लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   नेता
WFTW Body: 

पौल येशू ख्रिस्ताचा राजदूत होता (2 करिंथ 5:20). ख्रिस्ताचा राजदूत होण्याचे 12 चिन्ह आहते . तमु च्या जीवनातील या चिन्हांचा विचार करा.

1. देवाने बोलाविलेला (2 करिंथ 1:1). ''देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल''. त्याने स्वतःला पाचारले नाही. देवाने त्याला पाचारले. हे फार महत्वाचे आहे. जर देवाने तुम्हाला पाचारण दिले नाही तर सेवेत जाऊ नका.

2. तो पूर्णपणे प्रामाणिक होता (वचन 12). आपल्याकडून सर्व महत्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट जी देवाला हवी आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा व सात्विकपणा. तुमच्यामध्ये उणीवा असू शकतात, परंतु, जर तुम्ही प्रामाणिक व सात्विक आहात तर तुम्ही देवाचे खरे दास बनू शकता.

3. पवित्र आत्म्याद्वारे त्याला अभिषिक्त केले होते (वचन 22). तुमचे शिक्षण कितीही असू द्या, जर तमु चा पवित्र आत्म्याद्वारे अभिषके झाला नाही तर देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करू नका. देवाची सेवा सोडा व जाऊन दुसरे कार्य करा.

4. ज्याची त्याने सेवा केली त्यांच्यावर त्याने प्रीती केली (2 करिंथ 2:4). ''तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले''.

5. तो देवावर पूणर्प णे निर्भर होते (2 करिंथ 3:5). ''आमच्या अगं ची पात्रता देवाकडून आलेली आहे''. कोणत्याही मानवी संसाधनांवर तो अवलंबून नव्हता. लोकांनी दिलेल्या वस्तूंचा त्याने कदाचीत वापर केला असेल, परंतु, तो लोकांवर कधीच अवलंबून राहिला नाही. कोणत्याही मानवी गोष्टींवर तो अवलंबून नव्हता. तो पूर्णपणे देवावर अवलंबून होता.

6. त्याने हार मानली नाही (2 करिंथ 4:1). ''म्हणून आम्हावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही''. सेवेमध्ये अनेकदा सोडून देण्यासाठी तुमची परीक्षा झाली असेल. परंतु, पौलाने कधीच हार मानली नाही.

7. तो लोकांकरिता कित्ता झाला (2 करिंथ 6:3,4). ''तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो''. स्वतःच्या जीवनाद्वारे व वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये योग्य वर्तन ठेवून त्याने लोकांपुढे उदाहरण ठेवले.

8. त्याने कोणाचाही गैरफायदा घते ला नाही (2 करिंथ 7:2). त्याने कधीच स्वतःचे कार्य करण्याकरिता आपल्या सवे काला पाठविले नाही व त्याचा गैरफायदा धेण्याचा कधीच प्रयत्नही केला नाही. इतर लोकांच्या आदरातिथ्याच्या चांगलू पणाचा त्याने कधीच गैरफायदा घेतला नाही.

9. त्याने पैशाच्या वापर शहाणपणाने केला (2 करिंथ 8:20,21; 11:19). पैशाकरिता तो कोणावरही ओझे झाला नाही. पैशाचा वापर त्याने फार दक्षतेने केला. त्याला वाटले तेव्हा त्याने लोकांकडून पैसे घेतले नाही.

10. देवाने लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच तो राहिला (2 करिंथ 10:13).

11. बहेरुन येणारे दुःख सहन करण्यास तो तयार होता (2 करिंथ 11:23-33). त्याचप्रकारे शरीरात असणार्या काट्याद्वारे होणारे दुःख सहन करण्यास तो तयार होता (2 करिंथ 12:9,10). हे दुःखसहन देवाकडून होते व त्याचा पौलाने स्वीकार केला.

12. विश्वासाणाप्यांना परिपूर्णतके डे नेण्यास तो आतूर होते (2 करिंथ 13:9). ''जेव्हा आम्ही दुर्बळ असनू तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करितो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करितो''.

प्रेषित पौल असा होता. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचे अनुसरण करू या व त्याच्यासारखी देवाची सेवा करू या.