WFTW Body: 

१९९३ सालच्या ऑगस्ट महिन्याच्या एके दिवशी मी माझ्या मोपेडवरून वर फेकला गेलो आणि रेल्वे रुळावर पडलो, तेव्हा देवाने माझ्या प्राणाचे रक्षण केले. रेल्वे-फाटक चालवणारी व्यक्ती नवशिकी होती आणि मी ते पार करण्याआधीच दुसरा बार खाली केला गेला आणि म्हणून तो माझ्या छातीवर आदळला आणि त्याने मला खाली पाडले. मी रेल्वे रुळावर पडून राहिलो, थोडा वेळ बेशुद्ध पडलो - किती वेळ मला माहीत नाही. एखादी रेल्वे येण्यापूर्वी कोणीतरी मला उचलले. मला आता मेलेल्या अवस्थेतून परत आलेल्या एखाद्या व्यक्ती सारखे वाटते आहे (कारण माझे पडणे प्राणघातक ठरू शकले असते).

ही माझ्यासाठी एक नव्याने करून दिलेली आठवण होती की, माझ्या उर्वरित दिवसांकरिता मी माझे जीवन देवाला देणे लागतो. मी माझा वेळ, शक्ती किंवा पैसा मला हवा तसा खर्च करू शकत नाही. मला जे वाटेल ते मी वाचू शकत नाही. मला जे वाटेल ते मी बोलू शकत नाही. देवाचे गौरव कशाने होईल यावर सर्व काही ठरवावे लागेल. अशा प्रकारचे जीवन जगताना तणाव येणार नाही (जसे सैतान आपल्याला मानण्यास भाग पाडतो त्याप्रमाणे), परंतु हे सर्वात वैभवशाली जीवन असेल जे एखादा जगू शकेल - कारण आपला प्रभू असेच जीवन जगला. तुम्हांलाही असे अनुभव आले असतील जेव्हा तुम्हांला रस्त्यांवर प्राणांतिक अपघात होऊ शकले असते. पण देवाच्या दिव्यदूतांनी तुमचे रक्षण केले. त्यामुळे तुम्हीही देवाचे ऋणी आहात. आपले जीवन वाचवल्याबद्दल परमेश्वराची स्तुती करा. आपण असे जगूया जणूकाही आपल्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलेले आहे .

अपघातानंतर माझा हात आणि खांदा यांना दुखापत झाली होती, जे अपघातानंतर ३ आठवड्यांच्या आत, ९५% परत सामान्य झाले . तो एक चमत्कार होता, ज्यासाठी मी देवाचे आभार मानतो. त्या तीन आठवड्यांमध्ये मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे जीवनातील सामान्य गोष्टी गृहीत धरू नका - अगदी देवाची स्तुती करताना हात वर करण्याची क्षमता, जे मी त्या ३ आठवड्यांत करू शकलो नाही. ५४ वर्षांत प्रथमच, देवाची स्तुती करताना माझे दोन्ही हात वर करता आल्याबद्दल मी देवाचे आभार मानले. तोपर्यंत मी ती कृती गृहीत धरली होती. यामुळे मी माझ्या शरीराच्या इतर अनेक भागांच्या वापराबद्दलही कृतज्ञ झालो - जसे की माझे डोळे, कान आणि जीभ इत्यादि .

प्रत्येक गोष्टीसाठी आपण देवाचे आभार मानायला शिकले पाहिजे. माशाच्या पोटात असताना योनाने केलेली प्रार्थना सर्वात जास्त उद्बोधक आहे (योना २). जरी ती एक अरुंद जागा होती जिथे माशाच्या पोटातील आम्ले त्याच्यावर पडत होती, तरीही योनाने त्याला तेथे राहू दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. जेव्हा त्याने परमेश्वराचे आभार मानण्यास सुरवात केली, तेव्हाच परमेश्वराने माशाला योनाला कोरड्या जमिनीवर उलटी करण्याची आज्ञा दिली (योना २:९,१० काळजीपूर्वक वाचा).

त्यामुळे आपले घर, खाणेपिणे किंवा परिस्थितीबद्दल कधीही तक्रार करू नका. कृतज्ञता बाळगा. पुष्कळ मुले आपल्या आईवडिलांबद्दल आणि आपल्या घराबद्दल कृतज्ञ नसतात, जोपर्यंत ते विस्तृत जगात जात नाहीत आणि आयुष्य किती कठीण आहे हे त्यांना समजत नाहीत. कृतज्ञतेची वृत्ती तुम्हाला अनेक बंदिवासातून सोडवू शकते - जशी योनाची सुटका करण्यात आली होती.