लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   नेता
WFTW Body: 

शास्तेच्या 13 व्या अध्यायामध्ये आपण मानोहाच्या कुटुंबाविषयी वाचतो की त्यांना एकही लेकरू नव्हते. एका रात्री प्रभुचा दूत त्यांच्याकडे आला व त्याने त्यांना सांगितले की त्यांना मुलगा होईल. दूताने सांगितले की त्यांनी त्याचे केस कापू नये. त्यानंतर शमशोनाचा जन्म झाला. प्रभुने शमशोनाला आशीर्वाद दिला व देवाचा आत्मा त्याच्यावर आला (शास्ते 13:25). त्याचा अभिषेक करण्यात आला. देवाच्या सर्व पुढार्यांरच्या सामर्थ्यामागील गुपित हेच आहे. परंतु दुःखाची गोष्ट अशी की फार लवकरच शमशोन पथभ्रष्ट झाला असे आपण वाचतो. तो सुंदर स्त्री बघत असे तेव्हा त्याच्या वासना अनावर होत असे. देवाने केलेल्या पाचारणाचा त्याला विसर पडत असे व तो त्या स्त्रीमागे जात असे. ती स्त्री यहूदी असो व परराष्ट्री असो, तो पर्वा करीत नसे. सुंदर देखण्या स्त्रीच्या मागे त्याचे मन ओढल्या जात असे. त्याच्या संपूर्ण जीवनात ही त्याची उणीव वा दुर्बलता होती. ह्यात शंका नाही की देवाने त्याचा उपयोग करून घेतला. परंतु, सुंदर देखण्या स्त्रियांचा तो लोभी होता. ही त्याची मोठी उणीव होती. आज अनेक प्रचारकांमध्ये ही उणीव आहे. शमशोनाचे वर्तन व योसेफाच्या वर्तनामध्ये मोठी भिन्नता आहे. नियमशास्त्र देण्यापूर्वी योसेफ चांगले नैतिक जीवन जगला. शमशोनाप्रमाणे त्याला देवाच्या मार्गांचे कमी प्रमाणात प्रकटीकरण झाले होते. तरी देखील तो देवासोबत प्रामाणिक राहिला व हजारो वर्षांपर्यंत तरुणांसाठी चांगला कित्ता झाला आहे. याउलट हजारो वर्षांपर्यंत शमशोनाच्या अनैतिक जीवनातून आपल्याला महत्वाची ताकीद मिळते!

शास्ते 14:5-6 मध्ये आपण वाचतो, ''शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्यापाशी येऊन पोहंचला तो एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला. तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले.'' आपण कागद फाडावा तसा शमशोनाने त्या सिंहाला फाडून टाकले. त्याविषयी शमशोन इतका नम्र होता की त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही - स्वतःच्या आईवडिलांना देखील सांगितली नाही. शमशोनाला माहीत होते की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो असे करू शकला. शास्ते 14:10 मध्ये आपण वाचतो की त्याचे वडील त्या पलिष्टी स्त्रीला भेटण्यास गेले जी शमशोनाला आवडत होती. त्यांनी शमशोनाचे लग्न तिच्यासोबत लावून दिले. याठिकाणी त्यांनी देवाच्या नियमाचा स्पष्टपणे भंग केला. कारण देवाने स्पष्टपणे आज्ञा केली होती की इस्राएली लोकांनी परराष्ट्रीयांसोबत लग्न करू नये. शमशोनाच्या जीवनात पुष्कळ चढउतार होत गेले. कमी वेळा तो चांगले जीवन जगला परंतु बहुतेक वेळा तो पथभ्रष्ट स्थितीत राहिला. शास्ते 16:1 मध्ये आपण वाचतो की तो गज्जा येथे गेला. त्याने त्याठिकाणी वेश्या बघितली व त्याला ती आवडली व तिच्यासाबे त त्याने समागम कलेा. जेव्हा गज्जा येथील लोकांना हे कळले तेव्हा शमशानेाने शहराचे दरवाजे आणि दोन्ही दारकसे अडसरासंकट उखडनू खाद्यंवर घतेले व तो तिथनू निघनू गलेा. पुदे त्याची भटे पलिष्टी स्त्री दलीलासाबे त झाली व तो तिच्या पम्रेात पडला (शास्ते 16:4). दवेाने त्याला अनके वळेा त्याची चकू लक्षात आणनू दिली परंतु त्याने लक्ष दिले नाही. त्याला आनदं हातेा की दवे त्याचा उपयागे करून घते आहे . आज देखील अनेकांना आनदं वाटतो की दवे त्यांचा उपयागे करून घते आहे. शवे टल्या दिवशी अनके लाके प्रभुकडे येतील व प्रभुला म्हणतील की त्यांनी पुशकळ पक्रारच्या सेवा केल्या आहते व प्रभुने त्यांचा उपयागे करून घतेला आहे; परंतु प्रभु या सवांना अग्नीकुंडात टाकले कारण ते आपले खाजगी जीवन अनॆतिकपणे जगले (मत्तय 7:22,23). जर आपण देवाच्या सॊम्य ताकीदीकंडे दुर्लश्न केले तर त्या सेवकांप्रमाणे आपला देखील नाश होईल.

शमशोनाने शेवटी आपले डोके दलीलाच्या मांडीवर ठेवले आणि तेव्हा त्याने त्याच्या शक्तीचे गुपित तिच्याकडे उघड केले. तिला गुपित कळताच तिनेशमशोनाचे केस कापले व शमशोनाच्या सेवेचा अंत झाला. किती दुःखद घटना आहे ही! असा पुरुष जो मोठ्या सामर्थ्याने लोकांना मुक्त करीत असे तो स्वतः आपल्या वासनमे ळुे व अभिलाषमे ळु े बंि दस्त झाला. 1 करिथ्ं ा 9:27 मध्ये पालै म्हणता,े ''तर मी आपलें शरीर कदु लतों व त्याला दास करून ठेि वता;ेंअसें न कल्े यास मीं दसु र्या सं घाष्े ाणा कल्े यावर कदाचित् मी स्वतः पसतं ीस न उतरलले ा असा ठरने .'' ह्याचा अर्थ असा की आपण आपले शरीर नियत्रं णात ठवे ाव.े आपण इच्छा म्हणनू काही खाऊ नये तर आराग्े यासाठी खाव,े आळशी म्हणनू झापे त राहू नये तर शरीराला आवश्यक तवे ढी परु श्े ाी झापे घ्यावी. जे अयाग्े य ते बघू नय,े तर डाळे ्याचं ा याग्े य उपयागे करावा. जे वाइर्ट ते बाले ू नये तर जे बाले ण्याची गरज आहे तचे बाले ावे व जीभ ताब्यात ठवे ावी.

जर आपण आपल्या शरीराच्या वासना व मोह ताब्यात ठेवले नाही तर आपण चांगल्या प्रकारे संदेश दिले तरी शेवटल्या दिवशी प्रभु आपल्याला अग्नीकुंडात टाकेल. आपल्या शरीराच्या वासनांना व मोहांना ताब्यात ठेवून शरीराला शिस्त लावणे महत्वाचे आहे. शमशोनाच्या गोष्टीतून आपल्याला हा मोठा बोध प्राप्त होतो. त्याने अद्भुतप्रकारे सेवा केली व अनेकांसाठी आशीर्वादाचे कारण ठरला; परंतु स्वतःच अपात्र झाला. अनेक प्रचारक सुंदर स्त्रियांच्या माहे ाला बळी पडल.े अशा प्रचारकांच्या गुणानं ी व दानांनी प्रभावीत होऊ नका. सामान्य माणसाने हे पाप करणे त्यापक्ष्े ाा पुढार्यांने हे पाप करणे अधिक गंभीर आहे. ज्यांना जास्त देण्यात आले आहे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केली जाईल.

विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीसोबत तुम्ही नैतिक संबंध ठेवू शकत नसाल तर पुढारी किंवा वडील होऊन देवाच्या नावाचा अवमान करू नका. तुम्ही देवाने नियुक्त केलेले पवित्र पुढारी आहात असा देखावा करून लोकांना फसवू नका. पापी जीवन जगत असता ढोंग करू नका. तुम्ही तसे करीत राहिला तर एके दिवशी देव सर्वांपुढे तुमचे ढोंग उघड करील. तुम्हाला वाटत असेल की पाप लपविण्यात तुम्ही चालाख आहात; परंतु, देवापुढे तुम्ही चालाखी दाखवू शकत नाही. तो इतक्या प्रमाणात तुमचे ढोंग उघड करील की तुम्ही विचार देखील केला नसेल.