लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   पुरूष
WFTW Body: 

देव पुढीलप्रमाणे म्हणतो, ''आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो'' (नीतिसूत्रे 14:14). मी माझी साक्ष तुम्हाला सांगू इच्छितो. आज (नोव्हेंबर 2011 मध्ये) मी 72 वर्षांचा झालो आहे. गेल्या 52 वर्षांपूर्वी माझा नवीन जन्म झाला व तेव्हापासून मी देवाचे लेकरू आहे. मी प्रामाणिकपणे साक्ष देऊ शकतो की माझे ख्रिस्ती जीवन माझ्या ठायी तृप्त आहे. मी अनेक परीक्षेंमधून गेलो; परंतु त्यामध्ये मी अद्भुत रीतीने देवाचा अनुभव घेतला आहे. माझा विश्वास आहे की माझ्या जीवनाचा उत्तम भाग पुढे आहेच. मी देवाकरिता जीवन जगलो व त्याची सेवा केली ह्याचा आनंद मला आहे. या जगामध्ये देवाची सेवा करणे हीच सर्वात उत्तम गोष्ट आपण करू शकतो.

जगातील कोणाहीविरुद्ध माझी तक्रार नाही. माझे वाईट करण्यात कोणालाही यश आलेले नाही. अनेकांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला, माझ्या सहकार्यां नी माझा विश्वासघात केला व ते माझ्याविरुद्ध झाले. अनेक ख्रिस्ती लोकांनी माझ्याविरुद्ध खोट्या गोष्टी मासिकांमध्ये छापल्या व इंटरनेटवर दिल्या, काही लोक मला न्यायालयात घेऊन गेले; परंतु, या सर्व गोष्टी ख्रिस्तासोबतच्या माझ्या दुःखसहनाचा भाग होत्या. रोम 8:28 मध्ये सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी मिळून माझ्या हिताच्या ठरल्या. या सर्व गोष्टींकरिता मी देवाचे आभार मानतो कारण घडलेल्या वाईट गोष्टींचा देवाने वापर करून मला अधिक उत्तम बनविले. त्यामुळे मी ख्रिस्तासारखा होत गेलो आहे. घडलेल्या वाईट गोष्टींमधून ही सर्वात उत्तम गोष्ट घडली

सर्वप्रथम, आपल्याला भग्नहृदयी होणे गरजेचे आहे त्यानंतरच देव आपला उपयोग करील. देव अनेक लोकांचा व घटनांचा उपयोग करून आपल्यामधील गर्व ठेचतो व आपल्याला भग्नहृदयी करतो. तसेच स्वतःवरील फाजील विश्वास तो संपुष्टात आणतो व आपल्या नजरेत आपल्याला लहान करितो

माझ्य ा सुरुवातीच्या दिवसांमध्येच देवाने मला भग्न केले व तो आज देखील मला नम्र व भग्न करीत आहे. हा फलवंत जीवनाचा मार्ग आहे. जितक्या जास्त प्रमाणात आपण भग्न होत जाऊ तितक्या जास्त प्रमाणात देव आपला उपयोग करून आपल्याला इतरांच्या आशीर्वादाचे माध्यम बनवील. आपण निर्गम 17 मध्ये वाचतो की खडक फोडण्यात आल्यावरच त्यातून पाणी बाहेर वाहू लागले. पापी स्त्रीने अलाबास्त्र कुपी येशूकडे आणली तेव्हा ती फोडल्यावरच त्या घरामध्ये सुगंध दरवळला (मार्क 14:3). पाच हजार लोकांना जेवू घालण्याकरिता येशूने भाकर घेतली व त्यावर आशीर्वाद मागितला. भाकर मोडण्यात आली नाही तोवर ती कोणालाही वाढण्यात आली नाही. या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला काय संदेश मिळतो? हाच की भग्नता आशीर्वादाकरिता एक मार्ग आहे. जेव्हा अणू विभाजीत होतो तेव्हाच मोठा विद्युत प्रवाह निर्माण होऊन शहराला विद्युत शक्ती पुरविली जाते. अणू इतका सुक्ष्म असतो की तुम्ही तो सुक्ष्मदर्शी यत्रांमधून बघू शकणार नाही. परंतु, जेव्हा अणू फोडण्यात येतो तेव्हा भयंकर उर्जा बाहेर पडते. निसर्गामध्ये व बायबलमध्ये हाच संदेश आहे की भग्नतेतून देवाचे मोठे सामर्थ्य बाहेर पडते. हा संदेश आपली नवीन वर्षामध्ये पकड घेवो.

1963 मध्ये देवाने या संदेशाद्वारे माझी पकड घेतली. त्यावेळेस मी जीवनाकरिता व सेवेकरिता देवाचे सामर्थ्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होतो

नेव्हीमध्न निवृत्त होण्यापूर्वी देवाने मला दाखविले की भग्नतेचा मार्गच शक्तीचा मार्ग आहे. ही गोष्ट मी माझ्या जीवनात कधी विसरू इच्छित नाही

तरुण् ाांना मी सांगू इच्छितो की तरुण असतांनाच त्यांनी हा बोध घ्यावा दुसरी महत्वाची गरज ही की देवाच्या अभिवचनांवर आपला जिवंत विश्वास असावा मिसरात असलेल्या वडील इस्राएली लोकांना देवाने दोन अभिवचने दिली : ''मी तुम्हाला मिसराच्या बाहेर आणीन'' व दुसरे अभिवचन असे की, ''मी तुम्हाला कनान देशात नेईन'' (निर्गम 3:17). याठिकाणी दोन अभिवचने तुम्ही पाहिली. परंतु, केवळ पहिलेच अभिवचन पूर्ण झाले. दुसरे झाले नाही. त्या वडील जनांपैकी एक सुद्धा कनान देशात प्रवेश करू शकला नाही, कारण कनान देशामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी विश्वासाने प्रतिसाद दिला नाही (गणना 13). जोवर आपण विश्वासाचा प्रतिसाद देत नाही तोवर देवाची अभिवचने पूर्ण होत नाहीत. देवाची अभिवचने व आपला विश्वास विद्युतच्या दोन तार्यापपं ्रमाणे आहे. जव्े हा दान्े हीही तारा कार्यरत असतात तव्े हाच विद्युत प्रवाह काम करतो. तुम्हाला देवाचे अभिवचन कळेल परंतु, तुम्ही विश्वासाने पुढील वाक्य म्हटल्यास ते अभिवचन पूर्ण होते, ''होय, मी विश्वास ठेवतो की माझ्या जीवनामध्ये मी तृप्त होईन.'' कनान देशाच्या सिमेवर केवळ यहोशवा व कालेबाने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला व त्यामुळे तेच वतनदत्त भूमीत प्रवेश करू शकले. आशा करतो की आपण देखील असाच विश्वास धरावा व या नवीन वर्षी विजयाच्या वतनदत्त भूमित जगत राहावे

आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की हे नवीन वर्ष तुम्हाला आशीर्वादाचे व्हावे. या नवीन वर्षी तुम्ही अधिक भग्न होऊन देवावरील तुमचा विश्वास बहुगुणीत व्हावा