लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

असे दोनच प्रसंग आले जेव्हा येशू मंडळीबद्दल बोलला - मत्तय १६:१८ आणि १८:१७-२० मध्ये. आणि या दोन्ही प्रसंगात त्याने सैतान मंडळीविरुद्ध लढत असल्याचे सांगितले. पहिल्या संदर्भात येशूने म्हटले की सैतान आत्मिक मृत्यूच्या शक्तीने मंडळीवर थेट हल्ला करतो - दुष्ट आत्म्यांकडून. दुसऱ्या उदाहरणात तो म्हणाला, सैतान एखाद्या भावाला नकळत त्याचा प्रतिनिधी बनवून, त्याला फसवून व जिंकून अप्रत्यक्षपणे मंडळी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण सैतानाने जरी कोणतीही पद्धत अवलंबली, तरी प्रभूने आम्हाला सैतानी कार्यांना बांधून टाकण्याचा व त्याच्या ताब्यात आलेल्यांना मोकळे करण्याचा अधिकार दिला आहे (मत्तय १६:१९; १८:१८; २ तीमथ्या २:२६). आपण मंडळीमध्ये या अधिकाराचा पूर्ण धैर्याने वापर केला पाहिजे.

येशूने म्हटले की जी मंडळी तो बांधित आहे तिला ओळकण्याचे एक चिन्ह म्हणजे : ती अधोलोकावर विजय प्राप्त करते (आत्मिक मृत्युंच्या शक्ति वर ).दुसरीकडे, जर आत्मिक मृत्युच्या शक्ति - म्हणजे, मत्सर , अथवा कलह, अथवा स्पर्धात्मक आत्मा, अथवा सन्मान मिळवण्यास झटणे, अथवा अनैतिकता, अथवा पैश्यावरील प्रेम, अथवा ऐहिकता अथवा कटुता, अथवा गर्विष्ठपणा, अथवा मग्रुरपणा, अथवा परुशीवाद, इत्यादी, जर मंडळीवर विजय मिळवत असतील तर आपण खात्री बाळगू शकतो की अशा मंडळीची बांधणी नक्कीच येशू करीत नाही.

सैतान सतत मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. आणि बहुतेक वेळा तो आपल्या प्रतिनिधी मार्फत मंडळीमध्ये घुसखोरी करून असे करण्याचा प्रयत्न करतो. यहुदा सांगतो की "कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत" (यहुदा ४) जसे गिबोनाच्या रहिवाश्यांनी यहोशवाला फसवले (याहोशवा ९). गिबोनाच्या रहिवाश्यांप्रमाणे आज असे अनेक लोक आहेत ज्यांनी वडिलांना फसवून आणि शिष्य असल्याचे भासवून आणि चोरून मंडळीच्या मध्ये प्रवेश केला आहे. पण या लोकांनी वडिलांना फसवण्यात कसे यश मिळवले? कदाचित त्यांचा दरारा, अथवा त्यांच्याकडे असलेली संपत्ती किंवा त्यांचे पद यामुळे. बाबेलच्या सर्व संप्रदायांमध्ये, ज्या लोकांकडे जगिक पद किंवा संपत्ती आहे त्यांचा प्रभाव त्यांच्या गटात घेतलेल्या निर्णयांवर असतो, जरी ते वडील नसले तरी. पण ते आपल्या मध्ये कधीही असू नये. आपण मात्र जर काळजी घेतली नाही, तर गिबोनातील रहिवाशी आपल्या मंडळीमध्येही येतील.

अशा सैतानी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी प्रभू आपल्याकडे सतत लक्ष ठेवतो यासाठी प्रभूची स्तुति असो. "परमेश्वर जर नगर रक्षीत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे." (स्तोत्रसंहिता 127:1) केवळ जिथे बंधु ऐक्याने एकत्र राहतात तेथेच देव आशीर्वाद देण्याचे ठरवतो (स्तोत्रसंहिता १३३:१,३) आणि केवळ अविभक्त मंडळीच अधोलोकाच्या द्वारावर विजय मिळवू शकते. म्हणून पवित्र आत्मा आपल्या मध्ये सामर्थ्याने काम करतो, आपल्याला ऐक्यात राखण्यासाठी.

प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या स्वर्गाच्या ७ ओझरत्या दर्शनांमध्ये आपण स्वर्गातील रहिवाशांना सतत मोठ्या आवाजात देवाची स्तुती करताना पाहतो - कधी कधी विजेच्या गडगडाटासारखा आणि गर्जना करणाऱ्या नद्यांच्या आवाजासारखा. हे स्वर्गाचे वातावरण आहे - कोणत्याही तक्रारी किंवा मागणी शिवाय सतत स्तुती करणारे. आणि हेच वातावरण पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, आपल्या घरांमध्ये आणि आपल्या मंडळी मध्येही आणण्याची इच्छा आहे. अशाप्रकारे सैतानाला या सर्व ठिकाणांपासून दूर पळवता येईल.

सैतानाने बहुसंख्य ख्रिस्ती लोकांना पंगू केले आहे आणि त्याच्याविरुद्ध आध्यात्मिक युद्धासाठी त्यांना प्रभावहीन बनवले आहे, कारण तो त्यांना त्यांच्या बंधू-भगिनींविरूद्ध, त्यांच्या नातेवाईकांविरूद्ध आणि शेजाऱ्यांविरुद्ध, त्यांच्या परिस्थितीविरुद्ध आणि अगदी देवाच्या विरुद्ध ही कुरकुर करण्याच्या आणि तक्रार करण्याच्या आत्म्याने संक्रमित करण्यात यशस्वी झाला आहे.

प्रकटीकरण १२:८ मध्ये एक अद्भुत वचन लिहिले आहे की सैतानाला व त्याच्या दूतांना स्वर्गात कोणतेही ठिकाण उरले नाही. आपल्या आयुष्यातही असेच असले पाहिजे - आपल्या हृदयात, आपल्या घरात आणि आपल्या मंडळी मध्येही. सैतान आणि त्याच्या दूतांना यापैकी कोणतेही ठिकाणी सपडू नये.

आपण सैतानावर तेव्हा मात करतो, जेव्हा आपण या उपदेशांचे पालन करतो: ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणांत राज्य करो; तिच्याकरता तुम्हांला एकशरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा (कलस्सै ३:१५). तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी (१ तीमथ्य २:१). आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा. इफिसकरांस पत्र ५:२०. सर्वप्रथम आपल्याला उपदेश दिला आहे की ज्या सर्वांना देवाने ख्रिस्ताच्या शरीरात पाचारण केले आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. जर ही निवड आपल्यावरच सोडून देण्यात आली असती, तर देवाने ज्यांना बोलावले आहे अशा अनेकांना - विशेषत: जे आपल्यापेक्षा इतर काही गटातील आहेत त्यांना आपण कधीही बोलावले नसते!!! पण देवाचे शहाणपण आपल्या शहाणपणा पेक्षा उच्च असल्यामुळे, जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे म्हणून साहजिकच त्यांच्या बद्दल त्याचे आपल्यापेक्षा वेगळे मत होते. आणि जर आपण शहाणे असलो, तर आपण आपल्या विचारसरणीला देवाच्या अनुषंगाने पुन्हा एका रेषेत आणू. एकदा का आपण ख्रिस्ताच्या शरीरातील आपल्या बंधू-भगिनींशी कृतज्ञ असायला शिकलो की, मग आपण सर्व लोकांसाठी आणि नंतर आपल्या सर्व परिस्थितीसाठीही कृतज्ञ असू शकू. आपल्याला माहीत आहे की आपला स्वर्गीय पिता सर्व लोकांवर आणि सर्व परिस्थितीवर सार्वभौमपणे नियंत्रण करतो. जर आपण खरोखरच यावर विश्वास ठेवला, तर आपण देवाची सदैव स्तुती करू आणि अशा प्रकारे हे सिद्ध करू की आपले राज्य स्वर्गाचे आहे, या जगाचे नव्हे. मग सैतानाची आपल्यावरील सत्ता नाहीशी होईल. मगच आपल्याला त्याच्याविरुद्ध प्रभावी पणे युद्ध करता येईल.