शुभवर्तमानाचा स्पष्ट संदेश

Article Body: 

या लेखात "नव्याने जन्मणे" किंवा "तारण पावणे" म्हणजे काय याविषयी मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो.

या अनुभवाकरिता पश्चात्ताप ही पहिली पायरी आहे. परंतु, पश्चात्ताप करण्याकरिता (पापापासून फिरणे) प्रथम पाप म्हणजे काय हे कळायला हवे. आज पश्‍चात्तापाविषयी ख्रिस्ती लोकांमध्ये असलेल्या गैरसमजाचे कारण पापाविषयी त्यांच्यामध्ये असलेले चुकीचे समज.

गेल्या काही दशकांमध्ये खरिस्तीपणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे. बर्‍याचशा प्रचारकांद्वारे 'सुवार्तेचा" प्रचार सत्यामध्ये भेसळ करून केला जातो. लोकांना केवळ येशूवर विश्‍वास ठेवण्यास सांगण्यात येते. परंतु, जर पश्चात्ताप केला नाही तर केवळ येशूवर विश्‍वास ठेवल्यानेच कोणाचे तारण होणार नाही.

नव्याने जन्मणे हा खिस्ती जीवनाचा पाया आहे. पाया न घालता जर चांगले जीवन जगला; तर तुमचे ख्रिस्तीत्व केवळ जगातील इतर सर्व धर्मासारखे होईल - ते देखील लोकांना चांगले जीवन जगण्यास शिकवितात. आपण नक्कोच चांगले जीवन जगावे. परंतु ते जीवन ख्रिस्तीपणाची उत्कर्षाची कमान आहे - पाया नव्हे. नव्याने जन्मणे हा पाया आहे. आपण प्रत्येकाने पाया घालण्यापासून सुरुवात करावी.

योहान ३:३२ मध्ये धार्मिक पुढारी असलेल्या, देवभिरू व चांगले जीवन जगणार्‍या निकदेम नावाच्या माणसासोबत बोलतांना येशूने "नव्याने जन्मणे" असा वाक्‍्यप्रयोग केला. येशूने त्याला म्हटले, "मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येणार नाही" (योहान ३:२३). ह्या प्रकारे आम्ही पाहतो की जरी तुम्ही चांगले व्यक्‍ती असला तरी देवाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता तुम्हाला आत्मिक जन्म घेण्याची गरज आहे. नंतर येशूने त्याला म्हटले की तो (येशू) मरण्याकरिता वधस्तंभावर खिळला जाईल आणि जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल (योहान ३:१५,१६).

येशू त्याला पुढे सांगू लागला को मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधकारावर जास्त प्रीती केली कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती (योहान ३:१९). परंतु, जे खरे असतील ते प्रकाशात येतील व तारले जातील (योहान ३:२१). नव्याने जन्मण्याकरिता तुम्हाला प्रकाशात यावे लागेल; म्हणजे, देवासोबत प्रामाणिक राहून त्याच्यापुढे आपली पातके कबूल करतील. हे अगदी खरे आहे की केलेली सर्व पापे तुम्हाला आठवणार नाहीत. परंतु तुम्हाला हे कबूल केले पाहिजे की तुम्ही पापी आहात आणि ज्या पापांची आठवण होते त्यांचा परमेश्‍वरासमोर अंगीकार करावा.

पाप ही फार मोठी गोष्ट आहे. जीवनात सर्वप्रथम त्याचा लहान भागच आपणास दिसेल. ही गोष्ट अशीच आहे की आपण एका मोठ्या देशात राहूनसुद्धा त्यामधील एका लहान भागालाच तुम्ही पाहिले आहे. परंतु, जसजसे तुम्ही माहीत असलेल्या पापांपासून फिराल तस-तसे तुम्हाला पापरूपी मोठ्या प्रदेशाचे दर्शन होईल. तुम्ही प्रकाशात चालत असतांना तुम्हाला तुमची पापे अधिक दिसू लागतील व तुम्ही अधिक आणि अधिक त्यापासून शुद्ध होत जाल. यामुळे तुम्ही सदैव देवापुढे प्रामाणिकपणे चालत राहावे.

आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो : तुम्ही अशा घरात राहत आहात ज्यामध्ये अनेक अस्वच्छ खोल्या आहेत. तुमची इच्छा आहे की प्रभु येशूने येऊन तुमच्या घरामध्ये राहावे. परंतु, तो अस्वच्छ खोल्यांमध्ये राहू शकत नाही. यामुळे तो तुम्हाला एक-एक करून प्रत्येक खोली स्वच्छ करण्यास मदत करितो. हळूहळू संपूर्ण घर स्वच्छ होते. ख्रिस्ती जीवनामध्ये आपण अशाचप्रकारे पवित्रतेत वाढत जातो.

एक वेळ प्रेषित पौल म्हणतो को ज्या कोणत्याही ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी त्याने हेच शुभवर्तमान सांगितले : "पश्चात्ताप करून देवाकडे वळा व आपल्या प्रभु येशू खिस्तावर विश्वास ठेवा" (प्रेषित २०:२१). तुमच्या जीवनामध्ये चांगला पाया घालण्याकरिता व नव्याने जन्मण्याकरिता ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. देवाने पश्‍चात्ताप व विश्‍वास सोबत जोडले आहेत; परंतु, अनेक ख्रिस्ती प्रचारकांनी किंवा वक्त्यांनी त्यास विभाजीत केले आहे. आज शुभवर्तमानाच्या संदेशांमध्ये अनेकवेळा पश्‍चात्ताप वगळण्यात येतो. बहुतेक वक्ते केवळ विश्‍वासाविषयी संदेश देतात.

परंतु, जर तुमच्याकडे केवळ विश्‍वास आहे तर तुमचा नव्याने जन्म होऊ शकत नाही. ते अशाप्रकारचे को एखाद्या स्त्रीने कितीही कठीण प्रयत्न केले तरी तिला एकटीने बाळास जन्म देता येत नाही. पुरुषाला देखील एकटे राहून बाप बनता येत नाही. बाळाला जन्म देण्याकरिता स्त्रीला व पुरुषाला एकत्रित यावे लागते. त्याचप्रमाणे पश्‍चात्ताप व विश्‍वास एकत्रित येतात तेव्हा आत्मिक बाळाचा जन्म होतो - म्हणजे तुमच्या आत्म्यामध्ये नवीन जन्म होतो. हा आत्मिक जन्म शारीरिक जन्मासारखाच वास्तविक आहे - व तो देखील क्षणात होतो. तो हळूहळू होत नाही.

ज्याप्रकारे शारीरिक जन्माकरिता अनेक महिन्यांची तयारी लागते त्याचप्रकारे या नवीन जन्माकरिता अनेक महिन्यांची तयारी लागू शकते. परंतु, शारीरिक जन्माप्रमाणेच हा नवीन जन्म देखील क्षणामध्ये होतो. काही ख्रिस्ती लोकांना त्यांच्या नवीन जन्माची तारीख माहीत नसते. मला देखील माझ्या नवीन जन्माची तारीख माहीत नाही. ज्याप्रकारे कोणाला आपल्या शारीरिक जन्माची तारीख माहीत नसते त्याचप्रकारे हे आहे. जर आपण जिवंत आहोत तर - ही गंभीर बाब नाही!! त्याचप्रकारे आज आपण ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत अशी खात्री असणे महत्वाचे आहे.

येशूच केवळ देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण संकुचित विचारांचे असतो का?

ह्याचे उत्तर मी उदाहरणाद्वारे देऊ इच्छितो : ज्याने माझ्या वडिलांना बघितले नाही (किंवा त्यांचा फोटो देखील बघितला नाही) त्याला माझे वडील कसे दिसतात हे माहीत नाही. त्याचप्रमाणे आपण देवाला पाहिलेले नसल्यामुळे आपण त्याच्याविषयी काही जाणत नाही किंवा त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आपल्याला कळत नाही. परंतु, येशू ख्रिस्त देवापासून आला आहे आणि केवळ तोच आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकतो. त्याने म्हटले, "मार्ग मीच आहे... माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही" (योहान १४:६).

देवपित्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग येशू ख्रिस्त आहे असे येशू खिस्ताने म्हटले ह्याविषयी आपण विचार करतो तेव्हा एकतर आपण म्हणू शकतो को तो खरे बोलला किंवा आपण म्हणू शकतो की तो खोटे बोलणारा व फसविणारा होता. येशू खोटा व फसवा होता असे म्हणण्याचे कोण धैर्य करील? येशू चांगली व्यक्‍ती होती किंवा संदेष्टा होता असे म्हणणे केवळ पुरे नाही. नाही. तो स्वतः देव आहे - केवळ चांगला पुरुषच नव्हे. तो जर खोटा व फसविणारा होता तर तो चांगला पुरुष होऊ शकत नाही! म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो की येशू मनुष्याच्या रूपात खरोखर देवच होता.

सर्व सत्य संकुचीतपणाच्या विचारसरणीत बसते. गणितामध्ये २--२ नेहमी ४ असतात. आम्ही त्याचे संभवनीय उत्तर ३ अथवा ५ काढून फार विशाल मनाचे अथवा समजूतदार आहोत असे प्रतिपादन करू शकणार नाही. किंबहुना ३.९९९९ हे उत्तर देखील मान्य होणार नाही. जर आपण सत्य अशा फरकांनी मान्य केले तर आपले गणित चुकेल.त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की सुर्याभोवती पृथ्वी फिरते. जर आपण विशाल मन करून असे म्हटले की पृथ्वीभोवती सूर्य फिरतो तर खगोलशास्त्राचे गणित चुकेल. त्याचप्रमाणे रसायनशास्त्रात प,0 म्हणजे पाणी. विशालमन करून आपण ए,0 म्हणजे मीठ म्हणू शकत नाही. तर आपण पाहतो की सत्य प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण असते. विशालमनाची धारणा गणित, खगोलशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये गंभीर चुका घडवू शकते - तसेच देवाचे सत्य जाणण्याबाबतसुद्धा.

बायबल आपल्याला शिकविते की सर्व मानवजात पापी आहे - व येशू पाप्यांकरिता मरण पावला. म्हणून जर तुम्ही येशूकडे "खिस्ती" म्हणून आलात तर तो तुमच्या पापांची क्षमा करणार नाही कारण तो ख्रिस्ती लोकांकरिता मरण पावला नाही! तो पाप्यांकरेिता मरण पावला. त्याच व्यक्तीला क्षमा मिळेल जो येशूकडे येऊन म्हणेल, "प्रभु, मी पापी आहे". तुम्ही एखाद्या धर्माचे सदस्य होऊन येशूकडे पापक्षमेकरिता येऊ शकत नाही; कारण, तो पाप्यांकरिता मरण पावला. तुम्ही पापी म्हणून त्याच्याकडे आला तर तुमच्या पापांची ताबडतोब क्षमा होईल.

आपण पापी आहोत हे जाणून घेणे आपल्या सर्वाकरिता सोपे आहे - देवाने आपल्या सर्वांना सद्सदुविवेकबुद्धी दिली आहे. लेकरांना तर फार संवेदनशील विवेकबुद्धी असते जी त्यांना चुकांबद्दल लगेच जाणीव करून देते. परंतु, ते मोठे होत असतां त्यांचा विवेक कठोर व असंवेदनशील होत जातो. जेव्हा तीन वर्षाचे बालक खोटे बोलते तेव्हा त्याच्या चेहऱयावर दोषी भावना दिसतात; कारण त्याची विवेकबुद्धी दोषी असते; परंतु, १५ वर्षांनंतर तो चेहऱ्यावर हावभाव न होऊ देता खोटे बोलू शकतो; कारण, त्याने वारंवार विवेकाच्या वाणीकडे दुर्लक्ष करून विवेकास जिवे मारलेले असते. लहान मुलांच तळपाय इतके मऊ असतात की पीसांचा थोडासा फटकारादेखील त्यांना जाणवतो. परंतु, प्रौढांचे तळपाय इतके टणक असतात को एखादी टाचणी पायाखाली येऊनसुद्धा जर ती सरळ पायांत रूतली नाही तर त्याची त्याला जाणीवही होत नाही. त्यांच्या वयोमानाच्या वाढीबरोबर त्यांच्या विवेकाची गत अशाप्रकारेच नष्ट होते.

विवेक देवाने आपल्यामध्ये ठेवलेला "आवाज? आहे. तो आवाज आपल्याला सांगतो की आपण नेतिक प्राणी आहोत. काय चूक व काय बरोबर याविषयीचे ती आपल्याला ज्ञान देते. ही विवेकबुद्धी आपल्याला देवाकडून मिळालेले अद्‌भुत दान आहे. येशूने या विवेकबुद्धीला "हृदयाचा डोळा" संबोधिले आहे (लूक ११:३४). जर आपण या डोळ्याची चांगली काळजी घेतली नाही तर एकेदिवशी आपण आत्मिकरित्या अंध होऊ. या आत्मिक डोळ्यात जाणारा कचरा तितकाच घातक आहे जितका आपल्या शारीरिक डोळ्यात जाणारा कचरा होय. जर आपण या कचयऱ्याकडे दुर्लक्ष केले तर एके दिवशी आपण पूर्णपणे आत्मिकरित्या आंधळे होऊ.

जेव्हा लहान बालके जन्मतात तेव्हा त्या कोणालाही कोणता धर्म नसतो. ते सर्व सारखेच असतात. दोन वर्षानंतर देखील ते सारखेच असतात - स्वार्थी व भांडणारे. परंतु, काही दिवसानंतर आईवडील त्यांना वेगवेगळ्या धर्मांच्या सिद्धांतामध्ये घडवितात आणि अशाप्रकारे ते वेगवेगळ्या धर्माचे होतात. ९० टक्‍्यांपेक्षा अधिक लोकांचा धर्म त्यांच्या आईवडिलांनी त्यांना निवडून दिला आहे.

परंतु, देव आपल्याकडे बघतांना आपल्याला वेगवेगळ्या धर्माचे समजत नाही. तो आपल्या सर्वांकडे पापी लोक म्हणून बघतो. सर्व मानवजातीच्या पापांकरिता येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला. देवाच्या उपस्थितीत प्रवेश करण्याकरिता जे स्वतःला लायक समजतात त्यांच्याकरिता येशू आला नाही तर, अशांकरिता आला जे कबूल करतात की ते पापी आहेत व देवाच्या उपस्थितीत येण्याकरिता लायक नाहीत. तुमची विवेकबुद्धी तुम्हाला सांगते की तुम्ही पापी आहात. तर, "प्रभु मी पापी आहे, माझ्या जीवनात मी पुष्कळ चुका केल्या आहेत" असे येशूला सांगणे का अवघड जावे?

"ज्याप्रमाणे वडील आपल्या लेकरांची क्षमा करितात त्याप्रमाणे आपला चांगला देव आपल्या पापांकडे दुर्लक्ष करून आपली क्षमा करू शकत नाही का?" असा प्रश्‍न कदाचित कोणी विचारेल. जर लहान मुलाने मौल्यवान वस्तू तोडली किंवा हरविली आणि नंतर त्याला वाईट वाटले व त्याने आपल्या वडिलांना क्षमा मागितली तर त्याचे वडील त्याला क्षमा करतील. परंतु, पाप हा नैतिकतेचा विषय नाही. जर आपली पापे नेतिकतेचा विषय असती तर देवाने आपली लगेच क्षमा केली असती; परंतु, पाप अशाप्रकारचे नाही. पाप गंभीर गुन्हा आहे.

जर एखादी व्यक्‍ती न्यायालयामध्ये न्यायाधीश आहे व त्याच्यापुढे त्याचा मुलगा गुन्हेगार म्हणून कटघऱर्‍यात उभा आहे; तर "मुला मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझी क्षमा करितो, मी तुला दंड देत नाही" असे हा न्यायाधीश म्हणेल का? न्यायाचा थोडाही विवेक असणारा जगातील न्यायाधीश असे म्हणणार नाही. आपल्यामध्ये सर्व सामथी देवाच्या परिपूर्ण न्यायाचा फार थोडा अंश आहे. कारण, आपण त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले गेलो आहोत. जर आपण गंभीर चूक केलेली आहे तर देव जो न्यायी आहे तो म्हणेल, "मी तुमच्यावर खूप प्रीती करितो; परंतु, तुम्ही गुन्हा केला आहे - आणि त्याकरिता मी तुम्हाला शिक्षा करणे भाग आहे. त्या न्यायालयामध्ये मुलाला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल कितीही वाईट वाटले तरी न्यायाधीश असलेल्या त्या बापाला त्याला शिक्षा द्यावीच लागेल. कल्पना करा की त्या मुलाने बँकेमध्ये दरोडा घातला आहे. त्याचे वडील त्याला नियमाप्रमाणे दशलक्ष रुपयांचा दंड घोषित करीत आहेत. दंड भरण्याकरिता मुलाकडे पैसे नसल्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागणार! आता वडील न्यायाधीशाच्या खुचीवरून खाली उतरतात व न्यायाधीशाचा गणवेष काढून टाकतात. ते आपल्या वैयक्तिक धनादेशाचे पुस्तक काढून दशलक्ष रुपयाचा धनादेश लिहून देतात. ही त्यांच्या संपूर्ण जीवनाची कमाई असते. हा धनादेश ते आपल्या मुलाचा दंड भरण्याकरिता देतात. आता त्यांचा मुलगा त्यांना त्याच्यावर त्यांची प्रीती नाही म्हणून दोष देईल का? नाही! त्याचवेळेस इतर कोणीही या न्यायाधीशाला न्यायाकरिता दोष देऊ शकत नाही; कारण, नियमाप्रमाणे परिपूर्ण दंड सुनावला. नेमके हेच देवाने आपल्या सर्वाकरिता केले आहे. न्यायाधीश म्हणून त्याने आपल्या पापांकरेता आपल्याला मरणदंड सुनावला. नंतर तो मनुष्य होऊन या जगात आला आणि त्याने हा दंड स्वतःवर घेतला.

बायबल आपल्याला शिकविते की देव एक असला तरी तो तीन व्यक्तींमध्ये अस्तित्वात आहे - पिता, पुत्र व पवित्र आत्मा. जर देव एकच व्यक्‍ती असती तर त्याने आपले स्वर्गातील सिंहासन सोडले नसते व तो येशूच्या रूपात मानव बनून पृथ्वीवर आला नसता. मग विश्वाला कोणी चालविले असते. परंतु, देव तीन व्यक्तीत अस्तित्वात असल्यामुळे पुत्र पृथ्वीवर येऊ शकला व स्वर्गातील पित्यापुढे म्हणजे न्यायाधीशापुढे आपल्या पापांकरिता मरू शकला. काही ख्रिस्ती लोक केवळ येशूच्या नावात लोकांचा बाप्तिस्मा करितात. ते म्हणतात की देव केवळ एका व्यक्तीत उपस्थित आहे - केवळ येशू. ही गंभीर चूक आहे. १ योहान २:२२ मध्ये म्हटले आहे को जे पित्याचा व पुत्राचा नाकार करितात त्यांच्यामध्ये ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. कारण, ते नाकार करीत म्हणतात को येशू खिस्ताच्या रूपात देव पुत्र ह्या जगात आला नाही. ते त्याच्यामधील मानवी इच्छेचा नाकार करितात, देवपित्याच्या इच्छेचा देखील नाकार करितात. ते म्हणतात की ख्रिस्ताने देवपित्यापुढे आपल्या पापांकरिता शिक्षा सहन केली नाही (१ योहान ४:२,३).

येशू जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा तो पूर्ण देव व पूर्ण मानव होता. जेव्हा तो क्रूसावर मरण पावला तेव्हा त्याने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले. आपल्या पापाची शिक्षा ही सार्वकाळासाठी देवापासून विभक्ती होय आणि जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळले तेव्हा तो त्याच्या स्वर्गातील पित्यापासून विभक्त झाला. अशा प्रकारची विभक्ती अत्यंत भयंकर दुःखद आहे; ज्याचा क्वचितच कोणी मानव कधी अनुभव घेऊ शकेल.

विश्‍वात नरक अशी एक जागा आहे जी परमेश्वराने त्यागलेली आहे. देव तिथे नाही. म्हणून नरकात सर्व वाईट-दुष्ट गोष्टी सैतानाद्वारे पूर्णपणे प्रकट होतात. तीच दुष्टता नरकात जाणाऱ्या लोकांच्या स्थितीला वाईट व भयंकर बनविते. जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा येशूने ह्या शिक्षेचा अनुभव घेतला. तो सहा तास वधस्तंभावर खिळलेला होता. परंतु, शेवटच्या तीन तासाच्या अवधीत तो देवाद्वारे त्यागलेला होता. सूर्य अंधारमय झाला आणि पृथ्वी हलली. स्वर्गातील पित्यासोबत असलेले त्याचे संबंध आता तुटले होते. पिता ख्रिस्ताचा मस्तक आहे (१ करिंथ ११:३) आणि येशूचा त्याग करण्यात आला तेव्हा ते त्याच्या मस्तकाला वेगळे करण्यासारखे होते. त्याने सहन केलेले क्लेश आम्ही पूर्णपणे समजू शकत नाही.

जर येशू निर्मित मानव असता तर संभवतः अब्जो लोकांच्या पापांची शिक्षा जी आदामाच्या काळापासून होती ती त्याने स्वतःवर घेतली नसती! एक अब्ज खुन्यासांठी केवळ एकाच मनुष्याला वधस्तंभावर खिळले जाऊ शकत नाही! परंतु येशू ती शिक्षा स्वतःवर घेऊ शकला कारण तो अनंत परमेश्‍वर आहे.

तो अनंत परमेश्‍वर असल्यामुळे सार्वकालिक दंड केवळ तीन तासात घेऊ शकला.

जर येशू ख्रिस्त देव नसता व देव पित्याने त्याला आमच्या पापांकरिता शिक्षा दिली असती तर तो फार मोठा अन्याय झाला असता. देव एका व्यक्तीच्या गुन्ह्यामुळे दुसर्‍या व्यक्‍तीला शिक्षा देऊ शकत नाही मग त्याची इच्छा असली तरीसुद्धा. तुमचा मित्र तुमची शिक्षा स्वतःवर घेऊ शकत नाही. तो अन्याय होईल. म्हणून जर येशू निर्मित मानव असता व त्याला आपल्या पापाबद्दल दंड दिला असता तर तो मोठा अन्याय झाला असता.

म्हणून हे स्पष्ट आहे की आपल्या पापांसाठी कोणीही निर्मित मानव शिक्षा भोगू शकत नाही. केवळ देवच ती शिक्षा स्वतःवर घेऊ शकतो; कारण, तो जगाचा न्यायकर्ता आहे. आपल्याला दंड देण्याचा त्याला अधिकार आहे - व आपली शिक्षा स्वतःवर घेण्याचाही त्याला अधिकार आहे. जेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वीवर मानव बनून आला तेव्हा त्याने हेच केले.

ख्रिस्ती विश्‍वासाचा पाया दोन महान सत्यांवर आधारलेला आहे : पहिले सत्य, ख्रिस्त संपूर्ण मानव जातीच्या पापांकरिता मरण पावला; दुसरे सत्य, तीन दिवसानंतर तो मृत्यूतून पुनरुत्थित झाला.

जर ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित झाला नसता तर तो देव आहे ह्याचा कोणताच पुरावा नसता. त्याचे मरणातून पुनरुत्थित होणे आपल्याला एक पुरावा आहे की तो जे सर्व बोलला ते सत्य बोलला. कोणत्याच धार्मिक पुढाऱ्याने असा दावा कधी केला नाही की तो जगाच्या पापासाठी मरेल. कोणताच धार्मिक पुढारी मरणातून पुनरुत्थित झाला नाही. ही दोन सत्ये येशू ख्रिस्ताचा एकमेवपणा प्रकट करण्याकरिता पुरेशी आहेत.

सर्वच धर्म आपल्याला इतरांप्रती चांगले राहण्यास आणि शांतीत जीवन जगण्यास शिकवितात. परंतु खिस्ती विश्‍वासाला एकमेव पाया आहे : ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला व मरणातून परत उठला. जर ख्रिस्तीत्वातून ही दोन सत्ये काढली गेलीत तर ख्रिस्तीत्व सुद्धा इतर धर्मासारखे होईल. ही दोनच सत्ये खिस्तीत्वाला एकमेव बनवितात.

देवासाठी आपण जगावे म्हणून आपल्याला निर्माण करण्यात आले आहे. परंतु, आपण सर्व आपल्या स्वतःसाठी जगलो. म्हणून जेव्हा आपण देवाजवळ येतो तेव्हा आपण अशा पशचात्तापी चोरासारखे यावे जो अनेक वर्षांपासून देवाच्या मालमत्तेची चोरी करीत आहे. खिस्त आपणासाठी मरण पावला म्हणून आपण त्याच्याजवळ कृतज्ञ अंतःकरणाने यावे आणि आपण असा विश्‍वास ठेवावा की तो मरणातून उठला आणि आजही जिवंत आहे. जर ख्रिस्त आज जिवंत नसता तर आपण त्याच्याजवळ प्राथना करूच शकलो नसतो कारण तुम्ही मृत व्यक्‍्तीजवळ प्रार्थना करू शकत नाही. परंतु, येशू मरणातून जिवंत झाल्यामुळे आपण त्याच्यासोबत बोलू शकतो.

ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाल्यानंतर, त्याचे स्वर्गारोहण झाले व तो स्वर्गास परतला. नंतर पवित्र आत्मा, तिसरा व्यक्‍ती देवाचा मस्तक पृथ्वीवर आला. पवित्र आत्मा देखील येशू खरिस्तासारखे एक व्यक्‍तीत्व आहे. तो आपले जीवन त्याच्या उपस्थितीने भरण्यासाठी पृथ्वीवर आला. जर आपण पवित्र आत्म्याला प्रतिसाद देतो तर आपल्याला पवित्र करू शकतो. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो तेव्हा तुम्ही पापावर विजयी जीवन जगण्यासाठी पात्र होता. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा येण्यापूर्वी कोणीही व्यक्ती असे जीवन जगू शकत नव्हता. त्यापूर्वी लोक केवळ त्यांच्या बाह्य जीवनात सुधार आणू शकत होते. त्यांचे आंतरिक जीवन पापाद्दारे पराभूत व अपरिवर्तित होते. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हामध्ये येतो तेव्हा देवच स्वतः तुम्हामध्ये वास करतो आणि तुम्ही आंतरिक रीतीने सुद्धा चांगले जीवन जगू लागता.

शुभवर्तमानाचा अद्‌भुत संदेश हा आहे की जेव्हा देव तुमची क्षमा करतो तेव्हा तुमचे हृदय पूर्णपणे स्वच्छ होऊ शकते आणि नंतर ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या शरीराला देवाचे घर बनवून तुम्हामध्ये वस्ती करू शकतो.

सिगारेट ओढणाऱ्या एका ख्रिस्ती व्यक्तीसोबत मी एकदा बोलत होतो. मी त्याला विचारले को कधी त्याने चर्चमध्ये सिगारेट ओढली का? तो म्हणाला की तो असे कधीच करणार नाही कारण चर्चची इमारत ही देवाचे घर आहे. मी त्याला सांगितले की देवाचे घर हे तुझे शरीरच आहे चर्चची इमारत नव्हे. तुम्ही चर्च इमारतीच्या आत कधी व्यभिचार करणार नाही, होय ना? तुम्ही चर्च इमारतीच्या आत अश्लील दृश्य इंटरनेटद्वारे पाहणार नाही. जेव्हा ख्रिस्त तुम्हामध्ये वस्ती करतो तेव्हा तुमचे शरीर हे देवाचे मंदिर असते. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराच्या अवयवासंबंधी दक्ष राहा. सिगारेर ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थ घेणे आणि अशुद्ध विचारांना आपल्या मनात प्रवेश करू देणे या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला व तुमच्या मनाला हळूहळू नाश करतील.

ख्रिस्ती जीवन हे शर्यतीसारखे आहे. जेव्हा आपण पापाकडे पाठ फिरवितो व नवीन जन्म पावतो तेव्हा आपण धावण्याच्या शर्यतीच्या आरंभ रेषेवर उभे होतो. मग मॅराथॉन शर्यत सुरू होते - जी आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत सुरू राहते. आपण धावतो, धावतो आणि धावतो आणि अशाप्रकारे आपण प्रत्येक दिवशी अंतिम रेषेच्या जवळ आणि जवळ पोहंचतो. परंतु आपण धावणे कधीच थांबवू नये.

आणखी एक उदाहरण देता येईल : जेव्हा आपण नव्याने जन्मतो, तेव्हा आपण आपल्या घरासाठी पाया घालतो. त्यानंतर आपण हळूहळू वरची इमारत बांधत जातो आणि या इमारतीला अनेक मजले असतात.

हे सर्वोत्तम जीवन आहे, कारण हळूहळू तुम्ही जीवनातील वाईट गोष्टींना काढून टाकता व प्रत्येक वर्ष लोटत असता देवासारखे होत जाता.

म्हणून नव्याने जन्मण्याकरिता तुम्ही काय करावे?

सर्वप्रथम, जाणून घ्या की तुम्ही पापी आहात. तुम्ही स्वतःची इतरांसोबत तुलना करू नका आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात अशा कल्पनेत समाधान मानू नका. पाप हे घातक विषासारखे आहे. मग ते एक थेंब असो किंवा १०० थेंब असोत, तुम्ही ते पिल्यावर मरालच. जर तुम्ही तुमच्या खिस्ती जीवनात चांगली सुरुवात करू इच्छिता तर तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की जगातील सर्वात मोठ्या पाप्यापेक्षा तुम्ही चांगले नाही. नंतर तुमच्या जीवनातील सर्व ज्ञात पापापासून वळण्याचा तुम्ही निर्णय घ्या.

नंतर, ख्रिस्तावर विश्‍वास ठेवा, म्हणजे ख्रिस्ताला आपले समर्पण करा - केवळ त्याच्याविषयी जी माहिती आहे त्यावर विश्‍वास असणे पुरे नाही. तुम्ही कोणालाही आपले जीवन समर्पित न करता त्याच्यावर विश्‍वास ठेवू शकता. एका वधूला तिच्या विवाहाच्या वेळी विचारण्यात आले, "तुम्ही या व्यक्तीला आपले समर्पण करण्यास तयार आहात का?" कदाचित तिने असे म्हणून उत्तर दिले, "माझा असा विश्‍वास आहे की तो चांगला मनुष्य आहे. परंतु मला ही खात्री नाही की मी माझे संपूर्ण जीवन व भविष्य त्याला समर्पित करू शकेल किंवा नाही." ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही कारण तिचा त्याच्यावर विश्‍वास नाही. जेव्हा एखादी स्त्री विवाह करते, तेव्हा तिच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून जाते. तिच्या आडनावाच्या ठिकाणी तिच्या नवर्‍याचे आडनाव तिला मिळते. ती तिच्या आईवडिलाचे घर सोडते आणि आपल्या पतीसोबत जाऊन राहते. तिला माहीत नसते की तो कुठे राहणार; परंतु, ती तिच्या संपूर्ण भविष्याचा भरवंसा त्याच्यावर ठेविते. तिचा त्याच्यावर विश्‍वास असतो. ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्याचा अर्थ ह्या चित्रात दिसतो.

"ख्रिस्ती" म्हणजे "सौ. ख्रिस्त"! माझ्यासोबत लग्न केल्यावरच माझी पत्नी माझे नाव वापरू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही ख्रिस्तासोबत लग्न केल्यावरच त्याचे नाव वापरू शकता किंवा स्वतःला ख्रिस्ती म्हणू शकता. जर एखाद्या स्त्रीने माझ्याशी लग्न न करता स्वतःला "सौ. जॅक पूनेन" म्हटले तर ती लबाडी करीत आहे. त्याचप्रमाणे खिस्ताशी लग्न न करता आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणतो तर आपण लबाडी करीत आहोत.

विवाह हा नेहमीसाठी असतो, काही दिवसांपुरता नसतो. त्याचप्रमाणे, आपण ख्रिस्ती असणे म्हणजे जीवनकालचे समर्पित ख्रिस्ती असणे होय. आपण जेव्हा पूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित असतो तेव्हा असे नाही की आपण परिपूर्ण झालो आहोत. स्त्रीचे लग्न होत असता ती असे वचन देत नाही की ती आपल्या जीवनात कधीही चुकणार नाही. ती अनेक चुका करेल. परंतु, तिचा नवरा तिची क्षमा करेल. परंतु, लग्न होत असता ती वचन देते की ती आपल्या नवर्‍यासोबत नेहमीसाठी राहील. खरिस्तासोबत आपण एक होण्याचे हे चित्र आहे.

पुढील पायरी ही की तुम्ही पाण्याने बाप्तिस्मा घ्यावा. बाप्तिस्मा घेणे म्हणजे विवाहाचे प्रमाणपत्र घेणे. केवळ विवाहाचे प्रमाणपत्र घेणे म्हणजे विवाह नव्हे. त्याचप्रमाणे बाप्तिस्मा घेणे म्हणजे ख्रिस्ती होणे नव्हे. लग्न झाल्यानंतरच तुम्हाला विवाहाचे प्रमाणपत्र मिळते. तसेच तुम्ही ख्रिस्ताला स्वतःचे समर्पण केल्यावरच तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता. बाप्तिस्म्याद्वारे तुम्ही अशी साक्ष देता की तुम्ही आपले जुने जीवन मागे सोडले आहे आणि येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभु केले आहे. चांगले पती पत्नी एकदुसऱयांसोबत खूप बोलतात. तुम्ही देखील रोज श्रिस्तासोबत बोलावे व बायबलमधून तो तुमच्याशी बोलत असता त्याचे ऐकावे.

चांगली पत्नी आपल्या पतीला कधीही दुखवीत नाही किंवा पतीला दुःख होईल असे काही करीत नाही. ती आपल्या पतीसोबत मिळून त्याच्या सहभागितेत सर्वकाही करते. खरी ख्रिस्ती व्यक्ती देखील खिस्ताला न आवडण्यासारखे काही करणार नाही - ख्रिस्ताला न आवडणारा सिनेमा देखील पाहणार नाही. जी गोष्ट येशू खरिस्तासोबत मिळून करता येणार नाही ती गोष्ट खरी ख्रिस्ती व्यक्‍ती करणार नाही.

तुम्ही नव्याने जन्मला आहात अशी तुम्हाला खात्री आहे का? रोम ८:१६ मध्ये म्हटले आहे को जेव्हा तुम्ही नव्याने जन्मला आहात तेव्हा देवाचा पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत.

हे अद्भुत जीवन आहे - कारण आपण सर्वात उत्तम मित्रासोबत जीवन जगत आहोत. आपण कधीही एकटे राहत नाही कारण येशू सदैव सर्वठिकाणी आपल्यासोबत आहे. आपण आपल्या समस्या येशूला सांगू शकतो व त्याने आपली मदत करावी अशी त्याच्याजवळ प्रार्थना करू शकतो. हे जीवन आनंदाने भरले आहे. या जीवनामध्ये चिंता व भय नाही कारण आपले भविष्य येशूच्या हातांमध्ये आहे.

जर तुम्ही नव्याने जन्म घेऊ इच्छिता तर आताच पूर्ण मनाने प्रामाणिकपणे प्रभूला पुढील प्रमाणे म्हणा:

"प्रभु येशू, माझा विश्‍वास आहे को तू देवाचा पुत्र आहेस. नरकात जाण्याच्या लायकीचा मी पापी आहे. माझ्यावर प्रिती केली म्हणून व माझ्या पापांकरिता तू वधस्तंभावर प्राण दिला म्हणून मी तुझा आभारी आहे. माझा विश्‍वास आहे की तू मरणातून परत जिवंत झाला व आजही जिवंत आहेस. मी आता या क्षणाला या पापी जीवनापासून फिरू इच्छितो. कृपया माझ्या सर्व पापांची क्षमा कर व मला पापाचा वीट वाटावा असे मन मला दे. ज्या लोकांनी माझे वाईट केले त्या सर्वाची मी क्षमा करतो. प्रभु येशू माझ्या जीवनामध्ये ये. आजपासून पुढे तू माझ्या जीवनाचा प्रभु हो. आता या क्षणाला मला देवाचे लेकरू बनीव."

देवाचे वचन सांगते, "परंतु जितक्यांनीं त्याचा स्वीकार केला तितक्‍यांना म्हणजे त्याच्या नांवावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यानें देवाचीं मुलें होण्याचा अधिकार दिला" (योहान १:१२). प्रभु येशू म्हणतो, "...जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही" (योहान ६:३७).

तर तुम्हाला खात्री आहे की त्याने तुमचा स्वीकार केला आहे.

तुम्ही त्याचे आभार मानू शकता, "प्रभु येशू मी तुझा आभारी आहे कारण तू माझी क्षमा केली आहेस व माझा स्वीकार केला आहेस. कृपा करून तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर व तुझ्याकरिता जीवन जगण्याचे सामर्थ्य मला दे. आजपासून पुढे मी केवळ तुला संतोषवू इच्छितो."

आता तुम्ही रोज देवाचे वचन वाचावे व रोज प्रभुजवळ प्रार्थना करावी को त्याने त्याच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला भरावे. नव्याने जन्मलेल्या खिस्ती लोकांसोबत तुमची सहभागिता असावी आणि मग तुम्ही खिस्ती जीवनात वाढत जाल व ख्रिस्ताच्या मागे चालू शकाल. प्रभुला विनंती करा की त्याने तुम्हाला चांगल्या मंडळीमध्ये सभासद होण्याचे मार्गदर्शन करावे. प्रभु तुम्हाला विपुल आशीर्वाद देवो.