WFTW Body: 

पवित्र शास्त्रात तीन प्रकारच्या बागा आपण बघतो.

1. एदेन बाग : उत्पत्ती 2:8,15 मध्ये असे म्हटले आहे, ''परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनास बाग लाविला आणि तींत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले. परमेस्वर देवाने मनुष्यास एदने बागते नेऊ न तिची मशागत व राखण करण्यास ठेविले''. त्या बागते पापाने कसा प्रवेश केला? आदाम व हव्वचेया दाने चुकीच्या वृत्तीमुळे हे घडले. पहिली गोष्ट, गर्व. त्यांना वाटले की, देवापेक्षाही त्यांना अधिक माहीत आहे. त्यांनी विचार केला की, देवाची आज्ञा माडे ली तर चालले व ते यातनू सटु नू जातील. आज जगातील अनके लाके असाच विचार करितात. दसुरी गोष्ट, स्वार्थीपणाची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांनी विचार केला की, फळ खाऊन स्वतःकरिता काही मिळवावे. त्या ठिकाणी असे लिहिले आहे की, स्त्रीने फळाकडे बघितले आणि तिला ते सुंदर दिसले. तिला वाटले की, त्याद्वारे तिची इच्छा पूर्ण होईल व ती ज्ञानी बनेल. प्रारंभी, गर्व व स्वार्थीपणा या दोन गोष्टी पापाचे मूळ बनल्या. आज मानवी समाजात या गोष्टीच पापाचे मूळ कारण बनत आहेत. याविषयीचे अनेक प्रमाण आपल्याला समाजात दिसत आहेत. मूलभूतपणे मनुष्य हा स्वकेंद्रीत बनला आहे व देवापासून स्वतंत्र जीवन जगण्याची तो इच्छा धरितो. यामुळेच पाप घडते व ते वाढत जाते.

2. गेथशेमाने बाग व कालवरी : पापाने एका बागेत प्रवेश केला आणि एका बागेतच येशूला अटक झाली की आपल्या तारणाच्या महत्वाच्या कार्याची सुरुवात व्हावी. गेथशेमाने बागेविषयी अनेकांना माहीत आहे. परंतु, त्यांना हे माहीत नाही की, येशूला बागेतच खिळण्यात आले आणि बागते च त्याला पुरण्यात आले. योहान 19:41 मध्ये म्हटले आहे, ''त्याला वधस्तंभीं खिळिलें होतें त्या ठिकाणीं एक बाग असनू तिच्यातं एक नवी कबर होती, तिच्यामध्यें त्या वळे पे र्यंत कोणालाहि ठेविलें नव्हतें''. येशूचा बागते च विश्वासघात झाला होता, बागेतच त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, बागेतच त्याला पुरण्यात आले आणि बागेतच तो पुनरुत्थित झाला. त्या बागेतच आपल्याकरिता तारण आले. त्या बागेत येशूने केलेल्या सर्व कार्याचे लाभ आज आपल्याकरिता आहेत. जेव्हा आपण येशूच्या जगातील जीवनाकडे बघतो तेव्हा आपल्याला दिसते की, गर्व व स्वार्थीपणा जो आदामामध्ये आपण बघितला त्याच्या अगदी विरुद्ध आपल्याला येशूमध्ये बघावयास मिळते. ख्रिस्ताच्या जीवनात आपण नम्रता बघतो. त्याच्या पित्याची त्याच्याकरिता जी इच्छा होती ती पूर्ण करण्यास तो तयार होता. मग, वधस्तंभावरचे मरण देखील त्याने स्वेच्छेने पत्करले. त्याने तयारी दाखवून कोणत्याही कराराविणा तो मार्ग निवडला. ख्रिस्ताने देखील स्वतःच्या गरजांविषयी विचार न करता निस्वाथर्प णे इतरांच्या गरजांचा विचार केला व त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अर्पण करण्यासही तो तयार झाला. हीच वृत्ती आपल्यामध्ये असावी अशी देवाची इच्छा आहे.

3. वराची बाग : गीतरत्नात या बागेचे वर्णन केले आहे. हे गीत पती आणि पत्नीमधील, वधू आणि वरामधील संबंध वर्णन करते. गीतरत्न 4:12 मध्ये वर म्हणतो, ''माझी भगिनी, माझी वधू ही बदं असलेली बाग, बदं असलेला निझर्र , माहे रबदं कारंजे हाये ''. याठिकाणी वर म्हणजे ख्रिस्त आहे आणि आपण त्याची वधू आहाते व त्याच्याकरिता मोहरबदं केलेली बाग आहाते . परंतु, ही बाग आपल्या स्वतःच्या लाभाकरिता किंवा इतरांच्या लाभाकरिता नसनू ती प्र्भुच्या लाभाची आहे. आपण हे नहे मी लक्षात ठेवावे की, आपले जीवन हे प्र्भुची खाजगी बाग आहे. नंतर, त्याचे फळ म्हणून, त्याद्वारे इतर लोक आशीर्वादित होतील

हचे येशूने शिकविले. जेव्हा कोणी तरी येशूला विचारिले की, सवार्त मोठी आज्ञा कोणाती तेव्हा, तो त्याला म्हणाला, ''तूं आपला दवे परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणानें, पूर्ण जिवानें' व 'पूर्ण' मनानें प्रीति कर, तेव्हाच तूं स्वतःसारखी शेजार्यांवर प्रीती करण्यास समर्थ होशील'' (मत्तय 22:37-40 मधील वचने स्वशब्दात मांडली आहेत). आपल्या जीवनाची सुरुवात प्रथम देवापासूनच व्हावी. म्हणूनच देवाने आदाम व हव्वेची निर्मिती एकत्र न करता वेगवेगळी केली, जेणेकरून जेव्हा आदाम आपले डोळे उघडेल तेव्हा त्याने हव्वेला न बघता, प्रथम देवाला बघावे. जेव्हा हव्वेला बनविण्यात आले तेव्हा तिने आदामाला न बघता प्रथम देवाला बघावे. जर आपले जीवन पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे करायचे असेल तर आपणही आपल्या जीवनात हाच मार्ग अवलंबिणे गरजेचे आहे

गीतरत्न 4:16 मध्ये लिहिले आहे, ''हे उत्तरवायू, जागृत हो; दक्षिणवायू तूंहि ये; माझ्या बागेवरून वाहा, तिचा परिमल पसर माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो''. आपल्या जीवनात देखील आपण उत्तरेकडील दुःखाच्या वार्याचा व दक्षिणेकडील भरभराटीच्या वार्याचा सामना करितो. परंतु, जेव्हा येशू आपल्या जीवनाचा प्रमुख असतो व त्याला आपण आपल्या जीवनावर नियंत्रण करू देतो तव्े हा दुःखाचा वारा असो किंवा भरभराटीचा वारा असो, परीक्षा असो किंवा सांत्वना असो, याद्वारे ख्रिस्ताचा सुगंध चहूकडे दूरवर पसरल्या जाईल आणि शेवटी आपण याठिकाणी वाचतो, ''माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो''. दुःखाच्या काळातील तुमचा विजय हा केवळ प्रभुने पाहण्याकरिता असावा. त्याचे इतरांपुढे प्रदर्शन नको. जेव्हा इतर लोक तुमच्या जीवनाकडे बघू शकत नाहीत तेव्हा देव गुप्तपणे तुमचे जीवन बघत असतो आणि जेव्हा तो त्याच्या बागेत येईल तेव्हा त्याला बागेत अशीच गोष्ट दिसावी ज्याद्वारे त्याचे मन उल्हासीत होईल

प्रत्येक बागेला पावसाची गरज असते. नवीन करारामध्ये स्वर्गीय पावसाची - पवित्र आत्म्याने भरले जाण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. याकरिता पूर्ण मनाने देवाचा शोध घ्यावा असे मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. पवित्र आत्म्याने भरणे म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर पवित्र आत्म्याला नियंत्रण करू देणे. स्वर्गीय पाऊस मिळावा म्हणून प्रत्येक दिवशी स्वतःचे अंतःकरण देवापुढे उघडे करा. तेव्हाच तुमचे जीवन भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होईल