WFTW Body: 

लबाड बोलून प्रभुला तीन वेळा नाकारल्यानंतर पेत्र कनवाळू प्रेषित होऊ शकला. पेत्राने तसे पाप करावे अशी देवाची इच्छा नव्हती. परंतु, पेत्रामध्ये कार्य घडवून आणण्याकरिता देवाने पेत्रासोबत तसे घडू दिले. जे जीवनामध्ये अपयशी झालेत त्यांच्याप्रती पुढे पेत्राला दया वाटू लागली व आपुलकी वाटू लागली.

येशूने एकदाही पाप केले नाही तरीही तो पाप्यांप्रती दयाळू व कनवाळू होता. परंतु, आदामाच्या वंशामध्ये येशूसारखा दुसरा कोणीही झाला नाही. जे लोक चुकत नाहीत किंवा पापात पडत नाहीत ते लोक कठोर मनाचे असतात, त्यांना पाप्यांप्रती दया व करुणा नसते.

पेत्राने ज्यावेळेस येशूला नाकारण्याचे पाप केले त्यावेळेस देव सहजरीतीने पेत्राला रोकू शकत होता की पेत्राने प्रभुला नाकारण्याच्या परीक्षेत पडू नये. तरीदेखील परीक्षेच्या परिस्थितीतून देवाने पेत्राला बाहेर ठेवले नाही.

योहान 18:15-18 मध्ये आपण बघतो की योहान व पेत्र येशूच्या मागे मागे मुख्य याजकांच्या सभेपर्यंत पोहंचले. योहानाची मुख्य याजकासोबत ओळख होती म्हणून द्वारपालाने त्याला आत प्रवेश दिला. परंतु, पेत्र आंत जाऊ शकला नाही. तेव्हा योहान तिथे आला व त्याने पेत्राकरिता परवानगी काढली. तोपयंत सर्व काही व्यवस्थित होते. पाहा, योहानाने पेत्राकरिता परवानगी काढली नसती तर त्या रात्री पेत्राने प्रभुला नाकारण्याचे पाप केलेच नसते. कारण आतमध्येच पेत्राला प्रश्न विचारण्यात आले होते आणि आतच त्याने प्रभुला तीन वेळा नाकारले (पाहा योहान 18:17,25,27).

आपण याठिकाणी एक प्रश्न विचारू शकतो, ''देवाने पेत्रासोबत असे का घडू दिले?, देवाने पेत्राला आत प्रवेश मिळू द्यायला नको होता, का ही देवाने चूक केली?'' नाही, देवाने त्याच्या सार्वभौमत्वात असे घडू दिले की योहानाने पेत्राकरिता परवानगी काढावी, पेत्राला आत प्रवेश मिळावा व पेत्राच्या अपयशाद्वारे त्याला आत्मिक शिक्षण लाभावे. जर पेत्राला हे शिक्षण मिळाले नसते तर कदाचित तो प्रेषितांचा पुढारी होऊ शकला नसता व प्राचीन मंडळीमध्ये सुवार्ताप्रचाराचा पुढारी होऊ शकला नसता.

पेत्राची परीक्षा घेण्याकरिता सैतानाचे प्रतिनिधी हजरच होते. परंतु, त्याकरिता देखील त्यांना देवाची परवानगी घेणे गरजेचेच होते. परंतु, येशूची प्रार्थना होती की अशा या अपयशामध्ये देखील पेत्राचा विश्वास डळमळू नये (लूक 22:31,32). याठिकाणी येशूच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले आहे. या अपयशाच्या अनुभवातून पेत्र भग्न, अनुतप्त व कनवाळू झाला. त्यापुढील जीवनात त्याने पाप्यांना वाईट वागणूक दिली नाही. ज्या ज्या वेळेस पाप्यांना वाईट समजण्याचे विचार त्याच्या मनात येत असतील त्या त्या वेळेस त्याला स्वतःच्या अपयशाची आठवण होत असे.

जर आपला विश्वास दृढ असला तर आपल्या जीवनातील वाईटात वाईट अनुभवाचा उपयोग देव आपल्या हिताकरिता व चांगल्याकरिता करितोपेन्टेकॉस्टच्या सात आठवड्यांपूर्वी पेत्राला अनेक वेळा वाटले असेल की योहानाने त्याच्याकरिता परवानगी काढायला नको होती जेणेकरून त्याने प्रभुला नाकारले नसते. परंतु, तो भग्न हृदयाचा झाला नसता तर पेन्टेकॉस्टच्या दिवशी पाप्यांना तो सुवार्ता सांगूच शकला नसता.

आपल्याला माहीत आहे की पेत्राने पापाविरुद्ध शिक्षण दिले आहे. त्याने त्याच्या पत्रामध्ये लिहिले आहे की आपण येशूचे अनुकरण करावे, पाप करू नये व पापापासून दूर राहावे (1 पेत्र 2:2,22; 4:1,2). परंतु, पेत्र भग्नहृदयाचा झाल्यानंतर मोठ्या करुणेने सुवार्ता गाजवू शकला. यामुळेच त्याला पेन्टेकॉस्टच्या दिवशी संधी मिळाली की त्याने यहूदी लोकांना सुवार्ता सांगावी व कर्नेल्याच्या घरामध्ये परराष्ट्रीयांना देखील सुवार्ता सांगावी. याठिकाणी देव याकोब व योहानाचा उपयोग करून घेऊ शकला असता. परंतु, देवाने तसे केले नाही. वाईट रीतीने पापात पडलेल्या पेत्राचा देवाने उपयोग केलाकारण पेत्रच पाप्यांना मोठ्या करुणेने सुवार्ता सांगण्यास तयार झाला होता.

दावीद देखील पेत्रासारखाच होता. दाविदाने आळस केला व तो युद्धासाठी गेला नाही आणि आपल्याला माहीत आहे की तो भयंकर अशा पापात पडला. त्या पापामुळे अनेक वर्षांपर्यंत दाविदाला वाईट परिणाम सहन करावा लागला (2 शमुवेल 11:1-5). पवित्र आत्म्याने नमूद केले आहे, ''कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरिया हित्ती याचे प्रकरण खेरीज करून तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही'' (1 राजे 15:5). तरीदेखील देवाने दावीदाला भग्न करण्याकरिता दाविदाच्या अपयशाचा उपयोग केला. त्यामुळेच दावीद स्तोत्र 51 लिहू शकला. हे दावीदाचे स्तोत्र अनेक शतकांपासून शतकांपर्यंत लोकांच्या आशीर्वादाचे कारण झाले आहे. जर दावीद त्या भयंकर पापात पडला नसता तर तो स्तोत्र 51 लिहूच शकला नसता. त्याचे अपयश भयंकर व जगजाहीर होणे गरजेचे होते जेणेकरून त्याने नम्र व्हावे व भग्न हृदयाचे व्हावे. त्यापुढे संपूर्ण जीवनभर दावीद भग्न हृदयाचा राहिला. आपण पाहतो की पुढे येशूने स्वतःला दाविदाचा पुत्र म्हटले आहे!!