लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मूलभूत सत्य
WFTW Body: 

लव्हलँड, कोलोरॅडो याठिकाणी झालेल्या (मार्च 18 ते 20, 2011) पुरुषांच्या सम्मेलनातील टिपणी थोडक्यात दिल्या आहेत

(सत्रांच्या ध्वनीफिती व चित्रफिती उपलब्ध आहेत. पुढील साईट वर संपर्क करावा.
http://rlcfchurch.org/rlcf-mens-leadership-conference-2011)
• साक्षी होणे म्हणजे (प्रेषित 1:8) तडजोड न करता देवाच्या सर्व सत्यासाठी खंबीर उभे राहणे
• देवाच्या दासाची वेळोवेळी परीक्षा होईल परंतु त्याने निराश होऊ नये
• ख्रिस्तासारखे असणे म्हणजे स्वतःसाठी अश्रू गाळणे नव्हे तर इतरांच्या दुःखात अश्रू गाळणे
• देवाच्या वचनातील आरोग्य आपण जपावे (2 तीमथ्य 1:13)
• एकदा देवाच्या आत्म्याने भरण्याचा फार कमी उपयोग आहे, एकदाच कारमध्ये पेट्रोल भरल्याप्रमाणे ते आहे
• येशू पृथ्वीवर असताना बहुतेक लोकांना माहीत नव्हते की त्र्यैक्यातील दुसरी व्यक्ती त्यांच्यामध्ये वावरत आहे
• आज बहुतेक लोकांना जाणीव नाही की त्र्यैक्यातील तिसरी व्यक्ती आज पृथ्वीवर सर्वत्र वावरत आहे
• तुमच्या बाबतीत लोकांनी पुढीलप्रमाणे म्हणावे, ''देवाने पाठविलेला मनुष्य आला व तो ख्रिस्ताची साक्ष झाला'' (योहान 1:6-7)
• आज आपली जबाबदारी आहे की आपण जगाचा प्रकाश व्हावे (पाहा योहान 9:5 व मत्तय 5:14). चंद्र सुर्याचा प्रकाश प्रतिबिंबीत करतो तसे आपण ख्रिस्ताचा प्रकाश जीवनातून प्रतिबिंबीत करावा
• देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनात व आपल्या सेवेत आपण असे फळ द्यावे जे सदासर्वकाळ टिकेल (योहान 15:16) - असे फळ देऊ नये जे काही वर्षांमध्ये नाहीसे होईल
• नवीन कराराच्या अंतर्गत देवाची सेवा करण्यामध्ये मोठा फरक हा की ह्या सेवेची सुरुवात अति पवित्र स्थानी होते. यामुळे देवाची सेवा करण्याकरिता आपण प्रथम त्याची भक्ती करावी (मत्तय 4:10)
• आपण खरोखर देवाची भक्ती करण्यास शिकलो तर आपल्याला देवाच्या उपस्थितीत कंटाळा येणार नाही
• आपल्या पत्नीकडून पूर्ण अधीनतेची अपेक्षा करण्यापूर्वी आपण पूर्णपणे आपला मस्तक ख्रिस्त ह्याच्या अधीन व्हावे व समर्पित व्हावे (1 करिंथ 11:3)
• ज्याने अधिकाराच्या विरुद्ध बंड केला (सैतान) त्याच्याद्वारे पाप जगात आले. पापाकरिता तारण येशूद्वारे आले कारण येशू नेहमी अधिकाराच्या अधीन असे
• अधिकारी परिपूर्ण असो वा नसो आपण अधिकाराच्या अधीन असावेच. येशू अपरिपूर्ण योसेफ व मरीयेच्या अधीन तीस वर्षे राहिला
. रोमकरांस पत्रामध्ये टप्याटप्याने सुवार्ता ऐकत असता एक महत्वपूर्ण टप्पा आपल्याला दिसतो की आपण जगातील अधिकार्‍यांच्या अधीन असावे (रोम 13:1-7)
• भग्न न झालेल्या मनुष्याने मंडळीमध्ये अधिकार गाजविणे फारच धोकादायक आहे
• सार्वकालिक जीवनाला केवळ शेवटच नाही तर सुरुवात देखील नाही. हे जीवन देवाचेच जीवन आहे - हा दैवी गुण आहे (योहान 17:3; 2 पेत्र 1:4)
• ख्रिस्तासोबत चालणार्‍या पुरुषाचे प्रथम चिन्ह नम्रता आहे (मार्क 11:29)
• ज्या देवाने आज्ञापिले, ''खून करू नको'', ''व्यभिचार करू नको'' व ''चोरी करू नको'' त्या देवाने तीन वेळा आज्ञापिले, ''लोभ धरू नको'' (मत्तय 6:25-34) व घाबरू नको (मत्तय 10:26-31)
• पहिल्या तीन आज्ञा जशा आपण गांभीर्याने घेतो तशा दुसर्‍या दोन घेतो का? जर आपण चिंता व भयाला आपली उणीव म्हणतो तर आपण त्यापासून मुक्त होणार नाही
• आपण त्यास पाप म्हणतो तर येशूने ते पाप स्वतःवर घेतले आहे व आपल्याला मुक्त केले आहे
• बहुतेक लोकांनी स्वतःला धार्मिकतेने आच्छादिले आहे - हा बाह्य देखावा आहे
• त्यांची तुलना अशा कुत्र्यांशी करता येईल ज्यांना मांजरीसारखा आवाज काढण्याचे प्रशिक्षण दिले आहे परंतु, त्यांना चेतविल्यास ते भुंकतीलच
• देवाचे भय मानण्याविरुद्ध मनुष्याचे भय मानणे आहे. जर आपण मनुष्याचे भय मानले तर आपण त्यांचा मान करितो. जर आपण देवाचे भय मानले तर आपण केवळ देवाचा मान करितो
• जुन्या कराराच्या अंतर्गत इस्राएली लोक सर्वांसमोर प्रार्थना करू शकत होते, दान देऊ शकत होते व उपास करू शकत होते
• नवीन कराराच्या अंतर्गत आपल्याला आज्ञा आहे की या गोष्टी आपण गुप्तपणे कराव्या (मत्तय 6:1-18)
• अन्यथा या गोष्टी मृत कर्म होतील
• पिता नेहमी येशूच्या प्रार्थना ऐकत होता (योहान 11:41-42) कारण येशू पित्याच्या मर्जीप्रमाणे करीत होता (योहान 8:29)
• प्रार्थनेचे उत्तर मिळण्याचे हे गुपित आहे मृत कर्म चांगली कर्मे असतात परंतु ती मनुष्याकडून गौरव मिळविण्याकरिता असतात
• आपण अशा मृत कर्मांपासून शुद्ध व्हावे आणि मगच जिवंत देवाची सेवा करावी (इब्री 9:14)
• देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही कारण त्याने तुमची प्रार्थना ऐकली नाही - कारण कबूल न केलेले पाप तुमच्या जीवनात असावे (स्तोत्र 66:18)
• देव नेहमी प्रार्थनेचे उत्तर देतो परंतु त्याचे उत्तर ''होय'', ''नाही'' किंवा ''थांबा'' या स्वरूपात असते. ट्राफीक सिग्नलवरील हिरव्या, लाल व पिवळ्या दिव्याप्रमाणे हे आहे
• जर तुम्ही तुमचे प्रार्थना जीवन घडीचा काटा पाहून जगता तर ते मृत कार्य आहे
• यावरून प्रमाण पटते की तुम्ही येशूवर खरी प्रीती करीत नाही
• दहा आज्ञेमधील शेवटची आज्ञा, ''लोभ धरू नको'' ही आंतरीक गरज आहे
• देवाने ही आज्ञा याकरिता दिली की ही आज्ञा न पाळल्यावर ती कबूल करणार्‍याला देवाने जाणावे
• पौलाने हा आज्ञाभंग कबूल केला (रोम 7:7-8)
• म्हणून देवाने त्याला नीतिमान जीवन दिले (रोम 8:2-4)
• डोंगरावरील प्रवचनाची सुरुवात आत्म्याने दीन असलेल्या लोकांना अभिवचन देऊन होते
• सबंध स्वर्गातील राज्य त्यांचेच आहे
• आत्म्यात दीन असणे म्हणजे स्वतःच्या गरजेची सतत जाणीव असणे (मत्तय 5:3)
• दुःखाची गोष्ट अशी की बहुतेक ख्रिस्ती लोक जगातील राज्यातच (भौतिक आशीर्वादांमध्ये) संतुष्ट आहेत
• डोंगरावरील प्रवचनाचा शेवट दोन प्रकारच्या मंडळ्याच्या चित्राने होतो - यरूशलेमेची मंडळी व बाबेलोनची मंडळी. एकीचा पाया खडकावर घातला
• हा पाया घालणारे लोक मत्तय अध्याय 5-7 प्रमाणे चालणारे आहेत
• दुसर्‍या मंडळीचा पाया वाळूवर घालण्यात आला, तो अशा लोकांनी घातला ज्यांनी या अध्यायांकडे दुर्लक्ष केले
• आंब्याच्या झाडाची फांदी जीने 50 वर्ष फळ दिले ती झाडातून रस न मिळाल्यास पूर्णपणे सुकू शकते
• देवावर पूर्णपणे विसंबून राहण्याची जागा आपला अनुभव घेऊ शकत नाही
• कारण सामर्थ्य पवित्र आत्म्यापासून प्राप्त होते
• डोळा उपटून फेकणे म्हणजे लैंगिक मोहात असता अंध पुरुषासारखे असणे
• डोंगरातील प्रवचनात येशू केवळ दोन पापांविषयी बोलला जी पापे लोकांना नरकात नेऊ शकतात - राग व लैंगिक विचार व कृती (मत्तय 5:21-30)
• आज बहुतेक विश्वासणारे ही दोन पापे प्रामुख्याने करीत असतात
• खडकावर आपले घर बांधणे म्हणजे आपल्या मनामध्ये खनून देवाच्या वचनावर पाया उभारणे व त्याच्या इच्छेला समर्पित असणे (लूक 6:47-48)
• जर तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर व भावनेंवर अवलंबून असला तर तुम्ही आत्मिक होऊ शकणार नाही
• देव तुमच्या आत्म्यामध्ये वास करू इच्छितो
• याकरिता तुम्ही त्याच्या इच्छेला समर्पित असावे