जेव्हा सैतानाला पती-पत्नीमध्ये येण्याचा वाव मिळतो , तेव्हा त्यांचे वैवाहिक जीवन एका वाळवंटासारखे होऊ लागते. नीतिसूत्रे २४:३०-३२ म्हणते, “मी आळशी माणसाच्या शेताजवळून आणि बुद्धीहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो, तो काटेऱ्यांनी भरून गेला आहे ; त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले, ते मी पाहिले त्याचा विचार केला; ते पाहून मी बोध घेतला.” जेव्हा एखाद्या बागेकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा त्या बागेत लवकर इतर झाडा झुडपांची वाढ होऊ लागते. तुम्हाला बागेत तण (रानटी गवत), काटे आणि काटेरी झुडुपे पेरण्याची गरज नाही कारण स्वतःहूनच तिथे त्यांची वाढ होईल. जर तुम्ही दोन घरांजवळून गेलात आणि पाहिले की त्यापैकी एका घरासमोर सुंदर बाग आहे आणि दुसऱ्याची बाग अस्ताव्यस्त वाढलेली आहे आणि ती वाळवंटासारखी दिसत आहे, तर तुम्ही असा विचार करणार नाही की ती सुंदर बाग आपोआपच तिथे तयार झाली. ज्या घरासमोर सुंदर बाग आहे त्या घरातील माणसाने ती बाग सुंदर करण्यासाठी खूप श्रम आणि कष्ट घेतले असतील. याउलट, ज्या माणसाची बाग अस्ताव्यस्त वाढली आहे त्याने ती तशी बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले असतील असा विचार तुम्ही करणार नाही - दुर्लक्षामुळे त्याची बाग एक वाळवंट बनली आहे.
वैवाहिक जीवनात हेच तत्व लागू होते. जर तुम्ही एखाद्या पती पत्नीचे सुंदर वैवाहिक जीवन पाहिले तर तुम्ही खात्री बाळगू शकता की ते आपोआपच सुंदर झाले नाही. पती-पत्नी दोघांनीही ते सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केले. पती-पत्नी दोघांनीही तण उपटून नियमितपणे पाणी दिले नाही तर वैवाहिक जीवन सुंदर बागेसारखे बनणे अशक्य आहे. याउलट, जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाकडे दुर्लक्ष केले तर ते आपोआपच वाळवंटासारखे होईल.
जर तुम्ही काळजी घेतली नाही, तर सैतान तुमच्या घरात चोरासारखा येईल - हळूहळू पण निश्चितपणे - तुमचे वैवाहिक जीवन नष्ट करण्यासाठी . हे एका रात्रीत घडणार नाही. वाळवंट फक्त दोन किंवा तीन दिवसांत विकसित होत नाही. तुम्हाला असे वाटू शकते की सर्व काही ठीक आहे, परंतु जर तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन जोपासण्यास दुर्लक्ष केले तर ते कालांतराने नक्कीच वाळवंट बनेल.
जर तुमची बाग आधीच वाळवंट झाली असेल तर काय? चला आपण बघू या की वाळवंटाला पुन्हा बागेत कसे रूपांतरित केले जाऊ शकते.
देव आपल्याला दोन महान वचने देतो. पहिले यशया ५१:३ -"परमेश्वर तिचे रान एदेनसारखे, त्याचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा करेल." हे किती अद्भुत वचन आहे ! प्रभूला तुमच्या जीवनात ते पूर्ण करण्यास सांगा. जर तुम्ही मागितले नाही तर तुम्हाला ते मिळणार नाही. याकोब ४:२ म्हणते, "तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही." प्रभूला त्याने वचन दिल्याप्रमाणे तुमचे वाळवंट एदेन बागेत पुनःस्थापित करण्यास सांगा.
दुसरे वचन यहेज्केल ३६:३४-३६ मध्ये येते, "आल्यागेल्यास वैरान दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल. तेव्हा लोक म्हणतील, 'ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे.' मी, परमेश्वर, जे बोललो आहे ते कारीनच." हे एका अश्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलत आहे जे इतके वाईट आहे की तेथून येणारे जाणारे लोकही त्याची स्थिती पाहू शकतात. पण देव म्हणतो की तो असे विचका झालेले (अयशस्वी) वैवाहिक जीवन पुनःस्थापित करेल आणि ज्यांना ते उजाड वाटत होते ते म्हणतील की ते आता एदेन बागेसारखे झाले आहे.
ही अद्भुत वचने वाचल्यानंतर, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाच्या वाळवंटाला बागेत पुनःस्थापित करू शकणार नाही – विवाह समुपदेशाने नाही किंवा अनेक पुस्तके वाचूनही नाही, तर केवळ पवित्र आत्म्याच्या मदतीनेच हे शक्य आहे. देवाने यहेज्केल ३६:२६ मध्ये आपल्याला पवित्र आत्म्याचे वचन दिले आहे: "मी तुम्हास नवीन हृदय देईन, मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन आणि तुम्हाला मांसमय हृदय देईन; मी माझा आत्मा तुमच्यात ठेवीन." उत्पत्ति २:१० मध्ये, आपण वाचतो की एदेन बागेतून एक नदी वाहत होती. ती नदी आपल्या वैवाहिक जीवनाच्या बागेच्या मध्यभागी वाहणाऱ्या पवित्र आत्म्याचे चित्र आहे, ज्यामुळे सर्वकाही ताजेतवाने होते.
जेव्हा आपण आपल्या जीवनातील वाळवंटाला बागेत पुनःस्थापित करण्यात आपली असहाय्यता मान्य करतो आणि मदतीसाठी देवाकडे प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्याला मदत करेल! स्तोत्र १२७:१ म्हणते, “परमेश्वर जर घर बांधत नाही, तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत .” जोपर्यंत प्रभु आपल्याला मदत करत नाही, आपल्या वैवाहिक जीवनाला बागेत रूपांतरित करण्यासाठी आपण केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. आणि जरी सध्या आपले वैवाहिक जीवन एका बागेसमान असले तरी, जर प्रभु त्याचे रक्षण करत नसेल तर आपण ते वाळवंट होण्यापासून वाचवू शकणार नाही.
आज तुमचे वैवाहिक जीवनातील नाते काय आहे? ते वाळवंट आहे का? तुमचे वैवाहिक जीवन कधी बागेत रूपांतरित होऊ शकेल अशी आशा तुम्ही सोडून दिली आहे का? तुम्ही असे म्हणता का, “जो माझा जोडीदार आहे, त्याच्यासोबत माझे वैवाहिक जीवन एका बागेसमान असणे अशक्य आहे”? सैतान तुमच्याकडून हेच वदवून घेऊ इच्छितो. पण आपण कधीही आशा सोडू नये. आता तुम्ही देवाच्या पुनःस्थापनेसंबंधित अभिवचनांना पाहिले आहे, तेव्हा तुमच्या वैवाहिक जीवनासाठी विश्वासाने त्यांचा दावा करा. यहेज्केल ३६:३७ म्हणते, “प्रभु परमेश्वर म्हणतो, ते मला त्यांच्यासाठी ते करण्यास सांगतील तोपर्यंत मी वाट पाहीन.” जेव्हा आपण देवाला विनंती करतो तेव्हाच तो आपल्यासाठी ते करेल. म्हणून, तुम्ही प्रभूकडे येऊन म्हणावे, "प्रभु, माझ्या वैवाहिक जीवनात तुम्ही हे करू शकता असा माझा विश्वास आहे! मी आशा सोडणार नाही."