ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले" (इफिस. ५:२५). मंडळी बांधण्यासाठी, आपल्याला मंडळीवर तसेच प्रेम करावे लागेल जसे येशूने मंडळीवर प्रेम केले. फक्त आपले पैसे किंवा आपला वेळ देणे पुरेसे नाही. आपल्याला स्वतःला - आपल्या जीवनाला - द्यावे लागेल.
देवाला जेव्हा मनुष्याप्रती असलेल्या त्याच्या प्रेमाचे वर्णन करायचे होते, तेव्हा तो त्याच्या प्रेमाची तुलना पृथ्वीवरील फक्त एका उदाहरणाशी करू शकला - आईचे तिच्या तान्ह्या बाळासाठी असलेले प्रेम (यशया ४९:१५ पहा). जर तुम्ही एखाद्या मातेचे निरीक्षण कराल तर तुम्हाला दिसेल की तिचे तिच्या बाळावरील प्रेम त्यागाच्या भावनेने भरलेले असते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत, आणि रात्रभर, एक आईच तिच्या बाळासाठी त्याग करत असते , त्याग करत असते आणि त्याग करत असते ; आणि तिला त्या बदल्यात काहीही मिळत नाही. ती तिच्या मुलासाठी वर्षानुवर्षे दुःख आणि गैरसोय बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता आनंदाने, सहन करत असते. देव आपल्यावरही असेच प्रेम करतो. आणि तोच स्वभाव तो आपल्याला देऊ इच्छितो. परंतु जगात कुठेही असा सहवास ज्याबद्दल प्रामाणिकपणे सांगितले जाऊ शकते की ते सर्व एकमेकांवर असेच प्रेम करतात मिळणे अशक्य आहे. बहुतेक विश्वासणारे फक्त त्यांच्याशी सहमत असलेल्या आणि त्यांच्या गटात सामील होणाऱ्यांवर प्रेम कसे करावे हे जाणतात. त्यांचे प्रेम मानवी आहे आणि ते आईच्या त्यागाच्या प्रेमापासून खूप दूर आहे !! तरीही, आपले ध्येय दैवी प्रेम आहे ज्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
एक आई, तिच्या सभोवतालचे लोक तिच्या मुलासाठी काही त्याग करत आहेत की नाही याची पर्वा करत नाही. ती आनंदाने स्वतःच्या सर्वसाचा त्याग करते. त्याचप्रमाणे, जो मंडळीला स्वतःचे बाळ म्हणून बघत आहे, त्याला त्याच्या सभोवतालचे लोक मंडळीसाठी काही त्याग करत आहेत की नाही याची पर्वा तो करणार नाही. तो आनंदाने स्वतःचे बलिदान देईल आणि त्याला इतर कोणाविरुद्ध कोणतीही तक्रार किंवा मागणी नसेल. जे लोक तक्रार करतात की इतर लोक मंडळीसाठी त्याग करत नाहीत ते आई नसुन भाड्याने घेतलेल्या परिचारिका आहेत. अशा परिचारिकांचे कामाचे तास निश्चित असतात आणि जेव्हा पुढील 8 तासांच्या शिफ्टसाठी दुसरी परिचारिका वेळेवर येत नाही तेव्हा त्या तक्रार करतात.
पण आई फक्त 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करत नाही. ती दररोज - वर्षानुवर्षे 24 तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असते, आणि तिला त्यासाठी पैसेही मिळत नाहीत. जरी तिचे मूल 20 वर्षांचे असले तरीही, आईचे काम कधीही संपत नाही !! फक्त एक आईच दररोज तिच्या बाळाला दूध देऊ शकते. परिचारिका ज्या बाळांची काळजी घेतात त्याच्यासाठी दूध तयार करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, मंडळीमध्ये आईसमान असणाऱ्यांकडे त्यांच्या अध्यात्मिक मुलांसाठी प्रत्येक सभेत नेहमीच एक वचन असेल. अनेक वडीलांकडे ( elders )मंडळीसाठी कोणतेही वचन नसते कारण ते माता नसुन केवळ परिचारिका असतात.
आई तिच्या मुलांकडून कोणत्याही पगाराची अपेक्षा करत नाही. कोणतेही मूल कधीही त्याच्या आईला तिच्या सेवेसाठी पैसे देत नाही. खरं तर, जर तुम्ही आईला प्रति तास २० रुपये (नर्सना देतो त्याप्रमाणे) याप्रमाणे मजुरीचा हिशोब कराल तर तुम्हाला आढळेल की २० वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक मूल त्याच्या आईला ३० लाख रुपयांपेक्षा जास्त देणे लागते !! कोणते मूल त्याच्या आईला ह्या रक्कमेची परतफेड करू शकेल ?
आता आपल्यासमोर असा प्रश्न येतो की: प्रभूसाठी आणि त्याच्या मंडळीसाठी कोणताही पगार न घेता, परंतु येशू येईपर्यंत दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे स्वतःला अर्पण करून, असे काम करण्यास कोण तयार आहे ? जर देवाला अशा आत्म्याचा फक्त एक माणूस कुठेही सापडला तर तो, त्यागाच्या भावनेशिवाय त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा ज्यांचा विश्वास अर्धवट आहे अश्या १०,००० विश्वासणाऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त त्या एका व्यक्तीचा मंडळी बांधण्यासाठी देव वापर करेल
जेव्हा येशू पृथ्वीवर परत येईल आणि तुम्ही त्याच्यासमोर उभे राहाल, तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने जीवन जगलात त्याबद्दल तुम्हाला काही पश्चात्ताप असेल का, की मागे वळून देवाच्या राज्यासाठी उपयुक्तपणे घालवलेल्या जीवनाकडे तुम्ही पाहू शकाल ? बरेच लोक भरकटले आहेत आणि पृथ्वीवर त्यांचे जीवन वाया घालवत आहेत. खूप उशीर होण्यापूर्वी जागे व्हा आणि देवाला तुम्हाला दाखवायला सांगा की त्याचा मार्ग म्हणजे बलिदानाचा मार्ग आहे. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको .