“माझ्या नावाने लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात” (मत्तय ५:११). हे वचन मागील वचनासारखेच आहे, जे म्हणते, “ नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य.....” परंतु तेथे येशू एक महत्त्वाचा फरक करतो.
वचन १० आणि वचन ११ मधील फरक असा आहे की, वचन १० मध्ये, तुम्ही जे योग्य आहे त्यासाठी उभे आहात. ख्रिस्ती नसलेले ही कधीकधी जे योग्य आहे त्यासाठी उभे राहतात. असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, असे न्यायाधीश ज्यांनी योग्य न्याय् केल्यामुळे त्यांना मारण्यात आले आणि व्यापारी, राजकारणी आणि इतर लोक जे सत्याच्या बाजूनी उभे राहिल्यामुळे त्यांच्या शत्रू द्वारे ते मारले गेले. हे फक्त ख्रिस्तीच करतात असे नाही आणि ही लज्जास्पद गोष्ट आहे की कधीकधी ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांपेक्षा ख्रिस्ती नसलेले नीतिमत्त्वासाठी उभे राहण्यास अधिक तयार असतात. मला विश्वास आहे की न्यायाच्या दिवशी तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल जेव्हा अशा ख्रिस्ती लोकाना ज्यांनी अशी कल्पना केली होती की ते देवाच्या राज्यात प्रवेश करत आहेत ते तडजोड करणारे आणि मागे हटणारे म्हणून उघड होतील. जर तुम्ही नीतिमान असाल आणि नीतिमत्तेसाठी छळ सहन करण्यास तयार असाल तर स्वर्गाचे राज्य तुमचे आहे; अन्यथा नाही.
मत्तय ५:११ येशूसाठी छळ सहन करण्याबद्दल बोलते. जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात या वस्तुस्थितीबद्दल गप्प राहिलात तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही फायदे मिळू शकतात. कदाचित तुम्ही नीतिमान असाल आणि इतर लोकानी याबद्दल तुमची प्रशंसा केली असेल, परंतु तुम्हाला बढती मिळणार नाही ह्या भीतीमुळे येशू ख्रिस्ताला तुम्ही तारणाचा मार्ग मानता या वस्तुस्थितीबद्दल तुम्ही गप्प राहता . कदाचित तुम्ही इतरांना असा विश्वास द्याल की तुम्ही ख्रिस्ती नाही आहात, जसे तुमचे मालक आहेत आणि तुम्हाला ख्रिस्ताचा साक्षीदार होण्यास लाज वाटते. मी अशी सरकारी कार्यालये आणि बँका पाहिल्या आहेत जिथे ख्रिस्ती नसणारे लोक त्यांच्या आवडत्या मूर्तीचे चित्र असलेले कॅलेंडर लावतात, परंतु असा फार दुर्मिळ ख्रिस्ती सापडतो जो देवाचे वचन असलेले कॅलेंडर लावण्यास इच्छुक असेल, ज्यामुळे तो ख्रिस्ती आहे हे स्पष्ट होईल. कारण त्याला लोक त्याच्याबद्दल काय म्हणतील याची भीती असते. "माझा बॉस ते पहिल का आणि मला बढती मिळण्यापासून रोखेल किंवा मला काही प्रकारे त्रास देईल का ?"
"धन्य ते लोक ज्यांचा माझ्यामुळे छळ केला जातो, ज्यांना माझी लाज वाटत नाही." तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी येशूची लाज वाटते का ? तुम्ही बाह्यतः नीतिमान आहात याचा अभिमान बाळगू नका कारण बरेच लोक जे ख्रिस्ती नाही ते देखील बाह्यतः नीतिमान असतात. त्यापलीकडे जा, एक पाऊल पुढे जा: घोषित करा, "मी देखील एक ख्रिस्ती आहे. मी येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे." जर तुम्ही देव आणि त्याच्या वचनासाठी उभे राहिलात (आणि ते केवळ कामाच्या ठिकाणीच नाही, अगदी उपदेशक म्हणूनही जर तुम्ही देवाच्या वचनात शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी उभे राहिलात तर), जर तुम्ही आज ख्रिस्ती वर्तुळात असलेल्या फसवणुकीचा पर्दाफाश करण्यास उत्सुक असाल, तर लोक तुमचा अपमान करतील आणि तुमचा छळ करतील आणि तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगतील, कारण तुम्ही सत्यासाठी उभे आहात.
जेव्हा असे घडते तेव्हा तुम्ही काय करावे ? आपल्याला स्वतःबद्दल वाईट वाटले पाहिजे का? ह्याच्या विपरीत ! वचन म्हणते, "आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे" (मत्तय ५:१२). तुम्हाला पृथ्वीवर प्रतिफळ मिळणार नाही - तुमचा छळ केला जाईल आणि बाहेर टाकले जाईल - परंतु स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे कारण त्यांनी तुमच्या आधीच्या सर्व संदेष्ट्यांचा असाच छळ केला होता. जर तुम्ही जुन्या करारातील संदेष्ट्यांना पाहिले तर तुम्हाला दिसेल की देवाच्या खऱ्या संदेष्ट्यांचा छळ झाला होता. तथापि, त्यांना ज्या छळांना तोंड द्यावे लागले त्यांचा नेहमीच उल्लेख केला गेलेला नाही. उदाहरणार्थ, यशयासारख्या माणसाचा विचार करा, ज्याने इस्राएल लोकांविरुद्ध काही कठोर शब्द बोलले. यशयाच्या पुस्तकात तो कसा मरण पावला हे आपल्याला सांगितलेले नाही, परंतु परंपरा आपल्याला सांगते की तो लाकडाच्या रिकाम्या पोकळ ओंडक्याच्या आत होता आणि त्याचा छळ करणाऱ्यांनी त्याचे दोन तुकडे केले.
तो इब्री लोकांस पत्र ११ मध्ये उल्लेख केलेल्या लोकांपैकी एक आहे, ज्यांना करवतीने चिरण्यात आले होते. ख्रिस्तासाठी उभे राहणाऱ्या सर्वांचा छळ केला जाईल. प्रेषितांची कृत्ये ७ मध्ये जेव्हा स्तेफन मुख्य याजकांसमोर उभा असतो, तेव्हा त्याच्या दीर्घ संदेशाच्या शेवटी तो समोर असलेल्या गर्दीला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो: तो प्रेषितांची कृत्ये ७:५२ मध्ये म्हणतो, “ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यामध्ये कोणी झाला का ? ज्यांनी त्या नीतिमान येशूच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यानी जिवे मारले. तुमच्या पूर्वजांनी इस्राएलमधील कोणत्या संदेष्ट्याचा छळ केला नाही ? तुम्ही एकाचे नाव सांगू शकाल का ?” स्तेफन इस्राएलच्या इतिहासाचे वर्णन करत होता. त्याने इस्राएलच्या इतिहासाचा अभ्यास केला होता आणि त्याने असा निष्कर्ष काढला की इस्राएलच्या संपूर्ण इतिहासात असा एकही संदेष्टा नव्हता ज्याचा छळ झाला नाही. कोणताही खरा संदेष्टा जुन्या करारातही लोकप्रिय नव्हता आणी नवीन करारातही लोकप्रिय नव्हता.
पाळक लोकप्रिय असू शकतात, सुवार्तिक लोकप्रिय असू शकतात आणि कधीकधी प्रेषित देखील लोकप्रिय असू शकतात. शिक्षक खूप लोकप्रिय असू शकतात, परंतु संदेष्टा जवळजवळ कधीच लोकप्रिय नसतो कारण तो मंडळीमधील किंवा लोकांमधील दोष उघड करण्यासाठी आणि निदान करण्यासाठी येत असतो. आणि तो मंडळीमध्ये, लोकाना जे ऐकायला आवडते ते बोलण्यासाठी नाही तर जे लोकानी एकण्याची गरज आहे ते बोलण्यासाठी येतो. तो त्यांना देवाच्या वचनाचे ते क्षेत्र दाखवेल ज्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत .तो त्यांना त्यांच्या जीवनातील असे क्षेत्र दाखवेल जिथे ते देवाच्या दर्जांनुसार चालत नाहीत आणि मग त्यामुळे त्याचा छळ केला जाईल. आजही असे घडते. येशूसाठी उभे राहण्याचा अर्थ असा आहे, "माझ्या आणि माझ्या वचनामुळे." जर तुमचा छळ झाला तर तुम्ही धन्य आहात आणि तुमचा हेवा केला पाहिजे . दुसऱ्या आवृत्तीत म्हटले आहे, "आनंदाने उडी मारा!" तुम्ही उत्साहित असले पाहिजे कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहात आणि येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवत आहात.