येशूने आपल्याला दररोज प्रार्थना करायला शिकवले, "जशी आम्ही इतरांना क्षमा करतो तशी तू आमच्या पापांची क्षमा कर." तुम्हाला माहित आहे का, की आपण दररोज क्षमेसाठी प्रार्थना केली पाहिजे ? जरी आपण येशूणे शिकवलेली प्रार्थना रोज करत नसलो तरी, आपण किमान हे समजले पाहिजे की आपल्याला दररोज क्षमेसाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. मी दररोज प्रार्थना करतो, "प्रभु, माझ्या पापांची क्षमा कर." क्षमा मिळणे ही आपली दररोजची गरज आहे हे आपल्याला कसे कळते? कारण प्रार्थनेतील ह्या आधीची ओळ आहे की , "आमची रोजची भाकर आज आम्हास दे" (मत्तय ६:११). म्हणून, ही एक रोजची गोष्ट आहे. प्रभु, माझी रोजची भाकर तू आज मला दे, आणि माझी पुढील विनंती अशी आहे की तू मला आज माझ्या पापांची क्षमा कर.
तुम्हाला असे वाटू शकते की , "तुम्ही पापावर विजय मिळवल्याचा दावा आणी त्याबरोबर , मी दररोज पाप करतो असे कसे म्हणू शकतात "? जाणीवपूर्वक केलेल्या पापावर मात करणे आणि ज्या क्षेत्रांबद्दल आपल्याला माहितीही नाही अशा क्षेत्रात नकळत पाप करणे यात फरक आहे. आपल्याला खरोखरच आपल्या आयुष्याबद्दल फक्त दहा टक्केच माहिती असते. ज्याप्रमाणे आपल्याला हिमनगाचे फक्त टोक दिसते, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनात पापाचा फक्त वरचा भाग दिसतो. आपल्या जीवनात असे अनेक क्षेत्र आहेत जिथे आपल्याला आपल्या पापांची आणि ख्रिस्तासारखे नसल्याची अजिबात जाणीव नसते. ह्या बाबतीतही देव आपल्याला क्षमा करील अशी प्रार्थना आपण रोज केली पाहिजे.
दररोज क्षमा मागण्याचा अर्थ हाच आहे. प्रेषित पौलाप्रमाणे आपण जाणीवपूर्वक करणाऱ्या पापांवर पूर्ण पणे विजय मिळवून शकतो. १ करिंथकर ४:४ मध्ये, पौल म्हणतो, " माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही ." दुसऱ्या शब्दांत, पौल म्हणत आहे की, "मी सर्व ज्ञात पापांवर विजय मिळवत जगत आहे. माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही , परंतु याचा अर्थ असा नाही की मी निर्दोष ठरतो किंवा अपराधापासून पूर्णपणे मुक्त झालो आहे. माझा न्यायानिवाडा करणारा प्रभू आहे , ज्याला मला उत्तर देणे आहे. तो माझ्या आयुष्यातील असे अनेक क्षेत्र पाहतो जे मला स्वतःलाही माहीत नाही. म्हणूनच मी निष्काळजीपणे असे म्हणू शकत नाही की मी निर्दोष आहे. मला देवाकडे क्षमा मागण्याची गरज आहे . जेव्हा तो माझ्या अशा क्षेत्रांतिल पापांवर प्रकाश टाकतो ज्यांची मला पूर्वी कधीही जाणीव नव्हती, तेव्हा मी या क्षेत्रांतिल पापांवर मात करण्याचा प्रयत्न करू शकतो." हे पवित्रीकरण आहे.
प्रभु आपल्याला एक साधी आज्ञा देतो ती म्हणजे , "माझ्यामागे या." त्यानंतर प्रभु आपल्याला प्रगतीशील पवित्रतेच्या अद्भुत जीवनाचा मार्ग दाखवतो. नीतिसूत्रे ४:१८ म्हणते, " धार्मिकांचा मार्ग मध्यानहापर्यंत उत्तरोतर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखे आहे ". जर आपण नवा जन्म जन्म झालेले असू तर आपण नीतिमान ठरवले जातो कारण ख्रिस्ताचे नितीमत्वात आपण गणले जातो . परिवर्तनचा क्षण म्हणजे, जो अंधाराला दूर करनाऱ्या पहाटे क्षितिजावर उगवणाऱ्या सूर्या सारखा असतो. सूर्य हळूहळू आकाशात उगवताना अधिक तेजस्वी होत जातो आणि तो दुपारच्या परिपूर्ण स्थितीत येतो जेव्हा तो सर्वात जास्त तेजस्वी असतो. त्याचप्रमाणे, जर आपण नीतिमान असलो, तर आपण व्यावहारिक नीतिमत्तेत दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती केली पाहिजे. आपल्या आयुष्यातील सूर्य सर्व दिवस क्षितिजावरच असू नये . त्याची चमक वाढत गेली पाहिजे. नीतिमानांचा मार्ग पहाटेच्या तेजस्वी प्रकाशासारखा आहे जो ख्रिस्त परत येईपर्यंत अधिकाधिक उजळ होत जातो. आणी मग आपण त्याच्यासारखे होऊ.
तो जेव्हा येईल तेव्हाच आपण पूर्णपणे त्याच्यासारखे होऊ, पण आज आपण त्याच्यासारखे, जसा तो चालला तसे आपण चालू शकतो. १ योहान ३:२ म्हणते, "प्रियजनहो, आता आपण देवाची मुले आहोत, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे , कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल ." १ योहान ३:२ मध्ये दाखवलेला फरक लक्षात घ्या. आपण आधीच देवाची मुले आहोत, पण आपण काय होणार आहोत हे अद्याप प्रकट झालेले नाही. आपण कसे होणार आहोत? आपण पूर्णपणे येशूसारखे असणार आहोत. आपले संपूर्ण व्यक्तिमत्व, ज्यामध्ये आपले सर्व विचार, शब्द, कृती, दृष्टिकोन, हेतू, आपल्या अंतर्गत जीवनाचे प्रत्येक क्षेत्र आणि आपले अज्ञात जीवन येशूसारखे असेल.
आणि हे कधी होईल? जेव्हा तो पुन्हा येईल , आणि आपण त्याला जसा आहे तसे पाहू . पण त्या दिवसापर्यंत आपण काय करावे? १ योहान ३:३ म्हणते की जो कोणी त्यासंबंधाणे ही आशा बाळगतो तो जसा शुद्ध आहे , तसे आपणाला शुद्ध करतो.. हे थोडेसे आधी १ योहान २:६ मध्ये लिहिलेल्या वचणा सारखेच आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की मी त्याच्या ठायी राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतः हि चालले पाहिजे . मग एके दिवशी मी त्याच्यासारखा होईन.
१ योहान २:६ आणि १ योहान ३:२ मध्ये फरक आहे. १ योहान २:६ चा संदेश असा आहे की येशूने ज्या तत्त्वांनुसार आपले पृथ्वीवरील जीवन जगले त्याच तत्त्वांनुसार आपणही चालले पाहिजे आणि त्याचे अनुसरण केले पाहिजे. येशू ख्रिस्ताचा जशी भौतिक गोष्टींबद्दल, पुरुषांबद्दल, स्त्रियाबद्दल, परुशींबद्दल, धार्मिक ढोंगी लोकांबद्दल आणि शत्रूंबद्दल वृत्ती होती तीच वृत्ती आपण आपल्या जीवनात बाळगली पाहिजे. उदाहरणार्थ, येशूने त्याला वधस्तंभावर खिळलेल्या शत्रूंसाठी प्रार्थना केली, "हे पित्या, त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहिती नाही."
पवित्र आत्मा आपल्याला येशूसारखे चालण्यास मदत करेल, परंतु तो केवळ आपल्या जागरूक असलेल्या जीवनात, जे आपल्या पूर्ण आयुष्याच्या फक्त दहा टक्के आहे. उर्वरित नव्वद टक्के लपलेले आहे. परमेश्वर आपल्याला त्या लपलेल्या जीवनाबद्दल अधिक प्रकाश देईल जेणेकरून आपण त्या वर मात करू शकू आणि स्वतःला अधिकाधिक शुद्ध करू शकू. देव आपल्याला पापापासून शुद्ध करतो (१ योहान १:७), परंतु आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पापापासून मुक्त होऊन स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे (१ योहान ३:३).