WFTW Body: 

१. देवाने जशी येशूवर प्रीति केली तशीच प्रीति तो आपल्यावर करतो.

"जशी तू माझ्यावर प्रीति केली तशी त्यांच्यावरही प्रीति केली "(योहान १७:२३). मला पवित्र शास्त्रामध्ये सापडलेले हे सर्वात महान सत्य आहे. याने मला एका असुरक्षित, निराश विश्वासणाऱ्यापासून ते एका पूर्णपणे देवामध्ये सुरक्षित आणि देवात पूर्ण आनंदाने भरलेल्या व्यक्तीमध्ये बदलुन टाकले. पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक वचने आहेत जी आपल्याला सांगतात की देव आपल्यावर प्रीति करतो, पण हे एकमेव वचन त्या प्रीतीच्या व्याप्तीबद्दल सांगते - जशी त्याने येशूवर प्रीति केली. कारण आपल्या स्वर्गीय पित्याकडे त्याच्या मुलांवर प्रीति करण्यात कोणताही पक्षपात होत नाही, म्हणून त्याला नक्कीच असे वाटत असणार की इतर मुलांसाठीही आपण प्रथम जन्मलेल्या पुत्र येशूसारखेच सर्वकाही करावे. जशी त्याने येशूला मदत केली तशीच तो आपल्यालाही करील. जशी त्याने येशूची काळजी घेतली तशी तो आपलीही घेईल.येशूच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक लहानसहान नियोजनात त्याला जितका रस होता तितकाच रस त्याला आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक लहानसहान नियोजनामध्येही असेल. देवाला आश्चर्यचकित करेल असे काहीही आपल्याबाबतीत कधीही घडू शकणार नाही. त्याने अगोदरच आपल्यासाठी घटना नियोजित केल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला असुरक्षित वाटण्याची गरज नाही. ज्या खात्रीशीर हेतूने येशूला पाठवण्यात आले होते तितक्याच खात्रीशीर हेतूने आपल्यालाही पृथ्वीवर पाठवले गेले आहे. तुमच्यासाठीही हे तितकेच खरे आहे - जर तुम्ही विश्वास ठेवला तर. जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही त्याच्यासाठी काहीच घडत नाही.

२. प्रामाणिक लोकांबद्दल देव आनंद करतो.

"पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे" (१ योहान १:७). प्रकाशात चालणे म्हणजे सर्वप्रथम आपण देवापासून काहीही लपवत नाही. आम्ही त्याला सर्व काही सांगतो, अगदी जसे आहे तसेच. मला खात्री आहे की देवाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे प्रामाणिकपणा. देवाला जे अप्रामाणिक आहेत त्यांचा तिटकारा वाटतो. येशू इतर कोणापेक्षाही जास्त ढोंगी लोकांच्याविरुद्ध बोलला. देव सर्वप्रथम आपल्याला पवित्र किंवा परिपूर्ण होण्यास सांगत नाही तर प्रामाणिक बनण्यास सांगतो. हा खरा पवित्रतेचा प्रारंभ बिंदू आहे. आणि या झऱ्यातून इतर सर्व काही वाहते. आणि जर एक गोष्ट खरोखर सोपी असेल जी आपल्यापैकी कोणीही करू शकतो, ती म्हणजे प्रामाणिक असणे. तर, देवाला ताबडतोब आपल्या पापाची कबुली द्या. पापी विचारांना ''सभ्य" नावे देऊ नका. "मी फक्त देवाच्या निर्मितीच्या सौंदर्याचे कौतुक करत होतो "असे म्हणू नका जेव्हा खरे तर तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या वासनेनी व्यभिचार केला होता. "रागा"ला "सात्विक संताप" असे संबोधू नका. जर तुम्ही अप्रामाणिक असाल तर तुम्हाला कधीही पापावर विजय मिळणार नाही. आणि "पापा"ला "चूक" असे संबोधू नका कारण येशूचे रक्त तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध करू शकते, पण तुमच्या चुकांपासून नाही!! तो अप्रामाणिक लोकांना शुद्ध करत नाही. केवळ प्रामाणिक लोकांसाठीच ही आशा आहे. "जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही."(नीतिसूत्रे २८:१३). येशूने असे का म्हटले की धार्मिक पुढाऱ्यांपेक्षा कसबिणी आणि चोरांसाठी देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची अधिक आशा होती (मत्तय २१:३१)? कारण कसबिणी आणि चोर पवित्र असल्याचा कोणतेही ढोंग करत नाहीत. बरेच तरुण मंडळीपासून दूर गेले आहेत कारण मंडळीचे सदस्य त्यांना असे दाखवतात की त्यांना स्वत:ला कोणताही संघर्ष नाही.आणि म्हणून ते तरुण असा विचार करतात की ; "त्या पवित्र लोकांना आपल्या समस्या कधीच समजणार नाहीत!!" जर हे आपल्याबाबतीत खरे असेल, तर आपण ख्रिस्तापेक्षा वेगळे आहोत ज्याने पापी लोकांना स्वतःकडे ओढून घेतले.

३. संतोषाने देणाऱ्यात देव आनंद पावतो.

‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो. (२ करिंथ ९:७). म्हणूनच देव माणसाला संपूर्ण स्वातंत्र्य देतो - आधी आणि पालट झाल्यानंतर, आणि आत्म्याने भरल्यानंतरही . जर आपण देवासारखे असलो, तर आपणही इतरांवर नियंत्रण ठेवण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही त्यांना आपल्यापेक्षा वेगळे असण्याचे, आपल्यापेक्षा भिन्न विचार असण्याचे आणि त्यांच्या स्वत:च्या गतीने आध्यात्मिक वाढ करण्याचे स्वातंत्र्य देऊ. कोणत्याही प्रकारची सर्व सक्ती सैतानापासून आहे. पवित्र आत्मा लोकांना भरतो, तर दुष्ट आत्मे लोकांवर ताबा मिळवतात. फरक असा आहे: जेव्हा पवित्र आत्मा कोणालाही भरतो, तेव्हाही तो त्या व्यक्तीला जे हवे आहे ते करण्याचे स्वातंत्र्य देतो. परंतु जेव्हा दुष्ट आत्मे लोकांवर ताबा मिळवतात तेव्हा ते त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. आत्म्याने भरलेले असण्याचे फळ इंद्रियदमन होय. (गलती५:२२,२३) आहे. दुष्ट आत्म्याने घेतलेल्या ताब्यामुळे मात्र आपण इंद्रियदमन गमावतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण देवासाठी केलेले कोणतेही काम जे हर्षाने, आनंदाने, मोकळेपणाने आणि स्वेच्छेने केले जात नाही ते एक मृत काम आहे. देवासाठी, पारितोषिक किंवा पगार मिळावा म्हणून केलेले कोणतेही काम हे देखील एक मृत काम आहे. देवाच्या दृष्टीने त्याला इतरांच्या दबावाखाली दिलेल्या कोणत्याही पैशांची मुळीच किंमत नाही!! देवाला, सक्तीच्या अंतर्गत केलेल्या मोठ्या गोष्टींपेक्षा, किंवा केवळ स्वतःच्या विवेकबुद्धीला बरे वाटावे म्हणून केले गेलेल्या कामापेक्षा त्याच्यासाठी खूप आनंदाने केलेल्या छोट्याशा गोष्टीची अधिक किंमत आहे.