लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

१. आपल्याला नीतिमान करण्यासाठी येशू स्वतः पाप बनला: "देवाने ख्रिस्ताला, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे." (२ करिंथ ५:२१). ख्रिस्त आमच्यासाठी पाप झाला यासाठी की त्याच्यामध्ये आपण देवाचे नीतिमत्व व्हावे. जे देवाच्या पवित्र मापदंडानुसार नीतिमान बनू शकत नाहीत हे ओळखण्यास पुरेसे नम्र असलेल्यांना ही देवाची मोफत भेट आहे आणि हे समर्थनीय आहे. केवळ कृपेमुळेच आपण नीतिमान ठरतो, आणि पवित्र शास्त्र म्हणते की "आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही." (रोम .११:६). येशूने फक्त आपल्या पापांची शिक्षाच सहन केली नाही तर तो स्वतःच पाप झाला. देवाचे नीतिमत्व पृथ्वीवरील सर्वांत नीतिमान मनुष्यापेक्षाही इतके उंच आहे जितके आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे (यशया ५५:८,९) पापरहित देवदूतसुद्धा देवाच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नाहीत, परंतु त्यांचे चेहरे त्याच्यासमोर त्यांना झाकून ठेवावे लागतात. (यशया ६: २,३) केवळ ख्रिस्त पित्याच्या चेहऱ्याकडे सरळ पाहू शकतो आणि म्हणूनच ख्रिस्तामध्ये देव आम्हांस ठेवतो, यासाठी की, आता आम्ही त्याच्याकडे निर्भयपणे येऊ शकू - कारण आपण ख्रिस्तामध्ये आहोत. आम्हांला ख्रिस्तामध्ये राखून आणि ख्रिस्ताइतकेच नीतिमान असल्याचा स्वीकार करून देव आम्हांला नीतिमान ठरवतो. आपण आता देवासमोर आमच्या परिपूर्ण स्वीकृतीमुळे आनंदित होऊ कारण आपण ख्रिस्तामध्ये देवाचे नीतिमत्व झालो आहोत.

२. येशू आपल्याला श्रीमंत बनविण्यासाठी गरीब झाला: "आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे" (२ करिंथ ८:९). येशू वधस्तंभावर गरीब झाला, यासाठी की आपण श्रीमंत व्हावे - किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आपल्या आयुष्यात आपल्याला "कशाचीही गरज नाही". देवाने आपल्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी देण्याचे वचन दिले नाही, परंतु आपल्यास आवश्यक सर्व गोष्टी देण्याचे वचन दिले आहे (फिलिप्पैकरांस पत्र ४: १९). सुज्ञ पालक आपल्या मुलांना हवे असलेले किंवा मागितलेले सर्व देत नाहीत तर फक्त त्यांना आवश्यक तेच देतात. तर देवही असेच करतो. जुन्या कराराने नियमशास्त्र पाळणाऱ्यांना पृथ्वीवरील संपत्तीचे वचन दिले होते. परंतु नवीन कराराच्या अंतर्गत, देव वचन देतो की जर आपण प्रथम त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला आणखी चांगले देईल: आपल्याला या पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट. (मत्तय ६: ३३; २ पेत्र १: ४ देखील पहा) येशू गरीब झाला - यासाठी की आपण श्रीमंत व्हावे. म्हणून आपल्या आयुष्यात कधीही कमतरतेमध्ये जगण्याची गरज नाही. आम्हाला स्वतःच्या किंवा आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही. वधस्तंभावर - येशूने आपल्यासाठी आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी असलेल्या पृथ्वीवरील प्रत्येक गरजेचा पुरवठा विकत घेतला आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, तुमच्या सर्व भयापासून मुक्त व्हा. येशू आधीच वधस्तंभावर तुमच्यासाठी गरीब झाला आहे. आपल्याला यापुढे आपल्या जीवनात सतत आर्थिक कमतरतेसह जगण्याची आवश्यकता नाही. तुम्हांला नेहमी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळू शकतात. सुवार्तेवर आपला जन्मसिद्ध अधिकाराचा हक्क गाजवा.

३.येशू, आपण आशीर्वाद असे व्हावे म्हणून शाप झाला: "आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा; म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे."(गलती ३: १३,१४). सुवार्तेची चांगली बातमी अशी आहे की येशू आधीच आपल्यासाठी एक शाप बनला आहे, म्हणून नियमशास्त्राचा कोणताही शाप आपल्याला स्पर्श करू शकत नाही. हीच एक चांगली बातमी असू शकली असती. पण अजून काही आहे. त्याऐवजी आपल्याला असा आशीर्वाद मिळू शकतो, जो देवाने अब्राहामाला दिला. देवाने अब्राहामाला दिलेल्या आशीर्वादाचे उत्पत्ति १२: २,३ मध्ये असे वर्णन केले आहे: "मी तुला आशीर्वाद देईन… तू आशीर्वादित होशील…… तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील." ख्रिस्ताने वधस्तंभावर शाप बनण्याद्वारे आमच्यासाठी हा आशीर्वाद विकत घेतला आहे. त्याला आपल्याला आशिर्वाद द्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या सर्व आयुष्यभर पृथ्वीवरील प्रत्येकासाठी आशीर्वाद असे करायचे आहे. हा आशीर्वाद (वचन आपल्याला सांगते) पवित्र आत्मा ग्रहण केल्याने आपल्याकडे येतो. येशूने पवित्र आत्म्याचे असे वर्णन केले की पाण्याचा झरा जो आपल्यात उफाळतो व आम्हांला आशीर्वादित करतो (योहान ४:१४), आणि मग पाण्याच्या नद्या आपल्यामधून वाहतात व इतरांना आशीर्वादित करतात (योहान ७: ३७-३९). आज पाप आणि अपयशाने जगणार्‍या सर्वांत वाईट पाप्याबद्दल परमेश्वराचे अभिवचन हे आहे: "जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल.” (जखऱ्या ८:१३). ईश्वराची हीच इच्छा आहे की आपण पृथ्वीवर आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी आशीर्वादरूप व्हावे.