WFTW Body: 

स्तोत्र 1 मध्ये एका धन्य पुरुषाचे वर्णन आहे. तो पापी मार्गाने न जाता देवाच्या वचनाचे मनन करितो. केवळ दुष्ट मार्गाकडे न जाणे पुरे नाही. ज्या हृदयातून दुष्टता बाहेर काढण्यात आली आहे व जे शुद्ध करण्यात आले आहे त्यात देवाचे वचन भरले जावे. देवाच्या वचनाचे रात्रंदिवस मनन करणे म्हणजे वेळोवेळी वाचलेल्या वचनाचा विचार करणे जेणेकरून ते आपल्या अंतःकरणात रूजावे. खाल्लेले अन्न ज्याप्रकारे अनेक तासांमध्ये पचल्या जाते, त्याचे रक्त होते, त्याचे मास व हाडे होतात तशाप्रकारचे हे आहे. जेवण खाण्याकरिता कमी वेळ लागतो. परंतु खाल्लेले जेवण पचण्याकरिता पुष्कळ त्रास लागतात. देवाचे वचन वाचण्याकरिता कमी वेळ लागतो परंतु, वाचलेल्या वचनाचे मनन करणे महत्वाचे आहे. जर आपण देवाच्या वचनाचे मनन केले तर आपण पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेल्या झाडासारखे व हंगामी फळ देणार्या झाडासारखे होतो आणि आपण हाती घेतलेले काम सिद्धीस जाते. देवाचा आशीर्वाद आपल्या हातच्या कामावर व आपल्या मुखातील शब्दांवर असतो. अशाप्रकारचे जीवन जगावे अशी अशी देवाची इच्छा आहे.

स्तोत्र 4 यामध्ये क्रोधाच्या पापाविरुद्ध आपल्याला ताकीद देण्यात आली आहे, 'त्याची भिती बाळगा, पाप करू नका' (स्तोत्र 4:4). हीच गोष्ट इफिस 4:26 मध्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहे. 'तुम्ही रागावा, परंतु पाप करूं नका''. परंतु, स्तोत्र 4:4 मधील उर्वरीत बोध इफिस 4:26 मध्ये केलेला नाही. तो अशाप्रकारे आहे, 'अंथरूणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा.' हा उत्तम असा व्यवहारिक सल्ला आहे. देवाच्या कृपेद्वारे तुम्ही रागावर विजय मिळविल्यास ते उत्तम. रागाला नियंत्रणात ठेवणे कठीण झाल्यास तुम्ही अंथरूणावर स्तब्ध पडावे. अंथरूणावर पडल्या पडल्या 'देवाला नीतिमत्वपूर्वक यज्ञ करा'' (स्तोत्र 4:5).'तू माझ्या मनात अधिक आनंद उत्पन्न केला आहे' (स्तोत्र 4:7). असे म्हणण्याची मनस्थिती तयार झाल्यावरच आपल्या अंथरूणावरून उठा. आतापर्यंत माझ्या अंतःकरणात क्रोध होता परंतु आता माझ्या अंतःकरणात आनंद आहे.

स्तोत्र 12 हे जिभेच्या उपयोगाविषयी आहे. ह्या स्तोत्रात सुरुवातीलाच म्हटले आहे की कोणी भक्तीमान उरला नाही आणि मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहे आणि पुढील तीन वचनांमध्ये जिभेविषयी सांगितले आहे की जिभेद्वारे लोक एकमेकांशी असत्य भाषण करितात, ते दुजाभाव ठेवून खुशामतीचे शब्द बोलतात. परंतु, धार्मिक मनुष्य कृपायुक्त भाषण करितो. अधार्मिक पुढीलप्रमाणे म्हणतो, 'आमचे ओठ आमचेच आहेत. आमचा धनी कोण?' (स्तोत्र 12:4). जो पुरुष आपली जीभ ताब्यात ठेवू शकतो तो पूर्ण म्हणावा (याकोब 3:1). धार्मिक पुरुषाला जाणीव असते की, '्यरमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमीनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत' (स्तोत्र 12:6). म्हणूनच तो विचार करून बोलतो. जर त्याच्या मनात शंका असेल तर जे शब्द तो बोलणार ते तो हृदयातील भट्टीत टाकतो आणि स्वतःला काही प्रश्न विचारितो : ''असे बोलणे गरजेचे आहे का?, मी सौम्यपणे ते बोलू शकतो का?, मी सत्य बोलत आहे का?, मी प्रीतीने बोलत आहे का?, इत्यादी...'' नंतर काय बोलावे व कसे बोलावे ह्याचा ठराव तो घेतो. एखाद्या व्यक्तीला जर तो पत्र लिहीत असेल तर लिहिलेले पत्र तो तपासतो व त्यातील चुका सुधारून तो नवीन प्रत लिहितो. पत्र पूर्णपणे त्रृटीरहीत होऊस्तर तो पक्की प्रत लिहीत राहतो. शेवटी लिहिलेली पत्र त्रृटीरहीत आहे ह्याची खात्री करून त्या पत्राची प्रत तो पाठवितो.