WFTW Body: 

१. प्रीती प्रशंसा व्यक्त करते:
वैवाहिक प्रीतिविषयीचे एक संपूर्ण पुस्तक आहे ज्याचा देवाने पवित्र शास्त्रामध्ये समावेश केला आहे— गीतरत्न. येथे गीतरत्नात पती आपल्या पत्नीला काय म्हणतो याचा विचार करा (द मेसेज बायबलमधील विविध वचनांतून): "तू सुंदर आहेस, माझ्या प्रिये, मस्तकापासून ते पायांच्या बोटांपर्यंत - तुलना करण्यापलीकडची व काहीही दोष नसलेली. तू माझ्या कल्पनेतील परमानंदाच्या मोहक दृश्यांइतकीच सुंदर आहेस. तुझी वाणी सांत्वन करणारी आहे आणि तुझा चेहरा अत्यंत मोहक आहे. माझ्या प्रिय मैत्रिणी, तू तर मनाने आणि तनाने, सौंदर्यपूर्ण आहेस. तू तर सुखलोक आहेस." तू माझे हृदय जिंकले आहेस. तू माझ्याकडे पाहिलेस आणि मी प्रेमात पडलो. एक दृष्टीक्षेप माझ्या मार्गाकडे - आणि मी अतिशय प्रेमात पडलो! माझे हृदय अत्यानंदाने भरले आहे. अहाहा, तुला पाहून माझ्या मनात किती भावना येतात आणि किती माझ्या इच्छेची खळबळ होते. मी आता दुस-या कोणासाठीही उपयोगाचा राहिलो नाही!"." पृथ्वीवर तुझ्यासारखी कोणीही नाही, तिथे कधीच नव्हती, आणि कधीच होणार नाही. तू एक अतुलनीय स्त्री आहेस." आणि आता पत्नी काय म्हणते ते ऐका. ही तिची प्रतिक्रिया आहे: "आणि तू, माझा प्रिय प्रियकर किती देखणा आहेस! तू दशलक्षांत एक आहेस. तुझ्यासारखा कोणीच नाहीये! तू सोन्यासमान आहेस - पुरुषांमध्ये तू आकर्षक आणि करारी आहेस. तुझे शब्द उत्साहपूर्ण आणि नव्याने आश्वासन देणारे आहेत. तुझे शब्द चुंबनासारखे आहेत आणि तुझी चुंबने सर्व शब्द आहेत. तुझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट मला आनंदित करते. तू मला अंतर्यामी रोमांचित करतोस ! मी तुझी फार इच्छा धरते आणि मला तू खूप हवा आहेस. तुझी अनुपस्थिती माझ्यासाठी वेदनादायक आहे. जेव्हा मी तुला पाहीन, तेव्हा मी माझ्या हातांनी तुला आलिंगन देईन आणि तुला घट्ट पकडून ठेवीन. आणि मी तुला जाऊ देणार नाही. मी फक्त तुझीच आहे आणि तू माझा एकमेव प्रियकर आहेस आणि तू माझा एकमेव पुरुष आहेस."

२. प्रीती क्षमा करण्यास तत्पर असते:
प्रीती दोष देण्यात मंद असते, पण क्षमा तत्परतेने करते. प्रत्येक विवाहात पती-पत्नीमध्ये समस्या येतील. परंतु जर आपण त्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर त्या निश्चितपणे उकळण्याची खात्री आहे (म्हणजे, जर आपण त्या समस्यांना कमी प्राधान्य दिले तर - त्वरित निराकरण करण्याऐवजी - त्या समस्या आणखी वाईट होतील). म्हणून क्षमा करण्यास तत्पर व्हा आणि क्षमा मागण्यास तत्पर व्हा. ते करण्यासाठी संध्याकाळपर्यंत थांबू नका. सकाळी पायात काटा रुतला तर तो तुम्ही लगेच बाहेर काढाल. तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबणार नाहीत. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला दुखावले असेल, तुम्ही त्याला/तिला काट्याने टोचले असेल, तर - तो ताबडतोब बाहेर काढा - ताबडतोब क्षमा मागा आणि क्षमा करा.

३. प्रीती आपल्या जोडीदारासह एकत्र गोष्टी करण्यास उत्सुक असते - आणि एकटेच नाही:
मनुष्याचा इतिहास किती वेगळा असता, जर सैतान हव्वेला बागेत मोहात पाडण्यासाठी आला असता, तेव्हा तिने फक्त एवढेच म्हटले असते, "मी निर्णय घेण्यापूर्वी मला प्रथम माझ्या पतीचा सल्ला घेऊ द्या". अहा, तेव्हा किती वेगळी गोष्ट झाली असती! हे लक्षात असू द्या की, जगातील सर्व समस्या उद्भवल्या कारण एका स्त्रीने स्वतःहून निर्णय घेतला होता, जेव्हा देवाने तिला असा एक साथीदार दिला होता ज्याच्याशी ती, तो निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत करू शकली असती. खरी प्रीती गोष्टी एकत्रपणे करते. एकट्यापेक्षा दोघे नेहमीच बरे असतात( उपदेशक ४:९).