सुखी वैवाहिक जीवनाकरिता. कृपा मिळण्याबाबत पेत्र बोलतो ''पतींनो तसेच तुम्हीही आपल्या, स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजकू पात्र आहते म्हणनू सुज्ञतेनें सहवास ठेवा; तुम्हीं उभयतां जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहां, म्हणून तुम्हीं त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाहीं'' (1 पेत्र 3:7).
देवाची इच्छा आहे की ख्रिस्ती दाम्पत्यांनी शांतीने व सौख्याने एकत्र मिळून राहावे. त्यांचे कुटूंब झगडत असलेल्या जगामध्ये एका द्वीपासारखे असावे. याकरिता विपुल कृपा हवी असते.
पुढे पत्रे आत्मिक दानांविषयी बोलतो, “प्रत्येकाल जसें कृपादान मिळालें आहे तसें देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्यांप्रमाणें तें एकमेकांच्या कारणीं लावा'' (1 पत्रे 4:10). प्रत्यके आत्मिक दान इतरांची सेवा करण्याकरिता उपयोगी पडावे. याद्वारे इतरापं यंर्त देवाची खरी कृपा पोहंचावी. देवाच्या कृपेला अनेक पहलू आहेत. यामुळेच देवाने विभिन्न पार्श्वभूमीतील लोकांना निवडले आहे. देवाने विभिन्न स्वभावाच्या, संस्कृतीच्या लोकांना ख्रिस्ताच्या शरीरात एकत्रीत ठेवले आहे जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनाद्वारे व सेवेद्वारे एकमेव रीतीने देवाची कृपा इतरांपर्यंत पोहंचावी.
''तसेंच तरुणांनो वडिलाच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठीं नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण 'देव गर्विष्ठांना विरोध करितो आणि लीनावंर कृपा करितो'' (1 पेत्र 5:5). याठिकाणी पेत्र आत्मिक अधिकाराच्या अधीन राहण्याचे महत्व तरुणांना सांगत आहे. 20 वयाच्या आत कोणा तरुणाचे तारण झाल्यास देवाचा उद्देश असा समजावा की त्याच्या वयाच्या पस्तीसाव्या वयापर्यंत त्याची सेवा प्रभावित व्हावी. परंतु हा देवाचा उद्देश पूर्ण होण्याकरिता तारण झालेल्या तरुणाला भग्न होण्याचे महत्व कळावे. वयाच्या पस्तीवाव्या वर्षापर्यंत त्याला नम्रतेचे महत्व कळावे. म्हणजेच त्याने भग्न व नम्र होणे फार जराजेचे आहे. जेव्हा तो आत्मिक अधिकाराच्या अधीन राहील तेव्हा तो नम्र व भग्न हाऊे शकले . मग स्वतः आत्मिक अधिकाराची जबाबदारी घरात व मंडळीत पेलाण्याकरिता त्याला कृपा प्राप्त हाइेर्ल. जे तरुण आत्मिक अधिकाराच्या अधीन नसतात त्यांची सेवा शेवटी अयशस्वी होते. ह्याचा अर्थ असा नाही की आपण वृद्ध झाल्यावर नम्र होण्याची किंवा असण्याची गरज नाही. आपण तरुण असतानाच वडिलांच्या अधीन राहण्यास शिकावे. परंतु, येशूच्या मागे जात असता आपण शेवटच्या दिवसापर्यंत नम्र असावे. मग जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कृपा प्राप्त होत राहील.
गर्विष्ठांचा देव विरोध करितो. तो नम्र जनांना कृपा पुरवितो. आपले सिद्धांत बरोबर असले परंतु आपण गर्विष्ठ असलो तर आपला शेवट परूश्यांप्रमाणे होईल, आपण फसविल्या जाऊ व आत्मिक सत्यांविषयी आंधळे राहू. मग आपल्या दिवसातील देवाच्या खर्या संदेष्ट्यांना आपण ओळखणार नाही. परूश्यांना देखील येशूची ओळख पटली नव्हती. तो तर खरा संदेष्टा होता.
पापाची सुरुवात गर्वापासून व स्वार्थीपणापासनू होते. त्याचप्रमाणे खिस्र्ताच्या सर्व सद्गुणांची सुरुवात नाम्रातेतून व निस्वाथीर्पणातून होते. जेवढ्या जास्त प्रमाणात आपण स्वतःला नम्र करू, तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत राहील. मग आपण विजयी होत राहू व आपल्या जीवनातून अधिक आणि अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा स्वभाव दिसत राहील. जर कोणी पापावर विजय मिळवू शकत नाही तर समजावे की नक्कीच तो नम्र झालेला नाही. कारण जे स्वतःला नम्र करितात त्यांना नक्कीच कृपा प्राप्त होते (1 पेत्र 5:6). जे देवाच्या कृपेंतर्गत येतात त्यांचा विजय निश्चित आहे (रोम 6:14).