लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   नेता शिष्य
WFTW Body: 

नवीन करारात मंडळीला देव बांधीत असलेले घर म्हटले आहे व नीतिसूत्रे 24:3 मध्ये नमूद केले आहे की सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते

शिष्य वचनांचा थोडा फार अभ्यास करून सुज्ञानी बनत नाहीत. त्यामुळे केवळ त्यांच्यात ज्ञानात भर पडेल. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय (नीतिसूत्रे 9:10). परमेश्वराचे भय धरणे ही ख्रिस्ती जीवनाची बाराखडी होय. याकोब 3:17 मध्ये सांगितले आहे की ''वरून येणारें ज्ञान हें मुळांत शुद्ध असतें.'' म्हणून जे ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करू इच्छितात त्यांनी प्रथम देवाचे भय बाळगण्यास शिकले पाहिजे. इतरांना पुढीलप्रमाणे म्हणण्यास शिकले पाहिजे, ''मुलांनो या, माझें ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन'' (स्तोत्र 34:11).

आपण सैद्धांतीक अचूकतेचा, भावनीक अनुभवांचा, स्तुती आणि भक्तीचा, सुवार्ता किंवा इतर गोष्टींचा प्रभाव पडू शकतो. परंतु, जर या सर्वांमध्ये देवाच्या भयाचा पाया नसला तर जे काही आपण बांधतो ते सर्व एके दिवशी कोसळून पडेल

कार्यक्रमांद्वारे, कार्यांद्वारे, संपत्तीद्वारे, मानवी आडाख्यांद्वारे किंवा ऐहिक जगातील कोणत्याही तत्वांद्वारे आपण मंडळी बांधू शकत नाही. अशा तत्वांनी जे ख्रिस्ती कार्य करण्यात येते ते मानवी डोळ्यांना आकर्षक दिसू शकते; परंतु, जेव्हा देव अग्नीने त्याला पारखेल तेव्हा ते आपल्याला केवळ लाकूड व गवतच दिसेल (1 करिंथ 3:11-15).

देवाच्या घराचे वैशिष्ट्य असे की ते स्वतःचा न्याय करिते (1 पेत्र 4:17). देवाच्या मुखापुढे जगण्याचे परिणाम म्हणजे आपल्यापासून न्यायनिवाडा होतो. यशया, ईयोब व योहानाने जेव्हा देवाला बघितले तेव्हा त्यांनी स्वतःची निष्क्रियता, शून्यता व पाप बघितले (यशया 6:5; ईयोब 42:5,6; प्रकटीकरण 1:17).

जेव्हा आदाम व हव्वेने देवाच्या पवित्रतेला विटाळविले तेव्हा देवाने त्यांना एदेन बागेतून काढून टाकले. देवाने नंतर जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्याकरिता करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार तिथे ठेविली. जीवनाचे हे झाड सार्वकालिक जीवनाला (दैवी स्वभावाला) जे देण्याकरिता येशू आला त्याला प्रकट करिते. तरवार वधस्तंभाला प्रकट करिते, ज्यामुळे दैवी स्वभावाचे वाटेकरी होण्यापूर्वी आपले स्वजीवन मारण्यात यावे. हे सत्य आहे की ही तरवार प्रथम येशूवर पडली; परंतु, त्याच्या बरोबर आपणही वधस्तंभाला खिळलेलो आहोत (गलती 2:20). आणि ''जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळिला आहे'' (गलती 5:24).

मंडळीतील वडीलजनांनी करूबीमप्रमाणे तरवारीचा उपयोग करावा आणि असे स्पष्ट सांगावे की दैवी जीवनाकडे जाणारा एकमेव मार्ग म्हणजे देहाचे मरण. देवासोबत पुन्हा सहभागिता होण्याचा मार्ग तरवारीद्वारे आहे. ह्या तरवारीचा योग्य प्रकारे उपयोग होत नसल्यामुळे आज अनेक मंडळ्या तडजोड करीत आहेत व ख्रिस्ताच्या देहाचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनाद्वारे पडत नाही

गणना 25:1 मध्ये आपण अशा घटनेविषयी वाचतो जेव्हा इस्त्राएल लोक शिट्टिमांत राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले होते. एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदाकडे आणली (वचन 6). परंतु, संपूर्ण राष्ट्राचा नाश होण्यापासून त्या दिवशी एका फीनहास नावाच्या याजकाने इस्राएलला वाचविले. देवाला गौरव देण्याकरिता त्याचे मन इतके चेतलेले होते की त्याने बरची घेतली व तो डेर्याच्या आंतील खोलीत शिरला व त्याने त्या पुरुषाला व त्या स्त्रीला आरपार भोसकून मारून टाकिले (वचन 7,8). नंतर देवाने इस्राएल लोकांमधील मरी थांबविली (वचन 9). परंतु तोपर्यंत देवाने मरीद्वारे 24,000 लोक मारून टाकले होते. मरी इतक्या जलदपणे पसरू लागली की जर त्या दिवशी त्या करूबीमाने ती तरवार चालविणे थांबविले असते तर मरीने संपूर्ण इस्राएल राष्ट्र मारल्या गेले असते

प्रत्येक मंडळीमध्ये ''तरवार घेऊन असलेला करूबीम'' असणे किती महत्वाचे आहे हे तुम्ही बघितले का?

आज जागतीक ख्रिस्ती समाजात ही मरी जलदगतीने पसरत आहे कारण तरवारीचा उपयोग कसा करायचा ह्याचे ज्ञान असलेले फीनहास आज मंडळ्यामं ध्ये नाहीत. मंडळीतले अनके वडील व वक्ते हे मनुष्यांना संतोषविणारे आहते जे आपल्याला सतत ''मिद्यान्यांवर प्रीती'' करण्यास सांगतात. मंडळीमध्ये आपण तरवारीचा उपयोग का करू नये ह्याची शंभर कारणे सैतान आपल्याला देईल. येशूची परीक्षा होत असताना ज्याप्रकारे सैतानाने वचनांचा उपयोग केला त्याचप्रकारे त्याची लबाडी योग्य ठरविण्याकरिता तो वचनांचे देखील सहाय्य घेईल.

फीनहासने तरवारीचा उपयोग केला तेव्हा त्याला वैयक्तिकपणे काही फायदा झाला का? काहीच नाही. याऊलट त्याने अधिक गोष्टी गमविल्या - विशेषेकरून स्वतःच्या चांगुलपणाची व सौम्यतेची साक्ष त्याने गमाविली. तो निंदेचे पात्र बनला आणि त्याच्या नातेवाईकांकडून व ज्या मनुष्याला त्याने मारले त्याच्या मित्रांकडून राग व द्वेष त्याला सहन करावा लागला. परंतु, याद्वारे फीनहासला प्रोत्साहीत करणार्या देवाचे गौरव झाले व देवाचा सन्मान झाला आणि फीनहासच्या सेवेवर देवाने ''फीनहास याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्ष्येने पेटून...'' असे बोलून शिक्कामोर्तब केले (गणना 25:11). प्रभू फीनहासविषयी पुढे बोलत गेला, ''म्हणून त्याला असे सांग की, मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करितों, कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्त्राएल लोकांसाठी पा्र यश्चित केले'' (गणना 25:12,13). मागील अध्यायामध्ये आपण बघितले की, देवाने लेव्यांसोबत देखील आपला शांतीचा करार केला कारण त्यांनी ह्या तरवारीचा उपयोग केला होता (मलाखी 2:4,5).

आज अनेक मंडळ्यांमध्ये शांतीचा अभाव आढळतो कारण ते देवाच्या तरवारीचा उपयोग न करता मानवी पद्धतीने शांती मिळविण्याचा प्रयत्न करितात आणि ह्याचा परिणाम संघर्ष व मतभेदांमध्ये होतो. ख्रिस्ताची शांती तरवारीद्वारे मंडळीत व घरात विकत घेण्यात आली आहे. ही तरवार स्वार्थी जीवनाचा वध करिते

मंडळीमध्ये जे लोक पुढारीपण करीत आहेत त्यांना जर मंडळीत शुद्धता राखून ठेवायची आहे तर त्यांनी देवाच्या नावाचे गौरव होण्याकरिता ईर्ष्येने पेटणे अत्यंत गरजेचे आहे. चांगुलपणाची व सौम्यपणाची साक्ष मिळविण्याच्या मागे त्यांनी लागू नये. त्यांना केवळ देवाच्या नावाचे गौरव होण्याची कळकळ असायला हवी

देवाचे गौरव करण्याच्या ह्याच ईर्ष्येने पेटलेल्या येशू ख्रिस्ताने मंदिरात व्यवसाय करणार्यांना व बाजारपेठ लावणार्यांना हाकलून लाविले. ''तेव्हां 'तुझ्या मंदिराविषयींचा आवेश मला ग्रासून टाकील'' (योहान 2:17). ख्रिस्तासारखे करणे किंवा ख्रिस्तासारखे होणे हे फार महत्वाचे आहे. परंतु, जर आपण अप्रसिद्ध होत असू किंवा आपल्याविषयी गैरसमज होत असेल तर आपल्याला ख्रिस्तासारखे होणे आवडेल का?