लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

१ ले राजे या पुस्तकात आपल्याला असे आढळते की, या पुस्तकाची सुरुवात दाविदापासून होते जो देवाच्या मनासारखा होता आणि त्याचा शेवट इस्रायलवर राज्य करणारा आतापर्यंतचा सर्वात वाईट राजा अहाब याच्यापाशी होतो . इस्रायल एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून सुरुवात करते आणि विभाजित राष्ट्र म्हणून संपते आणि अनेक दुष्ट राजांनी दोन्ही राज्यांवर - विशेषत: इस्रायलवर राज्य केले आहे.

देवाच्या लोकांची स्थिती त्यांच्या पुढाऱ्यांमधील आध्यात्मिकतेवर किंवा त्याच्या अभावावर खूप अवलंबून असते. जेव्हा जेव्हा इस्राएलचा पुढारी देवभीरू असायचा, तेव्हा ते देवाच्या मार्गात पुढे सरकायचे . जेव्हा त्यांच्याकडे एखादा दैहिक पुढारी असायचा , तेव्हा ते देवापासून दूर दैहिकतेमध्ये जायचे. देवाच्या लोकांमध्ये देवभीरू पुढारी असणे ही नेहमीच मोठी गरज राहिली आहे.

येशूने आपल्या काळातील लोकांकडे पाहिले आणि त्यांच्याकडे मेंढपाळ नसलेली मेंढरे म्हणून पाहिले. देवाने त्यांच्यामध्ये मेंढपाळ द्यावा त्याने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास सांगितले.(मत्तय९:३६-३८). आज जेव्हा देव मंडळीकडे पाहतो, तेव्हा त्याला हीच देवभीरू पुढाऱ्यांची गरज दिसते. तेव्हा आपल्यासमोर आव्हान येते ते म्हणजे आपल्या पिढीतील ज्या प्रकारच्या स्त्री-पुरुषांना देव शोधतो तसे होऊन देवाचे हृदय संतुष्ट करणे होय.

प्रत्येक पिढीत देवाला देवभीरु पुढाऱ्यांची गरज असते. आपण आधीच्या पिढ्यांच्या पुढाऱ्यांच्या शहाणपणावर अवलंबून असू शकत नाही. दावीद इस्रायलवर कायमचा राज्य करू शकला नाही. तो मरण पावणार होता आणि दुसऱ्या कोणालातरी राज्य ताब्यात घ्यावे लागणार होते. इस्राएलचे काय होईल हे पुढचा राजा कोणत्या प्रकारचा माणूस असेल यावर अवलंबून होते .

देव एका पिढीत काम सुरू करण्यासाठी एक देवभीरू माणूस उभा करतो. तो वयोवृद्ध होतो आणि मरण पावतो. पुढच्या पिढीतील पुढाऱ्यांजवळ केवळ संस्थापकाचे ज्ञान आणि त्याचे सिद्धांत असतील , पण त्याचा देवभिरुपणा आणि त्याचे देवाबद्दलचे ज्ञान नसेल का? मग लोक नक्कीच भरकटतील. देवाला आपल्या दिवसांत देवाला दाविदांची आणि दबोरांची गरज आहे.