लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

गणना १३ मध्ये आपल्याला आढळते की इस्राएली लोक कनानच्या सीमेवर कादेश बरण्या येथे - जी भूमी देण्याचे देवाने वचन दिले होते, आले होते. त्यांना मिसर सोडून दोन वर्षे झाली होती (अनुवाद २:१४) आणि देवाने त्यांना त्या प्रदेशात जाऊन तो काबीज करण्यास सांगितले. त्या देशात हेरगिरी करण्यासाठी इस्राएली लोकांनी बारा हेर पाठवले.

“देव ज्याच्याबरोबर उभा आहे त्याला तुम्ही कसे ओळखाल? तो विश्वासाची भाषा बोलतो.”
तो खरोखरच एक अद्भूत देश आहे असे सांगत हे सर्व बारा जण परत आले. त्यापैकी दहा जण म्हणाले, “परंतु तिथे महाकाय लोक आहेत आणि आम्ही त्यांच्यावर विजय मिळवू शकत नाही.” (गणना १३:२७, २८, २९).

​पण त्यातील दोन जण, कालेब आणि यहोशवा म्हणाले,“चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल. तेथील महाकाय लोकांवर विजय मिळवण्यासाठी परमेश्वर आम्हांला साह्य करील.”(गणना १४: ६-९) परंतु ६००,००० इस्राएली लोकांनी बहुमताचे ऐकले.

​यातून आपण काय शिकतो? सर्व प्रथम, बहुमताचे अनुसरण करणे धोकादायक आहे - कारण बहुमत नेहमीच चुकीचे असते. येशूने म्हटले, “जीवनाचा मार्ग अरुंद आहे आणि फारच थोड्या लोकांना तो सापडतो ”. बहुमत आजही विनाशाच्या रुंद मार्गाकडे जाते. म्हणून जर आपण बहुमताचे अनुसरण केले तर आपण विनाशाच्या व्यापक मार्गावर त्यांच्यासह नक्कीच असाल. अशी कधीही कल्पना करू नका की मोठी मंडळी म्हणजे आध्यात्मिक मंडळी होय. येशूच्या मंडळीमध्ये केवळ ११ सदस्य होते. जेव्हा दहा नेते एक गोष्ट बोलतात आणि दोघांनी अगदी उलट सांगितले तर आपण कोणाची बाजू घ्याल? देव, यहोशवा आणि कालेब या दोघांच्या बाजूचा होता.

​अविश्वास आणि सैतान इतर दहा जणांच्या बाजूला होते. परंतु बहुतेक इस्राएली लोक मूर्खपणे बहुमताच्या बाजूला गेले आणि म्हणूनच पुढची ३८ वर्षे त्यांना वाळवंटात भटकंती करावी लागली. देव कोणाच्या बाजूने आहे हे पाहण्याचा त्यांचा विवेक नव्हता! देव आणि एक माणूस नेहमीच बहुमत असते - आणि तिथेच मला नेहमी उभे रहायचे आहे. आपण निर्गम ३२ मध्ये पाहतो की जेव्हा सर्व इस्राएल सोन्याच्या वासराची उपासना करत होते तेव्हा देव फक्त एका मनुष्याच्या, मोशेच्या बाजूने होता. परंतु त्या बारा वंशांपैकी फक्त लेवीच्या वंशाला ते दिसू शकले. आणि देव जेव्हा यहोशवा आणि कालेबबरोबर होता तेव्हा लेवी वंशातील लोकांनासुद्धा ते समजू शकले नाही!

​या सर्व गोष्टी आपल्यासाठी आजचे धडे आहेत. ख्रिस्तीजगत सर्वसाधारणपणे तडजोड आणि जगिकतेने भरले आहे.अनेक ठिकाणी देव काही लोक उभे करतो जे देवाच्या वचनाच्या सत्यासाठी कोणत्याही तडजोडीशिवाय उभे राहतात.जर आपल्याकडे विवेकबुद्धी असेल तर आपण समजून घ्याल की देव त्या मोजक्या लोकांबरोबर आहे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर बहुमताच्या विरोधात उभे राहाल. आपण त्यांच्याबरोबर वचनदत्त देशात प्रवेश कराल.

देव ज्याच्याबरोबर उभा आहे त्याला तुम्ही कसे ओळखाल? तो विश्वासाची भाषा बोलतो. यहोशवा व कालेब विश्वासाची भाषा बोलले: “आपण विजय मिळवू शकतो.” राग, लैंगिक वासना, मत्सर, कुरकुर इत्यादी राक्षसांवर आपण विजय मिळवू शकतो आणि आपण सैतानावर विजय मिळवू शकतो. देव त्याला आमच्या पायांखाली तुडवील. देव ज्याच्याबरोबर उभा आहे त्या माणसाची ती भाषा आहे.