लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   घर
WFTW Body: 

प्रकटीकरण 9:1-11 मध्ये आपण वाचतो : पांचव्या देवदूतानें कर्णा वाजविला, तेव्हां एक तारा आकाशांतून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यांत आली. त्यानें अथांग डोह उघडिला, 'तेव्हां' त्यांतून मोठ्या 'भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला;' आणि त्या डोहांतल्या धुरानें 'सूर्य' व अंतराळ हीं 'अंधकारमय' झालीं. त्या धुरांतून 'टोळ निघून पृथ्वीवर' उतरले; त्यांस पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ति देण्यांत आलीं. त्यांस असें सांगण्यांत आलें कीं, 'पृथ्वीवरील गवताला, कोणत्याहि हिरवळीला व कोणत्याहि झाडाला' उपद्रव करूं नये; तर ज्या माणसांच्या 'कपाळांवर' देवाचा 'शिक्का' नाहीं त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना जिवें मारण्याचें त्यांच्याकडे सोपविलें नव्हतें तर फक्त पांच महिने पीडा देण्याचें सोपविलें होतें; त्यापासून होणारी पीडा, विंचू माणसाला नांगी मारितो तेव्हां त्याला होणार्याह पीडेसारखी होती. त्या दिवसांत माणसें 'मरणाची संधि शोधतील तरी ती त्यांना' येणार 'नाहीं'; मरावयाची उत्कंठा धरितील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल. त्या टोळांचें 'स्वरुप लढाईसाठीं' सज्ज केलेल्या 'घोड्यांसारिखें' होतें; त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुगुटासारखें कांहींतरी दिसत होतें. त्यांचे तोंडवळे माणसांसारिखें होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारिखें आणि 'त्यांचे दांत सिंहांच्या दांतांसारिखें' होते. त्यांस उरस्त्राणें होतीं तीं लोखंडी उरस्त्राणांसारिखीं दिसत होतीं; आणि त्यांच्या पंखांचा आवाज 'लढाईत धावणार्या ' अनेक घोड्यांच्या 'रथांच्या आवाजासारिखा' होता; त्यांस विंचवांसारिखीं शेपटें व नांग्या आहेत आणि माणसांस पांच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ति त्यांच्या शेपटांत आहे. अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे; इब्री भाषेंतलें त्याचें नांव अबद्दोन, आणि हेल्लेणी भाषेंतलें त्याचें नांव अपल्लूओन आहे.

हा तारा नक्कीच पतन पावलेला देवदूत सैतानच असावा. पतन पावलेल्या या देवदूताला अथांग डोहाच्या किल्ल्या दिल्या होत्या. ज्याठिकाणी देवाने काही दुष्टआत्म्यांना बंद करून ठेवले आहे (आपण 1 पेत्र 3:19 मध्ये वाचतो). सर्वच दुष्टआत्मे त्या ठिकाणी नाहीत. बहुतेक दुष्ट आत्म्यांना पृथ्वीवर सर्वत्र फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. येशू ज्या भूतग्रस्ताला भेटला होता त्याच्यामध्ये दुष्टआत्म्यांचे सैन्य होते. त्या दुष्टआत्म्यांनी येशूला विनवणी केली की त्यांना येशूने डोहात पाठवू नये. येशूने त्यांची विनंती ऐकली व त्यांना 2000 डुकरांमध्ये पाठविले व ती डुकरे समुद्रात जाऊन मरण पावली. एके दिवशी अथांग डोह उघडल्या जाणार आहे व त्यात बंदिस्त असलेले दुष्टआत्मे मोकळे केले जाऊन ते पृथ्वीवर येतील.

याप्रकारचा न्याय देव पृथ्वीवर पाठविणार आहे. याद्वारे देव लोकांना सांगू इच्छितो, ''तुम्ही सैतानाच्या सल्याप्रमाणे करण्याचे ठरविले. माझी वचने पाळण्याएवे जी सतै ानाची वचने तम्ु हाला पसतं आली. हरकत नाही. आता तमु चे मित्र तम्ु हाला यऊे न भटे तील. अथागं डाहे ातनू ते तमु च्याकडे यते ील.'' या ठिकाणी असेच लिहिले आहे.

त्या डोहातून अपशब्दांचा व अशुद्ध आत्म्यांचा धूर निघत होता. टोळ हे दुष्टआत्मे आहेत ज्यांना मानवीय मनात विष दंश करण्याची शक्ती देण्यात आली. विंचवासारख्या विषाची शक्ती त्यांच्यात देण्यात आली. जेणेकरून ते मनुष्याच्या शरीरात विष घोळून वेदना उत्पन्न करितील. या वेदना इतक्या भयंकर असतील की अनेक लोक मरणाचा प्रयत्न करितील परंतु त्यांना मरण येणार नाही!

दुष्टआत्म्यांचे हे वर्णन भयंकर आणि भयंकर आहे. त्याठिकाणी वेड्या स्त्रीच्या केसांसारखे केस दाखविले आहेत व सिंहाच्या दातांसारखे दात दाखविले आहे. हे सर्व दृश्य दुष्ट आत्म्यांकडून होणार्याख भयंकर वेदनांचे व त्रासाचे वर्णन करिते. परंतु, त्यांना केवळ पाच महिन्यापर्यंत मनुष्याला वेदना देण्याचे स्वातंत्र्य राहील. केवळ पाचच महिने कां? कारण देव दयाळू आहे.

मत्तय 18:23-35 मध्ये येशूने त्या व्यक्तीची गोष्ट सांगितली ज्याचे कर्ज एका राजाने माफ केले. आता त्याने देखील त्याच्या दासाचे कर्ज माफ करणे अपेक्षित होते. या दयाहीन माणसाने त्याच्या दासाला धरले व कर्ज मागितले. जेव्हा राजाने ही गोष्ट ऐकली तेव्हा राजाला राग आला. त्याने दयाहीन माणसाला शिक्षा केली. ती शिक्षा देण्यासाठी व वेदना देण्यासाठी काही लोक ठरविलेले होते. हे लोक त्या दुष्ट आत्म्यांचे प्रतिनिधीत्व करितात जे आजच्या दयाहीन विश्वासणार्यांाना वेदना देतील. कारण येशूने म्हटले आहे, ''म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाहीं तर माझा स्वर्गांतील पिताहि त्याप्रमाणेंच तुमचें करील'' (मत्तय 18:35).