लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

मला २ करिंथ ३:१८ हे एक वचन सापडले आहे जे संपूर्ण नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याच्या संपूर्ण सेवाकार्याचे बहुतांश वर्णन करते. जेव्हा पवित्र आत्मा माझ्या आयुष्यात प्रभू बनतो तेव्हा तो स्वातंत्र्य देतो (२ करिंथ ३:१७). तो मला मुक्त करतो. "जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे स्वातंत्र्य आहे" स्वातंत्र्य कशापासून? पापापासून, पैशावरील प्रेमापासून, वडील, आजोबा , मंडळीतील वडील या सर्वांच्या वाईट परंपरांपासून आणि लोकांच्या मतांपासून जे माझ्याबद्दल चांगले विचार करतात किंवा माझ्यावर टीका करतात. हे एक प्रचंड स्वातंत्र्य आहे. आणि आता मनुष्यांची सेवा करणे नव्हे तर देवाची सेवा करण्याचे स्वातंत्र्य आहे . पवित्र आत्मा हेच आणतो (२ करिंथ ३:१८). पवित्र आत्मा मला पवित्र शास्त्रामध्ये येशूचे वैभव दाखवतो. आरसा म्हणजे पवित्र शास्त्र. या आरशात मला येशूचे वैभव दिसते. पवित्र आत्मा आपल्याला केवळ धर्मसिद्धांत आणि प्रवचने दाखवत नाही - काही लोक धर्मसिद्धांत आणि प्रवचने मिळविण्यासाठी पवित्र शास्त्र वाचतात - पवित्र आत्मा आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये येशूचे वैभवदेखील दर्शवतो. नवीन करारातील सर्व काही मला येशू ख्रिस्ताचे वैभव दाखवते. मी ते वैभव पाहतो तेव्हा पवित्र आत्मा माझ्या हृदयात मला त्या प्रतिरूपात बदलण्याचे आणखी एक काम करतो. पवित्र आत्मा हेच करतो.

लोक म्हणतात, "सेवाकार्याचे काय?" येशूने कसे सेवाकार्य केले ते मी पाहतो आणि मी तसे सेवाकार्य करू लागतो. येशूने कसे बलिदान दिले व जिथेतिथे उपदेश केला तसे मीही त्याग करतो आणि जिथेतिथे उपदेश करतो. तुमचे सेवाकार्य कमी होईल असे समजू नका. तुम्ही अधिकाधिक त्याग करून सेवाकार्य कराल. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला २ करिंथ३:१७,१८ मध्ये नमूद केलेले काम करण्यास परवानगी द्याल तेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे सेवाकार्य बदलेल. तुम्ही एक नवीन कराराचे सेवक व्हाल आणि ते करण्यासाठी तुम्हांला पूर्णवेळ काम करण्याची गरज नाही. मंडळीमधील कोणताही भाऊ किंवा बहीण हे नवीन कराराचे सेवक असले पाहिजेत.

"आम्ही या सेवाकार्यासाठी समर्थ नाही." (२ करिंथ ३:५). या सेवाकार्यासाठी आवश्यक ते सर्व आपण तयार करू शकतो असे नाही, तर देवाकडून आपल्याला सामर्थ्य मिळते. नवीन कराराचा सेवक देवाची सेवा करण्यासाठी स्वत:मधील कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसतो. हे सर्व देवाकडून असते. "देवा, तू मला दे. मी ते इतरांना देईन." हे द्राक्षरस वाढणाऱ्या नोकरांसारखे आहे. या नोकरांनी ते पाणी येशूकडे नेले, त्याने ते द्राक्षरसामध्ये बदलले आणि त्यांनी ते वाढले. शिष्यांनी पाच भाकरी येशूकडे नेल्या, येशूने त्या अनेकपट केल्या आणि त्यांनी त्याचे वाटप केले. याचप्रकारे आपण आपली मर्यादित संसाधने देवाकडे नेतो आणि देव त्यावर अभिषेक करतो, आशीर्वादित करतो, ती अनेकपटींनी वाढवतो. अशा प्रकारे आपण सेवा केली पाहिजे. अनेक वर्षे देवाची सेवा केल्यानंतर देवाच्या कार्यातील अनेक लोक निराश, उदास आणि हताश होतात. ते थकून गेले आहेत कारण ते स्वत: च्या सामर्थ्यातून सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला विश्वास आहे की देवाच्या सेवेसाठी शारीरिक आरोग्य मिळवण्यासाठीही आपल्याला देवाची गरज आहे. आपण काही कठीण क्षेत्रात देवाची सेवा करण्यासाठी बाहेर जाऊ शकता आणि ते करण्यासाठी आपल्याला शारीरिक आरोग्याची आवश्यकता आहे. फक्त त्या अभिवचनाचा विचार करा, "तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत" ( यशया ४०:३०,३१ )आपले सामर्थ्य देवाकडूनच आहे जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असता, तेव्हा तुमच्याकडे ते वचन असेल, "आमचे सामर्थ्य देवाकडून आहे"(२ करिंथ ३:५). नव्या करारामध्ये तुमची गरज काहीही असली तरी आपली पूर्तता देवाकडूनच होते.

त्याने आम्हांला नवीन कराराचे सेवक बनवले आहे. नवीन करारामध्ये आपण अक्षराचे सेवक नाही तर आत्म्याचे आहोत (२ करिंथ ३:६). येथे दोन सेवाकार्ये नमूद केली आहेत, अन्यायी ठरवण्याची सेवा आणि न्यायी ठरवण्याची सेवा (२ करिंथ ३:९). अन्यायी ठरवण्याची सेवा म्हणजे काय? अन्यायी ठरवण्याची सेवा ही अशी आहे की जिथे तुम्ही उपदेश करता तेव्हा लोकांना अपराधी वाटते आणि ते निघून जातात. आपल्याला असे वाटेल की हे एक अद्भुत सेवाकार्य आहे कारण यात आपण प्रत्येकाला दोषीपणाची जाणीव करून दिली आहे. हा जुना करार आहे. नियमशास्त्र लोकांना दोष देते - "तुम्ही पुरेसे चांगले नाही, तुम्ही कधीच पुरेसे चांगले नसाल." ख्रिस्ती वर्तुळात आज संजीवन सभांमध्ये खूप उपदेश केला जात आहे ज्यात लोकांना फक्त सांगितले जाते की , "तुम्ही पुरेसे चांगले नाही, तुम्हांला ते कधीच शक्य होणार नाही. तू असा आहेस आणि तू तसाच आहेस." ते सर्व तिथे अपराधी भावनेने बसतात . तो ख्रिस्ती उपदेश नाही. ख्रिस्ती उपदेश लोकांना धार्मिकता आणि वैभवाकडे नेतात. त्यांना दोषी वाटते पण त्यांना सभेच्या अखेरीस प्रोत्साहित झाल्याची , बरे केल्याची आणि मुक्त झाल्याची जाणीव होते आणि ते आशेने जातात. जर तुमचा उपदेश लोकांना बंधनात आणत असेल तर आपण नवीन कराराचे सेवक नाही याची खात्री बाळगा. जर तुमच्या उपदेशाचा परिणाम म्हणून लोक प्रोत्साहित होण्याऐवजी त्यांना अपराधी वाटते, तर तो जुन्या कराराचा उपदेश आहे. जर तुम्ही लोकांना वर उचलण्याऐवजी खाली ढकलले, तर तो जुन्या कराराचा उपदेश आहे. नवीन कराराचा उपदेश त्यांना वर उचलतो आणि त्यांना आशा देतो.

२ करिंथ ४:१ मध्ये पौल आपल्या सेवाकार्याचे वर्णन करत राहतो. "म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही." 'धैर्य सोडणे' म्हणजे निराश होणे. प्रेषित पौलही निराश होण्याच्या परिक्षेत पडला. त्यामुळे जर तुम्हीही निराश होण्याच्या परिक्षेत पडत असाल, तर सेवाकार्यात हे आश्चर्य नाही. मीही अनेकदा निराश होण्याच्या परिक्षेत पडलो . पण पौल म्हणतो, "आपण निराश होत नाही. आपण निराश होण्यास नकार देतो कारण आपण आपले नेत्र येशूवर राखतो आणि देवाने आपल्याला दिलेल्या प्रचंड सेवाकार्याचा आपण विचार करतो." (२ करिंथ ४:१).