लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य
WFTW Body: 

नहेम्याचे पुस्तक आपल्याला दाखविते की एज्रा व नहेम्या ह्या दोन देवभिरू मनुष्यांद्वारे देवाने यहूदी लोकांमध्ये मोठे संजीवन आणले.

नहेम्याच्या आठव्या अध्यायात आपण वाचतो की एज्राद्वारे देवाने असे केले. एज्राने वचन घेतले व सर्व पुरुषांना, स्त्रियांना व समज आलेल्या लेकरांना एकत्र केले. त्यानंतर त्याने त्यांचा सहा तासाचा शास्त्रअभ्यासाचा वर्ग घेतला. वचनात सांगितले आहे, ''आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला'' (नहेम्या 8:3). त्यांनी आपल्या सभेची सुरुवात देवाला धन्यवाद देऊन केली (नहेम्या 8:6). मग त्याने देवाच्या वचनातून जे वाचले होते त्याचा अर्थ स्पष्टीकरणासह सांगितला (नहेम्या 8:8). देवाची वचन सर्व लोकांना स्पष्टपणे समजावून सांगता यावे म्हणून एज्राला त्या शास्त्र वचनाचा अभ्यास करण्याकरिता अनेक महिने व वर्षे द्यावी लागलीत

या वेळेकरिता देवाने त्याला गुप्तपणे तयार केले. जेव्हा लोकांना वचन समजले व त्यांच्यामध्ये संजीवन आले तेव्हा लोक आपल्या पापांकरिता रडू लागले होते (नहेम्या 8:9). त्यानंतर त्यांना ताकीद देण्यात आली होती की त्यांना देवाने ज्या चांगल्या गोष्टी दिल्या होत्या त्या त्यांनी इतरांना द्याव्यात. त्यामुळे परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच त्यांचा आश्रयदुर्ग होणार होता (नहेम्या 8:10). लोक तिथून निघाले व ह्या ताकीदीप्रमाणे ते वागले, त्यांनी आज्ञेचे पालन केले. दुसर्या दिवशी एज्राने पुढार्यांसाठी शास्त्रअभ्यासाचा वर्ग घेतला (नहेम्या 8:13). देवाने इस्राएली लोकांना दरवर्षी सातव्या महिन्याच्या पर्वणीस मांडवाचा सण पाळण्याची आज्ञा दिली होती हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी लागलीच ती आज्ञा पाळली. जवळ जवळ 900 वर्षांमध्ये हा सण पाळण्याची ही पहिलीच वेळ होती कारण यहोशवाच्या काळापासून लोक या आज्ञेचे पालन करीत नव्हते (नहेम्या 8:14-17). दावीद जो देवाच्या मनासारखा होता त्याने देखील इस्राएली लोकांनी या आज्ञेचे पालन करावे असे त्यांना सांगितले नव्हते. एज्रा पुढील सात दिवसपर्यंत लोकांना शास्त्र वचनातून शिकवीत राहिला (नहेम्या 8:18).

देवाने नहेम्याद्वारे ज्या गोष्टी केल्या त्या आपण नहेम्याच्या 9 व्या अध्यायात वाचतो. अध्यायाची सुरुवात इस्राएली लोकांनी केलेल्या उपासाने, पापकबुलीने व विदेश्यांपासून निराळे होण्यापासून होते (9:1,2). त्यानंतर ते तीन तास शास्त्राचा अभ्यास करीत असत व तीन तास देवाची स्तुती करीत असत व आपली पातके कबूल करीत असत. त्या ठिकाणी मोठे संजीवन आले होते (नहेम्या 9:3).

नंतर लेवी उभे राहून उच्च स्वराने देवाचा धावा करीत असत (नहेम्या 9:4). संपूर्ण शास्त्रात सर्वात मोठी प्रार्थना नहेम्या 9:5 ते नहेम्या 9:38 मध्ये नमूद केलेली आपल्याला आढळते. लेव्यांनी इस्राएली लोकांचा संपूर्ण इतिहास वदिला. त्यामध्ये अब्राहामाचा काळ, इस्राएली लोकांची चाळीस वर्षांपर्यंत अरण्यात भटकंती, शास्त्यांचा व राजांचा काळ समाविष्ट होता. त्या प्रार्थनेत त्यांनी असे कबूल केले की देवाने पाठविलेला प्रत्येक न्याय हा योग्य व न्याय्य आहे. त्यांनी पश्चात्ताप केला आणि देवापुढे त्यांनी करार करून त्यावर त्यांची मोहर केली. ह्या करारावर मोहर करणारा सर्वात प्रथम नहेम्या होता (नहेम्या 10:1).

एज्रा व नहेम्या या दोन देवभिरू मनुष्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व घडून आले. त्यांची ही जोड सेवा नवीन करारातील मंडळीच्या सेवेसारखीच कार्यरत होती जिचे नेतृत्व दोन पुढार्यांनी केले. आज अशीच सेवा करण्याकरिता आपल्यापुढे किती मोठे उदाहरण आहे!