WFTW Body: 

जर सैनिक आपला देश आझाद आणी स्वतंत्र ठेवण्यासाठी इतका त्याग करू शकतात, तर आपण आपल्या सर्वस्वाचा (आपल्या जीवनाचेसुद्धा) बलिदान करण्यास कितीतरी अधिक जास्त तयार असले पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीतून परमेश्वराचा सन्मान होईल, आणि सैतान लज्जित होईल.

मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या कार्यांमध्ये अलौकिकपणे देवाची कृपा मिळते. तुम्ही देवाला तुमच्या अभ्यासासाठी आणि कामासाठी कल्पना देण्यास सांगू शकता. देव तुम्हाला मदत करेल. विश्वासाने मागा - आणि तो तुमच्यासाठी काय चमत्कार करू शकतो ते पहा. अशा परिस्थितीत आपण त्याला सिद्ध करतो की आपला विश्वास दृढ होतो. देवाचा नेहमी सन्मान करा. जे लोक त्याचा सन्मान करतात त्यांना जीवनात प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम मिळते. माझा नवीन जन्म झाल्यापासून मी हे सिद्ध केले आहे, आणि ते इतक्या प्रमाणात की मी या जगभर फिरून सर्वत्र लोकांना पुढील गोष्टी सांगू इच्छितो:

- प्रत्येक क्षेत्रात देवाचा सन्मान करा.
- तुमच्या प्रेमात/ आवडीत नेहमी देवाला प्रथम स्थान द्या.
- तुमचा विवेक नेहमी स्वच्छ ठेवा.
तरच तुम्ही सार्थक जीवन जगू शकाल.

या जगातील सर्वात मोठे मूर्ख ते आहेत जे या गोष्टींना महत्त्व देत नाहीत, ज्यांना वाटते की आपण आपल्या प्रतिभा आणि त्यांच्या पृथ्वीवरील कामगिरीने सार्थक जीवन जगू शकतात. यापैकी काहीही शेवटी कोणाचेही समाधान करू शकत नाही.

योहान १५ हा एक अद्भुत अध्याय आहे. परमेश्वरामध्ये कायम असणे हे एक चिंता किंवा तनाव मुक्त जीवणाचे परिपूर्ण विश्रांतीचे (द्राक्षवेलीतील फांद्याप्रमाणे) चित्र आहे - परमेश्वर आपल्या जीवनातील प्रत्येक तपशीलाची काळजी घेतो हा आपला असलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. परिश्रम आणि कठोर परिश्रम असतील, परंतु कोणतीही चिंता किंवा तणाव नसेल. झाडापासून फांद्यापर्यंतचा रसाचा सतत प्रवाह पवित्र आत्म्याने निरंतर भरण्याची आवश्यकता स्पष्ट करतो.

दोन गोष्टींसाठी परमेश्वराचा शोध घ्या:
(१) तो तुम्हाला त्याच्या वचनातून दाखवेल की त्याचे नीतिमान ठरवणे किती सामर्थ्यवान आहे की तो तुम्हाला असे पाहतो जसे की तुम्ही आजपर्यंत कधीही पाप केले नाही.
(२) सर्व मनुष्यांच्या मतांपासून पूर्णपणे मुक्त असणे.

लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, या विचाराचे आपण किती गुलाम झालो आहोत हे आपल्याला कळत नाही. जर तुम्ही या दोन गोष्टींवर काम केले तर तुम्ही प्रभूच्या हातातील एक अतिशय प्रभावी पात्र होऊ शकता. जेव्हा आपण आपल्या भूतकाळातील अपयशाच्या आठवणी कुरवाळत असतो तेव्हा सैतान अनेकदा आपल्याला आपण किती नम्र आहोत असे विचार आपल्या मनात टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या भूतकाळातील अपयशांचा विचार आपण फक्त तेव्हाच केला पाहिजे जेव्हा आपल्याला दुसऱ्यावर कठोर होण्याचा मोह होतो (२ पेत्र.१:९) - अन्यथा नाही.

जर तुम्ही या दोन मुद्द्यांवर स्पष्ट असाल, तर तुमचे जीवन क्षेपनास्त्रा (रॉकेट) सारखे असेल, आणि काहीही तुम्हाला खाली दाबून ठेवू शकणार नाही. या बाबी तर्कशुद्ध किंवा बौद्धिकपणे सांगण्याचा प्रयत्न करू नका. फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्यावर विसंबून राहा.

स्वतःची निंदा आणि निराशा नेहमी सैतानाकडून असते. तुम्ही कधीही भूतकाळात जगू नका. तुमच्या भूतकाळातील अपयश - आणि तुमच्या भूतकाळातील यशाबद्दल विचार करणे थांबवा. आणि जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा लगेच उभे राहा आणि शर्यतित सरळ सतत धावत रहा. कधीही हार मानू नका.