WFTW Body: 

ईयोब अध्याय 26-31 मध्ये ईयोब त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींची मोठी यादी देतो ज्या गोष्टी त्याने जीवनात इतरांकरिता केल्या. हे अध्याय वाचत असताना मोठे नवल वाटते की त्या काळामध्ये बायबल नव्हते व पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला नव्हता तरी ईयोबाला देव कळाला होता, त्याचे मार्ग कळाले होते व तो उच्च स्तराचे जीवन जगला होता. या अध्यायांमध्ये काही गोष्टी बघणे चांगले आहे कारण त्या गोष्टी आपल्याला लाज वाटण्यास भाग पाडतात कारण आपल्यातील बहुतेक लोक तसे वागत नाही. त्या गोष्टी आपल्याला आव्हान देखील देतात की आज आपण उच्च स्तराचे जीवन जगावे सुरुवातीला तो सांगतो की मानव किती मूर्ख आहे की तो सोने प्राप्त करून घेण्यासाठी खणकाम करतो, परंतु ज्ञानाचा शोध करीत नाही (28:1,12,13). तो पुढे म्हणतो, ''पाहा, प्रभुचे भय धरणे हेच ज्ञान होय, दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय'' (28:28). इयोबाच्या 1000 वर्षांनंतर देखील शलमोनाने नीतिसूत्रे 9:10 मध्ये हेच म्हटले आहे. आपल्याला ईयोबाच्या पुस्तकातून हे सुज्ञान प्राप्त होते. ईयोब अध्याय 29 मध्ये ईयोब त्याच्या भूतकाळाविषयी बोलतो, त्याचे देवासोबत मैत्रीचे संबंध होते, तो गरीबांची, अनाथ, विधवा, अंध, लंगडे व गरजवंतांची मदत करीत असे. अध्याय 30 मध्ये तो तक्रार करतो की त्याने चांगल्या गोष्टी केल्या तरी त्याला दुःख सहन करावे लागत आहे व देवाने त्याला अगदी खालच्या स्तरावर आणले आहे.

अध्याय 31 मध्ये तो त्याच्या धार्मिक जीवनाविषयी बोलतो. त्याने स्त्रियांविषयी कधीही वासना डोळ्यात येऊ दिली नाही (व.1). मत्तय 5 मध्ये येशू ख्रिस्ताने याविषयी सांगण्याच्या 2000 वर्षांपूर्वीच ईयोब या पापाविषयी दक्ष व सावध होता. त्याची वाटचाल अगदी प्रामाणिक होती (वचन 5,6). तो पत्नीसोबत अविश्वासू राहिला नाही (वचन 9-12). तो त्याच्या सेवकांना प्रेमाने वागवीत असे (वचन 13-15), त्याने गरीब, विधवा व अनाथ लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे सांभाळले (वचन 16-23), त्याचा सोन्यावर भरंवसा नव्हता व तो मूर्तिपूजक नव्हता (वचन 24-28), शत्रुचा पाडाव झाल्यावर तो आनंद करीत नसे (वचन 29,30), तो परराष्ट्रीयांची काळजी घेत असे (वचन 31,32), त्याच्या हातून पाप घडल्यास तो ते कबूल करीत असे (वचन 33), तो लोकांच्या निंदेची पर्वा करीत नसे (वचन 34), तो त्याच्या संपत्तीची देखील काळजी घेत असे (वचन 38-40). आता तो याठिकाणी देवाला आरोळी करून उत्तर मागत आहे (वचन 35).

या अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की ईयोब अतिशय धार्मिक माणूस होता. जीवनातील अनेक क्षेत्रांवर त्याला प्रकाश प्राप्त झाला होता. तो मदत करणारा व्यक्ती होता. परंतु, एका गोष्टीवर त्याला प्रकाश प्राप्त नव्हता : आत्मिक गर्वावर. त्याला धार्मिकतेचा गर्व होता. देवाची ईयोबावर प्रीती होती. देवाची इच्छा होती की ईयोबाने पृथ्वी सोडण्यापूर्वी त्याच्या ठायी नम्रतेचा गुण असावा. म्हणून ईयोबावरील प्रीतीस्तव देवाने ईयोबाला परीक्षेतून वसंकटातून जाऊ दिले जेणेकरून तो धार्मिक तर राहीलच परंतु, नम्र देखील बनेल प्रे`िष्त पौल धार्मिक होता व गर्विष्ठ होण्याच्या धोक्यात होता तेव्हा देवाने त्याला सुद्धा दुःख व संकटातून जाऊ दिले. त्याने त्याच्या शरीरात कांटा ठेवला होता. हा कांटा सैतानाचा दूत होता (2 करिंथ 12:7). ईयोबामध्ये देखील सैतानाचा दूत होता. पौलाला हा कांटा असण्याचे कारण माहीत होतेपरंतु, ईयोबाला कारण माहीत नव्हते. या कारणास्तव देव अनेक धार्मिक लोकांना त्रासातून, गैरसमजेतून, विरोधातून व छळातून जाऊ देतो, जेणेकरून ते नम्र होतील व भग्न हृदयी होतील. त्यानंतर देव त्यांच्यावर कृपा ओतेल कारण देव केवळ नम्र लोकांवर आपली कृपा ओततो. ईयोबाने तक्रार केली म्हणून आपण त्याला दोष देऊ शकत नाही. त्याच्याजवळ बायबल नव्हते व पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला नव्हता. त्याला धीर देण्याकरिता व प्रोत्साहन देण्याकरिता बंधूजन नव्हते. परंतु, पौलाने कधीही कुरकुर किंवा तक्रार केली नाही. आपण देखील करू नये