WFTW Body: 

लूक २२:३१,३२ मध्ये वाचतो की येशूने पेत्राला त्याच्यापुढे असलेल्या धोक्याबद्दल इशारा दिला. त्याने त्याला सांगितले, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.

देवाने हेतूपूर्वक पेत्राला अपयशी ठरू दिले. पेत्राला चाळणे हाच त्याचा उद्देश होता. सैतानाला खरेच काय हवे होते ते म्हणजे पेत्राला पूर्णपणे नष्ट करणे , पण देवाने त्याला तसे करू दिले नसते . देव आपल्या क्षमतेपलीकडे आपली परीक्षा घेत नाही किंवा पारखत नाही. त्यामुळे सैतानाला पेत्राला चाळण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्या अपयशामुळे पेत्राला त्याच्या आयुष्यातील संपूर्ण भूशातून शुद्ध करता आले. देव आपल्याला अपयशीही ठरण्याची परवानगी देतो त्यामागे हाच खरा उद्देश आहे. आपल्या आयुष्यातून भुसा काढून टाकणे ही चांगली गोष्ट नाही का? नक्कीच. जेव्हा एखादा शेतकरी गव्हाची कापणी करतो, तेव्हा तो वापरण्यापूर्वी त्याला तो चाळावा लागतो. तरच त्यातून भुसा काढला जाईल.

आपल्या आयुष्यातला भुसा काढण्यासाठी परमेश्वर सैतानाचा वापर करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देव आपल्याला वारंवार अपयशी ठरण्याची परवानगी देऊन हा उद्देश पूर्ण करतो!! पेत्रामध्ये तो उद्देश पूर्ण करण्यासाठी देवाने सैतानाचा वापर केला आणि तो सैतानाचा उपयोग आपल्याही जीवनात तो उद्देश पूर्ण करण्यासाठी करेल. आपल्या सर्वांमध्ये खूप भुसा आहे - गर्व , आत्मविश्वास आणि स्वनीतिमानतेचा भुसा. आणि तो भुसा आपल्यातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी देव आपल्याला वारंवार अपयशी ठरवण्यासाठी सैतानाचा वापर करतो.

हा उद्देश तुमच्या आयुष्यात पूर्ण करण्यात परमेश्वर यशस्वी होत आहे की नाही, हे तुम्हाला एकट्यालाच माहीत आहे. पण भुसा काढला जात असेल तर तुम्ही नम्र आणि कमी स्वनीतिमान व्हाल. तुम्ही अपयशी ठरलेल्या इतरांना तुच्छ लेखणार नाही. तुम्ही स्वत:ला इतरांपेक्षा चांगले मानणार नाही.

देव, सैतानाला आपल्याला वारंवार अपयशी ठरू देण्याची परवानगी देऊन आपल्यातून भुसा काढू देतो. त्यामुळे तुम्ही अपयशी ठरल्यास निराश होऊ नका. तुम्ही अजूनही देवाच्या हातात आहात. तुमच्या वारंवार अपयशी होण्याद्वारे एक गौरवशाली उद्देश पूर्ण केला जात आहे. पण देवाच्या तुमच्यावरील प्रीतीवरचा तुमचा विश्वास अशा वेळी ढळू देऊ नका. येशूने पेत्रासाठी हीच प्रार्थना केली आणि आज तो आपल्यासाठी हीच प्रार्थना करत आहे. आपण कधीही अपयशी होऊ नये अशी तो प्रार्थना करत नाही, पण तो प्रार्थना करत आहे की जेव्हा आपण खडकाच्या तळाशी पोहोचू तेव्हाही देवाच्या प्रीतिवरचा आपला विश्वास ढळू नये.

अपयशाच्या अनेक अनुभवांमधूनच आपण शेवटी "शून्य बिंदू" पर्यंत पोहोचतो, जिथे आपण खरोखर मोडले जातो. जेव्हा पेत्र त्या टप्प्यावर पोहोचला, तेव्हा त्याचा दुसरा "पालट" झाला (लूक.२२:३२ - केजेव्ही). तो मागे वळला. येशूने पेत्रासाठी केलेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले गेले याचा पुरावा या गोष्टीत दिसून येतो की, जेव्हा पेत्र खडकाच्या तळाशी आपटला तेव्हा तो मागे वळला. तो निराशेने तिथे खालीच राहिला नाही. त्याचा विश्वास उडाला नाही. तो उठला. देवाने त्याला एका लांब दोरीवरून जाऊ दिले. पण जेव्हा पेत्र त्या दोरीच्या टोकाला पोहोचला तेव्हा देवाने त्याला मागे खेचले.

देवाचे मूल असणे ही एक अद्भुत गोष्ट आहे. देव जेव्हा आपल्याला धरून ठेवतो, तेव्हा तो आपल्या संरक्षणासाठी आपल्याला दोरीने वेढतो. त्या दोरीत बरीच ढील आहे आणि तुम्ही हजारो वेळा घसरू शकता आणि परमेश्वरापासून दूर जाऊ शकता. पण एक दिवस तुम्ही त्या दोरीच्या टोकाला पोहोचाल. आणि मग देव तुम्हाला परत त्याच्याकडे खेचेल. अर्थात, तुम्ही त्या क्षणी दोरी कापून पळून जाण्याचा निर्णय घेऊ शकता. किंवा देवाच्या दयाळूपणामुळे आणि शोकाने तुम्ही मोडणे आणि त्याच्याकडे परत जाणे निवडू शकता. पेत्राने तेच केले.तो रडला आणि पुन्हा प्रभूकडे वळला. पण यहूदा इस्कर्योतने तसे केले नाही. त्याने दोरी कापली - आपल्या आयुष्यावर देवाच्या अधिकाराविरुद्ध बंड करून - आणि सार्वकालिकपणे नाश पावला. पण मला विश्वास आहे की पेत्राने जे केले ते तुम्ही कराल.

तेव्हा येशूने पेत्राला सांगितले, "आणि तू वळलास आणि पुन्हा मजबूत झालास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.” जेव्हा आपण मोडतो तेव्हाच आपण इतरांना बळकट करण्यासाठी पुरेसे मजबूत होऊ शकतो. जेव्हा पेत्र अशक्त आणि मोडलेला होता, तेव्हाच तो खरोखर सशक्त झाला - इतका सशक्त की तो आपल्या भावांना आणि बहिणींना बळकट करू शकला. आम्ही असे म्हणू शकतो की पेत्राची आत्म्याने भरलेल्या सेवेची तयारी त्याच्या अपयशाच्या अनुभवातून आली. जर तो अपयशाचा हा अनुभव न घेता पवित्र आत्म्याने भरला गेला असता, तर तो पेंटेकॉस्टच्या दिवशी एक गर्विष्ठ माणूस म्हणून उभा राहिला असता, एक असा माणूस की जो कधीही अपयशी ठरला नाही, व त्याच्या समोरच्या दीन हरवलेल्या पापी लोकांकडे त्याने तुच्छतेने पाहिले असते आणि त्यांना कमी लेखले असते, आणि देव त्याचा शत्रू बनला असता, कारण देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो!!

देवाला जसा तो हवा होता तसा होण्यासाठी पेत्रालाही त्याअगोदर अशा शून्य बिंदूवर यावे लागले. एकदा का आपण स्वत: तळाशी गेलो की, आपण अजूनही तेथे असलेल्या इतरांना कधीही तुच्छ लेखू शकत नाही. त्यानंतर आपण पापी लोकांना किंवा मागे फिरलेल्या विश्वासणाऱ्या लोकांना किंवा पापात पडणाऱ्या ख्रिस्ती पुढाऱ्यांना तुच्छ लेखू शकत नाही. पापावरील विजयाचा आपल्याला कधीच गर्व होणार नाही, कारण आपण स्वत: एके काळी किती अपयशी होते हे आपल्याला माहीत आहे. म्हणूनच पेत्राने स्वत: इतर ख्रिस्ती लोकांना इशारा दिला की, "तुम्ही स्वत: एकदा आपल्या पापामधून कसे स्वच्छ केले गेले होता हे कधीही विसरू नका"(२ पेत्र १:९). तो त्यांना तिथे सावध करतो की जर ते ही गोष्ट विसरले तर ते अंध आणि अदूरदृष्टीचे होतील. मला कधीही आंधळे किंवा अदूरदृष्टीचे व्हायचे नाही. मला स्वर्गीय मूल्ये आणि सार्वकालिक मूल्यांची लांब पल्ल्याची दृष्टी हवी आहे - नेहमी.