WFTW Body: 

जेव्हा आपण स्वर्गात पोहोचु , तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनात प्रवास करत असताना ज्यानी आपले रक्षण केले त्या देवदूताना पाहू. जेव्हा आपण शेवटच्या दिवशी आपल्या संपूर्ण आयुष्याचि चित्र फित पाहु, तेव्हा आपल्याला कळेल की काही हजारो देवदुतांनी आपले संरक्षण केले, ज्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. आपल्या जीवनातील रस्त्यांवर आपण केलेल्या काही चुकांबद्दलच आपल्याला माहिती असेल. पण त्या दिवशी, आपल्याला कळेल की अशा आणखी अनेक चुका होत्या ज्यातून आपल्यला वाचवले गेले आहे. म्हणून कृतज्ञ (आभारी) रहा.

सर्व गोष्टी एकत्रीतपने आपल्या भल्यासाठीच काम करतात. काही वर्षांपूर्वी माझ्या झालेल्या अपघातानंतर, मी म्हणालो, "हे परमेश्वरा तु माझ्यासाठी क्रुसावर जे केले त्याबद्दल मी अद्याप पूर्णपने कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. त्यामुळे कृपया मला `धन्यवाद' म्हणण्यासाठी आणखी थोडा वेळ दे". मग मी या वाक्यांशाचा विचार केला: “परमेश्वराने वधस्तंभावर आपल्यासाठी जे केले त्याबद्दलची कृतज्ञता सतत आपल्या जीवनातून दिसली गेलि पाहिजे"

प्रत्येक गोष्टीत देवाचा एक उद्देश असतो. याकोबाबांबद्दल असे म्हटले आहे की "विश्वासाने त्याने आपल्या काठीवर टेकून देवाची उपासना केली (जी खरोखर एक कुबडी होती, कारण देवाने त्याची मांडी मोडून टाकल्यामुळे तो यापुढे चालू शकत नव्हता) आणि ह्यामुळे याकोबने इतरांना आशीर्वाद दिला" (इब्री 11: 21). ती कुबडी मजबूत आत्मनिर्भर याकोबाला सतत आठवण करून देणारी ठरली, की त्याला प्रत्येक गोष्टीसाठी देवावर असहाय्यपणे विसंबून राहावे लागेल. अशाप्रकारे तो इस्राएल बनला - देवाचा एक राजपुत्र ज्याला देवाबरोबर आणि माणसांसोबत सामर्थ्य होते. जेव्हा तो त्या कमकुवत अवस्थेत आला तेव्हा तो इतरांना आशीर्वाद देऊ शकला (त्या वचनानुसार). मी प्रार्थना करतो की तुम्हालाही त्या अनुभवातून काहीतरी कळेल - तुमचे मानवी सामर्थ्य तुटले आहे, जेणेकरून तुम्ही एकट्या देवावर विसंबून राहाल आणि इतरांसाठी अश्या प्रकारे आशीर्वाद व्हाल की कदाचितच तुम्ही झाले असता.

देवाने तुमचे जीवन उत्तम प्रकारे आखले आहे - जीवनातील प्रत्येक बारीक गोष्ट. तो सैतानाला तुमच्यावर हल्ला करू देतो, ज्याप्रमाणे त्याने सैतानाला येशूवर हल्ला करण्याची परवानगी दिली. परंतु येशूने त्याचा आत्मा शुद्ध ठेवला आणि तुम्हीही तुमचा आत्मा शुद्ध ठेवू शकता. "तुमच्यासोबत काय घडत आहे याची सर्व माहिती देवाला माहीत आहे" (इयोब 23:10), तुम्ही कठीण परिस्थितीत असतानाही; तो प्रत्येक परिस्थितीची योजना करतो (रोम. 8:28). त्यामुळे त्यात तुमचे सांत्वन शोधा. "मनुष्याची मदत व्यर्थ आहे" असे तुम्हाला वाटते अशा परिस्थितीत एकट्या देवावर विसंबून राहण्याचा अनुभव घेणे चांगले आहे. आत्मिक वाढीचा हाच एकमेव मार्ग आहे. सी. टी. स्टड एकदा म्हणाले होते, "मला जीवनतिल कठीण परिस्थिती आवडतात , कारण त्यामुळे, त्या परिस्थितीत देव माझ्यासाठी काय चमत्कार करेल हे मी पाहू शकतो ".

देव पित्याने आपल्याला निवडले आहे, देवाच्या पुत्राने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतले आहे आणि पवित्र आत्म्याने आता आपल्यावर देवाचे स्वतःचे असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे, हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा ते आपल्यामध्ये एक जबरदस्त मुक्ती आणेल (इफिस 1:1-13). आमचे तारण पूर्णपणे देवाच्या कृपेने आहे. देव फक्त आपली "होय" म्हणायची वाट पाहत होता आणि मग त्याने हे सर्व कार्य केले . (इफिस 2:1-8). आपली परवानगी असल्याशिवाय तो आपल्याला वाचवू शकला नसता, कारण आपण यंत्र मानव नाही.

आपण काही चांगले किंवा वाईट करण्यापूर्वीच देवाने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडले (रोम. 9:11) - आणि ख्रिस्तामध्ये आत्म्याच्या प्रत्येक आशीर्वादाने आशीर्वादित करण्याचे ठरवले. म्हणून, तो आता आपल्याबद्दलचा विचार बदलणार नाही.