WFTW Body: 

आज फार मोठ्या प्रमाणात आत्मिक र्हावस होत आहे. परंतु, या सर्वांमध्ये देवाचे हृदय असलेले काही थोडके देवाचे लोक आहेत. ते केवळ एकाच मंडळीत नसून सर्व मंडळ्यांमध्ये आहेत. निरनिराळ्या मंडळ्यांमध्ये देवावर प्रीती करणारे व सर्व गोष्टीत देवाचा मान करणारे लोक आहेत. ते खर्याम रीतीने पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. ते वादविवाद करीत नाहीत. ते आपली जीभ काळजीपूर्वक वापरतात व पैशाच्या बाबतीत फार विश्वासू असतातदेव आज अशा लोकांना एकत्रीत करीत आहे. ते देवाचे अवशिष्ट आहेत

प्रभु येशूच्या येण्याकरिता अवशेषांनी तयारी केली. प्रभुचा जन्म झाला तेव्हा अवशेष म्हणून फार थोडे लोक होते - शिमोन व हन्ना मंदिरात होते, बाप्तिस्मा करणारा योहान, मेंढपाळ व पूर्वेकडून आलेले ज्ञानी लोक हे जन्माच्या वेळी असलेले अवशेष म्हणावे. आज देखील ख्रिस्ती समाजामध्ये देवाचे अवशेष आहेत जे प्रभुच्या दुसर्याल येण्याची तयारी करीत आहेत.

अवशेषांच्या गुणधर्माविषयी सफन्याने काही सांगितले आहे.

''मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन'' (सफन्या 3:9). अवशेषाची बोलणे शुद्ध असणार. जेव्हा यशयाने प्रभुचे गौरव बघितले तेव्हा त्याला त्याच्या वाणीचे परीक्षण करावे लागले मी बहुतके वळेा आपल्या संभाषणाविषयी व पशोप्रती आपल्या वृत्तीविषयी बोलतो कारण संदेष्ट्यानी या दोन विषयावर सवार्त अधिक प्रभुचे संदेश दिले. जर आपण पैशाप्रती आपल्या बोलण्याप्रती दक्ष असलो तर आपण प्रभुचे प्रवक्ता बनू.

''परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धांवा एकचित्ताने करितील!'' (सफन्या 3:9). प्रभुचे अवशेष एका शरीराप्रमाणे एक होतील व प्रभुचे ओझे खांद्यांवर घेऊन प्रभुची सेवा करितील.

''ज्या ज्या बाबतींतं तूं मजविरूद्ध उल्लंघन करावसे त्याविषयी त्या दिवासांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हां मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्याास तुझ्यांतून नाहींतसें करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तूं यापुढें तोरा मिरविणार नाहीस. मी तुजमध्यें नम्र व गरीब लोक राहूं देईन, ते परमेश्वरांच्या नामावर श्रद्धा ठेवितील'' (सफन्या 3:11,12). देवाचे अवशिष्ट केवळ नम्र लोक असतील कारण देव गर्विष्टांना काढून टाकणार आहे. आणखी एक प्रश्न लोक मला विचारतात, ''बंधू, झॅक पूनन, तुम्ही नम्रतेविषयी इतक्या जास्त वेळा का बोलता?'' कारण बायबल नम्रतेविषयी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेळोवेळी बोलत असते.

''मी तुजमध्यें नम्र व गरीब लोक राहूं देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवितील'' (सफन्या 3:12). देवाचा अवशेष असलेले लोक विश्वासू असणार. ''इस्त्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहींत, लबाडी करणार नाहींत, त्यांच्या मुखांत कपटी जिव्हा आढळावयाची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांस भेवडावणार नाहीं'' (सफन्या 3:13). देवाचे अवशेष शांतीप्रिय लोक असणार जे लबाडी करणार नाहीत, इतरांना फसविणार नाहीत किंवा इतरांचे वाईट करणार नाहीत.

''सीयोनकन्यें उच्च स्वरानें गा; हे इस्त्राएला, जयजयकार कर; यरूशलेमकन्ये मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर. परमेश्वरानें तुझा दंड दूर केला आहेतुझ्य ा शत्रुचें निवारण केलें आहें; इस्राएलाचा राजा तुजमध्ये आहे. तुला पुनः अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही''(सफन्या 3:14,15). देवाचा अवशेष असलेले लोक आनंदित असणार, त्यांच्यावरील देवाच्या प्रीतीत त्यांना पूर्ण सुरक्षीतता भासणार.

''परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्या वीरासारखा तुझ्या ठायी आहें; तो तुजविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील. तुजविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल'' (सफन्या 3:17). देव अवशेष असलेल्या त्यांच्या लोकांविषयी आनंद करितो. पापात असलेल्या लोकांप्रती त्यांना आनंद वाटत नाही. मूल आजारी असताना वडिलांना आनंद वाटेल का? नाही. लोकांमध्ये पाप असताना देवाला सुद्धा आनंद वाटत नाही. जे रोगमुक्त होऊ इच्छित नाहीत त्यांच्याविषयी देवाला दुःख वाटते. देवाला पवित्र अवशिष्टाबद्दल आनंद वाटतो. वचन सांगते की देव त्यांच्याबद्दल मोठ्याने आनंदोत्सव करितो व उल्लास वाटून तो गातो. पवित्र शास्त्रामध्ये हे असे वचन आहे ज्यात लिहिले आहे की देव त्यांच्या लोकांबद्दल स्वतः उल्लासाने गातो. पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला देवाचे गौरव करण्याकरिता स्तुतीगीत गाण्यास सांगितले आहे परंतु, या वचनामध्ये आपल्याला सांगितले आहे की स्वतः देव आपल्याबद्दल गीत गातो. आपण किती धन्य लोक आहोत की स्वतः देव आपल्याबद्दल उल्लास करून गीत गातो.

''त्याचे प्रेम स्थिर राहील'' (सफन्या 3:17). आपल्यावरील देवाच्या प्रीतीस्तव आपल्या प्रत्येकाकरिता देवाकडे योजना आहे. येणार्या' दिवसांमध्ये आपल्याकरिता असलेली त्याची अद्भुत योजना आपल्याला कळणार. देव आपला प्रेमळ पिता असल्यामुळे त्याला आपल्या भावी जीवनाची काळजी आहे. ''पाहा, त्या समयी तुला पीडणार्यात सर्वांचा मी समाचार घेईन; जी लंगडी आहे तिला मी बचावीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नांवलौकिक व्हावा असें मी करीन. त्या समयी मी तुम्हास आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यादेखत तुमचा बंदिवास उलटवीन, तेव्हां पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असें मी करीन'' (सफन्या 3:19,20). देवाचा अवशेष असलेले लोक उणे व सहाय्यहीन असतात, तेव्हा त्यांच्या वतीने देव खुद्द त्यांच्या शत्रुंविरुद्ध लढतो. देव त्यांना विजयी करितो व शेवटल्या दिवशी वेगळे करितो.