लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

लूक २:४०,५२ मध्ये आपण असे वाचतो की येशू लहानपणापासूनच ज्ञानात वाढत गेला. जरी आपण तरूणांकडून मूर्ख गोष्टी करण्याची अपेक्षा करतो, कारण ते तरूण आहेत, तरीही येशू तरुण होता तेव्हा त्याने कधीही मूर्खपणाचे काहीही केले नाही. आपण येशूला आपले उदाहरण बनवू आणि तारुण्याच्या दिवसांत अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करण्यापासून आपला बचाव होईल. परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा उगम आहे. येशूने आध्यात्मिक मृत्यूपासून वाचवण्यासाठी मदतीची प्रार्थना केली - आणि “देवाच्या भयामुळे त्याची प्रार्थना ऐकली गेली.” (इब्री ५:७). देव आपल्यावर येशूप्रमाणेच प्रेम करतो. त्यामुळे, आपणही येशूप्रमाणे देवाचे भय धरले तर आपल्याही प्रार्थना ऐकल्या जातील.

देवाने अब्राहामाला उत्पत्ति २२:१२ मध्ये एक प्रमाणपत्र दिले, मग तो बोलला, “तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, ह्यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.” त्या दिवशी अब्राहामाने त्या डोंगरमाथ्यावर स्वतःहून देवाची आज्ञा पाळली. फक्त देवानेच त्याची आज्ञाधारकता पाहावी अशी त्याची इच्छा होती. देव एके रात्री अब्राहामाशी बोलला होता, जेव्हा तो एकटा होता (उत्पत्ती२२:१). देवाने त्याला काय सांगितले होते हे इतर कोणालाच माहीत नव्हते. आणि अब्राहामाने गुप्तपणे देवाची आज्ञा पाळली. आपण ज्या गोष्टी गुप्तपणे करतो (जिथे आपण काय करतो हे दुस-या कोणालाच माहीत नाही) त्यांच्यामुळे आपण देवाचे भय धरतो की नाही हे आपल्याला कळेल.

देवाने ईयोबाला सैतानासमोर एक प्रमाणपत्र (ईयोब १:८) दिले की ईयोब देवाला भिऊन वागणारा होता . जर देव आपल्याबद्दलही सैतानासमोर अभिमान बाळगू शकत असेल तर बरे आहे - कारण सैतान आजही जगभर फिरतो आणि आपल्या खासगी जीवनाबद्दल सर्व काही जाणतो. ईयोबाने आपल्या डोळ्यांशी एक करार केला की, त्यांनी स्त्रीकडे वासनेने पाहू नये (ईयोब ३१:१). नियमशास्त्र देण्याच्या आधी आणि नवा करार स्थापन होण्याच्या कित्येक शतकांआधीच, पवित्र शास्त्राशिवाय, पवित्र आत्म्याशिवाय आणि त्याला प्रोत्साहन किंवा आव्हान देणार्‍या इतर बांधवांशिवाय जगणारी व्यक्ती असा निर्णय घेऊ शकते हे आश्चर्यकारक आहे! ईयोब न्यायाच्या दिवशी उठेल आणि या पिढीला त्यांच्या वासना आणि पापाबद्दल दोषी ठरवेल.

योसेफाला, एका अपरिचित देशात देवाशी विश्वासू असलेल्या एका १८ वर्षांच्या तरुणाचे उदाहरण समजा. तो देवाच्या भयाच्या शस्त्राने सज्ज होता - आणि त्यामुळे तो सैतानाच्या पाशापासून दूर राहिला. योसेफाच्या उदाहरणावरून दिसून येते की, एका १८ वर्षांच्या मुलालाही प्रभूशी एकनिष्ठ राहणे शक्य आहे
(क) जरी तो कोणताही दर्जा नसलेल्या अनैतिक समाजात राहत होता ;
(ख) त्याला दरदिवशी एक स्त्री मोहात पाडायला पाहत होती ;
(ग) त्याचे आईवडील शेकडो मैल दूर होते आणि त्यांना वाटत होते की तो मेला आहे ;
(ड) त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्याकडे पवित्र शास्त्र किंवा कोणतेही ईश्वरी साहित्य नव्हते ;
(ई) त्याला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मिळाले नव्हते ;
(च) सहभागिता राखण्यासाठी त्याच्यासोबत कोणीही विश्वासणारे नव्हते ;
(ग) तो जाऊ शकेल अशा कोणत्याही आध्यात्मिक सभा नव्हत्या.
पण त्याच्या आयुष्याच्या पहिल्या १७ वर्षांत, तो घरी असताना त्याचे वडील याकोब यांनी त्याच्यात पेरलेले देवाचे भय होते. आणि देवाचे भय आजही कोणत्याही तरुणाला पापापासून दूर ठेवण्यासाठी पुरेसे आहे.

ईयोब आणि योसेफ यांच्या उदाहरणांवरून हे दिसून येते की केवळ देवाचे भय आपल्याला लैंगिक वासना आणि व्यभिचार या भयंकर पापापासून दूर ठेवण्यासाठी पुरेसे आहे. परमेश्वराचे भय म्हणजे सूज्ञतेची मुळाक्षरे (अ.ब.क.) आहेत.

जर शेवटचे दिवस नोहाच्या दिवसांसारखे असतील (येशूने मत्तय २४ मध्ये म्हटल्याप्रमाणे) तर या शेवटल्या काळातही नोहासारखी माणसे असली पाहिजेत, जी पाप व अनीतिविरुद्ध भूमिका घेतात आणि या दुष्ट काळात स्वतःला देवासाठी खरे व शुद्ध असे राखतात.

जोपर्यंत आपण पूर्णपणे शुद्धतेकडे येत नाही तोपर्यंत आपण लैंगिक क्षेत्रातील लढाई सतत लढली पाहिजे. आपण एखाद्या मुलीशी ज्या पद्धतीने बोलतो तीही आपल्याला अपवित्र करू शकते. या क्षेत्रात येशू जितका शुद्ध होता तितकेच शुद्ध असण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. असे लिहिले आहे की, येशूला एकदा एका स्त्रीशी बोलताना पाहून शिष्यांना आश्चर्य वाटले (योहान ४:२७). ती त्याची साक्ष होती.