WFTW Body: 

आपण वर्षाच्या शेवटी आलो असता आपल्या जीवनाचे परिक्षण करणे व ते आपण कसे जगलो ह्याचे मूल्यांकन करणे चांगले आहे.

हाग्गय संदेष्ट्याने लोकांना मार्गदर्शन केले की त्यांनी आपल्या मार्गांचे परिक्षण करावे. हाग्गय 1:5-6 मध्ये पुढीलप्रमाणे लिहिले आहे, ''आतां सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करितां पण हातीं थोडें लागतें; तुम्ही खातां पण तृप्त होत नाहीं, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाहीं; तुम्ही कपडे घालितां पण त्यांनी तुम्हांस ऊब येत नाहीं; मजूर मजूरीनें पैसा मिळवून जसें काय भोक पडलेल्या पिशवींत टाकितो.''

आपण वरील प्रश्न स्वतःला पुढीलप्रमाणे विचारू शकतो किंवा प्रभु आपल्याला पुढीलप्रमाणे आव्हान देऊ शकतो, ''तुमच्या जीवनामध्ये जे घडत आहे त्याचा विचार करा. तुमच्या जीवनात आत्मिक फळ आहेत का? तुम्ही पुष्कळ पेरले परंतु थोड्यांची कापणी केली. तुम्ही पुष्कळ सभेंमध्ये गेले, अनेक ख्रिस्ती पुस्तके वाचली, टीव्हीवर अनेक ख्रिस्ती कार्यक्रम बघितले परंतु तुमचे घर देवभिरू व शांतीचे घर आहे का?''

बायकोवर किंवा नवर्यावर ओरडण्याच्या साध्या वाईट सवयीवर तुम्ही मात केली आहे का? जर नाही, तर पुष्कळ पेरले परंतु थोडक्याची कापणी केली. तुम्ही कपडे घालता परंतु तुम्हाला उब येत नाही. तुम्ही पुष्कळ पैसा कमविता परंतु तुमच्या थैलीला छिद्र आहे. तुमचा पुष्कळ पैसा व्यर्थ खर्च होतो. तुम्ही देवाला विनंती करता की त्याने तुम्हाला आत्म्याने भरावे, परंतु, तुमच्या थैलीला छिद्र असल्यामुळे सर्व सामर्थ्य बाहेर पडते. काहीतरी चुकत आहे, फुटक्या भांड्यात कोण पाणी ओतेल? अनेक विश्वासणारे देवाला विनंती करतात की त्याने पवित्र आत्म्याने त्यांना भरावे. परंतु ते छिद्र असलेल्या भांड्याप्रमाणे आहेत. देव म्हणतो, ''सर्वप्रथम छिद्र बंद करा.'' देवाची इच्छा आहे की त्याने तुम्हाला

पवित्र आत्म्याने भरावे परंतु, तुमच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वप्रथम नीट करणे गरजेचे आहे. फाटक्या पाकीटामध्ये तुम्ही पैसे पाठविणार नाही. तुमच्या जीवनातील गळक्या क्षेत्रामध्ये देव आत्मा ओतणार नाही. ज्याचे तुम्ही वाईट केले त्याची तुम्ही क्षमा मागितली नाही. ज्याचे तुम्ही उधार घेतले त्याचे तुम्ही पैसे परत फेडले नाही. ही मोठी छिद्रे आहेत. अशी छिद्रे तुमच्या जीवनात असल्यास पवित्र आत्म्याने भरले जावे म्हणून प्रार्थना करणे व्यर्थ होईल, काहीही घडणार नाही. म्हणून सर्वप्रथम छिद्रे बुजवा. गोष्टी निट करा आणि उत्तर लागलीच मिळेल.

आज हजारो ख्रिस्ती लोक आहेत जे प्रभुकडे दुर्लक्ष करून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करतात. शेजार्यांनी त्यांच्या जमीनीवर काही प्रमाणात कब्जा केला आहे का याविषयी ते गांभीर्याने विचार करतात. परंतु, जेव्हा सैतान देवाच्या संपत्तीवर कब्जा करतो तेव्हा ते पर्वा करीत नाहीत. येशूने आपल्याला म्हटले आहे की जर आपण त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याचा प्रयत्न केला तर पृथ्वीवर आपल्याला जे आवश्यक आहे ते सर्व प्राप्त होईल. आपल्याला ते मिळविण्याचा प्रयत्न करावा लागणार नाही. जर आपण देवाच्या कुटुंबाची काळजी घेतली तर तो आपली काळजी घेईल. अविश्वासणार्यांकरिता आपण जिवंत उदाहरण असावे. त्यांना कळावे की आपण देवाचा आदर केल्यामुळे देवाने आपला आदर केला आहे. आपण देवाच्या कुटुंबाची काळजी घेतल्यामुळे त्याने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली आहेतुमची साक्ष याप्रमाणे आहे का?

हाग्गयाचे प्रमुख ध्येय पुढीलप्रमाणे आहे : ''तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा.''