लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

2 राजे 4:1-7 मध्ये आपण प्रचारकाच्या विधवेविषयी वाचतो की ती कर्जात होती. नवर्याच्या मरणानंतर बायकोने कर्जात असणे दुःखद आहे. नवर्याने बायकोला कर्जात पाडू नये. आपल्या प्रत्येकाने ही गोष्ट टाळावी. प्रचारकांनी तर कधीच कर्जात पडू नये कारण त्यामुळे त्यांची साक्ष वाईट होते. आता धनको या विधवेच्या दोन मुलांना कर्जाच्या मोबदल्यात गुलाम करून नेण्याकरिता आला. अलीशाने विधवेला विचारले की तिच्या घरात काय आहे. तिने पुढीलप्रमाणे उत्तर दिले, ''एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही.'' तिच्या समस्येचे उत्तर त्याठिकाणी होते. देवाने मोशेला अरण्यामध्ये अशाचप्रकारचा प्रश्न विचारला होता, ''तुझ्या हातात काय आहे?'' त्याच्याकडे केवळ

मेंढपाळाची काठी होती. ती पुरेशी होती. त्या काठीनेच मोशे तांबडा समुद्र दुभागू शकला, खडकातून पाणी काढू शकला व इस्राएली लोकांचे वचनादाखल सांगितलेल्या भूमीपर्यंत नेतृत्व करू शकला. एलीया सारफथ येथील विधवेच्या घरी गेला. तिच्याकडे केवळ दोन वाट्या पीठ व एका लहानशा भांड्यात तेल होते. परंतु, तिच्या कौटुंबिक समस्येचे निवारण त्याच ठिकाणी होते. त्याद्वारे ती व तिचा मुलगा मरणातून वाचले. आपल्यामध्ये देखील अशी पात्रता असेल ज्याला आपण महत्व देत नसू. उदाहरणार्थ, आपण म्हणत असू, ''या गुणाचे मी काही करू शकत नाही.'' परंतु, तोच गुण देव वापरू इच्छितो.

याठिकाणी हा तेलाचा घडा पवित्र आत्म्याचे द्योतक आहे. देवाची सेवा करणारे काही वेळेस म्हणतात, 'ट्टाझ्याकडे पुरेसा पैसा किंवा ज्ञान नाही. माझ्या अंगी दान किंवा गुण नाही व मी हुशार देखील नाही. मला आर्थिक सहाय्य करणारे लोक नाही. प्रभुच्या कार्यामध्ये गरजा खूप असतात. मी काय करावे?'' त्यांना तुम्ही विचारा, ''तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे काय?'' ते म्हणतील, ''होय.'' तेव्हा म्हणा, ''आणखी तुम्हाला कशाची गरज आहे?''

या स्त्रीला कल्पना नव्हती की तिच्या समस्येचे निवारण तेलाच्या त्या घड्यामध्येच आहे. अलीशाने तिला म्हटले, ''तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार्यापाजार्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरांत जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरले ते बाजूला ठेव'' (2 राजे 4:3,4). येशूने देखील अशाच प्रकारे म्हटले, '''आपल्या खोलींत जा व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची ्य्रार्थना कर' म्हणजें तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचें फळ देईल'' (मत्तय 6:1-18).

देवाच्या सेवकाने गुप्तपणे देवासोबत चालावे. लोकांसमारे उभे राहण्यापूर्वी त्याने देवासोबत वेळ घालवावा. तुम्ही दार आतून बंद करा आणि पाहा की पवित्र आत्मा तुमच्या सर्व गरजा भागवितो. मग दार उघडून हा अनुभव इतरांना सांगा. अशाप्रकारे तुम्ही आपले कर्ज फेडू शकता.

आपल्यावर संपूर्ण जगाचे कर्ज आहे - आपण जगाला सुवार्ता सांगावी. पौलाने म्हटले, ''हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे'' (रोम 1:14). याठिकाणी पौल म्हणत आहे की देवाची सुवार्ता सर्वांना सांगण्याचे कर्ज त्याच्यावर आहे.

आपल्यावर देखील सर्व मंडळीचे, प्रत्येक विश्वासणार्याचे कर्ज आहे की आपण त्यांना आपली प्रीती दर्शवावी. बायबल सांगते, ''एकमेकांवर प्रीति करणें ह्याशिवाय कोणाच्या ऋणांत राहूं नका; कारण जो दुसर्यावर प्रीति करितो त्यानें नियमशास्त्र पूर्णपणें पाळिलें आहे'' (रोम 13:8).

हे दुप्पट कर्ज आपण कसे फेडावे. आपण संपूर्ण जगाला सुवार्ता सांगावी व देवाच्या लेकरांवर प्रीती करावी. याकरिता आपल्याला पैशाची कलाकौशल्यांची गरज आहे का? नाही. आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते की त्यांनी पवित्र आत्मा येण्याची वाट बघावी (प्रेषित 1:8). पौलाने देखील तीमथ्याला हीच गोष्ट सांगितली (2 तीमथ्य 1:6).

दार आतून बंद करावे व गुप्तरीतीने देवाचा शोध घ्यावा. प्रीतीला बिलगून राहावे व पूर्ण मनाने पवित्र आत्म्याची अलौकीक दाने मिळविण्याचा प्रयत्न करावा. विशेषेकरून भविष्यवाणी किंवा संदेष्टीय दान प्राप्त करावे (1 करिंथ 14:1). मग तुम्ही जाऊन आपल्यावरील कर्ज फेडू शकाल. या शास्त्रभागातील हाच बोध आहे.

त्या विधवेने प्रत्येक भांडे भरले. तिने आपल्यावरील कर्ज फेडले, त्याचबरोबर आपल्या शेजार्यापाजार्यांना देखील आशीर्वादित केले. तिने शेजार्यांना भांडी परत करताना नक्कीच तेल भरून दिले असावे. हेच पाचारण आपल्याला देखील आहे. आपण आपल्या शेजार्यांना व त्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करावे ज्यांना आपण भेटतो. यामुळेच आपल्याला पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे.