पहिले राजे अध्याय 2 मध्ये आपण वाचतो की शलमोनाने त्याचा सावत्र भाऊ अदोनीयाला (वचन 19-27), पहिला चुलता यवाबला (वचन 28-35) व शिमीला (वचन 36-46) मारून स्वतःचे राज्य स्थापन केले. स्वतःचे राज्य स्थापन करण्याची ही कशी पद्धत आहे! विचार करा की हा तोच दाविद होता जो देवाच्या मनासारखा होता ज्याने शलमोनाला असे करण्यास सांगितले आणि अशाप्रकारे नाशाच्या मार्गावर चालण्यास त्याने सुरुवात केली. अशुद्ध कृत्याचा हा दीर्घकालीन परिणाम आहे ज्याद्वारे अनेक लोक दुषित झाले. परंतु, शलमोन अजूनही अशा भ्रमात होता की ही सर्व कृत्ये केल्यानंतर देखील देव त्याला आशीर्वादित करेल (वचन 45). मनुष्य किती फसवा होऊ शकतो!
अध्याय 3 : एकदा का तुम्ही चुकीचा मार्ग धरला तर तुम्ही अधिक आणि अधिक देवापासून दूर जाता! शलमोनाने दुसरी गोष्ट जी केली ती म्हणजे त्याने विधर्मी मुलीशी - फारोच्या कन्येशी लग्न केले. सूड कशाप्रकारे घ्यावा हे शलमोनाला शिकविण्याऐवजी दाविदाने जर शलमोनाला योग्य रीतीने म्हणजेच शहाणपणे विवाह करण्यास मार्गदर्शन केले असते तर शलमोनाच्या जीवनात दुसर्या चांगल्या गोष्टी करण्यास वळण मिळाले असते. तुमच्या लेकरांना तुम्ही कोणता सल्ला देता? तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टींना अधिक महत्व आहे?
आपण वाचतो की शलमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते, पण तो उच्च स्थानी यज्ञयाग करी व धूप जाळी (3:3). किती ही विसंगती! अशा तडजोडीमुळे शेवटी शलमोनाचा नाश झाला. तो दोन प्रकारचे जीवन जगला - एक जीवन होते मंदिरातले व दुसरे होते वैयक्तीक. दुःखाची बाब ही आहे की आज अनेक ख्रिस्ती लोकांचे जीवन असेच आहे. देवाबद्दलच्या त्यांच्या प्रीतीबद्दल ते मोठ्याने ओरडून सांगतात. परंतु, व्यक्तीगत जीवनात ते अधार्मिक राहतात व पाप करतात. लहान बाबीत देवापासून दूर होण्याचा परिणाम मोठ्या गोष्टीत होतो व त्यांचा नाश होते.
देवाचे मंदिर बांधण्याकरिता शलमोनाला 7 वर्षे लागली (6:38) व स्वतःचे घर बांधण्याकरिता त्याला 13 वर्षे लागलीत (7:1). त्याने कोणत्या गोष्टीला अधिक महत्व दिले हे यावरून कळते!! आज अनेक ख्रिस्ती लोकांचे जे ख्रिस्ती कार्य करीत आहेत अशाचप्रकारे वर्णन करता येईलते ख्रिस्ती कार्य व्यवस्थित करतात. परंतु त्यांची प्रमुख इच्छा त्यांच्या स्वतःच्या घराविषयी असते व त्यांच्या कुटुंबाच्या सुखसुविधांविषयी असते. त्यांच्याकरिता देवाचे कार्य व देवाचे घर हे दुय्यम असते. सुवार्तेच्या प्रचाराने त्यांना श्रीमंत केलेले असते.
शलमोन हळूहळू विश्वासातून मागे गेला. त्याने त्याचे राज्य लोकांना मारून सुरू केले. तो सहजतेने त्याच्या पित्याशी म्हणजे दाविदाशी असहमती दाखवू शकत होता व शिमी व यवाबला मारण्याचे तो नाकारू शकत होता. तो अदोनियाला क्षमा करू शकला असता व त्याला तो जीवदान देऊ शकत होता. एकदा त्याने खाली पडण्यास सुरुवात केली त्यामुळे उतारावरून तो जोरात घसरला. नंतर त्याने फारोच्या कन्येशी लग्न केले - अर्थातच तिच्या संपत्तीसाठी. नंतर त्याने 13 वर्षे स्वतःचे घर बांधण्यात घालविली. या सर्व वास्तविकते व्यतिरीक्त देवाने त्याला ज्ञान दिले होते. अनेकदा, मी ख्रिस्ती कार्यकर्त्यांना बघतो की ते त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच जगाकडे हळूहळू जात असतातसेवा सुरू केल्याच्या दिवसापासूनच ते स्वतःचे हक्क, अधिकार शोधण्यास सुरुवात करतात. परंतु तुम्ही जेव्हा त्यांना काही वर्षांनी बघाल तर तुम्हाला दिसेल की ते स्वतःचे अधिकार व हक्क शोधण्यात तज्ञ झालेले असतात.
परंतु देव अजूनही त्याच्या लोकांवर प्रेम करतो, जरी त्यांचा राजा विश्वासातून मागे गेला. म्हणून जेव्हा मंदिर पूर्णपणे बांधल्या गेले तेव्हा देवाने मंदिर त्याच्या गौरवाने भरले (8:10). मोशेने निवासमंडप पूर्ण केल्याचा जो दिवस होता तसाच हा दिवसही होता. निवासमंडपाच्या मांडणीप्रमाणेच मंदिर बांधल्या गेले होते, परंतु हे भव्य होते.
शलमोनाने समर्पणाची खूप चांगली प्रार्थना केली (8:22-61). तेव्हा देव त्याच्यासमोर दुसर्यांदा प्रकट झाला व त्याला म्हणाला की देवाने त्याची प्रार्थना ऐकली आहे व त्याला खर्या मनाने व सरळतेने वागण्याची विनंती केली, जेणेकरून देवाचे राज्य स्थापन होईल. देवाने शलमोनाला ताकीद दिली की जर त्याने देवाचे अनुसरण केले नाही तर जो देश इस्राएल लोकांस दिला आहे त्यातून देव त्यांचा उच्छेद करील व मंदिराचा नाश होईल (9:3-9).
मग अगदी असेच घडले. बाबेलचे लोक आले व त्यांनी यहूदा काबीज केले व मंदिराचा नाश केला. देवाने त्यांना ताकीद दिली की, ''तुम्ही आपल्या मनाप्रमाणे वागला तरी मी तुमच्यावर आशीर्वाद पाठवीन असा विचार करू नका.'' आपण नाशाच्या मार्गावर लागण्यापूर्वीच देवाने आपल्याला ताकीद दिली
दहाव्या अध्यायात आपण वाचतो की परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची किर्ती झाली ती ऐकून शबाची राणी येते व शलमोनाला भेटते. शलमोनाच्या ज्ञानाची किर्ती जगभर पसरली असली तरी सुद्धा शलमोन हा गोंधळलेल्या मनोवस्थेत होता. अनेक ख्रिस्ती लोकांसारखी तो सार्वजनिक ठिकाणी सुंदर प्रार्थना करू शकला असता. परंतु त्याच्या व्यक्तीगत जीवनात तो अनेक ख्रिस्ती लोकांसारखा देवहीन होता. त्याची लालसा, वासना शमशोनासारखी होती, त्याने 700 स्त्रियांशी विवाह केला होता व त्याही त्याला पुरेशा वाटल्या नाही म्हणून त्याने 300 रखेली ठेवल्या होत्या व त्यातल्या अधिकतर ह्या धार्मिक नव्हत्या (11:1-3). तीन वर्षातून तो एकीला एकदा पाहत असेल. शेवटी त्याच्या या बायकांनी त्याला देवापासून दूर करून मूर्तिपूजेकडे वळविले.
जेव्हा शलमोन नाशाच्या मार्गावर गेला तेव्हा देवाला त्याचा खूप राग आला. देव त्याला म्हणाला की देव शलमोनाच्या राज्याची दोन भागात विभागणी करेल (11:9). परंतु, दावीद नीतिमान मनुष्य होता म्हणून देवाने शलमोनाच्या हयातीत तसे केले नाही (11:12). वडिलांच्या धार्मिक जीवनामुळे कितीतरी लेकरांना देवाने आशीर्वादित केलेले आपण बघतो. देवाने शलमोनाला त्रास देण्याकरिता शत्रु उभे केले, परंतु तरी त्याने पश्चात्ताप कले ा नाही (11:14). जव्े हा शलमाने ाला भिती वाटली की यराबाम त्याच्याविरुद्ध बंड करण्यास उभा हाते आहे तव्े हा त्याने यराबामला जिवे मारण्याचा प्रयत्न केला (11:26). नंतर यराबाम हा विभाजीत झालेल्या राज्याचा राजा बनला. नंतर शलमोन मरण पावला (11:43).