लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य
WFTW Body: 

संदेष्टीय सेवेविषयी मी तुम्हाला काही महत्वाचे सांगू इच्छितो. 2 राजे 3:15 मध्ये भविष्यवाणी करण्याकरिता अलीशाला देवाची इच्छा जाणून घ्यायची होती तेव्हा त्याने वादकाला वाजंत्री वाद्य वाजविण्यास सांगितले. वादकांनी वाद्य वाजविण्यास सुरुवात केल्याबरोबर अलीशावर देवाचा वरदहस्त झाला व तो मोठ्या सामर्थ्याने भविष्यवाणी करू लागला. याठिकाणी आपण दैवी संगीताचे महत्व पाहतो.

अनेक वेळा मी अनुभवले आहे की सभेसाठी गेलो असताना ज्या वचनाची मी तयारी केली नव्हती ते वचन प्रभुने मला दिले व ते मी लोकांना सांगितले कारण सभेपूर्वी अभिषीक्त असे भक्ती दैवीसंगीत होत असताना देवाने मला त्याचे नवीन वचन दिले. अभिषिक्त संगीतामध्ये असे सामर्थ्य होते ज्याद्वारे अलीशावर भविष्यवाणीचा आत्मा उतरला.

संदेष्ट्यांना सुद्धा संगीतवह्नदाची गरज भासली. म्हणून संगीतवह्नदाने अभिषीक्त असणे फार गरजेचे आहे. त्यांनी केवळ चांगले संगीत कलाकार असणे पुरेसे नाही. ते अभिषीक्त असावे व त्यांना चांगली समजबुद्धी असावी. दाविदाने गायकांना व वाद्यवह्नदाला नियुक्त केले होते. त्यांच्यावर अभिषेक होणे गरजेचे होते. आसाफ या संगीत पुढार्याने बारा अद्भुत स्तोत्रे लिहिलीत (स्तोत्र 50, 73-83). दोन संगीत पुढार्यांना संदेष्टा म्हटले आहे - हेमान (1 इतिहास 25:5) व यदूथून (2 इतिहास 35:15).

म्हणून अभिषीक्त संदेष्ट्यांना प्रोत्साहन देण्याकरिता व सहाय्य करण्याकरिता अभिषीक्त संगीतकारांची देवाला फार गरज आहे. अशाप्रकारे मंडळी वाढते. तुम्हापैकी काहींना संदेष्टा होण्याकरिता पाचारण नसेल तर संगीतकार होण्याकरिता पाचारण असेल. अभिषीक्त संगीतकार असा. वाजंत्री वाजविणार्याने जगिक शैलीचे संगीत वाजविले असते तर अलीशा भविष्यवाणी करण्याकरिता प्रेरित झाला असता असे मला वाटत नाही. त्या संगीतात नक्कीच स्वर्गीय विशेषतः असावी. जगिक संगीत आहे व स्वर्गीय संगीत देखील आहे. स्वर्गीय संगीत ऐकत असताना तुम्हाला लगेच कळेल कारण तुम्ही त्याद्वारे आत्म्याने देवाची भक्ती करू लागाल. अनेक वेळा गायकांचे असे गीत व संगीत ऐकायला मिळते की असे म्हणणे भाग पडते, 'ट्टला पाहा आणि फुले वाहा.'' हे संगीत केवळ देखावा असतो. लोकांना भक्तीमध्ये चालवायचे असल्यास तुम्ही अभिषीक्त गायक वा संगीतकार असणे गरजेचे आहे. तुम्ही सभेमध्ये भविष्यवाणीचा आत्मा आणू शकता.