WFTW Body: 

तुमच्या भावी आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुम्हांला देवाचे मार्गदर्शन मिळेल जर - तुम्ही सुभक्त व्हायचे ठरवलेत तर. जो देवाचा सन्मान करतो तोच जीवनात सर्वोत्तम मिळवतो - हुशार किंवा श्रीमंत, किंवा प्रतिभावान किंवा ज्याला आयुष्यात नशिबाची संधी मिळते तो नाही. जेव्हा आपण सुभक्तीला जीवनाचा मार्ग म्हणून निवडत नाही तेव्हा भविष्याबद्दल सर्व प्रकारे असुरक्षितता वाटते. म्हणून देवाचा सन्मान नेहमी करण्याचा निर्णय घ्या. त्यानंतर तो तुम्हाला आध्यात्मिकरीत्या आणि त्याच वेळी या जगात भौतिक व शारीरिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देईल. माझ्या आयुष्याच्या मागील ५० वर्षांत मला हे सत्य असल्याचे कळून आले आहे. देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करेल - तुमच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमांपासून आणि तुम्ही निवडलेल्या व्यवसायात, नोकरीपर्यंत आणि नंतर लग्नापर्यंत - जर तुम्ही हा एकच निर्णय घेतलात आणि नेहमी त्याचा पाठपुरावा केलात तर: तुम्ही सर्व गोष्टींमध्ये देवाचा सन्मान कराल आणि एक देवभीरू व्यक्ती व्हाल.

याचा अर्थ प्रत्येक लहानसहान गोष्टींमध्ये विश्वासू राहणे असा होतो. आपल्या मालकीची नसलेली कोणतीही गोष्ट कधीही घेऊ नका - एखाद्या व्यक्तीकडून किंवा घरातून किंवा महाविद्यालयातून किंवा कार्यालयामधून किंवा कोठूनही - अगदी स्वस्त पेन किंवा पेन्सिल देखील नाही. छोट्या छोट्या गोष्टीतही कधीही कोणाची फसवणूक करू नका. आणि जसे की आपल्याला शालेय जीवनात शिकवले आहे, तुमच्या परीक्षेत अगदी लहानात लहान पद्धतीनेही कधीही फसवू नका. फसवणूक करून उत्तीर्ण होण्यापेक्षा नापास होणे चांगले. फसवून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब असणे चांगले.आपले मन प्रदूषित करणारे साहित्य वाचणे आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहणे थांबवा. सर्व बाबतीत आपला विवेक पूर्णपणे स्वच्छ ठेवा. जे असे जगतात त्यांना आयुष्यात - प्रत्येक पिढीत - अतिमहागाई आणि मंदीच्या काळातही - देवाचे सर्वोत्तम मिळते.

याचा अर्थ असा नाही की आपण कधीही पडत नाही किंवा अयशस्वी होत नाही. पण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अपयशी ठरता, तेव्हा तुम्ही शोक केलाच पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात (मग ते आध्यात्मिक असो वा शैक्षणिक) हजाराव्या वेळी अपयशी ठरलात तरीसुद्धा तुम्ही फक्त उठून धावत राहिले पाहिजे. आपण आपल्या मागील अपयशाला आपल्या मनात सतत येऊ देऊ नये. अपयशाची भीती ही एक सतत वाटणारी भीती आहे जी आपण झटकून टाकली पाहिजे. तुम्हाला फक्त तुमच्या इच्छेचा वापर करावा लागतो आणि भूतकाळातील अपयशांचा प्रत्येक विचार जेव्हा जेव्हा तुमच्या मनात येतो तेव्हा नाकारावा लागतो. जर तुम्ही हे करण्यात विश्वासू असाल, तर तुम्हाला काही काळानंतर कळेल, की असे विचार क्वचितच येतील - आणि शेवटी पूर्णपणे थांबतील. ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार प्रत्येक विचाराला अंकित करण्याचा हाच अर्थ होतो (२ करिंथ १०:५).

अशारितीने, अविश्वासणाऱ्या पिढीला तुम्ही एक जिवंत प्रात्यक्षिक होऊ शकता की, ते नीतिमान लोकांच्या बाबतीत चांगले घडते आणि जे देवाचा सन्मान करतात देव त्यांचा सन्मान करतो. आपल्या हुशारीने किंवा आपल्या कर्तृत्वाने या जगावर छाप पाडण्याऐवजी या जगात परमेश्वराची अशी जिवंत साक्ष तुम्ही व्हाल, अशी मनापासून तळमळ बाळगा. याकडेदेखील लक्ष ठेवा की, घराबाहेरील उपक्रम आपल्या जीवनात कधीही असे स्थान तर घेत नाहीत ना की ते आपले दैवत बनतील!

देवाची अशी इच्छा आहे की, पापावरील विजय आणि स्वतःला मरण्याच्या(या वस्तुस्थितीचा स्वतः अनुभव घेऊन) सुवार्तेची घोषणा तुमच्या संपूर्ण जीवनाने करावी आणि तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरात देवाने नियुक्त केलेली सेवा (मग ती कोणतीही असो) पूर्ण करावी, तसे तुम्ही स्वतःची नोकरी करून स्वतःचे जीवन जगताना - पौलाप्रमाणे परमेश्वराची सेवा करत असताना, कोणावरही अवलंबून न राहता, स्वत:च्या खर्चाने. हेच जगाने पाहण्याची गरज आहे आणि हीच तुमच्या सर्वांसाठी माझी सर्वात मोठी तळमळ आहे. मला माहीत आहे की, जे लोक सतत प्रथम देवाच्या राज्याचा आणि त्याच्या नीतिमत्त्वाचा शोध घेतात, त्यांनाच येशू परत येईल तेव्हा पस्तावा होणार नाही.