WFTW Body: 

आम्ही १ करिंथ १२:२७,२८ मध्ये वाचतो की "तुम्ही तर ख्रिस्ताचे शरीर आणि प्रत्येक आपापल्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे अवयव आहा. आणि देवाने मंडळीत कित्येक ठेवले आहेत; ते म्हणजे प्रथम प्रेषित, दुसरे भविष्यवादी, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करण्याची सामर्थ्ये मग निरोगी करण्याची कृपादाने, सहाय्ये, अधिकारी, निरनिराळ्या प्रकारच्या भाषा".

वरील वचनांमध्ये उल्लेख केलेली प्रत्येक व्यक्ती अशी आहे जिला देवाने आपली मंडळी तयार करण्यास मदत होईल अशा काही अलौकिक क्षमतेने सज्ज केले आहे. त्यांच्यापैकी काहीजण म्हणजे प्रेषित आणि भविष्यवादी आणि चमत्कार करण्याची आणि निरोगी करण्याची कृपादान असलेल्यांना अलौकिक क्षमता आहेत हे उघड आहे - आणि देवानेच त्यांना त्या क्षमता दिल्या आहेत. हे ही खरे असले पाहिजे की इतर जण ज्यांचा उल्लेख येथे केला आहे - जसे की शिक्षक, सहाय्ये आणि अधिकारी - यांनाही देवाने ख्रिस्ताच्या शरीरात आपले कार्य करण्यासाठी काही अलौकिक क्षमतांनी सज्ज केले आहे; व ते केवळ त्यांच्यातल्या काही नैसर्गिक क्षमतांच्या आधारावर कार्य करत असलेले नसावेत.

या उदाहरणाचा विचार करा, देवाने मंडळीमध्ये "सहाय्ये" यांना नियुक्त केले आहे. हे असे लोक नाहीत जे स्वेच्छेने फरशी झाडतात किंवा शौचालये साफ करतात इत्यादी. आम्हाला प्रत्येक मंडळीमध्ये अशा स्वयंसेवकांची नक्कीच गरज आहे, जे अशी कामे करण्यास तयार आहेत. परंतु अशी कामे कोणीही करू शकते ज्यासाठी कोणत्याही अलौकिक क्षमतेची आवश्यकता नाही. परंतु वरील वचनात नमूद केलेली सहाय्ये म्हणजे असे लोक आहेत ज्यांना देवाने अलौकिक क्षमता इतरांना मदत करण्यासाठी दिली आहे. प्रत्येक मंडळी मध्ये अशा लोकांची खूप गरज असते - आणि आपण सर्वांनी अशा सेवाकार्यासाठी देवाने आपल्याला सज्ज करावे म्हणून आतुर असले पाहिजे. असे "सहाय्ये" म्हणजे ते जे मंडळीमधील दुर्बळ व गरजूंना "आध्यात्मिक आधार आणि साहाय्य" करतात.

पवित्र आत्म्याला साहाय्य करणारा म्हटले आहे (योहान १४:१६) - आणि तो आपल्याला अदृश्यपणे मदत करण्याचे आपले काम करतो. हे ख्रिस्ताच्या शरीरातले "सहाय्ये" ही तसेच त्या महान साहाय्य करणाऱ्या पवित्र आत्म्यासारखे, साहाय्य करतात - आवाज न करता आणि पडद्यामागे , कोणत्याही भपकेबाजपणाशिवाय किंवा प्रदर्शनाशिवाय आणि अदृश्यपणे व कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता. ते भाऊ किंवा बहीण असू शकतात. अशा विश्वासणाऱ्या लोकांना देवाने दिलेली ही एक अनोखी देणगी आहे (आजारी लोकांना बरे करण्याच्या देणगीइतकीच अनोखी) मंडळीमधील कष्टकरी लोकांच्या अव्यक्त गरजांबद्दल संवेदनशील असणे जे संशय आणि भीतीशी झगडत आहेत. ते मदतीसाठी आमंत्रण मिळण्याची वाट पाहत नाहीत. पण आत्म्याच्या नेतृत्वात ते संघर्ष करणाऱ्या लोकांशी शांतपणे जोडले जातात आणि त्यांना विश्वास आणि प्रोत्साहनाच्या शब्दांनी साहाय्य करतात. ते स्वत: ला कोणावरही लादत नाहीत. पण ते दररोज देवाचे ऐकतात आणि त्यांना "थकलेल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हंगामी शब्द" दिले जातात (यशया ५०:४).

असे कृपादान पावलेल्या लोकांची आजच्या दिवसांत खूप गरज आहे, कारण प्रत्येक मंडळीमध्ये असे बरेच लोक असतात जे निराश, दुःखी, चिंताग्रस्त आणि जीवनाच्या लढाईत झिजलेले असतात. त्यांच्यासोबत असण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना कोणीतरी हवे आहे. त्यामुळे अनेक बंधू-भगिनींनी या देणगीसाठी परमेश्वराचा शोध घ्यावा जेणेकरून ते शांतपणे व आवाज न करता ख्रिस्ताच्या शरीराला आशीर्वादित करू शकतील.