WFTW Body: 

प्रकटीकरण १५:३, ४ मध्ये आपण वाचतो: ‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’ ‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.

जुन्या करारामध्ये मोशेची दोन गीते नमूद केली आहेत - एक निर्गम १५:१-१८ मध्ये, जेव्हा इस्राएली लोक तांबडा समुद्र ओलांडून गेले आणि फारो आणि त्याचे सैन्य त्यात बुडाले. त्यानंतर मोशेने गायले, "मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत." आपण प्रकटीकरण ६ मध्ये पाहतो की ख्रिस्तविरोधी यालादेखील पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला म्हणून कसे चित्रित केले आहे. तो घोडा आणि त्याचा स्वार ही उलथवून टाकल्याबद्दल देवाची स्तुती गाणारे विजयी येथे आपण पाहतो. हर्मगिदोनाच्या अंतिम लढाईत ख्रिस्तविरोधी आणि त्याचे सैन्य इस्रायलच्या भूमीत येऊन त्यावर हल्ला करतील (प्रकटीकरण १६:१४,१६).त्या वेळी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संतांसोबत उतरेल. तो सीयोन डोंगरावर उभा राहील आणि तो ख्रिस्तविरोधी शक्तींचा नाश करेल. देवाचे लोक पाहतील आणि अजिबात न लढता त्या विजयात सामील होतील. आणि आजही आपल्याला याचप्रकारे प्रत्येक विजय जिंकायचा आहे . मानवी शस्त्रांनी आपण लढाई जिंकत नाही. आपण स्थिर उभे राहतो आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि परमेश्वर आपल्या शत्रूंचा नाश करतो. तर, ज्यांचा यावर विश्वास आहे ते आजही मोशेचे गीत गाऊ शकतात!! आपण जीवनाच्या लढाईत मोशेचे गीत गाऊ शकतो. आपण "स्थिर" राहू शकतो आणि परमेश्वर आपल्या शत्रूंचे काय करतो ते पाहू शकतो.

मोशेचे दुसरे गीत अनुवाद ३१:३० ते ३२:४३ मध्ये आहे. तिथेही तो गातो,"राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करील." (अनुवाद ३२:४३). दोन्ही गीतांमध्ये आपल्याला एक सत्य दिसते: देवाचे लोक आपल्या शत्रूंवर सूड घेत नाहीत. ते मागे उभे राहतात आणि देव त्यांच्यासाठी लढतो आणि त्यांच्यासाठी बदला घेतो.

हे गाणे आपल्याला आता शिकण्याची गरज आहे जेणेकरून आपण एक दिवस देवाच्या तंतूवाद्यासह ते गौरवाने गाऊ शकू. आपल्यासाठी जीवनाची दैनंदिन परिस्थिती, ही गाणे शिकण्यासाठी गायकांच्या सरावासारखी आहे. देवाचे मार्ग परिपूर्ण आहेत असे म्हणत विजयी होणारे गातात. स्वर्गात आपण "येशूने सर्व गोष्टी योग्य केल्या आहेत" हे गाणार आहोत. त्या दिवशी जेव्हा आपण देवाने आपल्याला पृथ्वीवर चालवण्याकडे मागे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की सर्व काही - होय, सर्व काही - देवाने आपल्या कल्याणासाठी नियुक्त केले होते. आज आपल्याला अनेक गोष्टी का घडतात हे समजत नाही. पण त्या दिवशी आपल्याला अगदी परिपूर्णपणे समजेल. पण विश्वासणाऱ्याला त्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागत नाही. तो आताही त्यावर विश्वास ठेवतो आणि जाणतो. पृथ्वीवर त्याच्याबाबतीत जे काही घडले त्याचे कारण देवाने स्पष्ट करेपर्यंत त्याला वाट पाहावी लागत नाही. तो गातो, "प्रभू! तुझे मार्ग परिपूर्ण आहेत!"