WFTW Body: 

प्रकटीकरण 3:7-13 मध्ये फिलदेल्फिया येथील मंडळीला प्रभु स्वतःची ओळख सांगताना म्हणतो की तो कोणतेही दार उघडू शकतो किंवा बंद करू शकतो. जर आपण विजय मिळविणारे आहोत तर आपण कधीही बंद दारापुढे उभे राहू नये. कारण देवाची इच्छा आहे की आपण दाराने प्रवेश करावा. परंतु, प्रभु काही दारे आपल्यापुढे बंद देखील करतो. कारण जो मार्ग त्याने आपल्यासाठी ठरविला नाही त्या मार्गाने आपण जावे अशी त्याची इच्छा नसते. कारण त्याला माहीत असते की ते मार्ग आपल्या हिताचे नाहीत. विजयी जीवन जगणे खरोखर रोमांचक आहे. आपण कोणत्या दाराने जावे हे स्वतः प्रभु आपल्याकरिता ठरवितो. कोणते दार ठोकण्याचे आपण बंद करावे ते देखील प्रभु ठरवितो.

दोन प्रकारच्या संदेशवाहक व मंडळ्यांपैकी या दुसर्‍या प्रकारच्या संदेशवाहकाला व मंडळीला प्रभुने दाटले नाही. पहिली मंडळी स्मुर्णा व दुसरी मंडळी फिलदेल्फिया. ही दोन उदाहरणे आपल्याला दाखवितात की आपण प्रभुकरिता चांगला संदेशवाहक व चांगली मंडळी होऊ शकतो. प्रभु आपल्याला पारखतो तेव्हा प्रभु आपल्याला दाटणार नाही अशाप्रकारे आपण यशस्वी होणे शक्य आहे. हे आपल्या सर्वांकरिता आव्हान असावे. याठिकाणी असलेले संदेशवाहक व संतजन दुर्बल होते (प्रकटीकरण 3:8). ते समाजात प्रसिद्धी व अधिकार असलेले लोक नव्हते. परंतु, ते देवाची आज्ञा पाळीत व प्रभुचे नाव गाजवीत. आज आपण ज्या युगात राहतो त्या युगामध्ये दोन आवश्यक गोष्टी आहेत. या दोन गोष्टीविषयी प्रकटीकरणाच्या पुस्तकात वारंवार लिहिले आहे : प्रभुच्या वचनाप्रती आज्ञाधारकता व येशूची साक्ष घोषित करणे.

त्यांच्या विश्वासूपणामुळे प्रभु म्हणतो की प्रभुने त्यांच्यापुढे दार उघडे ठेवले आहे जेणेकरून ते त्याची साक्ष होतील. ते दार कोणीही बंद करू शकणार नाही (प्रकटीकरण 3:8). त्यांच्या साक्षीला सहाजिकपणे सैतान विरोध करेलच; परंतु, नरकाची दारे त्यांना आत घेऊ शकणार नाहीत. कारण ही मंडळी विजय मिळविणारी असून सैतान या मंडळीला घाबरतो. या मंडळीला सैतानाच्या सभेचा विरोध होता. स्मुर्णा येथील मंडळीला देखील असाच विरोध होता (प्रकटीकरण 3:9). याठिकाणी लक्षात घ्या की आशियामधील सात मंडळ्यांपैकी सैतानाच्या सभेने दोनच मंडळ्यांना विरोध केला आहे. या दोन मंडळ्यांना प्रभुने दोष दिलेला नाही. ज्या मंडळ्या प्रभुच्या अंतःकरणाजवळील असतात त्यांना सैतान फार विरोध करितो. सैतानाचा विरोध बहुतेकवेळा धार्मिक लोकांद्वारेच होतो.

येशू शरीरामध्ये असताना त्याचा रोमी किंवा ग्रीक लोकांनी विरोध केला नाही तर रोज बायबलचा अभ्यास करणार्‍या धार्मिक यहूद्यांनी केला. ख्रिस्ताच्या शरीराचा विरोध आज देखील असेच लोक करितील. स्वतःला ख्रिस्ती म्हणविणारे लोक आपला विरोध करितील. पापाच्या सत्तेपासून मिळणार्‍या मुक्तीविषयी ते संदेश देत नाहीत.

प्रभु म्हणतो की तो सैतानाच्या सभेतील लोकांना फिलदेल्फिया येथील मंडळीच्या लोकांच्या स्वाधीन करील. सैतानाचे प्रतिनिधी मंडळीसमोर झुकविल्या जातील (प्रकटीकरण 3:9). देवाने योजिले आहे की मंडळीच्या पायाखाली सैतानाला तुडविले जावे (रोम 16:20). आपण कधीही विसरू नये की सैतानाविरुद्धच्या लढ्यामध्ये प्रभु आपल्यासोबत सदोदीत आहे. आपण कधीही सैतानाला किंवा त्याच्या प्रतिनिधींना घाबरू नये.

येशूने प्रार्थना केली की पित्याची त्याच्या शिष्यांवर प्रीती आहे हे जगाला कळावे (योहान 17:23). या प्रार्थनेचे उत्तर फिलदेल्फियामध्ये पूर्ण होणार होते. यहूद्यांच्या सभेला एक सत्य कळणार होते प्रभुची मंडळीवर प्रीती आहे व तो मंडळीसाठी उभा आहे (प्रकटीकरण 3:9). आपल्या शत्रुविरुद्ध लढण्याकरिता देवाकडे अद्भुत मार्ग आहेत. तो आपल्या शत्रुला कळू देतो की त्याची आपल्यावर प्रीती आहे तो आपली काळजी घेतो!

फिलदेल्फिया येथील मंडळीने धीराविषयीचे येशूचे वचन राखिले होते (प्रकटीकरण 3:10). त्यांनी शेवटपर्यंत प्रभुची आज्ञा पाळली होती. परीक्षेच्या समयी विश्वासूपणे आज्ञा पाळल्यास आपण परिपूर्ण होत जातो व आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव पडत नाही (याकोब 1:4).

प्रभुने या मंडळीला दिलेले अभिवचन अशाप्रकारे आहे, "म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन" (प्रकटीकरण 3:10). संपूर्ण् जगावर होणार्‍या परीक्षा प्रसंगापूर्वीच प्रभु त्यांना अभिवचन देत आहे (पहिल्या शतकाच्या शेवटी किंवा दुसर्‍या शतकाच्या सुरुवातीला). फिलदेल्फिया येथील मंडळीला परीक्षेच्या वेळी दैवी संरक्षणाचे अभिवचन देण्यात आले. प्रभु त्यांना परीक्षा प्रसंगापासून कसा राखणार होता? प्रभु त्यांना नक्कीच जगातून उचलणार नव्हता. परीक्षेमध्ये देखील प्रभुने त्यांना सुरक्षित ठेवले. संकटाच्या काळात देखील त्यांना प्रभुच्या संरक्षणाचा अनुभव आला. आज आपल्याकरिता हे वचन प्रोत्साहानात्मक आहे. कारण ख्रिस्तविरोधकाच्या महासंकटाच्या काळात देखील प्रभु आपल्याला अशाचप्रकारे सुरक्षीत ठेवणार आहे. दुसर्‍या शतकामध्ये ज्याप्रकारे प्रभुने फिलदेल्फिया येथील मंडळीला सुरक्षीत ठेवले त्याचप्रकारे तो आपल्याला पृथ्वीवर दुष्टापासून सुरक्षीत ठेवील. त्याच्या नावाकरिता आपल्याला त्रासातून जावे लागले तरी तो आपल्याला सुरक्षीत ठेवील. येशूने म्हटले आहे, ''माझ्या नावाकरिता तुमचा छळ होईल... शरीराला जिवे मारणार्‍यांना घाबरू नका... कारण तुमच्या डोक्यावरील सर्व केस मोजले आहेत... तुमच्या डोक्यावरील एकाही केसाचा नाश होणार नाही'' (मत्तय 10:28,30; लूक 21:17-18). महासंकटाच्या काळात देखील प्रभुच्या परवानगीशिवाय आपल्या डोक्यावरील एकाही केसाला कोणी स्पर्श करू शकणार नाही. म्हणून आपण निवांत राहू शकतो.