प्रेम, विवाह आणि लैंगिक समस्या ! किती महत्त्वपूर्ण विषय ! त्यांचा परिणाम न झालेला असा कोणी असणे शय नाही, तरीही देवाने मानवाला दिलेल्या या देणग्यांच्या खऱ्या हेतूबद्दल किती अज्ञान आहे!
या आपल्या देशामध्ये पालक त्यांच्या मुलांना किंवा पाळक त्यांच्या तरूण मंडळीला या विषयाबद्दलची माहिती सहसा देत नाहीत त्यामुळे तरूण लोक त्यांना हवी असणारी माहिती अक्षरश: गटारातून अत्यंत विकृत स्वरूपात मिळवतात चर्चने जे काही त्यांना सुरूवातीलाच शुध्द सवरूपात शिकवायला हवे ते त्यांना, जग आणि सैतान आपापल्या मार्गाने शिकवण्यात अत्यंत तत्पर असतात या विषयांवरील पवित्र शास्त्राच्या शिकवणीबाबतच्या अज्ञानामुळे बहुतेक तरूण मंडळी या विषयांतील सैतानाच्या सूक्ष्म हल्ल्यांपासून असुरक्षित आहे प्रस्तुत पुस्तक म्हणजे ही गरज भागवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे मात्र त्याला प्रेम, विवाह आणि लैंगिक समस्या यांकडे परमेश्वराच्या दृष्टिकोणातून पाहण्याची आवश्यकता आहे
परमेश्वर स्वत: खऱ्या प्रेमाचा जणू अर्क आहे आणि विषयवासनेचा निर्माणकर्ता व विवाहविधी प्रस्थापित करणारा तोच आहे म्हणून तोच केवळ आपल्याला प्रेमाचा खराखुरा अर्थ काय आहे आणि लैंबिक बाबी व विवाह यांचा आपल्या हितासाठी कसा उपयोग करायला हवा हे सांगू शकेल परमेश्वराने त्याच्या वचनात जे काही सांगितले आहे त्याच्या अगदी विरूध्द शिकवण जग या विषयांबद्दल देते असे आपल्याला आढळून येईल परंतु परमेश्वराच्या वचनाची शिकवण ही एखाद्या खडकासारखी आहे जो त्याच्यावर आपल्या जीवनाची उभारणी करतो त्याचे जीवन केव्हाही ढासळणार नाही, कोणतेही वादळ किंवा भूकंप त्याला केव्हाही हादरवू शकणार नाही
अशा काही गोष्टी आहेत की, त्याबाबत कोणालाही हटवादी राहता येणे शय नाही, त्या गोष्टीबाबत मी हटवादीपणापासून अलिप्त राहिलो आहे परंतु दुसऱ्या काही गोष्टी आहेत की, त्याबबात एखाद्याला खंबीर राहण्याशिवाय गत्यंतरच नसते,अशा गोष्टींबाबत मी माझे विचार स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे या पुस्तकात मी काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या असून पाखंडी लोकांना तयामुळे धका बसेल! काही परखड विधानेही यात आहेत भारतातील पुष्कळशा ख्रिस्ती लोकांनी या विषयांची बराच काळ अत्यंत सौम्य रीतीने हाताळणी केली आहे या विषयांवर ख्रिस्ती नेत्यांनी खंबीरपणे आपला आवाज उठवला असता तर अनेक तरूण जीवनांचा बचाव झाला असता म्हणून काही ठिकाणी कठोर प्रहार केल्याबद्दल मी काही दिलगिरी प्रकट करीत नाही लैंगिक बाबींमध्ये सैतानाच्या जाळयात सापडणाऱ्या अनेक ख्रिस्ती लोकांना मी पाहिले आहे मी पुष्कळसे ख्रिस्ती विवाह असे पाहिले आहेत की, त्यात परमेश्वराचे हेतू सफल होण्याऐवजी सैतानाचे हेतू पूर्ण झाले आहेत त्यामुळे शस्त्रागारातील अत्यंत प्रभावी अस्त्रांनी हल्ला केलयाखेरीज मला गत्यंतरच नाही
फत मुलींकरिता हे सहावे प्रकरण माझ्या पत्नीने अत्यंत सहानुभूतिपूर्वक सादर केले आहे
तरूणांनी हे पुस्तक अत्यंत गंभीरपणे वाचावे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो पूर्वसूचित असणे म्हणजेच पूर्वतयारीत रहाणे रोगमुत होण्याआधी प्रतिबंधक उपाय योजून तो होऊ न देणे केव्हाही उत्तमच! या पुस्तकात जे सांगितले आहे त्याची दाखल घेतली, तर तुम्ही भविष्यात (पुष्कळ) मानसिक धयांपासून आणि विशानापासून वाचू शकाल
पुष्कळशा ठिकाणी मी पुरूषवाचक सर्वनामाचा उपयोग केला आहे, तो केवळ पुरूषांच्याच संदर्भात नसून सर्व मानवांसाठी, सर्वसाधारणपणे केला आहे आणि अर्थातच स्त्रियाही त्यात आल्याच ज्या ठिकाणी असे उल्लेख आहेत त्याचा अर्थ वाचकांना स्पष्ट होईल
ज्यांनी माझे मूळ हस्तलिखित वाचले आणि अत्यंत उपयुत सूचना केल्या त्या अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा मी ऋणी आहे
अनेकांना प्रेम, विवाह आणि लैंगिक बाबींसंबंधाने परमेश्वराची परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजण्यास मदत करणारे व आशीर्वादाचे ठरणारे असे हे पुस्तक व्हावे अशी माझी प्रार्थना आहे
मानवाच्या निर्माण केलेल्या उपजत प्रवृत्तींमध्ये सेसशरीरवासना ही अत्यंत शतशाली असून अगदी स्फोटक पदार्थासारखी आहे आशीर्वादाची कितीतरी शयता परमेश्वराच्या या आश्चर्यकारक देणगीमध्ये आहे आणित तरीही तिच्या दुरूपयोगाने किती भयंकर अनर्थ माजवला आहे
प्रत्येक स्त्री परुूषात शरीरवासना आणि गरजा या अस्तित्त्वात आहेत प्रत्येकाला या उपजत प्रवृत्तींची शती सारखी नसू शकेल, परंतु यौवन प्राप्त झाल्यानंतर कमीत कमी तीस वर्षेपर्यंत तरी प्रत्येक सर्वसाधारण मानवामध्ये ही प्रवृत्ती प्रभावी शती निर्माण करते स्फोटक पदार्थाप्रमाणे लैंगिक बाबींचा उपयोग चांगल्या किंवा वाईट गोष्टींसाठी करता येतो देवाच्या गौरवासाठी किंवा सैतानाची सेवा करण्यासाठीही ! स्फोटक पदार्थामधये उपजत पाप असे काहीच नाही त्याचा कसा आणि कोणत्या हेतूस्तव उपयोग केला जाते, यावर ते अवलंबून आहे लैंगिक बाबींचेही तसेच आहे जर परमेराची देणगी म्हणून तिचा स्वीकार केला आणि परमेराच्या नियंत्रणाखाली अगदी सुज्ञपणे तिचा वापर केला, तर मानवाच्या उच्चतम इच्छापूर्तीचे ते साधन होऊ शकेल दुरूपयोग केला तर मात्र ती त्याला अवनतीच्या खोल गतेंप्रत नेऊ शकेल एकाने म्हटल्याप्रमाणे लैंगिक बाब ही खरोखरच
आश्चर्यकारक सेवक परंतु भयंकर मालक अशी आहे
जेवण किंवा विश्रांती या इच्छांप्रमोण लैंगिक इच्छा अगदी सामान्य आहे परंतु ज्या परमेराने या साऱ्या इच्छा निर्माण केल्या आहेत त्याने त्यांच्याकडून कायदेशीर समाधान मिळवावे म्हणून मार्गही नेमून दिले आहेत
शारीरिक वासना जशी देवाने निर्माण केली तशी ती पवित्र आणि शुध्द आहे मानव पापात पडण्यापूर्वी आणि ज्याला देवाने अत्यंत चांगले म्हटले आहे अशा हया जगात तिची निर्मिती झाली यावरून ते सिध्द होते परंतु मानवाचे पतन झाल्यापासून लैंगिक बाबींबद्दल त्याचा दृष्टिकोण विकृत झाला आणि तो स्वत: लैंगिक इच्छेचा गुलाम बनला आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्याबरोबर त्यांना लैंगिक बाबींची जाणीव झाली आणि आपल्या नग्नतेची त्यांना लाज वाटू लागली लगेच त्यांनी आपली शरीरे झाकण्यासाठी आवरण प्राप्त केले आपण राहतो ते जग अजूनही त्या पतनाचे परिणाम भोगत आहे परिणामी जी लैंगिक बाब मानवाला आशीर्वादाची ठरणार होती, ती उलट भार अशी होऊन बसली आहे
परमेश्वराने दिलेल्या या व्यवहाराचा मानवाने वारंवार दुरूपयोग केल्यामुळे, सेस (लैंगिक बाब) या शब्दाचा एक अशुध्द गर्भितार्थ आज पुष्कळशा लोकांचा मनात आहे जे शुध्द, सुंदर आणि पवित्र असावे असा परमेराचा हेतू होता, त्याबद्दल विकृत आणि विपरीत विचार प्रस्तृत करण्याचे कार्य आजकालचे चित्रपट, जाहिराती आणि पुस्तकालयात विकल्या जाणाऱ्या हलया दर्जाच्या साहित्याने केले आहे
लैंगिक बाबीबद्दलचे आमचे विचार भ्रष्ट झाल्याचे सिध्द करण्यास भरपूर पुरावा उपलब्ध आहे क्रिस्तियन बिहेवियर मध्ये सी एस लुईस लिहितात
स्ट्रीपटीज् कार्यक्रमाला, महणजेच रंगमंचावर तरूणीने आपली वस्त्रे उतरविण्याचा कार्यक्रम पहायला तुम्हाला पुष्कळ प्रेक्षक मिळू शकतील समजा, तुम्ही अशा एका देशामध्ये आलात तिथे रंगमंचावर केवळ एक झाकलेले ताट आहे आणि नंतर हळूहळू त्यावरील आवरण काढण्यात येते किंवा दिवे जाण्यापूर्वी त्या ताटात एखादा मटन चॉप किंवा मांसाचा एखादा तुकडा असल्याचे प्रत्येकाला दिसते आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होते यावरून तुम्ही त्या देशाचे अन्नवासनेबाबत काही तरी बिघडले आह असेच समजणार नाही का ? तसेच वेगळया वातावरणात वाढलेला कोणीही आपल्यातील लैंगिक बाबींबद्दलची तऱ्हेवाईक प्रवृत्ती पाहून नेमका तोच विचार आपल्याविषयीही करणार नाही का?
या भ्रष्ट अशा जगामध्ये परमेरासाठी प्रकाशाप्रमाणे चमकावे म्हणून ख्रिस्ती मनुष्याला पाचारण केले आहे लैंगिक बाबीला जगाने केवळ शारीरिक घटना आणि सुखाचे साधन म्हणून हीन पदाला नेले आहे, त्या जगाच्या लैंगिक बाबीबद्दलच्या दृष्टिकोणाविरूध्द पवित्रा घेऊन त्याने उभे ठाकले पाहिजे त्याने देवाच्या आत्म्याकडून स्वत:च्या मनाचे असे नवीकरण होऊ द्यावयास हवे की शारीरिक लैंगिक संबंध ही पापमय व लज्जास्पद बाब नसून, तिचे स्वरूप सुंदर व मुळात पवित्र आहे असा जाेे देवाचा दृष्टिकोण आहे तो त्यालाही प्राप्त होईल पुष्कळसे धर्म आणि पुष्कळशी तत्त्वे यांत लैंगिक बाबींबद्दल अत्यंत विकृत दृष्टिकोण आहेत, त्याचे कारण एक तर असे की मानवी शरीर म्हणजे काहीतरी पापमय असून त्याचा शय तितया लवकर त्याग केला पाहिजे अशा अर्थाने ते त्याकडे पाहतात, किंवा ते दुसऱ्या टोकाला जाऊन शरीराचीच पूजा करतात, कुठलीही शंका न बाळगता त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात
शरीराला आत्मा व प्राण यांपेक्षा कमी महत्त्व असले, तरी शरीर हे आत्मा आणि प्राण यांच्याप्रमाणेच परमेराची निर्मितकृती आहे, हा ख्रिस्ती दृष्टिकोण आहे परमेराच्या योजनेमध्ये अर्थातच शरीराचा निश्चित असा हेतू आहे ख्रिस्ती माणसाने आपल्या शरीराद्वारे परमेराचे गौरव करावे, कारण ते पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, असे पवित्र शास्त्र शिकवते(१ करिंथ६:१३२०)उपासना म्हणून आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ आपण करावा असा बोध आपल्याला केला आहे(रोम १२:१) शरीर हे पापाचे कारण आहे असे ज्यांना वाटते, त्यांना मार्टिन ल्यूथरने स्मरण करून दिले आहे की, या पृथ्वीवर प्रभू येशूला देखील शरीर होते, परंतु तो निष्पाप राहिला, आणि सैतानाला शरीर नसूनही तो पापाने पूर्णपणे भरलेला आहे पापाचा उगम हा मानवी शरीरात नसून मानवी ह्दयात असतो असे आढळून आले आहे शरीर आणि शारीरिक इच्छा यांना दूर केल्याने पापापासून मुतता होत नाही, तर ती ह्दयपरिवर्तनामुळे होते परमेराने आपल्या लैंगिक इच्छा काढून टाकाव्यात अशी प्रार्थना काही लोकांप्रमाणे आपल्याला करायची नाही त्यामुळे आपला मर्दपणा खच्ची केला जाईल आणि परमेराच्या मंदिराच्या एका भागाचा नाश होईल आपण अखंड मानव राहून विजयी जीवन जगावे अशी परमेराची इच्दा आहे चुलीत असलेली आग विझविण्याचे कारण नाही मात्र त्या आगीमुळे सारे घर जळून जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे लैंगिक गोष्टींच्या बाबतीत आपल्याला मोह होण्याची परवानगी परमेर एका विशिष्ट हेतूने देतो त्याच उद्देशाने त्याने एदेन बागेत आदामाच्या मनात मोह उत्पन्न होण्यास परवानगी दिली होती आदाम निष्पाप तर होताच, परंतु तो पवित्रही असावा अशी देवाची इच्छा होती पवित्रता म्हणजे केवळ निष्पाप असणे एवढेच नव्हे आदामाने नैतिक निवड करून मोहावर विजय मिळवला असता तर तो पवित्र झाला असता आपलेही तसेच आहे
प्रत्येक तरूण मनुष्य हा लवकर म्हणा किंवा उशिरा, पण अशुध्द विचारांच्या मोहात सापडतोच स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये लैंगिक वासना तीव्र आणि आक्रमण प्रवृत्तीची असल्याने स्त्रियांपेक्षा पुरूषांना त्या समस्येला अधिक प्रमाणात तोंड द्यावे लागते मार्क ७:२१ मध्ये मनुष्याच्या अंत:करणातून बाहेर पडणाऱ्या गोष्टींच्या यादीत येशूने दुष्ट विचारांना पहिले स्थान दिले आहे ह्दयपरिवर्तन न झालेल्या लोकांची अंत:करणे सारखीच दुष्ट असतात आणि येशूने दिलेले वर्णन सर्वांच्या बाबतीत खरे असल्याचे दिसून येते योग्य संधीच्या अभावामुळे व समाजाच्या भयामुळे एखादा सभ्य गृहस्थ शारीरिक व्यभिचारापासून दूर राहिला असला, तरी व्यभिचाीर माणसाच्या मनात अशुध्द विचार जसे थैमान घालतात तसेच ते नीतीने चालणाऱ्या मनुष्यालाही तितकेच त्रासदायक ठरतात
तथापि मोह आणि पाप यांच्यामधील मेद लक्षात घेणे आपणांस आवश्यक आहे येशूवर देखील सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे मोह आले होते (इब्री ४:१५) परंतु विचारानेदेखील तो मोहाला कधी बळी पडला नाही आणि म्हणूनच त्याने कधीही पाप केले नाही या पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपल्यालाही मोह होतील परंतु आपण पाप करता कामा नये जेव्हा दुष्ट वासना आपल्या मनात गर्भवती होते, तेव्हाच आपण पाप करतो (याकोब१:१५), म्हणजे आपण पापवासनेच्या विचाराचा स्वीकार आपल्या मनाने करतो तेव्हा आपण पाप करतो तत्क्षणीच आपण त्या प्रेरणेला नकार दिला, तर आपण पाप करीत नाही एका जुन्या कर्मठ धर्माचारवाद्याने म्हटले आहे की, माझ्या डोयावरून उडणाऱ्या पक्ष्यांना मी प्रतिबंध करू शकत नसलो तरी त्यांनी माझ्या डोयावर घरटे बांधण्याला मी प्रतिबंध करू शकतो जेव्हा दुष्ट विचार आपल्या मनात येतो, तव्हा एक क्षणभर जरी आपल्या मनात आपण त्यामुळे सुखावलो तर आपण त्याला घरटे बांधण्याची परवानगी देतो आणि पाप करतो पापवासनेच्या विचारात एकदा मन रमले की, तो माणसाला आपला अधिकाधिक गुलाम बनवतो जसजसा काळ लोटतो तसतशी त्यापासून होणारी सुटका अधिकाधिक कठीण होऊन बसते जितया लवकर आपण सुटकेसाठी प्रयत्न करतो, तितके आपल्याला सोपे जाते पतनाीच प्रामाणिक कबुली, सुटकेची खरी उत्कट इच्छा, ख्रिस्ताबरोबर झालेल्या आपल्या मृत्यूची आणि आपले शरीर व मन परमेराला संपूर्णपणे शरण गेल्याबद्दलची स्वीकृती या (इतर सर्व पातकांवर विजय संपादन करण्याच्या) मार्गाद्वारेच सैतानी विचारांवर विजय संपादन करता येतो (रोम ६:११४)
आपल्यला निरंतर विजयाचा उपभोग घ्यावयाचा असेल, तर आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालले पाहिजे आणि आपल्या आयुष्याला शिस्त लावावी म्हणून त्याच्याीश सहकार्य केले पाहिजे (गलती ५:१६१९) जर आपण आपले डोळे व कान यांना शिस्त लावण्यात कसूर केली, म्हणजे पापवासनामय असलेले सारे काही वाचण्याचे, पाहण्याचे आणि ऐकायचे टाळले नाही, तर आपण आपल्या प्रत्येक विचाराला शिस्त लावू शकणार नाही (मत्तय ५:२४३० चा हा खरा सूचित अर्थ आहे) पापवासनामय विचारांपासून मुत होण्यासाठी शरीर शिस्तबध्द असण्याची आवश्यकता आहे मनातील विषयसुखाच्या मोहाशी आम्हाला सतत लढा द्यावा लागला अशी अनेक महान संतांनी कबुली दिली आहे विजय मिळविण्यासाठी त्यांना आपल्या शरीराला कडक शिस्त लावावी लागली
ईयोब हा दहा मुल असलेला विवाहित मनुष्य होता तरी त्याने, वासनामय विचारांपासून सुटका करवून घेण्यासाठी आपल्या डोळयांवर ताबा ठेवावा लागतो हे मान्य केले तो म्हणाला, मी तर आपल्या डोळयांशी करार केला आहे, मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?(ईयोब ३१:१) पुरूषांना तीव्र मोह डोळयांच्याद्वारे होतो त्यावेळी काळजी घेतली नाही आणि डोळयांद्वारे अशुध्द विचाराला किंवा चित्राला आपल्या मनात शिरकाव करण्यास परवानगी दिली, तर त्यांना तेथून काढून टाकणे अगदी अशय होऊन बसते
आपल्या आयुष्याला शिस्त लावण्यामध्ये, रोज सकाळी उठल्याबरोबर आणि रोज रात्री झोपी जाण्यापूर्वी आपण परमेश्वरासमवेत जो वेळ घालवतो त्याचाही अंतर्भाव होतो जर सकाळी जाग आल्यानंतरही आपण बिछान्यातच लोळत पडलो, तर दुष्ट विचारांना आपल्या मनात थारा देण्यासाठी आपण मनाचे दर अगदी खुले करून ठेवतो आपण रोज आपले मन परमेराच्या वचनांनी भरून टाकायला हवे कारण परमेश्वराच्या वचनांनी व्यापलेली आपली मने ही दुष्ट विचारसरणीपासून खात्रीलायकपणे सुरक्षित राहतात दावीद म्हणाला, मी तुझ्या विरूध्द पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे(स्तोत्र ११९:११)पवित्र शास्त्रसुध्दा म्हणते की जे काही सत्य जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुध्द, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा (फिलिप्पै ४:८)
अशुध्द विचारांशी सामना करताना पवित्र शास्त्राच्या या आदेशांचे पालन केल्यामुळे आपल्याला फार मोठी मदत मिळाली असे भारतात येऊन गेलेले एक महान मिशनरी हेन्री मार्टिन यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये म्हटले आहे जेव्हा त्यांच्या मनात एखाद्या मुलीविषयी वासनात्मक विचार येई, तेव्हा ते त्त्वरित त्या मुलीसाठी प्रार्थना करीत की, ती मुलगी आपल्या अंत:करणाने व मनाने शुध्द असावी आणि परमेश्वराची सेवा व वैभव यांना समर्पित अशी ती पवित्र आत्म्याचे मंदिर असावी तिच्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर अशुध्द विचारांना थारा देण्याचे धैर्य त्यांना होत नसे वैचारिक शुध्दता ठेवण्यासाठी ही अत्यंत उत्कृष्ट पध्दती आहे यात शंका नाही
काही लोक असे म्हणतील की, आपल्या सभोवती असलेल्या जगातील नीतीचा दर्जा इतका हीन आहे की, अशुध्द विचारांपासून संपूर्णपणे मुत राहणे अत्यंत कठीण आहे परंतु विसाव्या शतकातच अशी परिस्थिती आहे असे म्हणता येणार नाही पहिल्या शतकात करिंथ शहर हे उच्छृंखलपणाचे आणि अधर्माचे केंद्र बनले होते तरीही तेथील ख्रिस्ती लोकांनी त्यांचा प्रत्येक विचार पूर्णपेण ख्रिस्ताच्या आज्ञेच्या अधीन करण्यास देवाच्या आत्म्याने त्यांना प्रेरणा दिली (२ करिंथ१०:५) आपणही तसेच करावे असे तो सांगतो जीवनाकडे जाणारा मार्ग जरी अरूंद आणि कठीण असला, तरी पवित्र आत्मा आपल्याला त्या मार्गातून चालण्यासाठी शतशाली बनवू शकतो
तथापि आपल्या जीवनाला शिस्तबध्द करणे म्हणजे विरूध्द लिंगाच्या व्यतीबद्दल तिटकारा वाढवणे असे मात्र नव्हे त्याचा अर्थ याहून फार निराळा आहे आपल्याला विरूध्द लिंगाच्या व्यती आकर्षक वाटतात, यात पापमय असे काही नाही ते अगदी नैसर्गिकच आहे परमेश्वराच्या सुंदर निर्मितीची एक कृती म्हणून एखाद्या सुंदर चेहऱ्याची स्तुती करण्यात गैर असे काहीच नाही परंतु आपण पतन पावलेले आहो म्हणून, सावध न रहिल्यास सुंदर स्वरूप पाहता पाहता आपल्या मनात विलासी वासना उत्पन्न होतील म्हणून विरूध्द लिंगाच्या व्यतीचा आकर्षकपणा जरी स्वरूपत: शुध्द असला, तरी आपल्यासाठी अशुध्द विचार करण्याची संधी बनू शकतो
‘अ सेकन्ड ट्च‘ या आपल्या पुस्तकात कीथ मिलर म्हणतात,
ख्रिस्ताला पूर्णपणे जीवन वाहून दिल्यामुळे ख्रिस्ती मनुष्याला विरूध्द लिंगाच्या व्यतीच्या सौंदर्याची पूर्ण जाणीव होत नाही असे मुळीच नाही, हे माझ्या लक्षात आले आहे अशी जाणीव होऊन त्याला मान्यता देणे हे माझ्या दृष्टिने कधीच पाप ठरणार नाही वास्तविक पाहता, पाप करण्याच्या विशिष्ट शयतेची किंवा परिस्थितीची जाणीव होणे हे ख्रिस्ती व्यतत्वाच्या विकासाच्या दृष्टीने पूर्वापेक्षितच आहे उदाहरणार्थ, आंधळया मनुष्याने त्याच्या समोरील मेजावरचे सोने जर चोरले नाही तर त्यामुळे तो प्रामाणिक आहे असे म्हणता येणार नाही पण ते सोने आहे हे पाून, त्याकडे आपले मन आकर्षित होत आहे याची जाणीव होत असतानादेखील ते न चोरण्याचा निर्धार करणारा मात्र प्रामाणिक ठरले अडचणी निर्माण करणाऱ्या गोष्टींची पूर्ण जाणीव झाली असताना मनुष्य त्यासंबधी काय निर्णय घेतो किवां त्यासंबंधात कसा वागतो, ते महत्त्वाचे असते
आपल्यामध्ये असलेला पवित्र आत्मा आपल्याला अटकाव करतो आणि आपल्याला आपली नजर आणि आपले विचार दुसऱ्या दिशेला वळवण्यास सांगतो तेव्हा त्याच्या वाणीचे पालन करण्यातच आपली सुरक्षितता असते
आपणसुध्दा सतत अशी प्रार्थना केली पाहिजे,
परमेश्वरा, मी ज्यावर मात करू शकणार नाही अशा (या बाबींमधील) मोहाचा सामना मला करावयास लावू नकोसअशा प्रकारे आस्थेने प्रार्थना केल्यामुळे पुष्कळ तरूण लोकांना विजय मिळाला आहे
विचारांतील बेतालपणामुळे शारीरिक कामवासनांचा कल बेशिस्त वर्तनाकडे जातो ख्रिस्ती व्यत्लीा हे केव्हाही उचित नाही प्रेषित पौल म्हणतो,
स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो, ते नाशवंत मुगुट मिळविण्यासाठी असे करितात, आपण तर अविनाशी मुगुट मिळविण्यासाठी करतो यास्तव मी ही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही तसेच मुष्टियुध्दही करितो, म्हणजे वाऱ्यावर मृष्टिप्रहार करीत नाही, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवितो, असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित मी स्वत: पसंतीस न उतरलेला असा ठरेन (१ करिंथ, ९:२५२७)
पुन्हा तो म्हणतो,
देवाला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे काम वासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे (१ थेस्सल ४:४५)
या पुस्तकात सी.जी. स्कोरर म्हणतात,
(प्रेषित पौलाच्या) या शब्दांवरून हा सल्ला पवित्रशास्त्रात स्पष्टपणे उल्लेख न केलेल्या दुसऱ्या विषयाबद्दल एकान्तात गुप्त रीतीने करण्यात येणाऱ्या वासनातृप्तीबद्दल, महणजे हस्तमैथुनाबद्दल आहे माणसाच्या जीवनाच्या गुप्त स्वरूपाचे पृथकरण करण्याचा प्रयत्न काही नव्या कराराने केलेला नाही आधुनिक मानसशास्त्र ते करण्याचा प्रयत्न करीत असेल, ख्रिस्ताने आणि त्याच्या प्रेषितांनी मात्र तो केला नाही परंतु आपल्या शरीरावर असलेल्या परमेराच्या अधिकाराविरूध्द बंड करण्याची इच्छा अशा स्वसमाधानाच्या प्रकारात असते असा जो निष्कर्ष निघतो त्यापासून सुटका करून घेणे कठीण आहे त्यात लैंगिक सुखाचा अनुभव हेच उद्दिष्ट समजून, त्याीच अभिलाषा धरून ते संपादन करून घेण्याचा समावेश होतो पुरूष किंवा स्त्री आपल्या स्वत:च्या इच्छेवर प्रभुत्व चालविण्याऐवजी तिचे गुलाम बनतात विषयलालसेची विचारसरणी आध्यात्मिक ज्ञान व शती यांना विरोध करते हे एक सर्वसाधारण तत्व आहे शरीरप्रवृत्ती आपल्या जीवनावर अधिकार गाजवीत असेल तर आत्म्याला तो अधिकार गाजवणे शय नसते मानसशास्त्रदृष्टया अशा प्रकारची पापे ही व्यतमत्त्वाची अपरिपवता, स्वत:मध्ये गुरफटून जाणे व स्वत:मध्येच तल्लीन होणे यांची निदर्शक आहेत त्यांच्यावर जय मिळविण्याची आवश्यकता आहे अर्थात, व्यभिचाराइतके काही ते पाप गंभीर मानण्याचे कारण नाही कारण त्यात दुसरे कोणीही समाविष्ट नसते (परंतु) त्या लालसेवर त्या माणसाचा अधिकार चालत नसल्याचे त्याल कबूल करावे लागते, व याच कारणामुळे ते त्या माणसाला स्वत:बाबत हतबल ठरवते ते त्याची मानखंडना करते आणि त्याच्या स्वत:च्या प्रतिष्ठेबाबत त्याच्याच मनातील गोंधळामुळे ख्रिस्ती म्हणून त्याची साक्ष विफल करते विषयलालसा प्रारंभीच टाळली, तर लैंगिक उत्तेजनाला प्रतिरोध करता येतो, ही सामान्य वृत्ती व तशी इच्छा बाळगणे हाच या समस्येवर उपाय आहे
हस्तमैथुनामुळे कोणताही आजार होणार नाही परंतु त्यामुळे औदासीन्य, अपराधाची जाणीव आणि इच्छाशतीचा कमकुवतपणा निर्माण होईल या सर्व गोष्टी शेवटी माणसाकडून त्याचे देवाशी असलेले नाते आणि त्याची आध्यात्मिक कार्यक्षमता हिरावून नेतात त्याच अधिक गुरफटून गेल्यास विवाहोत्तर काळातील शरीरसंबंधामध्ये त्यामुळे समस्या निर्माण होतात हस्तमैथुन हे पाप आहे कारण देवाने जी लैंगिक सुखाची देणगी दिली आहे त्याचा तो दुरूपयोग होय त्याबद्दल पश्चाताप करून त्याचा त्याग केला पाहिजे
तरूण लोक आपल्या दैहिक वृत्तीच्या मित्रांकडून नेहमी लैंगिक बाबींबद्दलचे ज्ञान अत्यंत विकृत स्वरूपात शिकतात त्यामुळे ते या वाईट सवयीच्या सहज आहारी जातात एकदा ही सवय जडली की, मग तिची इतकी जबरदस्त पकड त्या व्यतीवर बसते की, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करण्याखेरीज त्याला गत्यंतर उरत नाही परंतु ख्रिस्त त्याला त्यातून मुत करू शकतो ज्याप्रमाणे अनेक वर्षेपर्यंत उपयोगात न आणलेला एखादा स्नायू निरूपयोगी बनतो त्याचप्रमाणे त्यांचे इंद्रिय त्याचा उपयोग न केल्यास निरूपयोगी होऊन जाईल म्हणून हस्तमैथुन करायलाच हवे, असे पुष्कळ तरूण मुलांना त्यांचे मित्र शिकवतात तथापि ही अत्यंत चुकीची कल्पना आहे गुप्त इंद्रियाचा उपयोग न केल्यास ते निरूपयोगी बनत नाही किंवा दुर्बल बनत नाही ही गोष्ट वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे प्रबळ लैंगिक भावना नियंत्रित ठेवण्यामुळे कोणताही मानसिक दुष्परिणामदेखील होत नाही वास्तविक पाहता लैंगिक इच्छा नियंत्रित ठेवण्यात कसल्याही प्रकारचा धोका नाही उलट, जेव्हा एखादी व्यती स्वत:ला नियंत्रित ठेवते तेव्हा त्या व्यतीची इच्छाशती अत्यंत प्रभावी बनते व तिचे मन अत्यंत सावध राहते एखादी व्यती आपल्या गुप्तेंद्रियाचा एकदाही उपयोग न करता देखील आपले जीवन जगू शकते आणि ती मानसिक व शारीरिक दृष्टीनींही संपूर्णपणे सशत व निरोगी राहते झोपेत वीर्यपतन झाल्यामुळे काही तरूणांच्या मनात चिंता निर्माण होत असेल शरीरात साचलेले अधिक द्रव्य बाहेर टाकणे ही शरीराची नैसर्गिक क्रिया असते त्यात अनैसर्गिक किंवा चिंतेस कारण असण्यासारखे काहीच नाही
प्रत्येक तरूण पुरूषाने त्याचा विवाह होण्यापूर्वीच त्याच्या लैंगिक वासना नियंत्रित ठेवण्यास शिकले पाहिजे, कारण नंतर आत्मसंयमनाची अत्यंत आवश्यकता असते विवाह झाल्यानंतरही लैंगिक संबंधाबाबत आत्मसंयमाला महत्त्व असते, कारण विवाह म्हणजे काही अनियंत्रित संभोगाचा परवाना नव्हे जो विवाहापूर्वी आत्मसंयमन करायला शिकत नाही तो विवाहोत्तर ते शिकणे असंभवनीय आहे जे कोणी अशा वाईट सवयींच्या आहारी गेले आहेत, ते कदाचित त्यातून सुटका कशी होईल याच विचार करीत असतील ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचे पुनरूत्थान यामध्ये आपला त्याच्याशी संयोग होण्यामुळे पापाचा आपल्यावरील अधिकार नष्ट झाला आहे, अशी जाणीव होणे हाच सुटकेचा मार्ग आहे आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी स्वत:ला परमेराला समर्पित केले तर आपण आज आपल्या जीवनामध्ये विजयाचा अनुभव घेऊ शकू(रोम ८:२)
आपल्या जीवनासाठी भरगच्च दैनंदिन कार्यक्रमांची आपण आखणी केली पाहिजे कोणत्या ना कोणत्या तरी कामात आपली मने व विशेषत: शरीरे दिवसभर कार्यमग्न ठेवली पाहिजेत आळशी आणि निरूपयोगी शरीर चटकन काम वासनेची शिकार बनते जी व्यती कष्टाळू जीवन व्यतीत करते तिला या क्षेत्रात फारच कमी अडचणी येतात मनुष्याने परिश्रम केले पाहिजेत अशी परमेराची इच्छा आहे आदामाला आपल्या निढळाच्या घामाने आपली भाकरी मिळवायची होती (उत्पत्ती ३:१९) वेळेची बचत करणारी अनेक साधने विज्ञानोन आमच्यासाठी शोधून काढली आहेत त्यामुळे आधुनिक तरूण लोकांना बराच रिकामा वेळ असतो याचा उपयोग सैतान चटकन करून घेतो यामुळे आपण वेळेची बचत करणाऱ्या कोणत्याही साधनाचा उपयोग करू नये असे मला म्हणावयाचे नाही त्यांचा सर्वतोपरी उपयोग करावा, परंतु आपल्याला मिळणाऱ्या फावल्या वेळेत आपण काहीतरी क्रियाशील उद्योग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे
शरीरातील शतीचा चार प्रकारे उपयोग करता येतो शारिरीक काम, बौध्दिक उद्योग, भावनात्मक अनुभव किंवा लैंगिक भोग जर आपली शारीरिक ताकद आपण पहिल्या तीन गोष्टींमध्ये खर्च केली नाही, तर चौथ्या गोष्टीवर तिचा सर्व भार पडेल परंतु शतीचा अपव्यय आणि मज्जातंतूवर पडणारा ताण दुसऱ्या कोणत्याही मार्गाने होत नाही एवढा लैंगिक भोगामुळे होतो
काही पुरूषांच्या लैंगिक भावना तीव्र नसतात व इतरांच्यावर कामोत्सर्गाचा जितका दबाव पडतो तितका त्यांच्यावर पडत नाही अधिक प्रमाणात लैंगिक वासना असल्यामुळे काही व्यतींच्या मनावर अधिक दबाव असल्यासारखे वाटते, त्यांनी ते अनैसर्गिक आहे असे समजण्याचे कारण नाही त्यांच्यामध्ये क्रियात्मक शती अत्यधिक असल्याचे ते दर्शकचिन्ह असून त्या शतीला शुध्द स्वरूप देता येते किवां तिचा उपयोग अत्यंत कायदेशीर मार्गांनी करता येतो आपण सतत वासनेच्या मोहाशी युध्द करीत रहावे अशी परमेश्वराची इच्छा नाही विचारोन अथवा कृतीने लैंगिक गोष्टी करावयास भाग पाडणाऱ्या आपल्या शारीरिक शतींना त्याला महिमा प्राप्त होईल आणि इतर माणसांना त्याचा उपयोग होईल असे वळण देण्याची परमेराची इच्छा आहे
म्हणून प्रत्येक ख्रिस्ती तरूण पुरूषाने रोज आपले शरीर दैनिक कार्यक्रमामध्ये गुंतवून इेवले पाहिजे निरर्थक गप्पा मारण्यात वेळ दवडण्यापेक्षा फावल्या वेळात त्याने गंभीरपणे पवित्रशास्त्राचे अध्ययन व प्रार्थना केली पाहिजे ( त्यमाुळे त्याच्या मनाला चांगला व्यायाम मिळेल) दिवसाच्या अखेरीस त्याने पुष्कळसे कार्य केले आहे असे त्याला आढळून येईल, एवढेच नव्हे तर तो इतका थकून गेलेला असेल की बिछान्यावर पडल्याबरोबर तो झोपी जाईल रात्रीच्या वेळी अंथरूणावर पडल्या पडल्या वैषयिक विचाराने आणि हस्तमैथुन करण्याच्या मोहाने पछाडण्यापेक्षा आपण गोड निद्रेच्या अधीन होत आहो असे त्याला आढळेल पवित्रशास्त्र आपल्याला सांगते की,
कष्ट करणारा त्याची निद्रा गोड असते (उपदे ५:१२)
आम्ही आमचा आहार आणि झोप या साधारण गोष्टींमध्ये स्वत:ला शिस्त लावून घेतली, तर कामवासना नियंत्रित करण्याचे काम अधिक सोपे होऊ शकेल या दोन गोष्टींच्या बाबतीत स्वत:ला केव्हाही शिस्त न लावल्यामुळे पुष्कळ लोक लैंगिक बाबतींत पराभूत होतात आवश्यकतेपेक्षा अधिक खाणे आणि कामवासना उत्तेजित होणे यांचा फार निकटचा संबंध आहे
गर्व, अन्नाची विपुलता व ऐषाराम (यहे१६:४९)
यामुळे प्राचीन काळी सदोम शहरामध्ये लैंगिक, कामविषयक पापे अधिक वाढली होती जे आपल्या लैंगिक वासनांच्या आहारी गेले आहेत, त्यांनी आपल्या आहारविषयीच्या सवयींवर निर्बंध घालून उपवास करावा व अंत:करणपूर्वक परमेराची प्रार्थना करून त्याचा शोध करावा म्हणजे त्यांना अगदी लवकरच मुती मिळेल
या सर्वाहून आपण प्रत्येक क्षणी परमेराची समक्षता प्राप्त करण्याची सवय लावायला पाहिजे परमेर नेहमीच आपल्याबरोबर असतो आणि आपल्या हालचाली पाहात असतो या गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे जर एखादा विासणारा आमचे निरीक्षण करीत असेल तर अर्थात आम्ही केव्हाही हस्तमैथुन करणार नाही मग परमेराची कितीतरी अधिक भीती आपणांस वाटली पाहिजे !
सर्वतोपरी प्रयत्न करूनही एखादे विशिष्ट वेळी तुम्हांला हा मोह टाळता आला नाही, तर ताबडतोब दुसऱ्या व्यतीचा विशेषत: विासणाऱ्या व्यतीचा सहवास संपादन करणे ही उत्तम गोष्ट होय विजयी होण्यास ती तुम्हांला बलशाली करील
स्त्री आणि पुरूष यांच्यामधील पहिला शारीरिक संभोग त्यांच्यामध्ये एक गूढ नाते निर्माण करतो आणि तेव्हाच विवाहाची पूर्णता होते जो कसबिणीशी जडला तो व ती एक शरीर आहेत, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एकदेह होतील असे तो म्हणतो (१ करिंथ ६:१६), असे पवित्र शास्त्र सांगते जुन्या करारामध्ये स्त्री आणि पुरूष यांच्यातील शारीरिक संभोगाला जाणणे असे म्हटले आहे संभोग म्हणजे केवळ शारीरिक परिणाम असलेले कार्य नव्हे तो अगदी सहजगत्या विसरून जाण्यासारखीही गोष्ट नाही तो संबंध दोघांना एका गूढ मार्गाने एक करतो म्हणूनच परमेरोन अनियमित संभोग करण्याच्या मार्गामध्ये पुष्कळशा अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत परमा आणि गरमी यासारख्या दोन भयानक गुप्तरोगांची नावे सांगितली तरी पुरे ! पवित्रशास्त्र म्हणते की, जारकर्मी व व्यभिचारी हयांचा न्याय देव करील (इब्री१३:४)
तरूण पुरूष साधारणपणे कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीशिवाय संधी साधून सौख्य मिळविण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच वैवाहिक जीवनाची जबाबदारी टाळून शारीरिक समागमाचे सुख उपभोगण्याचा मोह त्यांना होतो जे पुरूष लैंगिक गोष्टी अशा अवनतीस नेतात त्यांनी त्यांच्या जीवनात देवाचा शाप आणि शिक्षा याखेरीज दुसऱ्या कशाचीही अपेक्षा करू नये
तरूण पुरूषांना त्यांचे जगिक, भ्रष्ट असे मित्र आपले पुरूषत्त्व सिध्द करण्यासाठी संभोगाचा मार्ग अवलंबन करण्याचे आव्हान देतात जर त्यांनी एखाद्या तरूणीशी संबंध असल्याचे किंवा संभोगाविषयी आपल्या धाडसी कृत्यांचे अनुभव सांगितले नाही, तर त्यांचा उपहास करतात तथापि खरे पुरूषत्त्व लैंगिक स्वातंत्र्यात नसून स्वत:वर ताबा ठेवण्यात आहे आपल्या उच्छृंखल भावनांमुळे अंशत: पथभ्रष्ट झालेल्या दाविदाचे उदाहरण पवित्र शास्त्रात सांगितले आहे त्याच्या पतनाला कारणीभूत ठरलेली परिस्थिती लक्षात घ्या २ शमु ११:१, २ मध्ये लिहिले आहे की ज्या वेळी त्याने युध्दभूमीवर असायला हवे होते त्यावेळी आळशीपणाने दावीद घरीच राहिला आपल्या कर्तव्याला टाळून त्याने आळस आणि आरामाचा मार्ग पत्करला मग त्याने बथशेबाला पाहिले आपल्या नजरेवर ताबा ठेवण्याऐवजी तो तिच्याकडे पाहात राहिला आणि त्यामुळे पापात पडला
अनियंत्रित वासनांमुळे पूर्णत: नाश पावलेल्या शमशोनाबद्दल आपण पवित्र शास्त्रात वाचतो (शास्ते १४ व १६) जेव्हा त्याने सुंदर स्त्रिया पाहिल्या तेव्हा परमेराचा सेवक म्हणून त्याला झालेले पाचारण तो विसरला आणि त्यामुळे आपल्या सेवेला पारखा झाला पुष्कळ लोक शमशोनाप्रमाणेच पतित झाले आहेत आणि त्यांच्या सेवेला पारखे झाले आहेत तसेच आपण योसेफाबद्दल वाचतो त्याला दाविदाप्रमाणे ऐषाराम व उच्चपद प्राप्त झाले नव्हते, किंवा शमशोनाला झाले होते तसे त्याला देवाच्या सेवेसाठी पाचारण झाले नव्हते, तरीही त्याने कामवासनेवर संपूर्णपणे विजय मिळविला प्रत्येक तरूण माणसाने उत्पत्तीचा ३९ वा अध्याय वाचावा व त्याचे मनन करावे कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना नसताना अचानक एके दिवशी योसेफासमोर मोह कसा येऊन ठेपला ते आपण ७ व्या वचनात पाहतो त्याचप्रमाणे तो आपल्यापुढेही येईल आपण त्यापूर्वीच तयारीत नसलो तर नकीच मोहपाशात पडू योसेफ आपल्या खाजगी आयुष्यात विषयवासनेत गुंग होणारा असता तर तो नकीच मोहात पडला असता परंतु योसेफला परमेराची समक्षता अनुभवण्याची सवय होती त्यामुळे मोहाचा क्षण आला तेवहा दुसऱ्या कोणाच्याही उपस्थितीपेक्षा परमेराची उपस्थिती त्याला विशेष जाणवली योसेफाची आध्यात्मिकता वरपांगी, केवळ दुसऱ्यांवर प्रभाव पाडणारी असती आणि ती खरी व गाढ अशी नसती, तर अशा जबरदस्त मोहाला तो नकीच बळी पडला असता
आपण सापडले जाऊ किंवा आपल्याला शिक्षा होईल या भीतीने नव्हे तर केवळ परमेराच्या भीतीने योसेफ पापात पडण्यापासून वाचला (वचन ९) हेहल लक्षात घ्या! अरेरे! वरील दोन गोष्टींच्याच भीतीमुळे आजकाल पुष्कळसे लोक पापापासून मागे हटतात आपल्या काळातील पुष्कळशा लोकांचे असते तसे दिखाऊ नाते नव्हे, तर योसेफाचे परमेराशी अत्यंत निकटचे नाते होते
पोटीफरच्या पत्नीने योसेफाला पापात पाडण्यासाठी वारंवार केलेल्या प्रयत्नांना त्याने विरोध केल्याचे आपण वाचतो (वचन १०) त्याने पहिल्या वेळेला नकार दिला त्यामुळे दुसऱ्या वेळेस नकार देणे त्याला सोपे गेले आणि तिसऱ्या वेळेस त्यापेक्षा अधिक सोपे गेले एका गीतामध्ये म्हटले आहे: मोहाला शरण जाऊ नका, शरण जाणे म्हणजे पाप प्रत्येक विजय तुम्हांला दुसऱ्याला जिंकण्यास सहाय्य करील १० वे वचन आपल्याला सांगते की, योसेफाने पोटीफरच्या पत्नीचा सहवास पूर्णपणे टाळला मोहाचे दृश्यच शय होईल तिथे टाळणे हा सर्वदा सुरक्षित उपाय आहे
विरूध्दलिंगी व्यत्शीी असलेल्या आपल्या संबंधाबद्दल आपण सावध असले पाहिजे असा इशारा आपल्याला योसेफाचे उदाहरण देते केवळ सुंदर, आकर्षक तरूणीच्या सहवासातच सावधगिरी बाळगली पाहिजे असे नव्हे, तर अनाकर्षक तरूणींकडूनही मोह निर्माण होऊ शकतो त्यांच्यापैकी काहींना आपल्या सौंदयाच्या उणिवेबद्दल जाणीव असते, आणि पुरूषांना त्यांच्या शरीराला स्पर्श करण्याचे अधिक स्वातंत्र्य देऊन त्या ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतात
पवित्रशास्त्र आपल्याला हा इशारा देते: जारकर्मीच्या प्रसंगापासून पळ काढा जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करितो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करितो तुमचे शरीर, तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय ? आणि तुम्ही स्वत:चे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, हयास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा (१ करिंथ, ६:१८२०) तसेच तरूणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुध्द मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्त्व, विास, प्रीती, शांती हयांच्या पाठीस लाग (२ तीमथ्य २:२२), असेही सांगितले आहे
योसेफाने तेच केले त्याने निंदा किंवा तुरंगवास यांची पर्वा केली नाही, परंतु त्याने कामवासनेला शरण जाण्यास नकार दिला देवाने त्याचा सन्मान केला यात काहीच आश्चर्य नाही कदाचित पुष्कळशा तरूण लोकांचे या क्षेत्रात पतन झाल्यामुळेच परमेर आज त्यांचा सन्मान करीत नसावा
समलिंगी संभोगाची प्रवृत्ती म्हणजे सारख्याच लिंगाच्या व्यतींमधील कामाकर्षण लोटाच्या काळात परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा न्याय ज्या पापांबद्दल केला त्यापैकी हेही एक पाप होते लेबीय १८:२२ व १ करिंथ ६:९१० या वचनांमध्ये त्याची स्पष्ट शब्दात निर्भर्त्सना केली आहे जे अशा प्रकारे समलिंगी संभोगाच्या प्रवृत्तीसबळी पडतात त्यांना पवित्रशास्त्र ताकीद देते की, त्यांना आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी मिळेल (रोम १:२६,२७) जे कोणी अशा प्रकारचा अस्वाभाविक व्यवहार करतील त्यांना जुन्या करारामधील नियमात कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता मृत्यूची शिक्षा सांगण्यात आली होती (लेबीय २०:१३) विासणाऱ्या प्रत्येकाला समलिंगा संभोगाच्या प्रवृत्तीपासून तर दूर रहायलाच हवे पण समलिंगी व्यतीशी अस्वाभाविक प्रेम करण्यापासूनही दूर रहायलाच हवे अशा प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या मायाजालात अडकण्यापासून त्याने स्वत:ला सावरायला हवे जर तुम्ही या घातक सवयीच्या आहारी गेला असाल, तर त्यातून सुटका होण्यासाठी आणि विरूध्द लिंगाच्या व्यतीशी कायदेशीर व नैसर्गिक संबंध यावा म्हणून कळकळीने परमेराकडे सहाय्य मागा एखाद्या वृध्द, जाणत्या विासणाऱ्या व्यतीचा सल्ला आणि प्रार्थनेची मदत तुम्ही घेतली, तर त्यांचाही तुम्हाला फायदा होईल
या काळात लैंगिक क्षेत्रात आपल्याला अनेक प्रकारच्या मोहांना तोंड द्यावे लागते सैतान हा गर्जना करीत सर्वनाशासाठी टपलेला सिंह आणि फसवणारा धूर्त सर्प असल्याचे वर्णन पवित्र शास्त्रामध्ये केलेले आहे तरूण लोकांना जाळयात पकडून त्यांच्या जीवनाचा नाश करायला लैंगिक क्षेत्र अत्यंत सुलभ आहे हे त्याला माहीत आहे आपण आत्मसंयमी आणि नेहमीच सावध असणे यातच आपली सुरक्षितता आहे, कारण या क्षेत्रातही सतत सावध असणे ही स्वातंत्र्याची किंमत आहे हे तत्त्व अगदी खरे आहे
शत्रूच्या जाळयापासून आपण वाचावे यासाठीच परमेराच्या आज्ञांची योजना करण्यात आली आहे परमेश्वराने त्याच्या वचनाद्वारे विशेषत: नीतिसूत्रांमध्ये आपल्याला पुष्कळ सूचना, ताकीद देऊन ठेवली आहे प्रत्येक तरूण व्यतीने या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे काही विश्वासणाऱ्यांना नीतिसूत्रांतील एक अध्याय रोज, याप्रमाणे महिन्यात संपूर्ण नीतिसूत्रे वाचण्याची उत्कृष्ट सवय आहे शत्रूच्या आक्रमण हालचालींबद्दल आपल्याला ते अगोदरच सावध करते आपण विजय संपादन करण्याचा निश्चय केला आहे, तर आपणाला युध्दाला अवश्य तोंड द्यावे लागेल परंतु आपल्याला हार खावयाची नाही जर आपले अगोदरच पतन झालेले असेल, तर मग परमेरासमोर आपण पापकबुली दिली पाहिजे आपली क्षमा करणारा आणि आपल्या पूर्वीच्या गैरकृत्यांपासून व अशुध्द विचारांपासून आपल्याला शुध्द करणारा तो विसनीय परमेर आहे जे कोणी पापात खोलवर गुंतले आहेत त्यांची क्षमा करण्यात आली तरी कदाचित त्यांना त्याचे परिणाम भोगत आपले जीवन कंठावे लागेल परंतु जर अजूनही आपण त्यात पडलेलो नाही, तर आपण सावध राहू या, कारण पवित्र शास्त्र सांगते की, आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे(१करिंथ १०:१२)
आपणांस विजयाप्रत नेण्यासाठी सर्वदा आपले नेतृत्व करावे अशी देवाची इच्छा आहे (१ करिंथ२:१४पहा) आपल्या जीवनात त्याने तसे नेतृत्व करावे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू या!
विरूध्द लिंगी व्यतीशी सहवास, मैत्री आणि तिचे कौतुक करण्याची भावना आपल्या प्रत्येकामध्ये असते समलिंगी व्यतीपेक्षा त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा आपण प्रयत्न करतो समलिंगी व्यतीपेक्षा विरूध्द लिंगी व्यतीकडून उपेक्षा झाल्यास आपण अधिक निराश होतो जो कोणी अशा प्रकारच्या भावनांच्या अस्तित्वाला नकार देतो तो एकतर समलिंगी संभोग प्रवृत्तीचा असला पाहिजे किंवा लबाड तरी असला पाहिजे !
सर्वसाधारणपणे किशोरावस्थेत प्रवेश करताच (मुलांच्या बाबतीत १४ ते १६ या वयाच्या दरम्यान आणि मुलींच्या बाबतीत १२ ते १४ च्या दरम्यान) विरूध्द लिंगी व्यत्बीद्दलच्या भावनेत बदल होण्यास सुरूवात होते या वयोमर्यादेपूर्वी मुले मुलांची संगत तर मुली मुलींची संगत पसंत करतात परंतु किशोरावस्थेला सुरूवात होताच वूिध्द लिंगाबद्दलचे आकर्षण प्रत्येक लिंगाच्या व्यतींमध्ये आकार घेते अर्थात हे मान्य करायला प्रत्येकजण जरा आढेवेढे घेईल कोणी आपल्या वेषभूषेकडे किंवा एकंदर व्यतमत्त्वाकडे अधिक लक्ष पुरवू लागणे किंवा विरूध्द लिंग व्यतीच उपस्थितीमध्ये त्या व्यतीचे वागणे अधिक आकर्षक झाल्याचे जाणवणे यामुळे हे आकर्षण सहजपणे प्रकट होते अशा प्रकारचे आकर्षण अत्यंत नैसर्गिक आणि अटळ असते अर्थात असे आकर्षण केव्हाही पापमय नसते
परमेराने स्वत: आमची अशी घडण केली असल्यामुळे आपण विरूध्द लिंगाच्या व्यतींशी नैसर्गिक मैत्री ठेवावी अशी त्याची नकीच अपेक्षा असणार मैत्रीच्या अशा इच्छेचे अस्वाभाविकरीत्या दमन करावे असे परमेराला उपेक्षित नाही परंतु अशा इच्छा नियंत्रित ठेवाव्या व त्या हाताबाहेर जाऊ न देऊन त्यांचा अतिरेक होऊ नये असे मात्र तो सांगतो विरूध्द लिंगी व्यतींशी वाजवीपेक्षा अधिक मैत्री करणे विशेषत: जेव्हा ही मैत्री एकाच व्यतीच्या बाबतीत मर्यादित बनते तेव्हा अर्थातच त्यात अनेक धोके असतात परंतु दुसऱ्या टोकाला जाऊन, त्यांच्याशी संपूर्णपणे संबंध टाळण्यातही तितकेच मोठे धोके आहेत
काही लोक असे आहेत की ते स्वत:ला अती आध्यात्मिक समजतात आणि विरूध्दलिंगी व्यतीशी संभाषण करणेही टाळतात त्यांचे असे वागणे हे अर्थातच ते आध्यात्मिक वृत्तीचे असल्याचे दर्शवती नाही, तर ते अनैसर्गिक वृत्तीचे असल्याचेच दर्शविते हा वैवाहिक स्थितीपेक्षा अविवाहित राहणे अधिक आशीर्वादाचे आहे या शिकवणीचाच भाग आहे विरोधी लिंगाच्या व्यतीशी मैत्री ठेवणे हे अनाध्यात्मिक किंवा अधार्मिकतेचे लक्षण आहे, अशा प्रकारचे अधार्मिक शिक्षण केवळ गुप्त पापांकडे नेते पुष्कळसे धार्मिक अविवाहित लोक व्यभिचारी झाले हा त्याचाच पुरावा आहे त्याचप्रमाणे, फत समलिंगी व्यतींमध्ये मिसळणाऱ्या लोकांची मने आणि गुप्त सवयी या दोन्ही लिंगांच्या व्यतींबरोबर नैसर्गिकपणे मिसळणाऱ्या लोकांच्या मनांपेक्षा अधिक पापमय असतात
वर जे काही सांगितले आहे त्याचा अर्थ असा नाही की, विरूध्द लिंगामध्ये अनियंत्रित स्वातंत्र्याला प्रोत्साहन द्यावे, कारण तसे काही करणे एखाद्या व्यतीला व्यभिचाराच्या दुसऱ्या टोकाला नेऊ शकेल विरोधी लिंगाच्या व्यतींमध्ये निरोगी समतोल असावा हेच आम्हाला सांगायचे आहे
या पुस्तकामध्ये डॉ हर्बर्ट ग्रे म्हणतात, मैत्रीच्या क्षेत्रामध्ये स्त्रीपुरूषांचा अगदी विवाहाव्यतिरित देखील येणारा परस्परसंबंध इतका आनंद दायक, प्रेरणादायक,उत्साहवर्धक आणि चिरस्थायी होऊ शकतो की, एखादया अगदी आदरपूर्वक म्हणू शकतो की, मानवजातीला दोन वर्गात विभागण्याची संपूर्ण योजना परमेराच्या समस्त तेजस्वी विचारांपैकी एक आहे काही विशिष्ट अपवाद सोडले तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरूष एकमेकांना पूरक आणि प्रेरक ठरतात तसेच, अन्यथा शय होणार नाहीत अशा जीवनाच्या महान व उत्तम गोष्टी सहकार्याने ते यशस्वी करू शकतात
तरूण पुरूषांनी तरूणींना पूर्ण पावित्र्यामध्ये भगिनी मानायला हवे अशी पवित्रशास्त्राची शिकवण आहे (१ तीमथ्य५:२) दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे दुसऱ्या पुरूषांनी तुमच्या बहिणीशी कशी वागणूक ठेवावी असे तुम्हाला वाटते, तशीच वागणूक तुम्ही इतर मुलींशी ठेवायला हवी हा खरोखरच सर्वदा अवलंबन करण्यासाठी सुरक्षित असा नियम आहे
दोन्ही लिंगांच्या व्यतींनी एकमेकांना सन्मानाने व आदरपूर्वक वागवायला हवे, तसेच स्वत:ला आवश्यक तेवढे भिडस्त व मर्यादाशील ठेवायला हवे विरूध्द लिंगी व्यतीशी आपण केव्हाही अधिक निकट किंवा जिज्ञासू किंवा अगदीच चंचल राहता कामा नये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत भिडस्त राहणे किंवा सावध असणे हे नेहमीच शहाणपणाचे ठरेल त्याचा अर्थ थट्टाविनोदाला तेथे वाव नाही असा मात्र नव्हे दुसऱ्या कोणत्याही वेळेपेक्षा विरूध्दलिंगी व्यतीच्या सहवासामध्ये चंचलतेच्या आहारी जाण्याचा मोह आपल्याला अधिक होतो आणि ते धोयाचे ठरू शकते हे आपण लक्षात ठेवायला हवे
दोन्ही लिंगांच्या व्यतींमधील मैत्री अत्यंत लवकर आणि नकळत जमते,कारण तरूण आपले कतृत्व तर तरूणी आपला आकर्षकपणा दर्शविण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात पुष्कळसे लोक काही गुप्त हेतूंनी मैत्री संपादन करता, म्हणून आपण अत्यंत सावध राहिले पाहिजे ख्रिस्ती तरूणाने केव्हाही विरूध्दलिंगी व्यतींच्या अशतपणाचा गैरफायदा घेऊ नये आणि स्वत: एखाद्या तरूणीबाबत उत्सुक नसतानाही, आपण तिच्याबाबत उत्सुक असल्याची कल्पना तिला देऊ नये कोणाचाही काही अंत:स्थ हेतू नसतानासुध्दा तरूणी कधी कधी असा अर्थ चटकन काढतात प्रत्येक तरूणाने हे लक्षात ठेवले पाहिजे त्यांनी पत्र लिहिणे, किंवा कोणत्याही मुलीला नैमित्तिक निमंत्रण किंवा भेटी देणे टाळले पाहिजे, अन्यथा अशा वागण्यामागील हेतूबद्दल चुकीचा ग्रह होणे शय आहे विरूध्दलिंगी अविवाहित व्यतीकडून वैयतक किंवा अगदी आध्यात्मिक बाबतीतही मदत किंवा सल्ला मागणे किंवा पत्र लिहिणे हे शहाणपणाचे नाही
संभाव्य जीवनसाथी म्हणून आपण विरूध्दलिंगी व्यतीबाबत विचार करूच नये असा याचा अर्थ नाही परंतु विद्यार्थिदशेमध्ये विरूध्द लिंगी व्यतीशी अतिरेकी मैत्री करणे विासणाऱ्यांसाठी खचितच शहाणपणाचे ठरणार नाही विद्यार्थ्याने आपल्या भावना बर्फपेटीमध्ये बंद करून ठेवून आपल्या अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे तरूण पुरूषाने आपले शिक्षण संपेपर्यंत विवाहाचा विचार करू नये, तसेच कोणत्याही परिस्थितीत त्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत व तरूणीने कमीत कमी विसाव्या वर्षापर्यंत विवाहाचा विचार करू नये तोपर्यंत संपूर्णपणे अविचलित राहून त्यांनी आपल्या सर्व फावल्या वेळेमध्ये परमेराच्या कार्याला वाहून घेतले पाहिजे विवाह हा आपल्या सोबत जबाबदाऱ्या घेऊन येतो आणि त्या टाळता येत नाहीत विवाहापूर्वी जशी एखादी व्यती (वेळेच्या दृष्टीने) मोकळी असते तशी ती विवाहोत्तर रहात नाही परंतु पत्नीचा शोध (किंवा पतीचा शोध) आणि विरूध्दलिंगी व्यतीशी विशिष्ट प्रकारची मैत्री ही तर वैवाहिक जीवनापेक्षा अधिक कालहरण करणारी ठरू शकते वर उल्लेखिल्याप्रमाणे विवाहाला विलंब करण्याचे दुसरे कारण म्हणजे शहाणपणाने आपल्या जोडीदाराची निवड करण्यासाठी तरूण लोकांना मानसिक व भावनेची परिपवता येणे आवश्यक आहे, आणि केवळ वयच ती आणू शकते याबाबत आपण पाचव्या प्रकरणामध्ये अधिक विचार करू
विवाहाबाबत जोपर्यंत गांभीर्यपूर्वक विचार केला जात नाही तोपर्यंत विरूध्दलिंगी व्यतीशी घनिष्ठ संबंधी किंवा मैत्री केव्हाही प्रस्थापित करता काम नये तरूण आणि तरूणी (विशेषत: तरूण) यांनी त्यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाबाबत आपण प्रमाणिक आहोत याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे दोन्ही पक्षांमध्ये सर्वदा हेतूंचा अगदी प्रामाणिकपणा असला पाहिजे हा नियम न पाळल्यामुळे कित्येकांच्या जीवनात मानसिक लेश आणि निराशा निर्माण झाली आहे परीक्षेत अनुत्तीर्ण होण्यात आणि ख्रिस्ती साक्ष नष्ट होण्यातही त्याची परिणती झाली आहे पुरूष पुढाकार घेणारा असतो, तर स्त्री आकर्षण करणारी असते तेव्हा दोघांनीही काळजी घेणे आवश्यक आहे
एखाद्या तरूणीशी वाजवीपेक्षा अधिक मोकळेपणाने वागून किंवा तिच्याशी विवाह करण्याचा विचार नसतानाही इतरांना आपला तिच्याशी विवाह करण्याच हेतू असल्याचे भासवून, अगदी सहजपणे तरूण पुरूष त्या तरूणीचे विवाहविषयक भवितव्य धुळीस मिळवू शकतात, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे कदाचित आपल्या भवितव्याचे आणि चारित्र्याचे किंचित किंवा काहीच नुकसान होऊ न देता अशा गोष्टींतून तरूण पुरूष निसटू शकतो परंतु नंतर मुलीकडे मात्र, तिचा काही दोष नसतानाही, साशंक किंवा तुच्छ नजरेने पाहिले जाते अशी वागणूक कोणत्याही ख्रिस्ती तरूणाला शोभत नाही ज्याअर्थी पुरूष पुढाकार घेतो, त्याअर्थी अशा संकटांना टाळण्याची प्राथमिक जबाबदारीही त्याच्यावच पडते दुसऱ्या लोकांच्या चारित्र्याशी आपण केव्हाही खेळता काम नये जे कोणी असे करतात त्यांचा न्याय देव कठोरपणे करील काही वेळा एखादा तरूण कोणाच्याही नकळत गुप्तपणे एखादीशी प्रेमसंंबंध प्रस्थापित करतो अशा प्रकारचे प्रेम जोपर्यंत उघडकीस येत नाही तोपर्यंत वाढतच रहाते परंतु जेव्हा त्याची प्रेयसी दुसऱ्याच कोणाशी तरी विवाहबध्द होते, तेव्हा शेवटी सदर प्रेम प्रकरणात त्याच्या पदरी प्रेमभंग आणि नैराश्य पडते अशा वेळी शय तितया लवकर आपले विचार एखादया प्रौढ विवाहित विासणाऱ्या व्यतीजवळ व्यत करून त्यांचा सल्ला आणि मदत घेणे हे नेहमीच सुज्ञपणाचे ठरते
आता आपण संकेतभेट म्हणजे निश्चित समय ठरवून एकमेकांना भेटणे व निकटस्पर्श या दोन गोष्टींबाबत विचार करू, कारण आजकाल या दोन्हीही गोष्टी भारत देशामध्ये वाढत्या प्रमाणात ाअढळत आहेत संकेतभेट म्हणजे तरूण आणि तरूणीने खाजगीपणे भेटणे व दोघांनीच बाहेर जाणे आणि निकटस्पर्श म्हणजे (संभोगाशिवाय) त्यांचा एकमेकांशी येणारा शारीरिक संबंध अगदी स्पष्टपणे सांगायचे म्हणजे भारतामध्ये कोणत्याही विासणाऱ्याला आपली साक्ष टिकवायची असेल आणि परमेराचया उपयोगी पडण्याची त्याची इच्छा असेल, तर त्याने भिन्नलिंगी व्यतीची संकेतभेट केव्हाही घेऊ नये अगदी त्यांचा विवाह ठरा असला तरीही! तसेच आपल्याहून भिन्न लिंगाच्या व्यतीबरोबर एकटे अन तेही विशेषकरून सूर्यास्तानंतर कोठेही जाणे शयतो टाळले पाहिजे भारतीय संस्कृतीशी सुपरिचित असतील ते याचे कारण चटकन समजू शकतील त्याला कलंक लावण्याची संधी दुसऱ्यांना मिळू नये म्हणून विासणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे
आजूबाजूला असलेल्या पारंपारिक रीतिरिवाजांपासून व संस्कृतीपासून ख्रिस्ताने त्यांना मुत केले असल्याचे काही लोक कदाचित म्हणतील होय, खरे आहे ते! परंतु आपण परमेराच्या वचनानुसार आज्ञापालन करावे म्हणूनच ख्रिस्ताने आपल्याला मुत केले आहे हे लक्षात ठेवले पाहिजे आणि अशा संकेतभेटीगाठी घ्यायला पवित्रशास्त्र काही उत्तेजन देत नाही याबाबत त्यात पूर्ण मौन राखले आहे परमेराचे वचन आणि माणसाच्या रूढी यांचा संघर्ष होतो, तेव्हा आपण अर्थातच परमेराच्या वचनाचे पालन केले पाहिजे परंतु इतर सर्व बाबतीत आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नये (गलती५:१३) अशा वेळी रोम १४:१६ मध्ये सांगितलेल्या नियमानुसार आपण नियंत्रित केले गेले जावे हे वचन असे आहे: हयास्तव तुम्हांला जे उत्तम लाभले आहे त्याची निंदा होऊ नये दुसऱ्या शब्दात हया वचनाचा अर्थ असा: तुम्ही जे करता ते योग्य असल्याचे तुम्हाला ठाऊक असले, तरीही ज्याच्यामुळे तुमच्यावर टीका होईल असे काही करू नका
करिंथकरांस १ ल्या पत्रातील ८ वा अध्याय या दृष्टीने समर्पक असून त्याचा अनुवाद केला व संकेतभेटी घेण्याच्या विषयाला तो लागू केल्यास तो काहीसा पुढीलप्रमाणे वाचता येईल: तरूणी किंवा तरूण यांच्या संकेतभेटी घेण्याच्या विषयाबद्दल आपण आता विचार करू फत आपल्या एकटयालाच खरेखुरे उत्तर माहीत आहे, असा विचार करणे फार सेपे आहे परंतु ज्ञान माणसाला केवळ गर्विष्ठ बनवते, तर प्रेम त्याला देवासारखे बनवते, हे लक्षात ठेवा जो माणूस त्याला सर्व काही ठाऊक आहे असा विचार करतो तो त्यामुळे त्याचे अज्ञानच प्रगट करतो परंतु जो माणूस खरोखर देवावर प्रेम करतो तो एकटाच देवाचा मित्र आहे मग आपण काय करायला हवे? आपण संकेतभेटी घ्याव्यात की नकोत? आपले उद्देश जर अगदीच शुध्द असतील तर भिन्न लिंगाच्या व्यतीबरोबर फिरायला जाणे किंवा हॉटेलात काही खायला जाणे यात काहीच पाप नाही हे आपल्याला ठाऊक आहे परंतु भारतातील सर्वच लोक त्याकडे अशाच दृष्टिकोणातून पाहतील असे नाही संकेतभेटी घेेणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांच्यापैकी पुष्कळाीं आयुष्यभर मानले असेल आपण अशा प्रकारे भेटीगाठी घेतो किंवा नाही या गोष्टींच्या आधारावर परमेर आपली योग्यता ठरवीत नाही, हे लक्षात ठेवा आपण भिन्नलिंगी व्यतीची संकेतभेट घेतो म्हणून आपण चांगले बनत नाही आणि आपण संकेतभेट घेत नाही म्हणून आपण वाईटही ठरत नाही परंतु सावधान, अन्यथा तुमचे संकेतभेटी घेण्याचे स्वातंत्र्य दुसऱ्या ख्रिस्ती (किंवा सत्यशोधक हिंदू) व्यतीसाठी अडखळण व पतनासाठी कारणीभूत होईल जो संकेतभेटी अयोग्य समजतो त्याने समजा तुम्हाला एखाद्या तरूण मुलीबरोबर (अथवा मुलाबरोबर) बाहेर जाताना पाहिले, तर तुमच्या ख्रिस्ती साक्षीबद्दल असलेला तुमच्याबद्दचा आदर तो गमावून बसेल पुढे कदाचित ती व्यतीही भिन्नलिंगी व्यतीच्या संकेतभेटी घ्यायला सुरवात करील, आणि आध्यात्मिकदृष्टया तुमच्याइतकी बळकट नसल्यास पापातही पडेल तेव्हा तुमच्या बंधूच्या आध्यात्मिक पतनासाठी तुम्ही कारणीभूत ठराल जेव्हा तुमच्या अप्रत्यक्ष प्रोत्साहनामुळे दुसरी कोणी व्यती पापात पडते तेव्हा वास्तविक तुम्ही ख्रिस्ताविरूध्द पाप करता म्हणून मी असा निश्चय कला आहे की, जर मी संकेतभेटीसाठी बाहेर जातो आणि यामुळे माझ्या भावाला इजा होण्याची किंवा अडखळण होण्याची काही शयता असेल, तर मी केव्हाही संकेतभेटी घेण्यासाठी बाहेर पडणार नाही, नाहीतर इतरांच्या पतनाला मीच कारणीभूत होईन
जे कोणी संकेतभेटी घेणे चालूच ठेवतील त्यांना स्वत:ला शारीरिक निकटस्पर्शापासून दूर ठेवणे फारच कठीण जाते हातात हात घेण्यापासून सुरू होणारा हा प्रकार मग चुंबन, आलिंगनापर्यंत जातो तरूणीपेक्षा तरूणांमध्ये शारीरिक स्पर्शाची इच्छा अधिक उत्कट असते, कारण कामवासना पुरूषांमध्ये नेहमीच अधिक तीव्र असते पुरूष सहजपणे कामवासनेने उद्दीप्त होतात, आणि एकदा का कामभावना जागृत झाल्या की, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण होऊन बसते
एखाद्या युगुलाने शारीरिक स्पर्शाला प्रारंभ केला की त्याला थांबवणे मग सर्वस्वी अशय होऊन बसते एक पाऊल दुसऱ्याला पुढे जाण्यास गती देईल आणि प्रत्येक वेळी तुम्ही बरोबर असताना, मागील वेळेपेक्षा अधिक सुख संपादण्याची इच्छा तुम्हांला होईल आणि प्रत्येक वेळी तुम्हांला समाधान कमीच लाभल्यासारखे वाटेल शारीरिक स्पर्शासारख्या कामविषयक अनुभवांचा प्रभाव मनुष्याच्या संपूर्ण व्यतमत्त्वावर पडतो त्यांचा परिणाम गंभीर झाल्याखेरीज रहात नाही शारीरिक स्पर्श हा वैवाहिक जीवनातील स्त्रीपुरूष संबंधाचा एक पूर्वभाग आहे आणि म्हणून विवाहापूर्वी तसे करणे हे पाप तर आहेच पण ते शहाणपणाचेही नाही! विवाहपूर्व शारीरिक स्पर्श लैंगिक संबंधाला अत्यंत हीन आणि हलया दर्जाला नेतो आणि त्यामधून भावनासंघर्ष, नैराश्य व आंतरिक खळबळ निर्माण होते त्यामुळे जिथे केव्हातरी प्रेम प्रगट झाले होते तिथे तुच्छता आणि तिटकारा निर्माण होतोतो अगदी सहजगत्या शारीरिक संभोगाप्रत जाण्यास प्रवृत्त करतो तर्कदृष्टया तोच त्याचा शेवट आहे आणि जेव्हा एखादे युगुल काही काळपर्यंत संभोग टाळण्याचा प्रयत्न करते तेव्हा (भावनांच्या आवेगातून मुत होण्यासाठी) हस्तमैथुन करण्याकडे कल जातो आणि विवाहोत्तर शारीरिक संबंधात अनेक समस्या निर्माण होतात निकटस्पर्शाचा परिणाम म्हणून अपराधाची जाणीव आणि पश्चात्तापाची भावना मनामध्ये बराच काळपर्यंत राहू शकते
तरूण आणि तरूणी यांच्यातील मैत्री बऱ्याच वेळा अल्पावधीतच तुटते आणि जर त्यांना निकटस्पर्शाची सवय जडली असेल तर तरूणी ही वेश्येसमान ठरते जेव्हा आपला पुरूष मित्र शारीरिक स्पर्शासाठी आग्रह करतो असे आढळते, तेव्हाच तरूणीने निग्रहाने भावनेला आवर घातला पाहिजे
वर जे काही सांगितले त्यावरून, संकेतभेटीचे पर्यवसान शारीरिक निकटस्पर्शामध्ये होते आणि शारीरिक निकटस्पर्श विविध समस्यांना कारणीभूत ठरू शकतो, हे स्पष्ट होते आपल्या जीवनामध्ये परमेराला गौरव प्राप्त व्हावे अशी इच्छा करणाऱ्या प्रत्येकाच्या बाबतीत संकेतभेटी निषिध्दच मानल्या पाहिजेत आपल्या भोवतालचे लोक जरी तसे वागत असले तरी त्यांचा आदर्श आपण बाळगता काम नये तयांचा शेवट हा नेहमीच निराशा आणि पश्चातापामध्ये होत असल्याने त्यांचा हेवाही करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही परमेराचा आदर करता आणि त्याच्या वचनाद्वारे सांगितलेल्या तत्त्वांचे पालन करता, तर तुम्हांला निश्चितच सर्व तऱ्हेच्या पश्चातापापासून मुत असलेल्या जीवनाची, सार्वकालिक जीवनाची आशा बाळगायला हरकत नाही
प्रेम हा बहुधा पवित्र शास्त्रातील सर्वात सुंदर शब्द असावा पुष्कळांना त्याचा खराखुरा अर्थ समजू न शकल्याने त्याच्या अष्टपैलू सोंदर्याचा लाभ त्यांना केव्हाही झाला नाही परमेराच्या वचनाच्या शिकवणीपेक्षा विसाव्या शतकातील करमणूकप्रधान जगाचा आणि उन्मादक साहित्याचा अधिक प्रभाव पडल्यामुळे पुष्कळशी तरूण जोडपी खऱ्या प्रेमाच्या परिपूर्ण आणि आनंददायक अनुभवाला पारखी झाली आहेत
प्रेमाचा खरा अर्थ न समजल्याने अनेकांची वैवाहिक जीवने उद्ध्वस्त झाली आहेत विरूध्दलिंगी व्यतीच्या सहवासामुळे निर्माण होणाऱ्या उत्तेजनपर भावनेलाच खरे प्रेम असे चुकीने सहसा समजण्यात येते त्याच समजुतीच्या आधाराने विवाह केलेल्यांना लवकरच समजून चुकते की, ज्याला ते प्रेम समजत होते ते प्रेम नव्हतेच तर ते उन्मादक आकर्षण होते
पुष्कळ वेळा असे होते की, एखादा तरूण कोणत्यातरी तरूणीच्या प्रेमात पडतो मग त्याने नुकत्याच पाहिलेल्या चित्रपटाच्या नायकाच्या जागी (किंवा नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाच्या नायकाच्या जागी) आपण स्वत: असल्याची कल्पना करतो तो विचार करू लागतो की त्या तरूणीशी त्याचा विवाह झाला तर ते दोघे सदैव सुखाने राहतील परंतु मागणी आल्यावर विवाहापूर्वी या उन्मादक जोडप्याने रचलेल्या स्वप्नांचा विवाहानंतर चकाचूर होऊन जातो विवाहामुळे त्यांचे डोळे उघडतात आणि वास्तवतेच्या दुनियेत ते येतात जर विवाहापूर्वीचे उन्मादक प्रेम खरोखरच आंधळे असेल, तर विवाह हा त्यांचे डोळे उघडणारा उपाय आहे!
पवित्र शास्त्रामध्ये प्रेम या शब्दाचा उल्लेख कोणत्या अर्थाने केला आहे हे आपण समजावून घेतले पाहिजे, अन्यथा ज्याप्रमाणे लाखो तरूण लोक आणि विवाहित जोडपी आज अपयशाच्या मार्गाने वाटचाल करीत आहेत त्याच मार्गावर आपणही पाऊल टाकू
नवा करार हा मूळ ग्रीक भाषेत लिहिण्यात आला, आणि त्या भाषेत प्रेम या शब्दासाठी चार शब्द आहेत अगापे, फिलिया, स्टॉर्ग आणि इरॉस त्यांपैकी स्टॉर्ग हा शब्द संपूर्णपेण मातापित्यांचे त्यांच्या मुलांवरील व मुलांचे आपल्या मातापित्यांवरी प्रेम यासाठी वापरण्यात येतो आपण इथे दोन विभिन्न लिंगांच्या व्यतीतील प्रेमाचा विचार करीत असल्याने स्टॉर्ग या शब्दाकडे लक्ष न देता आपण दुसऱ्या तीन शब्दांचा विचार करू अगापे, फिलिया आणि इरॉस हे शब्द ज्यांचा संबंध आत्मा, प्राण व शरीर यांच्याशी आहे त्या प्रेमाच्या तीन पायऱ्यांच्या संबंधात वापरण्यात येतात
खालच्या पायरीपासून सुरूवात करायची झाली, तर इरॉस हा शारीरिक वासनांच्या संदर्भात वापरण्यात येतो अत्यंत उन्मादक आणि अनावर वासना अशी त्याची व्याख्या करण्यात येते आणि एका शरीराचा दुसऱ्या शरीराशी होणारा संबंध या प्राथमिक संदर्भात तो वापरण्यात येतो एका व्यतीच्या शारीरिक बाबीने दुसऱ्या व्यतीच्या उत्कट इच्छेची तृप्ती, यावर हे प्रेम आधारलेले असते हे प्रेम सदैव काहीतरी मिळविण्याची अभिलाषा धरते
फिलिया हा दुसरा शब्द आहे ग्रीक भाषेतील प्रेम या अर्थाचा हा सर्वसाधारण शब्द आहे त्याचा उल्लेख आदरपूर्ण प्रेमासाठी आणि मैत्रीतील प्रेमासाठी करण्यात येतो त्यात प्रेमाची जपणूक करण्याची कल्पना आहे विवाहामध्ये दोन जीवांच्या मीलनाच्या संदर्भात तो वापरण्यात येतो हे प्रेम साधारणपणे बौध्दिक व मानसिक दृष्टिकोणातील समानतेवर अवलंबून असते शारीरिक प्रेमापेक्षा अधिक अर्थ त्यात समाविष्ट असतो, तरी ते आत्मकेंद्रित असते कारण आपली गरज दुसऱ्या व्यतीला आहे किंवा त्या दुसऱ्या गरजू व्यतीचे आपण सहायक किंवा संरक्षक आहोत हया भावनेच्या समाधानातून ते उगम पावलेले असते
तिसरा शब्द, जो प्रेमाच्या अत्युच्च पातळीबाबत सांगतो तो अगापे हा होय पवित्र आत्म्याद्वारे परमेराने आपल्यावर वर्षविलेले हे प्रेम आहे (रोम५:५) एखाद्याच्या आत्म्याचा दुसऱ्याच्या आत्म्याशी संयोग होणे, असा याचा अर्थ विवाहाच्या संदर्भात होतो हे प्रेम स्वार्थत्यागी आहे कालवरीच्या क्रूसाचे हे प्रेम आहे!
या पुस्तकात म्हणतात, अगापे ही पादाक्रांत करता न येणारी दया आणि अजिंय अशी सदिच्छा आहे ती केवळ भावनेची लाट नाही, जीवनाच्या निश्चित अशा धोरणामधील तो एक मनाचा निश्चित असा विचार आहे, ते एक विशिष्ट महत्कृत्य आणि भावनेवरील विजय आहे असे प्रेम प्राप्त करण्यासाठी माणसाला सर्वस्व द्यावे लागते ते केवळ त्येच ह्दयच नव्हे तर त्याचे मन व त्याची इच्छाशतीही काबीज करते पवित्र आत्म्याने माणसाचा ताबा घेऊन त्याच्या ह्दयामध्ये देवाचे प्रेम ओतले नाही, तर अशा प्रकारचे प्रेम संपादन करणे माणसाला शय नाही
ग्रीक शब्दकोशामध्ये अगापेबद्दल सांगितले आहे की, ते आपले लक्ष्य निश्चयाने आणि स्वार्थत्यागपूर्ण दयेने निवडते ते प्रेमाचे परिपूर्ण व अत्युच्च स्वरूप आहे त्याचा उगम परमेरामध्ये आहे क्रियापदाच्या रूपात त्याचा अर्थ आपल्या लक्ष्याबाबत दयाळूपणा आणि त्याचा संदर्भ इच्छाशतीचा कल असा लावण्यात येतो
अगापन (अगापेचे क्रियापद रूप) याचा अर्थ असा की, महत्त्व जाणणे, काळजी, आस्था असणे, आनंद करणे व विश्वासू राहणे पती व पत्नी यांच्यामधील अपेक्षित प्रेमाच्या संदर्भात याचा अर्थ असा की, प्रत्येक जोडीदाराने आपल्या जोडीदाराचे मोल अमर्याद मानले पाहिजे, एकमेकांबद्दल त्यांना काळजी वाटली पाहिजे, एकमेकांच्या सहवासात त्यांनी आनंदी व सुखी असले पाहिजे आणि त्यांनी एकमेकांशी विश्वासू असले पाहिजे
पवित्र शास्त्र अगापेची पुढीलप्रमाणे व्याख्या सांगते, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही स्वार्थ पहात नाही चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानिते ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते सर्वांची आशा धरते, सर्वोसंबंधाने धीर धरिते प्रीती कधी खचन नाही संदेश असले तरी ते रद्द होतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, आणि विद्या असली तरी ती रद्द होईल (१ करिंथ १३:४८)
अगापेची दुसरी एक व्याख्या अशी आहे, ते फार सावकाश संशय धरते, पण चटकन विश्वास ठेवते सावशात दोष लावते पण चटकन समर्थन करते,एकदम मन दुखवीत नाही, पण चटकन प्रतिकार करते, उघड करण्यास माघार घेते, पण चटकन पांघरूण घालते, सावकाश शिक्षा करते, पण चटकन सहन करण्यास सरसावते: सावकाश निंदा करते, पण चटकन स्तुती करते, सावकाश मागणी करते पण चटकन देण्यास तयार असते, सावकाश रागाला येते पण चटकन मनधरणी करते, सावकाश अडथळा करते, पण चटकन मदतीला धावते, सावकाश संतापते, पण पटकन क्षमा करते
विûवासणाऱ्या व्यतीच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेमाचे हे सर्व प्रकार असेल पाहिजेत मात्र त्यांचा योग्य क्रम असा असावा: अगापे पहिले, फिलिया दुसरे आणि इरॉस तिसरे १ थेस्सल ५:२३ यातील शिकवणीप्रमाणे हे आहे त्यात आत्मा पहिला, जीव दुसरा व शरीर तिसरे आहे परमेराने जेव्हा मानवाची निर्मिती केली तेव्हा हा अनुक्रम माणसात असावा अशी त्याची इच्छा होती
पतित माणसामध्ये हा क्रम नेमका उलटा असतो त्यामुळे प्रेमाबद्दलचा त्याचा विचारही विकृत बनलेला असतो एका व्यतीच्या वैषयिक मनाचे व शरीराचे दुसऱ्या व्यतीच्या वैषयिक मनाला व शरीराला जे आकर्षण वाटते त्यालाच हे जग प्रेम असे म्हणते ते केवळ फिलिया किंवा इरॉस आहे, आणि दु:खाची गोष्ट ही की, काही वेळा तर ते फत इरॉसच असते परंतु परमेराच्या दृष्टिकोणानुसार जोपर्यंत अगापेचा समावेश होत नाही तोपर्यंत काहीही प्रेम म्हणण्याच्या योग्यतेला पोचत नाही
ख्रिस्तावर विास ठेवणाऱ्या व्यतीला प्रेमात पडण्याचा अधिकार आह का? ते प्रेमात पडणे याच्या अर्थावर किंवा प्रकारावर अवलंबून आहे या जगाची अशी एक धारणा आहे की, प्रेम हा प्रतिकार करता न येण्यासारखी शती असून ती एकाएकी माणसाचा ताबा घेऊन त्याच्यावर अंमल गाजवू लागते यदाकदाचित वर एखादी व्यती प्रेमात पडलीच आणि आपल्या प्रिय व्यतीशी विवाह करू शकली नाही, तर त्या व्यतीला सर्व काळ निदान पुनश्च प्रेमात पडेपर्यंत तरी अत्यंत दु:खात व्यतीत करण्याखेरीज गत्यंतर नसते पुष्कळशी पॉप गीते व चित्रपट हे अशाच विफल प्रेमाचा फिलिया आणि इरॉस याच पातळीवर विचार करते अशा प्रकारे प्रेमात पडणे हे विासणाऱ्या व्यतीसाठी अत्यंत चुकीचे आहे
परमेराच्या मुलासाठी प्रेमाची सुरूवात अगापेच्या पातळीवर व्हायला पाहिजे आणि ते मूलत: आध्यात्मिक आकर्षणावर आधारलेले असले पाहिजे केवळ अशाच प्रेमात त्याने पडले पाहिजे पवित्र आत्म्याच्या सर्वस्वी नियंत्रणाखाली त्याने असे राहिले पाहिजे की, त्याला आपल्या सर्व भावनांवर हुकुमत ठेवता येईल आणि तो त्यांना मोकाट सुटू देणार नाही जीवनातील इतर कोणत्याही बाबीप्रमाणेच प्रेमविषयक गोष्टीतही परमेराच्या आत्म्याकडूनच ख्रिस्ती व्यतीचे मार्गदर्शन झाले पाहिजे परमेराने तुमच्यासाठी निवडलेल्या जीवनाच्या जोडीदाराकडे पवित्र आत्माच तुम्हांला नेईल आणि त्याच एकमेव व्यतीच्या प्रेमात तुम्ही पडाल
मग आपण कितीतरी सावध रहायला हवे! अविासणाऱ्या व्यतीसारखे एका व्यतीच्या प्रेमात पडून काही महिन्यांनंतर किंवा वर्षानंतर आपले विचार बदलून दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडणे आपल्याला योग्य नाही विासणाऱ्याने केव्हाही स्वत:च्या भावनांचे खेळणे बनता कामा नये भावनांमुळे मनुष्याची फसवणूक होऊ शकते म्हणून विासणाऱ्याचे प्रेम त्याच्या भावनेतून नव्हे तर त्याच्या इच्छाशतीतून उद्भवले पाहिजे मनात प्रेमाच्या भावनाच नसाव्या असे मात्र नव्हे, पण प्रेमाच्या इच्छाशतीनंतर त्या उद्भवल्या पाहिजेत परंतु जेव्हा आपल्या स्वत:च्या इच्छा मारून आपण वधस्तंभाला आपल्या जीवनात सतत कार्य करू देतो आणि केवळ परमेराचीच इच्छा स्वीकारतो तेव्हाच हे शय होते
विरूध्दलिंगी व्यतीचे आकर्षण तुम्हाला वाटू लागले की प्रेमभावनांच्या गुुंतवळयात गुप्तपणे सापडण्याआधी तुमच्या स्वाभाविक प्रेमभावनांवर वधस्तंभाला निर्दयपणे काय करू द्यावे यामुळेच देवाची इच्छा अजमावण्यास तुम्हांला मानसिक व आध्यात्म्कि स्थिरता प्राप्त होईल याबाबतीत देवाची इच्छा समजून घेईपर्यंत भावनांच्या गुंतवळयापासून तुम्ही स्वत:ला आवरून धरावे असे न केल्यास तुमची सारासार विचारशती तुमच्या भावनांमुळे दडपली जाऊन शेवटी तुम्ही चुकीच्या मार्गाला लागाल
तुमच्या भावना तुम्हांला नंतर पश्चातापाच्या स्थितीला नेणार नाहीत याबद्दल तुम्ही सावध राहिले पाहिजे एखाद्या व्यतीला (अगदी गुप्तपणेही) जर तुम्ही तुमचे प्रेम दिलेत आणि नंतर जर तुम्हांला कळून चुकले की, ती व्यती तुमच्यासाठी परमेश्वराने निवडलेली नव्हती तर ते अत्यंत दु:खदायक होईल त्या व्यतीपासून स्वत:ला भावनेने अलग करणे अत्यंत कठीण होऊन बसेल अशा प्रकारच्या अनुभवामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि त्याचे विचारही सहजासहजी मनातून जात नाहीत दुसऱ्या कोणाशी जरी तुम्ही विवाह केलात तरी त्या स्मृती वारंवार येत राहतील अपराधाची भावना आणि पश्चाताप यामुळे तुमच्या मनाला लेश होतील व त्यामुळे तुमचे व्यतमत्व दुखावले जाऊन तुमचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होईल
शारीरिक सौंदर्य आणि आकर्षण यामुळे वाहवत जाऊ नये यासाठी विशेषत: तरूणांनी फार काळजी घेतली पाहिजे खरे प्रेम नसेल तर शारीरिक आकर्षणाचा मोह दाबून टाकला पाहिजे जिथे खरे प्रेम असते, तिथे शारीरिक आकर्षण ही प्रमुख बाब कधीच नसते
दुसऱ्या विषयाप्रमाणेच या प्रेमाच्या विषयीही पवित्र शास्त्रांची अशी आशा आहे की, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही (स्वत:) समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने (बदलाने) स्वत:चे (संपूर्णपणे) रूपांतर होऊ द्या (नव्या स्वभावाने तुमच्या मनाचे परिवर्तन होऊ द्या) (रोम १२:२)
प्रणयलुब्धता आणि अमापे प्रेम यांत कमालीचा फरक आहे मग कोणी पृच्छा करील की, मी एखाद्या मुलावर वा मुलीवर खरे प्रेम करीत आहे किंवा मी केवळ प्रणयलुब्ध मोहातच पडलो आहे हे मला कसे समजेल? वेबस्टरचया शब्दकोशात प्रणयलुब्ध या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की, विवेक बुध्दीच्या आवायाबाहेर गेेलेली आणि मूर्खपणाच्या अतिरेकी वासनांनी प्रेरित झालेली मन:स्थिती प्रणयलुब्धता आणि अगापेप्रेम यातील विसंगती एका तरूणीवर प्रणयलुब्ध झालेला प्रकाश आणि एका तरूणीवर खरेखुरे (अगदी अगापे प्रेम) करणारा सुरेश या दोन ख्रिस्ती तरूणांच्या अनुभवांवरून अधिक स्पष्ट होईल पुढे दिलेले उदाहरणे तरूणींच्या बाबतीतही लागू पडणारी आहेत (प्रणयलुब्धता आणि खरे प्रेम यांच्यातील विसंगती पुढील उदाहरणात दर्शविली आहे त्यातील पुष्कळसे मुद्दे ड्वाईट हर्वे स्मॉल यांच्या ‘ऊशीळसप षेी उहीळीींळरप चरीीळरसश‘ वरून घेतले असून मी त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे)
प्रकाश त्या तरूणीला कॉलेजमध्ये भेटला त्याला आकर्षक वाटणारी आणि त्याच्या मते त्याला प्रतिसाद देणारी ती पहिलीच तरूणी होती त्याला तिची फारशी माहिती नव्हती, परंतु एकाएकी त्याला आढळून आले (त्याच्याच शब्दात सांगायचे तर) की, तो तिच्या प्रेमात पडला प्रथमदर्शनी प्रेमाचा तो प्रकार होता अर्थात त्या तरूणीचे शरीरसौंदर्य आणि तिचा आकर्षकपणा आणखी तिच्या त्याच्याशी काही मिळत्याजुळत्या आवडी, या गोष्टी तो तिच्या प्रेमात पडायला प्रामुख्याने कारणीभूत झाल्या शरीरसौंदर्य हा मात्र नि:संशय महत्वाचा भाग होता त्या तरूणीची त्याला अगदी थोडी माहिती होती तरीही त्याने त्याला आवडणारे तिचे काही गुण पाहिले व त्यांची त्याने स्तुती केली त्या गुणांचे अतिरेकी चित्र कल्पून त्याने आपल्या मनामध्ये तिची आदर्श प्रतिमा तयार केली तीच अगदी परिपूर्ण मुलगी असल्याची त्याने कल्पना करून घेतली (जणू काही जगातील दुसरी कोणतीही मुलगी तशी असू शकणार नव्हती) आणि (जरी तिचे दोष इतरांना चटकन दिसत होते तरीही!) त्याने तिच्यामध्ये कसलेही दोष पाहण्याचे टाळले त्याने स्वत:च निर्माण केलेल्या स्वप्नसृष्टीत तो वावरत असे आणि केव्हा केव्हा त्याला हवेत तरंगत चालल्याचाही भास होत असे पूर्ण योग्य अशी तरूणी मिळाली म्हणून आपण जगात उच्च स्थानावर असल्याचे त्याला भासत होते (प्रणयलुब्धता किती आंधळी असते हे तुम्हांला यावरून दिसून येईल) तो तिच्याकडे अनावरपणे आकर्षिला जात असे आणि नेहमीच काही ना काही सबब काढून तिच्याजवळ किंवा तिच्या सान्निध्यात रहात असे तिच्याशिवाय जीवन हा विचारच त्याला अशय वाटत से त्याच्या आणि तिच्यातील फरक आणि न जुळणाऱ्या गोष्टी ज्या चर्चेतून बाहेर पडतील ती चर्चा तो टाळीत असे
ज्या अर्थी ती सर्व दृष्टींनी योग्य अशी तरूणी होती त्या अर्थी आपणही तितकेच योग्य तरूण आहोत हे आपण तिला दाखवून दिले पाहिजे, असे प्रकाशला वाटले मग तो फारच कृत्रिम बनला, आपले जे गुण अत्यंत आकर्षक आहेत अशी त्याची धारणा होती तेच तो प्रकट करू लागला आपण अत्यंत नि:स्वार्थी आणि नम्र आहोत असे दर्शवण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु सखोल विचार केल्यास त्याचे विचार स्वार्थी असून तो स्वत:कडेच केंद्रित झालेला तरूण असल्याचे दिसत होते ही तरूणी जणू त्याच्या ह्दयातील तीव्र उत्कंठा पूर्ण करू शकली म्हणून त्याच्या स्वत:च्या सुखाकरिताच तो तिची अपेक्षा करू लागला ती तरूणी केवळ त्याच्या सुखाचे एक साधन होती तिला खूष कसे ठेवता येईल याचा तो कधी कधी विचार करीत असे, परंतु दुसऱ्या कोणाला खूष ठेवण्याबद्दल त्याने केव्हाही विचार केला नाही जेव्हा तिला तो कॉलेजमधील दुसऱ्या एखाद्या मुलाशी बोलताना पाही, तेव्हा त्याच्या मनात असूया आणि संशय निर्माण होत असे त्याचे वागणे असंयुतक असून तिचे केवळ त्याच्याशीच बोलावे, अगदी इतर मुलींशीदेखील बोल नये, अशी त्याची अपेक्षा असे या सर्वांचे कारण म्हणजे प्रकाश मध्ये असुरक्षिततेची भावना होती, आणि ती लहाणपणी आपलेपणाच्या व प्रेमाच्या अभावाच्या जाणिवेमुळे निर्माण झाली होती त्यामुळे एखाद्या मुलीचे मन जिंकून तिचे आपल्यावरील प्रेम टिकवून धरण्याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये उरला नव्हता आपण तिचा विश्वास संपादन केला नाही व तिच्या प्रेमाच्या निष्ठेस पात्र नाही अशी त्याच्या मनाची डळमळीत स्थिती असल्यामुळेच तो तिची निष्ठा टिकवून धरण्याची अपेक्षा करीत असे
तिच्याशी लवकर विवाह करण्याची देखील तो घाई करू लागला परंतु ती घाई केवळ जोडीदार मिळविण्यासाठी होती कसलाही विलंब त्याला सहन होत नव्हता पैशाचा अभाव, आईवडिलांचे आक्षेप आणि तीव्र सांस्कृतिक भेद या समस्या त्यांच्या विवाहाच्या आड आल्या परंतु प्रेम या सर्वांवर ताण करील असे प्रकाशला वाटल्याने त्याने या सर्व अडचणींकडे डोळेझाक केली चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो, भोळे पुढे जातात आणि हानी पावतात (नीति २२:३) जेव्हा दुसऱ्यांनी त्याला सल्ला देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांचे ऐकण्यास नकार दिला, कारण तो प्रणयलुब्धतेच्या जाळयात गुरफटला होता (अशा अवस्थेत कोणत्याही व्यतीला शहाणपणाच्या गोष्टी ऐकण्यास भाग पाडणे अशय असते)
नंतर एकाएकी काही गैरसमजामुळे प्रकाशमध्ये आणि त्या तरूणीमध्ये मतभेद झाला त्यामुळे तो कमालीचा संतापला आणि एकाएकी त्याने तिच्यामध्ये कधीही न पाहिलेले दोष त्याला दिसू लागले व त्याने तसे तिला सांगितले त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यामुळे तो चटकन वास्तवतेच्या जगात आला त्याला त्या तरूणीचा तिटकारा वाटू लागला आणि अम्नोनने तामारेचा केला तसा तो तिचा द्वेषही करू लागला (२ शमु १३:११७) परंतु त्या तरूणीच्या भावनांची फारशी कदर न केल्यामुळे प्रकाश काही फारसा दु:खी झाला नाही दुसरीकडे गुप्तपणे दुसऱ्या एका तरूणीवर त्याचे लक्ष गेले होते ती त्याला आता अधिक आकर्षक आणि परिपूर्ण वाटू लागली होती
सुरेशच्या बाबतीत, ती तरूणी त्याच्यासाठीच परमेश्वराने निवडलेली आहे असे त्याला वाटण्यापूर्वी बराच काळ अगोदर तो तिला ओळखत होता त्याच्याप्रमाणेच तीही परमेश्वरावर प्रेम करीत होती आणि त्यांचा दृष्टिकोण व आवडीनिवडी अगदी सारख्याच होत्या काही काळपर्यंत त्याने विविध प्रसंगी तिच्या नकळत तिचे अवलोकन केले होते आणि तिच्याबद्दल मिळेल तितकी माहिती त्याने मिळवली होती सुरेशच्या अंत:करणात हळूहळू तिच्याबद्दलचे प्रेम वाढू लागले त्यात कसली घाई, एकाएकी प्रवृत्त झालेली, शीघ्र प्रेमात पडण्याची इच्छा नव्हती साध्या परिचयावरून या अगापे प्रेमामध्ये सावकाश आणि शांतपणे प्रगती होत गेली त्याचे तिच्याबद्दलचे आकर्षण हे तिचे आत्मिक गुण आणि तिचे चारित्र्य यावर मूलत: आधारलेले होते शारीरिक आकर्षणाचाही त्यात भाग होता पण तो फारच थोडा, कारण कोणत्याही सौंदर्यस्पर्धेत पारितोषिक मिळवील अशी काही ती सौंदर्यवती नव्हती दुसऱ्यांना जरी ती सौंदर्यवान वाटली नाही तरी ती तशी असल्याचे सुरेशला वाटलेतिच्यातील केवळ चांगल्याच गोष्टी लक्षात न घेता तिचे वास्तव चित्र मनामध्ये तयार करण्याचा त्याने प्रयत्न केला अर्थात काही प्रमाणात त्यात आदर्शवाद होताच हे खरे, आणि ते अपेक्षितही होते पण जे वास्तव होते त्याची कबुली देण्याइतके धैर्य व प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये निर्माण झाला होता (वासनामय प्रेमासारखे अगापे प्रेम हे आंधळे नसते हे तुम्हांला दिसून येईल)
सुरेशचे हेतू नि:स्वार्थी होते त्याची तिच्याबद्दलची इच्छा अत्यंत शुध्द होती तो समजूतदारपणे वागत होता आणि तिच्याबद्दल सहानुभूतिपूर्वक विचार करीत होता, स्वत:च्या अगोदर तिचे कल्याण पाहात होता केवळ स्वत:च्या सुखासाठी त्याला ती नको होती त्या दोघांनी संयुतपणे परमेश्वराला आनंद द्यावा अशी त्याची प्रथम इच्छा होती व तिला सुखी करावे ही त्याची दुसरी इच्छा होती घेण्यापेक्षा देणे यात धन्यता आहे (प्रेषित २०:३५) तिच्या भल्यासाठी तो आपल्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला तयार होता त्याने तिला स्वत:चे प्रेम अर्पण केले होते आणि तिच्यात असलेल्या गुणांचा विकास व्हावा अशी त्याची इच्छा होती आपल्या स्वत:च्या फायदयासाठी तिचा उपयोग करण्याची त्याची इच्छा नव्हती तिच्या सहवासातही सुरेशचे वागणे अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक असे त्यात कृत्रिमपणा नसे तो अत्यंत प्रामाणिक व सच्चा होता
तो सतत तिचाच विचार करीत नसे त्याला (आणि पुढे त्या दोघांनाही) त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या, आध्यात्मिक आणि ऐहिक गरजा असलेल्या लोकांना कशी मदत करता येईल याचाच तो वारंवार विचार करीत असे त्याने आपल्या सर्व भावनांमध्ये येशू ख्रिस्ताला सर्वोच्च स्थान दिले होते त्या मुलीचे स्थान दुय्यम होते त्याच्या जीवनात परमेश्वराच्या कार्याला अग्रस्थान होते त्या तरूणीला भेटण्याच्या निमित्ताने त्याने परमेश्वराचे कार्य केव्हाही टाळले नाही तिनेही प्रभूला तिच्या जीवनात प्रथम स्थान द्यावे असे त्याला वाटत होते सुरेशला तिच्याबद्दल संपूर्ण विश्वास वाटत होता, त्याच्यात असुरक्षिततेची भीती बिलकुल नव्हती त्याने तिच्याकडे कसलीही मागणी केली नाही, तसेच त्याने तिला केव्हाही अधिकार गाजविणारी किंवा अविचारी वर्तणूक दिली नाही मत्सर किंवा संशय यांना तेथे स्थान नव्हते त्याच्या प्रेमाचे सर्वात मोठे प्रमाण म्हणजे त्याने तिच्या इच्छेचे स्वातंत्र्य केव्हाही हिरावून घेतले नाही तिला नाही म्हणण्याचे स्वातंत्र्यही त्याने दिले होते
जेव्हा परिस्थितीमुळे बराच काळपर्यंत त्यांची भेट होत नसे, तेव्हा त्याचे तिच्याबद्दलचे प्रेम घटले नाहीउलट ते खोल रूजत गेले त्यांच्यापुढे आर्थिक आणि इतर समस्याही उद्भवल्या त्यामुळे त्यांना आपला विवाह बराच काळ पुढे ढकलाचा लागला त्यामुळे काही काळ जरी तो निराश झाला होता, तरीही या साऱ्या गोष्टी परमेश्वराकडून व त्याच्या आज्ञेनुसार होत असून त्यांचा शेवट चांगला होईल असे त्याने स्वीकारले या मधल्या काळामध्ये त्याने धीराने वाट पाहिली आणि विवाहाकरिता स्वत:ची तयारी केली त्याने खर्चाचे अनुमान काढून त्यांच्या सहजीवनाची सर्व तयारी केली या प्रतीक्षेच्या कालावधीमध्ये त्या तरूणीवरील त्याचे प्रेम अधिक दृढ होण्यास मदत झाली, एवढेच नव्हे तर परमेश्वराने त्याच्यासाठी तिचीच निवड केली असल्याची त्याची खात्री पटली तिच्याशी अगदी प्रत्येक बाबतीत तो सहमत होत नव्हता परंतु तिच्यावरील निस्सीम प्रेमामुळे किरकोळ गोष्टींतील मतभेद स्वीकारण्यास तो तयार झाला कारण त्यामुळे त्या दोघांनाही आपापले व्यतत्व प्रगट करणे शय होते असे त्याला वाटू लागले त्या तरूणीवरील सुरेशचे प्रेम हे चिरस्थायी स्वरूपाचे होते दुसऱ्या कोणत्याही तरूणीचा तो विचारही करू शकत नव्हता
या दोन उदाहरणांमध्ये आपल्याला प्रणयलुब्ध प्रेम (प्रेम म्हणून चुकीने उल्लेखलेले ) आणि पवित्र शास्त्रदृष्टया खरेखुरे प्रेम यांच्यातील तीव्र विरोधाभास दिसून येईल जे कोणी उन्मादक प्रेमात पडले असतील त्यांच्यात प्रकाशची काही लक्षणे दिसतील, तरीही ते प्रणयलुब्ध प्रेमच आहे सुरेशची गोष्ट ही खऱ्या आणि योग्य प्रेमिकाचे चित्र आहे दुसरे कोणी अगदी त्याच्याच सारखे नसेल, परंतु शय तेवढी परिपूर्णता हे आपले ध्येय असले पाहिजे त्याहून कमी असे आपले ध्येय नसावे
प्रणयलुब्ध प्रेमाचे काही कालावधीनंतर खऱ्या प्रेमामध्ये परिवर्तन होण्याची शयता आहे परंतु जोपर्यंत अमापे प्रेमाची काही मुख्य लक्षणे त्यात दिसून येत नाहीत, तोपर्यंत त्याला आगापे प्रेम म्हणता येणार नाही
चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून तरूणांनी वासना आणि प्रेम यातील फरक जाणून घेतला पाहिजे वासना काही काळातच उडून जाईल अगापे प्रेम मात्र वैवाहिक जीवनभर राहील आणि त्यामुळे प्रत्येक कार्य व कर्तव्य आनंदमय होईल
शलमोनाच्या गीतरत्नामध्ये तीन वेळा दिलेली सूचना प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका, तो राहील तितका वेळ राहू द्या (गीत २:७, ३:५, ८:४), ही आपण ह्दयात ठसवली पाहिजे दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे, शीघ्रगतीने मोहजालात फसण्यापेक्षा परमेश्वराकडून प्रेम करण्याच्या योग्य वेळेची प्रतिक्षा करा सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे (नीति ४:२३)
या जगात ख्रिस्ती पतीपत्नी एकमेकांहून अनेक गोष्टींमध्ये भिन्न असतानाही एका सूत्रात बांधले जाण्यासाठी एकत्र येतात, यासारखी स्वर्गीय अशी दुसरी कोणती गोष्ट सुंदर असू शके काय, असा एखाद्याला प्रश्न पडतो परमेश्वराला विवाहापासून अभिप्रेत असलेली विविधतेतील एकता अशा जोडप्यांमध्ये आढळून येते त्यांच्या या एकतेचे रहस्य कोणते असावे ? दुसरीकडे पाहिले तर अनेक वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतरही हजारो जोडपी जीवनात मेळ निर्माण करू शकत नाहीत, एकमेकांना समजू शकत नाहीत त्यातील बऱ्याच लोकांना संधी मिळाली तर ते अविवाहित जीवनाकडे मोठया आनंदाने वळतील परमेश्वराने मानवाच्या सुखासाठी जी विवाहाची स्थिती आशीर्वादित केली आहे, तीच विवाहाची स्थिती या लोकांसाठी दु:खद ठरली आहे विवाह म्हणजे त्यांच्याकरिता या पृथ्वीवरील खरोखरचा नरक बनला आहे ते एकाच छपराखाली एकत्रपणे राहतात, परंत एकमेकांशी कसलेही साम्य नसलेल्या एकाकी व्यतीप्रमाणे! आपल्या मुलांसाठीच ते एकत्र राहतात, किंवा त्यांचा विवाह मोडल्यास समाज त्यांचा तिरस्कार करील म्हणून ते एकत्र राहतात त्यांचे जीवन एक पोकळ बहाणा बनतो या सर्व जोडप्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला ऐय आणि प्रेम यांनीच सुरूवात केलेली असते मग त्यांचे कुठे चुकले ?
वैवाहिक जीवनाबद्दल परमेश्वराच्या शिकवणुकीचे पालन करणे वा न करणे यावरच विवाहाची यशस्विता किंवा शोकान्त अवलंबून आहे परमेश्वर विवाहाकडे ज्या दृष्टीने पाहतो, ती दृष्टी जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही ख्रिस्ती व्यतीने आपला जीवनसाथी शोधण्यास देखील सुरूवात करू नये विवाहाबद्दलची परमेश्वराची योजना आणि हेतू काय आहेत ? आपण त्यासाठी पहिल्या विवाहाकडे वळून पाहू या
उत्पत्ती २:१८२५ मध्ये मानवाच्या इतिहासातील पहिल्या विवाहाचे वर्णन आपण पाहतो तो स्वत: परमेश्वराने आयोजित केला होता उत्पत्ती १:२७ मध्ये जे थोडयात सांगितले आहे, त्योच विस्तृत विवेचन या परिच्छेदामध्ये दिले आहे परमेश्वराने प्रथम फत एकटा पुरूषच निर्माण केला, आणि सहाव्या दिवसापर्यत त्याने जे निर्माण केले ते चांगले (उत्पत्तीच्या १ ल्या अध्यायात देवाने पाहिले की हे चांगले आहे असे पाच वेळा पुन्हा पुन्हा सांगण्यात आल्याची नोंद घ्या) आहे असे त्याला वाटले पण तो आता म्हणतो की, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही (उत्पत्ती २:१८) मिल्टनने म्हटले आहे, एकाकीपणा ही पहिलीच गोष्ट देवाच्या नजरेला चांगली दिसली नाही नंतर परमेश्वराने आदामाची पत्नी आणि मदतनीस म्हणून स्त्रीची निर्मिती केली ते सर्व झाल्यानंतर त्याने आपल्या निर्मितीकडे नजर टाकली आणि त्याने जे पाहिले त्याचे वर्णन करण्यासाठी बहुत चांगले असा सर्वोत्कृष्ट शेरा दिला (उत्पत्ती १:३१) परमेश्वराच्या निर्मितीमध्ये एवढा मोठा फरक विवाहित जोडप्याने घडवून आणला
उत्पत्ती २:१८ मध्ये स्पष्ट सांगितल्याप्रमाणे विवाहाचा प्राथमिक हेतू निर्विवादपणे सहकार्य आणि साहचर्य हा आहे आदामाची कायमची सहचरी म्हणून हव्वेची निर्मिती झाली अनुरूप मदतनीस, मिळतीजुळती, त्याच्यासारखी व त्याला योग्य अशी प्रत्येक बाबतील त्याला पूरक ठरणारी अशी ती निर्माण करण्यात आली परमेश्वराची इच्छा अशी होती की, आदाम आणि हव्वा यांनी नेहमी एकमेकांच्या गरजा जाणून आणि दोघांनीही परमेश्वरावर अवलंबून असल्याची जाणीव ठेवून आपले जीवन कंठावे त्या प्रत्येकाने एकमेकांकरिता आणि दोघांनीही परमेश्वराकरिता जगावे हव्वा आदामाच्या शतीशिवाय आणि आदाम हव्वेच्या मायाळूपणाशिवाय, व दोघेही परमेश्वराशिवाय काही करू शकत नव्हते
अशा सहभागितेमुळे त्यांनी आध्यात्मिक दृृष्टया सशत व्हावे अशी परमेश्वराची योजना होती पवित्र शास्त्र आपल्याला आठवण करून देते की, एकटयापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याची दुर्दशा होते जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल (उपदे४:९१२)
सैतानाने हव्वेला आदामासह असताना नाही तर एकटी असताना मोहात पाडले या घटनेवरून हे सत्य प्रकट होते आदाम व हव्वा यांनी एकत्रपणे सैतानाचा हल्ला परतवला असता एकटेपणी प्रत्येकजण अशय होता (वरील वचनात सांगितल्याप्रमाणे) एकत्रपणे दोघांचीही शती केवळ दोघांच्या एकूण शतीइतकी नव्हे तर मोठया प्रमाणात द्विगुणित झाली असती अशी आध्यात्मिक शती प्रत्येक ख्रिस्ती विवाहित जोडप्याने प्राप्त करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे
परंतु परमेश्वराने देिलेले एकमेकांच्या नात्यातील स्थान जर पती व पत्नी या दोघांनीही ओळखले तरच या शतीचा अनुभव येऊ शकेल जेव्हा विवाहित जोडपे परस्परांचे सहकारी आणि जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार (१ पेत्र३:७) असे राहात नाहीत, तेव्हा ते विवाहाचा मूळ हेतूच केवळ निष्फळ करीत नाहीत, तर सैतानाला प्रवेश करण्यासाठी त्यांच्या जीवनाचे दार सताड उघडे ठेवतात कदाचित आपण हे ऐकले असेल की परमेश्वराने आदामाच्या डोयातून हव्वेला निर्माण केले नाही, कारण तिने माणसावर हुकूमत गाजवावी अशी परमेश्वराची इच्छा नव्हती तसेच त्याने तिला आदामाच्या पायातून काढले नाही कारण ती माणसाची गुलाम व्हावी असेही परमेश्वराला वाटले नाही परंतु त्याने तिला आदामाच्या फासळीपासून काढले कारण ती माणसांची सहचरी व सहाय्यक असावी अशी परमेश्वराची इच्छा होती हव्वा ही आदामाच्या फासळीपासून, त्याच्या ह्दयाच्या जवळून काढण्यात आली, कारण आदामाला नेहमीच तिला (सरंक्षण देऊन) आपल्या बाजूला ठेवण्याचे स्मरण व्हावे आणि (तिच्यावर मायेने प्रेम करून तिचे पालनपोषण करावे) तिला आपल्या ह्दयाशी ठेवावे या सांकेतिक शिकवणुकीत सत्याचा महान अविष्कार आहे
उत्पत्ती २:२१ सांगते की, आदामाची फासळी काढल्यानंतर परमेश्वराने ती जागा मासाने भरून काढली या ठिकाणीही सांकेति शिकवण आहे जेव्हा आदामाची फासळी काढण्यात आली तेव्हा त्याच्यात काही कमतरता निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्यासाठी मांस भरल्याने सकृतदर्शनी ती काही दिसून येत नव्हती तेव्हा हे असे दर्शवते की, त्याच्या आंतरिक जीवनातील पोकळी केवळ हव्वाच भरून काढू शकत होती कारण ती त्या फासळीपासून बनविण्यात आली होती यहूदी शिक्षकांचे म्हणणे आहे की, आपल्या शरीरातील फासळी काढल्यामुळे मनुष्य हा अत्यंत बेचैन असतो आणि स्त्री ही ज्या ठिकाणाहून काढण्यात आली त्या ठिकाणी जाईपर्यत म्हणजे पुरूषाच्या बाहुपाशात जात नाही तोपर्यंत बेचैन असते अशा प्रकारचे नाते पती आणि पत्नीमध्ये असावे अशी परमेश्वराची इच्छा आहे केवळ अशा सहभागितेकडूनच परमेश्वराचे सामर्थ्य प्रगट होईल आणि त्याचे हेतू पूर्ण होतील
नव्या करारामध्ये आपण पाहतो की पतिपत्नीच्या संबंधाबद्दल बोलताना येशू ख्रिस्त आणि (पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला) प्रेषित पौल हे दोघेही उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायातील या परिच्छेदाचा उल्लेख करतात (मत्तय १९:३९, इफिस ५:२२२३) विवाहासंबंधी खरी ख्रिस्ती कल्पना आपणांस समजून घ्यायची असेल,तर उत्पत्तीमधील या परिच्छेदातील शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे
उत्पत्ती १:२८ मध्ये नवपरिणीत जोडप्यासाठी परमेश्वराच्या पहिल्या शब्दात आपण विवाहाचा दुसरा हेतू पाहतो त्यांनी फलद्रूप व्हायला हवे होते संतती आणि घराची स्थापना हे परमेश्वराने विवाह संस्थापित करण्याचे दुसरे कारण होय त्यासाठी परमेश्वराने प्राथमिकरीत्या लैंगिक भावना निर्माण केली
गृह हे परमेश्वराच्या उपासनेचे आणि सेवेचे केंद्र असावे यावर पवित्रशास्त्राने खूप जोर दिला आहे परमेश्वराच्या नेतृत्वाखाली चालणारे गृह ही परमेश्वराला गौरव प्राप्त करून देणारी गोष्ट आहे केवळ आपली ह्दये आनंदाने भरून जावीत म्हणून परमेश्वर आपल्याला मुले देत नाही, तर त्याच्या भयामध्ये आपण त्यांची वाढ करावी आणि त्यामुळे त्यांच्या पिढीतही त्यांनी त्याचे विश्वासू साक्षीदार व्हावे, असाही त्यात हेतू आहे पवित्र शास्त्रामध्ये पुन: पुन्हा हया विचारावर भर दिला आहे (स्तोत्र ७८:५७)
परमेश्वराला गौरव प्राप्त करून देणारे, त्याच्या विश्वासूपणाची आणि तो आपली काळजी घेतो याबद्दलची साक्ष देणारे गृह उभारणे यासाठी प्रत्येक विवाहित ख्रिस्ती जोडप्याला पाचारण आहे मनुष्याला देता येण्यासारख्या कोणत्याही उपदेशापैकी सर्वात प्रभावशाली उपदेश म्हणजे परमेश्वराच्या मार्गात चालणारी मुले होत याला परमेश्वर किती महत्त्व देतो त्याचे चांगले उदाहरण म्हणजे आपल्या मुलांना परमेश्वराच्या मार्गात वाढवणाऱ्या अब्राहमाला त्याने दिलेला आशीर्वाद आणि तसे न करणाऱ्या एलीला त्याने दिलेला शाप (उत्पत्ती १८:१९, १ शमु ३:१३,१४) याचे महत्त्व नव्या करारातही शिकवण्यात आले आहे इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात मंडळी हे ख्रिस्ताचे शरीर आहे याचे गूढ उकलल्यानंतर (अध्याय १ ते ३), पौल पुढे म्हणतो की या सत्याचा व्यावहारिक प्रत्यय ख्रिस्ती गृहातील घरगुती नात्यातून पती व पत्नी यांच्यामध्ये पालक व मुले यांच्यामधये, धनी व चाकर यांच्यामध्ये दिसला पाहिजे (अध्याय ५:२२ ते ६:९) स्थानिक मंडळीबद्दल त्याने चकार शब्दही काढला नाही परमेश्वराच्या दृष्टीने ख्रिस्ती गृहाची साक्ष प्रथमत: महत्त्वाची आहे हे त्यावरून दिसून येते स्थानिक मंडळीतील गृहातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढले तर स्थानिक मंडळीही शतमान होऊ शकेल जेव्हा त्या घरातून आध्यात्मिक वातावरणाचा अभाव निर्माण होतो तेव्हा स्थानिक मंडळीचा नाश संभवतो
सैतान आपले भयाण आक्रमण याच आघाडीवर करीत राहणार अशी अपेक्षा करणे स्थाभावकि आहे परमेश्वराने स्थापन केलेल्या पहिल्या घरात सैतानाने मत्सर, द्वेष आणि खून आणला (उत्पत्ती ४:८) तेव्हापासून त्याने आजपयृंत एकाही धार्मिक घराला सोडले नाही म्हणून इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात आध्यात्मिक युध्दाचा विभाग ख्रिस्ती गृहाबद्दलच्या विवेचनानंतर लगेच आला आहे (अध्याय ६:१०१८) धार्मिकतेचे गृह बांधण्यासाठी आपण करीत असलेल्या प्रत्येक प्रयत्नाला सैतान विरोध करील असे आपणांस सूचित करण्यात आले आहे परंतु आपणांस असेही सांगण्यात आले आहे की, परमेश्वराने दिलेली शस्त्रसामग्री धारण केल्यास आपण शत्रूचे सर्व हल्ले परतवून लावू शकू
परमेश्वराचे गौरव करणारे गृह स्थापन करणे हा निर्विवादपणे विवाहाच्या उद्देशांपैकी एक उद्देश आहे
फलद्रुप व्हा (उत्पत्ती १:२८) या आज्ञेचा लक्ष्यार्थ असा आहे की, आदाम आणि हव्वा यांचा लैंगिक समागम व्हायला हवा होता हया परमेश्वरनियोजित विवाहापासून पुरूष आणि स्त्री या दोघांच्याही लैंगिक वासनांची पूर्ती होते विवाहाचा हा तिसरा हेतू आहे
केवळ शारीरिक समाधान व सौख्य यांहून विवाहोत्तर लैंगिक साफल्याचे महत्त्व अधिक आहे विवाहात केवळ तीच एक बाब असती तर मग माणूस पशूपेक्षा श्रेष्ठ ठरला नसता त्यातील शारीरिक बाब ही पवित्र शास्त्राने तिरस्कारणीय मानली नाही आपण पहिल्या प्रकरणात पाहिलेच आहे की, लैंगिक भावना परमेश्वराने निर्माण केल्या असून त्या पवित्र व शुध्द आहेत परंतु पती आणि पत्नी यांच्यातील लैंगिक समागाम हया त्यांच्यात आधीपासून असलेल्या आंतरिक ऐयाचा प्रतिकात्मक उच्च क्षण व त्याचेच व्यत स्वरूप असा असला पाहिजे त्यांना एकमेकांबद्दल असलेल्या अगापे प्रेमाचे ते शारीरिक व्यत स्वरूप असले पाहिजे सहजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, परस्परांकरिता त्यागमय सेवेत स्वत:ला वाहून देण्याची इच्छा व्यत करण्याची पवित्र वेदी, असे पतिपत्नीच विवाह शय्यचे स्वरूप असले पाहिजे
वैवाहिक जीवनातील लैंगिक प्रेमाचा पवित्रशास्त्र गौरव करते दोन प्रेमिकांची कहाणी विशद करणारे एक संपूर्ण पुस्तक शलमोनाने रचलेले गीतरत्नत्यात आहे त्यात नवऱ्यांना त्यांच्या पत्नीशी लैंगिक समाधान पावण्याबद्दल उत्तेजन दिले असून त्यांच्या प्रेमाने आनंदित होण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली आहे (नीति ५:१८,२९, १ करिंथ ८:५ पाहा) त्यांत पापमय असे काहीच नाही ते कायदेशीर आणि योग्य आहे पुष्कळ लोकांच्या मनांमध्ये लैंगिक भावनांबद्दल कलुषित कल्पना असतात त्यामुळे परमेश्वर त्याच्या वचनामध्ये त्याबाबत उल्लेख करण्याची परवानगी कशी देऊ शकतो हे त्यांना समजत नाही (अंत:करण आणि विवेक यांच्या दृष्टींनी) शुध्द जनांस सर्व काही शुध्द आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे हयांना काहीच शुध्द नाही, त्यांची बुध्दी व विवेकभाव ही विटाळलेली आहेत (तीत १:५) जर आपली अंत:करणे अजूनही वैषयिक असतील तर जिथे मलीनता नाही तिथे ती आपल्या नजरेस पडेल मग तर आपणांला परेश्वराने त्याच्या वचनात लिहिलेल्या गोष्टीसुध्दा अशुध्द आहे असे वाटेल ! परंतु पवित्र आत्म्याने आमची अंत:करणे नवीन झाली म्हणजे लैंगिक भावनेकडे परमेश्वर ज्या दृष्टीने पाहतो याच दृष्टीन पाहण्यास आपण सुरूवात करू विवाहोत्तर लैंगिक साफल्य हे खरोखरच पवित्र आणि योग्य असे आहे हे मग आपल्याला पटेल
जगात पापाने प्रवेश करण्यापूर्वी एदेन बागेत आदाम व हव्वा यांना एकमेकांमध्ये लैंगिक समाधान पावावयाचे होते पवित्र शास्त्र सांगते की पापाच्या प्रवेशामुळे आता विवाह ही एक अधिकच आवश्यक बाब झाली आहे (कदाचित पुरूषांना ते अधिक लागू पडेल), कारण अविवाहित पुरूष हा सहजासहजी लैंगिक पातकात पडण्याची शयता असते (१ करिंथ ७:२,५) अतृप्त वासनांमुळे सतत यातना होण्यापेक्षा पुरूषांनी विवाह करावा असे पवित्र शास्त्र सांगते, कारण पुरूषांनी व स्त्रियांनी आपल्या लैंगिक वासना पूर्ण करण्याचा, विवाह हाच एक ईश्वरयुत मार्ग आहे (१ करिंथ ७:९)
पवित्र शास्त्रातील गौरवी प्रकटीकरणांपैकी एक हे आहे की, पतिपत्नीमधील नाते हे ख्रिस्त आणि मंडळी यांच्यातील नात्याचे प्रतीकात्मक रूप आहे (इफिस५:२२२३) इफिसकरांस पत्राच्या या परिच्छेदात पत्नींना सांगण्यात आले आहे की, त्यांनी स्वत:ला पतींच्या अधीन करावे कारण पती हा परमेश्वराचे पत्नीचे मस्तक असा नेमलेला आहे पत्नींना अशीही आज्ञा दिलेली आहे की, त्यांनी सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे (मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे) आणि त्यांचा सन्मान व आदर करावा आपल्या काळामध्ये ही पध्दती कदाचित मान्य केलेली नसेल, पण हा परमेश्वराचा नियम आहे ज्या घरामध्ये या नियमाचे उल्लंघन होईल त्याला या आज्ञाभंगाच्या परिणामाला या ना त्या मार्गाने तोंड द्यावे लागेल ज्या ख्रिस्ती तरूणीला परमेश्वराच्या या आज्ञांचे वैवाहिक जीवनामध्ये पालन करावयाचे नसेल तिने केव्हाही विवाह करू नये तिने विवाह करून परमेश्वराच्या आज्ञांचे सतत उल्लंघन करणे यापेक्षा विवाह न करता राहणे हे तिच्यासाठी फार बरे आहे
परंतु कोणत्याही पतीने असा विचार करू नये की, परमेश्वराच्या आज्ञेने त्याला त्याच्या पत्नीकडून अवास्तव मागणी करण्याचा परवाना मिळाला आहे हा परिच्छेद पुढे असे सांगतो की, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि तिच्यासाठी स्वत:चे अर्पण केले तशी आपल्या पत्नीवर पतींनी प्रीती केली पाहिजे याचा अर्थ असा की पतींनी आपल्या पत्नींवर स्वार्थत्यागी बुध्दीने प्रेम केले पाहिजे केवळ काही गोष्टी देऊन नव्हे तर आपल्या पत्नींचे कल्याण व आनंद साधावा म्हणून त्यांनी आपले स्वत:चे जीवन समर्पित केले पाहिजे जसा ख्रिस्त आपल्या मंडळीवर निरंतर प्रेम करतो, तसे सतत, आपल्याला त्या प्रेमाच्या मोबदल्यात काही मिळते किंवा नाही हे न पाहणारे, निरपेक्ष प्रेम आपल्या पत्नीवर करणे हे पतीचे कर्तव्य आहे आणि हेही लक्षात ठेवा ख्रिस्ताने आपल्या शिष्यांवरील प्रेमामुळेच त्यांचे पाय धुतले (योहान १३:१,५) पतींना याच परिच्छेदात पुढे आज्ञापिले आहे की, जसे ते आपल्या शरीरावर प्रेम करतात, तसे त्यांनी आपल्या पत्नींवर प्रेम करावे आपल्या शरीराला जसे ते मुद्दाम दुखवीत नाहीत किंवा दुखापत करीत नाहीत, तसेच त्यांनी आपल्या पत्नीच्या भावना मुद्दाम दुखावता कामा नये त्रास व संकटापासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्याची ते जशी काळजी घेतात तशीच त्यांनी आपल्या पत्नीची काळजी घेऊन त्यांचे संरक्षण केले पाहिजे ज्या पुरूषाला ही पवित्र शास्त्राची शिकवण आचरणात आणण्याची इच्छा नाही त्याने अविवाहितच राहणे बरे
इफिसकरांस पत्रातील या परिच्छेदामध्ये परमेश्वराचा जो हेतू प्रगट झाला तो असा की, प्रत्येक ख्रिस्ती पती आणि पत्नी हे ख्रिस्त आणि मंडळी यांचे छोटेसे प्रतीक असावे त्यांच्या जीवनाद्वारे त्या नात्यातील सौंदर्य प्रगट व्हावे
पवित्र आत्म्याची परिपूर्णता प्रथम घरामधील ख्रिस्तसमान आचरणात व्हावी, हे दर्शविण्याकरतािच पतीपत्नींच्या संबंधाविषयीचा हा परिच्छेद पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याच्या आज्ञेनंतर लागलीच दिला असावा असे दिसते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्याचा अर्थ असा की, वैवाहिक जीवनामध्ये परमेश्वराचे गौरव व्हावे, म्हणून आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे आवश्यक आहे
आपला जीवनाचा जोडीदार शोधण्यापूर्वी प्रत्येक खिस्ती व्यतीने स्वत:ला हा प्रश्न विचारावा: वर वर्णन केल्याप्रमाणे माझे घर असावे अशी माझी खरोखरच इच्छा आहे काय? जर तुमची इच्छा नसेल तर परमेश्वराकडून तुमच्या विवाहाबाबत मार्गदर्शनाची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही पण खरोखरच तुमची अशी महत्त्वकांक्षा असेल, तर परमेश्वर तुमच्या विवाहाच्या बाबतीत तुम्हांला त्याच्या योग्य इच्छेनुसार मार्गदर्शन करील एवढेच नव्हे तर असे घर बनविण्यासाठी तुम्हाला तो शतमान करील, अशी तुम्ही खात्री बाळगू शकता
पवित्रशास्त्र केवळ विवाहाची थोरवीच सांगत नाही, तर अविवाहित अवस्थेचे फायदेही सांगते म्हणून आपण असमतोल आहोत असे समजले जाऊ नये म्हणून हे प्रकरण संपण्यापूर्वी या विषयावर काही लिहिणे आवश्यक आहे
करिंथकराच्या १ ल्या पत्रातील सातव्या अध्यायात पौलाने ब्रह्मचर्याबद्दल
लिहिले आहे त्या अध्यायावरून आणि मत्तय १९:१२ या परमेश्वराच्या वचनावरून काही लोकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, विवाहित अवस्थेपेक्षा अविवाहितावस्था ही अधिक अपेक्षित आणि आध्यात्मिक पाचारणाच्या दृष्टीने उत्तम आहे परंतु पवित्र शास्त्र खरोखरच असे शिकवते काय ?
१ करिंथ ७ वा अध्याय यावर विचार करताना या अध्यायात चार वेळा पौलाने सांगितले आहे की, तो स्वत:चे मत प्रदर्शित करीत आहे आणि तया उल्लेख केलेल्या काही मद्दयांच्या संदर्भात परमेशव्राचे काय म्हणणे आहे हे निश्चित रूपाने त्याला ठाऊक नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे (वचने ६,१२, २५,४० पहा) काही झाले तरी पौल हे स्पष्ट करतो की सर्व पुरूषांनी त्याच्यासारखे अविवाहित राहावे अशी त्याची इच्छा असली, तरी प्रत्येकाला परमेश्वराकडून एक विशिष्ट देणगी मिळालेली असते (वचन ७) त्याने या ठिकाणी देणगी हा शब्द वापरला ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे अविवाहितावस्थेला काही वैशिष्टय दिलेले नाही ते काही महान साध्य नाही किंवा पारितोषिकही नाही, तर देणगी आहे असे तो सुचवतो येशूने असेच शब्द मत्तय १९:११ मध्ये वापरले आहेत तो म्हणतो, अविवाहित जीवन जगण्याची क्षमता काही लोकांना दिलेली असते, ज्यांना परमेश्वराकडून अशा प्रकारचे जीवन जगण्याची क्षमता प्राप्त होते, केवळ त्यांनीच तसे जीवन जगावे हे त्याने अगदी स्पष्ट केले आहे (मत्तय१९:१२) अविवाहित राहणे हा काही खास सद्गुण नाही काही थोडया लोकांना परमेश्वराने यासाठी पाचारण केलेले असते हे मात्र निर्विवाद पंरतु अशिकांश लोकांसाठी त्याने विवाहाचीच योजना केली आहे जर तुम्ही अविवाहित राहावे अशी त्याची इच्छा असेल तर तसे तो तुम्हाला सांगेल अशी खास आज्ञा देवाकडून तुमच्या ह्दयात वैयतकपणे आलेली नसता, तुम्ही विवाह करावा अशी परमेराची इच्छा आहे, असे तुम्ही खुशाल समजावे
ज्यांना असे वाटते की आपण अविवाहित रहावे त्यांनी तसे जीवन निवडण्याच्या कारणांची नीट परीक्षा केली पाहिजे जर आपण एकटेच असावे अशा स्वार्थी इच्छेने किंवा आपण श्रेष्ठ आहोत आणि विरूध्दलिंगी व्यती उपेक्षित आहे अशा विचाराने किंवा तसे राहिल्यासच आध्यात्मिक शुध्दता आणि पावित्र्य लाभते या भावनेने, किंवा जे अपेक्षित होते ते न मिळाल्याने व जे मिळाले ते अपेक्षेप्रमाणे नव्हते अशा कोणत्याही विचारामुळे किंवा परिस्थितीमुळे ब्रह्मचर्यावस्थेची निवड केली असेल तर ते निश्चितपणे चूक आहे परंतु अविवाहित राहिल्यामुळे कोणताही चित्तविभ्रम न होता परमेश्वराची सेवा अधिक मोकळेपणाने करता येते म्हणून अविवाहित राहण्याची एखादयाची इच्छा असेल, तर त्याचा हेतू तरी शुध्द आहे असे म्हणता येईल परंतु अशा जीवनाकरिता खास परमेशव्राकडूनच पाचारण आले पाहिजे ते प्रेषित पौल याला आले होते (१ करिंथ ७:३२, ३३ आणि १ करिंथ ९:५ यांची तुलना करा)
ब्रह्मचर्य हे पावित्र्यपूर्ण जीवन जगण्यासाठी अधिक उपयुत आहे ही संपूर्णपणे चुकीची कल्पना आहे अविवाहित माणसाला विवाहित माणसांपेक्षा धार्मिक कार्याला अधिक वेळ असण्याची शयता आहे, परंतु पवित्र जीवनासाठी अशा कार्याची आवश्यकता नाही हनोख तीनशे वर्षे देवाच्या समागमात राहिला (त्याच्या सान्निध्यात राहिला), आणि त्यास पुत्र व कन्या झाल्या (उत्पत्ती ५:२२) त्याचा विवाह झाल्यानंतर आणि त्याला पहिला मुलगा झाल्यानंतरच तो परमेश्वराच्या समागमात चालू लागला त्याला त्याचे सर्वसाधारण वैवाहिक जीवन जगण्यापासून व मुले होण्यापासून परमेश्वराच्या समागमाने वंचित केले नाही किंवा त्याच्या कौटूंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना देवासह चालण्यात काही खंड पडला नाही
त्यामुळेच सर्व विश्वासणाऱ्यांनी अविवाहित राहावे असे सांगण्याचा पौलाचा हेतू नसावा उलट दुसऱ्या एका ठिकाणी तो स्वत: म्हणाला की जे कोणी अविवाहितपणा हा जीवनाचा नियम असल्याचे शिकवतात ते सैतानाच्या तत्वाचा प्रचार करतात (१ तीमथ्य ४:१३) त्यामुळे १ करिंथ ७:२५२८ हे हवेत ए एन ट्रिटन यांनी या परिच्छेदाचा असा अनुवाद काढला आहे
मी काही नियम तयार करणार नाही परंतु या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आम्ही विपत्तिग्रस्त आणि छळ अगदी जवळ येऊन ठेपलेल्या काळात आहोत (इ स ५५) छळ करणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक आहे की, स्त्री किंवा पुरूष यांच्यावर सरळ परिणाम करता आला नाही, तरी त्यांच्या कुटूंबाद्वारे तो करता येईल त्यामुळे विवाहित लोकांना या वेळी अत्यंत लेश आणि त्रास होण्याचा संभव आहे मी तुम्हांला यापासून वाचवू इच्छितो आणि म्हणून विवाहाविरूध्द सल्ला देतो परंतु कृपया लक्षात घ्या की विवाह हे पाप आहे असे मी म्हणत नाही मी केवळ एवढेच म्हणतो की, सध्याच्या काळात विवाहस्थिती संकटाला निमंत्रण देते आणि मी तुम्हाला त्रासापासून वाचवू इच्छितो
ज्या देशात तीव्र छळ,युध्द किंवा तशाच प्रकारची संकटे आहेत, तेथील विासणाऱ्यांना हे आजही लागू पडते पंरतु आम्ही जसे असावे म्हणून देवाची इच्छा असेल तसेच होण्याचा प्रयत्न आम्ही करावा आपल्या सर्वांसाठी त्याने जीवनाची अविवाहित किंवा वैवाहिक योजना केव्हाच करून ठेवली आहे परमेश्वराची नेमकी इच्छा काय आहे ती शोधून काढून त्याप्रमाणे चाले हे आपले कर्तव्य आहे
परमेश्वराची इच्छा जाणून घेताना, जर परमेश्वराने अगदी स्पष्टपणे आपल्याला अविवाहित जीवनासाठी पाचारण केले असेल, तर आपण ते स्वेच्छेने स्वीकारायला तयार असावे जेेथे अशा स्वेच्छेची उणीव असते, तेथे ते जीवन परमेराच्या अधीन नसल्याचे स्पष्ट होते व त्यामुळे परमेश्वराची आपल्या जीवनाबद्दलची योजना समजण्यास आपल्याला अडथळे येतात
प्रेषित पौलाने १ करिंथ ७:२९३६ मध्ये काय महटले ते लक्षात घ्या ए एन ट्रिटन यांनी त्याचा अनुवाद असा केला आहे : काही झाले तरी ख्रिस्ती कार्य आणि साक्ष यांची संधी अत्यंत कमी आणि मर्यादित झाली आहे आपण या जगापासून आणि शय तर आपल्या कुटूंबापासूनही निरळे असे जगायला हवे या सर्व गोष्टी अगदीच तात्पुरत्या आहेत आणि परमेराचे कार्यच सार्वकालिक महत्त्वाचे आहे परंतु विवाहित लोकांना त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत आणि अविवाहितांना वाटते त्यापेक्षा त्या जबाबदाऱ्या अधिक मर्यादा घालणाऱ्या आहेत जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हांला घरगुती कामे आहेत व ती तुम्ही केलीच पाहिजेत, आणि तुम्ही परमेराच्या कार्यात बिना अडथळा लक्ष केंद्रित करू शकणार नाही
तुम्ही तरूण असताना तरी (वचन ३६) विवाह टाळण्याची ही प्रभावी कारणे आहेत अविवाहित लोकांसाठी ख्रिस्ती कार्यामध्ये जी मोठी संधी आहे तिच्याकडे लक्ष द्या अधिक चालढकल केल्याने फार उशीर होईल (वचन ३६) असे वाटेपर्यंत, तुम्ही आपला विवाह पुढे ढकलला, तर सेवेचे विशाल क्षेत्र तुमच्यासाठी खुले आहे
तुमच्या स्वातंत्र्याला बांध घालण्याच्या उद्देशाने मी हे सांगत नाही हे कृपया आपण लक्षात घ्या (वचन ३५), परंतु केवळ आपल्या हितासाठी सांगतो जर परिस्थिती आणि प्रकृती यामुळे तुम्हांला दुसऱ्या दिशेने जाण्यास उद्युत केले, तर विवाह करण्यामध्ये कसल्याही प्रकारची चूक नाही ते परमेश्वराचे अत्यंत उत्तम वरदान आहे (वचन ३६) यामुळेच पौल अविवाहितावस्था ही परमेश्वराकडून प्राप्त होणारी देणगी आहे अशी सुरूवात करतो व शेवटी विवाह ही देखील परमेश्वरी देणगी असल्याचे सांगतो याबाबत त्याने त्याचा दृष्टिकोण समतोल ठेवला आहे
प्रभू येशूने अविवाहितावस्थेविषयी बोलल्यानंतर लगेच बालकांना आपल्या हातात उचलून घेतले आणि त्यांना आशिर्वाद दिला आणि असे केल्याने विवाहालाही अनुमती दिली (मत्तय १९:१०१५) ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे पवित्र शास्त्रामध्ये असे समतोल विचार मांडले आहत आम्हीही सत्य समतोलच राखले पाहिजे
अगदी चचितच परमेश्वर माणसाला अविवाहित राहण्याचे पाचारण करतो परमेश्वर स्वत:च म्हणाला की, एका अर्थाने माणूस विवाह करतो तेव्हाच तो पूर्ण होतो उत्पत्ती २:१८ सांगते, मग परमेर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूपसा (आणि पूर्णत्व आणणारा) सहकारी मी निर्माण करीन
पवित्र शास्त्राची सुरूवात विवाहाने (उत्पत्ती २:१८२५) आणि शेवटही विवाहानेच (प्रकटी १९:७९, २१:२१०) होतो तसेच येशूने पहिला चमत्कारही लग्नाच्याच वेळी केला (योहान २:१११) ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणून लग्न सर्वस्वी आदरणीय असावे (इब्री १३:४) म्हणजे उचित, अमूल्य म्हणजेच महान किंमत असलेले आणि मौल्यवान असावे
तुमच्या जीवनाला सुयोग्य असणाऱ्या तुमच्या जोडीदाराची निवड करण्यासाठी फत परमेरच तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो जर तुम्ही त्याचे ऐकाल, तर तसे करण्यासाठी तो अत्यंत उत्सुक आहे आपल्या प्रत्येक मुलाच्या जीवनासाठी परमेश्वराची योजना असल्याचे पवित्र शास्त्र शिकवते (इफिस २:१०) जर ते खरे आहे, तर तुम्ही विवाह करावा किंवा नाही याची योजना परमेश्वराने केव्हाच केली असल्याचा विश्वास तुम्ही ठेवण्याखेरीज दुसरे गत्यंतर नाही जर त्याने तुमच्या विवाहाची योजना केली असेत, तर तुम्ही कोणत्या व्यतीशी विवाह करायला हवा हेही त्याने नि:संशयपणे योजून ठेवलेले आहे मात्र प्रत्येकाने त्याचे आज्ञापालन करावे अशी सती परमेश्वर करीत नाही म्हणून परमेश्वराची योजना नाकारणे किंवा टाळणे आणि परमेश्वराच्या इच्छेविरूध्द विवाह करणे हे कोणाही व्यतीला शय आहे
आपल्या आत्म्याच्या तारणानंतर अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुमच्या जीवनात तुम्हांला घ्यायचा असतो आणि तो म्हणजे तुमच्या जीवनाचा जोडीदार शोधण्याचा ! या बाबतीत कसलीही चूक केलेली तुम्हाला परवडणार नाही कारण आयुष्यातील हा एक निर्णय असा आहे की, तो घेतल्यानंतर त्यात थोडाही बदल करता येत नाही जर तुम्ही चुकीचा व्यवसाय निवडला असेल, तर तुमची ती चूक तुम्हाला दुरूस्त करता येते, तसेच जीवनातील इतर कित्येक निर्णयांचेही असेच आहे परंतु जर तुम्ही परमेश्वराच्या इच्छेविरूध्द विवाह केला, तर तुम्हांला तुमची चूक केव्हाही सुधारता येणार नाही फार तर, तुमच्या चुकीच्या निवडीतून थोडे समाधान शोधण्याचा प्रयत्न तुम्हाला करता येतो विवाहाच्या बाबतीत परमेश्वराची इच्छा टाळणे ही दु:खद घटना होय
परमेश्वराने नेमलेला योग्य काल किंवा त्याची इच्छा न जाणता ज्यांनी विवाहाची घाई केली, त्यांना आता आयुष्यभर संथपणे पश्चाताप करीत बसण्याची वेळ आली आहे ! या बाबतीत तरूणांनी सावधानतेने पाऊल उचलण्यासाठी त्यांचे उदाहरण त्यांना धोयाची सूचना देत आहे परमेश्वराच्या इच्छेविरूध्द विवाह करण्यापेक्षा अविवाहित राहणे फार बरे आहे जे त्यांच्या विवाहाच्या बाबतीत परमेश्वराची इच्छा टाळतात आणि नंतर पश्चाताप करतात, त्यांची दया येऊन परमेश्वराने जरी त्यांना आशीर्वाद दिला, तरी खरे सौख्य आणि आशीर्वादित जीवन केवळ परमेश्वराच्या परिपूर्ण इच्छेच्या केंद्रस्थानी राहणयनेच मिळू शकते
परमेश्वराच्या गौरवासाठी आणि आपल्या फायदयासाठी, आपण परमेश्वराने आपल्यासाठी निवडलेल्या व्यतीचा शोध करणे आणि त्याच व्यतीशी विवाह करणे आवश्यक आहे आदामाला सहचारी असावा असे परमेश्वराला वाटले, तेव्हा त्याने दहा स्त्रीया निर्माण करून आदामाला त्यातील चांगली वाटणारी एक निवडण्यास सांगितले नाही परमेश्वराने फत एकच स्त्री निर्माण केली आणि ती आदामाला दिली त्या बाबतीत आदामाला निवड करण्याची संधीच नव्हती त्याच परमेश्वराने त्याच्या प्रत्येक आज्ञाधारक मुलासाठी प्रत्येकी फत एकाच व्यतीची योजना केली आहे मनुष्याच्या स्वतंत्र इच्छाशतीबरोबरच परमेश्वराच्या सार्वभौमत्वाचे सिध्दान्त समजून घेणे कठीण आहे तसेच या शिकवणुकीसंबंधीच्या सर्व गोष्टी समजून घेणेही कठीण आहे परंतु ही सारी पवित्र शास्त्राची शिकवण आहे जर आपण परमेश्वराची योजना स्वीकारली, तर आपल्याला असे आढळून येईल की, आपल्यासाठी परमेश्वराने निवडलेली व्यती खरोखरच उत्तम आहे जशी हवा आदामासाठी होती, तशी ही व्यती आपल्याला प्रत्येक बाबतीत पूरक ठरणारी अशी त्याने बनवली आहे
इसहाकासाठी वधूसंशोधन करीत असताना अब्राहामाचया सेवकाला ही गोष्ट समजली त्याने प्रभू, मला काही चांगल्या मुली सुचव, म्हणजे इसहाकासाठी मी त्यातून एखादी चांगली मुलगी निवडून काढीन अशी प्रार्थना केली नाही उलट त्याने अशी प्रार्थना केली की प्रभू तू इसहाकासाठी पत्नी म्हणून ज्या तरूणीची निवड केली असशील, जिला त्याची पत्नी म्हणून नेमले असशील त्या मुलीकडे जाण्यास मला मार्गदर्शन कर (उत्पत्ती २४:१४, ४४) जेव्हा परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिले तेव्हा तो सच्चेपणाने म्हणू शकला की, परमेश्वराने मला नीट मार्ग दाखवला (उत्पत्ती २४:२७) आज काही लोक सहज वापरतात तसा हा केवळ धार्मिक वाक्प्रचार नव्हता तो अगदी शंभर टके खरा होता प्रत्येक ख्रिस्ती विवाहामध्ये परमेश्वराने, केवळ परमेश्वरानेच मार्गदर्शन केल्याची अशीच खात्री असली पाहिजे
परमेश्वराने तुमच्यासाठी ज्या व्यतीची निवड केली आहे, त्याबद्दलचे मार्गदर्शन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तुमच्या पालकांद्वारे आणि मित्र मंडळीद्वारे तो करील इसहाक आणि रिबका यांच्या बाबतीत परमेश्वराने विवाहाबद्दल स्पष्टपणे केलेला हा एकच उल्लेख पवित्र शास्त्रात आपल्याला आढळून येतो तो विवाह काही पालकांनी योजलेला नव्हता कारण अब्राहामाने रिबकेला केव्हाही पाहिले नव्हते आणि त्याच्या सेवकाला तर तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती तसेच सदर विवाह तो तरूण आणि ती तरूणी यांनीही ठरवलेला नव्हता, कारण इसहाक आणि रिबका त्यापूर्वी एकमेकांना कधी भेटलेही नव्हते तो परमेश्वराने आयोजित केलेला विवाह होता
ही घटना आपणांस असे शिकवते की, देवाने आपल्या मुलांना एकत्र कसे आणले त्याची पध्दत महत्त्वाची नसून, परमेश्वराने त्यांना एकमेकांसाठी तयार केले हे महत्त्वाचे आहे आपल्या पालकांद्वारे किंवा आपल्या मित्रांद्वारे किंवा आपल्या स्वत:लाच एखाद्या व्यतीविषयी मार्गदर्शन झाले, तर ती व्यती परमेश्वराने आपल्यासाठी निवडलेलीच आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे
जीवनसाथी शोधण्याच्या बाबतीत संस्कृती आणि इतर गोष्टींना निर्माण केलेल्या मर्यादाबद्दल, काही विासणारे तरूण इतके सावधगिरीने वागण्याचा प्रयत्न करतात की, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी परमेश्वर हा सर्वात महान असल्याचे ते विसरतात काहींना एक गुप्त भीती असते की, परमेश्वराला त्यांच्या समस्यांमध्ये बिलकूल रूची किंवा आस्था नाही ते अगदी अशा शब्दांत कदाचित हे स्पष्ट करीत नसतील, परंतु त्यांचे वागणे तेच दर्शविते या साऱ्यांसाठी एक आनंदाचा संदेश मी सांगतो तो तुमची काळजी घेतो आणि तुमच्याबद्दल काळजी वाहतो (१ पेत्र ५:७) आदामाची पत्नीबद्दलची गरज जाणून त्याला ती पुरवणारा परमेश्वर होता हे लक्षात ठेवा (उत्पत्ती २:१८) आदामाला परमेश्वराकडे जाऊन पत्नीसाठी विनंती करावी लागली नाही परमेश्वराने आदामाच्या गरजेची काळजी घेतली आणि तो तुमच्याही गरजांची काळजी घेतो
म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करील यासाठी शांतपणे वाट पहा अधीरता, उन्माद यांचा फायदा होत नसतो परमेश्वराने आदामाला झोपवले आणि नंतर उठवून त्याच्याकडे हव्वेला आणले (उत्पत्ती २२:२१, २२) हे प्रतीक अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे निद्रा हे विश्रांतीचे प्रतीक आहेआपल्सासाठी निवडलेल्या जोडीदाराला घेऊन परमेश्वर स्वत: येत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये विश्रांती घ्यावी अशी परमेश्वराची इच्छा आहे याचा अर्थ आपण काहीच करू नये असा मात्र नव्हे, कारण मी ज्या विश्रांतीचा उल्लेख करतो ती बाहय स्वरूपाची शारीरिक विश्रांती नव्हे, तर आंतरिक आध्यात्मिक विश्रांती आहे
आपणाला ही विश्रांती कशी मिळेल ? फत परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागण्याने ! येशू म्हणाला, माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका (म्हणजे तुमच्या जीवनामध्ये माझ्या इच्छेनुसार वागा) म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल (मत्तय ११:२९) परमेश्वराच्या इच्छेमध्ये निद्रा घेणे आपण शिकायला पाहिजे आपण जर तसे केले तर त्याने आपल्यासाठी नियुत केलेल्या समयी योग्य व्यतीविषयी परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करील जीवनाच्या इतर सर्वच क्षेत्रांमध्ये परमेश्वराच्या इच्छेनुसार वागण्यात आपण गुंतलो असू, तर या बाबतीत आपल्याला घाबरण्याचे किंवा परमेश्वराची इच्छा टळेल म्हणून काळजी करण्याचे कारण नाही या संबधात तीन उत्कृष्ट पुस्तके तरूण मंडळीने वाचली पाहिजेत : मिसेस हॉवर्ड टेलरकृत ‘ढहश ढीर्ळीाहि ेष गेहप । इशीीूंं डींरा‘, एलिझाबेथ इलियटकृत ‘डहरवेु ेष ींहश अश्राळसहीूं‘ आणि जेसी पोलॉककृत ‘ र्कीवीेप ढरूश्रेी रपव चरीळर‘ ही ती होत
परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची आपली इच्छा असली पाहिजे पवित्र शास्त्र सांगते की, आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशय आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे (इब्री ११:६) जर तुम्ही आस्थेने त्याच्या इच्छेनुसार वागाल तर त्याने तुमच्यासाठी निवडलेली व्यती तो नि:संशयपणे तुमच्याकडे आणील ती पालकांद्वारे, मित्रांद्वारे किंवा प्रत्यक्षपणे अशा कोणत्याही मार्गाने असो कोणती पध्दत निवडायची ते त्याच्यावरच सोपवून द्या त्याने नियुत केलेल्या समयी, तुमच्या अंत:करणातील सर्व इच्छा तो पूर्ण करील (स्तोत्र ३७:४)
तुमच्यासाठी योग्य असलेली व्यती तुमच्या स्थानिक मंडळीमध्ये किंवा ख्रिस्ती समाजामध्ये किंवा अशाच कोणत्या तरी सहभागितेत असल्याचे परमेश्वर तुम्हाला कदाचित मार्गदर्शन करील जर ख्रिस्ती समाजाच्या एखाद्या सभेच्या वेळी भेट झाल्यानंतर एखाद्या व्यतीकडे तुम्ही आकर्षित झालात आणि आपल्या जीवनाचा जोडीदार म्हणून त्या व्यतीचा आपण विचार केलात तर त्यात चूक असे काहीच नाही तुम्ही दोघांनी एकत्र भेटावे म्हणून कदाचित परमेश्वराची ही योजना असू शकेल अनेक लोकांचा लैंगिक विषय आणि प्रेम याबद्दलचा दृष्टिकोण इतका विकृत असतो की, पवित्र सभेमध्ये जीवनाचा जोडीदार शोधणे ही गोष्ट ते अपवित्र समजतात परंतु तुमच्या जीवनाचा जोडीदार शोधणे ही काही अपवित्र बाब नव्हे परमेश्वरासमोर तर ती पवित्र गोष्ट आहे जर तुमचे अंत:करण शुध्द आहे आणि तुमचे वर्तन ख्रिस्ती व्यतीला शोभणारे आहे, तर दुसरे काय बोलतात याची काळजी करण्याचे कारण नाही
मी या ठिकाणी असा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, मी विासणाऱ्यांच्या अशा काही शोकांतिका पाहिल्या आहेत की, या लोकांनी संबंधित ख्रिस्ती समाजामध्ये आपल्या जोडीदारांचा शोध केला नाही (कदाचित दुसरे काय म्हणतील या भीतीने ! ) आणि त्यांच्या केवळ नामधारी ख्रिस्ती पालकांनी सुचवलेल्या विश्वासणाऱ्या व्यतींशी त्यांनी विवाह करून टाकले माणसांची भीती त्यांना सैतानाच्या छुप्या सापळयात अडकवण्यास कारणीभूत ठरली (नीति २९:२५ शी तुलना करा), आणि परिणामी परमेश्वराला आणि मंडळीला पुष्कळशा संभाव्य ख्रिस्ती गृहांना मुकावे लागले
ज्यांना परिस्थितीमुळे अशी किंवा नव्याने जन्मलेल्या ख्रिस्ती लोकांच्या सह वासाची कोणतीच संधी मिळू शकत नाही, किंवा ज्यांची मंडळी लहान आहे असेही काही विश्वासणारे आहेत आजार, कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटूंबातील अभागी परिस्थिती किंवा सांस्कृतिक बाबी या काही लोकांच्या अडचणीस कारणीभूत होत असतील ते आपल्यासाठी योग्य व्यती कशी काय निवडू शकतील याबाबत विचारग्रस्त असतील परंतु तसे काही घडण्याची सर्व आशा लुप्त झाल्यानंतर पुष्कळसे लोक शेवटी त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी निवडलेल्या अविश्वासणाऱ्यांशी विवाह करतात कोणत्याही विश्वासणाऱ्याच्या मनात असले विचार येणे हे विश्वासाच्या अभावामुळेच आहे परमेश्वराला काही अशय आहे काय? त्याला तुमच्याबद्दल काही आस्था नाही काय ? जेव्हा तुमची परिस्थिती तुमच्यासाठी अशय आहे असे तुम्हांला वाटते, तेव्हा मानवाला अशय असणाऱ्या गोष्टी परमेश्वराला शय असल्याची आठवण ठेवा मानवाला अशय असणाऱ्या गोष्टी परमेश्वराला शय असल्याची आठवण ठेवा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होईल (मत्तय ९:२९) याचा प्रत्यय घ्या तुम्ही त्याच्याकडे प्रामाणिकपणे तुमचे चित्त लावले आणि परमेश्वराच्या वचनात सांगितलेल्या तत्त्वावर तुम्ही ठाम उभे असलात तर परमेश्वराचे नेत्र तुमच्यासाठी अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात (२ इति १६:९) असे तुम्हाला आढळून येईल
आश्चयकारक कृत्ये करणाऱ्या आपल्या परमेश्वराला संस्कृतीचे अडथळे, पालकांचे आक्षेप, परिस्थितिजन्य अडचणी आणि इतर हजारो विघ्ने म्हणजे फार मोठी समस्या नाही उदाहरणार्थ तारण पावलेली, हिंदू पार्भूमीतील एक तरूणी मला ठाऊक आहे तिच्या कुटूंबापासून ती संपूर्णपणे विभत झाली होती तिच्या विवाहासाठी खटपट करणारे कोणीही नव्हते तरीही परमेश्वराने तिला विश्वास ठेवणारा जोडीदार दिला आणि आश्चर्य हे की, त्याच्या आईवडिलांना तिची पार्भूमी माहीत असतानाही कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता आपल्या मुलाकरिता तिला पसंत केले परिस्थितीवर मात करणारा केवळ परमेश्वरच आहे आणि जर तो तुमचा पिता आहे तर तुम्ही भाकरी मागितल्यानंतर तो तुम्हांला दगड देणार नाही, याबद्दल तुम्ही खात्री बाळगली पाहिजे आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे जर पापी वडिलांना समजते, तर स्वर्गातील पित्याजवळ जे मागणी करतात त्यांना तो कितीतरी चांगल्या देणग्या देईल (मत्तय ७:११)! पवित्र शास्त्रानुसार जीवनाचा जोडीदार ही देखील या चांगल्या देणग्यांपैकी एक आहे (नीति १८:२२)
आपली विासयोग्यता आपल्या मुलांना सिध्द करून दाखवावी याची परमेश्वर वाट पाहात आहे परंतु आपण पण शांतपणे धीर धरा घाइ आणि अधीरता यामुळे परमेश्वराकडून मिळणाऱ्या उत्कृष्ट गोष्टींना मुकू नका पुष्कळांनी तेच केले आहे पूर्ण अंत:करणाने त्याच्यावर विश्वास ठेवा जे त्याच्यावर पूर्णपणे विास ठेवतात, त्यांना तो पूर्णपणे सत्य असल्याचे अनुभवास येते आपली विशिष्ट परिस्थिती किंवा भोवतालचे वातावरण हे देवाच्या नियमाला अपवाद आहे, अशी सबब कोणीही कधी सांगू शकणार नाही परमेश्वर आपला प्रभू सर्वांवर प्रभुत्व चालवितो
परमेश्वराची इच्छा कशी समजावून घ्यावी याबद्दल मी माझ्या ऋळपवळपस ऋेव’ी थळश्रश्र या पुस्तकात विवेचन केले असल्यामुळे या ठिकाणी मी त्याबाबत काही विचार करणार नाही आपल्या नवीन अंत:करणाच्या आचरणाद्वारे परमेश्वर आपले मार्गदर्शन करीत असतो म्हणून आपण आपल्या जोडीदाराचा शोध करीत असता, तो किंवा ती ही आपल्यासाठी परमेश्वराने केलेली निवड आहे किंवा नाही हे समजण्याकरीता आपण कोणत्या गोष्टींचा विचार करावा, एवढेच मी येथे सांगणार आहे
परमेश्वराने हव्वा ही आदामासाठी सुयोग्य अशी मदतनीस म्हणून उत्पन्न केली तेव्हा तिला कितीतरी बाबतीत आदामाशी एकरूप व्हावे लागले तुमच्या बाबतीत देखील ज्या व्यतीशी तुम्ही विवाह करता त्या व्यतीने अनेक बाबतींत तुमच्याशी एकरूप असावे विवाहामध्ये दोघेजण एक होतात पवित्र शास्त्र सांगते की, परस्परांशी सहमत न होता दोन व्यती केव्हाही एकत्रपणे चालू शकत नाहीत (आमोस ३:३) विवाह जर यशस्वी व्हायचा असेल तर त्यात एकता, साम्य आणि सहमत हे गुण मोठया प्रमाणात असले पाहिजेत जी दोघे एक होतात ती वैयतकरीत्या आत्मा, जीव आणि शरीर यांची बनलेली असतात, तेव्हा या तिन्ही बाबतींत अगदी मोठया प्रमाणात त्यांची एकता असली पाहिजे पुरूष आणि स्त्री यांचे मीलन हे आत्मा, जीव आणि शरीर यांचे मीलन असेल, तरच त्यांचा विवाह परमेरांच्या इच्छेनुरूप असेल असे मीलन हे तीन पदरी दोरीसारखे असून उपदे ४:१२ ने आपल्याला स्मरण करून दिल्याप्रमाणे ते केव्हाही तुटत नाही तुटणे हा शब्द फत घटस्फोट दर्शवीत नाही, तर स्त्री आणि पुरूष यांच्यातील ऐयाचा अभावही दर्शवितो विवाहाच्या बाबतीत तुम्ही परमेश्वराच्या इच्छेची अपेक्षा करता तेव्हा तुम्ही त्या व्यतीला या तीन गोष्टींतून पारखले पाहिजेे आपण एकेका गोष्टीचा विचार करू (मी पुढे जे काही सांगितले आहे त्यात पुरूषवाचक सर्वनामाचा उपयोग केलेला असला तरी ते मुलींनाही तसेच लागू आहे)
आपण आत्म्यापासून सुरूवात करू या, कारण तो मनुष्याचा सर्वोच्च भाग आहे जर या बाबतीत एकता नसेल तर इतरत्र कुठेही ती शोधणे व्यर्थ आहे आत्मा हा माणसाला परमेश्वराशी सहवास ठेवण्याच्या क्षमतेचा भाग आहे अविासणाऱ्या माणसामध्ये म्हणजे ज्याने पश्चात्तापामुळे आणि त्याच्या जीवनात ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळे मिळणाऱ्या नव्या जीवनाचा कधीही अनुभव घेतला नाही त्याच्यामध्ये ( तो धार्मिक नामधारी ख्रिस्ती असून चर्चच्या कार्यात भाग घेणारा असला तरीही) आत्मा मेलेला असतो ज्याअर्थी जिवंताचे मृताशी ऐय होऊ शकत नाही, त्याअर्थी विासणाऱ्याचा विास न ठेवणाऱ्याशी विवाह करण्याच्या विचाराचा प्रश्नच उद्भवत नाही जर तुम्ही परमेश्वराशी संयुत झालेला असाल तर तुमचा आत्मा त्याच्याशी एकरूप झालेला आहे (१ करिंथ ६:१६) मग तुम्ही अशाच प्रकारे केवळ परमेश्वराशी संयुत झालेल्या व्यतीशी विवाह करण्याचे ठरवू शकता खऱ्याखुऱ्या ख्रिस्ती विवाहासाठी पुरूष, स्त्री आणि परमेश्वर या तिघांचे ऐय व्हावे लागते, त्यामध्ये थोडीही कमतरता असली तरी त्याला ख्रिस्ती विवाह कदापीही म्हणता येणार नाही
पवित्र शास्त्र आपल्याला आज्ञा करते की, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका त्यांच्याशी अयोग्य शरीरसंबंध ठेवू नका (२ करिंथ ६:१४) जू हे विवाहाचे अत्यंत स्पष्ट असे प्रतीक आहे ते नांगराला जुंपलेल्या दोन बैलांचे चित्र आहे ते पती आणि पत्नी एकत्र येऊन संयुतकपणे परमेश्वराचे कार्य करण्याचे प्रतीक आहे जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांना बैल आणि गाढव यांना एकत्रपणे नांगरास जुंपण्यास बंदी करण्यात आली होती (अनु२२:१०), कारण त्या दोन्ही प्राण्यांचे स्वभाव भिन्न आहेत विासणाऱ्याचा स्वभावही अविासणाऱ्याहून भिन्न असतो म्हणून पवित्र शास्त्र म्हणते की, उजेड व अंधार हयांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियालाशी एकवायता कशी होणार ? विश्वास ठेवणारा व विास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? (२ करिंथ, ६:१४,१५) तुम्ही देवाचे मूल असताना जर विश्वास न ठेवणाऱ्याशी (म्हणजे सैतानाच्या अपत्याशी योहान ८:४४, १ योहान ३:१०) विवाह केला, तर खुद्द सैतान तुमचा सासरा होतो हे स्पष्टच आहे अशा या सासऱ्यामुळे तुमचे सारे जीवन अनंत दु:खांनी भरलेले असेल याची खात्री बाळगा
काही विश्वासणारे असा दावा करतात की, जर मी विश्वास न ठेवणाऱ्या व्यतीशी विवाह केला, तर त्यायोगे मी एका आत्म्याला नरकापासून वाचवीन पण हा दावा जर बळकट असता तर सर्वज्ञानी परमेश्वराने सर्व विश्वासणाऱ्यांना विश्वास न ठेवणाऱ्यांशी विवाह करण्याचा आग्रह नकीच केला असता! मग त्याच्या वचनात त्याने असे का सांगितले नाही? कारण विवाह हा आत्म्यांना वाचवण्याचा मार्ग असावा हा त्याचा हेतू नाही आणि म्हणून तुम्ही जर आत्मे जिंकण्याची अशी मूर्खपणाची योजना स्वीकारलीत, तर तो तुम्हांला पाठिंबा देईल अशी अपेक्षा धरू नका जर तुमच्या जोडीदाराचे विवाहापूर्वी परिवर्तन झालेले नसेल, तर त्यानंतर ते होण्याची फार थोडी शयता आहे ते काहीही असो, पण जर तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या व्यतीशी विवाह करता, तर तुम्ही पवित्रशास्त्राच्या आज्ञांचा सरळ सरळ भंग करता आणि तुमच्या प्रभूचाही पूर्णपणे आज्ञाभंग करता त्याच्या उपस्थितीसाठी तुम्ही काहीही प्रार्थना व विनवणी केलेली असो, परमेश्वराने तुमच्या विवाहसमयी उपस्थित रहावे, एवढेच नव्हे तर त्याने तुमच्या गृहावर आशीर्वाद पाठवावा याची तुम्ही बिलकूल आशा धरू नये
कोणत्याही परिस्थितीत परमेश्वर आपल्या मुलाचा विवाह विश्वास न ठेवणाऱ्या व्यतीशी होणे, मंजूर करणार नाही (आपण विसरू नये म्हणून मला पुनश्च सांगू द्या की, एखादा हिंदू किंवा नास्तिक हा जेवढा विश्वास न ठेवणारा असतो तेवढाच नामधारी ख्रिस्तीही विश्वास न ठेवणारा असतो) एखाद्या विासणाऱ्याच्या जोडीदाराचे विवाहोत्तर परिवर्तन झाले असल्याचे उदाहरण देणे व्यर्थ आहे, कारण तुम्ही परमेश्वराच्या वचनाद्वारे नियंत्रित व्हायला हवे, कोणाच्या उदाहरणांनी नव्हे! जर तुम्ही परमेश्वराकडून जे सर्वोत्तम ते मिळण्याची इच्छा धरता, तर आताच तुम्ही आपल्या मनाचा निर्धार करा की, विश्वास न ठेवणाऱ्या व्यतीशी विवाह करण्यापेक्षा तुम्ही अविवाहित राहावे
जर तुम्हांला सुचविण्यात आलेल्या जोडीदार व्यतीचा नव्याने जन्म झालेला नसेल, तर तुमच्या पालकांनी किंवा इतर कोणीही केलेली आर्जवे तुम्ही मानता कामा नये ‘फत प्रभुमध्येच‘ तुम्ही आपल्या पालकांची आज्ञा पाळायला हवी (इफिस ६:१), म्हणजे ज्यावेळी तुम्हांला तुमच्या सद्सद्विवेक बुध्दीच्या आणि परमेश्वराच्या वचनाविरूध्द जावे लागणार नाही तेव्हाच त्यांची आज्ञा पाळता येईल प्रथमत: तुम्ही परमेश्वराशी निष्ठ असला पाहिजे, त्यामुळे कदाचित तुम्हाला वेळप्रसंगी तुमच्या पालकांविरूध्द ठाम मत प्रकट करावे लागेल परमेश्वराने खुद्द हे मत्तय १०:३२३९ मध्ये सांगितले आहे त्यातील ३७ वे वचन खास लक्षात घ्या जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत, पण सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते (नीति १९:१४)
काही वेळा असे हाते की, तुम्ही एखाद्या तरूणीकडे आकर्षिले जाता आणि नंतर तिचे खरेखुरे तारण न झाल्याचे तुमच्या लक्षात येते किंवा कदाचित तुमचे तारण होण्यापूर्वीच तुम्ही परिवर्तन न झालेल्या तरूणीच्या प्रेमात पडलेले असता अशा वेळी (तुमच्या म्हणण्याविरूध्द स्पष्ट पुरावा असून देखील )ती मुलगी तारण पावलेली आहेच अशी स्वत:ची व इतरांची खात्री करून देण्याचा अनावर मोह तुम्हांला होईल जर तुम्ही प्रामाणिक आणि वास्तववादी असाल, तर स्वत:शी अशी फसवणूक होऊ देणार नाही उलट कदाचित तुमचा सर्व वेळ त्या तरूणीचे परिवर्तन करण्यात तुम्ही खर्च कराल परंतु त्यातून तुम्ही ज्याची अपेक्षा करता तो निर्णय सहसा तुम्हांला मिळणार नाही एकमेकांबद्दल आकर्षण असल्यामुळे ज्याला तुम्ही परिवर्तन म्हणता त्या स्थितीतून एखादे वेळी ती पार पडेलही परंतु अशी परिवर्तने ही बहुधा बनावट असतात कारण पापाच्या खऱ्या जाणिवेतून व पश्चातापातून ती उद्भवत नाहीत तुम्ही तिला शुभवर्तमान देऊ नये, असे मात्र म्हणावयाचे नाही परंतु त्यातून केवळ वरपांगी बदल होण्याचीच शयता आहे हे मात्र लक्षात ठेवा
परमेश्वराच्या कार्यात पुढाकार घेणाऱ्या एका विश्वासणाऱ्याची मला या ठिकाणी आठवण होते त्याच्या आईवडिलांनी त्याचा विवाह ठरवला त्याची वाग्दत्त वधू, त्यावेळी तारण न झालेली नामधारी ख्रिस्ती होती परंतु त्याने जेव्हा विवाहापूर्वी तिला शुभवर्तमान दिले, तेव्हा तिचे तारण झाले आहे, असे ती म्हणाली परंतु त्या तरूणीचा खरा स्वभाव विवाहानंतर काही महिन्यांनंतर प्रकट झाला त्यामुळे तिला तारणाचा खराखुरा अनुभव आलाच नाही हे सर्वांनाच व तिच्या पतीलाही लवकरच कळून चुकले आपल्या पतीच्या धार्मिक कार्यामध्ये ती धोंड होऊन बसली आणि लवकरच त्याची साक्ष आणि त्याचा उत्साह मावळला अशा परिवर्तनापासून सावध राहा !
परिवर्तन न झालेल्या व्यतीमध्ये सैतान तुम्हांला खूप चांगले गुण दाखवील ती व्यती अनेक दृष्टींनी कशी योग्य आहे हे तो कदाचित दाखवील ती अत्यंत गोड आणि मिळत्याजुळत्या स्वभावाची आहे असे तो तुमच्या कानात गुणगुणेल परंतु त्याकडे लक्ष देऊ नका तो लबाडांचा बाप आहे त्याने तर आपल्या आदी मातापित्यांना चांगल्या आणि सुंदर दिसणाऱ्या वस्तूंद्वारे मोहात पाडले (उत्पत्ती ३:६) परंतु परमेश्वराने त्या गोष्टी मना केल्या होत्या त्याचप्रमोण परमेश्वराने विजोड जू बांधण्यास मना केले आहे (२ करिंथ ६:१४) परमेश्वराने मनाई केलेल्या गोष्टींतून (त्या तुम्हांला कितीही चांगल्या वाटल्या तरी) हानीशिवाय दुसरे काहीही निघू शकणार नाही या विषयावरील परमेश्वराच्या वचनांची शिकवण नाकारल्यामुळे विवाह दु:खपूर्ण झाल्याची व पती आणि पत्नी यांच्या अखंड कटकटी निर्माण झाल्याची एकच नव्हे, तर अनेक उदाहरणे मला ठाऊक आहेत ज्या स्त्रीला आपण विवाहानंतर आपल्या पतीचे परिवर्तन करू असे वाटत होते, तिची सर्व स्वप्ने धुळीला मिळाली आणि परमेश्वराच्या कार्यासाठी आपल्या घराचा उपयोग करण्यास आता ती असमर्थ बनली आहे ज्या माणसाला वाटत होते की, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सहचारिणीला विवाहानंतर परमेश्वराकडे आणण्यात त्याला काहीच अडचण पडणार नाही, तीच स्त्री त्याच्यासाठी कायमचे अडखळण बनली आहे, असे त्याला दिसून आले कोणत्याही वेळी तारण न झालेल्या कोणाही व्यतशी भावनात्मक संबंध जोडण्याचे नाकारणे हाच एक सुरक्षित उपया आहे जर अशा व्यतीबद्दल तुम्हांला आंतरिक आकर्षण वाटत असेल तर तुम्ही त्वरित स्वत:ला प्रतिबंध घाला ती व्यती संपूर्ण आणि खरेपणाने तारण पावल्यानंतरच तिचा संभाव्य जोडीदार म्हणून विचार करा
तुम्ही तुमचे तारण होण्यापूर्वी एखाद्या तरूणीच्या प्रेमात पडला असाल, तर तुमची आध्यात्मिक सद्य:स्थिती तुम्ही तिला स्पष्ट केली पाहिजे तुमचे प्रथम प्रेम आता येशू ख्रिस्तावर असून तिच्या जीवनात जोपर्यंत तशा तारणाचा अनुभव येत नाही तोपर्यंत विवाहाबद्दल विचार करता येणे शय नाही असे तिला समजावून सांगा तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात ख्रिस्त सर्वश्रेष्ठ नसला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचे गृह हे खरे ख्रिस्ती गृह होणारच नाही अशा परिस्थितीमध्ये जे परमेश्वराचा आदर करतात त्यांचा आदर परमेश्वर करतो (१ शमु२:३०) जेव्हा तुम्ही त्या तरूणीशी असलेले तुमचे नाते घेऊन परमेश्वराच्या वेदीवर शरण जाल आणि त्याला त्याच्याच इच्छेप्रमाणे करण्याची विनंती कराल, तेव्हाच तुम्ही परमेश्वराचा आदर कराल जर ती तरूणी परमेश्वराने तुमच्यासाठी निवडलेली असेल, तर तो तिला ख्रिस्ताला शरण जाण्याच्या स्थळी आणील आणि नंतर जसा त्याने इसहाक अब्राहामाला परत दिला (उत्पत्ती २२), तसेच ती तरूणी तो तुम्हांला परत देईल जर ती परमेश्वराची निवड नसेल तर जसे त्याने इश्माएलला अब्राहामापासून दूर नेले (उत्पत्ती २१), तसे तो तिला तुमच्या जीवनातून दूर घेऊन जाईल तुम्ही यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी तयार असायला हवे आपल्या जीवनामध्ये तुम्ही परमेश्वराला प्रथम स्थान दिले तर तो तुमचा ऋणी राहणार नाही आणि तुम्ही त्याच्याकडून मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींना मुकणार नाही जेव्हा विवाहितांपैकी दोघांनाही तारणाचा खराखुरा अनुभव असतो तेव्हा प्रत्येकजण परमेश्वराच्या क्षमेच्या आनंदाचा अनुभव घेत जगेल हा क्षमेचा आनंद त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्यामध्ये एकमेकांना पुन:पुन्हा क्षमा करण्याची व क्षमा मागण्याची त्यांची इच्छा व तयारी असते यावरून दिसून येईल एका किंवा दोन्हीही जोडीदारांत या गुणाचा अभाव असल्यामुळे पुष्कळसे विवाह असफल झाले आहेत
परंतु कवेळ परिवर्तनच तेवढे पुरेसे नाही आत्म्याच्या ऐयात आत्मिक गोष्टीतील साम्यही सामावलेले असते देवाविषयीचा उत्साह आणि श्रध्दा यांबाबत विासणाऱ्यांमध्ये फार फरक आहेत जर उष्ण ख्रिस्ती व्यतीने कोमट व्यतीशी विवाह केला तर त्यातून दोन कोमट ख्रिस्ती व्यती निर्माण होतील उष्ण ख्रिस्ती व्यतीचे तपमान कोमट व्यतीबरोबर खाली येईल तेव्हा एखादी व्यती केवळ नव्याने जन्मली आहे एवढाच विचार न करता, ती तुमच्या जीवनामध्ये अडखळण होणार की प्रेरक व्यती होणार याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे तिला तुमच्याप्रमाणेच आध्यात्मिक गहनता आणि परमेश्वराची भूकअसली पाहिजे, आणि तिचे जीवन तुमच्यासाठी सतत आध्यात्मिक आव्हान बनले पाहिजे तिची आध्यात्मिकता तुम्हांला आदर वाटणारी अशी असली पाहिजे जेव्हा देन्हीही जोडीदार खरे धार्मिक असतात तेव्हा उभयतांना परस्परांबद्दल आदर वाटतो व प्रत्येकलाला दुसरा आध्यात्मिकदृष्टया श्रेष्ठ वाटतो (फिलिप्पै २:३) तुम्हांला अशी जोडीदारीन लाभल्यावर, ज्यावेळी तुम्ही आध्यात्मिकदृष्टया घसरता त्यावेळी तुम्हांला ती वर खेचते आणि तुम्हीही तिच्या बाबतीत तसे करण यास समर्थ असता तुमची आध्यात्मिक धार जेव्हा बोथट होईल तेव्हा ती पुन: पाजळण्यास ती समर्थ असते आणि तुम्हीही तिच्यासाठी तसेच करण्यास समर्थ असता (उपदे ४:१०) जगातील सर्व संपत्तीपेक्षा असा जोडीदार श्रेष्ठ आहे
परंतु आपण आध्यात्मिकता कशी ओळखू शकू ? धार्मिक कार्यावरून ती ओळखणे शय आहे काय ? एखादी मुलगी नेहमी पवित्र शास्त्राच्या सभा आयोजित करीत असेल, शुभवर्तमान घेऊन घरोघरी भेटी देत असेल (ती स्वत: धार्मिक वृत्तीची असेल), तरीही कदाचित ती अत्यंत किरकोळ दर्जाची पत्नी व माता बनेल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, उत्साही कार्यकर्त्यामध्ये प्रगाढ आध्यात्मिकता नेहती असतेच असे नाही कारण आध्यात्मिकता आणि धार्मिक कार्य हे नेहमीच समानार्थक नसते हे लक्षात ठेवा की वैवाहिक जीवनातील सुरूवातीच्या वर्षात पती पत्नीला पवित्र शास्त्राचा नियमित अभ्यास आणि प्रार्थना तसेच ख्रिस्ती सेवा करता येत नाही, कारण त्यांची गोंगाट करणारी मुले सारा दिवसभर मातेचा वेळ घेतात आणि रात्रीच्या वेळी ती माता व पिता दोघांनाही त्रास देतात आध्यात्मिकपणा फत धार्मिक कार्यात आणि केवळ पवित्र शास्त्राच्या अभ्यासातच असतो असे ज्या मुलीला वाटते ती या सर्व गोष्टींमुळे आपल्याला परमेश्वराच्या सहवासात (तिच्या मते) अडथळा येतो असे म्हणून त्रासेल व चिडेल
आध्यात्मिक जीवनाचे अनुमान करणे, एवढेच नव्हे तर नवा जन्म झाला किंवा नाही हयाचे अनुमान करणे ही सोपी गोष्ट नाही लोक जगातील नकली वातावरणात राहतात त्यामुळे त्यांना ओळखणे जास्तच कठीण बनले आहे फारच थोडे लोक कपटापासून सर्वस्वी मुत आहेत पुष्कळसे विासणारे त्यांची आध्यात्मिक पातळी आहे त्यापेक्षा उच्च असल्याचा दुसऱ्यांचा समज करून देतात हे विशेषकरून तरूण लोकांमध्ये जे नियमितपणे ख्रिस्ती सभांना हजर राहतात त्यांच्यात विशेषकरून आढळून येते आपण हे लक्षात ठेवून सावध राहिले पाहिजे, अन्यथा आपण एखाद्या व्यतीच्या बाहय स्वरूपावर फसून जाऊ खरेखुरे अनुमान काढणे हे वास्तविक पाहता अत्यंत कठीण आहे, परंतु विवाहासंबंधी विचार करताना आपल्याला ते करावे लागते तारणाच्या अनुभवाबद्दल जर कोणी तोंडी साक्ष दिली, तर तुम्ही त्यावर सरळ विास ठेवू नये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, नव्या जन्माचा कधीही अनुभव न घेतलेल्या व्यतीला नवा जन्म झाल्याची साक्ष देता येणे शय आहे प्रभूने आपल्याला सांगितले आहे की, लोकांच्या फळांवरून आपण त्यांना ओळखू शकू (मत्तय ७:१६), आणि जर आपण दररोज परमेश्वराच्या समागमात चाललो, तर योग्य वेळ येताच तो आपल्याला अपेक्षित व्यतीला ओळखण्यास मदत करील
प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता (शांत स्वभाव, संयम), दयाळूपणा, चांगुलपणा (सदिच्छा), विश्वासूपणा (सौम्यता, नम्रता), लीनता आणि इंद्रियदमन (स्वत:वर नियंत्रण, स्थैर्य) (गलती ५२२, २३), ही जी आत्म्याची फलप्राप्ती आहे ती दिसते का हे आपण प्रथमत: शोधले पाहिजे ज्या व्यतीचा आपण विचार करीत आहोत तिला ख्रिस्ती सहभागितेमध्ये आणि परमेराच्या कार्यात अत्यंत रूची असावी तरूणीला जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची अविनाशी शोभा असावी (१ पेत्र ३:४) ती विसाव्या शतकातील काही मुलींच्या सारखी गोंधळ घालणारी, मिजासखोर आणि परमेश्वराने तिला चुकून मुलाऐवजी मुलगी केले आहे असा भास निर्माण करणारी नसावी
सद्गुणी स्त्रीचे वर्णन पवित्र शास्त्रात आपणांस नीति३१:१०३१ मध्ये सांगण्यात आले आहे त्यात सांगितलेले गुण प्रत्येक तरूणाने, तो ज्या तरूणीला चाहतो त्या तरूणीमध्ये आहेत किंवा नाहीत ते पहावे शारीरिक सौंदर्य आणि लावण्य यांची व्यर्थता त्यात दर्शविली आहे परमेश्वराच्या भयाला (वचन ३०) विशेष महत्त्व देण्यात आले आहे परमेश्वराच्या दृष्टीने तरूणी जितकी पवित्र तितकी ती सुंदर आहे जर आपण परमेश्वराची इच्छा जाणू इच्छितो तर परमेश्वर जसे लोकांकडे पाहतो तसे पाहण्यास आपण शिकले पाहिजे रोम १२:२ मध्ये आपणांस सांगितल्याप्रमाणे देवाची इच्छा समजण्यासाठी जी मनाच्या नवीकरणाची आवश्यकता आहे त्याचा हाच अर्थ आहे परमेश्वर अंत:करणाकडे पाहतो व बाहयस्वरूप पाहात नाही (१ शमु १६:७), हे माहीत असताही आपण जर शारीरिक सौंदर्यावर आपली निवड करण्याचे अवलंबून ठेवतो, तर परमेश्वराच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आपण करू शकत नाही त्यामुळे आपण, सैतानाने आपल्याला फसवावे आणि पदभ्रष्ट करावे म्हणून आपले दार सताड उघडे ठेवतो
आदर्श पत्नीचे जितके गुण नीति ३१:१०३१ या वचनांत सांगितले आहेत ते सर्व तिचा आंतरिक स्वभाव दर्शवतात ती कसल्याही संशयाला वाव ठेवत नाही आपल्या स्वत:च्या हितापेक्षा ती आपल्या पतीचे हित पाहते ती अत्यंत स्वेच्छेने आणि कष्टाने काम करते ती आपल्या कुटूंबाबद्दल प्रथम विचार करते कोणत्याही प्रकारचे हलकेसलके काम आपल्या हातांनी करण्यास ती लाजत नाही ती काटकसरी असते पण कंजूष नसते कारण गरजवंतासाठी ती दयाळू व उदार बनते आपल्या जिभेवर कसे नियंत्रण करावे, केव्हा काय बोलावे, केव्हा गप्प बसावे (हे किती महत्त्वाचे आहे!) हे तिला समजते ती रिकामपणात आपला वेळ घालवीत नाही, तर प्रत्येक क्षण सत्कारणी लावते तिचा पती, तिची मुले आणि प्रत्यक्ष परमेश्वरही तिची स्तुती करतो यात नवल ते काय !
एखाद्या मुलीमध्ये हे सर्व गुण असतील किंवा नाही हे खात्रीपूर्वक ओळखणे नेहमीच आपल्याला शय होत नाही तरीही जर आपल्याला परमेश्वराची इच्छा जाणून घ्यावयाची असेल, तर आपण आपल्या मनात हे शब्द ठेवायला हवेत आणि त्याच गोष्टीवर आपण जे काही अनुमान करू पाहतो ते करावे ज्या व्यतीचा तुम्ही विवाहासाठी विचार करता ती सध्या आध्यात्मिक दृष्टया योग्य नसली, तरी विवाहानंतर तुम्ही तिला सुधरवू शकता, तिला उच्च पातळीवर आणू शकता, या सैतानाच्या शिकवणीपासून सावध राहा तसे वचितच केव्हा तरी घडते जर आताच तिने स्वत:चे परमेश्वराला समर्पण केलेले नसेल, तर पुढे ती तसे करील याची काही शाश्वती नाही एखाद्या टेबलावर उभे राहून जमिनीवर उभ्या असलेल्या व्यतीला उचलून टेबलावर घेणे हे अत्यंत कठीण आहे उलट तुम्हाला खाली खेचणे हे दुसऱ्या व्यतीला सहज शय आहे आध्यात्मिक दृष्टया विजोड असलेल्या विवाहातही असेच घडते
तेव्हा खऱ्या ख्रिस्ती विवाहामध्ये तुमचे आकर्षण व्यतीच्या आध्यात्मिक सद्गुणांवर आधारलेले असले पाहिजे जर सर्वात अगोदर तुम्ही ते पाहिले तर परमेश्वराने तुमच्यासाठी निवडलेल्या व्यतीमध्ये आवश्यक त्या इतर सर्व गोष्टी असल्याचे तुम्हाला आढळून येईल मत्तय ६:३३ मध्ये सांगितलेले तत्त्व इथेही लागू पडते : ‘ तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर हयाही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील जर तुम्ही आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष केले किंवा निर्णय घेताना त्या बाबीस द्वितीय स्थान दिले तर तुम्ही परमेश्वराच्या सर्वात उत्तम गोष्टीला मुकाल
माणसाचा जीव हा त्याचे मन, भावना आणि इच्छा यांनी युत असतो विवाहातील अनुरूपतेसाठी याबाबतही काही प्रमाणात साम्य असणे आवश्यक आहे जसे आत्म्याच्या ऐयाबद्दल आपण काटेकोर राहिलो तसे या बाबतीत आपण राहू शकत नाही या बाबतीत साम्य नसतानाही परमेश्वर विवाहाच्या बाबतीत पुढाकार घेतो या अपवादाचा आपण स्वीकार केला पाहिजे परंतु आपण या ठिकाणी सर्वसाधारण दृष्टीने विचार करीत आहोत
आत्म्यापेक्षा जीव दुय्यम असला तरी शरीरापेक्षा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून आध्यात्मिक बाबींचा विचार केल्यानंतर तरूण मनुष्याने स्वत:ला ती कशी काय दिसते? हा प्रश्न न विचारता, ती बुध्दिमत्तेच्या व भावनेच्या दृष्टीने मला कशी काय शोभते? असा प्रश्न विचारायला हवा बहुत करून एखाद्या व्यतीसाठी परमेश्वराने निवडलेला जोडीदार हा त्याच मानसिक वयाचा असतो मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा निराळे असू शकते काही लोक २५ वर्षे वयाचे असताना ते १५ वर्षाच्या मुलांसारखे वागतात त्यांचा मानसिक व भावनात्मक विकास त्यांच्या शारीरिक विकासाशी जुळत नसतो कोणत्या आजारामुळे किंवा वैगुण्यामुळे नव्हे, तर कदाचित ते आपल्या पालकांवर फारच अवलंबून राहिल्यामुळे किंवा दुसऱ्या कोणत्यातरी परिस्थितीमुळे तसे झालेेले असतात
आपण मानसिक वय का लक्षात घेतले पाहिजे याला अनेक कारणे आहेत संभाषण हा वैवाहिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे दोन्ही जोडीदारांमध्ये अगदीच कमी किंवा काहीच समान रूचीच्या गोष्टी नसल्या, तर त्यातून मानसिक ताण व नैराश्य निर्माण होईल त्यामुळे सर्वसाधारण आवडींना जास्त वाव पाहिजे, कारण वैवाहिक जीवन ही काही महिन्यापुरती बाब नसून अनेक वर्षांचा तो प्रश्न असतो तसेच एकापेक्षा दुसऱ्याची बौध्दिक योग्यता जर फारच कमी प्रतीची असेल, तर ते वैवाहिक जीवन अनैसर्गिक होऊन जाईल जर पत्नी ही बौध्दिकदृष्टया फारच उच्च पातळीवर असेल, तर तिच्या नवऱ्यावर दु:खच कोसळेल कारण तो तिच्या हातातील बाहुल्यापेक्षा अधिक काहीच बनू शकणार नाही! जर पती पत्नीपेक्षा अत्यंत कुशाग्र बुध्दिमत्तेचा असेल, तर पत्नी ही घरात असून नसल्यासारखी होईल अशा वेळी ती घरातील दासीसमान होऊन बसेल या नियमाला काही अपवाद नसतील असे काही मला म्हणावयाचे नाही, किंवा मी असेही सुचवीत नाही की, दोघांचीही बुध्दिमत्तेची पातळी अगदी समान असली पाहिजे परंतु मी असे निश्चित सांगेन की, तुम्ही जर तत्त्वज्ञानी असाल, तर परमेश्वर काही तुम्हांला अशिक्षित खेडवळ तरूणीशी विवाह करण्यासाठी मार्गदर्शन करणार नाही, मग आध्यात्मिकदृष्टया ती कशीही असो पत्नी ही आपल्या पतीला साजेशी मदतनीस असावी म्हणून आपल्या पतीच्या जीवनात आणि कामात सहकार्य करण्यास ती समर्थ असण्याइतपत तिचा दर्जा असायला पाहिजे
एएनट्रिटन आपल्या ‘थहेीश थेीश्रव?‘ या पुस्तकात याबाबत उत्कृष्टपणे विवेचन करणारे उदाहरण सांगतात ते म्हणतात, एका उच्च सुसंस्कृत माणसाचे दु:ख लेखकाला चांगलेच आठवते तो जवळजवळ वीस वर्षांचा असताना त्याचे तारण झाले, तेव्हा त्याने ख्रिस्ती तरूणीशीच विवाह करावा ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे असे त्याला वाटले त्याने अगदी अशिक्षित तरूणीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला आणि अशा उमद्या तरूणाला नकार द्यावा असे तिलाही वाटले नाही थोडयाच काळानंतर त्यांना आढळून आले की, त्यांच्यामध्ये मानसिक ताण आणि संघर्ष निर्माण झालेला आहे ती कधी काही वाचतच नसे, तर उलट, तो पुस्तकातील किडा होता तो सुशिक्षित आणि फार तत्त्वचिकित्सक होता, तर तो स्वयंसिध्द आणि अंतर्ज्ञानाने चालणारी होती ते दोघे एकमेकांवर प्रेम करीत होते आणि खरे ख्रिस्ती होते, परंतु त्या दोघांच्या मानवी स्वभावात फारच थोडे साम्य होते त्याचा परिणाम म्हणजे दीर्घ काळपर्यंत त्यांच्यात मानसिक ताण व अडचणी निर्माण झाल्या अशा स्थितीत एखादा ख्रिस्तीतरांचा विवाह उद्ध्वस्त झाला असता त्यात त्या माणसाला सर्वात अधिक गोंधळून जाण्याचे कारण म्हणजे त्याच्या समस्येवर प्रार्थना काही उपयुत ठरत नव्हती परंतु आपल्या अडचणी, आणि विशेषत: ज्या आपणच स्वत: निर्माण केल्या आहेत त्या टाळण्याची पध्दत म्हणजे प्रार्थना नव्हे प्रार्थनेचा तसा हेतूच नाही शेवटी त्याला एका अनुभवी धर्मगुरूंनी सल्ला दिला त्यांनी त्याला सांगितले की, या सर्व समस्या त्याच्याच चुकीमुळे निर्माण झाल्या असून, त्या दोघांतील मानवी अंतर भरून काढण्यासाठी एक प्रदीर्घ मुदतीचा कार्यक्रम आयोजित करायला हवा त्याकरिता पुष्कळशी प्रार्थना आध्यात्मिक कृपा ही दोन्ही बाजूंना आवश्यक होती त्याप्रमाणे त्या दोघांकडे असलेल्या नैसर्गिक देणग्या, पात्रता आणि शयता यांच्या पातळीवर कार्य करण्याची आवश्यकता होती ती वाचायला आणि पुस्तकांबाबत रूची घ्यायला शिकली, तिच्या आवडी निवडीबद्दल आस्था बाळगण्यास तो शिकला दुदैंवाने पुष्कळसे ख्रिस्ती विवाह अशाच प्रकारे अडचणीतून गेले आहेत, कारण परमेश्वराच्या योजनेत विवाह कशाकरिता आहे हे त्यांना समजले नव्हते (किंवा त्यांनी त्याबाबत विचार केला नाही)
वरील गोष्टींवरून हे स्पष्ट होईल की, बौध्दिक पातळीच्या समानतेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे दोन्ही जोडीदारांसाठी निष्कारण कठीण परिस्थिती आणि त्रास निर्माण करणे होय अशा प्रकारे दुर्लक्ष करणे हे आध्यात्मिकतेचे चिन्ह नाही, कारण जोडीदार हा खराखुरा सहचारी असावा हा परमेश्वराचा हेतू आहे एखाद्या मुलीचा विवाहाच्या दृष्टीने विचार करीत असता चतुर पुरूषाने स्वत:ला एक प्रश्न विचारून पहावा, तो असा की, ‘माझ्या दृष्टीने माझ्या मुलांची माता होण्याजोगी व माझ्याबरोबर प्रार्थना, चर्चा व जीवनातील समस्यातून मार्ग काढण्यास माझी सहचारी होण्यास ही मुलगी पात्र आहे का? ‘
आता आपण भावनेबद्दल विचार करू विवाहामध्ये आनंदी वातारण आणि प्रेमळ सहवास असावा म्हणून याबाबतही काही साम्य असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एखाद्या शांत आणि गंभीर प्रकृतीच्या तरूणाचे अतिशय उत्स्फुर्त आनंदी भावना असलेल्या तरूणशी जुळणे असंभवनीय आहे ती दोघेही आध्यात्मिकदृष्टया समान असली तरीही त्यांच्या प्रकृतीमध्ये असलेला फरक त्यांनी विवाह केला तर, पुष्कळशा समस्यांना कारणीभूत होऊ शकेल यावरून मला असे म्हणावयाचे नाही की आनंदी भावना असलेल्यांनी तशाच प्रकृतीच्या लोकांशी विवाह करावा त्यांचे जीवन अत्यंत अवास्तव होऊन बसेल, आणि जर शांत आणि गंभीर प्रकृतीच्या लोकांनी तशाच शांत व गंभीर लोकांशी विवाह केला, तर त्यांची घरे स्मशानासारखी होऊन जातील ! तरी देखील प्रकृतीमधील आत्यंतिक फरकांबद्दल विचार करणे आवश्यक आहे
खरोखर तुम्ही ज्या व्यतीचा विचार करता त्या व्यतीमध्ये विनोदबुध्दी असल्याचे पाहा असे मी सुचवितो ती व्यती विदूषक असावी असे मात्र नव्हे (ती तशी नसावी हेच उत्तम), परंतु ती व्यती स्वत:बाबतही हसण्यास समर्थ असली पाहिजे विनोदबुध्दीला वैवाहिक जीवनामध्ये दोन कारणांमुळे अत्यंत महत्त्व आहे पहिले म्हणजे, ती सुरक्षिततेची झडप असते तिच्यामुळे संतप्त वादविवाद टाळता येतात दुसरे म्हणजे, जी जीवनात मौज आणते जर एखाद्याला विनोद करता येत नाही अगर सहन होत नाही, तर त्याचे वैवाहिक जीवन हे अत्यंत कंटाळवाणे होऊ शकेल
जीवाचे तिसरे क्षेत्र म्हणजे इच्छा तुमच्या प्रत्येक म्हणण्याला होकार देणे हेच तिचे कर्तव्य आहे, असे जी तरूणी समजते तिचा विवाहाच्या दृष्टीने तुम्ही विचारच करू नका कारण ती केवळ यांत्रिक बाहुल्यासारखी आहे आपल्या स्वत:च्या व्यतमत्वापेक्षा प्रभावी व्यतमत्त्वाच्या स्त्रीशी विवाह करणे हे पुरूषासाठी निर्विवादपणे धोयाचे आहे याउलट, जबरदस्त, इच्छाशती असणारी स्त्री आपल्या पतीसाठी अत्यंत महान संपत्ती होऊ शकते ज्या तरूणीचा तुम्ही विवाहाच्या दृष्टीने विचार करता ती तुमच्या अधीन राहण्यास तयार असली पाहिजे, हे खरे, पण केवळ होला हो म्हणणारी ती निश्चित नसावी आपल्या पत्नीच्या विश्वासू आणि प्रामाणिक टीकेमुळे पुष्कळ पुरूष महान झाले आहेत
आफ्रिकेतील प्रेमकथा हया पुस्तकामध्ये वॉल्टर ट्रोबिश यांच्या मित्रांपैकी एकाने त्याच्या भावी पत्नीपासून कसल्या अपेक्षा कराव्या त्याबद्दल असे लिहिल्याचे मि ट्रोबिश सांगतात
परंतु दुसऱ्या जोडीदारामध्ये स्वत:ची स्वतंत्र इच्छा असून ती व्यवहारामध्ये आणण्याची त्याची तयारी असेल तरच हे शय होईल पुरूषाला दासीची आवश्यकता नाही तर बरोबरीच्या सहचारीची आहे
शरीर हे देखील परमेश्वराच्या निर्मितीचाच एक भाग आहे, म्हणून विवाहाचा विचार करीत असताना मनुष्याच्या शरीराच्या विविध भागांचा विचार करणे अत्यावश्यक आहे जे आपल्या वासनेच्या पूर्तीसाठीच केवळ विवाह करतात किंवा विवाह म्हणजे जणू काही कायदेशीर व्यभिचार आहे असे समजतात, अशा टोकाला आपल्याला जावयाचे नाही त्याच वेळी, शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फत अध्यात्मालाच महत्त्व देण्याच्या टोकालाही आपल्याला जावयाचे नाही या दोन अंतिम टोकांमधील मार्ग पवित्र शास्त्रात दिला असून आपण तो स्वीकारावा अशी परमेश्वराची अपेक्षा आहे
ज्याअर्थी आपण केवळ देहविरहित आत्मे नसून मानव आहोत, त्याअर्थी विवाहाने बांधल्या जाणाऱ्या दोन जोडीदारांमध्ये काही प्रमाणात शारीरिक आकर्षण हे असणारच शारीरिक सौंदर्याकडे आकर्षित होणे यात चूक असे काहीच नाही, मात्र त्याचे स्थान आत्मा आणि जीव यांच्यानंतर असले पाहिजे तथापि जो शारीरिक आकर्षणाला अवास्तव महत्त्व देतो किंवा कातडीच्या रंगाला अधिक महत्त्व देतो त्याला परिणामी विवाह हा अत्यंत निराशाजनक असल्याचे आढळते जर एखाद्या मुलीकडे सुरूवातीला तुम्ही तिच्या आध्यात्मिकतेमुळे नव्हे, तर शारीरिक सौंदर्यामुळे आकर्षित झाला असाल, तर ती मुलगी विासणारी असली, तरीही विवाहानंतर अनेक समस्या तुमची वाट पहात असल्याचे तुम्हांला दिसून येईल पुष्कळ वेळा सैंदर्यवान तरूणी ही साधारणपणे स्वत:च्या सौंदर्याच्या जाणिवेत दंग असणारी आणि पुष्कळशा पुरूषांचे लक्ष वेधून घेण्यास सरावलेली असते तेव्हा तिच्या पतीने विवाहानंतर तिच्याकडे असेच लक्ष द्यावे अशी साहजिकच तिला अपेक्षा असते मग तुम्हांला कळून येईल की, तुमची सौंदर्यवान पत्नी तुमच्या वेळेची व सतत तिच्या सौंदर्याची दखल घेण्याबद्दल तुमच्याकडून अवास्तव मागणी करीत आहे
वय हा लक्षात येण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याअर्थी पतिपत्नी यांचे नाते हे ख्रिस्त आणि मंडळी यांच्या नात्याचे प्रतिक आहे आणि ज्याअर्थी पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे, त्या अर्थी पुरूष हा वयाने मोठा आणि उभयतांमध्ये अधिक परिपव असावा हे तर्कदृष्टया सुसंगत आहे पुरूष हा स्त्रीपेक्षा मंद गतीने परिपव होत असतो आणि तो जर लहान असला तर आपल्या पत्नीपेक्षा मी परिपव असण्याची शयता आहे ते ठीक नव्हे कारण स्त्रीने सदैव आपल्या पतीकडे सन्मानपूर्वक दृष्टीने पाहिले पाहिजे पुरूष जेव्हा वयाने मोठा असतो तेव्हा जगातील अनेक व्यावहारिक अनुभव त्याला आलेले असतात, हा एक त्याचा फायदा होतो तरीही पुरूष वयाने मोठा असण्याचे दुसरे एक कारण म्हणजे स्त्री पुरूषापेक्षा अधिक लवकर वयस्कर होऊ लागते विशेषत: मुलांच्या जन्मानंतर,अणि म्हणून जर ती वयाने मोठी असेल, तर मध्यम वयाचे झाल्यावर त्या दोघातील फरक अगदी स्पष्टपणे दृष्टीस येईल या गोष्टी लक्षात घेता, पुरूषाने आपल्यापेक्षा वयाने मोठया असलेल्या स्त्रीशी विवाह करू नये हेच उत्तम
काही लोकांवर इतरांपेक्षा वयातील फरकाचा परिणाम अधिक होतो, त्या अर्थी या नियमालाही काही अपवाद असू शकतात जर वयाने मोठया असलेल्या तरूणीशी विवाह करण्याचा विचार असेल, तर वयातील हे अंतर दोन किंवा तीन वर्षांपेक्षा अधिक नसावे ते जर जास्त असेल तर मग ती स्त्री तिच्या नवऱ्याची पत्नी दिसण्यापेक्षा माताच शोभेल ! कोणत्याही परिस्थितीत स्त्रीने स्वत:पेक्षा कमी परिपव असलेल्या पुरूषाशी विवाह करू नये त्याचप्रमाणे तरूणींनी आपल्या पेक्षा दहा वर्षापेक्षा अधिक मोठया असलेल्या पुरूषाशी विवाह करू नये कारण तो तिचा पती शोभण्यापेक्षा पिताच शोभून दिसेल ! वयाच्या बाबतीत असे नियम काही घालून देता येणार नाहीत तथापि पुरूषाने २५ ते ३२ या वयाच्या दरम्यान विवाह करणे उचित आहे २५ व्या वर्षापूर्वी तो अपरिपव असतो आणि त्याने या काळात कोणत्याही प्रकारे अडथळा न आणता परमेश्वराच्या कार्याला वाहून घ्यायला हवे ३२ व्या वर्षानंतर मात्र त्याला पुष्कळशा गोष्टीत तडजोडी (ज्या विवाहामध्ये अटळ असतात) करणे अधिक कठीण होऊन बसते, कारण त्याच्या सवयींमध्ये व मार्गामध्ये तो पूर्ण रूळलेला असतो याच कारणासाठी तरूणींनी २० ते २७ या वयाचे दरम्यान विवाह करावा हे उत्तम हे काही काटेकोर नियम नाहीत, कारण परिस्थितीनुरूप किंवा दुसऱ्या कुठल्या कारणास्तव माणसाला उशिरा लग्न करणे भाग पडते परंतु जेव्हा निवड करणे तुमच्या हाती असते तेव्हा या वयोमर्यादेतच ती करणे उत्तम होय
प्रकृतीसंबंधीच्या गोष्टी, शरीराची सर्वसाधारण प्रकृती आणि अनुवंशिकता (ज्यांचा मुलावर परिणाम होऊ शकतो) या गोष्टींचाही विचार करायला हवा त्यासाठी प्रत्येक व्यतीने अनुवंशिक दोष, रोग किंवा स्वत:ला किंवा आपल्या जवळच्या नात्यातील कोणालाही असलेले मानसिक रोग असल्यास अगदी प्रामाणिकपणे ते उघडकीस आणले पाहिजेत, कारण त्यांचा परिणाम पुढील पिढीवर होण्याची शयता असते ज्यावेळी या बाबतीत शंका येते त्या वेळी डॉटरांचा सल्ला घेऊन निश्चित मत ठरविणे उत्तम होय अशा प्रकारच्या विकृतीमुळे विवाहात अडथळा निर्माण व्हावाच असे नाही कारण हा विवाह परमेशराच्या इच्छेनुसार होत असतो असा विास दुसरा जोडीदार धरीत असेल, तर या शारीरिक विकृतींना बरे करण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी तो परमेश्वरावर श्रध्दा ठेवील परंतु अशा प्रकारची कोणतीही गोष्ट लपवणे हे चुकीचे व पापमय आहे विवाहापूर्वी अशा प्रकारच्या लपवलेल्या गोष्टी नंतर उघडकीस आल्यामुळे पुष्कळसे विवाह तुटले आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये विश्वासणाऱ्याने कपटाने वागणे योग्य होणार नाही तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही आपला जोडीदार गमावून बसाल अशी भीती तुम्ही बाळगण्याचे कारण नाही उलट पक्षी, तुमच्या प्रामाणिकपणामुळे तो कदाचित तुम्हांला अधिक मान देईल तुमच्या प्रामाणिकपणामुळे त्याने जर तुम्हांला तोडले, तर विश्वास ठेवा की तुम्ही परमेश्वराचा आदर धरला असून तो तुम्हाला दु:खी ठेवणार नाही जेव्हा तो अशा प्रकारे नाते तुटण्याचा प्रसंग येऊ देतो, तेव्हा त्यापेक्षाही श्रेष्ठ असे कोणीतरी तुम्हांला देण्याचा त्याचा हेतू असतो
निकटच्या नात्यातील व्यतीशी विवाह करणे अत्यंत धोयाचे आहे त्याचे कारण म्हणजे त्या व्यतीमध्ये असलेल्या अपवादात्मक गोष्टी त्यांच्या मुलाबाळांमध्ये येतात कारण त्याचा जोडीदार निकटच्या नात्यातील असतो (आणि त्याच अपवादात्मक गोष्टी त्याच्यातही असतात) जवळच्या नात्यातील कोणीही परस्परांशी विवाह करण्याला प्रतिबंध करावा अशी परमेश्वरानेच मानवी स्वभावाची घडण केली आहे हे लक्षात घ्या पवित्र शास्त्रात अशा विवाहांना मनाई केली आहे (लेवीय १८:६)
भारताच्या काही भागांमध्ये तरूण पुरूषाने आपल्या थोरल्या बहिणीच्या मुलीशी (जेव्हा ती मुलगी विवाहयोग्य वयाची असते), विवाह करण्याची प्रथा आहे ही विधर्मी लोकांची प्रथा आहे आणि कोणत्याही विश्वासणाऱ्याच्या विचारांवर तिने पगडा बसवता कामा नये ते सर्वस्वी निसर्गाविरूध्द आणि पवित्र शास्त्राविरूध्द आहे अशा घडलेल्या एका गोष्टीत मी पाहिले की, अशा जोडप्यांना झालेली सर्व मुले कोणत्या ना कोणत्या तरी दृष्टीने विकृत होती जेव्हा खुद्द परमेश्वर कोणत्या तरी गोष्टीला मनाई करतो, तेव्हा त्याच्या तशा करण्यामागे काही तरी चांगली कारणे असतात, याची खात्री आपण बाळगली पाहिजे
जर परमेश्वर एखाद्या व्यतीशी विवाह करण्यासाठी तुमचे मार्गदर्शन करतो तर तो तुम्हांला नेहमीच त्या व्यतीसाठी प्रेम देईल अशा प्रेमाचे काय गुणधर्म असतील याचा आपण तिसऱ्या प्रकरणातच विचार केलेला आहे विवाहापूर्वी व्यतीच्या मनातले प्रेम वाढत असेल किंवा ते वाढलेले नसेलही, पण मनात ते प्रेम उपजतच असते इसहाकाने रिबकेला पूर्वी केव्हाही पाहिले नव्हते तरी त्याची देवाने निवडलेली वधू म्हणून त्याने तिचा स्वीकार केला,तेव्हा आपल्याला सांगण्यात आले की, त्याने तिच्यावर प्रेम केले (उत्पत्ती २४:६७) तो तिला फारसा ओळखत नव्हता तरीही त्यात परमेश्वराची इच्छा आहे याची त्याला खात्री होती, आणि म्हणून तिच्यासाठी त्याच्या ह्दयात प्रेम निर्माण झाले
परमेश्वराने जसे इसहाकाला मार्गदर्शन केले तसे सहसा तो कोणत्याही व्यतीला, जिच्याविषयी काहीच माहित नाही अशा व्यतीशी विवाह करण्यासाठी मार्गदर्शन करीत नसतो याच्याशी मी सहमत आहे परंतु तद्वतच तो या प्रकरणाप्रमाणे अत्यंत स्पष्ट रीतीने आपली इच्छाही प्रगट करीत नसतो या घटनेतून जो प्राथमिक धडा घ्यावयाचा तो हा की ज्या व्यतीशी तुम्ही विवाह करता ती व्यती परमेश्वराने तुमच्यासाठी निवडलेली असेल, तर तिचा परिचय तुमच्या पालकांद्वारे किंवा प्रत्यक्षपणे झालेला असो (जसे त्याने इसहाकाच्या बाबतीत केले तसे ) परमेश्वर तिच्यासाठी तुमच्या अंत:करणात प्रेम निर्माण करील हे प्रेम अर्थातच दोघांनाही एकमेकांबद्दल वाटेल
हुकूम दिल्याबरोबर प्रेम निर्माण करता येत नाही! ते ह्दयात उत्स्फूर्तपणे उत्पन्न न होता बळजबरीने निर्माण झाले तर ते खरे प्रेम केव्हाही असणार नाही खरे प्रेम हे एखाद्या व्यतीबद्दल असलेल्या आदरातून उमलते जर तुम्ही एखाद्या व्यतीचा आदर करीत नाही आणि कौतुक करीत नाही, तर तुम्ही त्याच्यावर किंवा तिच्यावर खरेखुरे प्रेम करू शकणार नाही सहानुभूतीला चुकूनही प्रेम समजू नका एखाद्या मुलीच्या दुदैंवी परिस्थितीची कणव येऊन सहानुभूतीपोटी जर तुम्ही तिच्याशी विवाह केला,तर ते अत्यंत मूर्खपणाचे ठरेल तुम्हांला ते र्शार्याचे आणि स्वार्थत्यागाचे कृत्य वाटेल, परंतु तुमच्या अंत:करणात तिच्याविषयी जर खरे प्रेम नसेल तर तुमचा विवाह भंग होऊ शकेल प्रत्येक ख्रिस्ती विवाहामध्ये प्रेम ही अत्यंत आवश्यक बाब आहे केवळ सहानुभूती आणि दया या पुरेशा नसतात
जर एखाद्या मुलीच्या आध्यात्मिक जीवनाचा, निश्चित मतांबद्दलच्या धैर्याचा आणि तिच्या बौध्दिक पात्रतेचा तुम्ही आदर करीत नसाल आणि तिच्याबद्दल कौतुकाचे विचार तुमच्या मनात नसतील तर पुढे जाणे व्यर्थ आहे पवित्र शास्त्र सांगते की जगातील सर्वात महान गोष्ट प्रेम आहे (१ करिंथ १३:१३) आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही
तुम्ही जीवनाचा जोडीदार शोधता तेव्हा आतापर्यंत जे काही सांगितले त्याशिवाय आणखी काही गोष्टी पाहणे आवश्यक आहे
त्यापैकी एक म्हणजे वंश होय विासणाऱ्यांनी दुसऱ्या वंशातील व्यतीशी विवाह करणे योग्य आहे काय ? वंशविषयक भेदाबद्दल पवित्र शास्त्र काय सांगते? कलस्सै ३:११ सांगते, हयांत (म्हणजे नव्या जीवनामध्ये) हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही, आणि सर्वात आहे (फत व्यती ख्रिस्ती आहे का यालाच महत्त्व आहे) गलती ३:२८ मध्ये आपण वाचतो की, ‘यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरूष व स्त्री, हा मतभेद नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहा ‘
या वचनातून आपण निर्विवादपणे हे शिकतो की, परमेरासमोर आपला स्वीकार होणे यात आपण कोणत्या वंशातून आलो आहोत यामुळे काही फरक होत नाही मंडळीच्या सहवासातील आपण एकमेकांना देत असलेली वागणूक वंशभेदामुळे पक्षपाताची असेल तर ते पूर्णपणे अयोग्य आहे परंतु वंशामध्ये बिलकूल फरक नाही असा त्याचा अर्थ नव्हे (वर उल्लेख केलेल्या) गलती ३:२८ या वचनात आपणांस सांगितले आहे की, ख्रिस्त येशूच्या ठायी आपले वंशभेदच काय लिंगभेददेखील महत्त्वाचे नाहीत पंरतु लिंगामध्ये भेद नाहीत असा त्याचा अर्थ विवाहाबाबत होत नाही गलती ३:२८ या वचनाचा उल्लेख करून एक पुरूष दुसऱ्या पुरूषाशी विवाह करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही तसेच वंशामध्ये अनेक भेद असून विवाहाचा विचार करतेवेळी ते मनात ठेवायला हवेत
आंतरवंशीय विवाह हा पवित्र शास्त्राच्या दृष्टीने चुकीचा नाही परंतु या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता असलेल्या दोन इतर गोष्टी आहेत विशेषत: भारतामध्ये मिश्रवंशीय पालकांच्या मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते दुसरे म्हणजे जर एखाद्याचा जोडीदार विदेशी असला तर त्याने केलेल्या परमेश्वराच्या सेवेला (भारतामध्ये) अत्यंत अडथळे निर्माण होतात काही लोक, त्यांच्या अपरिपवपणामुळे आणि अत्यंत स्वार्थी बुध्दीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि अशा प्रकारचे विवाह करून घेतात कालांतराने त्यांना पश्चात्ताप होतो
वंशाशी संबंधित असलेली व विचार करण्याजोगी दुसरी बाब म्हणजे संस्कृती होय एखाद्या भारतीय व्यतीने परदेशी व्यतीशी विवाह केला, तर त्यामध्ये पुष्कळसे सांस्कृतिक भेद असतील व त्यामुळे परस्परांशी विवाहोत्तर जुळवून घेणे कमालीचे कठीण होऊन बसेल आणि जर ते भारतातच राहिले तर फारच कठीण होऊन बसेल भारतातील एका भागातील व्यतीने आपल्यापेक्षा निराळी पार्श्वभूमी असलेल्या दुसऱ्या भागातील व्यतीशी विवाह केला तर वरील गोष्ट त्याच्याही बाबतीत खरी ठरेल, पण काहीशा अल्प प्रमाणात अशीही काही उदाहरणे असू शकतील की त्यात अगदी सहजगत्या सांस्कृति भेदांवर मात करण्यात आली असेल आणि अशा वेळी जरी दोन व्यती भारताच्या भिन्न भिन्न प्रांतातील असल्या आणि भिन्नभिन्न भाषा बोलणाऱ्या असल्या तरी त्यांचा विवाह व्हायला काहीच हरकत नाही परंतु सर्वसामान्य भाषा एक असणे अत्यंत श्रेयस्कर आहे जर उभयता एखादी भाषा सफाईदारपणे बोलत असतील, तर त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही परंतु दोघांपैकी एकाला दुसऱ्याला परिचित नसणारी भाषा जर सातत्याने वापरावी लागली, तर मात्र फारच कठीण होऊन बसेल या बाबतीत कायम राहण्याच्या ठिकाणाबद्दलचा विचारही अत्यंत महत्त्वाचा आहे सुरूवातीपासूनच, अशा विवाहाच्या बाबतीत हे एक लक्षात ठेवले पाहिजे की, एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीवर सतत प्रभुत्व गाजवीत राहील
भारताच्या बहुसंख्य भागात विवाहाचा निर्णय होताना जातीला प्राधान्य दिले जाते जातीय पध्दत ही अत्यंत तिरस्करणीय अशी ख्रिस्तीतर लोकांची शिकवण असून अर्धवट परिवर्तन झालेल्या ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती समाजामध्ये ती आणली आहे ख्रिस्ताने सर्व जातिभेद काढून टाकले असल्याने, विश्वासणाऱ्याने केवळ जताीमधील फरकास्तव विवाहाचा प्रस्ताव नाकारता कामा नये विवाहाच्या वेळी जातीमुळे प्रभावित झालेली व्यती परमेराचे मूल होण्यास लायक नाही कारण त्या व्यतीवर अद्याप ख्रिस्तीतर धर्माद्वारे उत्पन्न केलेल्या मेदांचे नियंत्रण आहे तरीही वंश, संस्कृती, भाषा आणि जाती यांच्या मर्यादा उल्लंघून केवळ ख्रिस्ती लोक या भेदभावाच्या विरूध्द व या कोत्या विचारांच्या पलीकउचे आहेत एवढेच केवळ दर्शविण्यासाठी विवाह करता कामा नये
विवाह ठरवताना समोरच्या व्यतीची संपत्ती किंवा त्याचया कुटूंबातील सामाजिक संबंध लक्षात घेऊन तो ठरवता कामा नये जे स्वत:ला विासणारे म्हणवतात त्यांनी अशा गोष्टींमुळे प्रभावित व्हावे हे लज्जास्पद आणि कमीपणाचे आहे !
आपल्या देशातील आणखी एक घृणास्पद पध्दत म्हणजे हुंडा मागण्याची पध्दत ही हुंडयाची पध्दत (जी भारतात प्रचलित आहे) अर्थातच ख्रिस्तीतर जातीतून उत्पन्न झालेली आहे ती विवाहातील वैयतक नात्याकडे दुर्लक्ष करून त्याला य:कश्चित व्यवहाराचे स्वरूप देते विास न ठेवणाऱ्यांमध्ये (त्यात नामधारी ख्र्रिस्ती लोकांचाही समावेश होतो) अशी पध्दत असणे हे समजण्यासारखे आहे कारण ते आध्यात्मिकदृष्टया अंध असून त्यांचे जीवन लोभाच्या अधीन असते परंतु पुष्कळसे विश्वासणारे त्यातील काही स्वत:ला जगापासून निराळे असे आणि नव्या कराराच्या आदर्शाप्रमाणे चालणारे मानताततेही अशा पध्दती पाळतात तेव्हा काय म्हणावे ? खरेच, सैतानाने त्यांना अंध करून टाकले आहे मुलाच्या पालकांनी केेलेली हुंडयाची अवास्तव मागणी मुलीच्या पालकांना पुरी करता न आल्यामुळे पुष्कळसे विवाह मोडले आहेत आपल्या देशातील कितीतरी तरूणींच्या भावना या पध्दतीपायी दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांना निराशेने ग्रासले आहे
विवाहाच्या बाबतीत केवळ सौदेबाजी करणाऱ्या लोकांचा न्याय परमेश्वर अत्यंत कठोरपणे करील हा न्याय परमेश्वराच्या घरात, जे नव्याने जन्मले आहेत असे सांगतात त्यांच्यामध्ये सुरू होईल मंडळीमध्ये ही प्रथा अजूनही चालण्याचे कारण म्हणजे विश्वासणाऱ्यांना ठाऊक असूनही त्यांनी या अन्यायी प्रथेविरूध्द चकार शब्द काढलेला नाही या बिघडलेल्या आणि कुटिल जगात परमेश्वराच्या बाजूने ज्यांनी उभे रहावे, ते स्वत:चे बिघडले आहेत व कुटिल बनले आहेत ही किती दु:खाची गोष्ट आहे! देवाला संतुष्ट करू इच्छिणाऱ्या विश्वासणाऱ्याने हुंडा मागायला नको व घ्यायला नको
आम्ही स्वत: काही हुंडयाची मागणी केली नाही, तर ती आमच्या पालकांनी केली अशी सबब दाखवून स्वत:वर दोष येऊ न देण्याचा प्रयत्न काही विश्वासणारे करतात परंतु जर त्यांचे ठाम मत बनलेले आहे तर मग त्यांच्या पालकांनी कसल्याही परिस्थितीत हुंडा स्वीकारू नये असे ते का सांगत नाहीत ? त्याचे सरळ कारण म्हणजे गुप्तपणे तेही हुंडयाची अपेक्षा करीत असतात जर आपल्याला हुंडयाची पध्दत चुकीची असल्याचे पटलेले असेल तर आपण सत्य सांगून त्याविरूध्द बोलावे अशी परमेश्वराची अपेक्षा आहे इतर बाबतीत मनोनिग्रह करणारे हुंडयाच्या बाबतीत मात्र आपले मत प्रकट करताना गुळमुळीतपणे वागतात हे एक आश्चर्यच आहे
काही लोक असे म्हणतील की त्यांच्या पालकांनी त्यांच्या शिक्षणासाठी पुष्कळ पैसा खर्च केला, तेव्हा हुंडयाच्या रूपात तो मुलीच्या पालकाकडून स्वीकारणे योग्यच आहे काही लोक हुंडा मागण्याचे असे समर्थन करतील की त्यांच्या बहिणींच्या विवाहाच्या वेळी हुंडा देण्यासाठी त्यांच्या पालकांना पैशाची आवश्यकता आहे परंतु हुंडा पध्दत परमेश्वराला आवडत नाही हे आपणांस माहीत असल्यावर वरील सारी विधाने व्यर्थ ठरतात तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले, तर तो तुम्हांला केव्हाही निराश करणार नाही, याची मात्र खात्री बाळगा जर तुम्ही त्याचा आदर केलात तर तोही तुमचा आदर करील आणि तुमच्या कुटूंबियांच्या गरजाही पुरवील (१ शमु २:३०)
दुसरे कदाचित विचारतील की, जर मुलीचा बाप देणगी म्हणून आनंदाने देत असेल, तर ते घ्यायला काय हरकत आहे? त्यात खरोखरच काही चूक नाही परंतु कोणी आपल्या लोभास्तव तशी सबब सांगू नये, अशा परिस्थितीमध्ये सर्व तरूण पुरूषांनी पुढील तीन प्रश्नांची प्रथम उत्तरे द्यावीत :अ) हा पैसा सदर विवाहाबद्दल निर्णय घेण्यासाठी एक बाब (मग ती कमी महत्त्वाची असली तरीही) समजण्यात आली काय? ब) विवाह नकी ठरल्यानंतर तुम्ही किंवा तुमच्या प्रतिनिधींनी (म्हणजे पित्याने किंवा नातेवाईकांनी) पैशाची मागणी केली काय? क) (मुलीला किंवा तुम्हाला ) पैसा दिला जावा अशी तुमची गुप्त इच्छा होती काय?
जर या तिन्ही प्रश्नांपैकी एकाचे उत्तर होय हे असेल, तर तुम्ही कितीही सबबी सांगून त्यावर पडदा टाकला, तरी नकीच लोभात फसलात अशा प्रसंगी आपण विश्वासणारे असतानाही आपला उपदेश व आपली वर्तणूक यांत कमालीचा फरक आहे हे सर्वांना समजून चुकते ख्रिस्ती लोक काहीही प्रचार करोत, परंतु पैशाचा प्रश्न येताच सर्वांचा धर्म एकच आहे असे नास्तिक लोक बोलतात, त्यात आश्चर्य मानण्याचे काहीच कारण नाही आपल्या आचरणामुळे ख्रिस्ती लोकांविरूध्द असे आरोप करण्याची संधी देणाऱ्या विासणाऱ्यांचा धिकार असो
हया हुंडयाच्या पध्दतीचा तीव्र निषेध केल्यामुळे अनेक लोकांना चीड येते परंतु त्यांनी याचे स्मरण ठेवावे की, ती पध्दती माणसाच्या लोभी स्वभावातून निर्माण झाली आहे पवित्र शास्त्र त्याला मूर्तिपूजा म्हणून संबोधते (कलसै३:५) जुन्या करारामध्ये मूर्तिपूजेची किती कडक निंदा केली आहे ते नुसते वाचूनच परमेश्वराला तिचा किती तिटकारा आहे याची कोणालाही कल्पना येते जुन्या भविष्यवाद्यांनी तिची कडक निर्भर्त्सना केली होती परमेश्वर ज्याचा तिरस्कर करतो, त्याबाबत बोलताना त्यांनी काही सौम्य शब्द उच्चारले नाहीत
विवाहाचा निश्चय करण्यापूर्वी चर्च आणि धर्मसिध्दांत यांच्याबद्दल विचार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे चर्चमधील सहभागिता आणि बाप्तिस्मा याबाबतीत सहमत व्हावे नाही तर नंतर समस्या उद्भवतील एकाला आपल्या मुलांचा बाप्तिस्मा ती मुले लहान असतानाच करावासा वाटेल तर दुसऱ्या जोडीदाराला तसे वाटणार नाही विवाहानंतर या मदुद्यावर भांडत बसण्यापेक्षा विवाहापूर्वीच ते योग्यच होते, कारण त्याचे वर टिकून राहते तर दुसऱ्या माणसाचे कोसळते (मत्तय ७:२४२७) परमेश्वराच्या इच्छेवर उभारलेला विवाह जीवनातील प्रत्येक वादळाशी सामना करतो तेव्हा तुम्ही तुमचे घर बांधायला सुरूवात करण्यापूर्वी परमेश्वराची इच्छा काय आहे त्याची खात्री करा, त्याची प्रतीक्षा करा व नंतर श्रम करा म्हणजे ते योग्य ठरतील
म्हणूनच समतोल विचारांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एकमेकांचे नाते लक्षात घेऊन या प्रकरणात उल्लेख केलेल्या प्रत्येक गोष्टीला योग्य ते महत्व दिले पाहिजे काही विश्वासणारे अपयशी होतात, कारण ते काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, तर काही विशिष्ट गोष्टींना अवास्तव महत्त्व देतात आणि नंतर विषम विचारांच्या स्थितीस पोचतात इतर काही लोक आपल्या बुध्दीने काम करण्यापूर्वीच भावना वाहवत जाऊ देण्याची चूक करतात परिणामी त्यांची परीक्षण करण्याची शती बोथट होते आणि दुसऱ्या व्यतीबद्दलचे तंतोतंत अनुमान काढणे त्यांना सर्वथा अशय होऊन बसते त्यामुळेच जे आपल्या निवडीबाबत समतोल निर्णय घेत नाहीत अशा विश्वासणाऱ्यांच्या विवाहांपेक्षा अविश्वासणाऱ्या परंतु सुज्ञ व्यतींचे विवाह कित्येकदा सुखी ठरू शकतात
जेव्हा तुम्हाला स्वत:ला परमेश्वराच्या इच्छेबद्दल शंभर टके खात्री नसते तेव्हा तुम्ही स्वत:ला, तुमचे मित्र, नातेवाईक, हितचिंतक किंवा परमेश्वराचे सेवक जरी असले तरी यापैकी कोणाच्याही आग्रहास्तव विवाहपाशात ढकलून देऊ नका अशा परिस्थितीत धीर धरणे हेच उत्तम होय जर तुमचे अंतर्मन तुम्हांला मागे ओढत असल्याचे भासत असेल तर पुढे जाऊ नका थांबा, अशा प्रकारच्या पवित्र आत्म्याकडून होणाऱ्या थोपवणुकीकडे लक्ष द्या, म्हणजे नंतर तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही
भारतीय संस्कृती एकमेकांनी संकेत भेट घेण्यास व (काही ठिकाणी तर) एकमेकांशी बोलण्यासही परवानगी देत नाही अशा परिस्थितीमध्ये विरूध्द लिंगी व्यतीचा परिचय आपण कसा करून घेऊ शकू असा प्रश्न काहींना पडत असेल परंतु मुलीशी संभाषण करून किंवा तिला भेटल्यानंतर आपण तिच्याबद्दल सर्व काही जाणू शकतो असा जर विचार कोणी करीत असेल तर तो सपशेल चुकीचा आहे जिथे समय देऊन भेटण्याची प्रथा अगदी तरूण वयातच सर्वसामान्य झालेली आहे आणि जिथे प्रत्येक व्यती आपल्या जोडीदाराची निवड करते त्या पाश्चात्य देशातील हजारो घटस्फोटांकडे आपण फत दृष्टिक्षेप टाकला तरी संकेत भेट हा काही पूर्ण परिचयाचा मार्ग होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात येईल त्यावर एकच उपाय आहे व तो म्हणजे तरूण किंवा तरूणी यांच्या खऱ्या चारित्र्याबद्दल मार्गदर्शन करण्याची परमेश्वराला विनंती करणे हा होय दुसऱ्या विश्वासणाऱ्यांकडून त्या तरूण वा तरूणीबद्दल तुम्ही शय ती सर्व माहिती काढण्यासाठी प्रयत्न करावा कारण याच तऱ्हेने तुम्ही याबाबत बुध्दी पुरस्सर प्रार्थना करू शकाल तुम्ही योग्य व्यतीची निवड करावी म्हणून तुमच्यापेक्षाही परमेश्वर अत्यंत उत्सुक असल्यामुळे कोणत्याही सांस्कृतिक रूढींचे बंधन असले तरी तो त्या व्यतीबद्दलची आवश्यक ती सारी माहिती तुम्हांला मिळणे शय करील परमेश्वराने तुमच्यासाठी तसे करावे म्हणून त्याच्यावर श्रध्दा ठेवा त्याला काहीही अशय नाही तुमच्या अविश्वासामुळे त्याला मर्यादा घालू नका (मत्तय १३:५८)
परमेश्वराची इच्छा जाणून घेतल्यानंतर (विशेषत: आपल्या हया देशात) आपल्या पालकांकडून किंवा दोन्हीकडील सामान्य मित्रांकडून विवाहाची इच्छा व्यत करणे शहाणपणाचे आहे जर अपेक्षित व्यतीने तुमची इच्छा अमान्य केली तर ? अशा वेळी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे धरी धरून प्रार्थना करणे कोणत्याही मार्गाने याबाबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका काही काळ थांबूनही जर दुसऱ्या व्यतीने तुम्हांला तिच्या जीवनाचा जोडीदार म्हणून पत्करण्याचे नाकारले, तर मात्र तुमच्या मार्गदर्शनात तुम्ही चुकला याची खात्री बाळगा जर परमेश्वराची खरोखरच इच्छा असेल तर तो दुसऱ्या व्यतीलाही त्याबद्दल अवश्य पटवून देईल जर मार्गदर्शनाचा अनुभव तुम्हाला एकटयालाच आलेला असेल, तर तुम्हांला मिळालेले मार्गदर्शन हे निश्चित परमेश्वराकडून आलेले नसावे परमेश्वराने नियुत केेलेल्या वेळेपर्यंत जर तुम्ही प्रतीक्षा कराल तर त्याने तुमच्यााठी निवडलेल्या व्यतीला तो तुमच्या मार्गावर आणून सोडील आणि अशा परिस्थितीत ती किंवा तो जसे रिबकाने म्हटले (उत्पत्ती २४:५८) तसे हो म्हणेल
परमेश्वराने जी व्यती तुमच्यासाठी निवडली आहे असे तुम्हाला वाटते त्या व्यतीला तुमच्या पालकांनी नकार दिला तर काय करावे? अशा प्रसंगी तुम्ही पहिले पाऊल कोणते उचलाल तर तुमच्या पालकांची समजूत घालण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करणे हे होय तुम्ही याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्पष्टीकरण नंतर तुम्ही त्यांना करावे तुम्ही त्यांच्याबोबर मन मोकळेपणाने वागले पाहिजे त्यांना केव्हाही कमी लेखू नका कारण त्यांच्या शहाणपणाच्या सल्ल्यामुळे पुढे बरीच मदत होणार असते ते पुरातन वृत्तीचे आहेत असे जरी तुम्हांला वाटले, तरी त्यांना तुम्ही तसे सांगता कामा नये त्यांना तुम्ही आदर व प्रेम व्यत करा विवाहातील अनेक अडचणीतून तुम्हाला वाचवण्यासाठी परमेश्वर त्यांचा उपयोग् करील
पवित्र शास्त्र म्हणजे, तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृध्द झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानितो, वाग्दंड लक्षात ठेवितो तो शहाणा होतो (त्यांचे सर्व शिक्षण तू) आपल्या उराशी कवटाळून घर तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील, तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे, बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे (नीति २३:२२, १५:५, ६:२१२३) ज्याचा नव्याने जन्म झाला असून जे परमेश्वरासह चालतात, त्याच पालकांच्या बाबतीत हे सर्व काही पूर्ण खरे आहे तरी पण, ते तारण पावलेले नसले तरी त्यांचा सल्ला तुम्हांला पुष्कळ वेळा उपयुत होईल
पालकांची संमती हा मोठा आशीर्वाद असून शय असेल त्या प्रत्येक ठिकाणी ती संपादन केली पाहिजे तुमचे पालक विश्वासणारे असतील तर त्यांनी संमती देईपर्यंत तुम्ही थांबले पाहिजे काही वर्षे थांबावे लागले तरी ! जेव्हा ते संमती नाकारतात तेव्हा तुम्हीसुध्दा तुम्हाला झालेले मार्गदर्शन पुन्हा तपासून पहावे तुम्ही तसे केले तर परमेश्वर तुमचा आदरच करील तो सर्वश्रेष्ठ आहे आणि तुमच्या पालकांचे विचार त्याच्या नियोजित वेळेत बदलून टाकण्यास तो समर्थ आहे (नीति २१:१) अनेक प्रकरणांमध्ये त्याने असे केल्याचे मला ठाऊक आहे ज्यांनी त्याचा सन्मान केला आणि तो त्यांच्या वतीने कार्य करीत आहे म्हणून प्रतीक्षा केली त्यांना त्याने सहाय्य केले आहे अधीरतेने पुढे गेल्यामुळे पुष्कळजण या अमूल्य अनुभवाला मुकले आहेत हडसन टेलरने म्हटले आहे की, परमेश्वरातर्फे विजय संपादन करा तो कोणतेही दार उघडू शकतो याबाबतची जबाबदारी पालकांची असून ती गंभीर आहेजेव्हा मुलगा किंवा मुलगी प्रामाणिकपणाने म्हणतात की ‘हे प्रभू, तू मार्ग खुला करावा म्हणून मी प्रतीक्षा करीत आहे, तेव्हा ही बाब परमेश्वराच्या हातात असते व तो ती मनावर घेतो‘ (डॉव सौ हॉवर्ड टेलर यांच्या ‘ र्कीर्वीीप ढरूश्रेी’ी डळीिर्ळीींरश्र डशलीशीं‘ मधून उद्धृत)
तथापि, जेव्हा पालक विासणारे नसतात किंवा काही वेळा विासणारे असूनही, ते ऐहिक गोष्टींच्या आधारे अयोग्य आक्षेप घेतात, तेव्हा त्यांच्या संमतीसाठी अनिश्चित काळपर्यंत थांबण्याची काही आवश्यकता नाही तरीही अशा बाबतीत एखाद्याने काही काळ तरी प्रतीक्षा करून निदान विवाहापूर्वी शय असल्यास त्यांची संमती संपादन करावी जर तुमची अगदी खात्री झाली असेल की, परमेश्वर त्यांच्या संमतीशिवाय तुम्हांला पुढे जाण्यास सुचवीत आहे, तर ही गोष्ट त्यांना नम्रतापूर्वक आणि प्रेमपूर्वक समजावून द्या तुम्ही उध्दट किंवा बंडखोर आहात असा त्यांचा ग्रह होऊ नये असा प्रयत्न करा
विवाहाबद्दल विचार करण्यास ज्यांना अजून पुष्कळ अवकाश आहे त्यांच्यासाठी मी काही सांगणार आहे अब्राहामाने इसहाक असा अर्पण केला (उत्पत्ती २२) तशी आपण विवाहाची व कौटुंबिक जीवनाची इच्छा परमेश्वराला समर्पित केली पाहिजे दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे जर ते परमेश्वराच्या गौरवासाठी असेल, तर तुम्ही आयुष्यभर अविवाहित राहण्यास तयार पाहिजे तुम्ही असा निश्चय केला व तो टिकवला, तर प्रत्येक विरूध्दलिंगी आकर्षक व्यतीकडे आपला भावी जीवनसाथी म्हणून पाहण्याच्या मोहापासून तुम्ही दूर राहू शकाल मोकळा असलेला प्रत्येक क्षण या ना त्या प्रकारे परमेश्वरासाठी खर्च केला पाहिजे परमेराच्या इच्छेमध्ये निर्धास्त राहणे त्याचा खरा अर्थ हा आहे विवाहासाठी परमेश्वराने नियुत केलेली वेळ येईल तेव्हा जे तुम्ही त्याला समर्पित केले ते तो तुम्हाला परत करील त्याने इसहाकालाही अब्राहामाकडे परत सुपूर्त केले होते परमेश्वरासमोर या परिच्छेदात वर्णन केल्याप्रमाणे आपले वर्तन टिकवून ठेवल्यामुळे पुष्कळ वेळा सैतानाच्या सापळयातून ते कसे वाचले आणि शेवटी परमेश्वराने त्यांच्या विवाहासाठी नियुत केलेला समय येऊन ठेपला, तेव्हा त्याने त्यांना अत्यंत उत्तम दान कसे दिले, याविषयीची साक्ष आपल्या अनुभवावरून देऊ शकतील असे पुष्कळ लोक आहेत
ओव्हरसीज मिशनरी फेलोशिपचे माजी जनरल डायरेटर जे ओसवाल सॅन्डर्स सांगतात की ते तरूण होते तेव्हा त्यांचे जीवन सपूर्णपणे ख्रिस्ताला वाहिलेले होते त्यांनी परमेश्वराला वचन दिले होते की, जोपर्यंत पुढे दिलेल्या गोष्टींविषयी त्यांना खात्रीपूर्वक मार्गदर्शन होत नाही तोपर्यंत ते कोणत्याही मुलीशी संपर्क साधणार नाहीत: अ) त्यांनी कोणते कार्य करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे ब) अमुक मुलगी हीच त्यांच्याकरिता योग्य मुलगी आहे, आणि क) तिच्याशी संपर्क साधण्याची अमुक वेळ परमेश्वराने नियुत केली आहे, आपली अविवाहित राहण्याचीही तयारी आहे असे त्यांनी
तिचे मोल मोत्यांहून अधिक आह, असे पवित्र शास्त्र सद्गुणी स्त्रीचे वर्णन करते (नीति ३१:१०) ख्रिस्ती संस्कृतीच्या बाहेर स्त्री ही पुरूषापेक्षा कनिष्ठ दर्जाची अशी निर्माण केलेली असल्याचे समजून तिला नेहमीच कमी लेखले जाते परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपले शिक्षण व उदाहरणे या दोन्ही गोष्टींद्वारे असे शिकवले की, परमेश्वराने स्त्रीची जागा पुरूषाच्या बाजूला नियुत केली, त्याच्या पायाशी नव्हे
जे कार्य पुरूष करू शकत नाही असे असामान्य कार्य करण्यासाठी परमेश्वराने स्त्रीची निर्मिती केली म्हणूनच ती शारीरिक दृष्टयाच केवळ नव्हे तर मानसिक आणि भावनात्मक दृष्टीनेही पुरूषापेक्षा निराळी बनवलेली आहे मातृत्वाच्या विशिष्ट जबाबदाऱ्यांमुळे तिची प्रकृती पुरूषाहून अधिक संवेदनाक्षम, अधिक आत्मनिष्ठ व अधिक भावनामय बनली आहे त्यामुळे तिच्यामध्ये प्रेम करण्याची महान क्षमता आणि त्याचप्रमाणे प्रेमाकरिता महान आकांक्षा आहे त्याशिवाय तिला अतृप्त राहिल्यासारखे वाटते तिने पुरूषापेक्षा अधिक कार्यनिपुण असावे असे अपेक्षिण्यात येते, कारण तिला अनेक विशिष्ट कार्ये पार पाडावी लागतात त्यामुळे तिला तीव्र अंतर्ज्ञानाची देणगी लाभलेली असते पुरूष कदाचित हे चटकन कबूल करणार नाहीत!
जी कॅम्बेल मॉर्गन यांनी ‘ र्डीींवळशी ळप ींहश झीेहिशलू ेष गशीशाळरह‘ या पुस्तकात स्त्रीच्या जबाबदारीबद्दल उल्लेख करताना म्हटले आहे की, जगाला दर्शविण्यासाठी देवाचे प्रतिरूप व सादृश्यता स्त्रीमध्ये पूर्णपणे अवतरली आहे हे स्त्रियांनी समजून घ्यायला हवे, कारण आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू, असे जेव्हा देव बोलला तेव्हा पुढे असेही नमूद केेले आहे की, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केलादेवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली देवामध्ये असलेल्या ज्या गुणांचे प्रकटीकरण त्याला पुरूषामध्ये करता आले नाही त्या गोष्टीचे प्रकटीकरण स्त्रीमध्ये झालेले आपणांस आढळते असे म्हणण्यांत कोणती अडचण आहे हे मला ठाऊक आहे, तरीही पवित्र शास्त्रातील अनेक सत्यांपैकी ते एक महान सत्य आहे जर आपणांला देवाची आणि मानवतेची पूर्ण ओळख करून घ्यायची असेल तर हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे देवाविषयीचे गूढ सत्य उघड करून सांगण्याची जी एक स्वतंत्र आणि पवित्र जबाबदाीर स्त्रीवर सोपवलेली आहे ती कोणताच पुरूष कधीही पार पाडू शकणार नाही
ती जबाबदारी कोणती आहे देव पिता आहे हे सत्य आहे आणि तो माता आहे हे देखील सत्य आहे याशिवाय दुसऱ्या कोणत्या शब्दांत ती जबाबदारी मी व्यत करू शकेन ? देवाच्या पितृत्वाविषयी जर पवित्र शास्त्रात शिकवण दिली असेल, तर तितयाच स्पष्टपणे त्याच्या मातृत्वाबद्दलही शिकवण दिली आहे (यशया ६६:१३, मत्तय २३:३७) सार्वकालिक सामर्थ्याचा जणू अर्क किंवा सार असलेल्या गहन व गूढ अशा प्रीतीचे प्रकटीकरण स्त्रीने करावे अशी योजना करण्यात आली आहे पवित्र अशा रहस्याने, आश्चर्याने आणि सामर्थ्याने मांडित असलेल्या मातृत्वाद्वारेच आपल्यासारखा मर्त्य मानव ही गहन आणि गूढ अशा प्रीती समजून घेऊ शकतो
ज्यांना प्रत्यक्ष मातृत्व प्राप्त झालेले आहे केवळ अशांचाच मी उल्लेख करतो असे नाही कारण अशा काही स्त्रिया आहेत की, ज्यांना प्रत्यक्षात माता होण्याचे भाग्य लाभले नाही, तरी देखील त्या मातृत्वाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत उदा दया दाखवणे, काळजी घेणे इ खरोबर ज्या दिवशी स्त्रीत्वाच्या या उत्कृष्ट अशा नाजूक पैलूंचा एखाद्या कठीण आणि ओबडधोबड गोष्टीमुळे नाश होणार असेल तर त्या दिवसापासून परमेश्वर आमची सुटका करो ! आणि म्हणून या सर्व गोष्टींद्वारे तिला देवाचे प्रतिनिधित्व करायचे आहे परमेश्वराच्या स्वभावाचा जो पैलू मानवी शब्दांच्या पलीकडे आहे, त्याला आपण केवळ मातृत्व असे म्हणू शकतो आणि परमेश्वराविषयीच्या उत्कृष्ट गोष्टी प्रकट करण्यासाठी हे वस्त्र किवां हा पोशाख ओबडधोबड आहे हे मान्य करण्यात माता प्रथम असतील परमेश्वराला स्त्रीत्वाद्वारे स्वत:चे विशिष्ट गुण प्रकट करावयाचे आहेत
असे हे स्त्रीसाठी पाचारण आहे जर ती खरोखरच परमेश्वराला समर्पित झालेली असेल, तर परमेश्वराने तिच्यावर ज्या विशिष्ट गुणांचा वर्षाव केला आहे, त्यांचा उपयोग त्याच्या गौरवासाठी आणि दुसऱ्यांच्या फायद्यासाठीही होऊ शकेल परंतु तिच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने जर धार्मिकतेचा शोध केला नाही, तर या सर्व गुणांचा दुरूपयोग होऊन त्यांचा नाश होण्याचा संभव आहे परमेश्वराने कोमलता आणि मोहकता या ज्या खास देणग्या स्त्रियांना दिल्या आहेत, त्यांच्याद्वारे आपण जीवनातील सर्वसाधारण गोष्टींमध्ये सौंदर्याची वृध्दी करावी आणि त्यामुळे आसपासच्या लोकांसाठी आशीर्वाद असे ठरावे अशी जी त्याची अपेक्षा आहे, ती आपण समजावून घ्यावी म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो
स्त्रीमध्येही लैंगिक भावना अस्तित्वात असते ती पुरूषांप्रमाणे आक्रमक नसून सौम्य असल्याने सहजगत्या नियंत्रित केली जाते अशा प्रकारच्या भावना असणे अगदी नैसर्गिकच आहे, जर त्या नसत्या तर स्त्री ही अस्वाभाविक ठरली असती स्त्री कौतुक आणि प्रेम यांच्या प्राप्तीची आकांक्षा धरणारी असते स्वत:चे घर आणि स्वत:चे कुटूंब असावे अशी तिची कोणत्याही पुरूषापेक्षा अधिक तीव्र इच्छा असते मातृत्वाच्या तयारीसाठीच या उपजत इच्छा तिच्यामध्ये असतात परमेश्वराने आम्हांला असे घडवले ही फार चांगली गोष्ट आहे अशी इच्छा असल्यामुळेच स्त्री ही पुरूषाकडे विवाह करण्याच्या उद्देशाने आकर्षित होते पुरूष स्त्रीकडे सहसा शारीरिक संबंधाच्या अभिलाषेनेच आकर्षिला जातो परंतु स्त्रियांना विरूध्द लिंगाचे आकर्षण फत विवाह करण्याच्या उद्देशानेच वाटते उच्छृंखल प्रेमासाठी मुलांशी मैत्री संपादन करू इच्छिणाऱ्या मुली वचित पहायला सापडतात, पण अशी उदाहरणे अस्वाभाविक आहेत उलटपक्षी काही थोडयाच मुलींना विरूध्द लिंगाबद्दल कसलेही आकर्षण नसते परंतु त्या पूर्णपणे व फत आपल्याच लिंगाच्या व्यतीकडे आकर्षिल्या जातात हेही अनैसर्गिक आणि आरोग्यास घातक असून ते बहुधा समलिंगी प्रवृत्तीचे लक्षण असते
पवित्र शास्त्र तरूण स्त्रियांना ताकीद देते की तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किवा उंची पोषाख करणे हयात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी कारण हयाप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणांस शोभवीत असत (१ पेत्र ३:३५)
स्त्रीच्या व्यतमत्वामध्ये विरूध्द लिंगी व्यतीला आकर्षून घेण्याचे सामर्थ्य असते ते सामर्थ्य परमेश्वराकडून देण्यात आलेेले असते, परंतु त्याचा पुष्कळदा दुरूपयोग होऊ शकतो जर त्या आकर्षणशतीला पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली ठेवले नाही, तर ती स्त्री आपत्ती ओढवून घेते तरूण मुलींना जसजशी त्यांच्यातील या सामर्थ्याबद्दल कल्पना येऊ लागते, तसतसे ते आकर्षण वाढविण्यासाठी शय असेल त्या सर्व गोष्टी करण्याचा मोह त्यांना होतो परिणामी त्या अधिक सौंदर्यप्रसाधने वापरतात, (सध्याच्या आधुनिक फॅशनच्या कपडयांद्वारे) शरीराचे अधिकाधिक प्रदर्शन करतात आणि आपली केशभूषा करताना कमालीचा वेळ खर्ची घालतात पवित्र शास्त्र सांगते, स्त्रियांनी स्वत:स साजेल अशा वेषाने आपणांस भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे, केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे (१ तीमथ्य २:९) वरील वचनात अगोदर सांगितल्याप्रमाणे येथेही खऱ्या सौंदर्याची व्याख्या परमेश्वराने आपल्यासाठी दिली आहे
आपले शरीर म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली पवित्र ठेव आहे आणि आपण त्याचा दुरूपयोग करू शकत नाही आपल्या शरीराद्वारे परमेराचे गौरव करण्याची आज्ञा आपणांस देण्यात आलेली आहे त्याचा संदर्भ केवळ आपल्या शारीरिक सवयींशी नाही, तर आपल्या शरीरावर आपण कोणत्या प्रकारची वस्त्रे घालतो त्याच्याशीही आहे जुन्या करारामध्ये, परमेराने, विरूध्द लिंगी व्यतींना आकर्षून घेण्याच्या शतीचा अनेक प्रकारे दुरूपयोग करणाऱ्या सियोनाच्या कन्यांना दोघ दिला आहे (यशया ३:१६ ते २४ वाचून पहा)
आपले अंतरंग खरे कसे आहे त्याची जाहिरात कित्येकदा आपली वस्त्रे करतात, आपले व्यतमत्व काही अंशी ती प्रगट करतात आपल्या अंगावरील कपडे पाहूनच दुसरे लोक आपल्याबद्दलचे त्यांचे प्रथम ग्रह तयार करतात जर आम्ही आमच्या कपडयांमध्ये जगातील फॅशन अवलंबिली तर ख्रिस्ताबद्दलची आमची साक्ष निरर्थक होऊन जाईल कारण आपण कोणते कपडे घालतो हे दुसरे लोक अवश्य पाहतील त्यांनी जे काही पाहिजे त्याबद्दल ते आपल्याला कदाचित काही सांगणार नाहीत, परंतु जर आपण त्यांना सांगितले की, परमेश्वराने आम्हाला या दुष्ट जगापासून वाचविले आहे, तर ते मनातल्या मनात निश्चितच आपल्याला हसतील म्हणून आपण आपल्या वेषभूषेबद्दल जागरूक असायला पाहिजे
आपण गबाळा पोषाख करावा असे मात्र मला म्हणायचे नाही नकीच नाही आपण घाणेरडे किंवा किळसवाणे असावे असे परमेश्वराला वाटत नाही, म्हणून आपण व्यवस्थित आकर्षक राहण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केला पाहिजे एबी सिम्पसन यांनी म्हटले आहे की, विासणाऱ्या व्यतीचा वेष साधेपणा व शालीनता या गुणांनी युत असावा, म्हणजे पाहणाऱ्याला तो काहीतरी विशेष पाहात असल्यासारखे वाटणार नाही, आणि वेष परिधान करणारी व्यतीही आपण काय परिधान केले आहे ते विसरून जाईल अनुसरण्यासाठी हा चांगला नियम आहे पुरूषांची वैषयिक भावना चेतवील अशा पध्दतीचा आपला वेष केव्हाही नसावा वासनासतीबद्दल जर परमेश्वर पुरूषांचा न्याय करणार असेल तर मला वाटते की पुरूषांच्य विषयवासना चेतवण्यासाठी उत्तान वेषभूषा करणाऱ्या स्त्रियांचाही तो न्याय करील हे संयुतक आहे
कपाळावरील कुंकवाच्या उपयोगाबद्दल मला या ठिकाणी काही सांगावयाचे आहे ही हिंदू पध्दती आजकाल पुष्कळशा ख्रिस्ती मुली आचरणात आणाताहेत ही अत्यंत दु:खाची गोष्ट आहे हा तिलक म्हणजे जणू काही शिवाचा (शंकराचा) डोळा असल्याचे समजले जाते आणि हिंदू लोक (जरी त्या सर्वांना त्याची कल्पना नसली तरी) तो दुष्टात्म्याच्या मोहिनीविरूध्द उपाय म्हणून वापरतात असे चिन्ह वापरणे हे ख्रिस्ती मुलीला केवळ पापमयच आहे असे नव्हे तर धोयाचे देखील आहे तिला काहीही कल्पना नसली तरी त्यामुळे तिचा विधर्मी दैवतांशी व मूर्तिपूजशी संबंध आहे असे दर्शविले जाते आणि तिच्या ध्यानीमनी नसताना देखील सैतानाच्या हल्ल्यांना ती बळी पडू शकते ती केवळ फॅशन आहे असा जे विास ठेवायला सांगतात ते चूक आहे आपल्या ख्रिस्ती साक्षीला बाधक ठरणाऱ्या सर्व जागतिक विचारधारा आणि वेषभूषेच्या पध्दती यांशी सामना करण्याचे धैर्य परमेश्वर आपल्याला देवो !
अब्राहामाला दिलेल्या वचनांचा जो वारसदार होता त्या इसहाकाची पत्नी होण्याचा उच्च मान देण्यासाठी परमेश्वराने रिबेकाची निवड का केली? किंवा प्रभू येशूची माता होण्यासाठी मरीयेचीच निवड का करण्यात आली? परमेराला आनंद देणाऱ्या त्यांच्या अंत:करणातील सौंदर्यामुळेच हे असले पाहिजे खरे सौंदर्य अंत:करणात असते, बाहयस्वरूपात नसते आणि प्रसाधनांचया दुकानातून काही ते विकत घेता येत नाही (नीति ३१:३०) डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी (नीति ११:२२) असे जे पवित्र शास्त्रात सांगितले आहे त्यात आश्चर्य ते कसले ! ती किती कठोर भाषा आहे परंतु ती आपल्याला सत्य मूल्यांची कल्पना देते जगातील फॅशनच्या आहारी गेल्यामुळे परमेश्वराच्या उत्तम गोष्टींना पुष्कळशा मुली मुकल्या आहेत याबद्दल माझी खात्री आहे
तुम्हांला आवडो अगर न आवडो, परंतु केव्हा ना केव्हा मुलांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटत असल्याचे तुम्हांला आढळून येईल कदाचित ते तुमच्या कॉलेजमधील, तुमच्या चर्चमधील किंवा तुमच्या शेजारचे असतील तुम्हांला ते टाळता येणे शय नाही म्हणून त्यांच्याशी कसे वागावे याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये विरूध्द लिंगातील संबंधांबाबत चर्चा केली असल्याने त्यात लिहिलेल्या गोष्टींची मी येथे पुनरावृत्ती करणार नाही परंतु मुलींनी ज्यांची नोंद घ्यावी अशा काही गोष्टी सांगायची माझी इच्छा आहे
पूर्वी त्यांच्या बहिणींनी ज्या वयात विवाह केला असेल, त्याहून सध्याच्या मुली उशिरा विवाह करतात, कारण अधिकाधिक मुली उच्च शिक्षण घेत आहेत एखादी पदवी किंवा विशिष्ट प्रशिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत जेव्हा त्या पुरूषांच्या सहवासात येतात, तेव्हा पुष्कळशा मोहांचे पाश त्यांच्याभोवती असतात विवाह करण्याचा गंभीर हेतू मनात नसतानाही पुरूषांना आकर्षून घेणाऱ्या आपल्या सामर्थ्याचा उपयोग करून त्यांचे लक्ष वेधण्याचा मोह त्यांना होतो, आणि त्या मोहाला शरण गेल्यास परिणामी त्या स्वत:वर आपत्ती ओढवून घेतात
पुरूषांपेक्षा त्यांच्यावर भावनेचा प्रभाव अधिक काळपर्यं राहतो हे मुलींनी ओळखले पाहिजेएखाद्या मुलीच्या प्रेमात सहज पडणे व तितयाच सहजपणे तिला विसरणे तरूण पुरूषाला शय होत असेल स्वत:च्या भावनात्मक जीवनाला विशेष इजा न पोचता तो दुसऱ्या मुलीशीही तसेच वागेल याचे कारण म्हणजे मुली ज्या मर्यादेपर्यंत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देतात तेवढा साध्य करण्याचा पुष्कळशा तरूणांचा हेतू असतो त्याचे कदाचित प्रेमही नसेल, परंतु अशा संबंधामुळे मुलीच्या भावना मात्र जागृत होतात एकदा एका मुलावर प्रेम जडल्यानंतर त्याला आपल्या मनातून काढून टाकणे मुलीला फार कठीण जाते, काही स्त्रियांना तर विवाहानंतरही पूर्वप्रेम संबंध विसरणे कठीण होऊन बसते त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन असमाधानी बनते अशा बाबतीत सावधगिरीची खरी आवश्यकता आहे
स्पर्शाच्या भावनतेतून निर्माण होणारा मोह अत्यंत प्रभावी असतो हे तुम्ही केव्हाही विसरता कामा नये तेव्हा तुमचा हात हातात घेण्यास मुलांना तुम्ही बिलकूल संधी देऊ नये अन् चुंबनाला तर मुळीच देऊ नये ! एकदा का तुम्ही अशी संमती दिली की व्यर्थ कल्पनांचा स्वैराचार आवरणे तुम्हांला फार कठीण जाईल आणि एक पाऊल पुढे टाकले की ते दुसरे पाऊल पुढे टाकण्यास कारणीभूत ठरेल
तुमच्या आणि एखाद्या मुलातील मैत्री जर तुटली, तर तुम्हाला त्या मुलापेक्षाही अत्यंत भारी किंमत द्यावी लागेल हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे तुमचा त्याग करून दुसऱ्या एखाद्या मुलीशी विवाह करणे त्याला सोपे जाईल परंतु तुम्हांला ते तितके सोपे जाणार नाही उलट तुमच्यावर कलंक लागेल आणि भविष्यकाळात जीवनाचा जोडीदार शोधणे तुमच्यासाठी अत्यंत कठीण होऊन बसल्याचे तुम्हाला आढळून येईल भारतामध्ये हे विशेषकरून अत्यंत सत्य आहे ज्या मुली पुरूषांबरोबर एकटयाच फिरायला जातात आणि निकट स्पर्शाचे अनुभव घेतात त्यांच्याच विषयी केवळ मी हे सांगते असे नाही जिचा एखाद्या मुलाशी अत्यंत शुध्द प्रेमसंबंध आहे (तो जरी पत्राद्वारे असला तरी) व त्यांचे संबंध (किंवा त्यांचा पत्रव्यवहार सुरू असल्याचे) जर इतरांना माहीत असले तर त्या मुलीलाही तसेच अपमान सहन करावे लागतील मुलींची मने हळवी असतात हे त्यांनी विसरता कामा नये सुरूवातीला सावधगिरी न बाळगल्यामुळे पुष्कळशा मुलींना असाच त्रास सहन करावा लागला आहे व त्यांची नावेही कलंकित झाली आहेत अशा गोष्टीमुळे केवळ त्यांची साक्षच बिघडते असे नाही, तर परमेराच्या नामाचीही त्यामुळे फार निंदा होते पवित्र शास्त्रामध्ये काही विनाकारण सांगितले नाही की स्त्री ही अशत असून पुरूषापेक्षा लवकर बळी पडणारी आहे (१ पेत्र ३:७, १ तीमथ्य २:१४)
नजिकच्या भविष्यकाळात तुमचा विवाह होण्याची शयता नसेल, तर कोणत्याही मुलाशी तुम्ही निकटची मैत्री का ठेवू नये याचे दुसरे एक कारण मी तुम्हाला सांगते तुमच्या जीवनातील अविवाहितपणाचा काळ असा आहे की, तेव्हाच तुम्ही मुतपणे व कोणत्याही प्रकारच्या अडथळयाशिवाय परेराची सेवा करू शकता विवाह केल्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेच्या मालकीण राहू शकणार नाही जर विवाहापूर्वीचा काळ परमेराच्या कार्यासाठी सदुपयोगात घालविण्याऐवजी पुरूष मित्रांबद्दलची स्वप्ने रंगविण्यात गेला, तर जीवनातील महत्त्वाच्या संधीला तुम्ही परया होता तुम्हांला पदभ्रष्ट करण्याची संधी सैतानाला देऊ नका या बाबतीत मी आणखी दोन उपदेशाचे मुद्दे सांगू इच्छिते पहिला म्हणजे आध्यात्मिक गोष्टीबाबत सल्ला विचारण्यासाठी अविवाहित पुरूषाकडे कधीही जाऊ नका त्याऐवजी एखाद्या स्त्रीकडे अथवा अधिक वयस्कर अशा विवाहित माणसांकडे जा दुसरी गोष्ट म्हणजे विवाहित मनुष्याच्या पत्नीशी मैत्री असल्याखेरीज त्याच्याशी अगदी साधी मैत्रीदेखील करू नका
अविवाहित असताना जीवनपूर्तीचा आणि पूर्णतेचा जो अनुभव केव्हाही मिळत नाही तो विवाह आणि मातृत्व यात मिळतो, याच्याशी सर्वच माता सहमत होतील परंतु ज्यांना अविवाहित राहण्यासाठी परमेश्वराचे निमंत्रण आहे त्यांना पूर्णता लाभत नाही असे मला म्हणायचे नाही ख्रिस्ती मुलगी, मग ती विवाहित असो वा अविवाहित, तिने परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यातच आनंद मानला पाहिजे अशा प्रकारे परमेश्वराच्या आज्ञा पाळल्याने अविवाहित स्त्रीलाही पूर्णत्वाची अनुभूती लाभते तथापि स्त्रीला अविवाहित जीवन कंठण्यासाठी वचितच निमंत्रण मिळते स्त्री ही मूलत: पत्नी व माता व्हावी म्हणून परमेश्वराने निर्माण केली आहे
विवाह केल्यामुळे आपली ख्रिस्ती सेवा संपुष्टात येईल असे कोणत्याही मुलीने मनात आणता कामा नये त्यामुळे तिच्या कार्यावर कदाचित मर्यादा पडेल परंतु आध्यात्मिक सेवा मात्र मर्यादित राहणार नाही ख्रिस्ती कार्यामध्ये अत्यंत कार्यरत असलेल्या मुलीला विवाहानंतर असे आढळून येते की तिच्या स्वतंत्र कार्याला बंधन पडले असून तिच्या मुत हालचालींना पुष्कळशा प्रमाणात प्रतिबंध झाला आहे पुरूषाला विवाहानंतर ते जाणवत नाही, परंतु मुलींना मात्र ते प्रकर्षाने जाणवते तिच्यासाठी विवाहानंतर परमेश्वराने निराळया स्वरूपाचे कार्य ठेवले आहे हे तिने ओळखायला हवे निराशा आणि चिंता यापासून मुत रहायचे असेल तर तिने त्याचा स्वीकार करायला हवा विवाहानंतर तिचे पहिले कर्तव्य गृहिणीचे आहे तिने आपले घर हे संकटग्रस्त तरूण लोकांसाठी (तसेच वृध्दांसाठीही) आश्रयस्थान बनवावे आणि परमेश्वराच्या भयामध्ये आपल्या मुलांची वाढ करावी अविवाहित असताना तिने जे कार्य केले तितकेच हेही कार्य महत्त्वाचे आहे
कोणी असे म्हटले आहे की, जी स्त्री आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे आणि जिने वैवाहिक जीवनातील सर्व गुंतागुंती, वेळ आणि शतीची मागणी व तिच्या स्वातंत्र्यावरील मर्यादा यांचा स्वीकार केला आहे ती स्त्री इतरांकरिता पुष्कळ कार्य करू शकते आपल्या कौटुंबिक जीवनातील अनुभवांच्या द्वारे आणि वैवाहिक जीवनात मिळणाऱ्या प्रेमामुळे दुसऱ्या लोकांबद्दल अधिक संवेदनाशील होऊन स्नेहाची स्वाभाविकपणे वृध्दी करणारे असे वातावरण ती निर्माण करू शकते सुसान्ना वेस्ले ही सुवार्तिक नव्हती, परंतु ती धार्मिक वृत्तीची आई होती आणि तिने आपल्या बहुतेक मुलांना परमेराच्या भयामध्ये वाढवले तिच्या मुलांपैकी जॉन आणि चार्जस हे दोघेजण इंग्लडमध्ये धर्मसंजीवन करण्यासाठी परमेश्वराच्या हातातील प्रभावी साधन ठरले त्या संत मातेने आपल्या देशासाठी जे पुष्कळ कार्य केले ते तिला अविवाहित राहून करता येणे शय नव्हते
विवाहाची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक मुलीने नीति ३१:१०३१ ही वचने वाचून वारंवार त्यावर मनन करावे आदर्श पत्नीचे वर्णन आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे परमेश्वराचे भय हे तिच्या संपूर्ण जीवनाचे रहस्य आहे (वचन ३०) परंतु पत्नीपदाचा हा पाया विवाहाच्या फार पूर्वी रचला गेला पाहिजे तेव्हा हा परिच्छेद प्रत्येक ख्रिस्ती मुलीला एक आव्हानच आहे प्रत्येक गोष्ट त्यात इतकी स्पष्ट करून सांगितली आहे की, एका शब्दाच्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही तेथे उल्लेख केलेल्या चांगल्या गुणांपैकी काटकसर हा एक होय आदर्श पत्नी अशी असते की आपले पैस आपण कशा प्रकारे खर्च करतो त्याबाबत ती सावधगिरी बाळगते ही अशी सवय आहे की प्रत्येक मुलीने ती अंगी बाणवावी आजकाल कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक मुली उधळया आहेत काटकसर करण्याची सवय आजच तुम्ही लावलीत तर विवाहानंतर तुम्हांला ती अत्यंत उपयुत असल्याचे आढळून येईल त्यावेळी तुमचा सध्याचा अनुभव तुमच्या कामी येईल
विवाहाची पूर्वतयारी म्हणून मुलींनी स्वार्थत्याग करायला शिकले पाहिजे स्वार्थत्यागाशिवाय कोणताही विवाह सुखी होऊ शकत नाही मुलींबाबत हे विशेषकरून सत्य ठरले आहे विवाहानंतर पुरूषापेक्षा तिला अधिक स्वार्थत्याग करावा लागतो अविवाहित असताना असलेले कितीतरी अधिकार, हक तिला सोडून द्यावे लागतात तुमचा विवाह होण्यापूर्वीच जर तुम्ही स्वार्थत्यागाचा अर्थ समजावून घेतला नाही, तर नंतर तुम्हांला ते फार कठीण जाईल तुम्हांला ते शिकवावे म्हणून परमेश्वराला विनंती करा
विवाहाची पूर्वतयाीर म्हणून तरूण मुलीने करावयाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थातच प्रार्थना ही होय विवाह होण्याची शयता किंवा योजना असल्यास त्यापूर्वी दोनतीन वर्षे प्रत्येक ख्रिस्ती मुलीने आपल्या जीवन जोडीदाराविषयी मनापासून व नियमितपणे प्रार्थना करावी परमेश्वराच्या पसंतीच्याच व्यतीशी विवाह करण्यासाठी त्याने मार्गदर्शन करावे अशी तिने प्रार्थना करावी विवाहाच्या इतर सर्व मागण्या रहित व्हाव्यात अशी मागणी तिने देवाला करावी भारतामध्ये त्याची फार आवश्यकता आहे कारण आपल्या मुलांच्या व विशेषत: मुलींच्या विवाहात पालकांच्या म्हणण्याला फार महत्त्व असते पालकांचे तारण झालेेले नसले तरी परमेश्वराने याबाबत त्यांनाही मार्गदर्शन करावे म्हणून तिने प्रार्थना करावी ज्या मुली परमेश्वराची प्रार्थना सतत, विासाने करतात त्यांच्या प्रार्थनेला आश्चर्यकारक उत्तर मिळते
विवाहाच्या पूर्वतयारीसाठी व्यावहारिक सूचना म्हणजे सवड मिळेल तेव्हा स्वयंपाक करायला शिकावे तुमचा विवाह होईल तेव्हा ती गोष्ट तुम्हाला पुष्कळशा अडचणीतून आणि ओशाळविणाऱ्या अनुभवांपासून वाचवील
आपल्या भावी पतीमध्ये मुलीने कशाची अपेक्षा करावी त्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी पाचव्या प्रकरणात दिल्याच आहेत मुलींनी लक्षात ठेवाव्यात अशा आणखी काही गोष्टी सांगून काहींची आठवण मी करून देऊ इच्छिते: जो तिला संरक्षण देईल, तिला सुरक्षितता देईल जो तिला मदत करील,सुख देईल आणि काही मर्यादेपर्यंत तिचे मन समजून घेऊ शकेल अशा जोडीदाराची मुलीला आवश्यकता आहे ज्याच्यावर अवलंबून राहता येईल असा तिच्यासाठी तो सामर्थ्यवान आणि परिपव असावा आणि त्याने तिच्यात कमीपणाच्या भावना निर्माण करू नयेत परमेश्वराने स्त्री अशी निर्माण केली आहे की तिने पुरूषावर अवलंबून रहावे तेव्हा ज्या व्यतीचा तुम्ही विचार करता त्या व्यतीने तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत केला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही सर्वस्वी अवलंबून राहू शकाल अशी खात्री तुम्हांला वाटली पाहिजे
पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, आज्ञापालन, स्तुती व आदर यांच्यायोगे पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी (इफिस ५:३३) आदरातून प्रेम निर्माण होते आणि जर पत्नी पतीचा आदर करीत नाही तर त्याची दया येऊन कदाचित केले तर सोडा पण त्याच्यावर खरे प्रेम करणे तिला शय होणार नाही आपल्यापेक्षा परिपव असलेल्या पतीबद्दल तिच्या मनात आदर नसला तर ती पतीला तो आपले मस्तक आहे असे समजणार नाही तेव्हा कोणत्याही व्यतीचा विचार करताना तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, तुमच्या उवरित आयुष्यामध्ये त्याच्याकडे अभिमानाने पाहण्यासाठी तुमच्या मनात त्याच्याबद्दल पुरेसा आदर व कौतुक भावना आहे काय ? अशी कौतुक भावना वैवाहिक जीवनातील अनेक समस्या सोडवू शकेल
कोणत्याही व्यतीच्या अचूक स्वभावाबद्दल सारे काही जाणणे शय नाही हे मी समजू शकते परंतु वर सांगितलेल्या गोष्टी व पाचव्या प्रकरणात जे काही सांगितले आहे त्याच्या सहाय्याने परमेशव्राने नियोजित केलेल्या व्यतीसाठी तुमचे मार्गदर्शन व्हावे आपल्या देशातील मुली सहसा करतात तशा, अनोळखी व ज्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही अशा व्यतीशी विवाह करू नका विवाह हा साऱ्या आयुष्यासाठी असतो, त्यात बदल करता येत नाही आणि गंमत समजून विवाहात प्रविष्ट होता येत नाही
जेव्हा तुमचे पालक एखाद्या न विश्वासणाऱ्या किंवा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने न शोभणाऱ्या व्यतीबद्दल सुचवतात तेव्हा काय करावे असे कदाचित तुम्हांला वाटत असेल अशा परिस्थितीतमध्ये आपल्या पालकांना नकार देणे हे मुलांपेक्षा मुलींना अत्यंत कठीण जाते याची मला कल्पना आहे परंतु तुम्ही प्रीतीने परंतु ठामपणे आपल्या मताला चिकटून रहाणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही तसे केले तर परमेश्वर तुमचा सन्मान करील सैतान तुम्हाला भविष्यातील असुरक्षिततेच्या विचारांचा मोह दाखवून तुम्ही न विासणाऱ्या व्यतीशी विवाह करावा अशी गळ घालील, परंतु त्याचे काही ऐकू नका परमेश्वराला आतापर्यंत अनुसरल्याने कोणाचेही नुकसान झालेेले नाही तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नाही तुम्ही परमेश्वराचा आदर केलात व त्याच्यावर विासून राहिलात, तर तो तुम्हांला केव्हाही खाली पडू देणार नाही त्याने नियुत केलेल्या समयी तो तुम्हांला अत्युत्कृष्ट व्यती देईल ती तुम्हांला गमवायची नाही होय ना?
हुंडयाचा प्रश्न अगोदर चर्चिला गेला आहे हुंडा मागणाऱ्या व्यतीशी विवाह करण्यापूर्वी ख्रिस्ती मुलीने दोन वेळा विचार करावा, एवढे मात्र मी अधिक सांगू इच्छिते त्या व्यतीला तुमच्यापेक्षा पैशाबद्दल अधिक लोभ असण्याचा संभव आहे तसेच केवळ एखाद्याची श्रीमंती व परिस्थिती पाहून भाळू नका प्रेमाचा पर्याय पैसा नाही याचे स्मरण पवित्र शास्त्र आपल्याला करून देते (गीत ९:७)
ज्या मुली अविवाहित राहतात त्यांच्याबद्दल काही लिहिले नाही तर ते प्रकरण पूर्ण होऊ शकणार नाही हेतु पुरस्सर अविवाहित राहण्याची निवड करणे भारतीय समाजामध्ये फारच वचित आढळून येते ज्यावेळी परमेश्वराकडून स्पष्ट आवाहन मिळते तेव्हाच अशा जीवनाची निवड केली पाहिजे कारण अशा आवाहनाचे विचार परीक्षेच्या समयी तुम्हाला स्थिर ठेवतात काहींच्या बाबतीत परमेश्वराने त्याच्या खास सेवेसाठी कदाचित त्यांना संसाराच्या गुंतागुंतीपासून काही वर्षासाठी मुत राहण्याचे आवाहन केले असेल, नंतर परमेश्वर विवाहासाठी कदाचित मार्गदर्शनही करील
ज्यांच्या इच्छेविरूध्द त्यांच्यावर अविवाहित जीवन लादले गेले आहे अशा व्यतीही कदाचित हे वाचतील तुमच्या या परिस्थितीला कारणीभूत झालेल्या त्या पुरूषावर किंवा त्या कुटूंबावर किंवा परिस्थितीवर राग न धरणे किती कठीण आहे नाही? आपलेसे समजून कोणावर प्रेम करण्यासाठी व त्याच्याकडून प्रेम करवून घेण्यासाठी तुमच्या नैसर्गिक स्त्रीसुलभ भावना आकांत करीत असताना त्याबद्दल वाईट वाटून न घेणे किती कठीण आहे ! परंतु तुम्हांला कितीही अन्यायकारक वागणूक मिळाली असली तरी आपल्या स्वत:ची कीव करणे अत्यंत चुकीचे आहे, तसेच ते तुमच्या व्यतमत्वावर पुष्परिणाम करते, म्हणून चांगले नाही त्यांची कबुली देऊन त्यांचा त्याग केला पाहिजे एकदा का या अमंगल गोष्टी दूर फेकल्या गेल्या की तुमचा परमेश्वराशी संबंध पुन: प्रस्थापित होईल आणि भूत, भविष्य व वर्तमानकाळाकरिता तुम्हांला त्याच्या सार्वभौमत्वावर नम्रपणे विासून राहता येईल तुमची परिस्थिती आश्चर्यकारक रीतीने बदलण्यास तो समर्थ आहे परंतु त्याने जर तसे काही केेले नाही तर तुम्हांला पाचारण्यात तुमच्यासाठी त्याने आणखी काही तरी उच्च योजना आखली असल्याबद्दल तुम्ही खात्री बाळगली पाहिजे त्याच्या अनुग्रहाच्या विपुल पुरवठयाचा अखंड भाग तुम्हांला मिळेल आणि तुमच्यातील उणिवांची आवश्यकतेहून अधिक भरपाई केली जाईल (२ करिंथ १२:७१० वाचा)
आपल्या विवाहित बहिणीचा द्वेष करीत जगण्याचे तुम्हांला कारण नाहीतिला प्राप्त झालेले सौभाग्य तुम्हांला मिळाले नाही हे खरे आहे परंतु तिला न लाभलेले विशेष हक तुम्हांला लाभले आहेत हेही विसरू नका १ करिंथ ७:३४ दर्शवते की, तिच्यापेक्षा तुम्ही परमेश्वराची सेवा अधिक सुलभपणे करू शकता पुष्कळशी अशी क्षेत्रे आहेत की जिथे तुम्ही अत्यंत यशस्वी कार्य करू शकता उदाहरणार्थ लहान मुलांची किंवा तरूणांची सेवा तुम्हांला आलेल्या स्वत:च्या अनुभवामुळे तुम्ही जीवनाच्या संघर्षात आघात झालेल्या इतरांना सहानुभूतीपूर्ण मैत्रीची महान देणगी देऊ शकता
तरीही कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही परीक्षेत पडाल परंतु तसे प्रसंग सर्वांनाच येतात स्त्रीचा स्वभाव हा संवेदनाक्षम व भावनात्मक असल्याने सैतान त्यावर सहज हल्ला करू शकतो, परंतु देव त्याच्या वचनाबाबत व त्याच्या दयाळू स्वभावाबाबत विसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शतीपलीकडे होऊ देणार नाही (तो विश्वास ठेवण्यास योग्य आहे), तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील (नेहमी) हयासाठी की तुम्ही ती सहज करावयास समर्थ व्हावे (१ करिंथ १०:१३) परमेश्वराचे प्रेम, सार्वभौमत्व आणि त्याची विश्वसनीयता यांवरील तुमची अढळ ही ढाल सैतानाच्या सर्व जळत्या बाणांना विझवून टाकील (इफिस ६:१६)
आपल्या जीवनाच्या मध्यम वयात पुष्कळशा अविवाहित स्त्रिया मनाच्या कडवटपणाचे आणि संकुचितपणाचे भक्ष्य होतात, परंतु त्याची काही आवश्यकता नाही परमेश्वराचे सर्व मार्ग आनंदाने स्वीकारून, त्याची आराधना करण्याची वृत्ती विकसित ठेवून, छोटयाशा दयापूर्ण कार्याबद्दल परमेश्वराचे आणि मनुष्यांचेही आभार मानून राहिल्यास तुमचे जीवन परमेश्वराच्या निरंतर आनंदाने भरून जाते व त्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळतो
एकटे जीवन कंठणाऱ्या कितीतरी स्त्रियांनी मंडळीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे पंडिता रमाबाई (ज्या विधवा होत्या) त्यांनी केडगावला मुती मिशनची स्थापना केली हे अलौकिक उदारहण आहे अॅमी कारमायकेल ही डोनावरची स्त्री, ही भारतात येणाऱ्या संत मिशनऱ्यांपैकी प्रसिध्द होती त्यांना देवाज्ञा झाल्यानंतरसुध्दा त्यांच्या जीवनातून पाझरणारा आशीर्वादाचा प्रवाह आजही वाहात आहे अशा इतर अनेक स्त्रियांपैकी ही केवळ दोनच उदाहरणे आहेत वास्तविक पाहता महत्त्वाची गोष्ट ही आहे की, परमेश्वराने आपल्या जीवनासाठी असलेले पाचारण ओळखणे आणि ते कसेही असले तरी आनंदाने त्याची पूर्ती करणे, कारण त्यातच शांती आहे
शेवटी, अशतपणातच (माझी) शती पूर्णतेस येते (२ करिंथ १२:९) असे म्हणणाऱ्या परमेश्वराकडे आपण दुर्बळ असल्याचे जाणून अधिक जवळ जाऊ या विशिष्ट कार्य करण्यासाठी परमेश्वराने स्त्रीला निमाण केल्याचे विसरू नका तुमच्या जीवनात ते संपूर्णपणे सफळ होवो
दहा, नऊ, आठ, सात,सहा, पाच चंद्रावर रॉकेट सोडताना जेव्हा आकडे शून्यापर्यंत जातात तेव्हा उत्सुकता अगदी शिगेला पोचते चंद्रावर मानवासहित रॉकेटचे उड्डाण सुरू होण्याचा तो क्षण असतो अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ तयारीनंतर शेवटच्या क्षणी करावयाची तपासणी केली जात असते कोणत्याही तपशिलाकडे सहज दुर्लक्ष करणे येथे प्राणघातक ठरणार असते थोडयाशा निष्काळजीपणामुळे मनुष्यहानीचा संभव असतो मनुष्याच्या प्राणांचा हा प्रश्न असतो कोणत्याही अंतराळ उड्डाणापेक्षा वैवाहिक जीवन हे अधिक साहसपूर्ण आणि अधिक धोयाचे आहे ते सहजगत्या किंवा निष्काळजीपणाने स्वीकारता येत नाही त्याकरिता तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे
विवाहापूर्वी काही महिने आधी असा एक दिवस ठरवला पाहिजे (त्याला तुम्ही मागणी दिन म्हणा हवं तर कारण नावाचे विशेष महत्त्व नाही) त्या दिवशी आकडे मोजणी सुरू होते त्यावेळी लोकांना जाहीर करण्यात येते की या मुलामुलीचा विवाह होणार आहे त्या वेळेपासून विवाहाचा क्षण येईपर्यंत आकडेमोजणी चालू असताना त्या दोन्ही जोडीदारांची उत्सुकता अगदी शिगेला पोचणे स्वाभाविक आहे परंतु विवाहाची तयारी करण्यासाठी या उत्सुकतेमुळे अडथळा येता कामा नये
मागणी (साखरपुडा) करण्याचा मुख्य फायदा असा की, विवाह करू इच्छिणाऱ्या दोघांनाही विवाहापूर्वी काही मर्यादेपर्यंत परस्परांना ओळखण्याची संधी मिळते ती एकमेकांशी मनमोकळेपणाने पत्रव्यवहार करू शकतात आणि बदनामीचे भय न बाळगता ती एकमेकांना भेटू शकतात दुसऱ्याच्या कुटूंबातील व्यतीबद्दल व कुटूंबाच्या इतिहासाबद्दल माहिती होण्यासही तो काळ उपयुत ठरतो भारतामध्ये त्याची आवश्यकता आहे, कारण आमच्या येथे विवाहामुळे दोन घराणी जोडली जातात
मागणी झाल्यानंतरच्या काळात दोन्ही जोडीदारांमध्ये मनमोकळेपणा चर्चा व्हावी पूर्वीच्या मैत्रीबद्दल व प्रेमप्रकरणाबद्दल, (शरीरसंबंध आले असतील तर त्याहीबद्दल) प्रामाणिक कबुली करावी काहींना असे वाटेल की अशी कबुली दिल्यामुळे कदाचित विवाह मोडेल परंतु दोन्ही जोडीदार जर प्रकाशात चालले नाहीत तर ख्रिस्ती विवाहामध्ये त्यांना एकमेकांशी सहभागितेने राहता येणार नाही (१ योहान १:७ चा सिध्दान्त इथेही लागू आहे) अगदी सुरूवातीलाच त्यांनी काही गोष्टी एकमेकांपासून लपवल्या तर त्यांचे वैवाहिक जीवन किती फसवणुकीचे होईल! प्रकाशात चालत असताना कशालाही भिण्याचे काहीच कारण नाही काही भागात अंधाराला प्रवेश दिला की मग सैतान तिथे प्रवेश करतो आणि धुमाकूळ घालतो
ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे मी अशा काही गोष्टी पाहिल्या आहेत की जेथे लोकांनी (द्वेषभावनेने किंवा तत्सम कोणत्या तरी दुष्ट हेतूने) एकाबद्दल दुसऱ्याला खोटेनाटे सांगन त्यांचा विवाह रद्द करण्याचा सल्ला दिला ऐकणाऱ्या व्यतीने त्यातील सत्यतेची शहानिशा करण्याची काळजी न घेतल्यामुळे पुष्कळशा मागण्या (साखरपुडे) मोडल्या आहेत पुष्कळ वेळा अशा गोष्टी एक तर निखालस खोटया असतात किंवा त्यात फारसे तथ्य नसते संबंधित व्यतीशी त्याबाबत चौकशी केल्याशिवाय कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो (नीति १४:१५) प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगण्यात आले होते की, तो कानांनी ऐेकेल तेवढयावरूनच निर्णय करणार नाही, डोळयांनी पाहील तेवढयावरूनच न्याय करणार नाही, तर तो न्याय यथार्थतेने करील (यशया ११:३, ४) हे सारे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या आणि विशेषत: विवाहापूर्वी मागणीद्वारे करारबध्द झालेल्या जोडप्याच्या बाबतीत खरे असावे एकमेकांबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण करण्याची संधी त्यांनी सैतानाला देऊ नये जर एकमेकांबद्दल परस्परांना विश्वास नसेल तर त्यांनी विवाह न करणेच उत्तम
जर एखादया जोडीदाराने पूर्वी भ्रष्टाचारी जीवन जगून त्याबद्दल कबुली दिली असेल आणि आता ती व्यती ख्रिस्तामध्ये नव्याने जन्मलेली असेल तर अशा वेळी काय करावे ? पवित्र शास्त्र म्हणते की, देवाने जे शुध्द केले ते तू निषिध्द मानू नकोस (प्रेषित १०:१५) त्या व्यतीच्या जीवनात खरोखरच परिवर्तन घडल्याबद्दल आपली खात्री झाली असेल, तर त्या व्यतीने पूर्वी पापमय जीवन कंठल्याच्या कारणावरून आपण तिचा अव्हेर करणे योग्य होणार नाही खरे म्हटले तर परमेश्वराने आम्हांलाही चिखलातून वर काढले आहे परमेश्वर जसे लोकांकडे पाहतो तसेच आपणही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे ख्रिस्ताच्या रताने शुध्द झालेल्या कोणत्याही व्यतीला तो अपवित्र समजताेे काय ? नाही मग आपणही अपवित्र समजू शकत नाही असे घडण्याचे कारण म्हणजे माणसाला दोषमुत करणाऱ्या ख्रिस्ताच्या रताच्या सामर्थ्याची जाणीव आपल्याला नसल्याने (म्हणजेत्याने आयुष्यात जणू काय केव्हाही पाप केले नाही असा तो शुध्द होतो, हे न समजल्याने रोम ५:९), आपण एखाद्या व्यतीच्या पूर्वचरित्रावरूनच त्याचा न्याय करतो
पालकांशी असलेली अनावश्यक ओढ काढून टाकण्यास दोघानाही मागणी नंतरच्या काळात सवड मिळते, हा आणखी एक त्या काळातला फायदा आहे विवाहानंतरही कोणी आपल्या पालकांवर प्रेम करणे व त्यांची काळजी करणे यात काही चूक नाही खरे पाहता ते पवित्र शास्त्राला अनुसरून आहे परंतु एकमेकांपेक्षा आपल्या पालकांकडेच जास्त ओढा असल्याने पुष्कळसे विवाह नाशवंत ठरले आहेत
जे सर्व आयुष्यभर आपल्या घरातच राहिले व आपल्या पालकांपासून केव्हाही दूर गेले नाही, त्यांचा इतरांपेक्षा जास्त ओढा आपल्या पालकांकडेच असतो या विषयावर शिक्षण देताना पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगते की, यास्तव पुरूष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील (उत्पत्ती २:२४) ते स्त्रियांनाही तसेच लागू आहे (स्तोत्र ४५:१०)
मागणी झालेल्या जोडप्याने वारंवार भेटण्याची संधी मिळाल्यानंतरची इतरांची सोबत टाळून बाहेर जाणे व शारीरिक स्पर्शाच्या मोहात पडणे योग्य आहे काय ? दुसऱ्या प्रकरणामध्ये सांगण्यात आलेली तत्वे आपण पुन्हा एकवार लक्षात घेतली पाहिजेत भारतामध्ये मागणीनंतर दोघांनाही एकत्र फिरणे योग्य नाही असे मी म्हणेन अर्थात, मागणी झाल्यानंतर त्या जोडप्याला एकमेकांना भेटण्याची व खाजगीपणे बोलण्याची इच्छा होणे स्वाभाविक व योग्य आहे परंतु अशा गोष्टी दोन्ही जोडीदारांपैकी एकाच्या घरात किंवा दोघांच्या सामायिक मित्राच्या घरात, जिथे दोघांना एकत्र बसून निवांतपणे बोलता येईल तिथे व्हावयातदोघांनीही एकाकी ठिकाणी जाणे बदनामीलाच केवळ वाव देणार नाही तर त्यांच्या लैंगिक वासना उद्युत करण्यास मदत करील
निकट शरीरस्पर्शाबद्दल सांगायचे तर ते चूक असल्योच मी निश्चित म्हणेन मागणी हा काही लैंगिक स्वातंत्र्याचा परवाना नव्हे प्रत्येक गोष्टीकरिता योग्य अशी वेळ असते आलिंगन देण्याचा समय व आलिंगनाचा मोह टाळण्याचा समय असतो (उपदे ३:५) आलिंगन देण्याचा समय विवाहानंतर असतो आधी धीर धरा म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन किती सौख्याचे बनते ते पहा, कारण कसल्याही प्रकारची दोषाची भावना तुमच्या मनात सलणार नाही विवाहापूर्वी जेव्हा जोडपे निकट शरीरस्पर्श करते किंवा आलिंगन देते तेव्हा त्यांचे वैयतक संबंध बिघडतात व भावनेचा आवेग वाढतो, प्रार्थना संपुष्टात येते, (प्रार्थनेऐवजी शरीरस्पर्शची चटक लागते) आणि अगदी विवाहपूर्व शरीरसंबंध होण्यापर्यंत मजल जाऊ शकते
मागणी मोडण्याची शयताही लक्षात घेतली पाहिजे जर शरीरस्पर्श झालेला असेल तर मागणी मोडल्यानंतर त्या तरूणाला आपल्या शरीराला स्पर्श करू दिल्याबद्दल तरूणीला फार खेद वाटेल म्हणून दुसऱ्या प्रकरणात मी म्हटले आहे की, जर तूरण गैरवागणूक करीत असेल तर तरूणीने त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण अनिर्बंध वागण्याचे दुष्परिणाम त्याच्यापेक्षा तिच्यावर अधिक होतात अशा प्रकाराला प्रतिबंध केल्यामुळे ती त्याला मुकेल अशी भीती बाळगता कामा नये जर तो विवाह करण्यालायक पुरूष असेल तर तो तिच्या अशा वागण्यामुळे दु:खी होणार नाही, उलट तिला अधिक मान देईल जर तो त्याला अपमान वाटला तर तो तिच्यासाठी अयोग्य असल्याचेच स्पष्ट होईल
मागणी झालेल्या काही जोडप्यांना असे वाटते की, छोटया गोष्टींबाबत जर दोघांचे एकमत झाले नाही, तर ते एकमेकांना लायक नसल्याचे दर्शवते आणि मग त्यांना शंका वाटू लागते की ही मागणी पुढे चालू ठेवावी की नाही? परंतु आपल्या जोडीदाराशी केव्हाही मतभेद होणार नाही अशा विचाराने जर कोणी विवाह केला तर (वास्तवतेपेक्षा परीकथेचा पगडा मनावर बसल्यामुळे) ते त्यांचे सुखस्वप्नच म्हणावे लागेल अगदी धार्मिक लोकांच्या अनुरूप असल्याचे किंवा त्यांचा विवाह परमेश्वराच्या इच्छेविरूध्द असल्याचे काही ते चिन्ह नाही जर ते असते तर मग परमेश्वराने नियुत केलेला विवाह कुठेही झाला नसता ज्यावेळी दोघांपैकी एक जोडीदार स्वत:ची इच्छाशती नसेलेले यांत्रिक बाहुले असेल, तेव्हाच मतभिन्नता किवां लहान सहान गोषटींबाबत कुरबूर न होणारे वैवाहिक जीवन आढळेल लहान सहान गोष्टींत मतभेद होणे हे मागणी मोडण्याचे कारण केव्हाही ठरता कामा नये उलटपखी ते दोघांमध्येही सुदृढ इच्छाशती असल्याचे शुध्द चिन्ह असू शकेल मात्र त्यासाठी दोघांमध्येही विनयशीलता व परस्परांकडे नम्रपणे क्षमा मागण्याची वृत्ती असली पाहिजे स्त्रीप्रमाणे पुरूषही क्षमा मागण्यास तत्पर असला पाहिजे भारतीय समाजव्यवस्थेत पुरूषासाठी ते अपमानकारक समजले जाते पंरतु ख्रिस्ती लोकांसाठी मात्र ते तसे नाही जो पुरूष आपल्या पत्नीकडे क्षमा मागण्यास तयार नसतो त्याने केव्हाही विवाह करता कामा नये
मागणी झाल्यानंतरच्या काळातकाही बाहय स्वरूपाच्या समस्यांमुळे आणि अडचणींमुळे विवाहाला विलंब होण्याचा संभव असतो किंवा त्यामुळे दोन्ही जोडीदारांना मनस्ताप व दु:ख होते उदाहरणार्थ, पालकांची असंमती किंवा आर्थिक अडचणीपण या अडचणींमुळे निराशा आणि दु:ख निर्माण होण्यास वाव देता कामा नये उलटपक्षी, त्यामुळे प्रेमसंबंध दृढ व्हावेत आणि भावी गृहाचा पाया अगदी खोलवर रचला जावा तुम्ही किती सहन करू शकता याची परमेश्वराला कल्पना आहे आणि तो विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शतीपलीकडे होऊ देणार नाही (१ करिंथ १०:१३) त्याच्या इच्छित समयी तो प्रत्येक तांबडया समुद्रातून माग काढील आणि त्याने तुमच्यासाठी निर्माण केलेल्या स्थळी तुम्हा उभयतांना विजयाने घेऊन जाईल (निर्गम १४) म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे अंत:करण निराशेने व्यथित होऊ देऊ नका
मागणीनंतरच विवाहपूर्व कालावधी किती असावा ? त्यासाठी काही नियम रता येणे शय नसले तरीही जेव्हा उभयता एकाच ठिकाणचे असतात आणि वारंवार भेटतात तेव्हा हा काळ सहा महिन्यांपेक्षा दीर्घ नसावा जेव्हा ते एकमेकांपासून दूर असतात तेव्हा हा कालावधी साधारणपणे बारा महिन्यांपेक्षा अधिक नसावा मागणी घातल्यानंतर दोघांच्याही भावना उत्कटतेच्या पराकोटीला पोचलेल्या असतात आणि प्रदीर्घ काळापर्यंत अनावर स्थितीत राहिल्याने मानसिक ताण वाढण्याचा संभव असतो
वॉल्टर ट्रोबिश यांनी आपल्या आफ्रेिकेतील प्रेमकथा या पुस्तकामध्ये मागणीनंतरच्या काळात तुलना आईच्या पोटात मूल असणाऱ्या काळाशी केली आहे विवाहाच्या दिवसाचा संबंध त्यांनी बालकाच्या जन्माच्या दिवसाशी लावला, कारण ज्या दिवशी बालकाचा जन्म होतो त्या दिवशी त्याला सर्वजण पाहतात परंतु बालकाचा प्रत्यक्ष जन्म होण्यापूर्वी मातेच्या उदरात त्याच्या पूर्वतयारीसाठी व वाढीसाठी काही महिने जावे लागतात मागणीनंतरचा विवाहपूर्वकाळ म्हणजे नकी काय याचे हे चांगले चित्र आहे
नियमित प्रकाराने झालेली मागणी म्हणजे विवाह करण्यासंबंधी गंभीर प्रतिज्ञा आहे आणि तिला सहजपणे हाताळता कामा नये पवित्र शास्त्र म्हणते की, जो परमेश्वराच्या समक्षतेमध्ये राहतो तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वत:चे अहित झाले तरी ती मोडीत नाही (स्तोत्र १५:४) असत्य वाणी परमेश्वराला वीट आणिते, परंतु सत्याने वागणारेत्यास आनंद देतात (नीति १२:२२) ख्रिस्ती व्यतीचे होय म्हणजे होय असावे व नाही म्हणजे नाही असावे (मत्तय ५:३७, याकोब ५:१२)
विवाहाच्या औचित्याबद्दल शंका निर्माण करणाऱ्या काही नव्या गोष्टी प्रकाशात आल्या तर मागणी मोडणे योग्य आहे काय? जर दुसऱ्या व्यतीचा नव्याने जन्म झालेला नसेल तर तुम्ही त्वरित मागणी मोडायला हवी पण नव्या जन्माबद्दल मागणीपूर्वीच चौकशी करणे आवश्यक आहे हे आश्वासन मागे घेतल्याने तुम्ही वर सांगितलेल्या परिच्छेदातील प्रतिज्ञा काही मोडीत नाही कारण त्या विवाहामुळे केवळ तुमचीच नव्हे तर या पृथ्वीवरील परमेश्वराच्या कार्याचीही हानी होईल २ करिंथ ६:१४ या वचनाद्वारे तुमचे मार्गदर्शन व्हावे
जेव्हा दुसरी व्यती नव्याने जन्मलेली असेल तेव्हा मागणी तोडण्यासाठी शय होणारे एकच कारण म्हणजे ती व्यती तुमच्याशी विश्वासू नाही हे समजणे किंवा पूर्वी ठाऊक नसलेली प्रमुख सिध्दान्तविषयक तीव्र मतभेदासारखी एखादी गंभीर असामोपचारी बाब उघडकीस येणे दुसऱ्या व्यतीला वचन दिल्यानंतर लगेच परमेश्वराच्या इच्छेबद्दल आपण अनिश्चित असल्याचे सांगून वचनभंग करतात त्या ढोंगी विश्वासणाऱ्यांचा परमेश्वर केव्हाही सन्मान करीत नाही आपल्याला परदेशी जायला पाहिजे या क्षुल्लक बाबीवरून मागणी तोडणारा एक तरूण मला ठाऊक आहे अशा परिस्थितीमुळे मुलीची अतिशय कुचंबणा झाली व तिच्या कुटूंबियांनाही तिच्या विवाहाकरिता दुसऱ्या तरूणाचा शोध करणे अशय होऊन बसले अशा प्रकोर वागण्यात स्त्रियांपेक्षा पुरूष अधिक दोषी ठरतात अशा प्रकारचे चंचल लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला कमीपणा आणतात तुम्ही वचन देण्यापूर्वी आपली खात्री करून घ्या तुमची जर खात्री नसेल तर थांबा तुमच्या चंचल मनोवृत्तीमुळे दुसऱ्या लोकांच्या जीवनाचा नाश करू नका नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे (उपदे ५:५)
ज्यांचा विवाह होणार आहे, अशांनी त्यांच्या विश्वासातील विासणाऱ्या समलिंगी विवाहिताचा वैवाहिक जीवनाबद्दल सल्ला घेणे अत्यंत उपयुत आहे अशा प्रकारचा सल्ला अत्यंत मूल्यवान आहे दोन्ही जोडीदारांना शरीराच्या गुप्तेंद्रियांची रचना व शरीरविज्ञान, प्रजोत्पादनाची तत्वे आणि विवाहातील शारीरिक गोष्टींचे सामान्य ज्ञान असले पाहिजे त्याबद्दल त्यांनी समलिंगी विवाहित (शयतो विासणाऱ्या) डॉटरांचा वैयतक सल्ला घ्यावा अजाणतेपणामुळे काही विवाहित दांपत्यांना शारीरिक संबंधातील अयोग्य तडजोडीमुळे सतत निराशा अनुभवावी लागली आहे गुप्तेंद्रियांची रचना व शरीरविज्ञान माहिती डब्ल्यू मेलविल कॅपर आणि एच मॉगन विल्यम्स यांचय ढेुरीवी उहीळीींळरप चरीीळरसश‘ या पुस्तकात आढळून येईल
आपल्या विवाहाच्या तपशीलवार तयारीबद्दल दोन्ही जोडीदारांनी चर्चा करावी विवाहविधीमधये काय कार्यक्रम असावा याची कल्पना त्यांनी आपल्या आईबापांना,पालकांना व पाळकांना द्यावी प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यतीने अन्य जातींच्या रिवाजांना व प्रथांना टाळून ख्रिस्ताचा सन्मान करणाऱ्या सरळ, साध्या विवाहाबद्दल आग्रह धरावा दु:खाची गोष्ट म्हणजे भारतातील पुष्कळशा ख्रिस्ती विवाहामध्ये हिंदू धर्माकडून उसन्या घेतलेल्या पध्दती आढळतात अशा अन्य धर्मीय रिवाजांच्या आहारी अगदी विश्वासणारेही जातात ही शरमेची गोष्ट आहे स्वत:चा बचाव करण्यासाठी ते म्हणतात की, आमच्या आईवडिलांना व नातेवाईकांना आम्हांला दुखवायला नको परमेश्वराचा त्यामुळे अपमान होईल, त्याला खेद होईल, त्याला दु:ख होईल याची ते पर्वा करीत नाहीत हे स्पष्ट आहे (कदाचित परमेश्वरापेक्षा त्यांना आपल्या नातलगांची भीती वाटत असेल म्हणून ते निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भती व सेवा करतात रोम १:२५) या प्रसंगी तुम्ही ख्रिस्तीतर धर्मरिवाजांसाठी विवाहविधीचे द्वार खुले केल्यास परमेश्वराने तुमच्या विवाहप्रसंगी हजर राहून आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा तुम्हाला करता येणार नाही परमेश्वराच्या वचनाला दृढपणे चिकटून राहा व कोणत्याही परिस्थितीत इतर धर्मरूढींशी तडजोड करू नका आणि मग परमेश्वर तुमचा आदर करील
ख्रिस्तावरील आपल्या विश्वासाची छोटीशी साक्ष देण्याची आदर्श संधी नवरा व नवरी या दोघांनाही विवाहविधीमुळे मिळते ही संधी गमावता कामा नये, तर परमेश्वरासाठी तिचा सुदपयोग करावा अगोदरच आईबापांशी व पाळकांशी या सर्व गोष्टींबाबत चर्चा करून त्यानुसार विवाहविधीची योजना तयार केली पाहिजे
विवाह झाल्याबरोबर लगेच किंवा शय तितया लवकर नवपरिणीत दांपत्याने कमीत कमी एका आठवडयासाठी एखाद्या निवांत ठिकाणी एकत्र जाणे उचित आहे कारण तिथे ते परस्परांच्या व परमेश्वराच्या सहवासात एकान्तात राहू शकतात तुम्ही त्याला मधुचंद्र म्हणा किंवा म्हणू नका, परंतु ही वेळ अत्यंत मोलाची व महत्वाची असते जर तुमच्यासाठी ते काही कारणामुळे अशय असेल तर परमेश्वराची प्रार्थना करा आणि परमेश्वर तुमच्यासाठी काय करू शकतो ते पाहून तुम्ही चकित व्हाल
विवाहानंतर जोडप्यासाठी त्यांचे स्वत:चे घर असावे व त्यांनी कोणत्याही नातेवाईकांबरोबर राहू नये हे केव्हाही हितकारक असते भारतामध्ये आर्थिक व इतर काही गोष्टींमुळे ते नेहमीच शय होत नाही परंतु शय असेल तिथे तेच पसंत करावे
विवाहाच्या तयारीसंबंधाने आपण काही प्रमुख गोष्टींची चर्चा केली आहे त्यापैकी कोणतीही बाब कमी महत्वाची आहे असे समजू नका रॉकेट अंतराळात परिणामकारकपणे जाण्यासाठी शून्य आकडा येण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक तयारी करावी लागते त्याचप्रमाणे सुखी विवाहाचा पाया विवाहदिनापूर्वी अनेक दिवसांत घातला जातो
लैंगिक बाबी, प्रेम आणि विवाह यांच्या क्षेत्रात आनंदाचा मार्ग असून त्यावरून आपण वाटचाल करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे परंतु पुष्कळ लोक दु:खाच्या गलिच्छ गटारातून चालणेच पसंत करतात असे वाटते ! या विषयांतील सर्वच बाबींचा स्पष्ट खुलासा केलेला आहे त्यांतून कोणती निवड करायची तो तुमचा प्रश्न आहे तुमच्या ह्दयातील गुप्त स्थळी तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहात आहा त्या ठिकाणी तुम्ही जे निर्णय घ्याल ते तुमच्या व परमेश्वराशिवाय कोणालाही ठाऊक असणार नाहीत परंतु तुमची जीवनाची परिणामकारकता व आशीर्वादितपणा या निर्णयांवर अवलंबून राहील जर आपल्याला परमेश्वराच्या राजमार्गावरून जायचे आहे, तर आपल्याला त्याची किंमत द्यावी लागेलप्रत्येक पावलागणिक परमेश्वराला अनुसरण्याची ती किंमत आहे कारण आनंदाचा राजमार्ग हाच पावित्र्याचा राजमार्ग असतो (यशया ३५:८ व १० ची तुलना करा)
या राजमार्गाच्या दोन्ही बाजूंना परमेश्वराने कुंपण लावले आहे आणि जे हे कुंपण तोडतात त्यांना सर्प डसतो (उपदे १०:८) असे पवित्र शास्त्र आपल्याला इशारा देते एदेन बागेतही परमेश्वराने एका झाडाला कुंपण घातले होते, परंतु सैतानाने त्या झाडावरील फळांचे सौंदर्य हव्वेला दाखवले, त्या फळाचे सेवन केल्यानंतर होणारे फायदे सांगितले आणि ते खाल्ल्यानंतर तिला कसल्याही परिणामाला तोंड द्यावे लागणार नाही याची तिला खात्री दिली मग तिला प्रतिबंधाचे कुंपण तोडण्याचा मोह झाला आणि तिला तो दुष्ट सर्प, सैतान डसला लैंगिक बाबी, प्रेम आणि विवाह यांतील प्रतिबंधित विभाग व देवाने त्यांना लावलेले कुंपण पवित्र शास्त्रात स्पष्टपणे दाखवले आहे आणि या पुस्तकात त्यांचे स्पष्टीकरण केले आहे परमेश्वराचा मार्ग सोडावा, परमेश्वराने उभारलेले कुंपण मोडावे, परमेश्वराने प्रतिबंध केलेल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा यासाठी लक्षावधी तरूणांना आणि वृध्द लोकांनाही मोहजालात फसवण्याबाबत सैतान यशस्वी ठरला आहे सर्पाचा हा दंश आद्य पालकांसाठी जितका भयंकर होता तितकाच भयंकर तो आजही आहे हे या लोकांना फार उशिरा समजते
परमेश्वराच्या वचनाचे कटाक्षाने पालन करणे आणि परमेश्वराने स्वत: रचलेल्या प्रतिबंधाचा आदर करणे यातच आपली सुरक्षितता आहे त्यांचे उल्लंघन करण्यापासून सावध राहा, नाही तर परिणामी तुझा देह आणि तुझी शती क्षीण झाल्यावर तू शोक करशील आणि तू म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानिले? मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे, असे होईल (नीति ५:११ ते १४)
काना येथील विवाहावरून आपल्याला परमेश्वराचा आदर केल्याने मिळणाऱ्या आशीर्वादाची कल्पना येते (योहान २:१११) प्रभू येशूने आपले गौरव प्रथमच प्रकट करण्याचा निर्णय एका विवाहाच्या वेळी घेतला हे अत्यंत सूचक आहे आजही, प्रत्येक विवाहामध्ये आपले गौरव प्रकट करण्याची त्याची इच्छा आहे लैंगिक बाबी, प्रेम आणि विवाह ही त्याने आपल्याला दिलेल्या सर्वात मौल्यवान वरदानांपैकी आहेत आपण त्याला संधी दिली तर ही साधने आमच्यासाठीच केवळ नव्हे आमच्याद्वारे इतरांनाही त्याचे वैभव त्याने प्रकट करावे म्हणून उपयुत ठरतील
काना येथील विवाहातील द्राक्षारसाची कमतरता हे दर्शविते की, प्रत्येक विवाहामध्ये काही ना काही तरी अडचणी येणारच या अडचणी शेवटी पतिपत्नींना हताश करून निराशेच्या गर्तेत नेऊन सोडू शकतात परंतु जेव्हा येशूला विवाहामध्ये सर्वोच्च सथान दिले जाते तेव्हा, त्याने काना येथे केल्याप्रमाणे तो त्वरित सर्व अडचणी सोडवतो व गरजा पूर्ण करतो
घरामध्ये केवळ ख्रिस्ताला निमंत्रण देणेच काही पुरेसे नाही, तर तो घराचा प्रभू मालक झाला पाहिजे घरामध्ये पतीचे (किंवा पत्नीचे) प्रभुत्व गाजत असेल तर ख्रिस्त या घराचा पुढारी आहे असा फलक नुसता लावणे म्हणजे संभावना करणे होय परंतु जेव्हा ख्रिस्त हाच घराचा पुढारी असल्याचे मानले जाते तेव्हा त्याने दोन हजार वर्षापूर्वी काना येथे केल्याप्रमाणे (वचन ११) तो आपले गौरव तसेच प्रकट करतो
मरीयेने सेवकांना तिथे सल्ला दिला होता की, हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा (वचन ५) त्यांनी तो सल्ला पूर्णपणे मानला आणि निश्चयाने व तात्काळ येशूची आज्ञा पाळली आणि लगेच तेथे उत्पन्न झालेल्या अडचणीचे निवारण झाले जर विवाहित दांपत्ये (आणि विवाहाच्या वाटेवरील तरूण लोक) हा सल्ला पाळतील आणि असाच निश्चय व प्रभूच्या आज्ञांचे तात्काळ पालन करतील तर त्यांच्या समस्यांवर त्वरित उपाय सापडतील या विवाहामध्ये पाण्याचे द्राक्षारसात परिवर्तन झाले चव, रंगरहित आणि साधारण असलेल्या गोष्टीचा क्षणार्धात पालट होऊन ती गोड, रंगयुत आणि मूल्यवान झाली परमेश्वर जेव्हा घराचे पूर्ण नियंत्रण करणारा असतो तेव्हा वैवाहिक जीवनातील साध्या गोष्टी (दररोज घडणाऱ्या कंटाळवाण्या गोष्टीदेखील) कशा कांतिमान ठरतात याचे हे चांगले उदाहरण आहे रूचिविहीन असेल ते गोड होते, आणि पूर्वी मोल नसेल त्याला मोल येते
या चमत्कारामुळे पुष्कळ लोकांच्या गरजा पुरविल्या गेल्या फत दोन्ही जोडीदारांना सुख देण्यामुळे ख्रिस्ती विवाहाचा उद्देश सफल होत नाही परमेश्वराची इच्छा अशी आहे की, विवाहित दांपत्याचे पात्र सतत काठोकाठ भरलेले असावे (स्तोत्र २३:५) इतर अनेकांसाठी खरे तर त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकासाठी ती आशीर्वादाचे साधन बनावीत आपल्या आज्ञाधारक सेवकाला एकदा परमेश्वर म्हणाला, तुझे मी कल्याण करीन तू कल्याणमूलक हो (आणि) तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील (उत्पत्ती१२:२,३) गलती ३:१४ नुसार परमेश्वराचा तो आशीर्वाद आपल्यासाठीही आहे विवाहामध्ये यापेक्षा दुसरे काही महान ध्येय असू शकेल का? परंतु ज्या प्रमाणात आपण आपल्या दैनंदिन जीवनात परमेश्वराच्या आज्ञा पाळतो त्याच प्रमाणात आपण इतरांसाठी आशीर्वाद ठरतो परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्याद्वारे अभीष्ट पावतील (उत्पत्ती २२:१८)
लैंगिक बाबी, प्रेम आणि विवाह यांच्या क्षेत्रामध्ये चुका करणाऱ्या व असफल होणाऱ्यांना काना येथील चमत्कार आशेचा संदेश देत आहे काना येथे द्राक्षारस संपला तेव्हा लोकांनी प्रभूकडे याचना केली आणि प्रभूने त्यांच्यावर खाली पाहण्याची वेळ येऊ दिली नाही तुमचे अपयश कितीही मोठे असले तरी तुम्ही तुमच्या गरजेचया वेळी त्याच्याकडे याचना केली तर तो तुमच्यावर खाली पाहण्याची पाळी येऊ देणार नाही काना येथील घर धन्याने आपली गरज जशी प्रामाणिकपणे सांगितली तसेच तुम्ही तुमच्या गरजा व अपयश त्याला प्रामाणिकपणे सांगावे एवढीच त्याची अपेक्षा आहे एखाद्या मुलीबरोबर (अथवा मुलाबरोबर) तुमच्या मूर्खपणामुळे तुमचे संबंध पराकोटीला पोचले आहेत काय? अज्ञानापोटी तुम्ही प्रेमामध्ये भयंकर चूक केली काय? त्यामुळे तुम्हांला शरम व निराशा वाटते काय ? दुसरे लोक तुमच्याबद्दल गैरसमज करून घेऊन तुम्हाला दोष लावतात काय? किंवा तुमच्याकडे कुत्सितपणे पाहतात का ? तर एका क्षणाचाही विलंब न करता तुम्ही परमेश्वराला शरण जा तो पाप्यांचा मित्र आहे तो तुमच्या अपराधांची क्षमा करण्यासाठी आणि सैतानाने बिघडवलेले तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुमची वाट पाहात आहे कारण या दोन हेतूंची पूर्ती करण्यासाठी तो या जगात आला (१ योहान ३:५,८) निराशेला बिलकूल थारा देऊ नका कारण तुमच्यासाठी आशेला जागा आहे काना येथील विवाहामध्ये उणीव असलेली गोष्ट त्याने आवश्यकतेहून अधिक भरून काढली तसेच तो तुमच्या जीवनातील प्रत्येक कमतरता आवश्यकतेहून अधिक भरून काढील काना येथे प्रभूने आपले गौरव प्रकट केले तुमच्या बाबतीतही तो तसेच करील
जर तुम्ही निराश आहात तर ख्रिस्ती जीवनामधील खरे आशीर्वाद, लोभामुळे नाही तर त्यागामुळे प्राप्त होतात हे सत्य लक्षात घेऊन आनंदित व्हा (प्रेषित २०:३५) तुमच्या चांगल्यासाठी परमेश्वर सर्व गोष्टी साधून आणू शकतो व अतृप्त इच्छांऐवजी त्याच्या गौरवासाठी पूर्णत्त्वाचे जीवन जगावे म्हणून तुम्हांला मदत करू शकतो
लैंगिक बाबी, प्रेम व विवाह या बाबतीत परमेश्वराचे गौरव हे एकच तुमचे ध्येय असू द्या मग या क्षेत्रात तुम्ही त्याच्या योग्य इच्छेला मुकाल अशी भीती बाळगण्याचे तुम्हांला कारण राहणार नाही ज्या ठिकाणी कोणताही सिंह किंवा हिंस्त्र पशू नाही, अशा राजमार्गावरून तो निश्चितच तुम्हांला नेईल तुमच्या जीवनाच्या प्रवासाच्या अखेरपर्यंत परमेश्वराचे गौरव अधिक तेजस्वी व प्रकाशमान राहील या स्वर्गीय राजमार्गावर तुम्ही जीवनभर चालत रहावे असे होवो आमेन