ख्रिस्ती विश्वासणारे एक सर्वसाधारण चूक नेहमी करतात, ती ही की पवित्र शास्त्रातील एखादे वचन घेऊन बसतात व त्याच विषयावरील दुसऱ्या पवित्रशास्त्र वचनाकडे दुर्लक्ष करतात
सैतानाने प्रभू येशूची अरण्यात परीक्षा घेतलीतो म्हणाला, असा शास्त्रलेख आहे (मत्तय 4:6) परंतु प्रभू येशूने त्याला प्रत्युतर करीत म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे (मत्तय 4:7) जेव्हा आम्ही एका शास्त्रलेखाचा दुसऱ्या शास्त्रलेखाद्वारे तुलनात्मक अभ्यास करतो म्हणजे हा शास्त्रलेख आहे यासोबत आणखी असाही शास्त्रलेख आहे असे वाचतो तेव्हाच परमेश्वराचा संपूर्ण मनोदय आम्हास कळतो
आपण त्या महान आदेशाविषयी अभ्यास करू या
येशूने आपल्या शिष्यांस शेवटली महान आज्ञा दिली सर्व जगात जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा (मार्क 16:15) येशूने हेही आज्ञापिले की आ/न सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा (मत्तय 28:19) हया दोन्ही आज्ञा एका महान आज्ञेचेच दोन भाग आहेत आणि हे जाणून, ओळखून आणि त्यांचे पालन करूनच आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराची पूर्ण इच्छा समजू शकतो व ती पूर्ण करू शकतो
पहिली पायरी अर्थातच जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करणे (मार्क 16:15) ही आहे ही आज्ञा कोणा एका व्यतीस केलेली नसून प्रभूच्या संपूर्ण मंडळीस केलेली आहे हे प्रथम लक्षात घ्यावे मानवी दृष्टया एका व्यतीने किंवा
एखाद्या मंडळीने हे कार्य करणे, संपूर्ण सृष्टीला सुवार्ता प्रचार करणे अशयच आहे पण आपण सर्वच हयात थोडा थोडा हातभार लावून हे करू शकतो
पण आपण प्रत्येकाने हा थोडा भाग पूर्ण केलाच पाहिजे येथे प्र्रेकृ 1:8 हे वचन आमच्यापुढे येते प्रत्येक विश्वासणाऱ्याला जर प्रभावी साक्षीदार व्हायचे असेल तर त्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यांची गरज आहे आता आपण हे लक्षात घ्यावे की, प्रत्येक व्यती सुवार्तिक होऊ शकत नाही इफिस 4:11 हे वचन स्पष्ट करते, पण प्रत्येकास साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे
सुवार्तिकाच्या कामाचे क्षेत्र साक्ष देणाऱ्यापेक्षा अधिक विस्तृत प्रकारचे असते साक्ष देणारा आपल्या कामाच्या क्षेत्रात, नातेवाईकात, शेजाऱ्यांत त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यतींना ख्रिस्ताची साक्ष देतो, प्रचार करतो परंतु सुवार्तिकाचे काम केवळ आत्मे जिंकणे हे नव्हे किंवा लोकांस ख्रिस्ताजवळ आणणे नव्हे तर ख्रिस्ताच्या देहाची उभारणी करणे होय आपण कोणतेही इतर काम करीत असू किंवा आपला व्यवसाय कोणताही असो आपण सर्वच येशूची साक्ष देऊ शकतो
परंतु प्रभु येशू ख्रिस्ताने मंडळीला सुवार्तिक दिले आहेत त्यांची सेवा अधिक विस्तृत आहे म्हणजे हरविलेल्यास शोधण्याची आहे पण सुवार्तिकाचे काम केवळ आत्मे जिंकणे किंवा लोकांस ख्रिस्ताकडे आणणे नव्हे तर ख्रिस्ताच्या देहाची उभारणी करणे होय (इफिस 4:11,12) येथे आजच्या अनेक सुवार्तिकांचे अपयश आढळून येते आजचे अनेक सुवार्तिक मंडळीच्या उभारणीचे कार्य करीत नसून वैयतक आत्मे जिंकत आहेत हे आत्मे नंतर बहुधा अशा मंडळयांत पाठविले जातात ज्या मंडळया मृतावस्थेत आहेत येथे आत्मे एकदा हरवून जातात किंवा कोमट होऊन प्रभूच्या तोंडातून ओकण्यालायक बनून जातात (प्रवा3:16)
दोन्हींही दृष्टीने पाहू जाता ते प्रभूच्या मंडळीत बांधले जात नाहीत हे प्रत्ययास येते आणि अशा रीतिने सैतानाचा हेतू साध्य झालेला दिसून येतो कारण हा आत्मा मत्तय 23:15 प्रमाणे दुप्पट असा नरकपुत्र बनतो कारण प्रथम तो हरवलेला होताच, आणि आता तो बचावला आहे अशा भ्रमात काही सुवार्तिकांनी त्याला पाडले आहे, परंतु खरे पाहता तो हरवलेलाच आहे! हया सर्व सुवार्तिकांच्या अशा सुवार्ता प्रसाराद्वारे फार काय तर सुवार्तिकांचे व्यतगत साम्राज्यच तेवढे स्थापिले जाते आणि याचे कारण एकच की त्या सुवार्तिकाला पैशाची किंवा मानवाकडून प्राप्त होणाऱ्या फाजिल मान सन्मानाची हाव किंवा दोन्ही गोष्टींची हाव असते !
येशूने सुवार्तिकांना माणसे धरणारे म्हणून संबोधिले आहे पण जो सुवार्ताप्रसार न बदललेल्या ख्रिस्ती पुढाऱ्यांसोबत, गटांसोबत किंवा जनमत प्राप्त करू पाहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांसोबत केला जातो तो सुवार्ताप्रसार जणू काही छिद्रे असलेल्या जाळीने मासे पकडण्यासारखे आहे येशूने कधी हन्ना, कैफा, हेरोद किंवा पिलात यांना आपल्यासोबत मंचावर बसावयाचे व त्याच्या सुवार्ताप्रसार सभांचे उद्घाटन करावयाचे आमंत्रण दिले असेल अशी आपण कल्पनाही करू शकत नाही पण आजचे सुवार्तिक केवळ एवढेच करून थांबत नाहीत, तर आपल्या मंचावरून हया अविश्वासू पुढाऱ्यांचा ते उदोउदो करतात
पुढे काय होते ? जे मासे जाळयात पकडले जातात त्यांना परत समुद्रात (मृतावस्थेतील मंडळयांमध्ये) सोडले जाते पुढील सुवार्ताप्रसाराच्या सभांत त्यांस पुन्हा जाळयात पकडले जाते आणि परत समुद्रात सोडले जाते ! ही प्रक्रिया अशा सुवार्तिकांद्वारे वारंवार चालविली जाते जे आज काल इंटरडिनॉमिनेशनल सभांचे आयोजन करीत आहेत प्रत्येक असे सुवार्तिक सभेत उंचावलेले हात मोजणे, निर्णय कार्ड भरून घेणे अशा गोष्टींद्वारे आपल्या प्रचारसभांच्या यशाचे मूल्यमापन करतात असे सुवार्तिक खरे म्हणजे देवदूतांऐवजी सैतानाच्या व त्याच्या हस्तकदूतांच्या आनंदाचे कारण ठरतात कारण जे दुप्पट नरकपुत्र बनणार आहेत अशा आत्म्यांविषयी स्वर्गाती देवदूत कसे बरे आनंद करू शकतील ! आजच्या अशा सभांतील तारण पावलेल्या आत्म्यांची आकडेवारी म्हणजे केवळ फसवेगिरी होय
येशू क्षमा करतो, रोग बरे करतो हया संदेशाच्या घोषणेसोबत चिन्ह व चमत्कार होत असतील, पण महत्वाचा प्रश्न शिल्लकच राहतो तो म्हणजे अशा सभांद्वारे किती आत्मे येशूचे शिष्य बनले आहेत व किती लोक प्रभूच्या मंडळीत रचले गेले आहेत?
प्रभूच्या प्रेषितांनी अशा प्रकारच्या सुवार्ता कार्याचा कधीच अवलंब केला नाही त्यांच्याद्वारे प्रभूकडे आलेल्यांना स्थानीय मंडळीकडे पाठवीत यासाठी की त्यांना प्रशिक्षण घेऊन प्रभूचे शिष्य बनता यावे व आध्यात्मिकरित्या त्यांनी प्रगती प्राप्त करून घ्यावी
इफिस 4:11 मध्ये ज्या पाच सेवाप्रकारांचा उल्लेख आहे (प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक) हया सेवा प्राथमिकतेच्या क्रमानुसार 1 करिंथ 12:28 मध्ये मांडण्यात आल्या आहेत येथे आपण वाचतो, त्यानेच प्रथम कोणी प्रेषित, दुसरे संदेष्टे, शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याचे कृपादान पावलेले (यांना सुवार्तिक म्हटले जाते कारण नवीन करारातील सर्वच सुवार्तिकांना रोग बरे करण्याचे वरदान प्राप्त झाले होते) नंतर व्यवस्था पाहणारे (याचा शब्दश: अर्थ जहाजाचा कप्तान असा आहे म्हणजे पाळक, मेंढपाळ)आहेत
यावरून स्पष्ट होते की परमेश्वराच्या शरीराच्या म्हणजे मंडळीच्या रचनाकार्यात सुवार्तिकापेक्षा प्रेषित, संदेष्टे, आणि शिक्षक यांचे स्थान अधिक महत्त्वाचे आहे सुवार्तिकाला योग्य स्थान तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तो या वचनाप्रमाणे प्रेषित, संदेष्टे, शिक्षक हयांच्या देखरेखीखाली त्यांच्या आधीन राहून आपले स्थान ग्रहण करतो आणि तेव्हाच त्याची सेवा खऱ्या अर्थाने मंडळीच्या उभारणीस पूरक ठरते आणि येथेच या वर्तमान शतकातील सुवार्ताप्रसार कार्य परमेश्वराच्या वचनापासून दूर झालेले आहे असे दिसून येते
सुवार्ताप्रसाराचा मुख्य उद्देश तेव्हाच सफल होतो जेव्हा आम्ही येशूच्या महान आज्ञेच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशात त्याचे मूल्यांकन करतो मत्तय 28:19 तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा तारण न पावलेल्यांसाठी देवाचा संकल्प याद्वारेच पूर्णतेस येतो
तारण प्राप्त झालेल्यांस शिष्य बनविणे महत्त्वाचे आहे
दु:खाची गोष्ट ही आहे की आजची तारलेली व्यती खऱ्या अर्थाने तारण पावलेली नसते, कारण पुष्कळांनी खरा पश्चातापच केलेला नसतो सुवार्ता सभांत त्याला येशूवर विश्वास ठेव एवढेच काय ते कळविले जाते पश्चाताप, परमेश्वराशी समेट यांची त्याला जाणीव करून दिल्या जात नाही अशी व्यती येशूचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, बरे होण्यासाठी केवळ प्रभूकडे येते पश्चाताप करून आपली पापे त्यागण्यासाठी नव्हे आजचे बहुतांश असे, तथाकथित परिवर्तन झालेले लोक एखाद्या अकाली जन्मलेल्या बालकासारखे असतात, अधीर दायांनी (सुवार्तिकांनी) बळजबरीने ओढून काढण्यागत असतात आकडेवारीच्या हावेखातर अपूर्ण बालकांना ते त्यांचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच ओढून काढतात ! आणि अशी बालके लवकरच मृत्यू पावतात किंवा इतरांसाठी पूर्ण आयुष्य एक समस्या बनून राहतात आपल्या पाळकांसाठी, मेंढपाळासाठी ते असंख्य समस्या निर्माण करतात या अशा व्यतींना आपण विश्वासात मागे घसरलेले असे म्हणू शकत नाही कारण ते कधी विश्वासात पुढे गेलेले नसतात ! येशूने म्हटले, पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात देवदूत आनंद करतात (लूक 15:7,10) ज्यांनी कधी आपल्या पापांबद्दल पश्चाताप केला नाही अशा विश्वासणाऱ्यांबद्दल नव्हे
जकयाने अन्यायाने घेतलेले धन चौपट परत करण्याची, त्याची भरपाई करण्याची तयारी दाखविली (लूक 19:9), तेव्हा येशूने म्हटले, आज हया घराला तारण प्राप्त झाले आहे दु:खाची गोष्ट ही की आजचे सुवार्तिक पश्चाताप, भरपाई यांचा उल्लेख न करता सर्रास तारण प्राप्त झाले आहे अशी घोषणा करतात
व्यतीच्या जीवनात परमेश्वराची इच्छा पूर्ण व्हावी असे असेल तर खऱ्या पश्चातापानंतरही व खऱ्या अर्थाने तारणप्राप्ती झाल्यानंतरही त्या व्यतीला शिष्यत्वाप्रत पोहोचविले पाहिजे शिष्यत्वाशिवाय सुवार्ताप्रसार अपूर्ण आहे
व्यतगत साम्राज्य बनविण्याची हाव ज्या सुवार्तिकाला असते ते तारलेल्यास शिष्यत्वाप्रत प्रशिक्षित करू शकणाऱ्या इतर सेवकांसोबत कार्य करू इच्छित नाहीत अशा सुवार्तिकांचा न्याय आम्ही करत नाही कारण न्याय करू नका असे वचन आम्हांस सांगते पण अशा सुवार्तिकांना प्रभूच्या न्यायाला शेवटी तोंड दयावे लागणार आहे कारण ते आपल्या परिवर्तीत व्यतींना शिष्यत्वाप्रत प्रशिक्षित होण्यापासून रोकतात
पश्चाताप व विश्वास यानंतरची दुसरी पायरी म्हणजे पाण्याचे बाप्तिस्मा घेणे मार्क 16:16मध्ये प्रभू स्पष्टपणे म्हणतात आणि प्रेकृ 2:38 मध्ये प्रेषित पेत्र हेच स्पष्ट करतो तसेच मत्तय 28:19 या वचनात पाण्याने बाप्तिस्मा घेण्याचे महत्व दर्शविले गेले आहे म्हणून नवीन जन्म पावलेल्यांसाठी ही पुढील पायरी होय
त्यानंतर येशूचा शिष्य या नात्याने त्याला दररोज प्रभू येशूचे अनुकरण करणे अत्यंत जरूरी आहे
लूक 14:2535 या वचनात शिष्यत्वाच्या अटी स्पष्ट केल्या आहेत
येशू येथे अशा व्यतींविषयी बोलत आहे ज्याने बुरूजाचा पाया घातला, पण तो पूर्ण करू शकला नाही कारण तो बांधकामाचे पैसे देऊ शकला नाही (28:30) यावरून स्पष्ट होते की शिष्य बनण्यासाठी किंमत मोजावी लागते येशूने म्हटले आहे की बांधण्यापूर्वी बसून त्याच्यासाठी द्याव्या लागणाऱ्या किंमतीचा विचार करा
पापक्षमेअंती आपण खूप वर्षानंतर शिष्यत्वाला लागणारी किंमत मोजण्यास बसावे अशी परमेश्वराची इच्छा नाही येशूने आपल्या शिष्यांना ते त्याजकडे आल्याबरोबर, शिष्यत्वाची किंमत मोजण्यास सांगितले लूक 14:35 मध्ये त्याने असेही म्हटले आहे की जो शिष्य बनू इच्छित नाही तो परमेश्वरासाठी त्या मिठासारखा आहे ज्याचा खारटपणा गेलेला आहे व ते उकिरडयावर फेकण्यालायक आहे
परीवर्तित व्यतीस शिष्य बनण्यासाठी प्रथम आप्तसंबंधांचा द्वेष करायचा आहे जे त्याला प्रभु येशूचे अनुसरण करण्यात अडखळण असे आहेत (लूक 14:26) दुसरे म्हणजे त्याने स्वत:चा नाकार करून रोज स्वत:चे स्वार्थी जीवन वधस्तंभास खिळिले पाहिजे (लूक 14:27) तिसरे म्हणजे त्याने भौतिक संपत्तीचा मोह टाळला पाहिजे (लूक 14:33) येशूचे शिष्य बनू इच्छिणाऱ्यांसाठी हया किमान अटी आहेत
पहिली अट म्हणजे आमच्या आप्तसंबंधीचे आमच्या मनात असलेले अमर्याद व स्वाभाविक प्रेम आम्ही धिकारले पाहिजे
प्रभु येशू म्हणतो, जर कोणी मजकडे येतो आणि आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ, बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही (लूक 14:26)
जरा कठोर विधान वाटते ना? द्वेष करणे म्हणजे काय? द्वेष करणे म्हणजे जिवे मारणे (1 योहान 3:15) उपरोत ठिकाणी आपणांस आपल्या आप्तसंबंधीच्या अमर्याद प्रेमाला जीवे मारावयाचे आहे
याचा अर्थ हा आहे का की आपण त्यांच्यावर प्रेमच करू नये ? अर्थातच नाही जेव्हा आम्ही मानवी प्रेमाला दूर करतो तेव्हा परमेश्वर त्याची जागा दैवी प्रीतीने भरून काढतो आपले आप्तांसंबंधीचे प्रेम शुध्द केले जाते म्हणजे आपल्या प्रेमभावनेत सर्वप्रथम स्थान आम्ही परमेश्वराला देतो आपल्या प्रेमीजनांना नव्हे
परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास कित्येक यासाठी भितात की त्यांना आपल्या आईवडिलांस किंवा पत्नी व इतरांस दु:खित करायची भिती वाटते प्रभुची ही इच्छा आहे की आम्ही त्यास आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यावे आणि हे जर आम्ही करू शकत नाही तर त्याचे शिष्य आम्हास होता येत नाही प्रभु येशू हा आपल्या सर्वस्वाचा प्रभ असावा नाही तर तो आपला प्रभच नाही !
येशूच्या या जगातील जीवनाकडे लक्ष द्या येशू आपल्या विधवा आईवर प्रीती करीत असला तरी आपल्या स्वर्गीय पित्याच्या परिपूर्ण इच्छेच्या आड त्याने ती प्रीती येऊ दिली नाही आणि लहान सहान गोष्टींच्या बाबतही आपल्या आईच्या प्रेमाच्या दबावाखाली तो कधीच आला नाही याचे उदाहरण आपण काना येथील लग्नाच्या ठिकाणी पाहतो जेथे आपण पाहतो की त्याने आपल्या आईच्या शब्दांप्रमाणे चमत्कार करण्यास नकार दिला (योहान 2:4)
येशू आम्हास शिष्यत्वासाठी भावाचा द्वेष कसा करावा हे शिकवितो पेत्र जेव्हा येशूला वधस्तंभापासून परावृत्त करू पाहत होता तेव्हा येशूने मागे वळून अत्यंत कठोर शब्दांत त्याची कानउघाडणी केली (येशूने असे कठोर शब्द इतरत्र वापरलेले दिसत नाहीत) त्याने म्हटले, पेत्रा, माझ्या पुढून निघून जा तू मला अडखळण आहेस (मत्तय 16:23) पेत्राने तर मानवी प्रेमाच्या वशीभूत होऊन येशूला सल्ला दिला होता पण येशूने त्याला कठोर शब्दताडण केले कारण त्याचे तसे करणे हे स्वर्गीय पित्याच्या इच्छेविरूध्द होते
स्वर्गीय पित्याचे स्थान येशूच्या जीवनात सर्वोच्च होते, आणि हीच वृत्ती आपणही त्याच्याप्रत बाळगावी अशी त्याची इच्छा आहे पुनरूत्थानानंतर योहान 21:1517 मध्ये येशू पेत्राला मंडळीच्या मेेंढपाळाची सेवा सोपविण्यापूर्वी विचारतो की इतर सर्वांपेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा तो प्रभु येशूवर अधिक प्रीती करतो काय? जे येशूवर सर्वोच्च प्रीती करतात त्यांनाच प्रभु आपल्या मंडळीत जबाबदारी सोपवितो
प्रकटीकरण 2:15 आपण वाचतो की इफिस येथील मंडळीच्या, पुढाऱ्याचे स्थान धोयात येते कारण त्याने आपली प्रभुवरील पहिली सर्वोच्च प्रीती त्यागिलेली होती
आम्ही स्तोत्रकर्त्याप्रमाणे, स्तोत्र 73:25,म्हणू शकतो की, स्वर्गात मला तुजशिवाय कोण आहे? व पृथ्वीवर मला तुजशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही: शिष्यत्वाची पहिली अट आपण पूर्ण केली असे आम्हास म्हणता येईल
प्रभु येशू ज्या प्रेमाची अपेक्षा करतो ते भावनात्मक, संवेदनशील मानवी प्रेम नव्हे जे गीतात, भतीरूपात गायिले जाते, तर जर आपण त्याजवर खरी प्रीती करीत असू तर आपण त्याच्या आज्ञा पाळू (योहान 14:21)
शिष्यत्वाची दुसरी अट म्हणजे, स्वत:चा द्वेष करणे (लूक 14:26) येशूच्या हय शिकवणीबद्दल समजण्यात आम्ही नेहमीच चूक करतो येशू म्हणतो की जर कोणी मजकडे येतो आणि आपल्या जीवाचाही द्वेष करीत नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही
पुढे तो याचा अर्थ स्पष्ट करतो, माझा शिष्य होऊ पाहाणाऱ्याने प्रथम आत्मत्याग करावा व स्वत:चा वधस्तंभ उचलून मला अनुसरावे (लूक 9:23) येशूच्या हया शिकवणीचा अनेकांना अर्थ कळलेला नाही
येशूने म्हटले की शिष्याला, आत्मनिग्रह करावा लागेल आणि प्रतिदिवशी स्वत:चा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे लागेल (लूक 9:23) शास्त्रवाचन, प्रार्थना याहीपेक्षा जर काही महत्वाचे असेल तर ते हेच की प्रतिदिनी आपला वधस्तंभ उचलून प्रभुस अनुसरणे ! आत्मत्याग म्हणजे स्वत:चा द्वेष करणे, आपणांस वंशपरंपरेने मिळालेल्या आदामस्वभावाचा द्वेष करणे, वधस्तंभ उचलण्याचा अर्थ आपल्या स्व ला वधस्तंभी खिळणे, वधस्तंभी खिळण्यापूर्वी त्या स्वभावाचा स्व चा द्वेष करणे अत्यावश्यक होय
आपले स्वार्थी जीवन हे आमच्या ख्रिस्ती जीवनाचा शत्रू आहे पवित्रशास्त्र हयास शारीरिक जीवन असे संबोधिते शरीर हे ऐहीक दुष्ट वासनांचे भांडारगृहच आहे हया दुष्ट भावना वारंवार उचंबळून स्वत:चा फायदा, स्वत:चा मान, सुख याकडे स्वमार्गाकडे आपल्याला ओढतात
जर आम्ही खरोबर प्रामाणिकपणे स्वत:चे परीक्षण केले तर आपणांस कळून येईल की वरपांगी चांगली दिसणारी आमची कृत्ये वास्तविकरित्या स्वार्थी (दुष्ट) मनोभावना व वासनात्मक प्रवृत्तीतूनच उद्भवतात जोपर्यंत आम्ही हया देहाचा द्वेष करून त्याला जीवे मारत नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने कधीच प्रभुला अनुसरू शकत नाही
म्हणूनच प्रभु येशूने स्वत:चा द्वेष करण्यासंबंधी किंवा स्वत:ला नाकारण्यासंबंधी इतके काही म्हटले आहे वस्तुत:, आपला जीव गमावणे हा वायप्रयोग शुभवर्तमानात सात वेळा पुन्हा पुन्हा आलेला आहे (मत्तय 10:39, 16:25, मार्क 8:35, लूक 9:24, 14:26, 17:33 योहान 12:25) ही येशूची अशी शिकवण पवित्र शास्त्रात पुन्हा देण्यात आलेली आहे हया विषयावर फार कमी प्रचार करण्यात आलेला आहे व हा विषय फार कमी समजला गेला आहे
स्वत:चा द्वेष करणे म्हणजे आपले अधिकार, सौभाग्य आपली प्रतिष्ठा आपल्या आकांक्षा या सर्वांवर पाणी सोडणे त्यांना दुय्यम स्थान देणे आपलेच मार्ग अवलंबिण्याची वृत्ती त्यागणे, आणि हे करण्याची आपली मन:पूर्वक इच्छा असली तरच आपण येशूचे खरे शिष्य होऊ शकतो
तिसरी अट आहे सर्वस्वाचा (आपले जे काही आहे पैसा, संपत्ती, जगिक मालमत्ता यांचा) त्याग करणे
लूक 14:33मध्ये येशू म्हणतो, याशिवाय कोणालाही माझा शिष्य होता येत नाही
सर्वस्वाचा त्याग म्हणजे जे आपले आहे ते आपले न समजणे अब्राहामाचे उदाहरण घ्या, अब्राहामाचा एकुलता एक पुत्र इसहाक याला अर्पण करण्यास प्रभु त्याला सांगतो (उत्पत्ती 22) पण त्याला वधण्यापूर्वीच तो अब्राहामाला हाक मारून थांबवितो कारण अर्पणाची गरज नव्हती, तर अर्पण करण्याची संपूर्ण इच्छा दाखविणे हेच प्रभुसाठी पर्याप्त होते त्यानंतर अब्राहामाला हे नेहमीच लक्षात राहिले की इसहाक हा आता त्याचा नाही प्रभुचा आहे
हेच सर्वस्व त्यागणे हयाचा अर्थ, प्रभु समर्पित गोष्टींमधील काही आपल्याला परत त्याचा उपयोगासाठी परत करतो, पण ती समर्पित वस्तु यापुढे आपली स्वत:ची नसते प्रभुची असते जसे आपले घर हे देखील प्रभुच्या मालकीचे आहे प्रभुने आपल्याला परत ते बिनभाडयाने त्याच्या सेवेकरता वापरण्यास दिल्याप्रमाणे! हे खरे शिष्यत्व आहे काय?
आम्ही आमची मालकीच्या वस्तूसंबंधाने असे केले आहे काय? आमची मालमत्ता म्हणजे आमची बँकबचत, स्थायी, अस्थायी संपत्ती, आमची नोकरी, आमची शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता, आमची पत्नी, आमची मुले, आमची कृपादाने व हया पृथ्वीवर जे काही आम्हाला प्रिय व मौल्यवान वाटते ते सारे ते सर्व आम्हाला प्रभुच्या वेदीवर समर्पित करावयाचे आहे तरच आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य बनू शकतो
असे केले तरच आपण परमेश्वरावर शुध्द अंत:करणाने प्रीती करतो असे म्हणता येईल शुध्द अंत:करणाबद्दल येशु मत्तय 5:8 मध्ये म्हणतो फत शुध्द विवेक असणे पुरेसे नाही शुध्द विवेक असणे म्हणजे प्रत्येक माहीत असलेल्या पापाचा तिरस्कार करून ते सोडून देणे पण शुध्द ह्दय म्हणजे सर्वस्वाचा (जे आपले आहे म्हणतो त्या सर्वाचा) त्याग करणे !
खरे शिष्यत्व म्हणजे
जोपर्यंत हया बाबीसंबंधी आपण पूर्ण प्रामाणिकतेने व गंभीरतेने विचार करीत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात परमेश्वराचा पूर्ण मनोदय सिध्दीस जाणे हे अशयच होय
जोपर्यंत प्रचारक, खऱ्या शिष्यत्वाचा हा संदेश लोकांना बिना भेसळ केल्यावाचून प्रचार करीत नाहीत, तोपर्यंत ख्रिस्तमंडळीची उभारणी ते करू शकत नाहीत हे तितकेच खरे
खऱ्या शिष्यत्वाचा मार्ग मत्तय 28:20 मध्ये आपणांस स्पष्ट दिसतो तो हा की शिष्यांना जे काही प्रभुने आज्ञापिले आहे त्यातील प्रत्येक वचनाचे पालन करण्यास शिकविले पाहिजे हा खऱ्या शिष्यत्वाचा मार्ग आहे येशूने दिलेल्या काही आज्ञा मत्तय 5,6,7 हया अध्यायात दिलेल्या आहेत ज्यांचे पालन करण्याची तसदी कित्येक विश्वासणारे घेत नाहीत
ज्यांस परमेश्वराचे पाचारण घडले आहे अशा लोकांनी परमेश्वराचा संपूर्ण मनोदय शिकवावा अशी आज आपल्या देशात गरज आहे जे स्वत: येशूच्या सर्व आज्ञांचे पालन करतात आणि येशूच्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास इतरांना शिकविण्याची जे उत्कट इच्छा बाळगितात आणि ख्रिस्ताच्या मंडळीची पूर्ण उभारणी करतात त्यांची आज गरज आहे
येशूने म्हटले की त्याच्या शिष्यांची ओळख पटविणारी एकच खूण आहे व ती म्हणजे त्यांची एकमेकांवरील प्रीती (योहान 13:35)
लक्षात घ्या ! येशूचे शिष्य त्यांच्या प्रचारसभांतून उपदेश करण्याच्या कौशल्यामुळे ओळखले जात नाहीत किंवा संगितातील प्राविण्यामुळे नव्हे, अन्य भाषा बोलण्यामुळेही नव्हे, सभांना जाताना बगलेत पवित्रशास्त्र बाळगल्यानेही नव्हे किंवा सभामध्ये जोरजोराने आवाज काढल्यामुळे त्यांची ओळख पटत नाही तर त्यांची एकमेकांवरील अपरंपार प्रीती पाहून लोकांस त्यांची ओळख पटेल!
सुवार्ता प्रचारसभांचे उद्दिष्ट हे असले पाहिजे की ज्या ठिकाणी अशा सभांद्वारे लोक ख्रिस्ताकडे येतात त्या ठिकाणी अशा मंडळीची स्थापना व्हावी जेथे एकमेकांवर प्रगाढ प्रीती करणारे शिष्य तयार होतील
आणि तरी वस्तुस्थिती ही दिसते की जेथे वारंवार सुवार्ताप्रसार सभांचे वर्षानुवर्ष आयोजन होते तेथे एकही अशी ख्रिस्ती मंडळी आपणांस आढळून येणार नाही जिच्याबद्दल आपणांस म्हणता येईल की, पहा, ते आपसात भांडत नाहीत एक दुसऱ्याच्या चुगल्या चहाडया करीत नाहीत, तर प्रीतीने राहतात
एखादया नवीन विश्वासणाऱ्याचे विजयी जीवन नसेल तर ते आपण समजू शकतो पण जर आपल्या देशातील मंडळयांतील वडील व ख्रिस्ती पुढाऱ्यांनी अशी भांडखोर व फुट पाडणारी प्रवृत्ती बाळगावी तर त्याला काय म्हणावे?
हयावरून हे स्पष्ट दिसून येते की मत्तय 28:19,20 मधील येशूच्या महान आज्ञेतील मुख्य भाग शिष्यत्व आणि येशूच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन करण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे
मार्क 16:15 मधील पहिल्या भागावरच सर्वत्र जास्त जोर दिल्या जात असलेला आपणांस दिसून येतो सुवातची घोषणा करण्यावर जोर देण्यात आला आहे परमेश्वर चिन्हे व चमत्कार करून आपल्या वचनांची पुष्टी करतो
पण मत्तय 28:19,20 या वचनात शिष्यत्वावर भर देण्यात आला आहे शिष्यत्वाचे जीवन येशूच्या आज्ञेचे पालन केल्याने प्रगट होते चिन्हे चमत्कार याकडे आकर्षित होणाऱ्यांची जास्त गर्दी आपणांस दिसते, पण आज्ञापालनाकडे मोजकेच वळतात! परंतु या दुसऱ्या भागाशिवाय पहिला अपूरा, अगदी अविकसित अधूऱ्या मानवी देहासारखा आहे पण किती याकडे लक्ष देतात?
येशूच्या सेवाकार्यात आपण पाहतो की त्याच्या आरोग्यदानाच्या, चमत्कारांच्या सेवेमुळे लोकसमुदाय त्याच्यामागे गर्दी करीत असे पण येशूने नेहमीच त्यांना मागे फिरून शिष्यत्वाबद्दल शिकविले (लूक 14:25,26) आजकालचे सुवार्तिक स्वत: किंवा प्रेषित, संदेष्टे, शिक्षक,मेंढपाळ जे सुवार्तिकाने सुरू केलेले कार्य पूर्ण करू शकतात ते या मंडळीतील सेवकांच्या सहकार्याने असे करतील काय?
प्रचारक शिष्यत्वाचा संदेश देण्याची हयगय का करीत आहेत? कारण त्यांना भिती असते की यामुळे कदाचित त्यांच्या मंडळीतील सभासदांची संख्या कमी होईल, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की याद्वारे त्यांच्या मंडळीचा आत्मिक दर्जा अधिक वाढेल
जेव्हा येशू लोकसमुदायास शिष्यत्वाचे शिक्षण देऊ लागले तेव्हा पुष्कळ लोक येशूस सोडून गेले आणि फत मोजके अकराच शिष्य त्याच्याजवळ राहिले (योहान 6:2 व 6:60 या वचनांची तुलना करा) कित्येकांना येशूचे वचन कठीण वाटले व ते त्याला सोडून गेले (योहान 6:60, 66) पण अकरा शिष्य शेवटपर्यंत त्याजसोबत राहिले व हयाच अकरा शिष्यांद्वारे परमेश्वराने आपली जगासाठी योजलेली योजना शेवटी पूर्णतेस नेली
प्रथम शतकातील अकर प्रेषितांनी सुरू केलेली ही सेवा येशू ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आम्ही आज पुढे नेली पाहिजे लोकांना प्रभुकडे आणल्यानंतर त्यांना शिष्यत्वाकडे व आज्ञापालनाकडे आणणे हे आमचे कर्तव्य आहे आणि मगच आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीची पूर्ण रचना करू शकू
जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरूंद आहे व थोडके आहेत ज्यांना तो प्राप्त होतो
ज्याला कान आहेत तो ऐकतो
शिष्य म्हणजे शिकणारा येशूला संपूर्णपणे अनुसरणारा तो येशूला आपला आदर्श मानून चालतो व प्रत्येक बाबतीत त्याला अनुसरतो
प्रीतीसारखीच शिष्यत्वाची सुरूवात ही कुटूंबापासूनच होते
शिष्यत्वाचा पाया म्हणजे येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात आपला प्रभू स्वीकारणे आणि आपणा स्वत:स व आपल्या सर्वस्वास त्यास समर्पित करणे
लूक 14:26 मध्ये येशूने आज्ञा दिली आहे की, आपल्या आईवडिलांचा द्वेष कर, याकडे थोडा वेळ आपण लक्ष देऊ या
पहिली पायरी आहे आईवडिलांचा मान राखणे, ही अभिवचनयुत पहिली आज्ञा आहे (इफिस 6:2) येशूने म्हटल्याप्रमाणे आपल्या आईवडिलांचा द्वेष करण्याअगोदर त्यांचा मान राखायला शिकले पाहिजे मान करणे शिकल्याशिवाय आम्ही द्वेष करणे शिकू शकणार नाही आज काल असे कित्येक अविश्वासू लोक आहेत ज्यांना आपल्या आईवडिलांचा द्वेष करता येणार नाही काही भ्रमिष्ट करणाऱ्या संस्था व प्रचारकही स्वत:भोवती तरूण अनुयायांची गर्दी करण्यासाठी येशूच्या हया वचनांचा चुकीचा वापर करतात हया मुलांनी आपल्या आईवडिलांचा मान करण्यास कधीही शिकलेले नसते
येशूच्या प्रत्येक शिष्याने येशूच्या उदाहरणानुसार चालावे येशूचा कित्ता घेऊन आम्ही चाललो तर आम्ही कधीही मार्ग चुकणार नाही येशूच्या उदाहरणानुसार न चालता जर आपण त्यांच्या वचनांचा अर्थ लावू लागलो तर आम्ही बहकून जाऊ जसे कित्येक ख्रिस्ती म्हणविणारे बहकले आहेत मत्तय 11:29 मध्ये येशू म्हणतो की, माझ्यापासून शिका
येशूने कशाप्रकारे आपल्या आईवडिलांचा द्वेष केला? प्रथम जोपर्यंत तो नासरेथमध्ये होता तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत राहून, त्याने त्यांचा मान राखिला (लूक 2:51)
नासरेथमधील येशूच्या तीस वर्षाच्या जीवनकालाबद्दल फत दोनच गोष्टींचा उल्लेख आपणास पवित्रशास्त्रात दिसतो
सर्वप्रथम, इब्री, 4:15 मध्ये आपण वाचतो तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखला गेला तरी निष्पाप राहिला हयाचा अर्थ त्या 30 वर्षाच्या कालात त्याजवर बालपणापासून तर प्रौढपणापर्यंत त्या सर्व प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागला असावा ज्याला प्रत्येक व्यतीला त्या तीस वर्षाच्या काळात तोंड द्यावे लागते
मार्क 6:3 मध्ये आपल्याला पवित्रशास्त्र हे सांगते की येशूच्या कुटूंबात कमीत कमी चार भाऊ व दोन बहिणी होत्या म्हणजे कमीत कमी नऊ सभासद त्याच्या घरात असतील आणि हे एक गरीब कुटूंब होते असे आपल्याला दिसते (जेव्हा आपण लूक 2:24 या वचनांची लेवी 12:8 या वचनांशी तुलना करतो तेव्हा पाहतो की, योसेफ व मरीया इतके गरीब होते की त्यांच्याजवळ येशूच्या समर्पणाच्या वेळी साधे कोकरू अर्पण करावयाची ऐपत नव्हती) येशूची स्वत:ची वेगळी अशी खोली नसणार की जेथे रोजच्या कठीण समयातून थोडा वेळ त्याला एकांतात विसावा घेता यावा योहान 7:5 आम्हाला सांगते की येशूच्या भावानीही त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता कदाचित लहानपणापासून येशूच्या शांत स्वभावाचा, कधी राग न भरण्याच्या, भांडण न करण्याच्या स्वभावाचा ते हेवा करीत असावेत व बालपणी पुष्कळदा एकजुट होऊन त्यांनी खोडी काढून त्याला चिडीस आणण्याचा व्यर्थ प्रयत्न केला असेल ज्यांना तारण न झालेल्या नातेवाईकांसोबत मोठया घरात रहावे लागते त्यांना आपल्या अनुभवावरून येशूला नासरेथ येथे असताना कोणकोणत्या परीक्षांना तोंड द्यावे लागले असणार ते समजेल तरी तो निष्पाप राहिला, त्याने कधीच पाप केले नाही या सर्वा ऊपर येशू किशोर अवस्थेत असतांना योसेफाचा मृत्यु झाला असावा कारण येशूच्या लोकसेवेच्या काळात योसेफाचा कुठेही उल्लेख झालेला नाही याचा अर्थ वडील भाऊ या नात्याने आपल्या आठ लहान भावंडाची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर आली असणार आणि अशा परिस्थितीत येशूला पुष्कळ परीक्षांना तोंड द्यावे लागले असणार तरी त्याने पाप केले नाही
दुसरे म्हणजे, लूक 2:51 प्रमाणे जोपर्यंत 30 वर्षापर्यंत तो नासरेथला आपल्या घरी होता तोपर्यंत येशू योसेफ व मरीया यांच्या आज्ञेत राहिला आणि आईवडीलांच्या आज्ञेत राहणे किती अवघड हे आपल्या प्रत्येकाला आपल्या बालपणाच्या अनुभवावरून माहीत आहे कित्येकदा आपण काही वेगळे करू इच्छितो व आईवडील आपल्याला असे काही वेगळे करावयास सांगतात जे करावयाची आपल्याला मुळीच इच्छा नसते
आणि म्हणून आपण आपल्या लेकरांसमोर येशूचे उदाहरण ठेवू शकतो वडिलांना इफिस 6:4 मध्ये सांगण्यात आले आहे की बापांनो आपल्या मुलांचा प्रभुचे शिक्षण व बोध याच्या योगे प्रतिपाल करा प्रभुचे शिक्षण म्हणजे काय? याचा अर्थ स्वत: येशूने नासरेथमधील आपल्या जीवनाचा त्यांच्यासमोर ठेवलेला कित्ता
जर कोणी मुलगा किंवा मुलगी येशूच्या जीवनातल वरील दोन क्षेत्रातील त्याचा कित्ता पुढे ठेवून वागतात तर ते सुध्दा येशूप्रमाणे परमेश्वराच्या कृपेत व मनुष्याच्या कृपेत ज्ञानाने व शरीराने वाढत जातील जसे येशूने स्वत:संबंधी लिहिले आहे (लूक 2:25)
जेव्हा आम्ही मोठे होतो लग्न करतो तेव्हाही आम्ही आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे उत्पत्ती 9:2126 मध्ये आपण नोहाचा पुत्र, हाम हयाबद्दल वाचतो त्याने आपल्या वडिलांस द्राक्षरस पिऊन मस्त अवस्थेत पाहिले हाम त्यावेळेस वयस्क होता कारण तो विवाहीत होता जलप्रलयापूर्वीच तो विवाहीत होता त्याने जाऊन आपल्या भावास हे सांगितले आणि आपल्या वडिलांस लज्जित केले जे त्याने सांगितले ते खरे होते, पण त्याने आपल्या वडिलांचा अपमान केला आणि त्यामुळे हाम व त्याचे वंशज शापित झाले चहाडी करणाऱ्यांना परमेश्वराचा शाप लागतो मग ते सत्यच का सांगत नाही ! कोणीही चहाडी करणारा येशूचा शिष्य होऊ शकत नाही
नोहाच्या इतर दोन मुलांनी शेम व याफेथ हयांनी आपल्या बापाची नग्नता राखली पाठमोरे होऊन त्यांनी आपल्या बापाची नग्नता न पाहता ती झाकली म्हणून ते व त्यांचे वंशज आशीर्वादीत झाले
यावरून आपण शिकतो की जे आपल्या आईवडिलांचा मान राखतात त्यांना परमेश्वर आशीर्वाद देतो आणि जे आपल्या आईवडिलांस तुच्छ लेखितात त्यांना तो शाप देतो पवित्रशास्त्र बायबल यामध्ये हे उदाहरण आपल्यासाठी, लहानथोर सर्वांसाठी इशाऱ्यादाखल अगदी सुरूवातीलाच दिलेले आहे
योसेफ व मरीया, जुन्या कराराच्या नियमानुसार जरी देवभिरू असले तरी निष्पाप नव्हते आणि त्यांना पापावर विजय मिळालेला नव्हता (रोम 6:14 हे पापावरील विजयाचे अभिवचन नवीन करारातील आहे) आपल्याला जसे पवित्र आत्म्याचे दान आहे तसे मरीया व योसेफ हयांना नव्हते, म्हणून ते आपल्यासारखे कृृपाधीन नव्हते आणि शय आहे की त्यांच्यात वादविवाद होत असावा एकमेकांवर रागे भरणे व इतरही अनेक चुका त्यांच्याद्वारे होत असतील ज्यात त्यांना आपल्यासारखा विजय मिळालेला नव्हता (आपण मरीयेला पवित्र समजत असू, म्हणून आपणांस यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल) पण वस्तूस्थिती ही होती की येशूने पुष्कळदा योसेफमरीया यांना कित्येक बाबतीत पाप करतांना पाहिले असणार, तरी त्याने आपल्या आईवडिलांचा मान राखिला त्याने त्यांना तुच्छ लेखिले नाही आईवडिलांचा आदर करणे याचा हा मुख्य भाग आहे
नीतिसुत्रे 23:22 मध्ये लिहिले आहे आपल्या वृध्द झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको जर आपल्या आईवडिलांचा काही दोष, नैतिक अशतपणा आपण पहाल (त्यांची नग्नता) तर त्यांना तुच्छ मानू नका, त्यावर पांघरूण घाला त्याची इतरांजवळ वाच्यता करू नका खरे पाहिले असता आपण इतर लोकांशीही असेच वागले पाहिजे कारण आपणांस पवित्र शास्त्रात विदीत केले आहे की खरी प्रीती पापांची रास झाकते
तुम्ही नवीन जन्म पावलेले असाल व तुमचे आईवडील विश्वासात नसतील व ते तुम्हाला पवित्रशास्त्र वचनाविरूध्द काही करावयास सांगतील (जसे, मुर्तिपूजा, अविश्वासणाऱ्या मुलीशी लग्न इ) तर तुम्ही त्यांना आदरपूर्वकच सांगावे की तुम्ही असे करू शकत नाही कारण परमेश्वराच्या वचनात ते वर्जिले आहे तुम्ही परमेश्वरासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे पण तुम्ही हे त्यांना नम्रतेने कृपायुत भाषणाने सांगावे, उध्दटपणाने नव्हे, कारण पवित्रशास्त्र तसे करण्याची मनाई करते
परंतु ज्या ठिकाणी पवित्र शास्त्रातील आज्ञेच्या उल्लंघनाचा प्रश्न उद्भवत नाही अशा ठिकाणी लेकरांनी आपल्या आईवडिलांसोबत राहत असताना आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळून त्यांचा मान राखावा पण जेव्हा ते वयस्क होऊन घर सोडतात व स्वत:चे कुटूंब प्रस्थापित करतात तेव्हा आपल्या आईवडिलांच्या निर्देशानुसार चालणे जरूरी नाही पण तरी देखील त्यांनी त्यांचा मान राखावा व त्यांची काळजी घ्यावी
हेही आम्ही येशूच्या उदाहरणात पाहतो जे त्याच्या शिष्यांच्याही जीवनात असणे जरूरी आहे येशू 30 वर्षाचा असताना त्याने आपले घर सोडले व बाप्तिस्मा घेतला पहिली घटना जी नमूद केली आहे ती म्हणजे काना येथील लग्न घरात नासरेथमध्ये 30 वर्षे राहत असताना मरीयेने आपल्या या पुत्राचे, येशूचे बारकाईने निरीक्षण केले होते की तो किती आज्ञाधारक आहे आणि म्हणूनच तिला वाटले की, द्राक्षरसाच्या बाबतीतही तो निश्चित काहीतरी करू शकेल यापूर्वी येशूला तिने कधीच चमत्कार करताना पाहिले नव्हते म्हणून तिला चमत्काराची अपेक्षा नव्हती पण आपला हा मुलगा बुध्दीमान व समजूतदार आहे हे तिला पुरेपुर माहीत होते तिने हे घरी म्हणून पाहिले होते आणि म्हणून ती येशूला काहीतरी त्याने करावे म्हणून सांगते
आणि येथे पहिल्यांदाच आपण पाहतो की येशू तिला जरा कडक शब्दात प्रत्युत्तर देतो, बाई, तुझा ताझा काय संबंध? (योहान 2:4) येशूने घर सोडले होते व आज्ञापालनाचे त्याला आता प्रयोजन नव्हते
आपल्या आईवडिलांचा ,ेष करण्याविषयी येशू जेव्हा शिष्यांस म्हणतो तेव्हा त्याच्या बोलण्याचा अर्थ हाच आहे आम्हीही हाच समतोल बाळगला पाहिजे जेव्हा आम्ही आपल्या आईवडिलांच्या ताब्यात असतो तेव्हा आम्ही त्यांचा मान राखावा परंतु परमेश्वराच्या आज्ञापालनाचा जेव्हा प्रश्न उद्भवतो तेव्हा आम्ही त्यांचा द्वेष करावा स्वर्गीय पित्याने दिलेली सेवा, परमेश्वराची इच्छा पूर्ण करावयाची जेव्हा वेळ आली तेव्हा येशूने आपल्या आईस म्हटले, बाई, तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही (योहान 2:4) जेव्हा आम्ही आईवडिलांचे घर सोडून स्वत:चे घर प्रस्थापित करतो तेव्हा आम्ही त्यांच्या आधीन नसतो परंतु स्वतंत्र असतो
ही मोठी मनोरंजक गोष्ट आहे की पवित्र बायबलमध्ये पहिली आज्ञा जी सर्व पुरूषांसाठी देिलेली आहे ती ही की, यास्तव पुरूष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील व ती दोघे एकदेह होतील (उत्पती 2:24) आणि ही आज्ञा तेव्हा देण्यात आली जेव्हा आदामाला वडील किंवा आई दोघेही नव्हते ज्यांना तो सोडून जाऊ शकत होता ! हे अर्थातच त्यांच्यानंतर लग्न करणाऱ्या इतर पुरूषवंशासाठी म्हटले गेले होते
दु:खाची गोष्ट ही की भारतीय पध्दतीतील अनेक विवाहांत पती परमेश्वराचीही आज्ञा मानत नाही ख्रिस्तीतर समाजाबद्दल आपण समजू शकतो की ते आपल्या पत्नीपेक्षा आपल्या आईवडिलांस अधिक जडून राहतात पण जे ख्रिस्तीतर भारतीय संस्कृतीलाच चिटकून राहतात त्या ख्रिस्ती लोकांबद्दल आपण काय म्हणावे? पत्नीऐवजी आईवडिलांनाच जास्त चिटकून राहणारे अशा रीतीने आपल्या देशाला परमेश्वराने प्रस्थापित केलेल्या वैवाहिक जीवनाचा कित्ता दाखविण्यात अपयशी ठरतात
आपल्या आईवडिलांशी भौतिक संबंध तोडणे हयापेक्षा त्यांच्याशी असलेले भावनात्मक संबंध विच्छेद करणे हा याचा खरा अर्थ होय पतीचे प्रथम प्रेम व निष्ठा ही आपल्या पत्नीसंबंधी असावी, आपल्या आईवडिलांसंबधी नव्हे
त्याचप्रमाणे पत्नीलाही वडिलांचे घर विसरावयास पवित्र शास्त्रात सांगितलेले आहे (स्तोत्र 45:10)
आपण अर्थातच आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घ्यावी येशूने येथेही आपल्याला उदाहरण दिले आहे वधस्तंभावर मरण पत्करण्यापूर्वी येशूने आपल्या विधवा आईची योहानाकडे सोय लावून दिली आईवडिलांनी पती व पत्नीच्या मध्ये येऊ नये, आपल्या आईवडिलांप्रत असलेल्या स्वाभाविक व भावनात्मक प्रेमबंधनामुळे भारतातील कितीतरी ख्रिस्ती लोक ख्रिस्ताला पूर्णपणे अनुसरण्यात कमी पडतात!
अनुवाद 33:811 मध्ये लेवी वंशास परमेश्वराने याजकपदासाठी का निवडले हाते ते आम्ही वाचतो ते यासाठी की त्यांनी आपले आईवडील भाऊबंद, लेकरे या सर्वांपेक्षा परमेश्वराला जास्त, म्हणजे पहिले स्थान दयावे जेव्हा मोशेन पाहिले की इस्त्राएली लोक सोन्याच्या बनविलेल्या वासराची पूजा करीत आहेत तेव्हा मोशेने आव्हान केले की कोण यहोवा प्रभुच्या पक्षाचा आहे त्याने बाजूला येऊन समोर यावे तेव्हा लेवीचा वंश पुढे आला व मोशेच्या बाजूस येऊन उभा राहिला लेवी लोकांस सांगण्यात आले की त्यांनी तंबूत जाऊन तलवार धारण करून आपल्या लोकांचा वंध करावा ज्यांनी मूर्तिपूजेचे पातक केले होते त्यांचा (निर्गमन 32:26) हे लेवी जणू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचेच नमूने होते
मोशेने नुकतीच आज्ञा दिली होती की आईवडिलांचा मान राखा (निर्गमन 20) पण आता तोच तलवार घेऊन त्यांचा वध करावा अशी आज्ञा देतो याठिकाणी सत्याच्या दोन बाजू आपण पाहतो जेव्हा लेवी वंशाने आपल्या नातेवाईकांस मुर्तिपूजा करतांना पाहिले, तेव्हा ते त्यांना सोडून ठार करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही उलट आपल्या आईवडिलांची, भाऊबंदाची व लेकरांचीही गय केली नाही (अनु 33:9)
आज असे कित्येक आहेत ज्यांना प्रभुच्या आज्ञेचे पालन करता आले नाही कारण आपल्या आईच्या डोळयांतील आसवे पाहून ते हेलावून गेले किंवा आपल्या आईवडिलांचे बोलणे ऐकून त्यांचे मन विचलीत झाले, आम्ही तुझ्यासाठी एवढे केले आणि तू याप्रकारे ते प्रभु येशूचे शिष्य बनण्यास अपात्र ठरतात
आपणांपैकी जर काही स्वार्थापोटी आपल्या आईवडिलांचा द्वेष करीत असतील तर हे वरील विधान आपल्यासाठी नाही आपण प्रथम आपल्या आईवडिलांचा मान राखायला शिका
जे प्रथम आपल्या आईवडिलांचा मान करणे शिकले आहेत त्यांनाच, त्यांचा द्वेष करणे म्हणजे काय हया येशूच्या शिकवणीचा खरा अर्थ कळेल कारण जे आपल्या आईवडिलांचा मान करणे शिकले आहेत त्यांना प्रभु येशूने त्यांचा द्वेष करण्यासंबंधी सांगितले आहे
जे येशूच्या कथनाप्रमाणे, तलवार वापरू शकत नाहीत, मानवी, भावनांमुळे ज्यांनी तडजोड केली आहे असे लोक कालांतराने आत्मिक दृष्टया हानी सोशितील लेवी लोकांना परमेश्वराच्या आज्ञेनुसार आपल्या लोकांचा नायनाट करणे कठीण गेले असणार, पण त्यांनी प्रभुसाठी ते केले
मलाखी 2:4,5 मध्ये परमेश्वर म्हणतो की त्याने लेवी वंशासोबत जीवनाचा व शांतीचा करार स्थापिलेला आहे कारण त्यांनी परमेश्वराचे भय मानले व त्यास आदर दिला पण ती शांती लेव्यांनी तलवारीच्या माध्यमातून कमावली !
हे सर्व आम्हाला आज कसे लागू होते? आज आपण शारीरिकरित्या तलवार चालवू शकत नाही जशी लेव्यांनी जुन्हा करारात चालविली तलवार चालविणे याचा अर्थ एवढाच की आम्ही आपले मानवी प्रेम संबंध छाटले पाहिजेत, जे आम्ही आपल्या आईवडिलांप्रत व आपल्या आप्त संबंधाप्रत ठेवतो आणि त्याठिकाणी ईश्वरीय प्रीती असावी आईवडिलांना प्रसन्न करण्याकरिता किंवा त्यांची मदत करण्यासाठी त्यांच्याप्रत असलेले मानवी प्रेम आम्हाला पापात पाडू शकते याउलट ईश्वरीय प्रेम आम्हाला पापांपासून आवरते, एवढेच नाही, तर आमच्या आप्तजनांवर खऱ्या अर्थाने निस्वार्थी वृत्तीने, अधिक गाढ, निर्मल अंत:करणाने प्रीती करण्यास सामर्थ्य पुरविते !
आणि ते आईवडिलांची आज्ञा की परमेश्वराची आज्ञा यामध्ये जेव्हा आंतरिक लढा निर्माण होतो तेव्हा आम्ही परमेश्वराची आज्ञा मानली पाहिजे अशाच परिस्थितीत परमेश्वर आम्हास पारखितो की आम्ही त्याचे भय मानतो काय व त्याला प्रसन्न करणे आम्हाला अधिक आवडते काय की आम्ही आपल्या प्रियजनांस प्रसन्न करण्याचा अधिक प्रयत्न कराते?
आमच्या जीवनात आमच्या आईवडिलांचे, पत्नीचे, मुलांचे आणि इतर नातेवाईकांचे काय स्थान आहे आणि परमेश्वराचे आमच्या जीवनात काय स्थान आहे ही अत्यंत महत्वाची बाब आहे जिचा ख्रिस्ती जीवनाच्या अगदी सुरूवातीलाच आम्ळी एकदाचा निकाल लावून टाकला पाहिजे नाही तर आपल्या ख्रिस्ती जीवनात नेहमीच यामुळे आपल्याला निरनिराळया समस्यांना तोंड दयावे लागेल
आम्ही जर परमेश्वराला योग्य मान देऊ तर तो देखील आपला आदर करील जर आम्ही परमेश्वराच्या इच्छेमध्ये स्थिर राहिलो तर आपले आईवडीलही यामुळे आशीर्वाद प्राप्त करतील परमेश्वराची अंतिम योजना ही आमच्या व इतरांच्या भल्याचीच आहे आणि म्हणून या बाबतीत जे तडजोड करतात ते स्वत:चा आत्मिक तोटा तर करून घेतातच, शिवाय आपल्या आईवडिलांसह परमेश्वराच्या आशीर्वादांपासून वंचित ठेवतात परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केल्याने आपला कधीच तोटा होणार नाही
परमेश्वराने जेव्हा अब्राहामास इसहाकाचे अर्पण करण्यास सांगितले तेव्हा परमेश्वराने हयाच तत्वाचे पालन केले इसहाक हा अब्राहामाचा अत्यंत प्रिय झाला होता त्या प्रीतीमुळे अब्राहामासाठी जणू तो एका दैवताप्रमाणे होता आणि म्हणूनच परमेश्वराने अब्राहामास इसहाकाला समर्पित करण्यास सांगितले परमेश्वराचा अंतिम उद्देश हाच होता की प्रेमाच्या या तत्वांची अब्राहामास प्रचिती करून देणे
आपले आईवडिलांशी, पत्नी व लेकरांशी असे प्रेमसंबंध आहेत काय, ज्यांनी देवाचे स्थान घेतले आहे? जर असे आहे तर आपणांस खऱ्या अर्थाने येशूचे शिष्य होता येणार नाही
जेव्हा एखादे वेळी तुमची पत्नी मंडळीतील एखादा बांधवाबद्दल तुमच्याजवळ चुगली करते तेव्हा तुम्ही त्या व्यर्थ गप्पा करणाऱ्या आत्म्याशी एकरूप होऊन पत्नीचे ऐकता काय किंवा आतून त्या आत्म्याचा अव्हेर करिता? तुम्ही आपल्या पत्नीचे ऐकून घेऊन तिला प्रसन्न करावयाचा प्रयत्न करता काय? असे असेल तर तुम्ही स्वत:ही आत्मिकदृष्टया पतन पावाल व आपल्या पत्नीलाही गमावून बसाल पण तेच जर या पापांपासून तुम्ही स्वत:स शुध्द ठेवाल तर तुम्ही तारण प्राप्त करून घ्याल व कालांतराने तुमच्या पत्नीच्याही तारणाचे कारण ठराल आणि म्हणूनच हा हा द्वेषाचा मार्ग खरे तर आशीर्वादाचाच मार्ग होय
आणि जर आम्ही अशा बाबतीत कठोर निर्णयात्मक वृत्ती बाळगली तर आपणांस परमेश्वराचे याजक बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही!
मला परत सांगावेसे वाटते की आईवडिलांपुढे विश्वासाखातर खंबीरपणे उभे राहणे म्हणजे त्यांच्याशी उध्दटपणे अपमानास्पद वागणे नव्हे नम्रपणा धारण करा व म्हणा, क्षमा करा, बाबा, मी आपली आज्ञा पाळू शकत नाही कारण ती आज्ञा परमेश्वराच्या वचनांच्या विरूध्द आहे अनेक तरूण उध्दटपणा करणे व सत्यासाठी उभे राहणे यातील भेदच समजू शकत नाहीत सौम्यवृत्तीमुळे पुष्कळ समस्यांचे निवारण होते
लग्न किंवा विवाह हेच मनुष्याचे जीवन बनविते किंवा मनुष्याचे जीवन नष्ट करते म्हणून विवाह ही पायरी जीवनातील अत्यंत महत्वाची पायरी आहे
जे तरूण विवाहनिर्णयात परमेश्वराची इच्छा जाणाण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम हे समजले पाहिजे की ते प्रथम येशूचे शिष्य आहेत व म्हणून लग्न ही बाब दुय्यम स्थानी आहे पण आमची प्रथम इच्छा प्रभुला अनुसरण्याची आहे
ज्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला तो शिष्य परमेश्वराची इच्छा असेल तर तो अविवाहीतही राहण्यास तयार असेल आणि अशाच तरूणांना आपल्या वैवाहिक जीवनात परमेश्वराच्या सर्वोत्तम आशीर्वादांचा लाभ घडतो आम्ही जेव्हा विश्वासणाऱ्या लोकांच्या वैवाहिक जीवनात दु:ख सहन करणाऱ्या, आपसात मतभेद असलेल्या विश्वासणाऱ्यांची संख्या पाहतो तेव्हा आम्हास हे स्पष्टपणे दिसून येते की शिष्य या नात्याने त्यांनी प्रथमत: वैवाहिक जीवनात प्रवेश केला
प्रभुला प्रथम स्थान दिल्यानंतर प्रभुची इच्छा हा पाया घेत मग आपण इतर गोष्टींचा विचार निश्चितपणे करू शकतो लक्षात घ्या आदामासाठी पत्नी तयार करताना परमेश्वराने त्याला गाढ निद्रा लावली त्याला पत्नी शोधत इकडे तिकडे बागेभोवती पळावे लागले नाही! आपणही परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत असू तर निश्चितच शांतचित्त राहू शकतो आणि योग्य वेळी प्रभू आपला जोडीदार आपल्या जीवनात आणील पण याचा अर्थ हा नव्हे की आपण काहीच प्रयत्न करू नये तर याचा अर्थ हा आहे की आपण उगीच गोंधळून घाबरून जाऊ नये
25 वर्षे वय झाल्यानंतर तरूणांनी व 20 वर्षे झाल्यानंतर तरूणींनी प्रार्थनापूर्वक आपला जीवनसाथीसाठी प्रार्थना करावयास सुरवात केली पाहिजे त्यापूर्वी आम्ही लग्नाचा विचारही मनात न आणता, प्रभूचे वचन व त्याचे कार्य यात व्यस्त असले पाहिजे कोणतीही सुंदर मुलगी किंवा मुलगा पाहिला की हाचहीच तर माझा जीवनसाथी होण्यासाठी योग्य असणार नाही अशा विचारांनी वेळ व्यर्थ खर्चू नका आणि एखादी खरोखर सुंदर व्यती दिसली तर आता हिला पटविलेच पाहिजे नाही तर हातची जायची असे म्हणत घाई करू नका जर ती व्यती खरोखरच परमेश्वराने तुमच्यासाठी निवडली असेल तर देवबाप तुमच्यासाठी तिला राखून ठेवू शकतो इतर कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही जर तुम्ही खरोखर त्याचे शिष्य असाल तर तो तुमच्याकरिता उत्तम ते राखून ठेवील
दाविदाने शौलापासून राजासन हिसकण्याचा प्रयत्न कधीच केला नाही तर परमेश्वराच्या नेमलेल्या समयाची तो प्रतिक्षा करीत राहिला आणि त्याला परमेश्वराने माझ्या मनासारखा ही पदवी दिली (प्रेषितांची कृत्ये 13:22) जर तुम्ही धीराने दाविदाप्रमाणे त्याच्या हातून सर्व काही प्राप्त करावयाची वाट धराल तर परमेश्वर तुमच्याबद्दलही असे म्हणू शकतो जर तुम्ही परमेश्वराच्या राज्याचा आधी शोध करीत असाल तर तुम्ही आपली विवाहाची समस्या ही प्रथूच्या हातात विश्वासाने सोपवू शकता परमेश्वर त्याचा आदर करणाऱ्यांचा आदर करतो
नीतिसुत्रे 19:14 सांगते की धन व संपत्ती पित्यापासून आम्हास वारसाने मिळतात, पण सुज्ञ पत्नी केवळ परमेश्वरच देतो हा विश्वास ठेवून प्रभुच्या इच्छेने व मदतीने आपल्या जीवनाचा जोडीदार आपण शोधावा
तर मग खऱ्या शिष्याने कसे जोडीदार शोधावे?
मी तजविजीने ठरविलेल्या लग्नावर ठाम विश्वास ठेवतो परमेश्वराने जोडलेला विवाह! अशा दोन विवाहांचा बायबलमध्ये उल्लेख आढळतो परमेश्वराने आदामासाठी अनुरूप सहकाऱ्याची जीवनसाथीची तजवीज केली आणि परमेश्वराने इसहाकासाठी देखील जीवनसाथीची तजवीज केली आणि माझा स्वत:चाही अनुभव आहे प्रभुने मजसाठीही तशी व्यवस्था केली एका अति उत्तम जोडीदाराची, मी कल्पनेतही विचार केला नव्हता अशा जोडीदाराची !
2 इति 16:9 मध्ये लिहिले आहे, परमेश्वराचे नेत्र अखील पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो परमेश्वराप्रमाणे अखील पृथ्वीचे निरीक्षण कोणीच करू शकत नाही आणि जे त्याजवर सात्विकमनाने भरोसा टाकतात त्यांना तो कधीच निराश करणार नाही
म्हणून जर तुम्हाला एक सूज्ञ उत्तम पत्नी हवी असेल तर प्रभम येशूचे संपूर्ण अंत:करणाने शिष्य व्हा आणि तुमच्या विवाहाची तजवीज परमेश्वर करील तुमच्या विश्वासाप्रमाणे व्होवो प्रभु हेच आपणांस म्हणतो अब्राहामाच्या सेवकाने प्रार्थना केली व परमेश्वराने त्यांचे अचूक मार्गदर्शन केले त्याने त्याला योग्य मुलीपर्यंत पोहोचविले जी इसहाकासाठी त्याने निवडली होती (उत्पत्ती 24) तोच परमेश्वर आमचा स्वर्गीय पिता आहे तो हे तुमच्यासाठीही करू शकतो
रोम 12:2 मध्ये आपण पाहतो की परमेश्वर आपली इच्छा नवीनीकरण प्राप्त झालेल्या मनाद्वारे प्रकट करतो म्हणून परमेश्वराची परिपूर्ण इच्छा प्राप्त करण्यासाठी आपण प्रथम आपल्या अंत:करणाचं रूपांतर होऊ दयावे नवीन अंत:करण ते अंतकरण होय ज्याद्वारे आपला लोकांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोण आपणांस प्राप्त होतो परमेश्वराच्या दृष्टिकोणातून !
नीतिसुत्रे 31:1031 मध्ये परमेश्वराने शिफारस केलेली सद्गुणी स्त्री आपणांस दिसते त्या ठिकाणी दिलेल्या सद्गुणांची अपेक्षा प्रत्येक तरूणाने आपल्या इच्छित भावी पत्नीत शोधावी आणि त्याच सद्गुणांनी स्वत:स सुशोभित करण्यासाठी तरूणीने सतत झटावे
आजकालचे पुष्कळ तरूण तरूणीमध्ये सौंदर्य व लावण्यच शोधतात नीतिसुत्रे 31:30 मध्ये पवित्र शास्त्र त्याबद्दल सांगते की सौंदर्य हे भुलविणारे व व्यर्थ आहे तसेच नीतिसुत्रे 11:22 मध्ये फारच कडक भाषेत लिहिले आहे की तारतम्य नसलेली स्त्री ही डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी आहे काही पुरूषांना हया नथीचे (सुंदर चेहरा) इतके आकर्षण असते की ते डुकरीणीशी (मुलीशी) लग्न करतात !
नीतिसुत्रे 31 मध्ये वर्णिलेली स्त्री ती आहे जी आपल्या हाताने कष्ट करते रात्र सरली नाही तोच ती उठून कामाला लागते (13,15) ती आपल्या कुटूंबाच्या अन्नसामग्रीसाठी द्राक्षमळा लाविते व आपल्या कुटूंबासाठी जास्तीची मिळकत प्राप्त करते (1618) तिचे बाहू नेटाने काम करतात ती फायदेशीर उद्योग पाहते म्हणजे पैसा विचारपूर्वक खर्चिते ती दयाळू आहे व ती गरीबांसाठी मुठ उघडिते तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते (26) ती कष्टाळू आहे मितव्ययी आहे उदार आहे तिचे बोल दयापूर्ण आहेत
कष्टामुळे तिचे हात जरी जठर झाले असले तरी तिची जिव्हा कृपायुत आहे मृदू आहे दुर्दैवाने आजकालच्या बहुतांश ख्रिस्ती तरूणींत आपण अगदी याउलट पाहतो त्यांचे हात मृदू (आळशीपणामुळे) असतात आणि जिव्हा कठोर असते (बेशिस्तपणामुळे व घमंडीपणामुळे) अशा तरूणींशी जे विवाह करतात त्याची किती दुर्दशा होणार !
हाताशी बायबल बाळगून इकडे तिकडे बायबल अध्ययन घेत फिरणाऱ्या मुलींमध्ये आपणांस उत्तम पत्नी लाभेल अशीही आपण मुळीच गैरसमजूत करून घेऊ नये ख्रिस्ती कार्यात वस्तता (वरपांगी दिसणारी) म्हणजे आत्मिकता असे आपण मुळीच समजू नये लग्नानंतर आपणाला पत्नी व आपल्या लेकरांना त्यांची काळजी घेऊन त्यांचे योग्य संगोपन करणारी माता हवी आपणा कोणालाही नुसते पवित्र शास्त्र शिकवणारी शिक्षिका नकीच हवी नसणार हे लक्षात ठेवा !
गीतरत्न 8:9 मध्ये दोन तऱ्हेच्या मुली आपणांस दिसतात काही भिंतीसारख्या व काही दारासारख्या दार म्हणजे आजकालच्या बेछुट मुलीसारखी, त्या तुमच्याकडे मोकाट मनाने येतात दुसरी आहे भिंत म्हणजे साधी, लाजाळू, संकोचित वृत्तीची, परमेश्वराने बनविलेली सर्वसाधारण अशी सरळ मुलगी ती जर वेशीसारखी असेल तर तिच्या आईवडिलांना तिला बंदिस्त करावे लागेल (तिच्यावर बंधने लावून तिला आळा घालावा लागेल) पण तटासारखी असली तर तिच्यावर रूप्याचा मनोरा बांधला जाईल धार्मिक कुटूंबाची तिच्याद्वारे उभारणी केली जाईल असे पवित्र शास्त्र म्हणते
ज्या स्त्रिया येशूच्या शिष्या होऊ पाहतात त्यांच्याकरिता 1 पेत्र 334 वचन आम्हांस सांगते की त्यांनी महागडे कपडे व सोन्याचे दागिने यांचा मोह टाळावा सौम्य व शांत आत्मा ज्या स्त्रीजवळ असेल तिचे परमेश्वराच्या दृष्टिने मोल आहे पेहराव्यावरून जरी शिष्यत्वाची खरी ओळख होत नसली तरी स्त्रियांच्या पेहरावा करण्यावरून त्यांच्या चरित्राबद्दल पुष्कळ काही जाणता येते त्या कोणत्या गोष्टीला मूल्य देतात हे त्यांच्या पेहराव्यावरून लक्षात येते येशूचे शिष्य कधीही निष्काळजीपूर्वक, अविचारपूर्वक आपला पेहरावा घालणार नाहीत ती भडक, महागडया वस्त्रांवर आपला पैसा व्यर्थ खर्चणार नाहीत
म्हणून तरूणांनो, जे तुम्ही सुज्ञ सद्गुणी पत्नीच्या शोधात आहात ते परमेश्वराचे भय (नीतिसुत्रे 31:30) धरणाऱ्या, शांत, सौम्य, आत्म्याने दीन, कृपायुत भाषण करणारी, साधेपणा, व्यासंगी, परिश्रमी यांच्या शोधात असावेत
जेव्हा तरूणी विवाहाचा विचार करतात, तेव्हा बहुधा, शिक्षण, मुबलक पैसा, सुंदरता इत्यादी गोष्टी तरूणांमध्ये शोधतात हे सत्य आहे की स्त्रीने कधीही अशा पुरूषाबद्दल विवाहाचा विचार करू नये जो आपल्या कुटूंबाच्या पालनपोषणाचा भार वाहण्यालायक नाही कारण नीतिसुत्रे 24:28 हे वचन प्रत्येक पुरूषास ही ताकीद देते की त्याने प्रथम उद्योग स्थिर करावा नंतरच घर बांधण्याचा विचार करावा पण केवळ एवढेच पुरेसे नाही!
सर्वप्रथम तरूणींनी हा विचार करावा की ज्या तरूणाबद्दल ते विचार करीत आहेत तो ख्रिस्त येशूचा खरा शिष्य आहे का जो तुमच्यासाठी एक आदर्श ठरू शकेल ज्याच्याकडे तुम्ही आदराने पाहू शकाल? आणि फत बायबल सांगते म्हणूनच नव्हे तर स्वत:हून त्याच्या शिष्यत्वामुळे आनंदाने तुम्ही त्याला आपल्या विवाहीत जीवनात प्रमुख मानू शकाल का? जेव्हा तुम्ही नवरा मुलगा शोधता तेव्हा हा प्रथम विचार आपण करावयास हवा
माझ्या प्रेम, विवाह व लैंगिक संबंध : ख्रिस्ती दृष्टिकोन हया पुस्तकात तुम्हास या विषयावरील अधिक माहिती मिळेल
मलाखी 2:15 मध्ये आपण वाचतो, तुम्ही तुमच्या पत्नीशी खुद्द देवाकडूनच जोडले गेला होता, देवाच्या सुज्ञ योजनेनुसार तुम्ही विवाहबध्द झाला तुम्ही उभयता त्याच्या दृष्टीने एक व्यती असे झाला
आणि यासाठी एकच गोष्ट प्रामुख्याने आवश्यक आहे दोघांपैकी एकतरी पूर्णत: संपूर्ण अंत:करणाने येशूचा खरा शिष्य असायला हवा जो प्रभुवर प्रीती करतो करते असा प्रभुवर अर्धवट प्रेमश्रध्दा असलेले कुटूंब देवभिरू संतती निर्माण करू शकत नाही
दुसरी महत्त्वाची बाब म्हणते पतीपत्नीत ऐय आणि दोघांपैकी एक जरी प्रभु शिष्य तर हे शय होणार नाही, नाही तर एकटयालासैतानाविरूध्द आपल्या लेकरांसाठी लढा द्यावा लागेल परंतु जर दोघेही शिष्य असले तर हे काम सोपे होईल आणि म्हणून योग्य जीवन जोडीदाराची निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब होय
कुटूंबात जर आईवडील सारखे एकमेकांशी भांडत राहणारे, एकमेकांना दोष देत असणारे असतील तर अशा वातावरणात देवभिरू देवभत संतती निर्माण होणे व तिचे संगोपन होणे अशयच आहे जर तुम्हाला चांगले देवभिरू, देवभत्, धार्मिक कुटूंब स्थापित करायचे असेल तर पती पत्नी आपसात कोणत्याही किंमतीवर ऐय ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी आपल्या पुष्कळ अधिकारांचा त्याग आपणांस करावा लागेल जेव्हा तुम्ही पहाल की तुमची लेकरे परमेश्वराच्या भयात व त्याच्या ओळखीत वाढत आहेत त्याला अनुसरत आहेत, तेव्हा तुम्ही केलेल्या त्यागाची तुम्हाला किंमत कळून येईल
येशूने मत्तय 18:1820 मध्ये शिष्यांच्या एकतेमध्ये किती अपार सामर्थ्य आहे हे दर्शविले आहे जेव्हा दोन शिष्य या पृथ्वीवर एकचित्त होतील तेव्हा त्यांना आकाशातील दुरात्मा समूहाचा दुष्ट कार्यास बांधण्याचे सामर्थ्य प्राप्त होते (इफि 6:12) आणि अशा प्रकारे आपण दुष्टात्म्यांना, आपल्या घरापासून आपल्या मुलांस प्रभावित करण्यापासून वाचू शकतो
इफिस 5:22 ते 6:9 मध्ये पवित्र आत्मा कौटुंबिक संबंधाबद्दल म्हणजे पती व पत्नी, मुले आणि आईवडील, दास व स्वामी, यांच्यातील संबंधाबद्दल बोलतो आणि लगेच 10 व्या वचनापासून पुढे पवित्र आत्मा आकाशातील दुरात्म्यांबरोबर युध्द करण्याविषयी बोलतो यावरून आपणांस तो काय शिकवितो ? हेच की, सैतानाचे हल्ले सर्वप्रथम कुटूंबातील लोकांमधील परस्पर संबंधावरच होता आणि येथेच आपण त्याच्यावर विजयी झाले पाहिजे
कदाचित पती पत्नीस कल्पना नसेल की त्यांच्या आपसातील भांडणाने जी खिंड आपसातील संबंधात निर्माण होते, त्याद्वारे ते सैतानाला आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी व आपल्या लेकरांवर हल्ला करण्यासाठी दार मोकळे करून देते घरातील बंडखोर मुलगा जो आईवडिलास उलटून बोलतो, ते तसे बोलणे एक तर तो आपल्या आईपासून शिकला असेल जी आपल्या पतीशी तसे बोलते किंवा आपल्या वडिलांपासून जे प्रभुप्रती कोणत्यातरी क्षेत्रात वा बाबतीत त्यांच्यासारखेच बंडखोर असलेले तो पाहतो आणि म्हणूनच अशा गरीब लेकरांना दोष देण्यात काय फायदा, कारण ही दुर्गुणांची लागवण तर त्यांना आईवडिलांपासूनच झालेली असते ! आणि म्हणून प्रथम अशा आईवडिलांस पश्चातापाची खरी गरज असते
कुटूंबातील ऐय हे त्या घराच्या मोठया आकारापेक्षा, त्या घराच्या सजावटीपेक्षा आणि यांत्रिक वस्तूंपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे परमेश्वराचे गौरव एखाद्या झोपडीत राहणाऱ्या विश्वासू कुटूंबाद्वारेही प्रगट होते, जर त्यातील सदस्य प्रथमत: येशूचे खरे शिष्य असतील तर
जर आईवडील येशूचे खरे शिष्य असतील तर ते एकमेकांना दोष देण्याच्या पापापासून दूर राहतात हया पापाने आदाम आणि हव्वा हे संसर्गदुषित झाले होते आदामाने हवेला दोष दिला व हव्वेने सापाला दोष दिला
मत्तय 5:3 सांगते की जे आत्म्याचे दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे आणि दीनपणाची पहिली ओळख म्हणजे स्वत:च्या उणीवांची आणि गरजांची जाणीव आत्म्याचे दीन आईवडील आपल्या घराचे स्वर्गात रूपांतर करतात आणि एकमेकांना दोष देण्याऐवजी स्वत:चे परीक्षण करून दोष पदरी घेतात आणि अशा घरात सैतान कधीच प्रवेश करू शकत नाही आणि अशा घरात मुलांना आशीर्वाद व सुखे यांचा जो वारसा मिळणार आहे त्याची तुम्ही कल्पना करू शकता का?
काम करणाऱ्या मातांबद्दल मला काही सांगावयाचे आहे दु:खाची गोष्ट ही आहे की आज काही शहरांमध्ये वाढत्या महागाईमुळे व राहणीमान उंचावल्यामुळे ही एक गरज झालेली आहे पण काही मूलतत्वांवर अशा मातांनी येथे लक्ष दिले पाहिजे
तीताला लिहिलेल्या पत्रात 2:5 मध्ये आम्हास सांगण्यात येते की परमेश्वराची अशी इच्छा आहे की तरूण स्त्रिया प्रथमत: घरचे काम पाहणाऱ्या असाव्यात आणि म्हणून घरच्या कामाकडे दुर्लक्ष करून स्त्रियांनी बाहेरील व्यवसायात लक्ष देता कामा नये प्रभु, पती आणि लेंकरे हयांस तिच्या जीवनात प्राथमिकता असावी या क्रमानुसार तिच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम व भती ही असावी आणि तिचे बाहेरील व्यावसायिक काम हयांचा क्रमांक चौथा असावा
ज्या विवाहीत स्त्रियांना घरी राहणारी मुले नसतील त्यांना कामानिमित्त बाहेर जाण्यात फारशी समस्या नाही
पण लहान मुले असलेल्या तरूण स्त्रिया आज बाहेर नौकरी करू इच्छितात याची दोन मुख्य करणे आहेत :
जर तुम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणे हे सांगू शकता की नुसते जीवन जगणे हाच उद्देश तुमचा आहे, तर परमेश्वर तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्हाला आपली विशेष कृपा पुरवील याची खात्री बाळगा
पण जर याचे कारण ऐषोआराम हे असेल तर मला इशारा द्यावासा वाटतो की तुम्ही धोयात आहात कालांतराने जेव्हा तुमची लेंकरे घर सोडून गेलेली, परमेश्वरापासून दूर गेलेली परमेश्वरासाठी निरूपयोगी अशी झालेली आपणास दिसतील तेव्हा याचे दुष्परिणाम आपणांस निश्चितच भोगावे लागतील त्यावेळी वेळ निघून गेेलेली असेल, मग तुम्हांस त्याबाबत काहीच करता येणार नाही
परमेश्वर माझा साक्षी आहे की जे मी स्वत: आचरणात आणलेले आहे केवळ त्याचाच प्रचार करीत आहे 1969 साली जेव्हा आमचा पहिला मुलगा जन्मास आला त्यावेळी माझी पत्नी एक डॉटर म्हणून काम करीत होती माझा जो मासिक पगार मला मिळत असे तेवढीच काय ती आमची मिळकत होती त्याशिवाय इतर कोणतेही बचतीचे साधन आम्हाजवळ नव्हते तरीही आम्ही निर्णय घेतला की माझ्या पत्नीने तिची नोकरी सोडावी व आपल्या कुटूंबाकडे लक्ष द्यावे त्यानंतर 28 वर्षे तिने नोकरी केलीच नाही आणि घरीच राहून आमच्या चार मुलांचे पालनपोषण केले आणि त्यांना प्रभुच्या प्रीतीत व ज्ञानात वाढविले त्याचा परिणाम काय झाला? आज आमची चारही लेकरे, नवा जन्म पावलेली, बाप्तिस्मा घेतलेली, प्रभुचे अनुसरण करणारी व त्याची साक्ष देणारी आहेत जर माझ्या पत्नीने डॉटर म्हणून 28 वर्षे नोकरी करून तीन किंवा चार कोटी रूपये कमावले असते, घर सुखसमृध्दीच्या वस्तूंनी भरून ेले असते तरीही आम्हास एवढा आनंद मिळाला नसता आणि म्हणून आम्हास आमच्या सुरूवातीच्या त्या आमच्या निर्णयाबद्दल थोडेही दु:ख किंवा परतावा वाटत नाही माझा हा अनुभव मी आपणांस यासाठी सांगत आहे की ज्या माता या क्षेत्रात परमेश्वराचे मार्गदर्शन शोधत आहेत त्यांना याकडून प्रोत्साहन प्राप्त व्हावे
प्रभु येशूचे खरे शिष्य आपल्या घरात कोणती पुस्तके, कोणती मासिके घरात येतात आणि घरातील लोक टीव्हीवर, रेडिओवर कोणते कार्यक्रम पाहतात या गोष्टींबद्दल दक्षता घेतात पतीने घराचा प्रमुख या नात्याने आपल्या घरात काय येते यावर चांगला पहारेकरी या नात्याने पाळत ठेवावी व लक्ष द्यावे की कोणतीही जगिक गोष्ट जी प्रभुला आवडत नाही ती घरात येऊ देता काम नये त्याचे कार्य एखाद्या कंपनीतील दर्जानियमन अधिकाऱ्याप्रमाणे असावे जो आपल्या मालाच्या दर्जाचे बारकाईने निरीक्षण करतो व त्याची शुध्दता प्रमाणित करतो त्यात कोणतीही भेसळ वा हानीकारक पदार्थ येता कामा नये याकडे तो लक्ष देतो ज्या आईवडिलांची इच्छा आहे की त्यांच्या लेकरांनी प्रभुचे खरे शिष्य व्हावेत त्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यावी की ते आपल्या मुलांच्या लहरी स्वभावास बळी पडणार नाहीत त्यांची कोणतीही गैरवाजवी इच्छा वा मागणी ते पूर्ण करणार नाहीत, कारण तसे करणे हे त्यांच्यावरील प्रेमाचे दर्शक नसून, मुर्खपणाचे व प्रभुवरील अविश्वासूपणाचे दर्शक आहे
कोणत्याही मंडळीचे आत्मिक बल हे त्या मंडळीतील कुटूंबाच्या बळावर अवलंबून आहे जर कुटूंब दुर्बळ असतील तर मंडळीही दुर्बळ असेल मोठमोठयाने आवाज करणे, सुमधुर स्वरात गीत गाणे किंवा जोरदार वचन प्रचार करणे यांत मंडळीच्या सामर्थ्याचे गुज दडलेले नाही परंतु त्या मंडळीतील देवभत, देवभिरू, धार्मिक कुटूंबांमुळे मंडळी खरी सशत व सामर्थ्ययुत बनते
परमेश्वराला गौरव देणाऱ्या अशा कुटूंबाची आपण उभारणी करू या !
कोणत्याही चाकराला दोन धन्यांची चाकरी करिता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही (लुक 16:13)
या ठिकाणी आमच्या प्रभु येशुने स्पष्टपणे सांगितले आहे की परमेश्वराला सोडून दुसरा धनी म्हणजे धन (पैसा, भौतिक वस्तू, संपत्ती) दुसरा धनी म्हणजे सैतान नव्हे, कारण कोणीही येशूचा शिष्य सैतानावर व येशूवर एकाच वेळी प्रीती करण्याची कल्पना करू शकणार नाही धोका सैतानाकडून नव्हेधोका आहेधनाकडून, पैशाकडून
जोपर्यंत आपण जगात राहतो, प्रत्येक दिवशी आपला पैशाशी संबंध येतोच, आणि येशूचे शिष्य म्हणून आम्ही कल्पना करू की एकाच वेळी परमेश्वर व पैसा दोघांचीही आपण चाकरी करू शकतो तर आपण धोयात आहोत
धन किंवा पैसा सहज आपली पकड घेऊन येशूच्या शिष्यत्वात राहण्याच्या बाबतीत आपणाला अडखळण निर्माण करू शकतो म्हणून जसे आम्ही सैतानाच्या बाबतीत तटस्थ राहू शकत नाही तसेच आम्ही पैशाच्या बाबतीत तटस्थ वृत्ती बाळगू शकत नाही एकतर आम्ही प्रभुचे शिष्य आहोत नाही तर पैशाचे चाकर आहोत आम्ही दोन्हींचे शिष्य असूच शकत नाही ! एक तर आम्ही प्रभुला संतोषवू किंवा पैसा कमविण्याच्या पाठीस लागू हया दोन्ही परस्परविरोधी गोष्टी आहेत, जसे चुंबकाचे दोन ध्रुव जर आम्ही प्रभुवर प्रीती करीत असू तर पैशाच्या आसतीपासून दूरच राहू प्रभूवर पूर्ण प्रीती करणे म्हणजे पैशाचा द्वेष करणे एकतर येशूच्या विधानावर विश्वास ठेवून आपण ती आत्मसात करावी किंवा प्रभु खोटे बोलत आहे असे आपण म्हणत आहो हे आपण प्रकट करू !
पैशाला तुच्छ लेखणे म्हणजे त्याची पर्वा न करणे आपण पैशांचा खर्च तर करू, पण त्याच्या मोहाला चिकटून राहणार नाही स्वर्गातील मार्ग सोन्याचे आहेत या जगात लोक सोने डोयावर (कानात, गळयात) घालतात, पण स्वर्गात सोने आमच्या पायाखाली असणार स्वर्ग त्या लोकांसाठी तयार केलेला आहे जे या जगात पृथ्वीवर सोन्याला पायाखाली ठेवावयास शिकले आहेत
येशूने अनेक विषयांवर शिष्यांना शिकवीत असताना अशी आमूलाग्र बदल घडवून आणणारी विधाने केली आहेत तो म्हणाला की जर तुमचा डोळा तुम्हाला वासनायुत विचारांस प्रेरित करतो तर तो उपटून टाका याचा असा अर्थ होतो की डोळयाच्या द्वारे वासना बाळगणे हे किती गंभीर पाप आहे त्याने हेही म्हटले की मला तुम्ही तेव्हाच अनुसरू शकाल जेव्हा तुम्ही आपल्या आप्तांचा द्वेष कराल याचा अर्थ असा की येशूच्या मागे चालण्यास आम्हास जास्त अडखळणे आपल्या आप्तांपासूनच येतात असेच एक सत्य, मूलग्रामी विधान प्रभु येशू पैशाबाबत करीत आहे त्याने म्हटले आहे की परमेश्वर प्रेम करणे म्हणजेच पैशाचा द्वेष करणे होय हा पैसा पुष्कळ ख्रिस्ती लोकांच्या हाताला चिकटूनच राहतो आणि म्हणूनच ते प्रभुला चिकटून राहू शकत नाही फारच कमी विश्वासणाऱ्यांनी प्रभुच्या हया विधानाला गंभीरपणे प्रतिसाद दिला आहे आणि म्हणूनच अनेक लोक खऱ्या शिष्यत्वाची वाट चालू शकत नाहीत
प्रभुने आपल्या शिष्यांना संन्यासी बनण्यास बोलविले नाही की त्यांनी जंगलात रहावे, लग्न करू नये, नौकरी, संपत्ती, पैसा यांचा सर्वस्वी त्याग करावा ख्रिस्ती विश्वासणारे बाप्तिसमा करणाऱ्या योहानाचे नव्हे तर येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत आणि येशूने सुतारकाम करून आपल्या जगीक कुटूंबाच्या पोषणासाठी पैसे कमविले
जगिक, भौतिक बाबींबद्दल येशूच्या वृत्तीत समतोलपणा होता लग्नसोहळयात तो भरपूर प्रमाणात द्राक्षरस तयार करू शकला आणि तो 40 दिवस उपाशीही राहू शकला आपल्या प्रभुप्रमाणे त्याचा शिष्यही उत्तम भोजनाचा आनंद घेऊ शकतो आणि प्रसंगी गरज भासली तर उपाशीही राहू शकतो
पैशाचे प्रेम आमच्या प्रत्येकाच्या अंतर्यामी वसलेले असते जर कोणी म्हणत असेल की तो पैशावर प्रीती करत नाही तर तो एकतर स्वत:स फसवित आहे किवां तो खोटा आहे, कारण प्रत्येक मानवप्राणी पैशावर प्रेम करतो बायबल सांगते, द्रव्याचा लोभ सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे आणि केवळ प्रभूच यापासून आपणास मुत करू शकतो, सोडवू शकतो
पवित्र शास्त्रात अशांची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी प्रभुला अनुसरायची सुरूवात चांगली केली पण पैशाच्या पाठीमागे लागून परमेश्वराच्या सर्वोत्तम प्रतिफळास ते मुकलेत लोट सदोमास धन कमविण्यास गेला व आपल्या पूर्ण कुटूंबाचा नाश करून बसला बालाम पैशासाठी भविष्य निवेदन करायला गेला व त्याचाही नाश झाला पैशाच्या नादी लागू गेहजीने संदेष्टा बनण्याची संधी गमावली तो नामानाच्या पैशामागे गेला देमास पौलास सोडून गेला कारण त्याला ऐहिक सुख प्रिय होते (2 तीमथ्य 4:10) ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतील
जर कोणी ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी आपल्या पैशाच्या व्यवहारात अप्रामाणिक राहिला असेल तर, आता मी ख्रिस्ताकडे आली आहे, त्यानेच माझ्या मागील जीवनातील अप्रामाणिकपणाची क्षमा केली आहे म्हणून त्याबद्दल मला आता भरपाई करायची गरज नाही असे तो म्हणू शकत नाही परिवर्तनानंतर लवकरात लवकर त्याने चोरी केलेल्या पैशांची भरपाई करायला हवी कर्ज केले असेल तर ताबडतोब त्याची परतफेड केली पाहिजे यासाठी जर त्याला एकाच वेळी जेवावे लागले तरी ती सर्व परतफेड त्याला करावी लागेल किंवा घरातील काही सामान विकावे लागले तरी त्वरेने हे सर्व करून लवकरात लवकर परतफेड, भरपाई करावी हाच खरा शिष्यत्वाचा मार्ग आहे
कदाचित परतफेडीसाठी तुमच्याजवळ पैसे नसतील तर थोडे थोडे कदाचित दहादहा रूपये करून प्रत्येक महिन्यात परतफेड करावी परमेश्वर त्याचा आदर करणाऱ्यांचा आदर करतो आणि पवित्र शास्त्र म्हणते की जर मनापासून इच्छा असली तर परमेश्वर आम्ही जे करू शकतो त्यानुसार आम्हास मान्य करतो (2 करिंथ 8:12) जकयाने भरपाईचे वचन दिल्यावरच प्रभु येशूने म्हटले आज या घरास तारण प्राप्त आले आहे (लूक 19:9) त्यापूर्वी नाही परमेश्वर अप्रामाणिकतेबद्दल कधीच आशीर्वादित करीत नाही पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी परतफेड न केल्यामुळे त्यांची आत्मिक वाढ खुंटली आहे
रोम 13:8 आम्हास सांगते की, कोणाचे ऋणी असू नका, जर आम्ही कर्ज घेतले किंवा कोणाकडून उधार घेतले असेल तर ते लवकरात लवकर फेडले पाहिजे इस्त्राएल लोकांना जी अनेक अभिवचने परमेश्वराने दिली होती त्यात हे एक होते की जर त्यांनी त्याची आज्ञा मानली तर त्यांना कधीही ऋण, कर्ज किंवा उधार घ्यायची गरज पडणार नाही (अनुवाद 28:12) उधारीवर खरेदी करणे हेही स्वत:ला कर्जात गोवण्यासारखेच आहे आपल्या घरात काही यंत्रचलित सुख उपभोगाच्या वस्तू नसल्या तरी चालेल फत परमेश्वराचा आशीर्वादच पुरेसा आहे परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय राहण्यापेक्षा वस्तूंशिवाय राहणे पुरवेल
आता बँक मधून किंवा आपल्या कार्यालयातून कर्ज घेण्याबद्दल काय? एखादी गाडी घेण्यास किंवा घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यास काय हरकत? हे कर्ज घेणे ठीक आहे का? या ठिकाणी जे तत्व लक्षात घ्यायचे ते म्हणजे तराजूचे जर तुमच्याकडे कर्ज घेतल्या जाण्यासाठी तितयाच रकमेची वस्तू आहे ज्यामुळे कर्जाची रकम व ती यांचे पारडे बरोबर राहील (जसे स्कूटर, कार, घर) तर तुम्ही खरे पाहिले असता कर्जबाजारी होणार नाही कारण कर्जाच्या रकमेएवढे तारण म्हणून दाखवण्यासारखे तुमच्याकडे काही तरी आहे आणि जर तुमचा अचानक मृत्यु झाला तर तुमची पत्नी व लेकरे हे त्या वस्तू विकून कर्ज फेडू शकतात पण जर का तुम्ही लग्नासाठी कर्ज घेतले व ते सर्व खर्च करून टाकले तर तराजूचे पारडे बरोबर करण्यास तुमच्याकडे काहीच नसल्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने कर्जबाजारी झाला असाल आणि असले कर्ज तुम्ही करावयास नको, हे टाळावयास हवे
पुष्कळसे ख्रिस्ती लोक लग्नाची गोष्ट आली की खूपच मुर्खपणा करतात आणि आपल्या विवाहासाठी भकम खर्च करतात आपल्या वैवाहिक जीवनाची सुरूवात ते डोयावर कर्जाचे ओझे घेऊन करतात फत यामुळे की त्यांना आपला विवाह सत्कार सोहळा इतरांना प्रभावित करण्यासाठी खूपच दिमाखात करावयास हवा असतो आणि मग तो खर्च फेडण्यास त्यांना कित्येक वर्षे लागतात फत लोकांना दाखविण्यासाठी की जर लग्नसोहळा साधा असला तर लोक काय म्हणतील या फाजिल विचाराने भ्रमित होऊन ते कर्जबाजारी होतात आणि हा विचार करीतच नाही की इतकी वर्षे कर्ज डोयावर घेऊन बसल्याने त्यांच्या कर्जबाजारी होण्यामुळे परमेश्वराला काय वाटेल आणि परमेश्वराचे भय हया बाबतीत ते मुळीच धरीत नाहीत मी परमेश्वराचे उपकार मानतो की काही ख्रिस्ती लोक असेही आहेत की ज्यांनी लोकांची पर्वा न करता फत कॉफी व बिस्कीटांच्या द्वारेच लग्नसत्कार सोहळा साजरा केला आहे व करतात कारण ते आपली ऐपत जाणतात व तिच्याबाहेर जात नाहीत जर तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे, तर खुशाल करा खर्च वाटेल तसा, पण कर्ज करून खूप भपकेबाज लग्नसत्कार सोहळा करावा हे परमेश्वराला अपमानित करणारे आहे हा फार पुरोगामी विचार वाटतो, पण खरे शिष्यत्व ही आमूलाग्र बाब आहे
हुंडा पध्दती ही पुष्कळ विश्वासी लोकांत आढळते ख्रिस्ताचा खरा शिष्य मुलींकडून किंवा तिच्या आईवडिलांकडून मुलीशी लग्न करावयाची अट म्हणून कधीच हुंडयाची गोष्ट करणार नाही लग्न झाल्यानंतर आता मुलीच्या आईवडिलांनी स्वेच्छेने व आनंदाने काही भेटवस्तू दिल्यात तर त्याच काहीच चुकत नाही पण लग्न जुळण्यास हुंडा जर हे कारण असेल तर तिथे सर्वच चुकते भारतातील वर्तमान हुंडापध्दती ही सैतानी आहे यात शंका नाही पण जवळ जवळ सर्वच डिनॉमिनेशनच्या मंडळयांत हुंडा स्वीकारणारे अनेक ख्रिस्ती आपणास सापडतील (इव्हॅन्जलिकल आणि उदारमतवादी सुध्दा)
फ्रेंच नास्कि व्हॉल्टेयर याने अनेक अठराव्या शतकातील युरोप खंडातील ख्रिस्ती मंडळयातील प्रथांचे निरीक्षण करून व त्यांचा अभ्यास करून हे विधान केले आहे की, वेगवेगळया डिनॉमिनेशनच्या मंडळया जरी सिध्दान्ताच्या बाबतीत वेेगवेगळी विचारसरणी बाळगत असल्या तरीही एका बाबतीत मात्र सर्व मंडळयात साम्य आहे ते म्हणजे पैशाच्या बाबतीत ते सर्व पैशावर प्रेम करतात आणि मला त्यात भर घालायची आहे की हुंडयाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल ते सर्व एकाच सिध्दान्ताचे पालन करतात त्यांना तो आवडतो !!
आज, पाण्याच्या बाप्तिस्म्यावर कोणती पध्दत शास्त्रोत हे शोधून पाहण्यापेक्षा हुंडयाबद्दल पवित्रशास्त्र काय म्हणते हे पाहणे जास्त अगत्याचे आहे कारण बाप्तिस्मा कोणत्याही पध्दतीने झाला असला, लहानपणी झाला असला तरी व्यती परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतो पण कोणताही लोभी व्यती स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणारच नाही (1 करींथ 6:10)
परमेश्वराने जे काही आम्हास दिले आहे त्याबाबतीत संतोष बाळगणे हा सुभतीचा एक महत्त्वाचा भाग आहे (1 तीमथ्य 6:6) येशूच्या सर्व शिष्यांनी जेवढी त्यांची कमाई ऐपत आहे त्या मिळकतीनुसार खर्च करणे शिकले पाहिजे परमेश्वर हे निश्चित ठरवीत असतो की त्याच्या प्रत्येक शिष्याची काय कमाई असावी आणि म्हणून आपण जे आपल्यापेक्षा जास्त कमवितात त्या इतर ख्रिस्ती लोकांशी स्वत:ची तुलना कधीच करू नये कारण 2 करींथ 10:12 आपणांस सांगते की तुलना करणे हे समंजसपणाचे नाही आम्ही आपल्या खर्चाच्या एका मर्यादेत रहावयास शिकले पाहिजे म्हणजे ती वस्तू आपण खरेदी करू नये, जी आपल्या ऐपती बाहेर आहे इतर कुटूंबात त्या वस्तू आहेत म्हणजे मजजवळही असायलाच हव्या हे जरूरी नाही ऐपतीनुसार संतोषाने जगणे आपण शिकले पाहिजे
मरीयेने येशूबाळाला गाईच्या गोठयात जन्म दिला तिचे उदाहरण घ्या तेथे बाळासाठी गव्हाणीऐवजी काहीच उपलब्ध होऊ शकले नाही स्वच्छ खोली किंवा एकांत वगैरे काहीच तेथे उपलब्ध होऊ शकत नव्हते पण तिने कुरकुर केली नाही, तर नम्रपणे परमेश्वराने तिला जे तिच्या हिस्स्याचे दिले ते तिने ग्रहण केले यालाच आपल्या परमेश्वराने दिलेल्या क्षेत्रात संतुष्ट राहणे म्हणतात
आपल्या कमाईच्या आत आपल्या ऐपतीप्रमाणे जगणे, कर्जबाजारी होणे टाळणे, पैशाच्या बाबतीत प्रामाणिक राहणे एवढेच पुरेसे नाही तर आपण जो पैसा परमेश्वराने आपणांस दिला आहे त्या पैशाच्या बाबतीत विश्वासू राहणे ही एक महत्त्वाची बाब होय
अनुवाद 8:18 हे वचन आम्हाला सांगते की परमेश्वर आम्हास धन कमविण्याचे सामर्थ्य देतो आणि आपण हे कधीच विसरू नये आपणांस परमेश्वर एखादा भिकाऱ्याच्या कुटूंबातह जन्माला घालू शकला असता आपणास तो मुर्ख किंवा अपंगही करू शकला असता आणि आपण हे कधीही विसरू नये की आपली बुध्दीक्षमता, हुशारी ज्यामुळे आपण कमाई करतो धन कमवितो ती आपली स्वत:ची नसून परमेश्वरानेच आपणांस दिलेली आहे
पैशाच्या बाबतीत विश्वासूपणा म्हणजे सर्वप्रथम हेच लक्षात घेतले पाहिजे की आपण जे काही कमवितो ते सर्व परमेश्वराचेच आहे फत त्याचा दशांश नव्हे (जसे जुन्या करारात समजले जाई) परंतु जशी येशूने आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे सर्व काही परमेश्वराचे आहे आपले म्हणून असे काहीच नाही आणि म्हणूनच ते सर्व आपण परमेश्वराच्या वेदीवर त्याला परत समर्पित केले पाहिजे आणि तो जे आम्हास परत देतो ते विचारपूर्वक व विश्वासूपणाने आपल्या जगीक गरजांसाठी वापरले पाहिजे
पाच हजारांना भोजन या येशूच्या चमत्कारात आपल्याला देन गोष्टी प्रामुख्याने शिकावयास मिळतात सर्वप्रथम आपली गरज भागविण्यासाठी आम्हाला आपल्याजवळ जे थोडके आहे त्यावर जर परमेश्वराचा आशीर्वाद असेल तर तेच पुरेसे आहे दुसरे म्हणजे, प्रभुला वाया घालणे, व्यर्थ घालवणे आवडत नाही प्रभुने शिष्यांना काही व्यर्थ जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करण्यास सांगितले माझ्या पित्याने आशीर्वादाने इतया कमी भाकरी व मासे भरपूर केले असा विचार करून उरलेले येथे पर्वतावर पडून राहू द्या ते तसेच वाया गेले तरी हरकत नाही नाही, त्याने तसे केले नाही प्रभुने आपणांस खूप आशीर्वादीत केले आहे याचा अर्थ असा नाही की आपण निष्काळजीपणाने वाटेल तसा व्यर्थ खर्च करावा
जराशीच खराब झालेली वस्तू आपण फेकून देता का? श्रीमंतांचे चाळे आहेत ते पण सात्विक मनुष्य वस्तूंची दुरूस्ती करून ते परत वापरतो आत्मिकतेचा व अशा बाबींचा काही संबंध नाही असे आपणांस वाटते काय? असे नाही आत्मिकतेचा खचितच अशा वागण्याशी फार मोठा संबंध आहे !
येशूचे शिष्य या नात्याने आपण आपल्या खर्च करण्याच्या सवयीबाबत शिस्तीचे पालन केले पाहिजे कुटूंबात, कुटूंबात प्रमुख या नात्याने, पतीची ही जबाबदारी येते की पैशाचा खर्च कशा रीतीने करावा जास्तीचा व्यर्थ खर्च टाळणे ही त्याची जबाबदारी आहे पत्नीस त्याने समजावून सांगितले पाहिजे की तिची इच्छा असेल तरी अमुक वस्तू तिला घेता येणार नाही कारण ते आपल्या ऐपती बाहेरचे आहे
जो थोडयाविषयी विश्वासू राहील तोच बहुतांविषयी विश्वासू असू शकतो हा परमेश्वराचा मूळ सिध्दान्त आहे जर आम्ही थोडया गोष्टीत, भौतिक गोष्टीत विश्वासू राहणार नाही, तर परमेश्वर त्याच्या वचनातील रहस्यांचे भांडार आम्हासाठी कसे उघडे करणार त्याच्या स्वभावाचे व त्याच्या पवित्र वचनांचे अदभुत प्रकटीकरण तो आम्हास कसे देईल !
जर आम्ही आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छितो तर आम्ही वायफळ खर्च करणे, वाया घालविणे थांबविण्यास प्रथम शिकले पाहिजे जर आपणांस परमेश्वराचा विश्वासू सेवक व्हायची इच्छा असेल तर पैशाचा अपव्यय करणे, अनावश्यक वस्तूंची खरेदी करणे टाळा लज्जतदार जेवण, भपकेबाज पेहराव, उच्च राहणी या गोष्टींवर उगाच पैसा खर्च करू नका ज्या वस्तू दुरूस्त करून परत वापरता येतात त्या वस्तू फेकून देऊ नका जर तुम्हाला त्यांची गरज नसेल तर कोणा गरजू व्यतीला फुकट देऊन टाका
लूक 14:33 आम्हास सांगते की आमचे म्हणून काही आम्हास ठेवावयाचे नाही अनेक गोष्टी आम्ही उपयोगात आणू शकतो परंतु त्या वस्तूच आमचे सर्वस्व ठरता कामा नयेम्हणून जर काही मूल्यवान असे चोरीला गेले किंवा खराब झाले तर आपण चलबिचल होऊन उगाच त्याबद्दल खेद करीत बसू नये कारण ते आपले नव्हतेच आपण फत आपल्या स्वामीच्या मालमत्चेे कारभारी आहोत परमेश्वर आपणांस अनेक गोष्टी देतो यासाठी की आपण ते सर्व त्याच्याच गौरवार्थ वापरले पाहिजे कारण आम्ही या जगात केवळ प्रवासी आहोत
जोपर्यंत आम्ही सर्व काही परमेश्वराखातर त्यागून द्यावयास तयार होत नाही तोपर्यंत शुध्द अंत:करण आपणांस प्राप्त होऊ शकत नाही शुध्द विवेकभाव व शुध्द अंत:करण हया दोन्ही परस्पर वेगवेगळया गोष्टी आहेत पैशाच्या बाबतीत प्रामाणिक राहिल्याने, व्यवहारात प्रामाणिक राहिल्यामुळे आपणास शुध्द विवेक प्राप्त होतो तर पैशांच्या बाबतीत विश्वासू रहिल्याने शुध्द अंत:करण प्राप्त होते आपले अंतर्याम शुध्द असेल, पण तरीसुध्दा आपले मन आपल्या नोकरीच्या बाबतीत, जगीक संपत्तीच्या बाबतीत चिकटून राहिलेले असते कारण पूर्ण अंत:करणाने आपण परमेश्वरावर प्रीती करतो असे आपण म्हणू शकणार नाही
इस्त्राएली लोक आपल्या मिळकतीत 15 प्रतिशत परमेश्वराला देत असत 10 प्रतिशत दशांश आणि बाकी इतर अर्पणाद्वारे ते परमेश्वराला देत दशांश देण्यामागील सिध्दान्ताचे वर्णन अनुवाद 14:22,23 यात आढळून येते आम्ही आपल्या जीवनात सर्व बाबतीत परमेश्वराला पहिले स्थान द्यावे हा दशांशामागील हेतू आहे जेव्हा इस्त्राएली लोक आपला हंगाम गोळा करीत तेव्हा त्यांना परमेश्वराला आपल्या उत्पन्नाचा दशांश द्यावा लागत असे या उद्देशाने की जे काही आम्हाला लाभले आहे ते परमेश्वराकडूनच आहे व आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनात सर्व बाबतीत प्रथम स्थान देतो व त्याचे दर्शक म्हणून हा दशांश आणतो पण कालांतराने दशांश ही बाब निव्वळ प्रथाच बनून राहिली व ते एक ओझे मानले जाऊ लागले आजही अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांत आम्ही हीच वृत्ती पाहतो
नवीन करारात तेच तत्व आम्हास दिसते पैशापेक्षा परमेश्वराला उच्च स्थान, आद्यस्थान दिले पाहिजे पण आपण आता परमेश्वराला किती दिले पाहिजे? नवीन करारात सांगितले आहे की ज्या प्रमाणात प्रभुने आपल्याला दिले आहे त्या परीमानाने आपण प्रभुच्या भांडारात आणावे (1 करींथ 16:2)पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे काही आम्ही देतो ते संतोषाने दिले पाहिजे (2 करिंथ 9:6)
लूक 6:38 वचन आपणास सांगते की आपण जर परमेश्वराला देतो तर परमेश्वर आपणांस ते परत देतो पण आपणांस परत प्राप्त व्हावं या हेतूने आपण देऊ तर आपल्या पदरी निराशाच पडेल कारण परमेश्वर आपल्या अंत:करणाचे हेतू पारखितो, आणि मग कदाचित तुम्हाला परमेश्वराकडून काहीच प्राप्त होणार नाही जे परतीची अपेक्षा न ठेवता संतोषाने परमेश्वराला देतात त्यांनाच परमेश्वर सर्वोत्तम ते देतो
मला अशा एका बंधूबद्दल माहिती आहे ज्याची कमाई मोजकीच होती पण त्याला कशाचीच कधीही कमतरता भासली नाही व तो कधी कर्जबाजारीसुध्दा राहिला नाही त्याला जे काही आवश्यक होते ते सर्व काही त्याच्याजवळ होते त्याच्या हया जीवनाचे रहस्य त्याला जेवहा कोणीतरी विचारले तेव्हा तो म्हणाला, परमेश्वर जे काही मला देतो त्यातून मी माझ्या फावडयाने त्याला परत देतो पण माझ्या हे अनुभवास आले आहे की देवाचा फावडा माझ्या फावडयापेक्षा कितीतरी मोठा आहे ! आम्ही जेव्हा परमेश्वराला देतो तेव्हा परतीत आम्हाला त्याच्याकडून अधिकच प्राप्त होते
2 करिंथ 9:6 हे वचन सांगते, जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील
लोकांमध्ये माझ्याबद्दल असे म्हटले जाते की मी दशांशाविरूध्द प्रचार करतो पण कदाचित त्यांच्या हे लक्षात आले नसणार की मी दशांशापेक्षाही कठीण अशा गोष्टीचा प्रचार करतो आणि ती म्हणजे 100 प्रतिशत देणे, तेही आनंदाने, संतोषाने, हेच येशूनेही शिकविले तो परूशांस नियमशास्त्राप्रमाणे 10 प्रतिशत देण्यास सांगतो (मत्तय23:23) तर पेन्टकॉस्टनंतर नवीन करारात प्रवेश करणाऱ्या शिष्यांस तो सर्वस्व देण्यास सांगतो (लूक 14:33) आणि हेच मी मागील 40 वर्षापासून प्रचार करीत आहे आणि स्वत:च्या जीवनात प्रत्यक्षात आचरणात आणित आहे
जर आम्ही परमेश्वराचा आदर करू तर तो आमचा आदर करील जर प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याचा प्रयत्न करू तर त्याबरोबर आपणांस परमेश्वर जीवनास आवश्यक असलेल्या इतर सर्व गोष्टीही देईल (मत्तय 6:33) आपणास वाटेल ते जे पाहिजे ते देण्यास परमेश्वर काही मूर्ख नाही, आपल्या जगीक आईवडिलांपेक्षा तो निश्चितच कितीतरी अधिक बुध्दिमान आहे पण तो विश्वासू आहे आणि आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते सर्व देण्यात, आपल्याला काय हवे आहे व आपल्याला कशाची गरज आहे, काय आवश्यक आहे या दोन्ही बाबतीत बराच फरक आहे फिलिपै 4:19 वचनात हे अभिवचन आहे की, परमेश्वर तुमची सर्व गरज पुरवील
आम्ही देण्याच्या बाबतीत समंजस असावयास शिकले पाहिजे अनेक गरीब लोक विश्वासूपणाने देतात, पण समंजसपणे द्यावयास ते चुकतात एखादे कार्य परमेश्वराचे कार्य आहे असे समजून ते आपले दान देतात पण त्यांच्या पैशाचा उपयोग करून एखादा अविश्वासू ख्रिस्ती सेवक चैनीत जीवन जगत असतो असे गरीब लोक देण्याच्या बाबतीत प्रामाणिक असतील, पण बुध्दिमान मात्र नाहीत आमचा पैसा कोठे जात आहे त्याचा उपयोग कसा होत आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे
गलती 6:10 मध्ये आपणांस सांगण्यात आले आहे की, आपण सर्वाचे व विशेषत: विश्वासूबंधूचे बरे करावे सर्वत्र आपले जे गरीब विश्वासबंधू आहेत त्यांना मदत करण्याची त्यांचे भले करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे पण आपण येथे ही सावधगिरी बाळगली पाहिजे की नाही तर आपल्या मंडळीत उदार लोकांद्वारे मिळणारी आर्थिक व इतर मदत प्राप्त करण्यासाठी, आर्थिक मदतीच्या लालचीने येणाऱ्या लोकांची गर्दी उसळेल ज्यांचा उद्देश फत मिळविणे हाच असेल आपल्या भारतासारख्या गरीब देशांत अशा प्रकारचा धोका टळण्याचा एकच उपाय हा आहे की स्थानीय मंडळीमध्ये विश्वासबंधू म्हणविणाऱ्या प्रत्येकाने आपला विश्वासूपणा सिध्द करून दाखवावा नाही तर, खऱ्या शिष्यांऐवजी पराजीवी लोकांचा भरणा आमच्या मंडळीत वाढेल
प्रेकृ 4:34 मध्ये आपण वाचतो की सुरूवातीच्या ख्रिस्ती लोकांत एकही दरिद्री नव्हता किंवा त्यातील एकालाही उणे नव्हते कारण त्यांचे सर्व समाईक होते म्हणजे श्रीमंत गरीबाला मदत करीत आणि कोणी श्रीमंताला सती करीत नसे, तर ते स्वेच्छेने व अंत:करणापासून गरीब विश्वासबंधूची मदत करीत
परंतु गरीबांची मदत कशी करावी या बाबत अनेक विश्वासणाऱ्याना ज्ञान नसते ते अज्ञानासारखे, मुर्खासारखे दैहिक उदारतेने अपात्र लोकांना मदत करतात याचा परिणाम, प्रभुच्या पैशाचा अपव्ययच होत नाही तर परोपजीवी (दुसऱ्यांच्या परोपकारावर जगणारे) लोकांचीच मंडळीत वाढ होत जाते जे फत उदार श्रीमंतानी दिलेल्या मदतीच्या अपक्षेनेच मंडळीत सामिल होतात कधी कधी हे श्रीमंत लोक स्वस्त प्रसिध्दीसाठी उदारहस्ते या गरीबांना देतात यासाठी की या गरीबांना सतत त्यांचाच पदर धरून रहावे, जर थोडी फार मदत केली गेली आणि ते सुध्दा अधून मधून तर हे एवढे गंभीर होणार नाही पण जेव्हा ही तुम्ही मंडळीत एखाद्याला मोठी रकम, किंवा नियमित मदत देऊ इच्छिता तेव्हा त्या मंडळीच्या एखाद्या समंजस वडिलांस विचारून त्याचा सुज्ञ सल्ला घेतल्यानंतरच केले तर ते अधिक बरे होईल कारण मंडळीतील वडिलांना मंडळीत खरोखर गरजवंत कोण आहे किंवा कोणाला जास्त गरज आहे याची अधिक माहिती असते व ते आपल्यापेक्षा या बाबतीत निश्चितच सुज्ञ असतात
प्रारंभिक मंडळीतील ख्रिस्ती लोक अधिक नम्र होते व त्यांना माहीत होते की या बाबतीत पण अधिक जाणते नाही, म्हणून त्यांनी सुज्ञतेने आपली संपत्ती प्रेषितांच्या पावलावर आणून टाकली यासाठी की त्यांनी ते गरीबांस वाटून द्यावे परंतु प्रेषितांनी त्यांच्यातील एकाही भेटीला स्वत: स्पर्श केला नाही पेत्र व योहान यांच्याकडे लक्षावधी रूपये येत असत तरीही ते इतया विश्वासूरित्या तो पैसा गरजवंतांकडे हस्तांतरित करीत म्हणूनच ते मंदिराच्या सुंदर नामक दरवाज्याजवळ असलेल्या भिकाऱ्याला म्हणू शकले, सोने रूपे आमच्याकडे नाही, सर्व पैसा त्यांच्या हस्ते जात असे, पण त्यांनी तो आपल्या हातास चिकटू दिला नाही आणि यामुळेच पवित्र आत्म्याचा अभिषेक जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांच्यावर होता पण आजची कथा व तिची व्यथा वेगळीच आहे आज प्रचारकांच्या हाताला अधिकाधिक पैसा चिकटलेला आपणास दिसतो जो त्यांच्याकडे इतरांसाठी येतो
आपणास जे उधार मागतात त्यांना देण्याच्या बाबत काय? मला आठवते मी नेव्हीमध्ये (नौकादलात) होतो तेव्हा एक स्थानीय मंडळीतील विश्वासणारा मजकडे उसणे पैसे मागायला आला परमेश्वराचे वचन मत्तय 5:42 मध्ये म्हणते, जो तुझ्याजवळ मागतो त्याला दे व जो तुजपासून उसणे घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको ! तो मनुष्य मला म्हणाला की तो माझे पैसे पुढच्या महिन्यातच परत करील म्हणून मी त्याला जितके पैसे हवे होते तितके दिले परंतु पुढील महिन्यांत तो ते परत करू शकला नाही, उलट त्याने मला अजून पैसे मागितले मी त्यावेळेस नौकादलात असल्यामुळे मला चांगला पगार होता व माझी राहणी साधी होती त्यामुळे मजजवळ भकम पैसे असत मी त्याला अजून पैसे दिले परत पुढच्या महिन्यात तो पुन्हा आला व मजजवळ त्याने परत पैसे मागितले काही दिवसानंतर तो विश्वासणारा विश्वासापासून मागे घसरला व दारू पिऊन आपले पैसे उडवू लागला मी जेव्हा हे पाहिले तेव्हा मी त्याला जाऊन म्हटले की जर तुजजवळ अशा रीतीने सैतानाला देण्यासाठी पैसे असतील तर तू माझे उसणे घेतलेले पैसे मला परत कर म्हणजे ते मला परमेश्वराच्या कार्यासाठी देता येतील हे ऐकून त्याला खूप राग आला व तो उलट मलाच दोष देत म्हणू लागला की मीच त्याला छळत आहे मी शेवटी त्याला पैसे परत मागणे सोडून दिले
यानंतर मी प्रभुजवळ विचारले की याबाबतीत माझे कुठे चुकले आणि प्रभुने मला माझी चूक दाखवून दिली प्रभु मला म्हणाला, तुला वाटले, तुझा पैसा तुझ्या स्वत:चा आहे आणि तू वाटेल तसा तो वापरू शकतोस पण खरे पाहिले असता तुझा पैसा माझा आहे आणि तो वापरण्याअगोदर, त्या व्यतीला ते उसणे देण्याअगोदर तू माझा सल्ला घ्यावयास हवा होता
जर कोणी मजजवळ दहा हजार रूपये ठेवले असते व तुम्हास हे माहीत पडल्यावर तुम्ही मजकड येऊन म्हणाला असता की त्याच्यातून मला काही उसने द्या, तर मी तुम्हास म्हटले असते की मला ज्याचा पैसा आहे त्याची आधी परवानगी घ्यावी लागेल मी त्याच्या परवानगीवाचून तुम्हाला त्यातील काहीही देऊ शकत नाही कारण तो माझा पैसा नाही पण वरील बाबतीत मी तसे केले नव्हते कारण मी समजलो नव्हतो की माझा पैसा खरे पाहिले असता प्रभुचा पैसा आहे जर मी लूक 14:33 प्रमाणे माझे सर्वस्व प्रभुला दिले असते तर प्रभुच्या आज्ञेप्रमाणे मी त्या व्यतीला स्पष्ट म्हणू शकलो असतो की माझा पैसा प्रभुचा आहे व मला प्रभुला याबाबत विचारणे आवश्यक आहे पण त्यावेळी मी यांत्रिकरित्या बायबल वचनाचे नुसते शब्दश: पालन केले आणि परमेश्वराचा पैसा गमावून बसलो सैतानानेही एकदा परमेश्वराचे वचन सांगितले होते मी एका वचनाची दुसऱ्या वचनाशी तुलना करून पहावयास हवे होते
आपण गरजवंताची गरज पुरविण्यासाठी त्यांना अवश्य दिले पाहिजे पण प्रत्येक वेळी आपण प्रभुला विचारून त्याचा सल्ला घ्यावयास हवा आम्ही परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगले पाहिजे जर अशी व्यती आपणास भेटते की जी खरोखरच गरजवंत आहे, तर आपण प्रभुचे मार्गदर्शन प्रार्थनेद्वारे शोधले पाहिजे तेव्हा परमेश्वर आपल्या अंत:करणात, आपल्या आत्म्यामध्ये आपल्या आत्म्याद्वारे खात्री करून देईल की आपण त्याची आर्थिक मदत करावी किंवा नाही नाहीतर काय माहीत, एखादे वेळी आपल्याला मदत मागणारी व्यती एखाद्या उधळा पुत्र असू शकतो, ज्याला परमेश्वर डुकरांमध्ये शिस्त लावत असणार आणि अशा वेळेस त्याला आपण मदत करू तर आपण त्याच्या स्वर्गीय पित्याच्या घराकडे जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू आणि ती खऱ्या अर्थाने मदत अशी होणारच नाही
परमेश्वराचा धन्यवाद असो की आपण नियमशास्त्राधीन नाही, त्यातील कडक नियमांचे, कायद्यांचे पालन करण्याची आपणास गरज नाही पण आपल्याला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन उपलब्ध आहे जो प्रत्येक परिस्थितीत आपले सामर्थ्ययुत पध्दतीने सहाय्य करू शकतो व आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दल आम्हास मार्गदर्शन करू शकतो
1 करींथ 9:14 आपणास सांगते की प्रभुने असे नेमिले आहे की सुवार्तिकांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी पण पुढे वचन 1518 मध्ये पौल म्हणतो की तो अशा प्रकारच्या सहाय्याची स्वत:साठी अपेक्षा करीत नाही कारण ती स्वत:ची उपजीविका कमाविण्यासाठी स्वत: काम करून सुवार्ताप्रचार करीत असे यामुळेच तो करींथ येथील ख्रिस्ती मंडळीला प्रभुसाठी द्यावयास प्रोत्साहीत करतो व म्हणतो की त्यांनी गरीब गरजवंत ख्रिस्ती लोकांना आपल्या पैशांनी मदत करावी कारण त्याने स्वत:करीता त्यांच्याकडून कधी आर्थिक मदत मागितलेली नव्हती
आपण येशूला किंवा त्याच्या शिष्यांना स्वत:करिता व आपल्या सेवेकरिता आर्थिक सहाय्य मागतांना कधीच पाहत नाही त्यांनी केवळ गरीबांना मदत करण्यास सांगितलेले आपण पाहतो (मार्क 10:12, योहान, 13:29, 2 करींथ 8 व 9 अध्याय, गलती 2:10) पैशांच्या बाबतीत शिष्यत्वाचा हाच मार्ग आहे
या संदेशाची पूर्णवेळ सेवा करणाऱ्या ख्रिस्ती सेवेकऱ्यांस अत्यंत गरज आहे कारण त्यांच्यापैकी अनेक जण असे आहेत की जे निर्लज्जपणे विश्वासणाऱ्यांना पैसे मागतात व त्यांनी त्यांच्या सेवेसाठी व त्यांच्या स्वत:साठी आर्थिक मदत करावी म्हणून विश्वासणाऱ्यांवर दबाव आणतात आणि त्यांची मजल इथपर्यंत जाते की ते म्हणतात की जर त्यांना तशी आर्थिक मदत केली नाही तर परमेश्वर त्यांना शिक्षा करील हा परमेश्वराचा मार्ग नव्हे परमेश्वराच्या मार्ग तर हा आहे की आपण आपला वेळ, शती इतरांना पाणी पाजण्यात (इतरांची काळजी घेण्यात) खर्च करतो, आणि मग परमेश्वर आपली काळजी घेतो (नीतिसुत्रे 11:25) हा परमेश्वरावरील विश्वासाचा मार्ग आहे जेथे आम्ही परमेश्वरावर विसंबून राहतो मनुष्यावर नव्हे
मी भारतीय नौकादलात नोकरी करीत असताना नौकादलात मला पगार देत असे व माझ्या भौतिक गरजा पुरवीत असे मला माझ्या आर्थिक मदतीकरिता इतरांजवळ जाऊन पैसे मागण्याची गरज नव्हती आमच्या परमेश्वर या नौकादलापेक्षा किंवा इतर मालकांपेक्षा श्रेष्ठ नव्हे काय? जर आम्ही खरोखर सर्वशतीमान परमेश्वराचे सेवक आहोत तर आम्हाला मर्त्य मानवाकडून पैसे मागण्याची का गरज भासावी? जेव्हा आम्ही इतर विश्वासणाऱ्यांकडून पैसे मागतो तेव्हा हा आमच्या परमेश्वराच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे परमेश्वराच्या सेवकांनी मनुष्यावर नव्हे तर त्याच्यावर अवलंबून रहावे परमेश्वर याबाबत ईर्ष्यावान आहे
मला एक उदाहरण देऊ दया अशी कल्पना करा की एखादा पाश्चिमात्य व्यती छानसा सूट घालून तुमच्या घरी येतो आणि मी युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकेचा राजदूत आहे असे म्हणून आपला परिचय करून देतो मग लगेच हे म्हणतो की आमचा देश आर्थिक अडचणीतून जात आहे व त्याच्या देशाकरिता आपण थोडी फार आर्थिक मदत मिळावी म्हणून तो तुम्हास विनंती करतो तुम्ही काय विचार कराल? तुम्हास एकदम वाटेल की हा कोणी थापाडया माणूस दिसतो जो तुम्हास ठकवू पाहत आहे का? कारण तुम्हाला हे नकी माहित आहे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा असा देश आहे की जो आर्थिक मदतीसाठी घरोघरी लोकांकडून अशी भिक मागण्यासाठी आपल्या राजदूताला कधीच पाठविणार नाही इतया हलया व खालच्या स्थराला हा देश जाऊच शकत नाही
आता ही कल्पना करा की एखादी व्यती तुमच्या घरी येते किंवा तुम्हाला आपले मासिक पाठवून, मी प्रभु येशू ख्रिस्ताचा राजदूत आहे असा परिचय करून देतो तो पुढे म्हणतो की परमेश्वराच्या राज्यात सध्या पैशाची फार कमी आहे आणि म्हणून आपण पैशाची मदत करून परमेश्वराला या पेचातून सोडवा, मग कितीही शुल्लक मदत का होईना त्याच्या कार्याकरिता द्या तुम्ही त्याच्यावर विश्वास करीता का? कारण अमेरिकेच्या सरकारपेक्षा परमेश्वराचे राज्य तुम्ही कमी लेखता हे सत्य आहे दु:खद सत्य! आणि हेच कारण आहे की मोठया आत्मविश्वासाचा आव आणून मी परमेश्वराचा सेवक आहे असे ठामपणे सांगून हजारो विश्वासणाऱ्यांना मुरळ घालून फसविणारे असे अनेक परमेश्वराचे सेवक म्हणविणारे आहेत
अशा कित्येक तथाकथित परमेश्वराच्या सेवकांनी परमेश्वराच्या राज्याला इतया खाली स्थरापर्यंत आज आणून ठेवले आहे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे आणि हे यामुळेच की पैशाच्या बाबतीत ते अद्याप येशूचे खरे शिष्य झालेले नाहीत आणि म्हणूनच ते इतरांनाही पैशाच्या बाबतीत येशूचे शिष्य बनवू शकत नाहीत
आजकाल असे कित्येक प्रचारक आहेत ज्यांनी बायबल पाठशाळा व अनाथालय काढलेले आहेत ते इतरांना मदत करण्यासाठी नव्हे तर स्वत: मोठा पगार उकळण्यासाठी आणि त्यांच्या कुटूंबाला उच्च राहणीमान ठेवता यावे म्हणून पैसा कमविण्यासाठी आणि सर्वशतीमान डॉलर्स आपल्या झोळीत खेचता यावेत म्हणून आपल्या सेवेच्या यशाचा मोठा गौरवास्पद अहवाल ते बातमीपत्रकातून अगदी नियमितपणे परदेशात पाठवीत असतात! आपल्या भारत देशातील अनेक सेवकांनी अशा प्रकारे पैशाच्या नादी लागून स्वत:चा नाश करून घेतला आहे
परमेश्वराच्या कार्याकरिता दिलेला पैसा हा जगातील सर्वात पवित्र असा पैसा आहे आणि त्यातून जर तुम्ही, स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटूंबाच्या व्यतगत लाभासाठी धेतो, (तसा तो पैसा त्या कामाकरीता दिला गेल्याचा उल्लेख नसताना) तर आपण फार गंभीर धोयाच्या स्थानी उभे आहोत अनंतकाळचा विनाश आमच्या वाटयाला आहे आम्ही वाटीभर मसुरीच्या वरणासाठी जेष्ठपणाचा हक गमावून बसणार आहोत
आज ख्रिस्ती सेवकांनी काटकसरीने जगण्याची अत्यंत गरज आहे मितव्ययी, काटकसरी असणे हाही पैशाच्या मोहापासून दूर राहण्याचा एक भाग आहे मी असे ख्रिस्ती कामकरी पाहिले आहेत की ते आपला पगारी पैका तर काटकसरीने वापरतात पण तेच जर मिशनचा पैसा म्हटला की त्याची उधळपट्टी करतात अमेरिकेतील काही गरीब विधवा आपली दमडी न दमडी वाचवून भारतातील प्रभुच्या कार्याकरिता पाठवितात आणि भारतीय ख्रिस्ती तोच पैसा स्वत:ची गडेगंज घरे बांधण्यासाठी, चटकमटक जेवणासाठी खुशाल खर्च करतात हा अविश्वासूपणा होय आणि हेच मुख्य कारण आहे की अशा ख्रिस्ती कामकऱ्यांकडे परमेश्वराचा संदेश सांगण्यासाठी दमदार अशी वाणी नाही
आज भारतीय मंडळयात संदेष्टयाची, देवसंकल्प निवेदकांची का कमतरता आहे? परमेश्वराला या एका अब्ज जनसंख्येच्या देशाची काळजी नाही म्हणूनच का त्याने या दिवसात आपल्या या देशात आपले संदेष्टे पाठविलेले नाहीत? परमेश्वराला निश्चितच भारताची काळजी आहे आणि त्याने आपले संदेष्टे होण्याकरिता पुष्कळांना या देशात पाचारण देखील केलेले आहे पण बहुतेकांनी आपला संदेष्टे होण्याचा वारसाहक पैशाखातर धनदेवतेला विकून टाकला आहे व ते बालामाच्या मार्गाने आणि गेहजीच्या मार्गाने गेले आहेत आणि परिणाम हा की आज वचितच कोणी खरा असा संदेष्टा उरला आहे
भारतीय ख्रिस्ती मंडळीने आता स्वत:च्या पायावर उभे राहणे शिकावे याची अत्यंत गरज आहे आणि यासाठी परमेश्वर कदाचित एक दिवस भारतात ख्रिस्ती कार्याकरिता येणारा सर्व परदेशीय पैसा बंद करणार आहे आणि जर परमेश्वराने असे केले तर जे भाडोत्री मोलकरी आहेत ते उघडकीस येतील कारण ते आपले कार्य सोडून पळ काढतील आणि कदाचित मग, नंतर खरे संदेष्टे उदयास येतील व ख्रिस्ताच्या मंडळीचे पूर्ण रचनात्मक कार्य पूर्णतेस येईल आणि आपल्या या देशात परमेश्वराचे नाव खऱ्या अर्थाने गौरविले जाईल
जर परमेश्वराने आपणास पूर्ण वेळ सेवेकरी होण्यास पाचारण केले आहे तर ही खात्री करून घ्या की तुम्ही परमेश्वराचे सेवक म्हणून टिकून राहाल आणि कधीही मानवाचे सेवक बनणार नाही जेव्हा श्रीमंत लोक तुम्हाला व्यतगत पैसा देतील किंवा दाने देतील तेव्हा परमेश्वराच्या संदेशात भेसळ करून, त्यात समझौता करण्याचा मोह होण्याची फार शयता आहे कारण पैसा घेतल्यानंतर तुम्ही अशा श्रीमंतांना मुळीच दु:खविणार नाही याची काळजी घ्याल 1 करींथ 7:21 आणि 23 या वचनात लिहिले आहे की तुम्ही मोलाने विकत घेतले आहात, यासाठी मनुष्यांचे दास होऊ नका अनेक विश्वासणारे आपणांस त्यांच्या देणग्याद्वारे आपले गुलाम बनविण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून अशांपासून सावध रहावे
अनेक क्षेत्रांपैकी एक क्षेत्र ज्यांत अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची, त्यांच्या विश्वासाची व विश्वासूपणाची परीक्षा होते ते म्हणजे, जेव्हा आपले ख्रिस्तीतर बांधव त्यांच्या धार्मिक सणसोहळयासाठी आपल्याकडे वर्गणी मागण्यास येतात ख्रिस्ताच्या शिष्यांनी नम्रपणे व आदराने, पण खंबीरपणे त्यांस उत्तर देऊन सांगावे की गरीबांना मदत करण्याची बाब असती त्यांनी आनंदाने अशा कामासाठी वर्गणी दिली असती पण ख्रिस्तीतर सणांसाठी ते वर्गणी देऊ शकत नाहीत कारण ते त्यांच्यावर विश्वासच करीत नाहीत कधी कधी अशा प्रकारचा नाकार काही ठिकाणी विश्वासणाऱ्यांसाठी धोयाचाही असू शकतो पण अशा परिस्थितीत ख्रिस्ती शिष्यांनी सुज्ञ वागावे कोणत्याही किंमतीवर आपल्या प्रभुचा त्याने नाकार करू नये पण एखादा चोराप्रमाणे जर त्यांचे पैसे हिसकाविण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वत:स दोषी मानू नये कारण परमेश्वर सर्व परिस्थिती जाणतो
दुसरे क्षेत्र जिथे आपण पुष्कळदा अशा समस्यांना तोंड देतो ज्यावेळी आम्हाला एखाद्या गोष्टीची मंजूरी प्राप्त करण्यासाठी किंवा लायसेन्स मिळविण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांस पैसा देण्याची गोष्ट येते या विषयावर पुष्कळ प्रचारक बोलत नाहीत या भीतीने की लोकांत त्यांची अति पवित्र म्हणून प्रतिष्ठा धोयात येईल पण या विषयावर स्पष्ट बोलण्याची आज अत्यंत गरज आहे कारण ख्रिस्ती लोकांना आज आपल्या देशात या समस्येला रोज तोंड द्यावे लागते म्हणून काही सल्ला मी याबाबत आपणास देऊ इच्छितो की ज्यामुळे फाजिल विवेकाच्या टोचणीचे व दोषांचे ओझे आपल्या खांद्यावरून सारले जाईल
तीन प्रकारच्या पातळीवर लोक जगू शकतात जसे आपण 1 करींथ 6:12 आणि 10:23 मध्ये वाचतो :
आता हे स्पष्टच आहे की आपण कधीही बेकायदेशीर असे करू नये म्हणजे खालच्या स्थरावर जाऊन नियमाबाहेरचे काहीही कधीच करू नये
आणि म्हणून आपण कोणत्याही अनैतिक कामासाठी पैसा देऊ नये हे सरकारला किंवा एखादा संस्थेला ठकविणे होईल व जो पैसा आपण देऊ तो लाच ठरेल
पण समजा एखादा अधिकारी तुम्हाला अगदी कायद्यानुसार असलेल्या गोष्टीसाठी पैसे मागतो आणि नेहमीची दगदग व येणे जाणे टाळण्यासाठी तुम्ही तो पैसा त्याला देता तेव्हा तुम्ही कोणाला ठकवित नाही तुम्ही स्वेच्छेेन स्वत:चा तो पैसा देत आहात, आपण हॉटेलात टीप देतो त्यासारखे किंवा अधिक स्पष्टरित्या म्हणाल तर, एखादा डाकू जर तुमच्या छातीवर बंदूक रोखून तुम्हाला पैसे मागतो तेव्हा तुम्ही आपला जीव वाचविण्यासाठी त्यास जवळचे पैसे देता तसे हे आहे फरक एवढाच की बंदुकीऐवजी, एक सरकारी अधिकारी तुमच्यापुढे निर्वाणीची अट ठेवतो ! ही भरदिवसा केलेली लूटच आहे पण तुम्ही कमीत कमी स्वत:च्या फायद्यासाठी अनैतिक, अनियमित कार्य करण्यासाठी त्याला तो पैसा देत नाही व कोणाचीही फसवणूक करीत नाही
येशूचा शिष्य हा एकटा भटकणारा किंवा एकटाच सेवा करणारा असू शकत नाही त्याला नेहमीच त्याच्या स्थानीय मंडळीच्या इतर शिष्यांच्या सहभागितेत व सहवासात राहण्याची गरज आहे
येशूने म्हटले आहे की त्याच्या शिष्यांची ओळख म्हणजे त्यांची एकमेकावरील प्रीती (योहान 13:35) आणि जेव्हा शिष्य इतर शिष्यांच्या सहवासात राहतील तेव्हाच हे शय आहे म्हणून एकाकी शिष्य ही कल्पनाच शय नाही
योहान 12:24 मध्ये म्हटले आहे की जो गव्हाचा दाना जमिनीत पडून मरत नाही तो एकटाच राहील पण जो दाणा मरतो तो बहुत फळ देतो: असा शिष्य एकतर आपल्यासारखे आणखी शिष्य शोधून काढील व त्यांच्या सहवासात वाढेल किंवा स्वत: आपल्यासारखे आणखी शिष्य बनवून एका स्थानीय मंडळीची स्थापना करील जी येशूच्या मंडळीचे खरे स्वरूप दर्शवील आणि शिष्य अशाच स्थानीय मंडळीचा एक घटक असला पाहिजे तुम्ही जर एकटेच आहात तर त्याला एकच कारण हे आहे की तुम्ही जमिनीत पडून स्वत:ला मेला नाही
नवीन करारात मंडळी म्हणजे परमेश्वराचे घर, जे परमेश्वर स्वत: बांधत आहे असे चित्र मांडलेले आहे नीतिसुत्रे 24:3 मध्ये म्हटले आहे की सुत्त्ज्ञतेने घराची उभारणी होते
पवित्रशास्त्र वचनाचा नुसता अभ्यास करून शिष्य सुज्ञ बनत नाही अभ्यासामुळे त्याच्या ज्ञानात मात्र भर पडते पण बायबल सांगते की परमेश्वराचे भय हाच ज्ञानाचा आरंभ होय (नीतिसुत्रे 9:10) म्हणून परमेश्वराचे भय ख्रिस्ती जीवनाची जणू मुळाक्षरेच आहेत
याकोबाचे पत्र 3:17 आम्हाला सांगते की वरून येणारे ज्ञान हे प्रथमत: शुध्द असते म्हणून ख्रिस्ताच्या शरीराची म्हणजेच मंडळीची उभारणी करणाऱ्यांनी सुरूवातीलाच परमेश्वराचे भय म्हणजे काय हे शिकले पाहिजे आणि मग दुसऱ्यांस तेवढयाच आत्मविश्वासाने त्यांना ते सांगता आले पाहिजे या मी तुम्हास परमेश्वराच्या भयाविषयी शिकवितो (स्तोत्र 34:10)
आपण आपल्या पवित्रशास्त्र सिध्दांताच्या बिनचूकतेवर, शिकवणींवर, भावनात्मक अनुभवांवर, स्तुती व भती या विषयांवर, सुवार्ताप्रसार, अशा सारख्या अनेक विषयांवर भर देतो पण जर परमशेश्वराचे भय हा पायाच जर मांडण्यात आला नसेल तर जी इमारत तुम्ही शेवटी उभारणार आहात तीच मुळी एके दिवशी कोसळून जाणार आहे
ख्रिस्ती मंडळींची रचना कार्यक्रम, अर्थव्यवस्था, पैसा, मानवी धोरण किंवा या जगातील कोणत्याही व्यापारकौशल्यांमुळे होत नाही या जगीक सिध्दातानुसार उभारण्यात आलेले ख्रिस्ती कार्य, सेवा ही मानवी दृष्टीस कदाचित भपकेबाज दिसत असेल, पण जेव्हा परमेश्वर अग्नीद्वारे त्यांची पारख करील तेव्हा असे आढळून येईल की हे तर लाकूड, गवत व पेंढाच असे होते (1 करींथ 3:1115)
परमेश्वराच्या भावनेची सर्वप्रथम उठून दिसणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण होय (1 पेत्र 4:17) परमेश्वराच्या समक्षेत जीवन जगण्याच्या परिणाम म्हणजे आत्मपरीक्षण होय यशया, इयोब, योहान हे जेव्हा परमेश्वराच्या समक्षतेत आलेत, जेव्हा त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्याचा अनुभव घेतला तेव्हा त्यांना आपल्या विफल दशेची व पापांची जाणीव झाली व आपण काहीच नाही हे त्यांस कळून आले (यशया 6:5, इयोब 42:5,6, प्रकाशित वाय 1:17)
जेव्हा आदाम व हवेने परमेश्वराच्या पावित्र्याचे उल्लंघन केले, तेव्हा त्यांना एदेन बागेतून घालवून देण्यात आले आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी ज्वालारूपी तलवार व करूब परमेश्वराने नियुत केले हे जीवनाचे झाडअनंत जीवनाचे (ईश्वरीय स्वभावाचे) दर्शक आहे जे देण्यासाठी प्रभु येशू या जगात आला ज्वालारूपी तलवारवधस्तंभाचे दर्शक आहे ज्याद्वारे आम्ही हया ईश्वरीय जीवनात सहभागी होण्यापूर्वी आपल्या स्व ला मारून टाकतो हे सत्य आहे की ती तलवार प्रथम येशूवर पडली पण त्यावेळी आम्हीही त्याजबरोबर त्यांनी विकार व वासना हयांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे (गलती 5:24)
करूबांसारखे मंडळीचे जे वडील आहेत त्यांनी तलवार हाताळली पाहिजे आणि ईश्वरीय जीवनात सहभागी होण्याचा, शाश्वत जीवन प्राप्त करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देहस्वभावाचे मरण हा प्रचार त्यांनी केला पाहिजे परमेश्वराची सहभागिता प्राप्त करून घेण्याचा मार्ग हा तलवारीच्या धारेवरूनच जातो आज ही तलवार परजली जात नाही म्हणूनच कित्येक मंडळया या ऐहिक जगाशी तडजोड करणाऱ्या लोकांनी भरलेल्या आहेत व ख्रिस्ताच्या शरीराचे असे काहीच त्यांच्यातून प्रगट होत नाही
गणना 25:1 मध्ये आपण वाचतो की एकेवेळी इस्त्राएल लोक मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले एका इस्त्राएली पुरूषाने तर एका मवाबी स्त्रीस सरळ आपल्या तंबूत आणले (वचन 6) पण एका याजकाने त्या दिवशी इस्त्राएल राष्ट्रास नामशेष होण्यापासून वाचविले फिनहास हे त्याचे नांव परमेश्वराच्या प्रतिष्ठेविषयी तो इतका आवेशी झाला की लगेच त्याने आपल्या हातात बरची घेऊन सरळ त्या पुरूषाच्या तंबूत प्रवेश केला आणि तो पुरूष व ती स्त्री या उभयताच्या पोटात भोसकून त्यांस ठार केले (वचन 7,8) तेव्हा परमेश्वराने मरी थांबविली (वचन 9) पण तोपर्यंत 24000 इस्त्राएली लोक मृत्युमुखी पडले होते मरी इतया झपाटयाने पसरत होती की जर त्या एका करूबाने त्या दिवशी आपली तलवार चालविली नसती तर मरीने संपूर्ण इस्त्राएलची छावणी नष्ट झाली असती
प्रत्येक ख्रिस्ती मंउळीत अशी तलवार बाळगणाऱ्या करूबाची किती निकडीची गरज आहे हे आपणास यावरून समजून आले का ?
ख्रिस्ती क्षेत्रात आज झपाटयाने मरी पसरत आहे, कारण त्यांच्यात आज तलवार कशी चालवावी हे जाणणाऱ्या फिनहासांची कमतरता आहे मनुष्यांना खुष करणाऱ्या आणि मिद्यान्यांवर प्रेम करा असा आम्हास वारंवार गळ घालणाऱ्या वडिलांची व प्रचारकांची आज भरमार झाली आहे आपण मंडळीत तलवार का चालवू नये याचे समर्थन करणारे शेकडो वाद सैतान आज आम्हापुढे निर्माण करील त्या वादांच्या पुष्टीसाठी तो पवित्र शास्त्रातील वेगवेगळया वचनांचा पुरावाही आमच्यापुढे मांडील जेव्हा त्याने येशूची अरण्यात परीक्षा घेतली होती तेव्हा त्याने असाच परमेश्वराच्या वचनांचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला होता
फिनहासाला तलवार चालवून व्यतगत काय लाभ घडणार होता ? काहीच नाही ! उलट त्याला बरेच काही गमवावे लागले असेल तो दयाळू व सौम्य नाही हीच त्याची बदनामी झाली असेल आणि ज्या व्यतीला त्याने मारले होते त्याच्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून चुगल्या चहाडया, चर्चा यांचा त्याला सामना करावा लागला असेल त्यांचा रोष त्याला ओढवून घ्यावा लागला असावा पण परमेश्वराच्या पवित्र नामाच्या आवेशाने, त्याच्या गौरवाच्या आवेशामुळे प्रेरीत होऊन फिनहासाने ते कृत्य केले, आणि परमेश्वराने त्याच्या हया कृत्यावर आपल्या मंजुरीचे शिकामोर्तब करून म्हटले फिनहास हयाने माझ्या ईर्ष्येने ईर्ष्यायुत होऊनइस्त्राएल लोकांवरला माझा संताप दूर केला (गणना 25:11) परमेश्वर त्याहीपुढे जाऊन म्हणतो यास्तव मी त्याच्याशी माझा शांतीचा करार करतो, कारण तो परमेश्वरासाठी ईर्ष्यायुत झाला आणि पुढे तो असेही म्हणतो त्याच्याकरिता व त्याच्या मागून येणाऱ्या संततीकरिता हा निरंतरच्या याजकाचा करार होय (गणना 25:1213) यापूर्वीच्या अध्यायात आपण पाहतो की लेव्यांबरोबरही परमेश्वराने असाच करार केला होता, कारण त्यांनी संहारासाठी तलवार धारण केली होती (मलाखी 2:4,5)
आज मंडळयात मुळीच शांती नाही, कारण मानवी प्रकारांनी, प्रयोगांनी, अनेक जगीक मार्गांनी मंडळया शांती शोधण्याच्या प्रयत्नास लागल्या आहेत परमेश्वराची तलवार न चालवता ते शांती प्राप्त करू पाहतात त्याचे परिणाम म्हणजे भांडणे, तंटे, वादविवाद ख्रिस्ती कुटूंबात व मंडळीत ख्रिस्ताची शांती ही तेव्हा प्राप्त होईल जेव्हा आम्ही तलवारीने आपल्या देहस्वभावाला छाटून ठार करू
जर मंडळीचे पावित्र्य टिकवायचे असेल तर ज्यांना परमेश्वराने मंडळयात पुढारीपणाची जबाबदारी दिली आहे त्यांनी परमेश्वराच्या नावाच्या आदराखातर परमेश्वराच्या ईर्ष्येने पेटून गेले पाहिजे आम्ही खूप सौम्य व दयाळू आहोत अशी फाजिल ख्याती मिळविण्याचा आम्ही विचार करता कामा नये परमेश्वराचे नाम त्याचा आदर व गौरव हयाबद्दल आम्ही जास्त चिंतित असले पाहिजे
परमेश्वराच्या नामाच्या गौरवाप्रित्यर्थ याच ईर्ष्यायुत आवेशाने परिपूर्ण होऊन प्रभु येशूने मंदिरात क्रयविक्रय करणाऱ्यांना, कबूतर विकणाऱ्यांना, सराफानं कोरडयाने बदडून हाकलून लावले तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील (योहान 2:1317) असे शास्त्रवचन म्हणते अप्रसिध्दी व गैर समजूत ही वाटयाला आली तरी ख्रिस्तासारखे बनावयास कोण तयार आहे ?
होशेय 6:1 मध्ये आम्ही वाचतो की परमेश्वर आम्हास प्रथम फाडतो, व नंतर पट्टी बांधतो व बरे करतो हयाच समतोलाची आज प्रत्येक ख्रिस्ती मंडळीत गरज आहे चिरफाड करून कॅन्सर काढणे व नंतर बरे होण्याकरिता शिवून पट्टी करणे अशा प्रकारची सेवा एकमेकांबरोबर ऐयाने राहणारे दोन बंधु उत्तम प्रकारे करू शकतात एकाने फाडणे, तर दुसऱ्याने बांधणे किंवा एक व्यतीही हे दोन्ही काम चांगल्या प्रकारे करू शकते पवित्र आत्म्याने पौल व बर्णबा यांना जोडीने काम करण्यास पाचारण केले (प्रेकृ 13:2) आणि पौल बहुधा फाडण्याचे काम करी व बर्णबा बांधण्याचे
यशया संदेष्टयाने येशूविषयी हे भविष्य केले होते की त्याचे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे (यशया 49:2) व शिणलेल्यांस बोलून धीर व समाधान देणारे असे राहील (यशया 50:4) आणि आजही प्रभु येशू त्याच वाणीने मंडळयांशी बोलतो तीक्ष्ण तलवारीच्या धारेने व धीर समाधान देणाऱ्या सौम्य वाणीने
त्या काळात ज्यांनी प्रभु येशूची वचने ऐकली, त्यांनी एक तर पश्चाताप केला व ते येशूचे शिष्य झाले किंवा दुखावले जाऊन येशूला त्याला सोडून निघून गेलेत येशूने तिक्ष्ण, टोचणाऱ्या शब्दांनी पेत्राला शब्दताडण केले (मत्तय 16:23), पण पेत्राने फाजिल दुखावले जाऊन येशूला सोडले नाही (योहान 6:6) याउलट यहूदा इस्कार्योत हा क्षुल्लकशा बोलण्यामुळे अडखळून येशूपासून दूर झाला व पुढे त्याने येशूचा विश्वासघात केला (योहान 12:48, मत्तय 26:14) प्रभु येशूचे वचन आजही आमची परीक्षा घेऊन आम्हाला पारखते की आम्ही त्याद्वारे अडखळतो की अनुतप्त होऊन त्याला अनुसरतो ज्या मंडळयातून अशा प्रकारे समतोल शिकवण दिली जात नाही त्या मंडळया प्रभुच्या उद्देश्याच्या पूर्तीसाठी कार्य करू शकत नाही हे स्पष्ट आहे
ख्रिस्ताच्या शिष्याची पहिली खूण म्हणजे प्रीती ख्रिस्ताच्या शिष्यांत सहभागिता असणे हे आवश्यक आहे
अशा सहभागितेतून परमेश्वराचे जे सामर्थ्य उदयास येते त्याविषयी मत्तय 18:1820 मध्ये आपण वाचतो या उताऱ्याचे सुबोध भाषांतर केले तर ते असे होईल:
येशूने म्हटले, मी तुम्हास हेही सांगतो की जर तुम्हापैकी दोघे किंवा तिघे शिष्य एकाचित्ताने एका जागी येतील व त्यांच्यात फूट नसेल तर अनेक वाद्ययंत्रांच्या एकसुराने वाजविल्या जाणाऱ्या स्वरमिलापाप्रमाणे ("sumphoneo" (Greek) = agree) त्यांच्यात ऐय असेल तर मी त्यांच्यामध्ये उपस्थित राहीन आणि मग या पृथ्वीवर कोणतीही विशिष्ट मागणी ते करतील तरी माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करील त्यांना या पृथ्वीवरील कुठल्याही सैतानी कारवायांस बंदीस करायचा अधिकार व सामर्थ्य मी देईन आणि ज्या कारवाया ते या पृथ्वीवर बंद करतील त्या आकाशातील त्यांच्या उगमस्थानी जेथून हा दुरात्मासमूह कार्य करतो त्यांच्या त्या मुख्यालयात देखील (इफिस 6:12) बंद केल्या जातील आणि त्यांना मी हा अधिकारही देईन की या पृथ्वीवर दुष्टात्म्यांनी ग्रसित लोकांस ते मुत करतील
ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये असलेल्या ऐयाचे सामर्थ्य किती महान आहे याची सैतानाला जाणीव आहे पण दु:खाची गोष्ट ही आहे की ख्रिस्ताच्या शिष्यांना हयाची पुरेपुर कल्पना नाही आणि म्हणून शैतान या ऐयालाच तोडून अस्थैर्यता व विस्कळितपणा व असमर्थता आणण्याच्या मागास लागतो
ज्या घरात, कुटूंबात पती आणि पत्नीमध्ये असे आत्मिक ऐय असेल ते कुटूंब किती सामर्थ्ययुत राहील ! जिथे असे ऐय वास करेल त्या कुटूंबावर सैतान विजयी होऊ शकणार नाही !
ज्या मंडळयांतील दोन पुढाऱ्यांमध्ये असे आत्मिक ऐय असेल त्या मंडळया किती सामर्थ्ययुत असतील ! जिथे असे ऐय वास करेल त्या मंडळयांवर सैतान विजयी होऊ शकणार नाही !
आज सैतान अशाच कुटूंबावर व मंडळयात प्रभुत्व करतो ज्यामध्ये हे ऐय व सहभागिता यांचा अभाव आहे
मी येथे दुष्टात्मे काढण्याबद्दल बोलत नाही ज्याच्या अंत:करणात विश्वास आहे असा कोणीही विश्वासणारा, येशूच्या नामात एकटाही भुते काढू शकतो जसे येशूने मार्क 16:17 मध्ये म्हटले आहे आपण मत्तय 7:22, 23 मध्ये वाचतो की जे अविश्वासी आहेत ते लोकही दुष्टात्मे काढू शकतात
परंतु सैतानाने ज्या समस्या लोकांच्या जीवनात तयार केल्या आहेत त्यातून त्यांना मुत करण्यासाठी आम्हास सैतानाची कार्ये बांधावी लागतील व हे काम फार कठीण आहे विश्वासी हे काम एकटा करूच शकत नाही ख्रिस्ताचे शरीर जी त्याची मंडळी तिची अभिव्यती येथे प्रकट झाली पाहिजे ख्रिस्ती मंडळी बनण्यासाठी कमीत कमी दोनच व्यती पुरेशा आहेत ! अशा मंडळीद्वारे जे सामर्थ्य प्रगट होते त्याद्वारे अंधकाराच्या सामर्थ्यावर आपणास विजय प्राप्त होऊ शकतो
कमीत कमी अशा दोन व्यतींची मंडळीच्या केंद्रस्थानी गरज आहे जे एकमेकांशी एकचित्त असतीलसैतान नेहमी फुटीर प्रवृत्तींच्या लोकांच्या शोधात असतो जे स्वार्थापायी मंडळीत फूट पाडू इच्छितात, आणि यात सैतानाला यश मिळाले तर अशा परिस्थितीत मंडळी त्याच्याविरूध्द कार्य करण्यास सामर्थ्यहीन होते पण जर का मंडळीती हा गाभा खंबीर राहिला तर सैतान त्या मंडळीविरूध्द सामर्थ्यहीन ठरतो कुटूंबाच्या बाबतीतही हेच सत्य उपयोगात येते
प्रत्ये मंडळीत प्रौढ सभासद व नवविश्वास असतात जसे कुटूंबात बालके, तरूण , लेकरे व प्रौढ व्यती असतात तसेच लहान बालके भांडतात, चुगल्या चहाडया करतात, तक्रारी करतात कारण शांतीचा मार्ग त्यास अवगत नसतो अशी आध्यात्मिक बालकेही प्रत्येक वाढणाऱ्या ख्रिस्ती मंडळीत असतात पण यामुळे परमेश्वराच्या कार्यात अडखळण निर्माण होत नाही मंडळीच्या केंद्रस्थानी ऐय ठेवणारे पुढारी त्या मंडळीस विजय प्राप्त करून देऊ शकतात लेकरे व मुले यांचा भरणा प्रत्येक मंडळीत जास्त असेल, पण परमेश्वर अशा थोडया लोकांच्या शोधात आहे ज्यांच्या ऐयामुळे तो सामर्थ्याचा असा गाभा तयार करू इच्छितो, आत्मिक व सांख्यिक दोन्ही दृष्टिकोनातून मजबूत असेल आणि हाच गाभा सैतानाला लढा देऊन मंडळीचे जीवन रक्षू शकतो व तिला विजयाप्रत पुढे नेऊ शकतो
मंडळीतील सहभागिता ही सुवार्ता प्रसारापेक्षा अधिक महत्त्वाची आहे हरवलेल्या मेंढरांच्या दाखल्यात येशूने सांगितले आहे की, मेंढवाडयातील 99 मेंढरे म्हणजे ज्यांना पश्चातापाची गरज नाही असे नव्यानव धार्मिक लोक आहेत (लूक 15:7) ज्यांना पश्चातापाची गरज नाही ते कोण आहेत ? जे सतत आत्मपरीक्षण करून सतत स्वत:चा न्याय करतात तेच हे आहेत अशांना पश्चातापाची गरज नाही कारण ते वारंवार आपल्या पापांबद्दल पश्चाताप करत असतात, आणि अशा विश्वासणाऱ्यांना एकदुसऱ्यांशी एकजुट होऊन एकचित्त होण्यास काहीच समस्या येत नाही
पण जर ती मेढवाडयातील 99 मेंढरे आपसात वारंवार भांडत राहणारी, एकमेकांना मारून फाडून तुकडे तुकडे करून टाकणारी असती तर त्या मेंढपाळाने हरवलेल्या व सापडलेल्या मेंढरास कधीच मेंढवाडयात आणले नसते कारण येथे मेंढवाडयात मारले जाण्यापेक्षा रानातील पर्वतप्रदेशात त्याला अधिक संरक्षण लाभले असते
आमच्या मंडळयांत असे लोक असले पाहिजे ज्यांना पश्चातापाची गरज नाही तेव्हाच आमच्या मंडळया हरवलेल्या व सापडलेल्या, परत मेंढवाडयात आणलेल्या मेंढरांसाठी सुरक्षेचे, आरोग्यप्राप्तीचे आणि शांतीमय असे स्थान होईल परमेश्वर आपल्या मेंढरांस हिरव्या कुरणात व शांत पाण्याच्या झऱ्याजवळ नेतो जी मंडळी प्रभु उभारतो ती शांतीची जागा असते आणि अशाच मंडळीत हरवलेल्या मेंढरांना आणून ठेवले पाहिजे बहुतांश मंडळया अशा नाहीत कारण त्यातील सदस्यांनी केवळ धर्मांतर केले आहे ते समर्पित शिष्य बनलेले नाहीत
माझी भेट एका बुध्द धर्म स्वीकारलेल्या व्यतीशी झाली त्याने मला सांगितले की जेव्हा तो प्रथम एका ख्रिस्ती मंडळीत गेला तेव्हा तिथली भयंकर भांडणे पाहून तर त्याचा थरकापच उडाला व त्याच्या मनात विचार आला की यापेक्षा बुध्दधर्म काय वाईट आहे ? तो तर यापेक्षा कितीतरी पटीने चांगलाच आहे! पण नंतर जेव्हा त्याला एका खऱ्या मंडळीचा शोध लागला जेथे खरी प्रीती व सहभागिता होती, तेव्हा कुठे त्याला समाधान मिळाले
आणखी एक कुकर्म, पाप जे पुष्कळ मंडळयांत आम्हांस आढळते ते आहे पक्षपातीपणा (याकोब 2:1) श्रीमंतांना वेगळे मानाचे स्थान देण्याविषयीच्या पक्षपाताबद्दल याकोब या ठिकाणी लिहितो आणि असे जे करतात ते पाप करतात असेही तो लिहितो (याकोब 2:9) येथे भाषा व जातीभेद पाळणे याविषयीही म्हणता येईल
अनेक मंडळयात एक भाषा बोलणारे दुसरी भाषा बोलणाऱ्यांशी ऐयाने वागत नसतात तसेच एका सामाजिक गटातून आलेल्यांचे दुसऱ्या जातीजमातीतून आलेल्यांशी पटत नाही व ते आपआपले गट बनवून वेगवेगळी सहभागिता ठेवतात पण ते जर खरे येशूचे शिष्य असतील तर सुसंस्कृत व असुसंस्कृत या दोघांतही सहभागिता होण्यास काहीच अडचण येणार नाही
2 करींथ 5:16 आम्हांस सांगते की आम्ही आता नवीन करारात आहोत म्हणून आम्ही लोकांना देहावरून ओळखत नाही ते कोणत्या जातीतून आलेत, त्यांचा रंग कोणता या साऱ्या गोष्टी आम्ही पाहत नाही कारण प्रत्येक व्यती ही ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी आहे नवीन उत्पत्ती आहे (वचन 17) या नवीन सृष्टीमध्ये भाषाभेद, सामाजिक भिन्नता व जातपात असा काहीच भेद नाही आणि विश्वासणाऱ्यांना जर आम्ही अशा प्रकारच्या जीवनाकडे आणीत नाही तर ख्रिस्ताच्या मंडळीची उभारणी आम्ही कधीच यशस्वीरित्या आम्ही करू शकत नाही
येथे मी एक सावधगिरीचा इशारा देऊ इच्छितो ख्रिस्ताच्या शिष्याने आपण जातीभेद करीत नाही हे सिध्द करण्यासाठी दुसऱ्या कोणाही जातीच्या मुलीशी विवाहबध्द होऊ नये अनेकांनी अशा प्रकारे गैर जातीच्या व्यतीशी असंगत विवाह करून आपले वैवाहिक जीवन धोयात घातले आहे विवाहासाठी परस्पर एकमेकांच्या विचारांशी, भावनांशी जुळवणूक करून घ्यावयाची असते वैवाहिक जीवनातील मतभेदाची क्षेत्रे शयतो कमीत कमी असावीत येशूचे शिष्य होणे याचा अर्थ हा नाही, विवाह संबंधी विचार करताना आपण वय, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक दर्जा किंवा जात इ बाबींना बिलकुलच धाब्यावर बसवावे वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण अशा बाबतीत एक विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे
दुसऱ्या एका परिस्थितीचा आता येथे विचार करू या जर एक वडील (मंडळीतील पुढारी) या नात्याने तुम्ही पक्षपाताच्या पापाचे दोषी आहात जर तुम्हाला संदेश देतांना पवित्र आत्मा एखादी गोष्ट ठामपणे कठोर शब्दांत सांगण्याची प्रेरणा देतो आणि तुमच्या लक्षात येते की, तुमच्या कडक बोलण्याने संबंधित व्यतीला वाईट वाटेल, आणि त्या व्यतीस वाईट वाटू नये म्हणून तुम्ही ती पवित्र आत्म्याची प्रेरणा टाळता, पवित्र आत्म्याने जी गोष्ट तुम्हास बोलावयास लावली ती तुम्ही बोलत नाही परमेश्वराच्या तलवारीचा तुम्ही वापर करीत नाही, कारण तुम्हाला मनुष्याला प्रसन्न करणे जास्त रास्त वाटते हाच पक्षपात होय या पापामुळे तुमच्या सेवेत तुम्ही परमेश्वराने तुम्हास दिलेला अभिषेक गमावू शकता
आता आध्यात्मिक कृपादानांचा विचार करू या आध्यात्मिक वरदाने देखील ख्रिस्ताच्या मंडळीच्या रचनात्मक वाढीसाठी अत्यंत जरूरी आहेत
नवीन करारात आध्यात्मिक वरदानाच्या तीन यादया दिलेल्या आहेत (1 करिंथ 12:810, रोम 12:68 आणि इफिस 4:11)
1 करिंथ 12:1226 मध्ये या आध्यात्मिक कृपादानांचा उपयोग कसा करावा याबद्दल सांगताना त्यांची तुलना शरीराच्या वेगवेगळया अवयवांच्या कार्याशी केली आहे मनुष्याला जीवन असतानाही तो आंधळा, बहीरा, मुका आणि पक्षाघाताने निष्क्रिय झालेला असू शकतो पुष्कळ मंडळयांची अशीच गत आहे त्यांचे सभासद नवीन जन्म पावलेले आहेत पण त्यांच्याजवळ परमेश्वराची सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपादाने नाहीत व त्यामुळे ते सामर्थ्यहीन झालेले आढळतात
पवित्र आत्म्याच्या कृपादानांमुळे ख्रिस्ताचे शरीर, जी त्याची मंडळी ती पाहू, ऐकू, बोलू आणि चालू शकते सुभती हे मंडळीचे जीवन होय पण ख्रिस्ताची मंडळी इतरांकरिता पवित्र आत्म्याच्या कृपादानांशिवाय काय करू शकते? जर स्वत: प्रभु येशूजवळ पवित्र आत्म्याची कृपादाने नसती तर तो काय करू शकला असता ? तो पापावर विजयी झाला असता तो पवित्र जीवन जगला असता पण पवित्र आत्म्याच्या अभिषेकावाचून तो परमेश्वराच्या राज्याची तेवढया सामर्थ्याने घोषणा करू शकला नसता जसे त्याने आपल्या जीवनात केले त्याला रोग्यांना बरे करता आले नसते, भुते काढता आली नसती किंवा इतर अद्भुत कृत्येही तो करू शकला नसता
वयाच्या 30 वर्षी जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक येशूला प्राप्त झाला त्यानंतर तो पूर्वीपेक्षा अधिक पवित्र झाला असे नाही 31 व्या वर्षी वयाच्या 29 व्या वर्षापेक्षा तो अधिक पवित्र झाला असे नाही पण पवित्र आत्म्याच्या अभिषेकानंतर त्याला इतरांच्या सेवेसाठी सामर्थ्य प्राप्त झाले परंतु जर येशू लोकांना फत आपले पवित्र जीवन दाखवीत फिरला असता तर पित्याची योजना तो पूर्ण करू शकला नसता आजची मंडळी देखील नुसत्या पवित्र जीवनाच्या प्रदर्शनाने परमेश्वराची संपूर्ण योजना पूर्ण करू शकत नाही येशूजवळ दोन्ही होते, पवित्र जीवन व पवित्र आत्म्याची दाने आणि आज त्याच्या मंडळीलाही हया दोन्ही गोष्टींची अत्यंत गरज आहे
आज ख्रिस्ती जगाची शोकांतिका ही आहे की काही गट पवित्रीकरणावर अधिक जोर देतात, तर काही पवित्र आत्म्याच्या वरदानांवर पण येथे हे किंवा ते अशी गोष्ट नाही पवित्र शास्त्र बायबल म्हणते तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत (प्रत्येक क्षणी पवित्र जीवन जगणे) आणि तुझ्या डोयाला तेलाची वाण नसो (अभिषेकाखाली निरंतर राहणे) (उपदेशक10:8) दोन्ही गोष्टीची आम्हांस गरज आहे
पवित्र आत्म्याची कृपादाने आम्हांस अधिक आत्मिक बनवीत नाहीत करींथ येथील ख्रिस्ती लोकांजवळ ही सर्व कृपादाने होती (1 करींथ 1:7) ते आपल्या सभांमध्ये ज्ञानाची उती हे कृपादान वापरीत असत आणि तरी देखील त्यांच्यात एकही शहाणा (आत्मिक व्यती) नव्हता (1 करींथ 6:5) ज्ञानाची उती दैहीक मानसाकडूनही येऊ शकते पण ज्ञान हे फत आध्यात्मिक व्यतीमध्ये आढळून येते एखाद्याला ज्ञानाचे बोल लगेच प्राप्त होतात पण ज्ञान हे परमेश्वराकडून प्राप्त होऊ शकते ज्ञान हे स्वत: अनेक वर्ष स्वत:चा वधस्तंभ वाहित राहिल्यानंतर प्राप्त हाेे
आपण स्वत: कृपादानांची निवड स्वत:साठी करू शकत नाही कारण हे परमेश्वरच ठरवितो की त्याच्या मंडळीतील सेवाकार्यासाठी कोणते कृपादान आपल्यासाठी उत्तम व योग्य असे ठरेल पण वचन आम्हास सांगते की आम्ही मंडळीची आध्यात्मिक वाढ घडवून आणणाऱ्या कृपादानांविषयी उत्सुक असावे त्यांच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा बाळगली पाहिजे विशेष करून संदेश देण्याचे वरदान प्राप्त करून घेण्यासाठी (1 करींथ 17:1,12)
प्रभु येशूने लूक 11:13 मध्ये जेव्हा आपल्या शिष्यांस स्वर्गीय पित्यापासून पवित्र आत्मा मागण्याबद्दल शिकविले तेव्हा त्याने एका व्यतीचा दाखला देऊन पित्याला पवित्र आत्मा कसा मागावा हे दर्शविले हा व्यती मध्यरात्री शेजारी मित्राकडे जातो व त्याला आपल्या घरी आलेल्या मित्रासाठी भाकरी मागतो या दाखल्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहतो
या दाखल्यावरून आम्हाला काय शिकावयास मिळते ?
पहिली गोष्ट ही की आम्ही पवित्र आत्म्याच्या कृपादानाची स्वत:च्या फायदयासाठी नव्हे तर इतरांच्या फायदयासाठी प्रबळ इच्छा बाळगली पाहिजे ज्यांनी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा व कृपादाने यांची प्रबळ इच्छा बाळगली त्यांनी जर हे एकच तत्त्व आपणापुढे ठेवून आपली मागणी केली असती तर आज ते जे आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक आत्मिक झाले असते व ख्रिस्ती क्षेत्रात जे आज बनावटी कृपादानांच्या कवायतीचे थारूळ माजले आहे ते कितीतरी कमी झाले असतेदु:खाची गोष्ट ही आहे की, बहुतांश लोकांना ही चुकीची शिकवण दिली गेलेली आहे की त्यांनी पवित्र आत्म्याच्या कृपादानाची मागणी स्वत:च्या आध्यात्मिक अनुभववृध्दीसाठी करावी इतरांना आपल्याद्वारे आशीर्वादित करता यावे म्हणून नव्हे
आपल्या अवती भवती असे अनेक गरजवंत लोक आहेत ज्यांच्या त्या गरजा प्रभु भागवू इच्छितो आणि त्या गरजा तो आपल्याद्वारे भागवू इच्छितो आणि यासाठीच तो त्यांना आपल्याकडे आपल्या संपर्कात आणतो त्याची अशी इच्छा आहे की आपण त्याला पवित्र आत्म्याची कृपादाने मागावी ज्यामुळे त्यांची गरज भागेल व ते आशीर्वाद पावतील
एकदा एक व्यती येशूच्या शिष्यांकडे आपल्या मुलाला घेऊन आला कारण तो दुष्टात्म्याने पछाडलेला होता येशूच्या शिष्यांना त्याला काहीच मदत करत आली नाही कारण तो दुष्टात्मा त्यांच्याने निघत नव्हता तो येशूला म्हणाला, मी त्याला आपल्या शिष्यांकडे मदतीसाठी आणले पण आपले शिष्य माझी मदत करू शकले नाहीत आपले शेजारी देखील आपणाबद्दल आज प्रभुला हेच सांगत आहेत काय ?
जर आम्ही केवळ स्वत:साठीच प्रभुचे आशीर्वाद मिळवू इच्छितो तर आम्ही शुष्कच राहू प्रभु त्यांनाच पाणी पाजतो जे इतरांना पाणी पाजतात (नीतिसुत्रे 11:25) कदाचित आपल्या जवळील एखादा बंधू त्याच्या समस्येचे समाधान व्हावे म्हणून आपणाकडून ज्ञानाच्या वचनांची अपेक्षा करतो दुसऱ्या एखाद्याला आपल्या उदासीन, खिन्न परिस्थितीतून वर येण्यास उत्तेजनात्मक वचनांची गरज असेल आणखी एखाद्याला एखाद्या बंधनातून बंधमुत होण्याची गरज असेल आम्ही याकरिता प्रभुजवळ प्रार्थना केली पाहिजे तो हया सर्व गरजा भागविण्यासाठी आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्यांची कृपादाने देतो
पवित्र आत्म्याचे प्रत्येक कृपादान यासाठी दिल्या जाते की आपण इतरांना त्याच्याद्वारे आशीर्वाद प्राप्त करून द्यावा व त्यांची आध्यात्मिक उन्नती करावी लूक 4:18, 19 या वचनात येशूला प्राप्त झालेल्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचे परिणाम आम्हास दाखविण्यात आले आहेत त्याद्वारे त्याला दीनास सुवार्ता सांगण्याचे, बंदिवानास सुटका देण्याचे, आंधळयांना दृष्टी देण्याचे, ठेचलेल्यांस पायदळी तुडविलेल्यास त्यांचा जुलूम करणाऱ्यांपासून सुटका देण्याचे आणि परमेश्वराच्या प्रसाद वर्षाची घोषणा करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले वरील सर्व गोष्टी इतरांसाठी आहेत हे लक्षात घ्या पवित्र आत्म्याच्या कृपादानांद्वारे प्रभुला व्यतगत जीवनात काहीच लाभ झाला नाही
दुसरी गोष्ट जी आपल्याला लूक 11 मधील दाखल्यात शिकायला मिळते ती ही, की आम्ही एकसारखी वारंवार मागणी परमेश्वराला करीत राहिले पाहिजे आम्ही त्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास किती उत्सुक आहोत व त्याच्या सामर्थ्यास आम्ही किती मोल देतो हे परमेश्वर पारखू इच्छितो आम्ही स्वत:ला या दानांच्या अभावी किती असहाय व असमर्थ लेखितो हे तो पाहतो आमच्यातील कित्येक लवकरच प्रार्थना करणे सोडून देतात कारण त्यांना आपल्या सामर्थ्यांवर अधिक भरोसा वाटू लागतो आणि म्हणून आम्ही या परीक्षांमध्ये अयशस्वी होतो
1 करींथ 12 मध्ये पवित्र आत्म्याच्या ज्या कृपादानांची यादी आहे त्यापैकी उतीची कृपादानेच स्थानीय मंडळीतील सभांत जास्तीत जास्त उपयोगात येत असलेली आपण पाहतो जसे शिक्षण, भविष्य संदेश, भाषा आणि भाषांतर इत्यादी (1 करींथ 14: 26 पुढे ) या ठिकाणी आश्चर्यकर्माच्या कृपादानांचा मंडळीच्या सभांत उपयोग होत असल्याचा उल्लेख नाही आजही परमेश्वराच्या वचनाच्या पुष्टीसाठी निरोगी करण्याचे, दुष्टात्मे काढण्याचे कृपादान यांस सुवार्ता प्रसाराच्या सेवेत स्थान आहे (मार्क 16:15-18) आणि ज्यांना सुवार्तिक होण्यासाठी पाचारण झाले आहे (विशेषत: अशा भागांसाठी जिथे सुवार्ता सांगितली गेली नाही) त्यांनी या सामर्थ्याची प्रभुकडून अपेक्षा करावी प्रभु त्यांना ती कृपादाने देईल पण प्रत्येक स्थानीय मंडळीत या चमत्कारांच्या दानांची प्रात्यक्षिके झालीच पाहिजे हे जरूरी नाही
मंडळयांच्या सभात ज्या मुख्य कृपादानाचा उपयोग होतो ते म्हणजे, संदेश देण्याचे दान जुन्या करारात संदेश हा भविष्य संकल्प निवेदन करण्यासाठी असायचा पण नवीन करारात संदेश म्हणजे, मंडळीच्या उन्नतीसाठी म्हणजे उन्नती, बोध व सांत्वन यासाठी म्हणजेच आव्हानात्मक, उत्तेजनार्थ व उन्नतीप्रद असा असावा (1 करींथ 14:3) आणि प्रत्येक मंडळीत अनेक बंधू असे असावेत जे या कृपादानांचा उपयोग करतील स्थानीय मंडळीत, प्रेषित, शिक्षक, सुवार्तिक यांची विशेष गरज नाही (हया दानप्राप्त सेवा फिरतीच्या सेवा असू शकतात), पण स्थानीय मंडळयांत संदेष्ट आणि मेंढपाळ हे मंडळीची सिध्दतेकडे वाढ व्हावी म्हणून आवश्यक आहेत
जुन्या काळातील संदेष्टे, परमेश्वराच्या भारी वचनाबद्दल बोलत हे ओझे ते सतत आपल्या ह्दयाशी बाळगीत त्याबद्दल ते नेहमी बोलत अहरोनाच्या उरपटावर बारा रत्नखडे जडलेले होते इस्त्राएलाच्या बारा वंशाचे दर्शक म्हणून तो ते नित्य बाळगीत फिरे जे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करतात त्यांनी परमेश्वराच्या लोकांना नेहमी ह्दयाशी बाळगून राहावे अगदी जशी आई आपल्या बाळाला आपल्या ह्दयाशी घेऊन असते तसे (फिलिप्पै 1:6)
संदेशाचे दान असणाऱ्यांनी मंडळीच्या सभांमध्ये प्रथम संदेश द्यावा आणि त्यावेळी मंडळीचया विशिष्ट गरजांसाठी आवश्यक असलेला संदेश त्याने मंडळीपुढे मांडावा त्यांनी परमेश्वराचे प्रतिनिधी, परमेश्वराचे प्रवते या नात्याने संदेश द्यावा (1 पेत्र 4:11) धार्मि प्रवचन व ईश्वरी संदेश या दोहोंत बराच फरक आहे प्रवचन माणसाच्या डोयातून, बुध्दीचातुर्य व क्षमतेच्या श्रमांतून येते व ऐकणाऱ्यांवर त्याचा प्रभाव पडतो पण परमेश्वराचा संदेश हा संदेशवाहकाच्या ह्दयातून येतो हा संदेश श्रोत्यांंवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने नव्हे, तर ऐकणाऱ्यांच्या मनातील गुप्त गोष्टी उघडकीस आणून त्यांना प्रतिसादात्मक कृती करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने दिला जातो
अशा प्रकारचा प्रतिसाद देणारे स्वत:ची सुधारणूक करतील, पण जे या वचनांमुळे चिडीस येतील त्यांना संदेशवाहकाचा राग येईल संदेष्टे कधीच प्रसिध्द नव्हते, पण ते लोकांच्या द्वेशाचेच, टीकेचेच लक्षकेंद्र असत आणि लोक त्यांना कधीच समजून घेत नसत आणि त्यांचा छळ करीत जेव्हा येशूने नासरेथ येथील सभास्थानात संदेश दिला, तेव्हा लोकांनी त्याला मध्येच थांबवून ओढत नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला (लूक 4:2830)
इब्री 3:13 मध्ये बायबल आम्हास सांगते की आपण प्रति दिवशी एकमेकांस बोध करावा नाही तर पापाच्या फसवणुकीमुळे आपले अंत:करण कठीण होऊन जाईल मंडळीतील एकंदर सर्व संदेशाचा उद्देश हाच असावा की लोक त्यांच्या पापाच्या फसवणुकीपासून बचावले जावेत संदेश अंत:करणातील गुप्त गोष्टी उघड करतो व ते ऐकणारे पश्चाताप करून आत्मपरीक्षण करतात आणि परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन पश्चाताप करतात (1 करिन्थ 14:25)
जर आम्ही आत्मपरीक्षण करीत भीत व कापत आपले तारण साधून घेतले (फिलिपै 2:12) तर परमेश्वर आम्हाला प्रकाशित करील व आमच्या पापांच्या फसवणुकीपासून आम्हाला वाचवील नंतर आम्ही तेच वचन (ज्यांच्याद्वारे परमेश्वराने आमच्या पापांची आम्हास जाणीव करून दिली) इतरांना सांगू शकतो व त्यांचे तारण घडवून आणू शकतो ज्या वचनाने आम्हास प्रथम आपल्या पापांची जाणीव झाली तेच वचन आपण इतरांना सांगितले पाहिजे
मी येथे एक विशेष सावधगिरीचा इशारा देऊ इच्छितो 1 करींथ 1429 मध्ये संदेश ऐकणाऱ्यांना ही आज्ञा दिली आहे की ऐकणाऱ्यांनी आपण काय ऐकतो यावर निर्णय करावा, त्यांनी प्रथम हे पडताळून पहावे की जे त्यांनी ऐकले ते परमेश्वराच्या वचनांप्रमाणेच आहे काय आणि दुसरे म्हणजे ते वचन परमेश्वरापासून त्यांच्या स्वत:करिता होते का हे जाणावे हे यासाठी की प्रत्येक संदेश, प्रत्येक संकल्प निवेदन, प्रत्येक भाषेचे भाषांतर यामध्ये त्या व्यतीचे स्वत:चे विचारही झळकत असतात म्हणूनच प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक पारख करून चांगले ते बळकट धरण्याचा बोध आम्हास दिलेला आहे ( 1 थेस्सलनी 5:21)
जर आपण एकेत असलेल्या संदेशाच्या काही भागाची पुष्टी आमच्या अंत:करणात दिल्या गेलेल्या परमेश्वराच्या अभिषेकाने होत नसेल तर आपण तो संदेश नाकारावा हाच एकमेव मार्ग आम्हास फसविले जाण्यापासून वाचवू शकतो (1 योहान 2:27) पुष्कळ विश्वासणाऱ्यांनी ऐकलेला प्रत्येक संदेश परमेश्वरापासूनच आहे हे डोळे झाकून समजण्याची चूक केली व त्यानुसार वागले त्यामुळे त्यांनी बऱ्याच ठोकरा खाल्ल्या आहेत व स्वत:ची बरीच हानी करून बसले आहेत
आणखी एक इशारा मी आपणांस देऊ इच्छितो तो हा की आपल्या आवडत्या प्रचारकांची नकल करण्याचा प्रयत्न करू नका जर ही नकल नकळत घडत असेल तर बाब एवढी गंभीर नाही पण जर का तुम्ही हे बुध्दीपुरस्सर करता तर त्यात तुमचेच नुकसान आहे, कारण असले अनुसरण केल्याने तुम्ही परमेश्वराने तुम्हाला दिलेली अनुपम सेवाशैली गमावून बसता परिणामी परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या सेवेतही अडथळा आणता
जरी संपूर्ण नवीन करार पवित्र आत्म्याने प्रेरित असला तरी आपण पाहतो की पौल, पेत्र, योहान यांनी सत्यच विदित केले पण प्रत्येकाची भाषाशैली ही निराळी आहे प्रत्येकाने जे शब्द त्यांना प्रेरीत झाले ते आपल्या स्वाभाविक भाषेत लिहिले पौलाने कधीच, नव्याने जन्मणे याबद्दल लिहिले नाही, पण तो, ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळले जाणे हयाबद्दल बरेच काही लिहितो तसेच, जुन्या मनुष्यत्वाचा त्याग करणे हयाबद्दलही जेव्हा पेत्राने आपल्या पत्रात लिहिले तेव्हा तो पौलाची भाषाशैली वापरू शकला असता, पण त्याने तसे केले नाही त्याने स्वाभाविकरित्या त्याला प्राप्त झालेला देहात दु:ख भोगणे या विषयावरील संदेश लिहिला योहानाची आपली वेगळीच अनुपम भाषाशैली आपणांस दिसते जेव्हा तो लिहितो तेव्हा तो पोल व पेत्र यांच्या शैलीची नकल मारत नाही, तर परमेश्वरापासून जन्मलेले हा आपल्या आवडीचा वायप्रयोग आपल्या लिखाणात वापरतो
हयावरून हे स्पष्ट दिसते की परमेश्वराची इच्छा नाही की आम्ही हुबेहुब इतरांसारखी वाये, त्यांची शैली वापरावी त्याच्या वचनाची सेवा करवून घेतांना परमेश्वर आमचे व्यतमत्व आमच्यापासून हिरावून घेत नाही एखादा सचिवासारखे आपल्या अधिकाऱ्यांच्या हुकुमाचे पालन करणारे तो आपणास लेखत नाही, तर आपले व्यतमत्व, विशेष गुण यांची तो जोपासना करतो जेव्हा तो आपणांस पवित्र आत्म्याचा अभिषेक करून भरतो त्यावेळी सुध्दा तो असेच करतो
आपण प्रकटीकरण 21:19, 20 मध्ये एका शोभिवंत इमारतीचे असे चित्र पाहतो जो वेगवेगळया रंगाच्या रत्नांनी जडलेली दितसे व या रत्नांमधून जे प्रकाशझोत बाहेर पडतात त्या प्रकाशाचा स्त्रोत एकच येशूचे जीवनच तो प्रकाश आहे, जो या रत्नांतून प्रकाशित होतो पण या रत्नांतून येणारा तो प्रकाश भिन्न भिन्न रंगाचा, त्या रत्नांच्या गुणधर्मानुसार प्रकाश परिवर्तित करणारा असतो लाल, निळा, हिरवा इ आम्हा प्रत्येकास येशूचे जीवन प्रकाशित करण्यासाठी पाचारण झालेले आहे पण आमच्या प्रत्येकाच्या विशेष, अद्वितीय व्यतमत्वातून हे प्रगट करावयाचे आहे
जर तुम्ही माझे अनुकरण कराल, नकल करायचा प्रयत्न कराल, मी कसा बोलतो, लिहितो इत्यांदीचे अनुकरण कराल तर तुम्ही शेवटी हताश व्हाल आपण प्रत्येकाने आपल्या स्वत:च्या जीवनशैलीतून, व्यतमत्वाद्वारे ख्रिस्ताचा प्रचार करावा परमेश्वराने आपल्या प्रत्येकास दिलेल्या अनुपम व्यतमत्त्वाद्वारे हे करावे आणि तुम्ही मग खचितच ख्रिस्ताच्या मंडळीसाठी आशीर्वादाचे कारण ठराल परमेश्वराला त्याच्या मंडळीत एकच झॅक पूनन हवा, दुसरा नको तुम्हीही तुमच्यासारखे एकच एक त्याला मंडळीत हवे
मंडळीत ज्यांना संदेशासाठी प्रभुकडून वचन आहे ते आपण सर्वच मंडळीतील वडिलांच्या अधिकारात राहून संदेश देऊ शकतो यांत पुरूष व स्त्री दोघीही आहेत कारण परमेश्वर स्पष्ट सांगतो की संदेश देणारा आत्मा तो स्त्री व पुरूष दोघांवरही ओतणार (प्रे कृ 2:17) जर स्त्री वचनाप्रमाणे आपले डोके आच्छादिते तर ती मंडळीत संदेशही देऊ शकते, प्रार्थनाही करू शकते (1 करींथ 11:5)
अनेक जण मंडळीत संदेश देण्यास कचरतात ते त्यांच्या आध्यात्मिक आळशीपणामुळे किंवा लज्जात्मक भित्रेपणामुळे तीमथ्य असाच लाजाळू व भित्रा तरूण होता पौलाला त्याला आवर्जून सांगावे लागले की त्याने परमेश्वराने दिलेल्या कृपादानाला प्रदीप्त करावे त्यांची उपेक्षा त्याने करता कामा नये (1 तिमथी 4:14, 2 तिमथी 1:6,7) जेव्हा आम्ही मंडळीत सभांना येतो तेव्हा आम्ही या भित्रेपणाच्या आणि अविश्वासाच्या आत्म्यांना बांधले पाहिजे
तथापी, हया वरील प्रकारच्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग काही ऐहीक मनुष्ये करतात, ज्यांना स्वत:चे उपदेश स्वत:च ऐकणे आवडते व जी अशा सभांना वारंवार उभी राहून इतरांना कंटाळा आणतात अशा रितीने ते गैरफायदा घेऊ शकतात अशा व्यतींना मंडळीच्या वडिलांनी गप्प बसविले पाहिजे कारण मंडळीत प्रत्येक गोष्ट साजेल अशी व्यवस्थितपणे व्हायला हवी (1 करींथ 14:40) ही दु:खाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुतेक मंडळयांतील वडील एकतर भित्रे आहेत, किंवा त्यांना मनुष्यांकडून सौम्य व सहनशील बंधू म्हणून शिकामोर्तब हवा असतो म्हणून ही अशा ऐहीक व दैहिक वत्यांना जी लांब भाषणे देत असतात, गप्प करण्यास ते असमर्थ असतात
म्हणून गंभीरपणे हे लक्षात घेऊ या की स्तूती व आराधना ही महत्त्वाची असली तरी मंडळयांतील सभांचा मुख्य भाग हा नव्हे हे जरूरी आहे, पण महत्त्वाचे नाही महत्त्वाचा भाग म्हणजे परमेश्वराचा संकल्प निवेदन करणारा संदेश
आता परमेश्वराच्या मंडळीतील आत्मिक पुढारीपणाबद्दल पाहू या
परमेश्वराने प्रत्येक मंडळीत यासाठी वडील नेमले आहेत की त्यांनी मंडळीला परमेश्वराच्या मार्गात मार्गदर्शन करावे (1 करींथ 14:33 तिताला पत्र 1:5) वडील हा प्रचारक नसून सर्वप्रथम तो पुढारी आहे पुढारी जो इतरांच पुढे चालतो, त्याची नेहमीच पुढे वाटचाल चालू असते व तो म्हणतो, जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करा
पण काही म्हणतात, माझ्याकडे नव्हे तर येशूकडे पहा व त्याचे अनुकरण करा हे जरा नम्रपणाचे वाटते पण हे असे पूर्वीच्या प्रेषितांनी म्हटल्याचे आमच्या ऐकिवात नाही ते विश्वासणाऱ्यांना त्यांचे अनुकरण करण्यास सांगत जसे ते ख्रिस्ताचे अनुकरण करीत असत (1 करींथ 11:9 फिलिप्पै 3:17) तसे इतरांनी त्यांचे अनुकरण करावे ते हे हयासाठी म्हणून नसत की ते परिपूर्ण होते, परंतु ते योग्य दिशेने पुढे वाटचाल करीत होते
वडील ही एक तुलनात्मक बाब होय मी उदहारणाने ती स्पष्ट करू इच्छितो जेव्हा आईवड