चांगला पाया

लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मूलभूत सत्य
  Download Formats:

धडा 0
परिचय

शुभवर्तमान ही सुवार्ता आहे की मनुष्य आता देवाने योजिल्याप्रमाणे आपले जीवन जगू शकतो. जेा ख्रिस्ताने केलेल्या दाव्यांना पूर्णपणे समर्पित असतो तो निरंतर विजयोत्सवाचे जीवन जगू शकतो. तरी देखील ज्या पुष्कळांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारले आहे, ते शुभवर्तमान देत असलेल्या गौरवी जीवनात प्रवेश करतीलच असे नाही.

का नाही? बहुतेक वेळा कारण हे असते की त्यांनी त्यांच्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरूवातीलाच चांगला पाया घातलेला नसतो.

नवीन जन्मानंतरच्या आपल्या जीवनाची तुलना आपण बांधत असलेल्या घराशी करू शकतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की घराचा सर्वात महत्त्वाचा भाग हा त्याचा पाया असतो.

जर तिसर्याा माळयावर भेग पडली आहे तर त्यामागील कारण पायातील त्रुटी मानले जाते.

आपल्या जीवनासंबंधी देखील असेच आहे. ख्रिस्तावर वर्षानुवर्षे आपण भरवसा ठेवल्यानंतर देखील सुरूवातीला घातलेल्या चुकीच्या पायामुळे पुढे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

नवीन करार आपल्याला पापांवर विजय मिळवून विजयोत्सवाच्या जीवनाचे अभिवचन देतो.

रोम 6:14 मध्ये देवाचे अभिवचन बघा, ‘तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहा म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही.‘

आपल्याला अशी देखील आज्ञा दिली आहे की आपण निरंतर आनंदाचे जीवन जगावे व पूर्णपेण चिंतेपासून मुक्त जीवन जगावे. पहा फिलिप्पै 4:4,6, ‘प्रभुमध्ये सर्वदा आनंद करा... कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका.‘

हे लक्षात ठेवा की ज्या गोष्टींमध्ये देव आपल्याला सहाय्य पुरवितो त्याच गोष्टी तो आपल्याला करण्याची आज्ञा देतो.

तर त्याच्या आज्ञा एक प्रकारे अभिवच आहे. ज्या पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला कृपा देतो! म्हणून वरील आज्ञा हया देवाचे अभिवचन आहे की देव आपल्याला पूर्णपणे चिंतारहीत जीवन व निरंतर आनंदाचे जीवन जगण्यास सहाय्य करतो.

नवीन करारामध्ये अशा प्रकारचे पुष्कळ अद्भुत अभिवचने आहेत. परंतु आपण ज्या अभिवचनांकडे बघत आहोत ते अभिवचन आपल्याला हे दाखविते की खरोखर शुभवर्तमान ही सुवार्ता आहे.

दुःखद सत्य हे आहे की बहुतेक ख्रिस्ती लोक जे असा दावा करतात की त्यांनी शुभवर्तमानाचा स्वीकार केला आहे ते वरील वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले जीवन जगत नाहीत.

हया पुस्तकाचा हा उद्देश आहे की तुमच्या जीवनात तुम्हाला योग्य पाया घालता यावा जेणेकरून तुमच्या जीवनासाठी देवाचा जो पूर्ण उद्ेश आहे तो पूर्ण व्हावा. तर पुढे वाचा व पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणाशी बोलो.

तुमच्या जीवनामध्ये कदाचित ही अध्यायाची नवीन सुरूवात असू शकते..

धडा 1
पश्चाताप

येशूने म्हटले त्याच्या मेंढवाडयात (त्याच्या राज्यात) जाण्याचा योग्य मार्ग द्वार आहे. त्याने म्हटले की काही लोक भिंतीवरून चढून जाण्याचा प्रयत्न करतील (योहान 10:1).

तारण प्राप्त होण्यासाठी देवाने तयार केलेला मार्ग हा पश्चाताप व प्रभु येशू ख्रिस्तावरील विश्वास आहे. हाच एकमेव मार्ग आहे. दुसर्याप मार्गाने चढून जाण्याचा प्रयत्न करणार्या/ मनुष्याचा देव स्वीकार करीत नाही.

बाप्तिस्मा करणारा योहान जो प्रभूचा मार्ग तयार करण्याकरीता आला होता त्याने पश्चातापाचा संदेश दिला. इस्त्राएल राष्ट्नाने येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारावे हयाकरिता तयारीचा हा एकमेव मार्ग होता. आपल्याला सुध्दा दुसरा मार्ग नाही.

पश्चाताप व विश्वास

पूर्वीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये जी गहनता किंवा जे समर्पण किंवा जे सामर्थ्य होते ते आजच्या बहुतेक विश्वासणार्यांरमध्ये दिसत नाही.

हयामागील कारण काय असेल असे तुम्हाला वाटते?

प्रमुख कारण हे की त्यांनी नीट पश्चाताप केलेला नाही. त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला हे बरे केले परंतु त्यांनी प्रथम प्रश्चाताप न करता विश्वास ठेवला. आणि यामुळे त्यांचे परिवर्तन पोकळ आहे.

या प्रसिध्द गितांच्या ओळींकडे लक्ष द्या.

‘सर्वात वाईट अपराधी जर खरोखर विश्वास ठेवतो

तर त्या क्षणाला येशूकडून त्याला क्षमा मिळते.

हे खरोखर खरे आहे का — हे खरे आहे का की सर्वात वाईट अपराधी जर खर्याच रीतीने येशूवर विश्वास ठेवतो तर त्याला क्षमा मिळते. ‘

प्रथम त्याला प्रश्चाताप करण्याची गरज नाही का?

तुम्ही म्हणाल की खर्या् विश्वासामध्ये पश्चाताप देखील असतो. परंतु जर असे त्या अपराध्यास सांगितले नाही तर तो विचार करेल की त्याने येशूवर विश्वास ठेवल्यामुळे त्याचा नवीन जन्म झाला आहे आणि अशा प्रकारे त्याची फसवणूक होईल.

येशूने स्वतः सांगितले,पश्चाताप कराव सुवार्तेवर विश्वास ठेवा (मार्क 1:15).

त्याने त्याच्या शिष्यांना हाच संदेश गाजविण्यास सांगितले (लूक 24.47) आणि त्यांनी तसेच केले (प्रेषित 20:21).

हयाविषयी देवाचे वचन अगदी स्पष्ट आहे. जर तुम्हाला योग्य प्रकारे व खर्या् रीतीने परिवर्तन हवे आहे तर पश्चाताप व विश्वास यांस विभक्त करता येणार नाही. देवाने हयांना एकत्रित जोडले आहे. जे देवाने जोडले ते मनुष्याने तोडू नये.

पश्चाताप व विश्वास हे ख्रिस्ती जीवनाच्या पायाचे प्रथम दोन घटक आहेत (इब्री 6:1). जर तुम्ही नीट पश्चाताप केला नाही तर तुमच्या पायव्यात त्रुटी राहील. आणि मग, अर्थात, तुमचे संपूर्ण ख्रिस्ती जीवन डळमळीत होईल.

बायबल सांगते, परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ (अ, ब, क...) होय (नीतिसूत्रे 9:10), आणि जर आपण खरोबर परमेश्वराचे भय बाळगले तर आपण दुष्कर्मापासून दूर राहू (नीतिसूत्र 3:7).

तर ज्यांनी पश्चाताप केला नाही व पापापासून फिरले नाही ते ख्रिस्ती जीवनाचे अ,ब,क शिकले नाही.

खरा व खोटा पश्चाताप

जर तुम्ही पश्चाताप केला आहे तर तुम्ही खात्री करून घ्यावी की तुम्ही खरोखर खरा पश्चाताप केला आहे. कारण सैतानाकडे खोटा पश्चाताप देखील आहे ज्याद्वारे तो लोकांना फसवितो.

सैतानाला माहीत आहे की बहुतेक लोक फसू नका हया एका आज्ञेच्या आधारावर जगतात ! आणि कोणाकडून फसत नसता, तो त्यांना पापाचा मार्ग शिकवितो.

चोराला देखील पकडले गेल्यावर वाईट वाटते. परंतु हा पश्चाताप नाही.

बायबल मधून आपण अशा लोकांची काही उदाहरणे बघू या ज्यांनी केलेला पश्चाताप खोटा होता.

जेव्हा शौल राजाने देवाची आज्ञा मोडली तेव्हा त्याने शमुवेलाजवळ कबूल केले की त्याने पाप केले आहे. परंतु लोकांना हे कळू नये असे त्याला वाटत होते. आता देखील तो लोकांकडून मानाची अपेक्षा करीत आहे. त्याने खरा पश्चाताप केला नव्हता. तो पकडला गेला म्हणून त्याला वाईट वाटत होते (1 शमुवेल 15:24—30) त्याच्यात व दावीद राजात हाच फरक आहे की दावीदाच्या हातून पाप घडल्यावर त्याने उघडपणे कबूल केले (स्तोत्र 51).

अहाब राजादेखील शौलासारखा होता. जेव्हा एलियाने त्याला सांगितले की देव त्याला शिक्षा करणार आहे तेव्हा त्याला खरोखर स्वतःविषयी दुःख झाले. त्याने ताडवस्त्र देखील घातली व तो स्वतःच्या पापांकरिता रडला (1 राजे 21:27—29) परंतु त्याने खरा पश्चाताप केला नाही. त्याला केवळ देवाच्या शिक्षेची भिती वाटत होती.

यहूदाचे उदाहरण खोटया पश्चातापाचे स्पष्ट उदाहरण आहे. जेव्हा त्याने येशू ख्रिस्ताला मरणदंडाची शिक्षा झालेली बघितली तेव्हा त्याला वाईट वाटले व तो म्हणाला, मी पाप केले आहे (मत्तय 27:3—5). परंतु त्याने याचकाकडे असे कबूल केले— जेस आज देखील काही लोक करतात! त्याने पश्चाताप केला नाही. जरी त्याने केलेल्या पापाबद्दल त्याला वाईट वाटले तरी त्याने पश्चाताप केला नाही. जर त्याने खरोखर पश्चाताप केला असता तर तो पश्चातापी ह्दयाने प्रभुकडे गेला असता व त्याने प्रभूला क्षमा मागितली असती. परंतु त्याने तसे केले नाही. या उदाहरणावरून आपण पुष्कळ शिकू शकतो— काय करणे म्हणजे पश्चाताप नाही ते शिकू शकतो !

खरा पश्चाताप म्हणजे, मूर्तीपासून देवाकडे वळणे (1 थेस्सलनी 1:9).

मंदिरामधील लाकडाच्या किंवा दगडाच्या मूर्ती म्हणजेच मूर्ती असे नाही. तेवढयाच घातक मूर्ती आहेत ज्यांची लोक भक्ती करतात. ज्या वास्तविक मूर्तीसारख्या दिसत नाहीत. सुख विलासाची मूर्ती, चैनबाजी, पैसा, प्रसिध्दी, स्वतःच्या मार्गाने चालण्याची इच्छा हया देखील मूर्ती आहेत.

पुष्कळ वर्षापासून आपण सर्वांनी या मूर्तीची भक्ती केली आहे. पश्चाताप करणे म्हणजे या मूर्तीची भक्ती करणे थांबविणे व त्यांच्यापासून देवाकडे वळणे.

खर्याी पश्चातापामध्ये आपल्या संपूर्ण व्यक्तीत्वाचा—मनाचा, भावनेचा व इच्छेचा सहभाग असतो.

सर्व प्रथम, पश्चाताप म्हणजे आपण पाप व जगापासून आपले मन फिरवितो. आपल्याला जाणीव होते की आपल्या पापाने आपल्याला देवापासून विभक्त केले आहे. आपल्याला हे देखील दिसते की हया जगाचा संपूर्ण जीवनमार्ग हा देव विरोधी आहे आणि आपण देवाचा अनादर करणार्याव मार्गापासून फिरतो.

दुसरी बाब, पश्चातापामध्ये आपल्या भावनेचा समावेश आहे. आपल्या पापमय जीवनाबद्दल आपल्याला वाईट वाटते (2 करिंथ 7:10). आपल्या पूर्वीच्या कृत्यांबद्दल आपल्याला स्वतःचा वीट येतो आणि त्यापेक्षाही इतरांना न दिसत असलेले आपल्यामधील मोठे पाप आपल्याला दिसून येते (यहेजकेल 36:31).

आपण आपल्या जीवनाद्वारे देवाला दुखविले म्हणून रडतो व शोक करतो. बायबलमधील पुष्कळशा थोर पुरूषांचे उदाहरण आहे की त्यांनी पापाची जाणीव झाल्यावर अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली, दावीद (स्तोत्र 51), इयोब (इयोब 42:6) व पेत्र (मत्तय 26:75). हे सर्व पापाबद्दल पश्चाताप करीत असताना रडले.

येशूने त्याचप्रमाणे प्रेषितांनी आपल्याला आपल्या पापांबद्दल रडण्यास व शोक करण्यास सांगितले आहे. (मत्तय 5:4, याकोब 4:9). देवाकडे परत जाण्याचा हाच एक मार्ग आहे.

शेवटी, पश्चातापामध्ये आपल्या इच्छेचा सहभाग असतो. आपल्याला आपला हट्टी स्वार्थी स्वभाव सोडावा लागतो व येशूला आपल्या जीवनाचा प्रभू करावे लागते. हयाचा अर्थ असा की इथून पुढे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागणार व करणार, त्याकरिता कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल व कितीही अपमान सहन करावा लागला तरी चालेल.

उधळया पुत्र आपल्या वडिलांकडे घरी परतला तेव्हा तो पश्चातापी ह्दयाने व परिवर्तन झालेल्या मनाने परतला. तो त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याच्या तयारीने परतला. हा खरा पश्चाताप आहे (लूक 15:11—24).

आपण केलेले प्रत्येक लहान सहान पाप देवाजवळ कबूल करण्याची गरज नाही. पुष्कळ वेळा सर्वच पापे आठविणे शक्य होत नाही. उधळया पुत्राने तसे केले नाही. त्याने म्हटले, बाबा, मी तुमच्याविरूध्द पाप केले आहे आणि आपण देखील असेच म्हणावे.

परंतु हे लक्षात ठेवा की यहूदा इस्कार्योताने देखील म्हटले मी पाप केले आहे. यहूदा इस्कार्योताच्या कबुलीमध्ये व उधळया पुत्राच्या कबुलीमध्ये फार मोठा फरक आहे. देव आपण बोलत असलेल्या शब्दांनाच ऐकत नाही. आपल्या शब्दामागील भावना तो ओळखतो आणि त्याप्रमाणे तो आपल्या सेाबत वागतो.

पश्चातापाचे फळ

बाप्तिस्मा करणार्या येाहानाने परूश्यांना म्हटले की त्यांनी पश्चातापास योग्य असे फळ द्यावे (मत्तय 3:8). जर आपण खरा पश्चाताप केला तर आपले संपूर्ण जीवन बदलून जाईल. पश्चाताप केल्यानंतर सर्वात प्रथम आपण एक गोष्ट करावी आणि ती म्हणजे आपण जीवनात केलेल्या चुकांबद्दल भरपाई.

आपण शुभवर्तमानात जक्कयाविषयी वाचतो की ज्या क्षणी येशूने जक्कयाच्या घरात प्रवेश केला त्या क्षणी जक्कयाला आपली पापे दिसू लागली. (लुक 19:1—10). जक्कय पैशावर प्रिती करणारा मनुष्य होता. परंतु पश्चातापामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात हयाची त्याला कल्पना होती. त्याला माहीत होते की जर त्याला येशूचा शिष्य व्हायचे आहे तर जीवनात केलेल्या सर्व चुकांबद्दल त्याला भरपाई द्यायची आहे.

हयामुळे त्याला मोठया प्रमाणात पैशाचा तोटा होणार होता, कारण त्याने पुष्कळांना लुबाडले होते. परंतु पश्चाताप करीत असतांना पूर्ण मनाने पश्चाताप करावा असे त्याला वाटले. आणि म्हणून त्याने प्रभूला म्हटले की तो आपली अर्धी धनसंपत्ती गरिबांना देईल आणि ज्यांना फसविले त्यांना चौपटीने परत करीन. परत भरपाई करण्याविषयी जक्कय बोलल्यावरच येशूने म्हटले की त्याच्या घराला तारण प्राप्त झाले आहे. परत भरपाई करण्याची इच्छा असणे हे खर्याय तारणाचे प्रमाण आहे (लूक 19:1—10).

येशूने सांगितलेल्या दाखल्यामध्ये शहाण्या मनुष्याने खोल खोदून पाया खडकावर उभारला (लूक 6:48). मूर्ख मनुष्याने देखील त्याच प्रांतात घर बांधिले. परंतु त्याने पाया घालण्यासाठी खोल खणले नाही. त्याने वर वाळूवर पाया घातला.

आपण या दाखल्याचा खरा व खोटा पश्चाताप सांगण्याकरीता उपयोग करू शकतो. आपल्या जीवनामधील चुकांबद्दल परतफेड करण्याचे कष्ट आपण घेतल्यास आपण खोलवर पाया खणू.

जेव्हा आपण ख्रिस्ताकडे येतो तेव्हा सुरूवातीला आपल्या परिवर्तनापूर्वीच्या जीवनाच्या सर्व गोष्टींचे व चुकांचे निवारण करणे चांगले. जर आपण वरपांगी असलो तर आपल्याला कळेल की आपला पाया कच्चा राहिला आहे आणि मग एके दिवशी आपले घर कोसळेल.

भरपाईमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात?

भरपाईमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात?

हयाचा अर्थ असा की तुम्ही जर सरकारी खात्यात कर जमा केलेला नाही तर तुम्ही तो जमा करावा. पुष्कळ वेळा खात्यामध्ये रक्कम जमा करणे शक्य होत नाही, परंतु इच्छा असल्यास मार्ग असतोच— जर देवाची आज्ञा पाळण्याची आपली इच्छा आहे तर मार्ग आहे! आपण पोस्टाची तिकिटे किंवा रेल्वेची तिकिटे विकत घेऊन फाडून फेकू शकतो, जेणेकरून आपण विकत घेण्याकरिता दिलेला पैसा परत सरकारी खात्यात जमा होईल.

जर तुम्ही लोकांना लुबाडले आहे तर परतफेड करतांना किंवा भरपाई करतांना त्यांची क्षमा देखील मागा. तुमच्या जीवनात कशा रीतीने परिवर्तन घडून आले हे त्यांना सांगा. जर तुम्हाला वाटते की तुमच्यात तसे करण्याचे धैर्य नाही तर भरपाई करतांना सोबत आपल्या भावाला घेऊन जा.

जर तुम्ही एकाच वेळी आपले कर्ज फेडू शकले नाही तर, चिंता करू नका. ते थोडे थोडे करून फेडा. पाच रूपयांनी का होईना परंतु सुरूवात करा! ज्या दिवशी जक्कयाने निर्णय घेतला की तो परतफेड करील त्याच दिवशी देवाने जक्कयाचा स्वीकार केला— परतफेड किंवा भरपाई केल्यानंतर नव्हे.

जर तुम्ही एखाद्याला लुबाडले आहे आणि त्याचा पत्ता तुमच्याजवळ नाही तर तुम्ही तो पैसा देवाला परत करा— जो पैशाचा खरा मालक आहे. हा नियम देवाने इस्त्राएली लोकांना लावून दिला होता (गणना 5:6—8).

दुराचाराने गोळा केलेला पैसा आपण कधीही जवळ बाळगू नये. अशा पैशांवर देव आशीर्वाद पाठवीत नाही.

जर आपण कोणाला दुखविले किंवा जखमी केले, त्यामध्ये पैशाचा समावेश नाही, तर आपण त्या व्यक्तीकडे जाऊन त्याची क्षमा मागावी.

मी अशा भावांना ओळखतो ज्यांनी वर्षानुवर्षे पैसा साठविला, आणि नंतर सरकारी कर फेडण्याकरिता किंवा लुबाडून मिळविलेला पैसा परत करण्याकरीता बँकेतील जमाखात्यातील रक्कम काढून टाकली आणि नंतर देवाने त्यांना अधिक रक्कम देऊन आशीर्वादित केले !

मी अशा लोकांना देखील ओळखतो ज्यांनी तिकिट न काढता बसने व रेल्वेने प्रवास केला, परंतु नंतर त्यांनी ही रक्कम परत केली. जे लोक लहान लहान गोष्टीत विश्वासू असतात ते देवासाठी मोठया गोष्टी करू शकतात.

मी अशांना देखील ओळखतो जे विद्यापीठांच्या प्रमुखांकडे प्रमाणपत्र घेऊन गेले व त्यांनी कबूल केले की वार्षिक परीक्षेच्या वेळी त्यांनी चोरून नक्कल केली आहे. गरज पडल्यास, व विवेक शुध्द करण्याकरिता ते विद्यापिठाच्या प्रमाणपत्राचा त्याग करण्यास तयार होते. देवाने विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या नजरेत या विश्वासणार्यां ची क्षम करण्यात आली.

परंतु नेहमी अशाप्रकारे घडेल असे नाही. कदाचित देवाच्या इच्छेनुसार तुमचे विद्यापिठाचे प्रमाणपत्र काढून घेतल्या जाऊ शकते. परंतु हीच तुम्हाकरिता देवाची पूर्ण इच्छा आहे.

मला एका व्यक्तीविषयी आठवते ज्याने कोणाला क्षमा मागण्याकरिता पत्र लिहिले की त्याने त्याच्याकडून पुष्कळ वर्षापूर्वी लहानसे पोस्टाचे तिकिट चोरले होते. चोर हा चोर असतो, चोरलेली वस्तू कितीही लहान असो. लहान लहान गोष्टींमध्ये आपला विश्वासूपणा पारखला जातो.

मी असा सल्ला देत नाही की तुम्ही आपल्या जीवनातील लहान लहान चुका स्मरणातून काढून टाकण्याकरीता स्वतःला छळावे. नाही, तुम्हाला असे करण्याची गरज नाही. कोणत्या गोष्टीची भरपाई करावी हे देव तुम्हाला सुचवेल आणि देव सुचवेल त्याच गोष्टींची तुम्ही परतफेड किंवा भरपाई करावी.

पुष्कळवेळा भरपाई करणेदेखील अशक्य होईल कारण तुम्ही केलेल्या गोष्टी फार गुंतागुंतीच्या किंवा पूर्णपणे अडकलेल्या असतील. अशा स्थितीत तुम्ही देवाला क्षमा मागून त्याची कृपा मागावी.

कुठल्याही परिस्थितीत आपण सतत दोषीपणाच्या भावनेत जीवन जगत राहू नये. कारण काही गोष्टी आपल्या हातात नसू शकतात. देवाला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असते आणि तो आपल्याला छळत नाही. जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही केलेली लहान देखील भरपाईचा देव स्वीकार करेल— जर तुम्ही काही करू शकले नाही तरी देव तुमचा स्वीकार करेल (2करिंथ8:12).

देवाच्या दयेबद्दल त्याचे उपकार मानावे.

जे देवाचा आदर करतात त्यांचा देव आदर करतो (1 शमुवेल 2:30). लहान गोष्टींमध्ये विश्वासून राहून आपण देवाचा आदर करू शकतो.

जर आपण भरपाई करीत नाही तर आपण आपल्या संपूर्ण जीवनात बेडया वागवीत आहोत. पैसा, प्रतिष्ठा, विद्यापिठाचे प्रमाणपत्र व नोकरी यापेक्षा आपण शुध्द विवेकास अधिक महत्त्व देतो का हयाची देव पारख करील. पुष्कळ परीक्षेत अपयशी ठरतात. परंतु देवाची स्तुती करावी की प्रत्येक पिढीत असे लोक आहेत जे जगातील इतर गोष्टींपेक्षा देवावर अधिक प्रेम करतात.

इतरांची क्षमा करणे

पश्चातापामध्ये अशा लोकांना क्षमा करण्याचा समावेश आहे ज्यांनी आपल्याला दुखावले.

येशूने म्हटले, जर तुम्ही इतरांची क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही (मत्तय 6:15). पुढे त्याने म्हटले की आपण पूर्ण मनाने इतरांची क्षमा करावी वर वर करू नये (मत्तय 18:35). जर आपण पूर्ण मनाने व पूर्णपणे इतरांची क्षमा करीत नाही तर देवाकडून क्षमा प्राप्त करणे शक्य होत नाही.

इतरांनी आपल्याला कशारीतीने दुखविले हे आपण विसरू शकत नाही. परंतु जेव्हाही आपल्याला मोह होतो तेव्हा आपण त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा ती विसरण्याचा प्रयत्न करू शकतो.

पुष्कळवेळा कोणी आपल्याला अशा रीतीने त्रास दिलेला असतो किंवा दुखावले असते की पूर्ण मनाने क्षमा करणे कठीण वाटते. क्षमा करण्याकरीता देवाचे सहाय्य मागा आणि तुम्हाला कळेल की इतरांची क्षमा करण्याचे सामर्थ्य तुम्हाला देण्यास त्याला आवडेल.

आपल्या हजारो पापांची देवाने क्षमा केली आहे हे जर आपण आठवले तर इतरांची क्षमा करणे आपल्याला अवघड जाणार नाही. जेव्हा आपण इतरांची क्षमा करीत नाही तेव्हा सैतान आपल्यावर सत्ता गाजवितो.

क्षमा करा, पौलाने म्हटले, अशा हेतुने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये (2 करिंथ 2:10,11).

सैतानाप्रती बदललेली वृत्ती

आणखी एका ठिकाणी चूक निवारण करण्याची गरज आहे आणि ती म्हणजे सैतान व दुष्ट आत्म्यांच्या संपर्कातील ठिकाण.

जर तुम्ही पंचांग, भविष्य पाहणे, मूर्तीपूजा, हात पहाणे व जादूटोन्यात गुंतलेला आहात किंवा जर तुम्हाला रॉक संगितात व घातक मद्यात रस आहे तर तुम्ही या गोष्टी सोडून सैतानाशी संपर्क तोडण्याची गरज आहे. कदाचित तुम्ही नकळत सैतानाशी संबंध ठेवत असाल.

सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट करावी ती म्हणजे वाईट गोष्टींचा नाश करावा (विकू नये तर नाश करावा). मूर्तीचा, वाईट पुस्तकांचा, ताईतांचा व अशा इतर गोष्टींचा (पहा प्रेषित 19:19), आणि तुम्ही प्रार्थना करावी,

प्रभु येशू सैतानासोबत कळत नकळत संबंध असण्याकरिता ज्या गोष्टी होत्या त्या मी सर्व सोडल्या आहेत.

आणि सैतानाला म्हणा,

सैताना, मी माझा प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त हयाच्या नावात तुला आडवा होतो, तू यापुढे मला स्पर्श करू शकत नाही कारण आता मी प्रभु येशू ख्रिस्ताचा आहे.
याकोब 4:7 मध्ये सांगितले आहे, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल अशा प्रकारे सैतान तुमच्यावर कधीही ताबा करू शकणार नाही.

जर आपण प्रभूसोबत चालत राहिलो तर तो आपल्या जीवनातील विभिन्न क्षेत्रात अधिक आणि अधिक प्रकाश टाकेल. आपला जगिक पेहराव किंवा आपले भाषण किंवा आपला कठोर आवाज किंवा आपल्या वाईट पुस्तक वाचण्याच्या सवयीवर प्रकाश टाकेल. नेहमी कोणत्या नवीन गोष्टीविषयी आपण पश्चाताप करावा व शुध्द व्हावे हे आपल्याला कळत राहील.

रोज आणि रोज आपण निरंतर पश्चाताप करीत वाटचाल करावी.

धडा 2
विश्वास

ख्रिस्ती जीवनाच्या पायाचा पहिला भाग पश्चाताप आहे. विश्वास दुसरा भाग आहे.

देवावर विश्वास ठेवणे म्हणजे त्याच्यावर भरवसा ठेवणे व आपल्या भावना व इतर लोक काहीही म्हणो परंतु त्याच्या मुखातील वचनावर विश्वास ठेवणे.

देवाविषयी तीन सत्ये या ठिकाणी आहेत :

 1. 1) तो आपल्यावर अगम्य प्रेम करितो.
 2. 2) तो सर्वज्ञानी आहे व
 3. 3) तो सर्वशक्तीमान आहे.

या सत्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे का? नाही. जर नाही तर संपूर्ण अंतःकरणाने देवावर भरवसा ठेवणे कठीण नाही.

एदेन बागेत हवेने देखील सैतानाची वाणी ऐकली. ती विश्वास अपयशी करणारी होती. हवेचा असा विश्वास नव्हता की देवाच्या आज्ञा तिच्यासाठी चांगल्या आहेत. तिने देवाची आज्ञा मोडली कारण तिच्यावरील देवाच्या परिपूर्ण प्रीतीवर तिचा विश्वास नव्हता.

देवाचे दान प्राप्त करण्याकरिता विश्वास

आपल्याला देण्यासाठी देवाकडे पुष्कळ अद्भुत गोष्टी आहेत. त्याची सर्व दाने कृपेची दाने आहेत. परंतु या दानांना प्राप्त करण्याकरिता आपल्या ठायी विश्वासाची गरज आहे. बायबल सांगते, कृपेने विश्वासाच्या द्वारे आपले तारण झाले आहे (इफिस 2:8). कृपा म्हणजे स्वर्गाच्या आशीर्वादांनी भरलेला हात देव आपल्यापर्यंत पोहचवीत आहे. विश्वास म्हणजे आपला हात वर आकाशाकडे देवाच्या हातातील आशीर्वाद घेण्याकरिता वर केला जात आहे.

सर्वप्रथम देव आपल्याला आपल पापांची क्षमा देऊ करितो. जर आपण पश्चाताप केला तर आता आपण देव विनामूल्य देऊ करीत असलेल्या गोष्टी घेण्याकरीता हात वर करावा. याकरिता आपल्याला काम करण्याची किंवा किंमत देण्याची गरज नाही. वधस्तंभावर आधीच ही किंमत मोजून देण्यात आली आहे. आता आपल्याला केवळ म्हणायचे आहे, ‘पित्या, तुझे आभार मानतो‘ आणि देव देत असलेला आशीर्वाद घ्यायचा आहे. हा विश्वास आहे.

देव ज्या गोष्टी देत आहे त्या गोष्टी आपण जर घेत नाही तर आपण त्याच्या दानांना तुच्छ लेखीत आहोत. ज्या रीतीने काही लोक लेकरांना देण्याकरीता हात पुढे करतात व काही न देता परत मागे घेतात व चिडवतात त्या रीतीने आपल्याला वाटते की देव आपल्याला चिडवीत आहे. परंतु देव अशा लोकांसारखा दुष्टपणा करीत नाही. तो प्रेमळ पिता आहे. त्याची इच्छा आहे की आपल्याला चांगली दाने द्यावी.

यामुळे बायबल सांगते, विश्वासावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे— आपण कितीही प्रयत्न करीत असू (इब्री 11:6).

जर आपण देवावर भरवसा ठेवला तर तो केवळ आपल्या पापांचीच क्षमा करणार नाही तर तो आपल्याला पापाच्या सामर्थ्यातून देखील मुक्त करेल.

आपल्याला विश्वास कसा मिळतो?एकच मार्ग आहे. बायबल सांगते, हयाप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते (रोम 10:17). दुसर्या शब्दात जेव्हा आपण देवाला त्याच्या वचनातून आपल्याशी बोलू देतो तेव्हा आपल्याला विश्वास प्राप्त होतो आणि अशा रीतीने आपला विश्वास वाढत जातो.

देवाच्या वचनातून आपल्याला कळते की ख्रिस्त आपल्या पापांकरीता मरण पावला व पुनरूत्थीत झाला व जर आपण पश्चाताप करतो व त्याच्यावर भरवसा ठेवतो तर आपल्याला लगेच पूर्ण व विनामूल्य पापांची क्षमा मिळते. मग पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो की हे सत्य आहे. देवाच्या वचनाच्या व पवित्र आत्म्याच्या साक्षीद्वारे आपल्याला पूर्ण खात्री होते की देवाने आपली क्षमा केली आहे व खरोबर आपण त्याची लेकरे आहोत.

विश्वासाची खात्री

देवाची अशी इच्छा आहे की आपल्या अंतःकरणात आपल्याला पूर्ण खात्री व्हावी की खरोखर आपण देवाची लेकरे आहोत. हया सत्याविषयी आपण संशय बाळगावा असे त्याला कधीही वाटत नाही.

आपण संशय बाळगावा म्हणून सैतान पूर्ण प्रयत्न करेल. परंतु आपण कधीही संशय बाळगू नये कारण आपल्याला खात्री पटवून देण्याकरीता देवाने त्याच्या वचनात आपल्याला पुषकळशी अभिवचने दिलेली आहेत.

या अभिवचनांकडे बघा : येशूने म्हटले, ‘जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही...मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे‘ (योहान 6:37, 47).

‘परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यां.ना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला‘ (योहान 1:12).

‘कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी हयापुढे आठवणारच नाही‘ (इब्री 8:12).

देवाच्या अभिवचनांवर आपला विश्वास ठेवणे म्हणजे नदी ओलांडत असतांना मजबूत अशा पुलावर पाय ठेवणे. जर पूल मजबूत आहे तर आपला पाय अशक्त असला तरी चालेल. दृढ विश्वास म्हणजे काय? दृढ विश्वास म्हणजे सामर्थी देवावर व त्याच्या अभिवचनांवर भरवसा ठेवणे.

पुष्कळ वेळा आपल्या भावना फसव्या असतात. आपण भावनांवर भरवसा ठेवू नये. तीन मनुष्यांचे उदाहरण आहे, एकाचे नाव वास्तविकता, दुसर्यानचे नाव विश्वास व तिसर्याशचे नाव भावना. हे तिघेही निमुळत्या भिंतीवर एकामागून एक रांगेत चालत होते. वास्तविकता पुढे होता, विश्वास त्याच्या मागे आणि भावना सर्वात मागे. पुढे असलेल्या वास्तविकतेवर जोवर विश्वासाची नजर होती तोवर सर्व सुरळीत होते आणि भावना देखील अगदी नीटपणे मागे मागे चालत होता. परंतु जेव्हा विश्वासाने भावना मागे येतो की नाही हे वळून बघितले तेव्हा विश्वासाचे तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या मागोमाग भावना देखील पडला. वास्तविकता भिंतीवरून न डगमगता चालत राहिला.

या उदाहरणातील धडा स्पष्ट आहे. देवाचे वचन न बदलणार्या वास्तविकतेंनी परिपूर्ण आहे. जर आपला विश्वास केवळ देवाच्या वचनाकडे दृष्टी लावून राहील तर पडण्याची मुळीच भिती नाही आणि भावना नीट मागे चालतील. परंतु जर आपण आपल्या भावनांकडे बघितले तर आपण सहज रीतीने डगमगू व निराशेच्या व दोषाच्या दरीत पडू.

विश्वासाची कबुली

बायबल सांगते की आपला विश्वास आहे असे आपण कबूल करावे, ‘येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते‘ (रोम 10:9—10).

आपल्या मुखाची कबुली महत्त्वाची आहे. देवाचे वचन कबूल करणे म्हणजे देवाने जे सांगितले तेच सांगणे. देवाच्या अभिवचनांना आमेन म्हणून प्रतिसाद देणे अवघड नाही. विश्वास हा शब्द. सर्व प्रथम उत्त्पत्तीच्या 15 व्या अध्यायात आला आहे. त्या ठिकाणी आपण वाचतो की अब्राहामाला मूलबाळ नसतांना देवाने अब्राहामाला सांगितले की त्याला आकाशातील तार्यांाइतकी लेकरे होतील आणि असे सांगितले आहे की अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला (वचन 6). हयाठिकाणी वापरलेल्या विश्वास या शब्दाचा इब्री अर्थ अमन असा होतो, म्हणजे आमेन, म्हणजेच असे होवो अब्राहमाने देवाच्या अभिवचनाला आमेन असे म्हटले.

देवाला आमेन म्हणणे हाच खरा विश्वास आहे.

पुढे आपण वाचतो की अब्राहमाचे नाव देवाने अब्राहम असे ठेवले (हयाचा अर्थ बहुतांचा पिता). अभिवचन देत असतांना सारेला मूळबाळ नव्हते. परंतु अब्राहमावर या गोष्टीचा परिणाम झाला नाही. त्याचा देवावर विश्वास असल्यामुळे तो स्वतःला बहुतांचा पिता म्हणवीत होता (उत्पत्ती 17:5).

हयाला विश्वासाची कबूली म्हणावी. अभिवचनाची पूर्णता डोळयांनी पाहिली नसतांना देवाने जे सांगितले ते कबूल करणे.

देव आपल्याला हेच करण्यास सांगतो— देवाने जे त्याच्या वचनात म्हटले आहे तेच आपण म्हणावे. जेव्हा आपण देवाचे अभिवचन कबूल करतो तेव्हा आपण त्याच्यावरील विश्वास व्यक्त करतो आणि मग देव आपल्या वतीने कार्य करू शकतो.

आपल्या साक्षीच्या वचनामुळे आपण सैतानावर विजय मिळविला (प्रगटीकरण 12:11). सैतान जो दोष लावणारा आहे तो आपल्या तारणाची खात्री हिरावून घेऊ इच्छितो व देवापुढे आपले धैर्य हिरावून घेऊ इच्छितो. जर आपल्याला सैतानावर जय मिळवायचा आहे. तर आपण देवाचे अभिवचन सैतानाला बोलून दाखवावे. येशू ख्रिस्ताने सैतानावर विजय मिळविण्याकरिता शास्त्रभाग बोलून दाखविला. असे लिहिले आहे.... असे लिहिले आहे.....असे लिहिले आहे.... (मत्तय 4:1—11).

जर आपण देवाच्या वचनावर संशय धरतो तर देवाला आपण खोटा ठरवितो. परंतु सैतानाला जेव्हा आपण देवाचे वचन बोलून दाखवितो तेव्हा आपण सैतानाविरूध्द व त्याच्या खोटेपणाविरूध्द देवाची व त्याच्या वचनाची बाजू घेतो आणि अशा प्रकारे आपण सैतानाला सांगतो की देव जे बोलला आहे ते सत्य आहे, आपली परिस्थिती कशीही असो, आपल्या भावना आपल्याला काहीही सांगत असो.

ही विश्वासाची कबुली आहे.

धडा 3
निवड व नीतिमान ठरणे

देवाद्वारे त्याच्या लेकरांची निवड व त्यांना नीतिमान ठरविणे ही दोन सत्ये नवीन करारात आपल्याला शिकविली आहेत.

निवड

बायबल आपल्याला शिकविते की त्याची लेकरे होण्याकरिता देवाने आपल्याला त्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडले

(1 पेत्र 1:1,2).

हयाचा अर्थ असा की अनंतकाळापासून देवाला त्याची लेकरे कोण होणार हे माहीत होते.

बायबल आपल्याला असे देखील सांगते की त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. (इफिस 1:4). आदामाला घडविण्याच्या फार पूर्वी, देव आपल्याला त्याची लेकरे म्हणून नावाने ओळखतो व आपली नावे जीवनाच्या पुस्तकात नमूद केलेली आहेत (प्रकटीकरण 13:8).

हया वास्तविकता आहेत ज्या आपल्याला मोठी सुरक्षितता देतात.

बायबल सांगते की ज्या देवाच्या पायावर आपण उभे आहोत त्यास शिक्का मारलेल्या दोन बाजू आहेत. देवाच्या बाजूने लिहिले आहे, प्रभु आपले जे आहेत त्यांना ओळखतो व मनुष्याच्या बाजूने लिहिले आहे, जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतिपासून दूर रहावे (2 तीमथ्य 2:19).

जगाचा पाया घालण्यापूर्वीपासून देव त्याच्या लेकरांना ओळखतो. परंतु आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण खरोखर पश्चाताप करू व त्याच्याकडे वळू तेव्हाच आपण त्याची लेकरे आहोत. देव त्याच्या लेकरांना निवडतो व तरीदेखील तो मनुष्याला देवाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कसे देतो हे आपल्या मर्यादित बुध्दीला कळत नाही. हे दोन समांतर रेषेप्रमाणे आहे ज्या आपल्या कल्पनेत आपसात छेदत नाही. परंतु गणितात समातर रेषेंची व्याख्या आहे की त्या अनंत काळात आपसात छेदतात—देवाच्या अनंत विचारांमध्ये.

कोणीतरी हे अशा प्रकारे व्यक्त केले आहेः जेव्हा तुम्ही जीवनाच्या रस्त्यांवरून चालले, तेव्हा तुम्हाला एके दिवशी एक उघडे द्वार दिसले, ज्यावर असे लिहिले होते, ‘जो कोणी पश्चाताप करून ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो यात प्रवेश करू शकतो व त्याला सार्वकालिक जीवन मिळू शकते.‘ तुम्ही आंत प्रवेश केला आहे. आणि आता मागे बघितल्यावर तुम्ही ज्या द्वारातून आंत प्रवेश केला आहे त्याच द्वारावर ‘तुम्ही असे शब्द लिहिलेले पाहाल, तुम्ही ख्रिस्तामध्ये देवाद्वारे जगाच्या स्थापनेपूर्वी निवडल्या गेलात.

‘ नीतिमान ठरविणे

आपल्या पापांपासून आपली क्षमाशीलता ही भूतकाळातील अपराधीपणाला दूर सारते. परंतु ती आपल्याला पूर्ण पवित्र करीत नाही आणि म्हणून आपण अजूनही पूर्णपणे पवित्र असलेल्या देवापुढे उभे राहू शकत नाही. आणि म्हणून देवाला अधिक जास्त असे आपल्यासाठी करावे लागले.

त्याला आपणास नीतिमान करावे लागले.

नीतिमान ठरविणे म्हणजे देवाने ख्रिस्ताची परिपूर्ण धार्मिकता आपल्या नावे केली. त्याचा परिणाम असा आहे की देवापुढे आपले उभे राहणे हे आता ख्रिस्तासारखे पूर्ण आहे! ती आश्चर्यकारक वास्तविकता आहे. आणि ती खरी आहे! हे अशासारखे आहे की जसे एखाद्या भिकार्यातच्या नावाने एखाद्याने लक्षावधी रूपये जमा केले जे रूपये त्याने कमविले नाही व त्यासाठी तो पात्रही नाही, परंतु ते त्याला मोफत बक्षिसाच्या रूपात भेटले आहे.

नीमिमान ठरणे म्हणजे जीवनामध्ये कधीही पाप न केल्याप्रमाणे देवाने आपला स्वीकार करणे. आपल्या जीवनामध्ये आपण परिपूर्ण नीतिमान असल्याप्रमाणे देवाद्वारे स्वीकारल्या जाणे.

देवाचे वचन सांगते, आपण ज्या कृपेमध्ये आहो, त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो (रोम 5:2). आता आपण धैर्याने देवाच्या उपस्थितीत कोणतीही भिती न बाळगता कोणत्याही वेळेस येऊ शकतो. देवाने स्वतः हा मार्ग उघडा केला आहे.

एदेन बागेत, आदाम आणि हवेने पाप केल्याबरोबरच, त्यांना अपराध्यासारखे वाटू लागले, आणि त्यांना लाज वाटली व त्यांनी अंजीराच्या झाडाची पाने शिवून स्वतःच्या कटिवेष्टने लावलीत. देवाने ती झाडांची पाने काढून टाकली, प्राण्याला मारून त्यांना चर्मवस्त्रे घातलीत.

ती अंजीराची पाने आपल्या चांगल्या कार्याचे चित्र आहे. अंजीराच्या पानांप्रमाणे आपली चांगली कामे देवासमोर आपल्या नग्नतेला झाकू शकत नाही. कारण बायबल असे सांगते की आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरडया वस्त्रासारखी झाली आहेत. (यशया 64:6).

ज्या प्राण्याचा वध करण्यात आला होता तो ख्रिस्ताचे चित्र प्रदर्शित करतो जो आपल्या पापांसाठी मरण पावला. चर्म हे ख्रिस्ताच्या पूर्ण धार्मिकतेचे चित्र आहे जे आपल्याला झाकते (उत्पत्ती 3:7, 21).

नीतिमत्त्व हे देवाचे मोफत बक्षिस आहे. कोणीही मनुष्य त्याच्या कार्याद्वारे देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. एक चुका काढणारा जहाल मतवादी असे म्हणतो, ‘देवाद्वारे नीतिमान ठरण्याकरीता धार्मिकतेचा शोध करू या. ‘

त्यांच्या विरूध्द मतांचेही अनेक लोक आहेत आणि ते असे म्हणतात, जर आमची निवड झाली आणि आम्ही नीतिमान ठरविल्या गेलो, तर आज आपण काही पाप केले तरी हरकत नाही, ते पापास अत्यंत साधे समजतात, कारण ते असा विचार करतात की देवाने त्यांना निवडले आहे आणि त्यांना नीतिमान ठरविले आहे, त्या मार्गाने ते असे सिध्द करतील की ते देवाच्या निवडलेल्यांमधून नाही (तुलना करा, रोम 4:5 शी याकोब 2:24 सोबत).

एकदा जर आम्हाला खात्री झाली की आमची निवड झाली आहे आणि आम्ही नीतिमान ठरविल्या गेलो आहोत, सैतानाच्या आमच्यावरील दोषारोपाचे परिणाम नाहीसे होतील. जर देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? (रोम 8:31). आपल्या जीवनात हे कधीही परत असे अनुभवायची गरज नाही की आपण देवाद्वारे दोषी ठरविल्या गेलो किंवा नाकारल्या गेलो.

देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील ? देवच नीतिमान ठरविणारा आहे (रोम 8:33). हालेलुया !

ही देवाची सुवार्ता आहे. हे आश्चर्य करण्यासारखे नाही की सैतानाने अनेक विश्वासणार्यांाना हे जाणण्यापासून अलिप्त ठेवले आहे की ते देवाद्वारे निवडल्या गेले आहेत आणि देवाद्वारे नीतिमान ठरविल्या गेले आहेत.

धडा 4
शिष्यत्व

जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले की प्रत्येक राष्ट्नात जा आणि शिष्य बनवा, तेव्हा येशूला काय म्हणायचे आहे याविषयी त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारे शंका नव्हती (मत्तय 28:19). कारण त्याने त्याचे शिष्य असणे म्हणजे काय याविषयी स्पष्टीकरण दिले होते.

लूक 14:25—35 हे शिष्यत्वाच्या तीन अटींना अधिक स्पष्टपणे प्रकट करते. याठिकाणी येशू अशा व्यक्तींविषयी बोलला ज्योन बुरूज बांधण्यासाठी पाया घातला परंतु तो ते पूर्ण करू शकला नाही, कारण त्याच्यामध्ये बांधणीचा खर्च देण्याची ऐपत नव्हती (वचन 28—30). हयाचा अर्थ असा की शिष्य होण्याकरीता किंमत द्यावी लागते. येशूने आम्हाला सांगितले की आम्ही बांधकाम करण्यापूर्वी बसून खर्चाचा आढावा काढावा.

देवाची अशी इच्छा नाही की आपल्या पापांची क्षमा झाल्यानंतर आपण पुष्कळ वर्षे वाट पहावी आणि नंतर खरोखर शिष्यत्व म्हणजे काय हे समजून घ्यावे. लोक जेव्हा येशूकडे आले तेव्हा लगेच येशूने त्यांना शिष्यत्वाचे मूल्य सांगितले.

तो म्हणाला की जो विश्वासणारा शिष्य बून इच्छित नाही तो खारटपणा गेलेल्या मिठासारखा असल्यामुळे देवाच्या उपयोगाचा नाही. (लूक 14:35).

आपल्या नातेवाईकांचा द्वेष

शिष्यत्त्वाची पहिली अट ही आहे की आपण नैसर्गिक अमर्याद प्रेमाचा संबंध तोडावा जो आपल्या नातेवाईकांप्रती असतो.

येशूने म्हटले, जर कोणी माझ्याकडे येईल, पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी हयांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही (लूक 14:26).

ते कठीण शब्द आहेत. द्वेष करणे हयाचा अर्थ काय? द्वेष करणे हे नरहिंसकासारखे आहे (1 योहान 3:15). आपले जे नैसर्गिक प्रेम आपल्या नातेवाईकांसाठी आहे ते आपण मारावे असे या ठिकाणी सांगितले आहे.

हयाचा अर्थ असा होतो का की आपण त्यांच्यावर प्रीती करू नये? नाही. असे मुळीच नाही. जेव्हा आपण त्यांच्यासोबत असलेले मानवी प्रेम सोडतो तेव्हा तो त्याठिकाणी दैवी प्रेम देईल. नंतर आपले आपल्या नातेवाईकांसोबत असलेले प्रेम हे शुध्द होईल व आपल्या जीवनामध्ये आपल्या नातेवाईकांपेक्षा आपण देवावर अधिक प्रेम करू व त्याला अधिक प्राधान्य देऊ.

अनेक लोक देवाची आज्ञा पाळीत नाही कारण ते त्यांच्या वडिलाला, आईला किंवा पत्नीला, इत्यादींना....दुखविण्यास भितात. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या जीवनात त्याला प्रथम स्थान द्यावे. जर आपण ते देत नाही तर आपण त्याचे शिष्य होऊ शकणार नाही.

येशूच्या स्वतःच्या उदाहरणाकडे बघा. त्याने आपल्या विधवा मातेवर प्रेम केले परंतु लहान लहान गोष्टींमध्ये सुध्दा त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करीत असतांना त्याने तिच्याशी असलेल्या संबंधामुळे अडखळण निर्माण होऊ दिेले नाही. हयाचे उदाहरण आपण काना येथील लग्नाच्या वेळेस बघतो ज्याठिकाणी येशूने आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे कार्य करण्यास नकार दिला (योहान2:4).

येशूने आम्हाला आपल्या भावांचा द्वेष कसा करावा हे सुध्दा सांगितले. जेव्हा पेत्राने ख्रिस्ताला वधस्तंभावर जाण्यापासून रोकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ख्रिस्ताने पेत्राकडे वळून त्याला अत्यंत कठोर शब्दात रागविले. येशूने म्हटले अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस (मत्तय 16:23). पेत्राने मोठया मानवी प्रेमाने सल्ला दिला होता. परंतु येशू त्याच्यावर रागावला कारण पेत्राचा सल्ला देवाच्या इच्छेविरूध्द होता.

येशूकरिता येशूच्या संबंधापेक्षा पित्याची इच्छा नेहमी महत्त्वाची होती. येशूची इच्छा आहे की आपल्या ठायी देखील तीच चित्तवृत्ती असावी. पुनरूत्थानानंतर येशूने पेत्राला विचारले की तो जगातील सर्व गोष्टींपेक्षा येशूवर अधिक प्रीती करतो का ? (योहान 21:15—17). जे लोक प्रभुवर सर्वात जास्त प्रीती करतात त्यांनाच मंडळयामध्ये जबाबदारी आहे.

इफिस येथील मंडळीतील पुढार्यामला हा धोका होता की त्याला नाकारल्या जाईल कारण प्रभु प्रती त्याने पूर्वीचे समर्पण सोडले होते. (प्रकटीकरण 2:1—5).

आपण देखील जर स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणतो, स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पूथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही तर आपण खरोखर शिष्यत्त्वाची पहिली अट खर्याआ रीतीने पूर्ण करितो (स्तोत्र 73:25).

येशू आपल्याकडून ज्या प्रीतीची अपेक्षा करतो ती प्रीती भावनात्मक व मानवी नाही जो भक्तीगीत गात असतांना त्याच्याप्रती समर्पण दर्शविते. नाही. जर आम्ही त्याच्यावर प्रीती करतो तर आपण त्याच्या आज्ञा पाळू (योहान 14:21).

आपल्या जीवाचा द्वेष

शिष्यत्त्वाची दुसरी अट आपल्या जीवाचा द्वेष करणे होय. येशूने म्हटले, जर कोणी माझ्याकडे येईल व आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही (लक 14:26).

जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही, असे बोलून येशूने त्याच्या म्हणण्याला अधिक विस्तृत केले (लूक 14:27).

येशूच्या शिकवणीपैकी ही शिकवण पुष्कळ लोकांना समजलेली नाही.

तो म्हणाला की त्याच्या शिष्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे (लूक 9:23). आपले शास्त्र वाचण्यापेक्षा आणि दररोज प्रार्थना करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे हे आहे की आपण आत्मत्याग करावा व स्वतःचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे जावे. आपला आत्मत्याग करावा हे आपल्या जीवाचा जे जीवन आपल्याला आदामापासून मिळालेले आहे त्याचा द्वेष करण्यासारखे आहे. वधस्तंभ उचलणे म्हणजे स्वतःच्या जीवास मरण्यासाठी देणे. आपल्या जीवाचा वध होण्यापूर्वी आपण त्याचा पहिले द्वेष करायला हवा.

ख्रिस्ती जीवनाचा मुख्य शत्रू हा आपले स्वतःचे जीवन आहे. शास्त्र त्याला देह असे संबोधते. देह हे आपल्यातील दुष्ट अभिलाषांचे घर आहे जे आपल्याला स्वार्थीपणाचा, प्रतिष्ठेचा, सुखविलासाचा व स्वतःच्या मार्गाने जाण्याचा मोह आणते.

जर आम्ही प्रामाणिक आहेात, तर आपण हे स्वीकारायला हवे की आपली चांगली कृत्ये जी दुष्ट अभिलाषेतून बाहेर आलीत ती दुष्ट हेतूने दूषित झाली आहेत. जोपर्यंत आपण अशा देहाचा द्वेष करणार नाही तर तोपर्यंत आपण देवाला अनुसरू शकणार नाही.

म्हणूनच येशू आपल्या जीवाचा द्वेष करण्याविषयी अशाप्रकारे बोलला.

खरे तर, हा वाक्प्रचार शुभवर्तमानामध्ये सहा वेळा आलेला आहे. (मत्तय 10:39, 16:25, मार्क 8:3, लूक 9:24, 14:26, योहान 12:25). ही आपल्या प्रभुची एक म्हण होती जी शुभवर्तमानांमध्ये वारंवार आलेली आहे. तरी सुध्दा हया विषयी कमी शिक्षण दिले जाते व हा विषय लोकांना कमी प्रमाणात कळालेला आहे. स्वतःच्या जीवाचा त्याग करणे म्हणजे स्वतःच्या हक्कांमागे न लागणे व हिताचे प्रसंग सोडणे त्याचप्रमाणे स्वतःची अभिलाषा न बाळगणे, महत्त्वकांक्षा न बाळगणे व स्वतःचे हीत न पाहता स्वतःच्याच मार्गाने जाणे थांबविणे इत्यादी. जरी तुम्ही येशूच्या मार्गावर चालू इच्छिता तर तुम्ही त्याचे शिष्य होऊ शकता.

आपली संपत्ती देणे

शिष्यत्त्वाची तीसरी अट आपली संपत्ती देणे आहे. येशूने म्हटले, तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही (लूक 14:33).

आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टी आपले सर्वस्व आहे. सर्वस्वाचा त्याग करणे महणजे त्या गोष्टी आपण स्वतःच्या न समजणे.

या त्यागाविषयी आपल्याला अब्राहमाच्या जीवनातून चांगले उदाहरण बघायला मिळते. इसहाक त्याचा पुत्र होता— त्याचे सर्वस्व होता. एके दिवशी देवाने इसहाकाचे अर्पण करण्यास अब्राहमास सांगितले. अब्राहामाने इसहाकाला वेदीवर ठेवले व तो त्याचे अर्पण करणारच होता परंतु देवाने त्याचे अंतःकरण जाणले व त्याला म्हटले की आता अर्पण करण्याची गरज नाही कारण तेा देवाची आज्ञा पाळू इच्छितो हे त्याने सिध्द केले आहे (उत्त्पत्ती 22). तेव्हापासून जरी इसहाक अब्राहामाच्या घरात होता तरी अब्राहामाने इसहाकाला स्वतःची संपत्ती गणले नाही. इसहाक आता देवाचा होता.

हा सर्वस्वाचा त्याग करणे आहे. जे काही आपल्याजवळ आहे ते देवाच्या वेदीवर ठेवणे व देवाला देणे.

त्यापैकी काही देव आपल्याला उपयोग करण्याकरिता देईल. परंतु आपण कधीही ती स्वतःची अनामत समजू नये. जर आपण स्वतःच्या घरात राहत असू तरी आपण हे लक्षात ठेवावे की ते घर देवाचे आहे व त्याने ते आपल्याला मोफत राहण्यासाठी दिले आहे ! हे खरे शिष्यत्व आहे.

देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने प्रीती करावी. मत्तय 5:8 मध्ये सांगितलेल्या, शुध्द अंतःकरणाचा हा अर्थ आहे. शुध्द विवेक असणे पुरे नाही. शुध्द विवेक असणे म्हणजे आपण पाप सोडले आहे. शुध्द अंतःकरण म्हणजे आपण सर्वस्व सोडले आहे !

आणि आपण बघतो की खर्या शिष्यत्त्वामध्ये पुढील गोष्टींविषयी आपला दृष्टीकोण वा वृत्ती बदलली आहे.

 1. (अ) आपले नातेवाईक व आपले प्रियजन
 2. (ब) आपला जीव
 3. (क) आपले सर्वस्व.
जर आपण ख्रिस्ती जीवनाच्या सुरूवातीलाच हया विषयांना तोंड देत नाही तर उत्तम पाया घालणे शक्य नाही.

धडा 5
पाण्याने बाप्तिस्मा

स्वर्गारोहणापूवी येशूने आपल्या शिष्यांना पुढील आज्ञा दिली.

 1. (1) जा आणि शिष्य बनवा
 2. (2) त्यांना पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या.
 3. (3) त्यांना येशूच्या सर्व आज्ञा पाळण्यास शिकवा.
याठिकाणी क्रम महत्वाचा आहे. जे शिष्य होऊ इच्छितात त्यांनाच बाप्तिस्मा द्यावा. इतरांना नाही.

जेव्हा लहान लेकरांना येशूकडे आणले तेव्हा येशूने त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला (पहा मार्क 10:13—16). जेव्हा मोठयांनी पश्चाताप केला व त्याच्याकडे आले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांद्वारे त्यांना बाप्तिस्मा दिला. (पहा योहान 4:1—2).

परंतु आज आपण पुष्कळ मंडळयांमध्ये काय बघतो? हयाचा उलट बघतो. लहान लेकरांना बाप्तिस्मा दिला जातो व मोठया लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे समर्पण व दृढीकरण केले जाते. येशूने जे केले त्याच्या उलट हे आहे.

पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पुष्कळांना आपली पापे दिसू लागली. तेव्हा पेत्राने त्यांना म्हटले, पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या व पुढे म्हटले आहे, तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला (प्रेषित 2:38,41). हे स्पष्ट आहे की जे ते लोक बौध्दीक रीतीने देवाचे वचन ग्रहण करू शकले व ज्यांनी पश्चाताप केला त्यांचाच बाप्तिस्मा झाला आणि हे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रत्येक घटनेला नमूद केले आहे.

बाप्तिस्मा म्हणजे काय?

बाप्तिस्म्याचा अर्थ रोम 6:1—7 मध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. याठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे की आपला जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला व बाप्तिस्म्याद्वारे आपण ख्रिस्तासोबत पुरले गेलो. जुना मनुष्य म्हणजे आपले मन जे आपण बदललो नव्हतो. त्या दिवसांमध्ये पाप करू इच्छित नव्हते. त्यास ख्रिस्तासोबत खिळले गेले आहे.

त्याप्रमाणे जीवन जगण्यापूर्वी आपल्याला त्याचा अर्थ समजणे गरजेचे नाही.

देव आपल्याला जे सांगतो त्यावर आपण विश्वास ठेवावा. जर देव आपल्याला सांगतो की जर ख्रिस्तासोबत आपला जुना मनुष्य खिळला गेला तर आपण त्यावर विश्वास ठेवावा. देवाचे वचन सांगते की ख्रिस्ताने स्वतःला कालवरीच्या टेकडीवर वधस्तंभी दिले आणि आपण विश्वास ठेवतो तसाच विश्वास ठेवावा की आपला जुना मनुष्य ख्रिस्तासोबत खिळला गेला आहे. या दोन्ही सत्यांचा स्वीकार विश्वासाने करावा.

जुना मनुष्य व देह एक नाही. देह हा आपल्यामधील दुष्ट वासनेचे कोठार आहे. जो देवाच्या इच्छेला विरोध करतो. मरणाच्या दिवसापर्यंत आपल्याला तो सोबत वागवायचा आहे. आपण आपल्या देहाला अशा लुटारूंची टोळी म्हणू शकतो जे आपल्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतात व आपल्या जुन्या मनुष्याला अविश्वासू दास म्हणू शकतो जो या लुटारूंकरीता नेहमी आपल्या घराचे दार उघडतो. आता हया अविश्वासू दासास जिवे मारले गेले आहे. लुटारू दुष्ट व कठोर आहेत! परंतु आता आपल्याजवळ नवीन दास आहे, नवीन मनुष्य आहे जो आपले दार सतत बंद ठेवतो व लुटारूंना आत प्रवेश करू देत नाही.

बाप्तिस्मा घेत असतांना आपण आपल्या जुन्या मनुष्याच्या मरणाचे व त्याला पुरले आहे हयाचे साक्षी आहोत (पाप करण्याचा मोह) व ख्रिस्त मेलेल्यातून गौरवाने उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे (रोम 6:4).

नोहाच्या काळातील जलप्रलय देखील बाप्तिस्म्याप्रमाणे आहे (1 पेत्र 3:20—21). त्या जलप्रलयाद्वारे देवाने संपूर्ण जगाचा नाश केला. देवाने नोहाला तारवाद्वारे वाचविले व जलप्रलयानंतर त्याने नवीन जगामध्ये प्रवेश केला. जुने जग व त्यातील सर्वकाही जलप्रलयात पुरले गेले. आणि हीच साक्ष बाप्तिस्म्याद्वारे आपण देतो की जगासोबत आपले जुने संबंध (जगिक शैली, जगिक मित्र इत्यादी) तोडले आहेत व पाण्यातून व येत असतांना आपण नवीन जगामध्ये आलो आहोत.

बाप्तिस्म्याची पध्दत

आता आपल्यापुढे प्रश्न आहे : बाप्तिस्मा कशा पध्दतीने घ्यावा?

बाप्तिस्मा हा मराठी किंवा इंग्रजी शब्द नाही. नवीन करार ग्रीक भाषेत लिहिण्यात आला. ग्रीक भाषेतील बॅप्टो या शब्दापासून बाप्तिस्मा हा शब्द तयार झाला. बॅप्टो चा अर्थ पूर्णपणे पाण्याखाली झाकले जाणे किंवा बुडणे आणि जुन्या प्रेषितांकरिता बाप्तिस्म्याचा अर्थ हाच होता की पूर्णपणे पाण्यात बुडणे. कोणाच्या डोक्यावर पाणी शिंपडणे म्हणजे बाप्तिस्मा होत नाही.

जेव्हा फिलिप्पाने इथिओपियन षंढाचा बाप्तिस्मा केला तेव्हा असे लिहिले आहे की, ते दोघे पाण्यात उतरले... मग ते पाण्यातून वर आले (प्रेषित 8:38,39). येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस देखील आपण अशाच प्रकारे वाचतो की बाप्तिस्मा झाल्यावर तो पाण्याच्या बाहेर आला (मार्क 1:10).

नवीन करारामध्ये नेहमी पाण्यात बुडून बाप्तिस्मा केला जाईल. बाप्तिस्मा म्हणजे पूरणे म्हणून केवळ पाण्यात बुडवून बाप्तिस्मा केल्यावरच तो अर्थ पूर्ण होईल. कारण आपण कोणा व्यक्तीच्या डोक्यावर माती शिंपडून त्याला पुरत नाही, परंतु पूर्णपणे जमीनीतील खड्डयात टाकून पूर्णपणे मातीने झाकल्यावरच त्याला पुरले जाते !

यावरून हे देखील स्पष्ट होते की ज्या व्यक्तीतील जुना मनुष्य पूर्णपणे मेला आहे तो बाप्तिस्मा घेण्यास पात्र आहे. म्हणजे त्या व्यक्तीची कधीही पाप न करण्याची इच्छा असावी. केवळ मेलेल्या मनुष्यालाच पुरले जाते. जो व्यक्ती मेला नाही त्याला पुरणे गुन्हा आहे !

तीन नावात बाप्तिस्मा

येशूने अशी आज्ञा दिली की आपण पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यावा (मत्तय 28:19). नाव हे एकवचनी आहे कारण देव एक आहे. परंतु येशूने हे प्रगट केले की जरी देव एक आहे तरी त्याचे तीन व्यक्तीमत्त्व आहे जे एक दुसर्याापासून भिन्न आहे.

आपल्या पापांकरिता पिता मरण पावला नाही, पवित्र आत्मादेखील मरण पावला नाही. पुत्र मरण पावला. जेव्हा येशू स्वर्गात गेला तेव्हा तो पित्याच्या उजव्या बाजूस बसला. पवित्र आत्म्याच्या उजव्या वाजूस बसला नाही. त्याचप्रमाणे येशूने शिष्यांकरिता जो सहायक पाठविला तो पवित्र आत्मा होता, पिता नव्हे. हे ऐकतांना विलक्षण वाटेल. परंतु हे गरजेचे आहे की देवामधील या तीन व्यक्तिमत्त्वाविषयी आपण गोंधळू नये व आपल्या तारणाकरिता तिघांची जी वेगवेगळी भूमिका आहे त्याविषयी गोंधळू नये.

प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण वारंवार वाचतो की शिष्यांनी लोकांना येशूच्या नावात बाप्तिस्मा दिला (प्रेषित 2:38 इत्यादी). मत्तय 28:19 मधील येशूच्या आज्ञेप्रमाणे हे आहे का?

शास्त्रामध्ये दोन विरोधाभास असलेल्या गोष्टी जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यावर नीट अभ्यास केल्यावर आपल्याला आढळेल की दोन्हीही गोष्टी सत्य आहेत.

पिता, पुत्र व पवित्र आत्मा हे असंस्कृत त्र्येक्य नाही हे दर्शविण्याकरिता प्रेषितांनी दाखविले की पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणून त्यांनी लोकांना, पिता, पुत्र म्हणजे प्रभु येशू ख्रिस्त व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा दिला. आणि हयाला येशूच्या नावात बाप्तिस्मा असे संबोधण्यात आले.

विश्वासाचे आज्ञापालन

शिष्याच्या जीवनामध्ये बाप्तिस्मा हा आज्ञापालनाची पहिली पायरी असावा ज्याद्वारे तो जीवनकालपर्यंत आज्ञेत राहील आणि हे आज्ञापालन विश्वासाचे असावे. स्वतःच्या कारणांमुळे नसावे.

जर येशू स्वतःच्या कारणाप्रमाणे वागला असता तर तो बाप्तिस्मा घेण्याकरिता योहानाकडे गेला नसता. बाप्तिस्मा न घेण्याविषयी त्याच्याकडे पुष्कळ कारणे असतील —विशेषतः त्याने कधीही पाप केले नव्हते. येशूला बाप्तिस्मा घेण्याची का गरज आहे हे योहानाला स्वतःला कळले नाही. येशूने सर्व कारणे बाजूला सारून पवित्र आत्म्याच्या वाणीची आज्ञा पाळली (मत्तय 3:15). देवाच्या वचनात म्हटले आहे, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुध्दीवर अवलंबून राहू नको (नीति 3:5). कारण का विश्वासाचा प्रमुख शत्रू आहे. कारण मानवी कारणांमुळे आत्मिक सत्य स्वीकारले जाऊ शकत नाही.

जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपल्या शरीराच्या सर्वात शेवटी पाण्यात बुडणारा भाग म्हणजे आपले डोके. हे उपमात्मक आहे ! आपल्या कारणांचा जो अधिकारी आहे त्याला मारणे अत्यंत कठीण जाते ! आदामाची लेकरे त्यांच्या तर्कांच्या आधारावर जगत होती. बाप्तिस्मा घेत असतांना आपण अशी साक्ष देतो की आपण त्या जीवनाला मेलेले आहोत (आपण आपल्या तर्काच्या आधारावर जगत नाही), परंतु आता आपण देवाच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनावरील विश्वासाद्वारे जगतो (मत्तय 4:4, रोम 1:17).

काही ख्रिस्ती लोक बाप्तिस्म्याला क्षुल्लक समजतात. नामानाने सुरूवातीला एलीशाच्या आज्ञेचा नाकार केला की जाऊन यादेन नदीत कोड बरा होण्याकरिता सात वेळा डुबक्या माराव्या. परंतु जेव्हा त्याने ही साधी आज्ञा पाळली तेव्हा तो रोगमुक्त झाला (2 राजे 5:10—14). साध्या साध्या गोष्टींमध्ये देव आपल्या विश्वासूपणाची पारख करतो.

देवाची आज्ञा पाळण्याकरिता उशीर करू नका. जर आपला जुना मनुष्य मेला आहे तर त्याला लागलीच पुरावे. मेलेल्या माणसाला न पुरणे हा गुन्हा आहे!

तर आता उशीर का करितोस? उठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालण कर. (प्रेषित 22:16)

धडा 6
पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा

आपल्या सर्वांच्या दोन गरजा आहेत. एका गरजेचा संबंध भूतकाळाशी आहे— आपण केलेल्या पापांची क्षमा होणे आणि दुसर्यात गरजेचा संबंध भविष्यकाळाशी आहे— देवाला संतोषविणारे जीवन जगण्याची क्षमता. आपली पहिली गरज येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. दुसरी गरज पूर्ण करण्याकरिता देव आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देतो.

जीवनाकरिता व सेवा करण्याकरिता सामर्थ्य

पहिली गरज आपण स्वतः पूर्ण करू शकत नाही. देवाला ती पूर्ण करावी लागली. दुसरी गरज देखील तशीच आहे. आपण स्वतःच्या सामर्थ्याने देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाही. ख्रिस्ती जीवनाच्या सुरूवातीला पुष्कळ लोक हे जाणून घेण्याइतके समजदार असतात. म्हणून ते सरळ देवाच्या सामर्थ्याची अपेक्षा करतात. काहींना ते उशीरा कळते— ते पडतात व परत प्रयत्न करतात आणि वारंवार कित्येक वर्ष असे झाल्यावर ते देवाच्या सामर्थ्यांकरिता देवाकडे वळतात. दुःखाची गोष्ट की अद्याप असे पुष्कळ लोह आहेत जे पडत आहेत व प्रयत्न करीत आहेत आणि सतत अपयशी होत असल्यामुळे जीवनात पराभूत झालेले आहेत आता त्यांना असे वाटते की यशस्वी जीवन जगणे अशक्य आहे.

देवाची सेवा करताना व त्याच्याकरिता साक्ष होतांना वरील गोष्ट लागू होते. पुष्कळशा विश्वासणार्यांिना त्यांचे परिवर्तन झाल्याबरोबर कळते की त्यांनी प्रभुकरिता साक्ष व्हावे. परंतु त्यांना स्वतःची जीभ बांधलेली व शक्तीहीन दिसते. काहींना असे वाटते की त्यांच्या व्यक्तिमत्वात खोट आहे आणि त्यामुळे ख्रिस्ताकरिता प्रभावी साक्ष होण्याची ते आशा सोडतात.

काहींना कळते की देवाने पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देण्याचे अभिवचन दिले आहे आणि म्हणून ते हे सामर्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मिळते आणि ते सामर्थ्याने व दैवी दानांनी भरतात व न लाजता ख्रिस्ताकरिता प्रभावी साक्ष होतात.

पवित्र आत्म्याने जन्म घेणे ही एक बाब आहे आणि पवित्र आत्म्याने जन्म घेण्याद्वारे आपण देवाची लेकरे होतो. परंतु पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणे ही वेगळी बाब आहे. पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतल्यावर आपल्याविषयी देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याचे व आपल्या जीवनाद्वारे देवाची इच्छा पूर्ण होण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होते.

आपला नवीन कराराचा जन्मसिध्द हक्क

जुन्या कराराच्या अंतर्गत विशिष्ट लोकांवरच पवित्र आत्मा आला जेणेकरून देवाने दिलेले विशिष्ट काम ते पूर्ण करतील. नवीन कराराच्या अंतर्गत पवित्र आत्मा सर्वांना प्राप्त होऊ शकतो. तो आपल्याला ख्रिस्ताचे गौरव दाखविण्याकरिता व ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे करण्याकरिता आला.

बाप्तिस्मा करणार्याि योहानाने येशूच्या दोन सेवेविषयी सांगितले की तो पूर्ण करणार— एक पाप हरण करणे व दुसरी लोकांना पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणे (योहान 1:29,33). आपण दोन्हींचा अनुभव घ्यावा.

नवीन करारातील पहिले अभिवचन पुढीलप्रमाणे आहे, तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील (मत्तय 1:21). नवीन करारातील दुसरे अभिवचन येणेप्रमाणे, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे (मत्तय 3:11). हे महत्त्वाचे आहे की नवीन कराराच्या सुरूवातीलाच ही दोन अभिवचने दिली आहेत. इ. सन. सुरू होतानाच देवाने मनुष्यासोबत व्यवहार करतांना नवीन करार दिला. देवाची लेकरे या नात्याने हा आपला दुगम जन्मसिध्द हक्क आहे की आपल्याला पापापासून तारण मिळावे व आपला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा व्हावा.

देवाची इच्छा आहे की आपल्याला पूर्णपणे आपला जन्मसिध्द अधिकार मिळावा— अर्धवट नव्हे. नवीन करारातील प्रथम पाच पुस्तकांच्या सुरूवातीलाच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा मिळण्याचे अभिवचन दिले आहे (मत्तय 3:11, मार्क 1:8, लूक3:16, योहान 1:33, प्रेषित 1:5). तरी देखील पुष्कळशा ख्रिस्ती लोकांनी या अधिकाराकडे दुर्लक्ष केले आहे.

जिवंत पाण्याच्या नद्या

नवीन करारात पवित्र आत्म्याला देवाच्या सिंहासनापासून तर पृथ्वीपर्यंत वाहत येत असलेली नदी असे चित्रीत केले आहे. (प्रगटी 22:1, प्रेषित 2:33). पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणे म्हणजे धबधब्याच्या खाली पूर्णपेण डूबणे. येशूने असे म्हटले आहे की जे तहानलेले आहेत त्यांनी त्याच्याकडे यावे आणि पवित्र आत्मा प्राप्त करून घ्यावा जेणेकरून जिवंत पाण्याच्या नदया त्यांच्यातून वाहतील (योहान 7:37).

बहुतेक विश्वासणार्यांाचा अनुभव हापसीप्रमाणे आहे— प्रयत्नांचे जीवन— हापसल्यावर कोरडया ह्दयातून आशीर्वादाचे काही थेंब बाहेर येणे. असे असायला नको. जर आपले कोरडेपण आपल्याला देवाकडे नेत असले तर पुष्कळ गोष्टी वेगळया असत्या. जे लोक आपल्या संपर्कात येतात अशा लोकांकरिता आपल्यामधून आशीर्वादाच्या नद्या वाहव्यात अशी देवाची आपल्याकरिता इच्छा आहे. पहिली पायरी ही की आपण आपली गरज ओळखावी. पुष्कळ विश्वासणारे शब्दांच्या व्यर्थ वाद विवादात पडतात. परंतु आपल्याला सामर्थ्याची आवश्यकता आहे. अचूक शब्दप्रयोगांची नव्हे. आपल्याकडे अगदी बरोबर शब्द असले परंतु आपण जर हाडांप्रमाणे कोरडे असलो तर काय उपयोग ? हे बरे की प्रामाणिकपणे देवाकडे येऊन आपण कबूल करावे की आपल्यामधून आशीर्वादाच्या नद्या वाहत नाहीत. पहिले पाऊल टाकल्यावर आपण मागितलेल्या विनंतीकरिता देवावर भरवंसा ठेवावा की देव आपल्याला देईल.

पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होण्याकरीता आपल्याला तहान असण्याची आवश्यकता आहे. (तीव्र इच्छा, देवाचे गौरव व्हावे म्हणून ही इच्छा उत्पन्न व्हावी) त्याचप्रमाणे विश्वास असण्याची आवश्यकता आहे. (पूर्ण खात्री की देव आपले अभिवचन पूर्ण करेल), तर तहानले होऊन व विश्वासाने हे सामर्थ्य मागावे आणि देव आपल्याला नकार देणार नाही.

सामर्थ्य देणे

येशूच्या मागे जाण्याकरिता शिष्यांनी आपले सर्वस्व सोडले परंतु तरीदेखील देवाने दिलेली सेवा पूर्ण करण्याकरिता बाहेर निघण्यापूर्वी पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होण्याकरिता त्यांना वाट बघावी लागली. लोकांमधील सेवा सुरू करण्यापूर्वी येशूला देखील पवित्र आत्म्याने अभिषिक्त होण्याची व सामर्थ्य प्राप्त करण्याची गरज वाटली (प्रेषित 10:38). जर येशूला हया अभिषेकाची एवढी गरज पडली तर आपल्याला किती अधिक जास्त गरज आहे.

येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की सामर्थ्याचे वस्त्र त्यांना घालण्यात येणार तोपर्यंत त्यांनी यरूशलेमेत थांबावे (लूक 24:49). स्वर्गामध्ये जाण्यापूर्वी देखील येशूने परत एकवार त्यांना सांगितले की जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरेल तेव्हा त्यांना सामर्थ्य प्राप्त होईल (प्रेषित 1:8). पेंटेकॉस्टच्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्मा ओतण्यात आला. सर्व भित्र्या लोकांचे परिवर्तन होऊन ते धीट झाले व सामर्थ्याने प्रभुची साक्ष देऊ लागले (प्रेषित 2:1—4). त्यांनी जे प्राप्त केले ते येशूने सांगितल्याप्रमाणेच होते की ते सामर्थ्य प्राप्त करतील.

ख्रिस्ती जीवन जगण्याकरीता आपल्याला केवळ सिध्दांताची गरज नाही तर आपल्या जीवनामध्ये देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा मिळाल्यास आपल्याला धार्मिकतेचे व सेवेचे सामर्थ्य प्राप्त होते.

आत्म्याची निरनिराळी कार्ये

वचनात सांगितले आहे की पवित्र आत्मा वार्याेप्रमाणे आहे आणि पवित्र आत्मा वेगवेगळया वेळी वेगवेगळया दिशेने वाहतो. असेच आत्म्याने जन्मलेल्या प्रत्येकाचे आहे, असे येशूने म्हटले (योहान 3:8). पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येक विश्वासणार्यां चा अनुभव वेगवेगळा असेल. पवित्र आत्मा देण्यात आला आहे हे अधिक महत्त्वाचे आहे.

देव आत्म्याद्वारे सामर्थ्याची दाने देतो जेणेकरून शरीर म्हणजे त्याची मंडळी उभारण्याची सेवा आपण प्रभावीपणे करावी. कोणाला कोणते दाने द्यावी हे तो ठरवितो.

भविष्यवाणी (सामर्थ्याने आव्हानात्मक संदेश देण्याची पात्रता त्याचप्रमाणे धीर देण्याची व प्रोत्साहन देण्याची पात्रता) या दानांमध्ये महत्त्वाचे दान आहे (1 करिंथ 14:1—5). सेवा करण्याचे, शिक्षण देण्याचे, रोग बरे करण्याचे, ताकीद देण्याचे, पैसे देण्याचे, पुढारीपणाचे व इतरत्र निरनिराळी दाने आहेत (रोम 12:6—8,1 करिंथ 12:8—10). अपरिचित भाषा बोलण्याची पात्रता (अनन्य भाषेचे दान) हे दान देखील देव देतो जेणेकरून आपण प्रार्थना करू व त्याची उपकारस्तुती आपल्या मातृभाषेच्या व विचारांच्या सिमेपलीकडे करू.

जर तुमचा आत्म्याने बाप्तिस्मा झाला नाही तर हया तुमच्या जन्मसिध्द अधिकाराची इच्छा बाळगा व त्यासाठी देवाकडे विनंती करा की देवाने तुम्हाला खात्री द्यावी. तुम्ही वाईट असतांनाही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल. ... तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही (लूक 11:13, याकोब 4:2). म्हणून अंतःकरणापासून अश्रू गाळून मागा आणि याकोबाने झोंबी खेळतांना देवाला जसे म्हटले तसे म्हणा, तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही (उत्पत्ती 32:26).

देव भेदभाव करीत नाही. जे त्याने इतरांसाठी केले ते तो तुम्हासाठी करेल. आज देखील त्याचा मनापासून शोध करणार्यांतना तो पारितोषिक देणारा देव आहे. (इब्री 11:6). ज्यांना त्याचे गौरव करण्याची इच्छा आहे त्यांना पूर्ण पवित्र आत्मा देण्यात तो अधिक इच्छूक आहे.

धडा 7
पवित्रीकरण

शुभवर्तमानाचा दोन बाजू असलेला संदेश येशूने पापात सापडलेल्या स्त्रीसाठी वापरलेल्या शब्दांमध्ये सारांशीत केला आहे.

(i). मी तुला दोष देत नाही, (ii). यापुढे पाप करू नको (योहान 8:11)

नीतिमान ठरविल्या जाणे म्हणजे ख्रिस्ती जीवनाची धाव धावण्यास सुरूवात करणे. पवित्रीकरण म्हणजे धावत असलेल्या धावेची बांधून दिलेली धावपट्टी. पवित्रीकरण म्हणजे वेगळे करणे यामुळे पवित्रीकरण हे पापापासून, जगापासून व स्वतःच्या जीवनापासून वेगळे होण्याची प्रक्रिया.

देवाचा आपल्याकरिता उद्देश

आपल्यापैकी पुष्कळ लोक प्रथम ख्रिस्ताकडे स्वार्थी भावनेने येतात— स्वतःकरिता काही लाभ घडावा म्हणून येतात— अर्थात रोगातून बरे होण्याकरिता किंवा नरकाच्या अग्नीकुंडातून मुक्त होण्याकरिता. परंतु आपण स्वार्थी असतांना सुध्दा देव आपला स्वीकार करतो. उधळया पुत्राच्या पित्याने त्याच्या पुत्रावर अधिक प्रीती केली, जरी नंतर त्याचा मुलगा स्वतःचे पोट भरण्याच्या हेतूने त्याच्याकडे परत आला तरी सुध्दा परत त्याने त्याचा स्वीकार केला. अशा प्रकारे देव चांगला आहे!

आपण केवळ स्वर्गाला जाण्याच्या हेतुने जर ख्रिस्ती जीवन जगत आहोत तर ही दुःखाची बाब आहे. आपल्या जीवनाकरिता देवाचा उद्देश आपल्याला जितका अधिक कळेल तितके आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. इफिस येथील ख्रिस्ती लोकांकरिता पौलाने प्रार्थना केली की, त्याचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्यांच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती हे त्यांनी ओळखून घ्यावे (इफिस 1:18).

रोम 8:29—30 मध्ये पाचारणामुळे निर्माण होणार्याघ आशेविषयी सांगितले आहे. ज्याच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले हयात हेतु हा की तो पुष्कळ बंधुजनांमध्ये जेष्ठ असा व्हावा. देवाचा उद्देश हा आहे की आपण ख्रिस्ताच्या प्रतिरूपात परिवर्तित व्हावे आणि यासाठीच पवित्रीकरण आहे— दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे होत जाणे. ही ख्रिस्ती धाव आपण धावत आहोत. ती धावत असतांना आपली दृष्टी ख्रिस्ताकडे आहे ज्याने आपल्यापुढे ही धाव संपविली आहे. (इब्री 12:1,2).

पापाच शेवट

या धावेतील पहिले पाऊल हे आहे की कळत पाप करणे थांबवावे. नियमशास्त्रात पाप थांबविण्याकरिता जावले नाही. परंतु नवीन करारात सर्व प्रेषित सहमत होते की शुभवर्तमानाचा दोन बाजू असलेला संदेश ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे आहे. दोषापासून मुक्ती व पापास रोकधाम.

पौल म्हणतो, पाप करू नका (1 करिंथ 15:34). योहान सांगतो, तुम्ही पाप करू नये महणून हे मी तुम्हास लिहिलो (1 योहान 2:1). पेत्राने याठिकाणी आपल्याला कळकळून सांगितले की पापापासून निवृत्त व्हा. (1 पेत्र 4:1).
रोम 5 मध्ये पौलाने विश्वासाद्वारे पवित्रीकरणाविषयी स्पष्टीकरण दिल्यावर पुढील प्रश्न विचारला, तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात रहावे काय? (रोम 6:1) आणि परत (अधिक कळकळीने) तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? (रोम 6:15) दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे, नाही आपण कधीच पाप करू नये.

काय हा सल्ला कठीण व ओझ्याने भरलेला संदेश वाटतो? ज्यांना पाप करीत राहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे ओझे असावे ! परंतु जे पापाच्या बंधनाला कंटाळले आहेत व थकले आहेत त्यांच्याकरिता हा मुक्तीचा संदेश आनंदमय आहे. बंदिवानाला जर तो सुटणार असा संदेश सांगितला तर त्याला आनंद होईल. त्याला ते दडपण किंवा ओझे वाटणार नाही. वाटेल काय? संदेश सांगून पुढील गोष्टी करण्याकरिता येशूचा अभिषेक करण्यात आला, धरून नेलेल्यांची सुटका (पापापासून), ठेचले जात आहेत (सैतानाद्वारे) त्यास सोडवून पाठवावे (लूक 4:18).

नवीन कराराचे गौरवी अभिवचन पुढीलप्रमाणे आहेः तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही (जुन्या कराराच्या) तर कृपेच्या अधीन आहात (येशूने स्थापीलेल्या नवीन कराराच्या) (रोम 6:14). विजय मिळण्याकरिता पहिली पायरी ही आहे की विजयी जीवन आपल्याला मिळू शकते असा विश्वास ठेवावा.

मोह व पाप

मोह होणे व पाप करणे यात अंतर आहे. बायबल सांगते, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो, मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते (याकोब 1:14, 15). जर आपल्या देहात आपण वासनेला गर्भवती होऊ दिले नाही तर आपल्या अंतःकरणात पापाचा जन्म होत नाही. जेव्हा आपल्या मनामध्ये वासना येते तेव्हा आपण मोहात पडतो. जर आपले मत मोहाशी सहमत होते तेव्हा आपण भुलविले जातो व पापाला जन्म देतो. मोह आल्यास आपण दुष्ट होतो असे नाही. येशूची देखील परीक्षा झाली. परंतु त्याने कुठल्याही प्रकारे कधीही पाप केले नाही आणि यामुळे तो पूर्णपणे शुध्द होता. शास्त्र सांगते की, म्हणून त्याला सर्वप्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होत. ......तर तो सर्वप्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता (इब्री 2:17, 4:15). आपल्यासारखीच त्याची परीक्षा झाली तरी तो निष्पाप राहिला.

हे आपल्या प्रत्येकाला अद्भुत असे वाटणार नाही कारण आपण असा विचार करतो की येशू देव असल्यामुळे सहजरीतीने पापावर विजय मिळवू शकतो. परंतु लक्षात ठेवा की पृथ्वीवर येण्यापूर्वी येशूने स्वतःला रिक्त केले होते जेणेकरून देवाच्या बरोबरीचे त्याच्या ठायी काही नव्हते (फिलिप्पै 2:6,7). जरी तो देव होता तरी तो पृथ्वीवर मनुष्य बनून राहिला. आज तो आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे जे सामर्थ्य देऊ करतेा तेच सामर्थ्य त्याच्या ठायी होते. यामुळे आपल्याला धाव धावण्यास सांगितले आहे, येशूकडे दृष्टी लावून. पापासोबत आपण आज लढत असतांना येशूचा कित्ता घेऊन प्रोत्साहीत होऊ शकतो. (इब्री 12:2—4) कारण आपण ज्या परीक्षेंना तोंड देतो त्या सर्व परीक्षेंवर त्याने मनुष्याच्या रूपात असतांना विजय मिळविला आहे. अशा प्रकारे तो आपल्यापुढे धावणारा झाला व आपल्याकरिता कित्ता असा झाला (इब्री 6:20).

सुभक्तिचे रहस्य.... तो देहाने प्रगट झाला.... व आत्म्याने नीतिमान ठरला. (1 तीमथ्य 3:16). जरी त्याला मनुष्याचे शरीर होते तरी त्याने संपूर्ण जीवनात आत्म्यास शुध्द ठेवले. याद्वारे आपल्याला देखील आशा मिळते की आपण देखील त्याच्यासारखा विजय मिळवू शकतो. कारण त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापीत केला त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला वैर्य झाले आहे. (इब्री 10:20). हा पवित्रीकरणाचा मार्ग आहे.

नवीन मनुष्य व जुना मनुष्य

आपण आधीच बघितले की आपल्यातील जुना मनुष्य अविश्वासू दासासारखा होता जो चोरांना घरात प्रवेश करू देत होता. जुन्या मनुष्याला खिळण्यात आले पुरण्यात आले. आता आपल्या ठायी नवीन मनुष्य आहे जो म्हणतो, हे देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे (इब्री 10:7).

तरी देखील येशूच्या शिष्यांनी पापात पडणे शक्य आहे. ज्याप्रकारे मांजरीने चिखलात पडणे व डुकराने स्वतः चिखलामध्ये उडी घेणे यात फरक आहे त्याचप्रमाणे शिष्यांनी पापात पडणे व अविश्वासणार्यांिनी पाप करणे यात फरक आहे ! मांजरीला चिखलाच्या पाण्यात पडण्यास आवडत नाही परंतु ती नकळत पडू शकते. डुकरास चिखलाच्या पाण्यात आवडत. हा स्वभावगुणाचा प्रश्न आहे. येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या ठायी नवीन स्वभाव असतो त्यामुळे त्यांना शुध्दता आवडते आणि ते पापाचा तिरस्कार करतात. जुन्या मनुष्यास पाप करण्यास आवडते. नवीन मनुष्यास कधीही पाप करण्यास आवडत नाही. परंतु नवीन मनुष्य जर पुरेसा बळकट नसेल तर तो आपल्या अंतःकरणाचे दार बंद ठेवू शकणार नाही. जेणेकरून देहाची वासना आत शिरणार नाही. त्याला हया वासना आवडतात अशातला भाग नाही. नाही. परंतु तो प्रतिकार करण्यास बळकट नसल्यामुळे तो पापात पडतो. त्याने देवाच्या वचनाद्वारे अन्न सेवन न केल्यामुळे किंवा प्रार्थनेद्वारे आवश्यक तेवढे सामर्थ्य न मिळविल्यामुळे त्याच्या ठायी तेवढी शक्ती नसते.

म्हणून पाप करणे व पापात पडणे यात फरक आहे. हा फरक समजणे महत्त्वाचे आहे.कारण हा समजल्यास आपण पुष्कळशा अनावश्यक दोषी भावनांपासून स्वतःला दूर ठेवू.

बायबल सांगते, पाप करणारा (जो स्वेच्छेने कळत असून पाप करतो) सैतानाचा आहे (1 योहान 3:8). दुसर्या् बाजूला योहान विश्वासणार्यांेना लिहितो, जर कोणी पाप केले (म्हणजे जर कोणी मोह झाल्यास पापात पडतो) तर नीतिसंपन्न असा जो ख्रिस्त येशू तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे (1 योहान 2:1,2).

कळत नकळत केलेले पाप

पापात पडणे व पाप असणे यात फरक आहे. पाप असणे हे आपल्या व्यक्तिमत्त्वातील नकळत असलेले पाप आहे— ते पाप ज्याची आपल्याला जाणीव नाही, दुसरे जे आपल्यापेक्षा अधिक परिपक्व आहेत ते आपल्यामधील हे पाप ओळखू शकतात. पंरतु असे नकळत असलेले पाप आपल्याला कधीच दोघी ठरवीत नाही. कारण देवाचे वचन असे सांगते, नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही (रोम 5:13). (हयाचा असाही अर्थ होतो की आपल्या जागृत मनाला जेव्हा पापाची जाणीव नसते तेव्हा ते पाप गणत नाही.)

आपण प्रकाशात चालत असलो तरी आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत आपल्यामध्ये काही प्रमाणात नकळत पाप राहणारच. बायबल सांगते, आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठायी सत्य नाही (1 योहान 1:8). जो असे म्हणतो की त्याच्या ठायी पाप नाही तो असा दावा करतो की तो ख्रिस्तासारखा परिपूर्ण झाला आहे परंतु देवाचे वचन सांगते, आपण त्याच्यासारखे होऊ तो प्रगट होईल तेव्हा, परंतु त्यापूर्वी नाही (1 योहान 3:2). जे असा दावा करतात की त्यांचे पूर्णपणे पवित्रीकरण झाले आहे व ते परिपूर्ण झाले आहेत ते स्वतःला फसवीत आहेत.

नकळत केलेल्या पापाला देखील शुध्द करण्याची गरज आहे व जर आपण प्रकाशात चालत असलो तर येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुध्द करिते (1 योहान 1:7) न भिता आपण अगम्य पवित्र देवाच्या उपस्थितीत धैर्याने उभे राहू शकतो.

आपल्याला नीतिमान ठरविण्याकरिता ख्रिस्ताच्या रक्तात हे सामर्थ्य आहे. हालेलुया !

दया व कृपा

आपल्याला सांगितले आहे, आपल्यावर दया व्हावी व ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ (इब्री 4:16). दया व कृपा एक नाही. दया आपल्या पापांच्या क्षमेविषयी आहे. तिचा संबंध आपल्या भूतकाळाशी आहे. परंतु आपल्याला कृपेची देखील गरज आहे— भविष्यातील ऐनेवेळेकरिता.

ऐनवेळ म्हणजे परीक्षेची वेळ, जेव्हा पेत्रासारखे गालील समुद्रात पाण्यात डुबण्याचा आपल्यावर प्रसंग येईल (मत्तय 14:30). हयाचा अर्थ असा की कृपेकरिता जेव्हा आपण आरोळी मारू आणि ज्याप्रकारे ख्रिस्ताने पेत्राकडे आपले लगेच हात पुढे केले त्याप्रमाणे आपल्याला देखील लगेच कृपा प्राप्त होईल जेणेकरून आपण पडणार नाही परंतु उभे राहू.

देव आपल्याला पडू देत नाही हयाची खात्री पटवून देण्याकरीता देवाच्या वचनात आपल्याला अद्भुत अशी अभिवचने दिली आहेत. त्यापैकी काही वचनांकडे पहाः

सर्वप्रथम, आपल्याला असे अभिवचन दिले आहे की आपण सहन करू शकणार नाही त्यापलीकडे देव आपल्यावर कोणतीही परीक्षा ओढवू देणार नाही. मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तरी परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, हयासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे (1 करिंथ 10:13). देवाचे वचन असे देखील सांगते, तुम्हास पतनापासून राखण्यात आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास तो समर्थ आहे (यहूदा 24).

ही अभिवचने व देवाच्या वचनात आणखी पुष्कळ अद्भुत अभिवचने आहेत की आपण पाप करीत राहण्याची गरज नाही. केवळ देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपले जीवन जगू शकतो (असे 1 पेत्र 4:2 मध्ये सांगितले आहे.).

वाढत जाणारे पवित्रीकरण

येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की त्यांनी इतरांना त्याच्या आज्ञा पाळण्यास शिकवावे (मत्तय 28:20). जो प्रभुवर प्रिती करतो तो आपल्या संपूर्ण अंतःकरणाने प्रभुच्या आज्ञा कोणत्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करील आणि नंतर त्या आज्ञेचे पालन करण्याचा तो प्रयत्न करील (योहान 14:21). नियमाच्या अंतर्गत देवाने मनुष्याला आज्ञा दिल्या परंतु आज्ञापालनाचे सामर्थ्य दिले नाही. मग देवाने नियम का दिले? मनुष्याला केवळ याची जाणीव करून देण्याकरिता की तो देवाने सांगितलेल्या आदर्शापर्यंत पोहचू शकत नाही आणि त्याला तारणार्या ची व मदतगाराची गरज आहे. हयावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे बालरक्षक होते (गलती 3:24).

परंतु आता देवाने आपल्यासोबत नवीन करार केला आहे. त्याने आपल्याला केवळ आज्ञाच दिल्या नाही तर प्रभु येशू ख्रिस्ताच्या रूपात येऊन कित्ता दिला आहे. ख्रिस्ताने जगामध्ये जीवन जगून प्रात्यक्षिक दाखविले आहे की देवाच्या आज्ञेचे पालन करणे शक्य आहे. नवीन करारामध्ये देवाने हे देखील अभिवचन दिले की तो त्याच्या आज्ञा आपल्या मनावर अंतःकरणावर लिलील (इब्री 8:10). तो आपल्यामध्ये राहणार्यान पवित्र आत्म्याद्वारे असे करतो. पवित्र आत्मा आपला सहायकर्ता आहे जो केवळ आपल्याला देवाची इच्छाच दाखवीत नाही तर आपल्यामध्ये देवाची इच्छा पूर्ण करण्याची आवड निर्माण करतो व देवाच्या आज्ञा पाळण्याची आपल्याला कृपा देतो.

आपले पूर्णपणे पवित्रीकरण करणारा केवळ देवच आहे. (1 थेस्सलनी 5:23). आपण असे स्वतःच्या बळावर करू शकत नाही. आपल्याला त्याच्यावर अवलंबून रहावे लागते कारण तोच आपल्यामध्ये इच्छा जागृत करतो व आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य देतो. परंतु आपण भित व कापत आपले तारण साधून घ्यावे (फिलिप्पै 2:12,13). देव आपल्यामध्ये जे कार्य करतो त्यास आपण साथ द्यावी, त्याने आपल्याला यंत्रमानव बनविलेले नाही.

देव आपल्याला पापाच्या दोषारोपापासून शुध्द करितो. परंतु आपल्याला पुढील आज्ञा दिली आहे, देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुध्दतेपासून आपण स्वतःला शुध्द करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णत आणू (2 करिंथ 7:1). जेव्हा आपल्यामध्ये असलेल्या पापावर प्रकाश टाकला जातो तेव्हा आपण असे करावे.

जेव्हा आपण आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारतो (रोम 8:13) तेव्हा आत्म्याचे फळ आपल्याला दिसते— प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमन, हेच ख्रिस्ताच्या स्वरूपाचे होणे आहे. अशा प्रकारे आपला मार्ग अधिक आणि अधिक प्रकाशमय होईल (नीतिसूत्रे 4:18). हा पवित्रीकरणाचा गौरवी मार्ग देवाने आपल्याकरिता तयार केला आहे.

धडा 8
देवाचे वचन व प्रार्थना

नवीन बाळाचा जन्म झाल्यावर त्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते आणि ती म्हणजे अन्न आणि हवा. जे आध्यात्मिक जीवनाचा अनुभव घेतात त्यांचेही अगदी तसेच आहे. आत्मिक रीतीने जन्मलेल्या मुलास खाण्याची व श्वास घेण्याची गरज असते.

देवाचे वचन त्योच अन्न असते आणि प्रार्थना ही त्याचा श्वास असते.

देवाचे वचन— आपले आध्यात्मिक अन्न

लहान बाळाच्या जेवनाची सुरूवात ही दुधापासून होते व नंतर त्याला जड अन्नाची गरज असते. बायबलमध्ये दूध व जड अन्न असे दोन्ही प्रकारचे जेवण आहे.The milk is called "the elementary teaching about the Christ" (Hebrews 6:1); जड अन्न हे नीतिमत्त्वाचे अन्न हे होय (इब्री 5:13).

देव देत असलेल्या प्रकाशाप्रमाणे आपण किती लवकर चालू लागतो, त्यावर आपले जर सेवन करणे अवलंबून आहे.

आपली आध्यात्मिक वाढ ही विश्वास आणि आज्ञाधारकतेवर अवलंबून आहे. देवाने त्याच्या वचनात आपल्याला अभिवचने दिली आहेत जेणेकरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. त्याने आज्ञापालनाकरिता आज्ञाही दिल्या आहेत. जर आम्ही नियमितपणे देवाच्या वचनावर मनन करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो व त्याचे पालन करतो तर आपल्याला हे कळून येईल की आपण देवामध्ये सदा हिरव्या असलेल्या झाडासारखे अधिक खोलवर रूजलेले आहोत ज्याची पाने कोमेजत नाहीत. नंतर देव आपल्याला अशा प्रकारे आशीर्वाद देतो की, जे काही आपण करतो त्यात तो आपली भरभराट होते (स्तोत्र 1:2,3).

केवळ आपल्या बौध्दिकतेप्रमाणे अभ्यास करून आपण देवाच्या वचनास समजू शकत नाही. आपल्याला पवित्र आत्म्याच्या प्रगटीकरणाची गरज असते. येशूने म्हटले की ज्ञानी व विचारवंत हयांच्यापासून हया गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रगट केल्या (मत्तय 11:25).

बाळकांमध्ये काय आहे जे ज्ञानी व विचारवंतामध्ये नाही? शुध्द ह्दय !

देव अंतःकरणाने चाचपतो, डोके नाही, जे नम्र आहेत आणि जे त्याच्या वचनाने कंपायमान होतात त्यास तो प्रगटीकरण करतो (यशया 66:2).

येशूने म्हटले, जे कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनीषा बाळगेल त्याला देवाचे वचन समजेल (योहान 7:17).

देवाचे वचनः आत्म्याची तरवार

देवाचे वचन हे शस्त्रसुध्दा आहे जे आपण सैतानाच्या विरूध्द युध्दात वापरतो. इफिस 6:17 मध्ये त्याला आत्म्याची तरवार सुध्दा म्हटले आहे.

जंगलामध्ये परीक्षा होत असताना शेवटच्या तीन परीक्षेंमध्ये येशूने स्वतः या शस्त्रांचा उपयोग मोठया सामर्थ्याने केला. प्रत्येक वेळेस त्याने सैतानाच्या विरोधात बोलतांना त्याने असे लिहिले आहे....असा प्रतिहल्ला केला (मत्तय 4:4, 7,10).

असे त्याने जिंकले आणि आपल्यालाही जिंकायचे आहे.

सैतान हा दोष लावणारा आहे. त्याच्या दोषारोपामधील आणि पवित्र आत्म्याच्या मतांमधील फरक आपण जाणायलाच हवा. सैतान नेहमी आपल्याला छळायच्या प्रयत्नात असतो आणि त्याच्या दोषारोपाद्वारे आपण दोषी असल्याची भावना आपल्यामध्ये उत्पन्न करतो. दुसरीकडे पवित्र आत्म्याची खात्री आपल्याला सौम्यता आणि पूर्ण आशा देते.

आपण दोषारोप करणार्यापला केवळ कोंकर्यापच्या रक्ताने व आपल्या साक्षीने जिंकू शकतो (प्रगटीकरण 12:11). आपल्या भूतकाळातील पापाविषयीचे त्याचे दोषारोप केवळ त्याला आपल्या साक्षीने जिंकू शकते ती साक्ष म्हणजे ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या रक्ताने शुध्द केले आहे आणि आपल्याला पूर्णपणे नीतिमान ठरविले आहे. येशूने जे शस्त्र वापरले तेच आपणही वापरायला हवे, असे लिहिले आहे...

सैतानाला देवाच्या वचनाची साक्ष देणे हे केवळ सैतानाच्या दोषारोपासच जिंकत नाही तर निराशा व चिंता यावरही ते मात करते व सैतानाने आपल्या मनामध्ये जे अन्य मोहांचे घर केले आहे त्यावरही ते मात करिते.

म्हणूनच देवाचे वचन चांगल्यारितीने समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पवित्र आत्मा आपल्या गरजेच्या वेळेस योग्य वचन आपल्या मनात टाकू शकेल.

म्हणून दररोज देवाच्या वचनावर मनन करण्यासाठी व देवाने आपल्यासोबत

बोलण्यासाठी वेगळा वेळ असणे चांगले आहे. जेव्हा आपण देवाचे वचन आपल्या अंतःकरणात लपवून ठेवितो तेव्हा ते आपल्याला त्याच्याविरूध्द पाप करण्यासाठी थांबविते (स्तोत्र 119:11).

आपल्या जीवनाकरिता देवाची योजना

आपल्या जीवनाकरिता देवाची परिपूर्ण योजना आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला मार्गदर्शन करू इच्छितो. पृथ्वीवर जीवन जगतांना सर्वात आशीर्वादित जीवन जर कोणते असेल तर ती योजना पूर्ण करणे. व्यवसायाची निवड करण्यात किंवा विवाहात हे जाणून घेणे किती चांगले आहे की देवाने आपल्याकरिता पूर्वीच योजना आखून ठेवली आहे ! जर आपण त्याचा मार्ग निवडतो, तर सैतानाने निर्माण केलेल्या अनपेक्षित धोक्यास आपण टाळू शकतो. ते मुख्यतः त्याच्या वचनाद्वारे होते, जेणेकरून देव त्याच्या योजनेत मार्गदर्शन करतो.

देवाची योजना जाणणे हा अभ्यासात्मक विषय आहे आणि तो फाईंडिंग गॉड्स वील या माझ्या पुस्तकात पूर्णपणे अंकीत केलेला आहे.

आध्यात्मिक रीतीने विवाह करणे हे सुध्दा माझ्या सेक्स, लव्ह अॅण्ड मॅरेज— ख्रिस्ती मार्गदर्शन या पुस्तकात पूर्णपेण घेतलेला आहे.

प्रार्थना— देवाशी बोलणे

देवासोबत संवाद साधणे ही दोन मार्गाची बाब आहे. आपण प्रथम देवाचे बोलणे त्याच्या वचनाद्वारे ऐकतो. आणि नंतर आपण त्याच्याशी बोलतो.

परंतु प्रार्थना ही केवळ देवाजवळ विनंत्या मांडणे नव्हे. प्रार्थनेचा मुख्य भाग हा वधू वरामध्ये असलेल्या सहभागितेसारखी आपली देवासोबत असलेली सहभागिता होय.

वधूने तिच्या वराशी कसे बोलावे यात कोणतेही नियम नसतात.

परंतु शिस्त म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये पुढील गोष्टी असाव्या.

 1. 1. स्वर्गीय पित्याची स्तुती,
 2. 2. पाप व चुकांची कबूली,
 3. 3. देवाच्या राज्याविषयी विनवण्या,
 4. 4. आपल्या गरजाविषयी विनवणी,
 5. 5. इतरांच्या गरजांकरिता मध्यस्थी,
 6. 6. देवाने जे आपल्याकरिता केले त्याबद्दल उपकार मानणे,
 7. 7. देव जे करणार आहे त्याबद्दल उपकार मानणे.
 8. येशूने आपल्याला सर्वदा प्रार्थना करण्यास सांगितले (लूक 18:1).

  अशी चांगली सवय आपण लावावी की आपण देवाला रोजच्या जीवनातील लहान लहान गोष्टींविषयी सांगावे व संपूर्ण दिवसभर प्रार्थनेच्या आत्म्यात रहावे. अशा प्रकारे देवाशी बोलणे आनंदमय होईल. रूढी किंवा परंपरा होणार नाही. देव आपल्या अंतःकरणाशी अद्भुत रीतीने बोलतो हे आपल्या लक्षात येईल.

  परंतु प्रार्थनेच्या शाळेत हे अगदी सुरूवातीचे धडे आहेत. जर आपण विश्वासू राहिलो तर आपण पुढे वाढत जाऊ.

  कोणत्याही परिस्थितीत आपली प्रार्थना कोरडी किंवा रूढींसारखी रिक्त नसावी. प्रार्थना ही श्वासोश्वासाप्रमाणे आहे. जर आपल्याला श्वास घेतांना त्रास होतो तर आपल्याला कळते की काही तरी चुकले आहे. देवाला कधीही असे वाटले नाही की प्रार्थना कोरडी व कंटाळवाणी असावी.

  परंतु आपली उन्नती होत असतांना आपल्याला कळेल की प्रार्थना एक कष्टाचे काम आहे. जर प्रार्थनेविषयी आपण देवाने दिलेल्या लहान ओझ्यांप्रती विश्वासू राहतो तर देव आपल्याला अधिक आणि अधिक ओझे देत आहे असे आपल्याला जाणवेल. अशा प्रकारे आपण देव इतरांना देत असलेल्या आशीर्वादाच्या कामात देवासोबत सहकर्मी होऊ.

  येशूने मोठया आक्रोशाने अश्रू गाळीत प्रार्थना केली (इब्री 5:7). एकदा जेव्हा तो गेथसेमेनी बागेत प्रार्थना करीत होता तेव्हा त्याचा घाम रक्ताच्या मोठया थेंबाप्रमाणे खाली पडत होता (लूक 22:44). त्याची प्रार्थना कळकळीची होती.

  एकदा त्याने संपूर्ण रात्र प्रार्थनेत घालविली (लूक 6:12). येशूला अरण्यात एकांतात जाऊन प्रार्थना करण्याची सवय होती (लूक 5:16) कोणी म्हटले आहे, ज्याप्रकारे पर्यटक नवीन ठिकाणी आल्यावर निसर्गरम्य दृश्य बघण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्याचप्रकारे येशू नवीन ठिकाणी नेहमी प्रार्थनेकरिता शांत जागा शोधीत असे.

  येशूच्या उदाहरणावरून आपल्याला कळते की प्रार्थना फार महत्त्वाची आहे. जर येशूला प्रार्थनेीच एवढी गरज पडली तर तुम्हाला आणि मला किती अधिक प्रमाणात प्रार्थनेची गरज आहे. तर आळसाविरूध्द लढा व कितीही किंमत मोजावी लागली तरी प्रार्थना करणारा पुरूष किंवा स्त्री होण्याचा प्रयत्न करा.

धडा 9
सहभागिता व मंडळी

आपण बघितले आहे की देवाची इच्छा आहे की आपण ख्रिस्ताच्या स्वरूपात परिवर्तित व्हावे. परंतु ख्रिस्ताच्या इतर शिष्यांपासून वेगळे एकांतात राहिल्याने हे परिवर्तन घडून येत नाही. ख्रिस्ताच्या शिष्यांसोबत राहिल्यानेच हे परिवर्तन घडून येते.

देवाची अशी इच्छा आहे की आपण केवळ त्याच्यावरच अवलंबून राहू नये तर आपली इतरांसोबत देखील सहभागिता असावी. जुन्या कराराच्या काळात देव थोर पुरूषांद्वारे कार्य करीत होता— मोशे, एलीया, बाप्तिस्मा करणारा योहान इ.

परंतु नवीन कराराच्या अंतर्गत देवाची अशी इच्छा आहे की शिष्यांचे एकत्रित मिळून शरीर घडावे आणि त्याचा मस्तक ख्रिस्त असावा आणि हयालाच मंडळी म्हणावे— ख्रिस्ताचे शरीर (इफिस 1:22, 23, 2:14—16).

मंडळी ख्रिस्ताचे शरीर

चर्च ही इमारत नव्हे किंवा कुठला संप्रदाय नव्हे. नवीन करारातील मंडळी या शब्दाचा ग्रीक शब्द इक्लेसिया आहे, ज्याचा अर्थ पाचारलेल्या लोकांचे एकत्रित येणे. म्हणजे या लोकांना जगापासून वेगळे करून देवाच्या मालकीचे होण्याकरिता पाचारण्यात आले आहे.

संपूर्ण जगामध्ये ज्यांनी पापापासून व जगापासून वेगळे होण्याकरिता देवाच्या पाचारणाला प्रतिसाद दिला आहे त्यांच्या द्वारे मंडळी स्थापीत झाली आहे—ख्रिस्ताचे शरीर स्थापीत झाले आहे. प्रत्येक समाजामध्ये ख्रिस्ताच्या शरीराच्या या घटकांनी मिळून त्या शरीराचे स्थानीय अविर्भाव व्हावे.

ख्रिस्ताचे प्रथम शरीर ते आहे जे त्याने धारण करून जगामध्ये जन्म घेतला. या शरीरामध्ये देवाने स्वतःला जगास प्रगट केले. येशू परिपूर्ण रीतीने पित्याच्या इतक्या अधीन होता की त्याने म्हटले, ज्याने मला पाहिले आहे त्योन पित्याला पाहिले आहे (योहान 14:9).

आता, आपल्याला हे पाचारण झाले आहे की आपण मिळून जगातील सभोवताली असलेल्या लोकांमध्ये ख्रिस्ताचे प्रतिनिधित्त्व करावे. कोणीही स्वतः ख्रिस्ताचे पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व करू शकत नाही. आपल्याला एक दुसर्यां ची गरज आहे. आपल्यातील जे उत्तम ते देखील अद्याप समतोल नाहीत. आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये उणीवा देखील आहेत. आपण एका दिशेने ख्रिस्ताला प्रतिबिंबीत करू शकतो परंतु दुसर्या दिशेने प्रतिबिंबीत करण्यात आपण उणे आहोत. परंतु आपल्या प्रत्येकात उणीवा असल्या तरी आपण एकत्र मिळून आपल्या सर्वांच्या चांगल्या गोष्टींना एकत्रित आणून समतोलता साधू शकतो. जर आपण एक दुसर्यांपसोबत प्रीतीत व एकदुसर्‍यांच्या अधीनतेत राहिलो तर आपल्याद्वारे अविश्वासणार्या जगाला ख्रिस्त परिपूर्ण रीतीने प्रतिबिंबीत केल्या जातो. मंडळीकरीता देवाचा हाच उद्देश आहे.

स्थानीय मंडळीचा घटक होणे

तुमचे परिवर्तन झाल्याबरोबर तुम्ही ख्रिस्ताच्या शिष्यांबरोबर जे देवाचे वचन पाळू इच्छितात व ख्रिस्ताच्या मार्गावर चालू इच्छितात. त्यांच्यासोबत सहभागिता ठेवावी.

अशा वेळेस ख्रिस्ती जगामध्ये असलेल्या विभिन्न व असंख्य गट व संप्रदायामुळे परिवर्तित झालेला नवीन व्यक्ती गोंधळल्या जातो. सिध्दांतांच्या एका टोकापासून दुसर्याव टोकापर्यंत असे पुष्कळ आणि पुष्कळ गट आहेत जे असा दावा करितात की पृथ्वीवर केवळ तेच खरे ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहेत.

यापैकी पुष्कळसे गट बायबल आपटून सांगतील व सिध्द करतील की जोवर तुम्ही त्यांचे घटक होणार नाही तोवर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचा घटक होऊ शकत नाही !

अशापैकी पुष्कळ गटांना हे पटवून सांगणे अशक्य आहे की देवाची पुष्कळ लेकरे आहेत जी त्यांच्या गटामध्ये नाहीत व जी त्यांच्या सिध्दांताप्रमाणे चालत नाहीत! ही कलुषीत मताची शक्ती आहे. तुम्ही सावध असा की आजच्या जगामध्ये असलेल्या कट्टरपंथीवादाच्या कचाटयात तुम्ही सापडू नये.

जे लोक प्रभुवर प्रिती करतात व जे विश्वासूपणे त्याच्या मार्गावर चालण्याची इच्छा बाळगतात त्यांच्याकरिता आपले अंतःकरण उघडे ठेवा. त्यांचे व तुमचे सिध्दांत कदाचित एक नसतील. परंतु जर ते देवाने दिलेल्या प्रकाशात चालत असतील तर ही तेवढी गंभीर बाब नाही. देवाने आपल्याला दिलेल्या प्रकाशामध्ये त्यांनी चालावे अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही.

देवाच्या सर्व लेकरांचा स्वीकार करणे

देवाला जेवढी लेकरे आहेत तेवढे आपल्याला बहीण व भाऊ आहेत. देवाने स्वतः ज्यांचा स्वीकार केला आहे त्यांचा आपण पूर्ण मनाने स्वीकार करावा (रोम 14:1, 15:7). येशूला कोणाला आपला भाऊ म्हणण्यास लाज वाटत नाही तर आपल्यालाही वाटू नये (इब्री 2:11). विश्वासणारे सहभागितेविषयी दोन प्रकारे जहालमतवादी होऊ शकतात. एक म्हणजे, सहभागिता ठेवण्याकरिता सत्याविषयी तडजोड, दुसरे सहभागितेपूर्वी प्रत्येक गोष्टीमध्ये एकमत होण्याची अपेक्षा. जर तुम्ही शहाणे आहात तर तुम्हाला जहालमत स्पष्टपणे कळेल.

हे खरे आहे की देवाचे कार्य करण्याविषयी आपले सहमत नसल्यास आपण मिळून काम करू शकत नाही. परंतु आपण अशी अपेक्षा करू नये की सहभागितेपूर्वी प्रत्येक लहान सहान गोष्टींविषयी तंतोतंत एकमत असावे. कोणासेाबत सहभागिता असणे व कोणासोबत मिळून काम करणे यात मोठा फरक आहे.

तरीदेखील, तुम्ही जवळपास अशी मंडळी बघावी जी तुमच्याकरिता आत्मिक घर होईल व जिच्याप्रती तुम्ही समर्पित रहाल.

नवीन करारातील मंडळी

तुमच्या प्रांतातील पुष्कळ मंडळयापैकी तुम्ही अशी मंडळी पहा जी नवीन करारातील मंडळीशी जास्त प्रमाणात मिळती जुळती आहे. दिवस लोटल्यावर व नवीन करारातील मंडळीविषयी तुम्हाला अधिक स्पष्ट समजल्यावर तुम्हाला असे वाटेल की स्वतःची मंडळी सोडून दुसर्याळ मंडळीत जावे जी अधिक प्रमाणात देवाच्या वचनानुसार चालते.

जो व्यक्ती आत्मिक रीतीने वाढत आहे व जो आपल्या जीवनात देवाच्या दृष्टीने उत्तम व चांगले ते करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने असे करणे साहजिक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देवाकरिता जे उत्तम ते करण्यापासून वंचित राहू नका, अन्यथा तुम्हाला सार्वकालिकतेत बक्षिस मिळणार नाही.

नवीन करारातील मंडळीला संप्रदायाचे नाव नसणार. ही मंडळी म्हणजे ख्रिस्ताच्या नावात पवित्र आत्म्याद्वारे एकत्रित आलेल्या लोकांची सहभागिता आहे. प्रभूने असे अभिवचन दिले आहे की तो केवळ अशा लोकांच्या सहभागितेत उपस्थित राहील (मत्तय 18:20).

ज्या मंडळीचे तुम्ही सदस्य होऊ पाहता ती मंडळी बायबलला देवाचे वचन म्हणून स्वीकारणारी असावी व विश्वास व जीवनाकरिता केवळ बायबल हा पाया समजणारी असावी. पुष्कळसे कट्टरपंथी लोक असा दावा करतात की ते केवळ बायबलप्रमाणेच चालतात परंतु पुष्कळ वेळा असे आढळून येते की ते आपल्या पुढार्यांतच्या लिखाणांना सारखेच महत्त्व देतात व पूर्ण अधिकार समजून पुढार्यांलच्या मताचा उल्लेख करतात. तुम्ही त्यांच्या अधिक आणि अधिक जवळ गेल्यावर तुम्हाला कळेल की देवाच्या वचनापेक्षा ते पुढार्यां चया शिकवणींना अधिक प्रमाणात बांधलेले आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी असतील परंतु तुम्ही त्यांच्यासोबत जर जुडले तर तुम्हाला कळेल की त्यांच्या कट्टरपंथी वृत्तीने त्यांना बंदिस्त केले आहे.

देवाच्या मंडळीमध्ये सर्वच विश्वासणारे सारख्याच प्रमाणात याजकगण आहेत— कारण देवाने सर्वांना याजक केले आहे (1 पेत्र 2:9). ज्या मंडळीमधये विशिष्ट प्रकारचे याजक किंवा पाळक ठरविल्या गेले आहेत की तेच केवळ देवाच्या वचनाची सेवा करण्यास पात्र आहेत अशा मंडळीचे विचार देवाच्या इच्छेच्या विरूध्द आहेत.

देवाने मंडळीतील पुढारीपण करण्याकरिता वडील वर्गाला दिक्षीत केले आहे. (एकापेक्षा अधिक वडील). परंतु हे वडीलपूर्णकालीन सेवक नसावेत (प्रेषित 14:23, तीत 1:5).

नवीन करारातील मंडळयांच्या सभेमध्ये अधिक जोर देवाचे वचन सांगण्यावर दिल्या जाईल. आपआपल्या परिपक्वतेप्रमाणे व आत्मिक दानांप्रमाणे सर्व विश्वासणार्यांसना मंडळीमध्ये देवाचे वचन सांगण्याचे स्वातंत्र्य राहील.

जर देवाचे वचन खरोखर पवित्र आत्म्याद्वारे असेल तर तुम्हाला कळेल की ते उन्नती, उत्तेजन व सांत्वन करणारे आहे. त्याचप्रमाणे ते अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट करील (1 करिंथ 14:3, 24—31).

नवीन करारातील खर्या मंडळीवर विश्वासूपणे सोपविलेली जबाबदारी ही आहे की तिने शिष्य बनवावे व त्यांना येशूच्या आज्ञा पाळण्यास शिकवावे (मत्तय 28:19,20).अशा मंडळीचे निराळेपण हे आहे की हया मंडळीतील सदस्यांमध्ये प्रीती असेल— ख्रिस्ताने योहान 13:35 मध्ये सांगितले आहे. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा. अशा मंडळमध्ये देवाचे वचन सामर्थ्याने सांगितल्या जाईल, देवाची प्रीती वास करेल व प्रभुची उपस्थिती जाणवेल. तुम्ही आपल्या प्रांतातील अशाच मंडळीचे घटक असावेत.

सहभागितेचे महत्त्व

आपण जेव्हा इतरांसोबत प्रीतीमय सहभागितेत राहण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला कळेल की सहभागिता कायम ठेवण्याकरिता स्वतःचा त्याग करून रोज आपला वधस्तंभ वाहणे किती गरजेचे आहे.

सैतान देवाच्या लेकरांमध्ये खुंटया अडकविण्याच्या प्रयत्नात व्यस्त असतो. आपण जर परिपक्व असलो तर आपल्यामध्ये व इतरांमध्ये खुंटया अडकू न देण्याकरिता सावध राहू. जेव्हा ख्रिस्ताच्या शरीरामधील सहभागिता तुटते तेव्हा देवाचे व आपले मोठे नुकसान होते.

मंडळीतील ऐक्यामध्ये मोठे सामर्थ्य आहे.केवळ मंडळीतील ऐक्याद्वारे सैतानावर विजय मिळविला जाऊ शकतो. येशूने म्हटले, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे (मत्तय 18:18—20).

या कारणास्तव सैतान विश्वासणार्यां्मध्ये फुटी पाडतो आणि यामुळेच तो मंडळयांमध्ये वेगवेगळे गट तयार करतो. ऐक्य असलेल्या मंडळीपासून सुरक्षित राहण्याकरिता व स्वतःचे राज्य जोपासून ठेवण्याकरिता तो प्रयत्न करितो. आपण सैतानाच्या डावपेचांकडे दुर्लक्ष करू नये व त्याविषयी नेहमी जागृत रहावे.

जर ख्रिस्ताच्या शरीरामधल्या हातपायांना एकत्रित काम करता आले नसते तर कोणत्या गोष्टी मर्यादित झाल्या असत्या हयाचा विचार करा. खिस्ताला जगाला देवाचे गौरव प्रगट करता आले नसते. जेव्हा त्याचे आत्मिक शरीर म्हणजे मंडळीतील विश्वासणार्यां मध्ये फुटी पडतात तेव्हा आज ख्रिस्ताला याच मर्यादेचा सामना करावा लागतो.

आपले देखील नुकसान आहे. जर तुम्ही देवाच्या कोणा लेकरापासून विभक्त झाला तर त्या लेकराद्वारे तुम्हाला मिळणार्याो आशीर्वादापासून तुम्ही वंचित राहाल. सर्व संत जणांसोबत मिळून राहिल्याने आपल्याला ख्रिस्ताची प्रीती अनुभवता येते (इफिस 3:17—19). (ख्रिस्ती सहभागितेच्या महत्त्वाचा अधिक अभ्यास करण्याकरिता मी लिहिलेले वन बॉडी इन ख्राईस्ट हे पुस्तक उपलब्ध आहे.)

धडा 10
या युगाचा शेवट

जुन्या कराराच्या काळामध्ये मरणानंतरच्या जीवनाविषयी व देवाच्या भविष्यातील योजनेविषयी स्पष्ट असे ज्ञान नव्हते. परंतु ख्रिस्ताने या दोन्ही गोष्टींविषयी स्पष्ट असे शिक्षण दिले आहे. या दोन्ही गोष्टी जाणून घेणे आपल्यासाठी लाभाचे ठरेल.

मरणानंतर काय?

ख्रिस्ताच्या शिष्यांना मरणाची भिती नाही कारण येशूने मरणावर विजय मिळविला आहे. मरण पराभूत झालेला शत्रू आहे. येशू मरण पावला व त्याने सैतानाला शक्तीहीन केले जेणेकरून आपल्याला इथून पुढे मरणाला भिण्याची गरज नाही (इब्री 2:14—15). आता मरणाच्या किल्ल्या ख्रिस्ताच्या हातात आहे (प्रगटीकरण 1:18). आता त्याच्या शिष्यांकरिता केवळ तोच मरणाचे द्वार उघडू शकतो. सैतान येशूच्या शिष्यांना हात लावू शकत नाही.

मनुष्य मरतो तेव्हा काय घडते. श्रीमंत मनुष्य व लाजराविषयी सांगताना येशूने या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे सांगितले आहे. हे पुस्तक पुढे वाचण्याअगोदर तुम्ही लूक 16:19—31 आता वाचले तर बरे होईल...

हा दृष्टांत नाही. कारण येशूने कुठल्याही दाखल्यात मनुष्याचे नाव घेतलेले नाही. परंतु या ठिकाणी घेतले आहे. श्रीमंत मनुष्य व लाजर हे खरोखर लोक होते.

येशूने हयाठिकाणी स्पष्ट सांगितले आहे की मेलेला व्यक्ती केवळ दोनच ठिकाणी जाऊ शकतो. एक तर स्वर्गात (अब्राहामाच्या उराशी किंवा सुखलोकात) आराम व विश्रांतीचे ठिकाण, दुसरे नर्क— दुःख व क्लेशाचे ठिकाण. मनुष्य मेल्याबरोबर शरीर मातीत पुरण्यापूर्वी त्याचा आत्मा या दोनपैकी एका ठिकाणी जातो. त्याला शरीर नसताही त्याला आपल्या सभोवतालची, सुखाची किंवा त्रासाची जाणीव असते.

मनुष्य तीन घटकांनी बनलेला आहे— आत्मा, जीव व शरीर (1 थेस्सलनी 5:23). मनुष्य मेल्यावर जीव व आत्मा शरीरापासून विभक्त होतात आणि स्वर्गात किंवा नरकात जातात.

वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने पश्चातापी चोराला म्हटले की तो त्याच दिवशी सुखलोकांत जाणार. येशू व त्या चोराच्या आत्म्यांनी शरीर सोडले तेव्हा ते सुखलोकात गेले. येशूने म्हटले होते की तो मेल्यावर तो तीन दिवस व तीन रात्र पृथ्वीच्या पोटात राहील (मत्तय 12:40). यावरून आपल्याला कळते की त्या वेळेस सुखलोक हे पृथ्वीच्या पोटात होते. परंतु येशू ख्रिस्ताचे पुनरूत्थान झाले तेव्हा, त्याने उच्च स्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या, कारण आरोहण केले यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता (इफिस 4:8,9). त्याने अधोलोक व त्यातील सर्व आत्मे तिसर्याो स्वर्गात नेले.

2 करिंथ 12 मध्ये जेव्हा आपण 2 व 4 वचनाची तुलना करतो तेव्हा आपल्याला कळते की आता सुखलोक तिसर्या् स्वर्गात आहे. या ठिकाणी मेल्याबरोबर येशूचे शिष्य जातात (फिलिप्पै 1:23).

ख्रिस्ताच्या परत येण्याची चिन्हे

पृथ्वीवर ख्रिस्ताचे परत येणे होण्यापूर्वी असंख्य अशा ज्या घटना आकस्मात घडणार आहे त्याविषयी बायबल आपल्याला सांगते. त्यापैकी काही घटना पुढे सांगितल्या आहेत.

 1. 1.युध्द, दुष्काळ व भूमीकंप (मत्तय 24:7). या तीनही गोष्टी पृथ्वीवर नेहमीच घडतात. परंतु दुसर्याय महायुध्दाच्या (1939—1945) नंतर या तीनही गोष्टी घडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
 2. 2. ज्ञान, वृध्दी होईल व पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील (दानीएल 12:4). पूर्वीपेक्षा या 50 वर्षामध्ये या दोन्ही गोष्टी आपण अधिक प्रमाणात पाहतो.
 3. 3. मनुष्य सुखविलासावर प्रीती करणारा होईल (2 तीमथ्य 3:4). अनैतिकता आपल्या काळातील विशेष करून फार वाईट पाप आहे. अश्लील चित्रपट व व्हिडीयो फिती अनैतिकतेचा सैतानाचा उद्देश पूर्ण करीत आहे.
 4. 4. माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र होतील (2 तीमथ्य 3:2—4). आज बंडखोरीचा आत्मा आपल्याला सर्वत्र आढळतो— घरामध्ये, शाळेंमध्ये, विद्यापीठात व कारखान्यांमध्ये.
 5. 5. विश्वासणारे विश्वासापासून बहकतील (1 तीमथ्य 4:1). आजच्या दिवसांमध्ये आपण हे अधिक प्रमाणात बघतो. पुष्कळ विश्वासणारे कट्टरपंथी सांप्रदायाच्या मागे लागत आहेत.
 6. 6. इस्त्राएल राष्ट्नाचा पुनःजन्मा (अंजीराचे झाड— इस्त्राएलाचे प्रतिक—पालवी परत येत आहे— लूक 21:29—32). इ. सन. 70 पासून यहूदी लोक जगामध्ये सर्वत्र पसरले. हे अंजिराचे झाड 19 शतक शुष्क राहिले. परंतु मे 1948 मध्ये इस्त्राएल राष्ट्नाचा परत जन्म झाला. येशूने म्हटले की यरूशलेमेवर यहूदीतर राष्ट्न राज्य करेल आणि तोपर्यंत ही भविष्यवाणी पूर्ण झाली (लूक 21:24). जून 1967 मध्ये इस्त्राएलाने यरूशलेमेवर ताबा मिळविला तो 20 व्या शतकात.

आज जगामध्ये काय घडत आहे हे बघितल्यास आश्चर्य वाटेल. सर्व घटना या ख्रिस्ताच्या लवकर परत येण्याकडे आपले लक्ष वेधितात.

पहिले पुनरूत्थान व ख्रिस्ताचे न्यायासन

जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा डोळयांची पापणी पडत नाही तोच जे त्याचे आहेत ते सर्व परिवर्तित होतील. आपण नवीन शरीर धारण करू जे कधीच वृध्द होणार नाही व मरणारही नाही (1 करिंथ 15:51—53). आपले नवीन शरीर ख्रिस्ताच्या शरीरासारखे होईल जे त्याच्या पुनरूत्थानानंतर झाले होते. (फिलिप्पैकरांस 3:20,21). जे ख्रिस्तामध्ये मेले ते कबरेतून त्यांचे नवीन शरीर घेऊन उठतील आणि जिवंत असलेल्या येशूच्या शिष्यासोबत ते राहतील व प्रभुला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जातील (1 थेस्सलनी 4:13—17).

नंतर ख्रिस्त आपले न्यायाचे स्थान उभारेल जेथे आपला न्याय करण्यात येईल आणि वैयक्तिक रीतीने आपल्या पृथ्वीवरील जीवनात असतांना विश्वासूपणाकरिता आपल्याला पारितोषिक देण्यात येईल.

बायबल असे सांगते की जे विश्वासू राहिले त्यांना मुकूट देऊन गौरविल्या जाईल. तुम्ही 2 करिंथ 5:10, 1 करिंथ 3:11—15 व 4:5, 2 तीमथ्य 4:8 व 1 पेत्र 5:4 वाचा जेणेकरून त्यावेळेस प्रभुच्या शिष्यांना प्रभुकडून जे बक्षिस मिळणार आहे त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

त्या दिवसांमध्ये आपण बघू की, जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल (मत्तय 19:30). जे आपल्याला पृथ्वीवर फार धार्मिक स्वरूपाचे दिसले ते आपल्याला देवाच्या दृष्टीने तेवढे विश्वासू असलेले दिसणार नाही. ज्यांना आपण पृथ्वीवर तेवढे धार्मिक समजलो नाही त्यांना देवाच्या दृष्टीत आपण विश्वासू बघू त्या दिवसांमध्ये प्रचलीत प्रसिध्द नसलेली पण विश्वासू विधवा जगातील प्रसिध्द लोकांपेक्षा श्रेष्ठ दिसेल, अविश्वासू प्रचारक नव्हे.

त्या दिवसांमध्ये, मनुष्य पृथ्वीवर ज्या पैशाला व प्रसिध्दीला अत्यंत महत्त्व देत होता तो पैसा व ती प्रसिध्दी देवापुढे काहीच मोलाची नसणारा आणि जे सद्गुण ज्यांचे मनुष्यांनी मोल केले नाही, उदा. शुध्दता, नम्रता, निस्वार्थीपण, दया व चांगुलपणा हयांचे देव मोल करेल.

नंतर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या कोकर्यापचा विवाह होईल— येशू ख्रिस्ताचा त्याच्या वधूसोबत आत्मिक विवाह— ज्यांनी स्वतःचा त्याग केला व विश्वासूपेण रोज आपला वधस्तंभ उचलून पृथ्वीवर असतांना त्याचे शिष्य म्हणून त्याच्या मागे चालले (प्रगटीकरण 19:8—10). त्या दिवसांमध्ये आपण बघू की ज्यांनी गैरसमज, लज्जास्पद वागणूक, छळ आणि मरण प्रभु व त्याच्या शुभवर्तमानाकरिता सहन केले त्यांचे मोल केला जाईल.

शताब्दी

नंतर 1000 वर्षापर्यंत शांतीचे राज्य सुरू होईल आणि पृथ्वीवर एदेन बागेसारखी परिस्थिती तयार होईल. सिंहासोबत कोंकरा शांतीने झोपेल. लहान लेकरे सापासोबत खेळतील, इत्यादी (यशया 11:6—9).

येशू यरूशलेमेतून राजा म्हणून संपूर्ण पृथ्वीवर राज्य करील (जखर्या 14:9—21). त्या काळात सैतानाला बांधल्या जाईल जेणेकरून आता सैतानाला जशी मोकळीक आहे तशी राहणार नाही. 1000 वर्षाच्या शेवटी सैतानाला थोडया काळाकरिता सोडल्या जाईल जेणेकरून पृथ्वीवर ज्यांचे परिवर्तन झालेले नाही त्यांची परत एकवार परीक्षा व्हावी. परत फार मोठा लोक समुदाय सैतानाच्या मागे जाईल. शांतीचे 1000 वर्ष बघितल्यानंतर देखील लोकांची अशी इच्छा नाही की येशूने त्यांच्यावर राज्य करावे याचे प्रात्यक्षिक देवदूतांना दाखविण्याकरिता देवाने हे योजिले आहे. हे मानवाचे अंधत्व, बंडखोरपणा व दुष्टाई आहे. पंरतु या बंडखोर लोकांचा न्याय करण्याकरिता देव खाली येईल आणि सैतानाला अग्नीकुंडात टाकल्या जाईल (मोठा नर्क— प्रगटीकरण 20:7—10).

दुसरे पुनरूत्थान व शेवटला न्याय

मग देव अविश्वासणार्यांटचा न्याय करण्याकरिता न्यायासन स्थापील. हे दुसरे पुनरूत्थान असेल. मेलेले आपआपल्या कबरेतून उठतील. अविश्वासणार्यांरचे आत्मे परत जगातील शरीर धारण करून नरकात जातील जेणेकरून देव त्यांचा न्याय करेल. मग त्यांचा न्यायनिवाडा होईल. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला (प्रगटीकरण 20:12).

स्मरणबुध्दी ही व्हिडीयेा फितीप्रमाणे आहे जी विश्वासूपणे आपण केलेल्या विचारांना, बोललेल्या शब्दांना, केलेल्या कृतींना, आपल्या वृत्तीला व जगातील जीवनातील आपल्या मनसुब्यांना मुद्रीत करते. त्या दिवसांमध्ये देव ही फिती चालवेल जेणेकरून संपूर्ण जग प्रत्येकाच्या जीवनातील गुपीत गोष्टी उघड रीतीने बघेल. सार्वकालिक न्यायाकरिता लोकांना पाठविण्यात देव परिपूर्ण रीतीने नीतिमान आहे हे दाखविण्याचा हा देवाचा मार्ग आहे.

ज्या लोकांची नावे जीवनाच्या पुस्तकात सापडणार नाहीत त्यांना अग्नीकुंडात टाकण्यात येईल जेणेकरून ते पृथ्वीवर ज्या सैतानाची सेवा करीत होते त्याच्यासोबत राहतील (प्रगटीकरण 20:15).

काळाची समाप्ती

नंतर काळ संपेल व सार्वकालिकता सुरू होईल. तारण पावलेले स्त्री व पुरूष नवीन स्वर्गात व नवीन पृथ्वीवर प्रवेश करतील व ख्रिस्ताची वधू आपल्या गौरवात चमकेल (प्रगटीकरण 21).

सैतान व सर्व विश्वासणार्यांसना परिपूर्ण स्वर्गातून व पृथ्वीतून काढून टाकण्यात येईल. त्या वैभवी नवीन सृष्टीत पाप आपले डोके काढू शकणार नाही व आपल्या शरीरात वासना जागृत होणार नाही. स्वर्ग अशा लोकांनी भरला जाईल ज्यांनी सार्वकालिकतेकरिता देवाची इच्छा आनंदाने निवडली आहे.

विजय मिळविण्याकरिता पाचारण

पेत्र म्हणतो, पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे ? त्या दिवसांमध्ये आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्त्वे तप्त होऊन वितळतील (2 पेत्र 3:11, 12).

शेवटच्या दिवसांतील आत्म्याचा संदेश एका शब्दात सारांशीत केला जाऊ शकतो, विजय मिळावा (पहा प्रगटीकरण 2:7, 11,17, 26, 3:5, 12:21, 2:17).

आपण या पुस्तकाची सुरूवात अशा विषयापासून केली जो विषय आज अविश्वासणार्यां ना शिकविला जात नाही. — पश्चाताप.

आपण या पुस्तकाचा शेवट अशा विषयाने करीत आहोत जो विषय आज विश्वासणार्यां्ना शिकविला जात नाही— विजय मिळविणे.

मानव पतन पावला तेव्हापासून मानवाला देवाचे हे पाचारण आहे की त्याने विजय मिळवावा.देवाने काईनाला म्हटले,

दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुजवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव (उत्पत्ती 4:7).

बायबलच्या शेवटच्या पुस्तकात हेच पाचारण करण्यात आले आहे,

जो कोणी विजय मिळवितो त्याला हया गोष्टी वारसाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल (प्रगटीकरण 21:7).

पृथ्वीवर देवासोबतच्या सहभागितेत जगलेल्या जीवनाचे व त्याचा उद्देश पूर्ण करण्याच्या गौरवासोबत कशाचीही तुलना केल्या जाऊ शकत नाही. येशू जे जीवन पृथ्वीवर जगला ते अद्भुत, अत्यंत गौरवी व आनंदमय जीवन होते, तसे जीवन पृथ्वीवर कोणीही जगला नाही. तो श्रीमंत किंवा जगप्रसिध्द नव्हता. परंतु त्याने आपल्या जीवनाद्वारे देवाचे गौरव प्रगट केले.

शुभवर्तमानाची सुवार्ता ही आहे की तुम्ही देखील ते गौरव प्रकाशित करू शकता. पृथ्वीवरील जीवनाच्या प्रत्येक दिवशी तुम्ही विजय मिळवू शकता. तुम्ही विश्वासू असावे व सर्वदा सार्वकालिकतेच्या आदर्शाचे जीवन जगावे. आमेन !