खरी सुवार्ता व खोटी सुवार्ता

Article Body: 

ख्रिस्ती लोकांचे सामन्यत: विभिन्न रीतीने दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे:

1. ''रोमन कॅथोलीक'' व ''प्रोटेस्टेंट'' - जन्माच्या आधारावर. 2. ''एपिस्कोपल'' (कन्फोर्मिस्ट) व ''फ्री चर्च'' (नॉन-कन्फोर्मिस्ट) - चर्चच्या पद्धतीच्या आधारावर 3. ''नवीन जन्म झालेले ख्रिस्ती'' व ''नामधारी ख्रिस्ती'' - अनुभवाच्या आधारावर 4. ''सुवार्तिक'' व ''उदारपंथी'' - सिद्धांताच्या आधारावर 5. ''केरिस्मेटीक'' व ''अकेरिस्मेटीक'' - अन्य भाषा बोलण्याच्या आधारावर 6. ''पूर्ण कालीन ख्रिस्ती सेवक'' व ''कामकाज करणारा ख्रिस्ती सेवक'' - व्यवसायाच्या आधारावर

अशा प्रकारे आणखी अनेक प्रकारात वर्गीकरण केल्या जाऊ शकते. परंतु, ज्या समस्या मुळापासून सोडविण्याकरिता आपला प्रभु आला, त्या समस्या हे वर्ग सोडवू शकत नाहीत. पुष्कळ लोकांना माहीत आहे की ''ख्रिस्त आपल्या पापांकरिता मरण पावला'' (1 करिंथ 15:3). परंतु, बायबल सांगते, ''जे जगतात त्यांनी पुढे स्वत:करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे'' (2 करिंथ 5:15) ह्याकरिता देखील ख्रिस्त मरण पावला ही बाब अनेकांना माहीत नाही.

वचनाच्या आधारावर ख्रिस्ती लोकांचे पुढील विभागांमध्ये वर्गीकरण केल्या जाऊ शकते. ''जे स्वत:करिता जगतात'' व ''जे ख्रिस्ताकरिता जगतात'' ''जे स्वत:ची इच्छा पूर्ण करितात'' व ''जे ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करितात'' ''जे भौतिक गोष्टींना प्रथम स्थान देतात'' व ''जे प्रथम देवाचे राज्य मिळवू पाहतात'' ''जे धनावर प्रीती करितात'' व ''जे देवावर प्रीती करितात'' (येशूने म्हटले की दोन्ही गोष्टींवर प्रीती करणे अशक्य आहे) (लूक 16:13). परंतु, ह्या वर्गीकरणांचा उपयोग होत आहे असे मी कधी ऐकले नाही. हे वर्गीकरण ख्रिस्ती व्यक्तीच्या आंतरिक जीवनाशी व देवासोबत व्यक्तिगतपणे चालण्याशी किंवा जीवन जगण्याशी संबंधीत आहेत. परंतु, स्वर्गीय दृष्टीकोनातून बघितले तर दुसरे वर्गीकरण योग्य आहे. जर हे योग्य आहे तर हेच वर्गीकरण केवळ महत्वाचे आहे. या पद्धतीत इतर लोक आपल्याला विभाजीत करू शकत नाहीत. केवळ आपणच स्वत:ला वर्गांमध्ये विभाजीत करू शकतो कारण आपले आंतरीक मनसुबे व इच्छा केवळ आपल्या स्वत:लाच माहीत असतात. आपल्या पत्नीला सुद्धा आपण कशासाठी जगत आहोत ह्याची जाणीव नसते.

आपला प्रभु लोकांना सिद्धांत देण्याकरिता किंवा चर्चची रीत सांगण्याकरिता किंवा अन्यन्य भाषेत लोकांनी बोलवे म्हणून किंवा त्यांना अनुभव देण्याकरिता आला नाही!

''आपल्याला पापापासून तारावयास'' तो आला आहे. झाडाच्या बुंध्याशी कुर्‍हाड लावावयास तो आला आहे. पापाचा बुंधा : आपला स्वार्थीपणा आहे, स्वत:ची इच्छा पूर्ण करणे आहे. जर आपण प्रभुला आपल्या जीवनातून हे मूळ काढू दिले नाही तर आपण वरपंगी ख्रिस्ती राहू. सैतानाच्या फसवणुकीमुळे आपण इतर ख्रिस्ती लोकांपेक्षा स्वत:ला उच्च श्रेणीचे समजू; कारण, आपण आपले सिद्धांत, आपले अनुभव व आपल्या चर्चची रीत उच्च दर्जाची समजतो.

आपले सिद्धांत योग्य असले, आपल्याला चांगले अनुभव असले व आपल्या चर्चची रीत चांगली असली; परंतु, आपण स्वत:साठीच जगत असलो तर सैतानाला चिंता नाही. (हे जीवन पापात असलेले जीवनच आहे.) आज ख्रिस्ती समाजात असे ख्रिस्ती लोक आहेत जे स्वत:ची इच्छा पूर्ण करू पाहतात व स्वत:साठीच जीवन जगतात व त्यांची अशी धारणा झालेली आहे की देव त्यांना इतरांपेक्षा अधिक चांगले समजतो कारण केवळ त्यांच्याकडेच योग्य सिद्धांत आहेत व अद्भुत अनुभव आहेत. ह्यातून आपण हे पाहू शकतो की ख्रिस्ती समाजात सैतान किती मोठे कार्य करण्यात सफळ झाला आहे.

योहान 6:38 मध्ये आमचा प्रभु म्हणाला की तो स्वर्गातून पुढील गोष्टींकरिता उतरला आहे:

1. स्वत:च्या मानवी इच्छेचा त्याग करण्यास (जेव्हा तो स्वर्गातून पृथ्वीवर मानव बनून आला तेव्हा त्याला मिळालेली मानवी इच्छा) व 2. त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास. ह्यास्तव तो आपल्यासाठी कित्ता झाला.

येशूच्या पृथ्वीवरील संपूर्ण जीवनकाळात - त्याच्या 331/2 वर्षांच्या काळात, त्याने स्वत:च्या इच्छेचा नाकार करून देवाच्या इच्छेप्रमाणे केले. त्याने आपल्या सर्व शिष्यांना स्पष्टपणे सांगितले की जे त्याचे शिष्य होऊ पाहतात त्यांनी येशूच्या ह्याच मार्गावर चालावे. तो आपल्या जीवनातील पापाच्या मुळावर - ''स्वत:च्या इच्छेप्रमाणे करण्याच्या सवयीवर'' कुर्‍हाड चालविण्यास व त्यापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी आला.

विज्ञान क्षेत्रात, हजार वर्षांपासून मानव चूकीची कल्पना करीत आहे की पृथ्वी संपूर्ण विश्वाचे केंद्र आहे. मानवाच्या डोळांनी असेच दिसते कारण सूर्य, चंद्र व तारे 24 तास पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. या प्रचलीत बाबीविषयी प्रश्न विचारण्यासाठी कोपरनिकसला धैर्याचे पाऊल उचलावे लागले. केवळ 450 वर्षांपूर्वी ही गोष्ट निदर्शनास आली की पृथ्वी तर सूर्य उर्जा प्रणालीचे सुद्धा केंद्र नाही तर मग संपूर्ण विश्वाची गोष्ट तर फारच दूर आहे. त्याने हे दाखवून दिले की पृथ्वीची घडनच सूर्याला केंद्र मानून करण्यात आली आहे. जोपर्यंत मानव हा चुकीच्या केंद्राला मानत होता तोपर्यंत त्याची वैज्ञानिक गणिते चुकीची होती - कारण त्याचे केंद्र चुकीचे होते. परंतु, जेव्हा मानवाने योग्य व बरोबर केंद्राचा शोध लावला तेव्हा त्याच्या सर्व चूक गणितांचे अचूक गणितात परिवर्तन झाले.

'ईश्वर केंद्रित'' राहण्याऐवजी आम्ही ''स्वकेंद्रित'' राहतो तेव्हा हीच गोष्ट आपल्यालाही लागू होते. बायबलविषयी व देवाच्या परिपूर्ण इच्छेंविषयी आपला हिशोब चुकतो. ज्याप्रमाणे 5000 वर्षांपर्यंत लोक गैरसमजेत जीवन जगले की त्यांचे पूर्णपणे बरोबर आहे तसेच आपला देखील गैरसमज होऊ शकतो की आपले मत पूर्णपणे बरोबर आहे तसेच आपला देखील गैरसमज होऊ शकतो की आपले मत पूर्णपणे बरोबर आहे! परंतु, आपल्याला कळेल की आपले 100 टक्के चूक आहे. अनेक ''चांगल्या ख्रिस्ती'' लोकांमध्ये सुद्धा आम्ही ही गोष्ट पाहतो. एकाच बायबलचे त्यांच्याकडे वेगवेगळे अर्थ असतात - व प्रत्येक व्यक्ती हेच ठामपणे सांगतो की केवळ त्याचाच अर्थ योग्य आहे व इतर दुसर्‍यांचे मत चूक आहे, अयोग्य आहे. इतरांविषयी ते असे म्हणतात की ते ''फसविल्या गेले'' आहेत. असे का? कारण त्यांचा केंद्र हा चुकीचा आहे.

देवात केंद्रस्थ होऊनच मानवाची निर्मिती करण्यात आली होती, मानवात नव्हे. परंतु, जेव्हा ख्रिस्ती लोकांचे केंद्रच चुकीचे असते तेव्हा त्यांची सुवार्ता देखील चुकीची ठरते. मूळत: आज दोनच सुवार्ता संगण्यात येत आहेत - मानव केंद्रित व दुसरी ईश्वर केंद्रित.

मानव केंद्रित सुवार्ता लोकांना अभिवचन देते की त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी देव त्यांना देईल जेणेकरून त्यांचे पृथ्वीवरील जीवन सुखविलासाचे होईल व जीवनाच्या शेवटी स्वर्गात त्यांना स्थानही मिळेल. मानवाला हे सांगण्यात आले आहे की येशू त्यांच्या सर्व पापांची क्षमा करेल, त्याचे सर्व आजार बरे करेल, त्याला भौतिकरित्या आशीर्वादित करेल, त्याची भरभराट करेल, त्याच्या सर्व जगिक समस्या दूर करेल, इत्यादी, इत्यादी...

अशा मनुष्याचा केंद्र तो ''स्वत:'' राहतो व परमेश्वर केवळ त्याच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यास व त्याला जे काही हवे आहे ते देण्यास एका सेवकाप्रमाणे त्याच्या सभोवताली गिरक्या घालतो. त्याला केवळ देवावर विश्वास ठेवायचा असतो व प्रत्येक हव्या असणार्‍या गोष्टीला येशूच्या नावात मागण्याची गरज असते.

ही खोटी सुवार्ता आहे, कारण ह्यात पश्चात्तापाचा उल्लेखच नाही. पश्चात्तापाविषयी बाप्तिस्मा करणार्‍या योहानाने, येशूने, पौलाने, पेत्राने व सर्व प्रेषितांनी सांगितले आणि दु:खाची बाब ही आहे की आज पश्चात्ताविषयीच सांगण्यात येत नाही.

दुसर्‍या बाजूने विचार करता, ईश्वर केंद्रित सुवार्ता मनुष्याला पश्चात्ताप करण्यास सांगते. पश्चात्तापाचा अर्थ ती सांगते तो असा - स्वत:पासून फिरणे अर्थात स्वत:ला केंद्रातून दूर करणे, स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यापासून दूर जाणे, स्वत:च्या इच्छेप्रमाणे न चालणे, धनावर प्रीती न करणे, जग व जगातल्या गोष्टींवर (शरीराची व डोळाची लालसा व जीवनाची फुशारकी) प्रीती न करणे, त्यापासून पळ काढणे, इत्यादी.. आणि देवाकडे वळणे म्हणजे संपूर्ण मनाने देवावर प्रीती करणे, आपल्या जीवनाचा त्याला केंद्र बनविणे व त्याच्या इच्छेप्रमाणे करणे, इत्यादी...

वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या मरणावरील आपला विश्वास आपल्याला आपल्या पापांपासून तेव्हाच क्षमा देऊ शकतो जेव्हा आम्ही आपल्या पापांपासून तेव्हाच क्षमा देऊ शकतो जेव्हा आम्ही आपल्या पापांसाठी पश्चात्ताप करू. पश्चात्ताप करून येशूवर विश्वास ठेवल्यानंतर कोणाही व्यक्तीला पवित्र आत्म्याचे सामथ्‍​र्य मिळू शकते ज्यामुळे तो प्रत्येक दिवशी स्वत:चा नाकार करून ईश्वर केंद्रित जीवन जगू शकतो. ही तीच सुवार्ता आहे जी येशू व त्याच्या प्रेषितांनी सांगितली.

खोटी सुवार्ता दाराला मोठी व मार्गाला रूंद बनविते (ज्यामुळे त्यावरून चालण्यात सोयीस्कर होईल, कारण त्यात कोणाला स्वत:च्या ''स्व'' चा नाकार करावा लागणार नाही किंवा स्वत:च्या इच्छेप्रमाणे जगणे थांबवावे लागणार नाही किंवा स्वत:च्या फायद्याच्या गोष्टी थांबवाव्या लागणार नाही). अशा प्रकारची खोटी सुवार्ता ज्या ठिकाणी सांगितली जाते तिथे लक्षावधी लोक उपस्थित राहतात. आणि अनेक लोक अशा कल्पनेने या द्वारांतून प्रवेश करतात की तो मार्ग जीवनाकडे नेणारा आहे. परंतु, वास्तविकता ही आहे की तो मार्ग नाशाकडे जाणारा असतो. अशा प्रकारच्या सुवार्तेचे सुवार्तिक मोठा आवडीने, हावेने गर्दीकडे बघतात व त्या लोकांच्या मोठचा आवडीने, हावेने गर्दीकडे बघतात व त्या लोकांच्या मोठचा संख्येचा अहवाल देतात ज्यांनी हात वर करून ख्रिस्ताला स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला असतो. परंतु, ही पूर्णपणे फसवणूक आहे. या सभेत काही लोकांचे खर्‍या रीतीने परिवर्तनही होते कारण त्यांच्या मनात प्रामाणिकपणा असतो; परंतु, त्यांच्या व्यतिरिक्त हात उंच करणार्‍यांच्या गर्दीत असेही लोक असतात जे दुप्पट असे नरकपुत्र (मत्तय 23:15) बनतात; कारण ते स्वत:च्या वास्तविक स्थितीविषयी फसविले गेलेले असतात.

खरी सुवार्ता द्वाराला छोटी व मार्गाला अरूंद बनविते. परंतु, येशू ख्रिस्ताने बनविल्याल्या मार्गापेक्षाही लहान व अरूंद नाही, काही अति आत्मिक धर्मवेडे असे करतात. काही थोडकेच असे आहेत ज्यांना हा जीवनाचा मार्ग मिळाला आहे. सुवार्तिकांसाठी मोठा अहवाल यातून बनणार नाही आणि संख्याही प्रोत्साहानात्मक नसणार; परंतु, ही सुवार्ता लोकांना प्रभु येशू ख्रिस्ताकडे व स्वर्गाकडे घेऊन जाणारी आहे.

ह्यास्तव तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध असा. जो ऐकून त्याचे पालन करतो त्याला अधिक प्रकाश व समज दिल्या जाईल. परंतु, जो ऐकून त्याचे पालन करीत नाही तेव्हा त्याच्याकडे असणारा प्रकाश व समज त्याच्यापासून काढून घेतल्या जाईल (लूक 8:18 चा सरळअर्थ) ज्याच्याकडे कान आहेत तो ऐको.