लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर शिष्य
WFTW Body: 

प्रकटीकरण १४:१-५ मध्ये, आपण शिष्यांच्या एका लहान गटाबद्दल वाचतो ज्यांनी त्यांच्या पृथ्वीवरील जीवनात पूर्ण मनाने प्रभूचे अनुसरण केले. ते शेवटच्या दिवशी येशूसोबत विजयी म्हणून उभे आहेत - कारण देव त्यांच्या जीवनात त्याचा उद्देश पूर्णपणे साध्य करण्यास सक्षम होता.

जसे आपण प्रकटीकरण ७:९, १० मध्ये पाहतो: ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे ते एक मोठा समुदाय आहे ज्यांची गणना कोणीही करू शकत नाही.

या नंतर मी पाहिले तों सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला आणि त्यांच्या हाती झावळ्या घेतलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोंकऱ्यासामोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला; आणि ते रडून उच्च स्वराने म्हणत होते, "राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून,तारण आहे.

पण प्रकटीकरण १४ मध्ये उल्लेख केलेल्या शिष्यांचा समूह खूपच लहान आहे, जो मोजता येतो - १,४४,०००. ही संख्या शब्दशः आहे की प्रतीकात्मक आहे (जशी प्रकटीकरणाच्या पुस्तकातील बरीचशी माहिती आहे) ते महत्वाचे नाही. मुद्दा असा आहे की मोठ्या लोकसमुदायाच्या तुलनेत ही संख्या खूपच लहाण आहे.
हे राहिलेले थोडे लोक जे पृथ्वीवर देवाशी खरे आणि विश्वासू होते. त्यांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यांना देवाच्या मान्यतेचे प्रमाणपत्र मिळाले. देव स्वतः त्यांच्याबद्दल साक्ष देतो की त्यांनी स्वतःला शुद्ध ठेवले आहे ....जेथे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे ते जातात ....त्यांच्या तोंडात कोणतेही खोटे (किंवा कपट) आढळले नाही ....ते निर्दोष आहेत (प्रकटीकरण १४:४,५).

हे देवाचे पहिले फळ आहेत. त्यांचा ख्रिस्ताच्या वधूत समावेश होतो. कोकऱ्याच्या लग्नाच्या दिवशी, सर्वांना हे स्पष्ट होईल की लहान आणि मोठ्या सर्व गोष्टींमध्ये देवाशी पूर्णपणे खरे आणि विश्वासू राहणे सर्वस्वी योग्य होते.

त्या दिवशी, स्वर्गात हाक असेल , आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करूया, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला तयार केले आहे (प्रकटीकरण १९:७).

ज्यांनी पृथ्वीवर स्वतःचा फायदा आणि सन्मान शोधला त्यांना त्या दिवशीच पूर्णपणे कळेल की त्यांचे खरोखर किती मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी प्रभूपेक्षा वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी किंवा स्वतःचे जीवन किंवा भौतिक गोष्टींवर प्रेम केले, त्यांना त्या दिवशी त्यांचे शाश्वत नुकसान कळेल.

मग हे स्पष्ट होईल की पृथ्वीवरील सर्वात ज्ञानी लोक ते होते ज्यांनी येशूच्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या आणि तो जसा चालला तसे चालण्याचा त्यांच्या संपूर्ण मनाने प्रयत्न केला. त्यानंतर ख्रिस्ती धर्मजगताचा रिक्त सन्मान तो कचरा म्हणून स्पष्टपणे दिसून येईल. मग आपल्याला दिसेल की, पैसा आणि भौतिक गोष्टी हे फक्त असे माध्यम होते ज्याद्वारे देवाने आपली परीक्षा घेतली की आपण ख्रिस्ताची वधू असण्यास पात्र आहोत की नाही.

त्या दिवशी आपल्याला स्पष्टपणे दिसणाऱ्या सत्यांपैकी काही गोष्टी पाहण्यासाठी आतातरी आपले डोळे उघडले पाहिजेत!

कोणत्याही व्यक्तीला मिळू शकणारा सर्वात मोठा सन्मान म्हणजे, त्या दिवशी ख्रिस्ताच्या वधूमध्ये स्थान मिळणे- ज्यांची देवाने स्वतः परीक्षा घेतली आहे आणि त्यांना मान्यता दिली आहे!

ज्याला ऐकायला कान आहेत, त्याने ऐकावे. आमेन.