WFTW Body: 

जर देवाला असे दिसून आले की, विश्वासणाऱ्याला सुभक्तीबद्दल कळकळ नाही, किंवा तो भेकड आहे, सत्यासाठी उभे राहण्यास घाबरतो (जे तो शास्त्रवचनांत पाहतो), इतरांच्या टीकेला घाबरतो, तर देव ते सत्य त्याच्यापासून लपवून ठेवेल - कारण त्याला " सुभक्तीचे रहस्य" असे म्हटले जाते (१ तीमथ्य ३:१६). जे त्याचे भय बाळगतात त्यांनाच देव त्याची गुपिते प्रकट करतो (स्तोत्र२५:१४). देवाच्या बाबतीत भेकड असणे धोक्याचे आहे, कारण "भेकड" हे प्रकटीकरण २१:८ मध्ये अग्नीच्या सरोवरात पाठवलेले पहिले लोक म्हणून सूचीबद्ध आहेत - "खून करणारे, जारकर्मी, चेटकी व मूर्तिपूजक" यांच्याही आधी !

मार्टिन ल्यूथरने म्हटले: "देवाच्या सत्याच्या प्रत्येक भागावर विश्वास ठेवण्याचा मी मोठ्याने दावा करत असेन, पण त्याच वेळी सैतान ज्या विशिष्ट सत्यावर हल्ला करत आहे त्या सत्यावर मी मौन बाळगतो, तर मग मी ख्रिस्ताची कबुली देत नाही. सध्या असलेल्या ज्या ठिकाणी ही लढाई सर्वात भयंकर असते, त्याच ठिकाणी सैनिकाच्या निष्ठेची कसोटी लागते. आणि युद्धभूमीच्या इतर सर्व क्षेत्रांत विश्वासू राहणे निरर्थक आणि लज्जास्पद आहे, जर सैनिक संघर्षाच्या सध्याच्या टप्प्यावर खंबीरपणे उभा राहिला नाही तर."

"ख्रिस्ताला अगदी आपल्याप्रमाणेच पारखले गेले पण त्याने पाप केले नाही"(इब्री ४:१५) या सत्याभोवतीच भारतातील आपल्या मंडळींविरुद्ध गेली ४७ वर्षे ही लढाई अत्यंत भयंकर आहे. परंतु आम्ही "या सत्याचा स्तंभ व पाया " (१ तीमथ्य ३:१५) म्हणून उभे राहिलो आहोत आणि निर्भयपणे व लाज न बाळगता त्याची घोषणा केली आहे. आणि याचा परिणाम आम्ही असंख्य बदललेल्या जीवनांतून पाहिला आहे.

१ तीमथ्य ३:१६ मध्ये लक्षात घ्या, की सुभक्तीचे रहस्य "देह धारण करणाऱ्या ख्रिस्ताच्या शिक्षणात" नव्हे, तर 'देहात आलेल्या ख्रिस्त या व्यक्तित' आहे. पुष्कळ लोक या गोष्टीकडे एक मत म्हणून पाहून आणि स्वतः ख्रिस्त या व्यक्तीकडे न पाहता परूशी बनले आहेत. "लेख (अगदी योग्य शिक्षणाचा असला तरीही) जिवे मारतो. केवळ आत्माच जीवन देतो " (२ करिंथ ३:६). आपल्याला लोकांना कोणत्याही शिक्षणाकडे नव्हे तर स्वतः ख्रिस्ताकडे निर्देश करायचे आहे.

(केवळ आपल्या मनानेच नव्हे तर)आपल्या आत्म्याने - कबूल करणे(१ योहान ४:२) , याचा अर्थ सर्वप्रथम असा आहे की, आपण आपल्या संपूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवतो की येशू देहात आला, तो आपल्यासारखाच पारखला गेला होता, आत्म्याच्या सामर्थ्यात आपली पोहोच जिथपर्यंत आहे त्यापेक्षा अधिक कोणतेही सामर्थ्य त्याला उपलब्ध नव्हते , आणि जर आपण एकनिष्ठपणे वागलो तर तो जसा चालला तसे आपण चालू शकतो (१ योहान २:६).

याचा अर्थ असाही होतो की, आपला आत्मा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची इच्छा बाळगतो - कधीही आपल्या स्वतःचा फायदा करून घेण्याची इच्छा नसते आणि कधीही स्वत:च्या इच्छेप्रमाणे करू इच्छित नाही. येशूने पृथ्वीवरील काळात, त्याच्या परिक्षांद्वारे जे शिक्षण घेतले (आपल्या पित्याच्या आज्ञेत राहून) ते समजून घेण्यासाठी आपल्याला आत्म्याच्या प्रकटीकरणाची गरज आहे. असे लिहिले आहे की, "तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला" (इब्री ५:८). प्रत्येक मोहाविरुद्धच्या लढाईत तो पूर्णपणे विश्वासू होता. तसेच तो "आपले प्राण-जीवन मरणावर ओतण्यात" विश्वासू होता (यशया ५३:१२ - के.जे.व्ही.). अशा प्रकारे देवाच्या जीवनाची परिपूर्णता त्याच्या शरीराद्वारे प्रकट झाली. फार कमी लोक अशा ठिकाणी येतात, जिथे ते पवित्रीकरणाच्या शोधात आपल्या प्राण -जीवनालाही मृत्यूपर्यंत ओततात, कारण फार कमी लोक देवाच्या नजरेत विश्वासू असतात आणि सर्वप्रथम आपल्या जीवनातील सर्व ज्ञात पापांशी झगडत असतात.

येशूने आपल्या देहाद्वारे आपल्यासाठी निर्माण केलेल्या नवीन व जीवनयुक्त मार्गाविषयीचे हे सत्य त्यांना समजले नसल्यामुळे पुष्कळ विश्वासू लोकांच्या जीवनात देवाच्या इच्छेची उणीव भासत आहेत (इब्री १०:२०). येशूने म्हटले की, आपण प्रथम सत्य जाणून घेतले पाहिजे आणि मग "सत्य आपल्याला बंधमुक्त करील" (योहान ८:३२).