WFTW Body: 

देवाला अधिकाधिक ओळखणे ही आपली उत्कट भावना असली पाहिजे, कारण हेच सार्वकालिक जीवन आहे. देवाला अधिकाधिक ओळखण्यासाठी आपण अनंतकाळ घालवणार आहोत. म्हणूनच ज्याची उत्कट भावना देवाला ओळखणे ही आहे त्याच्यासाठी अनंतकाळ कंटाळवाणा होणार नाही. आपले पृथ्वीवरील जीवनही यापुढे कंटाळवाणे होणार नाही. उत्पत्ति २ मधून देवाच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या मार्गांबद्दल, ज्या प्रकारे त्याने आदामाशी व्यवहार केला त्याबद्दल आपण काही शिकूया. तिथे आपण पाहतो की देवानेच आदामाला पत्नीची गरज आहे हे पाहिले आणि त्याने ती गरज पूर्ण केली आणि आदामासाठी पत्नी बनवली. देवाचा स्वभाव कसा आहे हे आपण तिथे पाहतो. देव नेहमीच लोकांच्या गरजांबद्दल सजग असतो आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही करू शकतो ते करतो. जेव्हा आपण या दैवी स्वभावात सहभागी होऊ , तेव्हा आपणही असेच बनू - आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या गरजा आणि समस्यांबद्दल नेहमीच सजग राहू आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण शक्य ते सर्व करू! यात अनेकदा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याग करावा लागेल. म्हणूनच आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे की आपण दैवी स्वभावात सहभागी होण्यासाठी ही किंमत मोजण्यास तयार आहोत का?

आपल्यातील आदामाचा स्वभाव या दैवी स्वभावाच्या अगदी उलट आहे. आदामाचे जीवन पूर्णपणे स्वार्थी आहे आणि आपल्याला केवळ आपल्या स्वतःच्या गरजांप्रती आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांप्रती सजग करते. खरे तर हे स्वार्थ आणि मत्सराने इतके भरलेले आहे की इतरांच्या गरजा दुसऱ्यानेही पूर्ण करू नयेत अशी त्याची इच्छा आहे. उलटपक्षी लोकांना त्रास होताना पाहून त्याला आनंद होतो.

मनुष्याने पाप केले तेव्हा देवाने त्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गांची राखण करण्यासाठी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. जीवनाचे झाड सार्वकालिक जीवनाचे प्रतीक आहे - देवाला जाणणे. जीवनाच्या झाडासमोर ठेवलेल्या या तलवारीतून देव आदामाला प्रतिकात्मकरित्या दाखवत होता की, आता जर कोणाला जीवनाच्या झाडाचे सहभागी व्हायचे असेल तर त्याला प्रथम स्वत:च्या स्वार्थी जीवनावर पडणारी तलवार अनुभवावी लागेल. आपण उत्पत्ति ३:२१ मध्ये वाचतो की, आदाम आणि हव्वेने पाप करताच देवाने एदेनमध्ये एका प्राण्याला ठार मारले आणि त्या प्राण्याच्या चामड्याचे वस्त्र करून त्यांना वस्त्र घातले. तिथेही देव त्यांना एकच धडा शिकवत होता - की आता त्यांना स्वतःला झाकून ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याग आणि मृत्यूचा मार्ग. आदाम आणि हव्वेने यांनी कोणत्याही "मृत्यूशिवाय" प्रथम स्वत: ला झाकण्याचा प्रयत्न केला होता - फक्त अंजिराच्या पानांसह. पण देवाने ती पाने फेकून दिली आणि त्यांना स्वत:ला झाकण्याचा योग्य मार्ग दाखवला. म्हणून आपण पाहतो की सुरुवातीपासूनच देवाने माणसाला त्याच्याशी सहभागिता करण्यासाठी आणि त्याच्या स्वभावाने वस्त्रांकित करण्यासाठी त्यागाच्या मार्गावर भर दिला आहे.

देवाने काइनाला सांगितले की त्याची मूलभूत समस्या अशी आहे की त्याचा भाऊ हाबेलाबद्दल त्याचा "चांगला हेतू" नव्हता (उत्पती४:७ समास). यहूदा "काइनाच्या मार्गाने" चालणाऱ्या लोकांबद्दल बोलतो (यहूदा ११). ते कोण आहेत? ते असे आहेत ज्यांचा आपल्या भावांबद्दल चांगला हेतू नाही. या बाबतीत आध्यात्मिक तपासणी करणे आपल्या सर्वांसाठी चांगले आहे. आपण प्रामाणिकपणे सांगू शकता का की आपल्या स्थानिक मंडळीमधील सर्व बंधू-भगिनींसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण उत्तम इच्छिता? आपण असेही म्हणू शकता का की इतर संप्रदायांतील तुम्ही ओळखणाऱ्या विश्वासू लोकांसाठी आपण उत्तम इच्छिता? मग अजून वर्तुळ आणखी मोठे करा आणि स्वत: ला विचारा की तुम्हाला माहित असलेल्या सर्व लोकांसाठी, ज्यात तुमचे नातेवाईक, तुमचे शत्रू आणि ज्यांनी तुमचे काही प्रकारे नुकसान केले आहे त्यांच्यासाठी तुम्ही उत्तम इच्छिता? जर एखाद्या व्यक्तीचे किंवा त्याच्या मुलांचे काही चांगले होते तेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयात (आनंदाऐवजी) अस्वस्थता जाणवते किंवा त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाचे काही वाईट घडते तेव्हा तुमच्या हृदयात (दु:खाऐवजी) आनंदाची जाणीव झाली, तर अशी मनोवृत्ती काय सूचित करते ? फक्त हेच की आदामाचे जीवन आपल्यात जिवंत आणि सक्रिय आहे.

जर तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असाल, तर तुम्ही काइनाच्या मार्गाने चालला आहात की नाही हे लवकरच कळेल. अग्नी आणि देवाचा अभिषेक आपल्यावर सतत राहावा अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्यातील दुष्ट आदामाच्या जीवनाला ठार मारण्यासाठी तुम्ही तत्पर असले पाहिजे.

जेव्हा गव्हाचे धान्य जमिनीत पडते आणि पूर्णपणे मरते, तेव्हा बरेच फळ मिळते. जो स्वत:लाच पूर्णपणे मरण पावतो, तो कधीही नाराज होणार नाही, मग इतरांनी काहीही केले किंवा केले नाही. तो नेहमीच सर्वांप्रती चांगला हेतू ठेवेल. स्वत: ची चिंता असलेल्या कोणत्याही बाबतीत तो कधीही रागावणार नाही आणि तो कधीही कोणाशीही भांडणार नाही. तो स्वत:साठी कधीही एक अश्रू गाळणार नाही - कारण, नक्कीच, मृत लोक त्यांच्या कबरेत रडत नाहीत!!

काइनाचा चेहरा खिन्न आणि काळवंडलेला होता जेव्हा त्याचा आपल्या भावाबद्दल चांगला हेतू नव्हता (उत्पत्ती ४:६). कदाचित आपल्याला हे कळत नसेल, पण आपल्या हृदयात जी मनोवृत्ती आहे, ती अनेकदा आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. जर तुम्ही सर्वांच्या बाबतीत चांगला विचार करत असाल, तर तुमचा चेहरा नेहमीच परमेश्वराच्या आनंदाने चमकेल. अनेक विश्वासणारे काइनाच्या मार्गाने चालत आहेत. त्यांच्या दुर्बळ हास्य आणि त्यांच्या ओठातून आलेल्या "परमेश्वराची स्तुती असो" यांमागे त्यांच्या सहविश्वासू लोकांबद्दल चुकीची मनोवृत्ती दडलेली असते. जेव्हा लोक तुमच्या विरोधात जातात आणि तुमच्याशी वाईट वागतात, तेव्हा देव त्यांचा वापर करून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या खऱ्या अवस्थेचे परीक्षण देतो. जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकत नसाल, तर तुमच्या हृदयाच्या परीक्षणावरून हे दिसून येईल की तुम्ही देवाच्या स्वभावात सहभागी झाला नाहीत , कारण देवाचा स्वभाव हा त्याच्या शत्रूंवरही प्रेम करणारा आहे. यहूदा इस्कर्योतच्या दिशेनेही येशूचा हेतू चांगला होता.

देव सर्व लोकांसाठी सर्वोत्तम ते इच्छितो. शुभवर्तमानाचा संदेश हा आहे की आपणही या स्वभावाचे भागीदार होऊ शकतो. म्हणून ज्यांना शुभवर्तमान समजलेले नाही त्यांना शुभवर्तमान अजिबात समजलेले नाही.