लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   तारुण्य
WFTW Body: 

वीन कराराअंतर्गत आपल्याला झालेले पाचारण पृथ्वीवर दीर्घकाळ राहण्याकरिता नाही तर पृथ्वी सोडून जाण्यापूर्वी देवाने सोपविलेले काम पूर्ण करण्याकरिता आहे. एका चांगल्या भावाने सत्तर वर्षांमध्ये पूर्ण केलेले काम एखाद्या दुसर्‍या व्यक्तीने पूर्ण मनाने व जोमाने 35 वर्षांमध्ये तेच काम पूर्ण करणे शक्य आहे. जमीन चांगली असली तरी पीक वेगवेगळे उगवते - काही ठिकाणी 30 पट, काही ठिकाणी 60 पट तर काही ठिकाणी 100 पट उगवते (मार्क 4:8). आपण आपल्या जीवनामध्ये किती शिस्तबद्ध व पूर्ण मनाने काम करतो यावर ते अवलंबून आहे. येशूने केवळ साडेतीन वर्षांमध्ये त्याची पृथ्वीवरील सेवा पूर्ण केली.

पृथ्वीवर दीर्घकाळ जगून नव्हे तर आपल्याला सोपविण्यात आलेले काम पूर्ण करून आपण देवाचे गौरव करितो (पाहा योहान 17:4).ही आपल्या जीवनाची गुणवत्ता आहे (देवाची इच्छा पूर्ण करणे). नवीन करारामध्ये ही महत्वाची आहे. जुन्या कराराच्या काळात आयुष्याची लांबी महत्वाची गणली जात असे (स्तोत्र 91:16).

स्तोत्रसंहिता 90:10 मधील मोशेच्या शब्दांचा काही लोकांनी गैरअर्थ लावला आहे. ते असा विचार करतात की देवाने मनुष्याला जगण्याकरिता सत्तर ते ऐंशी वर्षे दिलेली आहेत. परंतु, मोशेने ते स्तोत्र अरण्यात लिहिले. त्याने पाहिले की काही लोक त्याच्यासारखे 120 वर्षे देखील जगतात. काही लोकांना त्यांच्या अविश्वासामुळे कनानमध्ये प्रवेश करता येऊ नये म्हणून देवाच्या न्यायामुळे सत्तर ते ऐंशी वर्षे आयुष्य मिळाले (वाचा 10-12 वचने).

काही लोक उत्पत्ती 6:3 मधील नोहाच्या काळातील देवाच्या शब्दांचा गैरअर्थ करितात. त्यांना वाटते की मनुष्याचे आयुष्य 120 वर्षांचे आहे. परंतु, अब्राहाम व काही लोक 120 वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगले. याठिकाणी देव असे सांगू इच्छित आहे की पश्चात्ताप करण्याकरिता तो 120 वर्षे देऊ शकतो. म्हणून नोहाने 120 वर्षे लोकांना संदेश सांगितला व तारू बांधण्याकरिता 120 वर्षे लागली.

आपला जन्म होण्यापूर्वीच देवाने पृथ्वीवरील आपल्या दिवसांची संख्या नेमून ठेवली आहे (स्तोत्र 139:16). त्याने अभिवचन दिले आहे की आपण पृथ्वीवरील आपले संपूर्ण दिवस परिपूर्ण असे जगावे (निर्गम 23:26). सैतान वा कोणीही व्यक्ती आपले आयुष्य कमी करू शकत नाही. याकरिता केवळ आपण आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करू पाहावे. आपले आयुष्य आपण स्वतः कमी करू शकतो - नवीन जन्म झाल्यानंतर पाप करीत राहण्याद्वारे किंवा बेपर्वाईने व मूर्खपणाने शरीराविषयी देवाची आज्ञा मोडण्याद्वारे (खादाडपणामुळे, धुम्रपान करण्याद्वारे, व्यायाम न करण्याद्वारे व आळसपणाद्वारे). आपण पृथ्वीवरील आपले आयुष्य देखील वाढवू शकतो - आधुनिक वैद्यकीय उपकरणांद्वारे (कृत्रीम हृदय किंवा फुफ्फुस लावून). परंतु, देवाने आपल्याकरिता नेमून दिलेले दिवस जगणे आपल्या हिताचे आहे. ते दीर्घकालीन असो वा अल्पकालीन असो. देवाने आपल्याकरिता नेमलेल्या दिवसांचा आपण आनंदाने स्वीकार करावा. येशू साडे तेहत्तीस वयात मरण पावला. याकोब मरण पावला तेव्हा तो 33 वर्षांचा होता. पौला 67 वयात मरण पावला. योहान 95 वर्षे जगला. डेवीड ब्रेनर्ड 29 वयात मरण पावला. जॉन वेस्ली 88 वर्ष जगले. देवाची त्याच्या लेकरांकरिता भिन्न भिन्न इच्छा असते.

हिज्कीयाने केले तसे करणे मूर्खपणाचे आहे. त्याने रडून प्रार्थना केली की देवाने त्याचे आयुष्य वाढवावे. परंतु, देवाने त्याला पूर्वीच सांगितले होते की पृथ्वीवरील त्याचे आयुष्य संपले आहे (यशया 38:1-5). याठिकाणी देवाने हिज्कीयाची प्रार्थना ऐकली व त्याला पृथ्वीवर अधिक 15 वर्षे आयुष्य वाढवून दिले. स्तोत्रसंहिता 106:14-15 मध्ये आपण वाचतो की देव काही प्रंसगी असे करितो. ''ओसाड प्रदेशात त्याने देवाची परीक्षा पाहिली. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांस दिले. पण त्यांचा जीव झुरणीस लाविला.'' हिज्कीयाच्याबाबतीत वाईट परिणाम पाहा. त्याने मागितलेल्या पुढील 15 वर्षांच्या आयुष्यात त्याला मनश्शे नावाचा पुत्र झाला. हा त्याचा पुत्र यहूदा राज्यातील सर्वात वाईट राजा झाला (2 इतिहास 33:1-2).

पौलाच्या बाबतीत वेगळे घडले. जेव्हा प्रभुने पौलाला सांगितले की पृथ्वीवरील त्याचे दिवस संपले आहेत तेव्हा त्याने अधिक आयुष्य मिळावे अशी विनंती केली नाही. पौलाची तर नक्कीच इच्छा असेल की प्रभुच्या परत येण्यापर्यंत त्याने जगावे (पाहा 1 थेस्सलनी 4:15 - याठिकाणी पौल स्वतःला त्या लोकांमध्ये गणतो जे प्रभुच्या आगमनाच्या वेळी उचलल्या जातील. याठिकाणी तो म्हणतो, ''प्रभुचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू''). परंतु, जेव्हा तो 67 वर्षांचा झाला तेव्हा प्रभुने त्याला कळविले की पृथ्वीवरील त्याचे आयुष्य संपले आहे (2 तीमथ्य 4:6-7). पौलाने आनंदाने देवाच्या इच्छेचा स्वीकार केला. पेत्राला हीच गोष्ट कळल्यावर पेत्राने देखील असेच केले (2 पेत्र 1:14).

देवाच्या पुस्तकामध्ये आपल्या आयुष्याची लांबी किती याविषयी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करणे अगदी बरोबर आहे. अशीच प्रार्थना आपण इतरांसाठी करावी, जेणेकरून आपण सर्व पृथ्वीवर अधिक काळ देवाची सेवा करीत राहू. पौल म्हणाला, ''पण जर देहांत जगणें हें माझ्या कामाचें फळ आहे तर कोणतें निवडावें हें मला समजत नाहींमी ह्या दोहोेंसंबंधाने पेचांत आहें; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहांत राहण्यापेक्षां हें फारच चांगलें आहे; तरी मी देहांत राहणे हें तुम्हांकरितां अधिक गरजेचें आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळें मी राहणार; आणि विश्वासांत तुम्हांला वृद्धि व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हां सर्वांजवळ राहणार हें मला ठाऊक आहे'' (फिलिप्पै 1:22-25).

देवाच्या द्राक्षमळ्यात सर्वत्र मोठ्या गरजा आहेत. असे फार थोडके लोक आहेत जे निर्भिडपणे देवाची सुवार्ता गाजवितात व मार्गदर्शन करितात. ''कारण कोणी भक्तीमान उरला नाही. मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत'' (स्तोत्र 12:1).

आपल्याला देवाची इच्छा माहीत नसल्यास आपल्याला योग्य वाटेल त्या विनंतीकरिता देवाकडे प्रार्थना करू शकतो - दीर्घायुष्याकरिता देखील आपण प्रार्थना करू शकतो. परंतु आपण शेवटी प्रार्थनेत म्हणावे, ''माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होवो.'' आमेन.