लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

येशूने आम्हांला सर्वत्र शिष्य बनवण्यास सांगितले - आणि केवळ धर्मांतर झालेले लोक नाही. शुद्ध साक्ष होण्यासाठी आपण सर्वात आधी, आपल्या मंडळीचा भाग होऊ इच्छित असलेल्या सर्वांना स्पष्टपणे शिष्य होण्याच्या अटी शिकवल्या पाहिजेत; आणि शिष्यत्वाचा आपल्या वैयक्तिक जीवनावर, आपल्या कौटुंबिक जीवनावर आणि मंडळीतील जीवनावर कसा प्रभाव पडतो हे शिकवले पाहिजे.

आपण लूक १४:२६ ते ३३ पासून शिकवायला सुरुवात केली पाहिजे, जिथे येशूने आपला शिष्य होण्यासाठी तीन आवश्यक अटी दिल्या:

१. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक, भाऊ व बहिणींपेक्षा आपण येशूवर अधिक प्रेम केले पाहिजे (लूक १४:२६). त्यापैकी कोणीही प्रभूने आम्हाला जे करावयास सांगितले ते करण्यास आडकाठी होऊ देऊ नये.
२. आपण स्वतःपेक्षा येशूवर अधिक प्रेम केले पाहिजे (लूक १४:२७). जेव्हा आमची परीक्षा घेण्यात येते तेव्हा दररोज बर्‍याच वेळा (लूक ९:२३) आम्ही आपले स्वजीवन नाकारले पाहिजे आणि वधस्तंभावर खिळले पाहिजे.
३. आपल्याकडे असलेल्या पृथ्वीवरील सर्व गोष्टींपेक्षा आ पण येशूवर अधिक प्रेम केले पाहिजे (लूक १४:३३). देव आपल्याला ऐहिक गोष्टी बाळगण्याची सवलत देतो. परंतु आपण त्यापैकी कशाविषयीही मालकी गाजवू नये. त्या सर्व ऐहिक गोष्टींना खुल्या तळहातावर ठेवणे आवश्यक आहे - देवाची संपत्ती म्हणून.

दुसरे म्हणजे, डोंगरावरील प्रवचनात येशूने जे शिकवले आणि ताकीद दिली त्या सर्व गोष्टी आपण विस्तृत आणि स्पष्टपणे स्पष्ट केल्या पाहिजेत (मत्तय ५, ६ आणि ७). येशूने त्या प्रवचनाचे तीन दाखले देऊन समारोप केला:

(अ) या प्रवचनातील त्याच्या शिकवणीत सार्वकालिक जीवनाकडे जाणाऱ्या अरुंद मार्गाचे वर्णन केले आहे. (मत्तय ७: १४).
(ब) केवळ या प्रवचनातील त्याच्या शिकवणींचे पालन केल्यामुळे त्याचे शिष्य देवाच्या गौरवासाठी फलदायी झाडे होतील. (मत्तय ७: १६-२०)
(क) केवळ या प्रवचनात येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टींचे पालन केल्यामुळेच त्याचे शिष्य त्यांचे वैयक्तिक जीवन, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि मंडळी चिरकाल टिकणाऱ्या पायावर उभे करू शकतील. (मत्तय ७: २४-२७).

तिसरे म्हणजे आपण मंडळीमधील प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरण्यासाठी देवाला शोधावे म्हणून प्रोत्साहित केले पाहिजे - कारण आपल्या स्वत: च्या सामर्थ्याने वर नमूद केलेल्या मानकांनुसार जगणे अशक्य आहे. परंतु हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शक्य आहे. (प्रेषितांची कृत्ये १: ८; इफिसकरांस पत्र ५: १८)

चौथे म्हणजे, स्वर्गातील देवाला आपला पिता म्हणून ओळखण्यासाठी आपण प्रत्येक विश्वासणाऱ्याचे नेतृत्व केले पाहिजे, जेणेकरून त्यांना अनिश्चित आणि दुष्ट जगामध्ये, देवामध्ये त्यांची सुरक्षितता सापडेल.

पाचवे, आपण लोकांना महान सत्य शिकवले पाहिजे की येशू "सर्व गोष्टींमध्ये आपल्यासारखे बनला होता"(इब्री लोकांस पत्र २: १७) आणि "आमच्यासारखा सर्व प्रकारे पारखला गेला" (इब्री लोकांस पत्र ४: १५), जेणेकरून सर्व असा विश्वास धरतील की ते “येशू चालल्याप्रमाणे” चालू शकतात (१ योहान २: ६).

जेव्हा आम्ही आपले काम सुरू केले तेव्हा आम्ही अनेक महिने शास्त्रवचनांच्या या महत्त्वाच्या सत्याचा अभ्यास केला. आणि त्यानंतरचे उत्कृष्ट परिणाम आम्ही पाहिले. केवळ अशा प्रकारे आम्ही प्रभुसाठी एक शुद्ध साक्ष तयार करू शकतो - नवीन कराराची मंडळी.