WFTW Body: 

प्रकटी 10:7, ''तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसांत म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल, तेव्हां देवानें 'आपले दास संदेष्टे' ह्यांस सुवार्ता सांगितली, तदनुसार 'त्याचें गूज' पूर्ण होईल.''

सातवा कर्णा वाजल्याबरोबर सुभक्तीचे रहस्य पूर्ण होईल. हे सुभक्तीचे रहस्य काय आहे? नवीन करारात रहस्य हा शब्द अनेकदा आलेला आढळतो. ह्याचा अर्थ असे गुपित जे देवाच्या प्रकटीकरणाशिवाय कोणालाही समजू शकत नाही. ते असे रहस्य नाही की ते कोणालाच मुळीच कळू शकत नाही; परंतु ते असे रहस्य आहे जे केवळ देवच प्रकट करू शकतो. नवीन करारात जी रहस्ये सांगितली आहेत ती मूलभूतपणे दोन शिर्षकांखाली सारांशीत केल्या जाऊ शकतात.

1. सुभक्तीचे रहस्य (1 तीमथ्य 3:16)

2. अनीतीचे रहस्य (2 थेस्सलनी 2:7)

सुभक्तीचे रहस्य सत्य आहे. अनीतीचे रहस्य खोटे आहे.

सुभक्तीचे रहस्य तीन भागात विभागल्या जाऊ शकते.

(अ) सुभक्तीच्या रहस्याचा पहिला भाग 1 तीमथ्य 3:16 मध्ये वर्णन केला आहे. ह्या वचनाआधीच्या वचनात म्हणजेच 15 व्या वचनात मंडळीला ''सत्याचा स्तंभ व पाया'' म्हटले आहे (वचन 15). कोणत्या सत्याचा उल्लेख इथे आहे? पुढील वचनात ह्याचे स्पष्टीकरण दिले आहे, 'सुभक्तिचें रहस्य निर्विवाद मोठें आहे; तो देहाने प्रगट झाला, आत्म्यानें नीतिमान् ठरला देवदूताच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली.' ह्याठिकाणी महत्वपूर्ण संदेश हा आहे की येशू ख्रिस्त मानवासारखा होऊन या जगात आला आणि तरी तो आत्म्याने पवित्र होता. तर म्हणून आपणही पाप करू नये. तो जसा चालला तसे आपला चालले पाहिजे (1 योहान 2:6). हेच ते 'सत्य' आहे. ह्याच सत्याला उभे धरून ठेवणारा स्तंभ म्हणजे मंडळी होय! परंतु, दुःखाची बाब अशी आहे की इतक्या वर्षांमध्ये मंडळीने हे सत्य धरून ठेवले नाही.

(ब) सुभक्तीच्या रहस्याचा दुसरा भाग इफिस 5:31, 32 मध्ये दिला आहे. 1 तीमथ्य 3:16 मध्ये ह्याला मोठे रहस्य म्हटले आहे. याठिकाणी देखील आपण मोठे रहस्य बघतो. ख्रिस्ताचे आणि मंडळीचे एक देहाचे रहस्य. येशू ख्रिस्ताला आता त्याची वधू (मंडळी) मिळाली आहे, जी त्याच्यासारखीच चालते, तिच्या आत्म्याला ती पवित्र ठेवते.

(क) सुभक्तीच्या रहस्याचा तिसरा भाग 1 करिंथ 15:51-52 मध्ये दिला आहे, ज्याठिकाणी आपल्याला सांगण्यात आले आहे की शेवटला कर्णा वाजेल तेव्हा आपण क्षणांत, निमिषांत बदलून ख्रिस्तासारखे होऊ.

आता आपण अनीतीच्या रहस्याविषयी बघू या (2 थेस्सलनी 2:7) जे मुख्यत्वे सैतानाला त्याच्याच देहात प्रकट करिते - शेवटी तो ख्रिस्तविरोधी म्हणून प्रकट होईल.

वचन 9-11 मध्ये आपण वाचतो की सैतान विरोधकाच्या आत्म्याने कार्य करेल, खोटे चिन्ह व चमत्कार दाखवेल व अनीतिजनक कपटाने तो लोकांना फसवेल. आपण असे देखील वाचतो की त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालावे असे करितो. ''ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनीतित संतोष मानला त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल.''

याठिकाणी जे असत्य म्हटले आहे ते कशासंबंधाने आहे? हे असत्य ते आहे जे सैतानाने हव्वेला एदेन बागेत सांगितले : 'तुम्ही हे पाप करू शकता, व त्यातून निर्दोष सुटू शकता. देव तुम्हाला शिक्षा करणार नाही.'

हे सर्वात मोठे असत्य आहे ज्याद्वारे सैतानाने जगाला फसविले आहे. सैतानाच्या या असत्यावर अनेक विश्वासणार्यांचा विश्वास आहे. अनीतीचे हे रहस्य असे आहे की हे असत्य इतके कार्यरत झाले की त्यात अनेक लोकांची फसवणूक झाली. या असत्यपणाचा कळस म्हणजे असा ख्रिस्ती समाज होय जो सैतानाला बाबेलच्या रूपात वधू देतो.

प्रकटीकरण 17:5 मध्ये तिच्याविषयी गूढ हा शब्द वापरला आहे, अगदी मंडळीला गूढ म्हटले आहे तसे. खोटी मंडळी या खुनेने ओळखल्या जाऊ शकते जी सैतानाच्या असत्याविषयी सांगेल की तुम्ही पाप करू शकता परंतु देव ते गंभीररित्या घेणार नाही.

जर नास्तिक लोक असा प्रचार करतील तर आपण ते समजू शकतो; परंतु, ख्रिस्ती प्रचारक आपल्या मंडळीला असे कसे सांगू शकतात? आजचे ख्रिस्ती लोक जर पवित्रता धारण करणार नाही तर ते कसे या असत्य चिन्ह चमत्कारांद्वारे वर घेतले जातील? पवित्र नसताना ते असे कसे म्हणू शकतात की ते पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. खरोखरच हे रहस्य आहे - अनीतीचे रहस्य. सातवा कर्णा वाजेल तेव्हा सर्व गूज पूर्ण होतील आणि सैतानाने केलेली फसवणूक सर्व जगासमोर स्पष्टपणे उघड होईल. परंतु आज देवाचे दास, संदेष्टे त्याविषयी सांगत आहेत (प्रकटीकरण 10:7).