लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

आपण दररोज ज्या परिक्षांना सामोरे जातो त्याच परिक्षांना येशूही सामोरा गेला (इब्री ४:१५). त्याला आमच्याप्रमाणेच सर्व मर्यादा होत्या आणि तरीही त्याने मात केली- कारण त्याला नीतिमत्त्वाची आवड होती व त्याने पापाचा द्वेष केला आणि जेव्हा जेव्हा तो परिक्षेत पडला तेव्हा त्याने पित्याला मदतीसाठी आरोळी मारली (इब्री १:९; ५:७). पवित्र आत्म्याने येशूला तो मानव रूपात असताना मदत केली - आणि पवित्र आत्मा त्याच प्रकारे तुम्हांलाही मदत करेल.

तरुणपणी येशू मोहांना कशा प्रकारे सामोरा गेला याचा सदैव विचार करा. सर्व तरुणांना ज्या मोहांची ओढ असते ती त्यानेही अनुभवली. मोहांवर मात करणे त्याच्यासाठी काही सोपे नव्हते. खरे तर ते अधिक कठीण गेले असावे, कारण त्याचा स्वभाव पूर्णपणे शुद्ध होता आणि त्यामुळे मोह ही गोष्ट त्याच्यासाठी अधिक ओंगळवाणी होती - आणि त्यामुळे मोहाची त्याच्यावरील ओढ आपल्यापेक्षा मजबूत असावी. आणि तरीही त्याने मात केली.

आणि आता मोहाच्या रस्सीखेचात येशू आपल्या बाजूने आहे - आणि तो तुम्हांला मदत करायला तत्पर आहे. शत्रूच्या बाजूने स्थिर उभा असलेला बलवान म्हणजे आपला गर्व होय. त्याच्या शेजारी स्वार्थ नावाचा आणखी एक बलवान आहे. पण इतर सर्व पापांसह या दोन्ही पापांना ओढण्यास देव तुम्हांला मदत करेल - आणि तुम्ही मात कराल. प्रभूची स्तुती असो!

येथे एक अभिवचन आहे: "तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास येशू समर्थ आहे" (यहूदाचे पत्र २४). विश्वासाने चालणे हे शारीरिक चालण्याप्रमाणेच शिकावे लागते. सुरुवातीला बाळाप्रमाणेच तुम्ही अनेकदा पडाल. पण जसेजसे तुम्ही नेटाने पुढे जाल तसेतसे पडणे कमी होत जाईल. शेवटी, पडणे क्वचितच घडेल, पण कधीही अशी वेळ येणार नाही, जेव्हा महान संतही असे म्हणू शकेल की तो कधीही पडणार नाही.

जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्हांला ते 'पाप' वगळता इतर नावाने संबोधण्याचा मोह होऊ शकतो. ते धोकादायक आहे. आपल्या पापांची वैयक्तिक जबाबदारी टाळण्यासाठी आपल्या पापांना 'चूक', 'घोडचूक' इत्यादी म्हणणारे अनेक जण आहेत. ते रोम ७:१७ चाही चुकीचा उल्लेख करतात , "तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते…..'' त्यांच्या उघड पापांसाठी बहाणा मिळावा म्हणून. हा धोकादायक मार्ग आहे. ते टाळा - कारण मग तुम्ही स्वत:ची फसवणूक कराल, आणि इतर अनेक लोकांप्रमाणे आपले जीवन जगाल. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर देव आपल्याला क्षमा करण्यासाठी आणि आपल्याला शुद्ध करण्यासाठी विश्वासू राहील (१ योहान १:९). पण जर आपण आपल्या पापांना "चुका" म्हटले तर शुद्ध करण्याचे कोणतेही वचन नाही. येशूचे रक्त केवळ पाप शुद्ध करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही पाप करता तेव्हा नेहमी प्रामाणिक राहा. त्याला "पाप" म्हणा, त्यापासुन वळा, त्याचा तिरस्कार करा, त्याचा त्याग करा, ते देवापुढे कबूल करा - आणि मग ते विसरून जा, कारण ते पुसून टाकण्यात आले आहे.

मनोवृत्तीची पापे कृतीच्या पापांपेक्षा अधिक गंभीर असतात कारण त्यांना सहजासहजी ओळखता येत नाही. येथे मनोवृत्तीची काही पापे आहेत: गर्विष्ठपणा, टीकात्मक मनोवृत्ती, कटुता, मत्सर, मनात इतरांचा केलेला न्याय (तुम्ही जे ऐकले आहे किंवा पाहिले आहे त्यावरून - यशया ११:३), स्वत:पुरते पाहणे, स्वार्थीपणा, परूशीवाद इत्यादि.

जर एखादा विश्वासणारा पापावर विजय मिळाल्याचा प्रचार करतो, इतरांकडे तुच्छतेने पाहतो तर त्याला हे कळत नाही की त्याला सर्वांत मोठ्या पापावर विजय प्राप्त झालेला नाही ते म्हणजे - आध्यात्मिक गर्व. इतरांना तुच्छ लेखणे म्हणजे सतत व्यभिचार करण्यासारखेच आहे. आणि अशा विश्वासणाऱ्या व्यक्तीने पापावरील विजयाबद्दल बोलणे हास्यास्पद आहे! तुम्ही जितके आध्यात्मिकरित्या वाढाल तितके तुम्ही अधिक पवित्र व्हाल आणि तुम्हांला पापावर जेवढा अधिक विजय मिळेल तेवढे तुम्ही अधिक नम्र व्हाल. हा खऱ्या पवित्रतेचा प्राथमिक पुरावा आहे. फळ देणाऱ्या झाडामध्ये सर्वाधिक फळे असलेल्या फांद्या सर्वाधिक झुकलेल्या असतात!

अनेकजण मानवी आत्मसंयमाचा 'दैवी स्वभावाशी असलेल्या सहभागितेशी' गोंधळ करतात. मानवी आत्मसंयमामुळे बाह्य सुधारणा होऊ शकते. पण माणूस त्याच्या आंतरिक मनोवृत्तीत गर्विष्ठ, घमेंडखोर आणि परूशीवादी असाच राहील. पापावर मात करण्यासाठी देवाकडून कृपा मिळवण्यासाठी आपल्याला बोलावले आहे - आणि आपल्याला जे फुकट मिळाले आहे त्याचा आपल्याला कधीही गर्व वाटणार नाही. आपण जे उत्पन्न केले त्याचाच आपल्याला गर्व वाटू शकतो - आणि आपल्या प्रयत्नांमुळे आपण निर्माण केलेले पावित्र्य हे नेहमीच खोटे पावित्र्य असेल.

तुम्हाला ज्या दैवी स्वभावात सहभागी होण्यासाठी बोलावले आहे ती प्रीती आहे. देव उपकार न मानणाऱ्या आणि दुष्ट लोकांसाठीही दयाळू आणि चांगला आहे आणि तो वाईटांवर आणि चांगल्या लोकांवरही सूर्य उगवितो (मत्तय ५:४४-४८). तुम्हीही पाळले पाहिजे असे हे उदाहरण आहे. सगळ्यांवर प्रीती करा - ते तुमच्याशी सहमत असो वा नसोत. सर्व वादग्रस्त चर्चा आणि वादविवाद टाळा - जसे की तुम्ही एखादा जीवघेणा रोग टाळाल. जर तुमच्या आजूबाजूच्या इतरांना एखाद्या गोष्टीबद्दल वाद घालायचा असेल तर त्यांना प्रीतीने सांगा की तुम्हांला सर्व वाद टाळायला आवडेल. प्रीतित परिपूर्ण होण्यासाठी मनापासून पाठपुरावा करा.