WFTW Body: 

देवाकडून कृपा प्राप्त झाल्याशिवाय कोणीही नवीन कराराच्या आज्ञांचे पालन करू शकत नाही. काहींना नियमशास्त्रातील दहा आज्ञांपैकी पहिल्या नऊ आज्ञा कृपेशिवाय पाळता येतील. परंतु दहावी आज्ञा - "आपल्या नसलेल्या कोणत्याही गोष्टीची हाव बाळगू नये "(अनुवाद ५:२१) - देवाच्या कृपेशिवाय कोणीही पाळू शकत नाही. आणि कोणीही कृपेशिवाय (मत्तय ५ ते ७ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे) नवीन कराराच्या जीवनाच्या उंचीवर जाऊ शकत नाही. आणि देव कृपा केवळ दीनांवर करतो (१ पेत्र ५:५).

नम्रता हा एक असा गुण आहे ज्यात सर्वात सहजपणे बनावट केली जाते . खरी नम्रता ही आपल्यामध्ये इतरांना दिसणारी गोष्ट नाही. आपल्यामध्ये जे ईश्वर पाहतो तीच ती आहे - आणि ती अंतर्गत आहे. येशूचे जीवन हे याचे उदाहरण आहे. फिलिप्पै २:५-८ आपल्याला सांगते, की येशूने देव या नात्याने आपल्या विशेषाधिकारांचा व अधिकारांचा त्याग केला आणि तो दास बनला आणि तो माणसांच्या हातून वधस्तंभही स्वीकारण्यास तयार होता. नम्रतेच्या त्या मार्गावर आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे.

येशूने तीन पायऱ्यांनी स्वतःला लीन केले.
१. तो मनुष्य झाला.
२. तो दास झाला.
३. क्रूसावर तो गुन्हेगाराप्रमाणे वागवून घ्यायला तयार होता.
तेथे आपल्याला ख्रिस्ती जीवनाची तीन रहस्ये दिसतात: नम्रता, नम्रता आणि नम्रता.

येशू पृथ्वीवर ३३ वर्षे जगला आणि इतरांची इतक्या नम्रपणे सेवा करत आहे आणि धीराने दुःख, अपमान व जखमा सहन करत आहे असे जेव्हा देवदूतांनी पाहिले असेल तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले असावे. स्वर्गात वर्षानुवर्षे त्याची उपासना करण्याची त्यांना सवय होती. परंतु जेव्हा त्यांनी पृथ्वीवरील त्याचे आचरण पाहिले, तेव्हा त्यांना देवाच्या स्वभावाबद्दल - त्याच्या लीनतेबद्दल आणि नम्रतेबद्दल - असे काहीतरी अधिक कळले की जे येशू स्वर्गात असताना त्यांनी कधीही पाहिले नव्हते किंवा त्यांना समजले नव्हते. आता देवाला, स्वर्गातील देवदूतांना ख्रिस्ताचा तोच आत्मा मंडळीमधून आपल्याद्वारे दाखवायचा आहे (इफिस ३:१० मध्ये सांगितल्याप्रमाणे). देवदूतांना आता आपल्यात आणि आपल्या आचरणात काय दिसते? आपल्या वर्तणुकीमुळे देवाचे गौरव होते का?

नम्रता हा सर्वांत मोठा सद्गगुण आहे, हे लक्षात ठेवा. नम्रता कबूल करते की आपण जे काही आहोत आणि आपल्याकडे जे काही आहे ते सर्व देवाच्या देणग्या आहेत. नम्रतेमुळे आपण सर्व मनुष्यांना, विशेषत: दुर्बल, असंस्कृत, मंदबुद्धी आणि गरीब लोकांना महत्त्व देतो आणि त्यांचा आदर करतो. नम्रतेच्या त्या भूमीवरच आत्म्याचे फळ आणि ख्रिस्ताचे गुण वाढू शकतात. म्हणून तुम्ही सतत स्वत:चा न्याय करत जगले पाहिजे, जेणेकरून उच्च विचारांचे, सन्मानाचे किंवा परमेश्वराला दिले जाणारे गौरव स्वतःला मिळवण्याचे कोणतेही विष कधीही तुमच्या अंतःकरणात कधीही प्रवेश करणार नाही. येशूच्या नम्रतेवर पुष्कळदा मनन करा. हा माझा तुम्हाला दिलेला सर्वात महत्त्वाचा बोध आहे.

येशूने आपल्या सत्तर शिष्यांना सांगितले, " भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना." (लूक १०:२०). आपण खालील बाबतीत आनंद करता कामा नये: (अ) आपण जे आहोत ते; (ब) आपण जे काही केले आहे; किंवा (क) आपण काय करू शकतो. परंतु आपण याबतीत आनंद व्यक्त केला पाहिजे: (अ ) परमेश्वर कोण आहे; (ब) परमेश्वराने जे केले आहे ते; आणि (क) परमेश्वर काय करेल. आपण जे करू शकतो त्याबद्दल जेव्हा आपण आनंदित होतो, तेव्हा आपल्याला स्वत:ला ते गौरव मिळते आणि त्यामुळे आपण इतर विश्वासणाऱ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे वाटते. हा परूशीवाद आहे. मग आपण "आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदित" होतो (प्रेषितांची कृत्ये ७:४१) - मग ते कार्य भुते काढणे असो, आजारी लोकांना बरे करणे, वचनाचा प्रचार करणे, लेख लिहिणे, आतिथ्यशील असणे, चांगले जेवण बनवणे, गाडी चालवणे किंवा पृथ्वीवरील एखादे कार्य उत्तम रीतीने करणे इ., स्वतःचे गौरव करण्याचे अनेक मार्ग आहेत. पण ही सगळी मूर्तिपूजा आहे. परंतु, देवाने जे काही केले आहे त्यावरूनच जेव्हा आपण आनंदित होतो, ज्यामुळे आपण नम्र राहतो आणि इतर सर्व विश्वासणाऱ्या लोकांबरोबर आपण समान पातळीवर असतो आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचे शरीर निर्माण केले जाऊ शकते.